Thursday, June 4, 2015

नमस्कार माझ्या प्रिय वाचकांनो,
मी हनुमंत, मी आज तुमचा जास्त वेळ न
घेता कथेला सुरुवात करत आहे...............
माझा एक मित्र आहे "सोनु". सुमारे २
वर्षांपुर्वी त्याच्यासोबत
हि घटना घडलेली आहे. मित्रांनो, खरतर
रात्री तळलेले पदार्थ खाऊन
शहराच्या बाहेर गेल्यावर काय अनुभव
येतो त्याबद्दल हे एक उत्तम
दाखला आहे.........
सोनु आणि त्याचा एक मित्र
दुसर्या गावी गेले होते. त्या रात्री परत
आपल्या घरी येण्यासाठी निघण्याअगोदर
त्यांनी तळलेले समोसे खाल्ले होते.
त्या गावी सोनु चे मामा राहत होते.
खुप दिवसांपासून ते एकमेकांना भेटले नव्हते
आणि सोनुलाही त्याना भेटायचे
होते म्हणून ते त्या गावी गेले होते. ते
गाव लातुर पासून सुमारे ३०
किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे ते
दोघेही तिथे बाईकवरुन गेले होते. तिथे
गेल्यावर त्यांनी सोनुच्या मामासोबत
गप्पागोष्टी केल्या आणि रात्रीचे
जेवणही उरकून घेतले.
त्या रात्री सोनुला तिथेच रहायचे होते
पण, त्याच्या घरावर एक छोटेसे संकट
आल्यामुळे त्या रात्री ११
वाजता त्यांना परत निघावे लागले.
निघण्याअगोदर त्यांनी पुरी भाजी
आणी समोसे खाल्ले
होती. त्याच्या मित्राने त्याला सांगितले
की, आपण इथेच राहुयात. सकाळ झाल्यावर
आपण घराकडे निघुयात. पण
सोनुच्या हट्टी स्वभावामुळे ते दोघे
रात्रीच निघाले. ज्या रस्त्यावरुन ते
निघाले होते तो रस्ता अतिशय खराब
होता. त्यामुळे सोनु बाईक हळुवार चालवत
होता. तिथून निघाल्यावर १८
किलोमीटर अंतरावर त्यांना एक पुल
लागला. त्या पुलावर त्यांची बाईक
येताच अचानक बंद पडली. त्यांनी बाईक
स्टॅंडवर लावली आणि नेमके बाईकला काय
झाले ते बघण्यासाठी खाली उतरले. ते
आजुबाजुला काही मदत मिळते का हे
पाहतच होते, इतक्यात
त्यांना त्या पुलाखाली एक बाई
झोका घेताना दिसली. त्यांना तो काय
प्रकार आहे ते काही कळले नाही. ते परत
आपल्या बाईकजवळ आले आणि बाईक सुरु
करण्याचा प्रयत्न करु लागले. ते प्रयत्न
करतच होते की, इतक्यात अचानक ती बाई
त्यांच्यासमोर येऊन
उभी राहिली आणि त्यांच्याशी वेगळ्या
भाषेत
बोलू लागली. त्यांनी तिच्याकडे पाहिले
तर त्यांना धक्काच बसला.
त्या बाईच्या एका हाताचा सापळा बनला होता,
तिच्या डोक्याची कवटी दिसत
होती आणि तिचे डोळे पांढरे झाले होते.
तिच्या डोळ्यातून रक्त येत होते
आणि त्या बाईचे पाय उलटे होते. ते पाहून
तर त्यांचे अवसानच गळून पडले.
त्यांनी लगेच तिथून पळ काढला.
त्यांना पळताना बघताच
ती बाईही त्यांच्या मागे पळू लागली. ते
दोघेही जिवाच्या आकांताने पळत होते.
पळता-पळता त्यांना एका शेतात एक छोटस मोडकळीस
आलेली झोपडी दिसली, ते दोघे
मदतीसाठी त्या झोपडीकडे
धावली ते दोघे जोरजोराने दरवाजा ठोठावत होती
शेवटी एका म्हतार्या आजीने दरवाजा उघडला
आणी त्यांना आत घेतल् तेव्हा त्यांनी
घडलेली घटना त्या आजीबाईला
सांगीतल. मग त्या आजीबाईने त्यांना देवाचा अंगारा
लावला आणी झोपु घातल. सकाळी जेव्हा ते दोघे
परत त्या मार्गाने घरी जायला निघाले तेव्हा त्यांनी
पाहील की त्या पुलाखाली
गर्दी जमलेली होती. ती
गर्दी कशामुळे जमलीये हे
पाहण्यासाठी ते दोघे जेव्हा त्या पुलाखाली गेले
तेव्हा त्याना समोरील दृश्य पाहुन आश्चर्याचा धक्काच
बसला. की ही तीच स्ञी
होती जी काल राञी
पुलाखाली झोका खेळत होती..........
BY @ हनुमंत गोटमवाड
http://bhutbanglaa.blogspot.com/
या ब्लॉग वर तुम्हाला रोज नवीन नवीन कथा पाहायला मिळतील … मग लगेच भेट द्या वाट कसली पाहताय…. तुमची कोणती भयकथा वाचायची राहून गेली असेल तर तुम्हाला ती ब्लॉग वर जरूर भेटेल….
हा प्रसंग लहान आहे. पण
माझ्यासाठी जीवनातला अतिशय
अविस्मरणीय प्रसंग आहे.
माझ्या पणजीच्या बाराव्याची गोष्ट
आहे. मी आणि माझ्या आईकडचे सगळे
नातेवाईक कोकणच्या संगमेश्वर
गावी गेलो होतो.
मी तेव्हा पाचवीला होतो. माझ्यासोबत
तेव्हा माझ्यापेक्षा एक वर्ष
मोठा माझा मावस भाऊ होता.
तो नेहमी मला घाबरवत असे.
आजीचे सगळे विधी उरकले होते.
आम्ही मुंबईला निघणारच होतो. आजीचं
घर जुन्या मांडणीच होतं. स्वयपाक
घरामध्ये मागे एक दरवाजा होता, जो थेट
घराच्या मागच्या बाजूला उघडत असे.
तिथे बरीच झाडी होती. थोडेसे जंगलंच
म्हणा!
मी आणि माझा भाऊ शू साठी तिथे गेलो.
रात्रीचे साधारण साडेनऊ दहा झाले
होते. माझा भाऊ माझ्या खोड्या काढत
मला घाबरवत होता.
आम्हाला झाडावर
काहीतरी उद्या दिसले. ते जंगल होते.
साहजिकपणे मला वाटले कि कोणी माकड
असेल. दादाने दगडी उचलल्या,
आणि मारायला लागला.
इतक्यात त्याच्यासमोर चारपाच फूट उंच
एक काळाकभिन्न खाडी उडी मारून येउन
उभा ठाकला. त्याचं रूप अतिशय भयानक
होतं. काळाकुट्ट, बुटका, अतिशय कुरुप.
डोळे वेगळ्या रंगाचे होते. आणि विवस्त्र
होत. मी त्याला कधीही विसरू शकणार
नाही. तो एकदमच समोर आला होता.
आम्हाला पाळता भुई थोडी झाली.
माझा भौतर मला मागे खेचून टाकून
पळाला. आम्ही कसेबसे घरात पोचलो.
दार आतून लाऊन घेतले.
आम्हाला आधीच सांगितले होते,
कि मागच्या बजुला जाऊ नका.
तरीही आम्ही गेलो होतो.
आम्ही मोठ्यांचा ओरडा बसू नये, म्हणून
शांत बसून राहिलो. कोणाला काहीच
सांगितले नाही. पण ते समजल्याशिवाय
राहिलेही नाही.
त्याच रात्री आम्ही खूप आजारी पडलो.
आम्ही घाबरलो आहोत हे
सर्वांच्या लक्षात आलं. सर्वांनी खोडून
खोडून विचारलं. आम्हाला खरं बोलावं
लागलं.
तेव्हा आम्हाला असं सांगितलं,
कि तो तिथल्या जागेचा यक्ष होता.
रक्षक देवतेला जुने लोक जागेवाला म्हणत
असत. त्याच्या जागी शु केली आणि दगडं
मारली म्हणून तिने आम्हाला घाबरवलं.
तो जागेवाला रागावला होता.
असो…
पुन्हा असं नाही झालं .
खोटं वाटू शकतं… पण जे झालं ते असं
झालं. . . .
असो…"
*****************************
तो यक्ष असावा.
यक्ष हा एखादा पाणवठा, जंगल,
किवा डोंगरी अशा वेगवेगळ्या भौगोलिक
पर्यावासाशी बांधली गेलेली देवताच
असते. यक्षाकडे त्या जागेचे अधिकार
असतात. तिथे त्याचा वावर असतो. ते
क्रूर नसतात.
आणि सहसा कोणाला कधी इजाही नाही
ह्या यक्षांना देवता म्हणता येण्याइतपत
ते शक्तिशाली असतात कि नाही, हे
माहित नाही; पण यक्ष शापित
देवता असतात असे
आमची आजी आम्हाला सांगत असे.
ह्या गोष्टी ऐकायला आजही तेवढीच
उत्सुकता जाणवते.
http://bhutbanglaa.blogspot.com/
या ब्लॉग वर तुम्हाला रोज नवीन नवीन कथा पाहायला मिळतील … मग लगेच भेट द्या वाट कसली पाहताय…. तुमची कोणती भयकथा वाचायची राहून गेली असेल तर तुम्हाला ती ब्लॉग वर जरूर भेटेल….
माझ नाव अवि पाटील माझ मुळ गाव परभणी . आणि
मी अनुभव केलेल्या एक विचित्र घटने बद्दल तुम्हाला
आज सांगणार आहे
मी तेव्हा नुकतीच बारावीची परीक्षा पास केली होती .
गुण थोडे कमी होते म्हणून तालुक्याच्या गावी
Admission घ्यावे लागले . त्यामुळे मला तिथेच
कॉलेज जवळ एखादी राहण्याची खोली भाड्याने शोधावी
लागली . आणि नशिबाने मला अशी रूम सापडली माझ्या
सोबत माझे ३ मित्रसुद्धा होते रूम शेअर करायला .
आमची रूम एका दुमजली इमारतीत होती. आणि एक
मस्त हवेशीर मोकळ टेरेस सुधा होत तिला .
एके दिवशी आमचा रूम पार्टनर असलेल्या निलेश ने
सांगितलं कि हि इमारत ज्या ठिकाणी उभी आहे तिथे
आधी मसनवटा म्हणजे स्मशान होत . आणि ते खरच
होत कारण आमच्या इमारतीच्या बाजूला सुमारे ५०
मीटर अंतरावर हिंदू श्मशान भूमी होती आम्ही कधी
कधी जेव्हा टेरेस वर जायचो तेव्हा . जळणाऱ्या चितेचा
धूर आणि अग्नी दिसत असे. पण आम्हाला कधीच या
गोष्टीची भीती वाटली नाही .
माझा रोज रात्रीचा एक प्रोग्राम फिक्स होता . जेवण
झाल कि मी टेरेस वर जाऊन माझ्या गर्लफ्रेंड शी जिच
नाव गुड्डी होत रात्री उशिरा पर्यंत फोन वर गप्पा
मारत बसायचो . आणि मी तसा निडर होतो आणि भूत
प्रेतांवर विश्वास सुधा नव्हता . आणि भिण्याच कारण
नव्हत कारण मी जेव्हा फोन वर बोलायचो तेव्हा
आमच्या इमारतीला चिटकून असलेल्या दुसर्या
इमारतील राहणाऱ्या कुटुंबातील एक बाई रोज
जेवणानंतर . शतपावली साठी तिथे येत असायची .
पण एक दिवस झाल अस कि ती बाई २ ते ३ दिवस
शतपावली साठी येत नव्हती पण माझा आपल रोजच
फोने वर बोलण चालूच होत. असाच एका रात्री बोलता
बोलता १२ वाजले . मी आपल्या धुंदीत होतो . अचानक
बाजूच्या इमारतीच्या टेरेस चा दरवाजा उघडला आधी
मी विचार केला कि ती बाजूची बाई असेल . पण लक्षात
आल कि रात्रीचे १२ वाजले आहेत आणि या वेळेला ती
शतपावली कशी काय वर येवू शकते कारण रोज तर ती
१० पर्यंत तिची शतपावली आटोपून निघून जायची. पण
वाटल कि २ ते ३ दिवस ती आली नव्हती आणि आज
उशीर झाला असेल जेवणाला म्हणून आली असेल .
म्हणून मी आपला टेरेस च्या भिंतीला चिटकून खाली
बसलो आणि फोन वर बोलू लागलो .
५ मिनिट झाले असतील अचानक मला बाजूच्या टेरेस वर
कोपर्यात कोणी तरी लोखंडी सळीने काही तरी ठोकतय
असा आवाज झाला . मी उठलो आणि पहिले पण टेरेस
वर कोणीच नव्हते आणि आवाजही होत नव्हता . मला
वाटल गेली असेल ती म्हणून मी पुन्हा खाली बसून बोलू
लागलो . जसा मी खाली बसलो तसा तो आवाज पुन्हा
येवू लागला . मी परत उठून पाहिलं म्पण सगळ शांत
म्हणून मी त्यांच्या टेरेस जवळ गेलो . जसा मी टेरेस
जवळ गेलो तसा तो आवाज पुन्हा येवू लागला आणि
यावेळी तो जोरात कोणीतरी लोखंडी सळीने जमिनीवर
वार करण्याचा आवाज येत होतो मी आवाज दिला .
वाहिनी तुम्ही आहात का तिथे . जसा मी आवाज दिला
तसा येणारा आवाज शांत झाला पण काही उत्तर नाही
आले . आणि २ मिनिटात पुन्हा तोच आवाज येवू लागला
आवाज टेरेस च्या एका कोपर्यातून येत होता . अंधार
असल्यामुळे मला निट दिसत नव्हते. मी विचार केला कि
जाऊन पाहूया . म्हणून मी आमच्या टेरेस च्या कॉमन
भिंतीवर चढलो आणि त्यांच्या टेरेस मध्ये उडी मारली .
आणि हळूच त्या कोपर्याजवळ गेलो आणि तिथल दृश्य
पाहून घामच फुटला कारण तिथे कोणीच नव्हते फक्त
एक लोखंडी सळी आपोआप जमिनीवर आपटत होती .
मी तसाच धावत पळत त्या टेरेस वरून आमच्या टेरेस
वर उडी मारली आणि अंगातील सगळी शक्ती एकवटून
मी माझ्या रूम मध्ये पळालो आणि सरळ जाऊन
अंगावर चादर घेऊन झोपलो .
सकाळी उठल्यावर झालेली हकीकत सांगितली मला ताप
सुधा आला होता . निलेश कडून कळले कि बाजू वाले तर
अजून आलेच नाही आहेत . भीती अजून भर पडली कि
रात्री दरवाजा कोणी उघडला . मी वडिलांना फोन करून
सगळ सांगितलं त्यांनी ताबडतोब मला तिथून घेऊन गेले
आणि माझ Admission पुण्याच्या एका कॉलेज मध्ये
केले .
मित्रानो कधी कधी अदृश्य गोष्टी हि मनात एक भीती
निर्माण करून जातात . त्या जर खरच दिसू लागल्या
तर आपली हालत काय होईल याचा विचारही करू शकत
नाही . स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा.
http://bhutbanglaa.blogspot.com/
या ब्लॉग वर तुम्हाला रोज नवीन नवीन कथा पाहायला मिळतील … मग लगेच भेट द्या वाट कसली पाहताय…. तुमची कोणती भयकथा वाचायची राहून गेली असेल तर तुम्हाला ती ब्लॉग वर जरूर भेटेल….
गुढ रहस्य: (मित्राकडून एकलेली )
कधी कधी माणसाच्या जीवनात काही
भयानक आणि विचित्र घटना घडतात. त्या
घटनेचा प्रभाव माणसाच्या मनावर खोल
कुठेतरी पडतो. तो त्यातुन बाहेर निघतोही
पण,जी काळी शक्ती असते ती त्याला पुन्हा
स्वतःकडे ओढून घेते. असच काही घडले होते ते
माझी मैत्रीण दिप्ती हिचा चुलतभाऊ
चेतनसोबत. त्याला जो अनुभव आला तो
अनपेक्षित व मानवी मनाला विचलित
करणारा आहे. ही कथा विस्तृत स्वरुपात न
सांगता महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या
सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. चेतन , देवगड
येथे शाळेत दहावीला शिकत होता. एके
दिवशी नेहमीप्रमाणे तो शाळेत
गेला.संध्याकाळचे ६.०० वाजले होते तरी तो
घरी आला नव्हता. सर्वत्र शोधाशोध
सुरु केल्यावर घरातल्यांना तो हनुमानाच्या
मंदिरासमोर बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याचा
चेहरा काळवडंलेला होता आणि हातातून रक्त
वाहतहोते. त्याला ताबडतोब घरी आणले.
गावातील एका वैद्यालाबोलवून औषधपाणी
केल्यावर त्याला शुद्ध आली. शुद्धीवरआल्यावर
तो काहीच बोलत नव्हता. त्याच्या डोळ्यात
अनामिक भिती होती. चार-पाच
दिवसानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा
झाली नाही. उलट दिवसेंदिवस त्याची प्रकृती
खालावत चालली होती. घरातले जबरदस्तीने
त्याला खायला भरवत होते. आई व आजीने
त्याच्यासाठी पुजापाठ केलेतरी काही
होईना. एक महिन्यानंतर दिप्तीच्या
वडिलांनी हवापालट म्हणून चेतनला मुबंईला
आणले. तिच्या वडिलांच्या जवळच्या मित्राने
एका नामांकित समोहंन तज्ञाचे नाव सुचवले.मग
चेतनला तिथे घेऊन गेल्यावर त्याच्यावर
उपचारकरण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्याने
उपचाराना प्रतिसाद दिला व हळूहळू प्रकृतीत
सुधारणा झाली. तज्ञांनी त्याच्या मनातील
भीती काढून टाकली. सर्वांनाप्रश्न पडला
होता की चेतनबरोबर असे काय घडले होते.
त्या प्रश्नांची उत्तर उपचारादरम्यान
सापडली. उपचाराच्यावेळी त्याने सांगितले
की, त्यादिवशी चेतन शाळा सुटल्यावर
मित्रासोबत मजामस्ती करत घरी येत होता.
त्याचा मित्र त्याच्या घराच्या वाटेने निघून
गेला. गाणे
गुणगुणत तो जंगलातुन जाणा-या वाटेने घरी येत
होता की त्याला 'शुऽऽक शुऽऽक' असा हाक
मारल्याचा आवाज आला. त्याने मागेपुढे
पाहिले परंतु कोणीच दिसले नाही. मग आवाज
आला कुठून? थोड्या वेळाने 'अरे वर बघ जरा'
असे कोणीतरी बोलले. वर पाहिले तर तिथेच
जवळच असलेल्या चिँचेच्या झाडावर
म्हातारीबसली होती आणि ती चिँच खात
होती. तिला पाहून त्याला हसुच आले. तो
तिला मजेत म्हणाला,"ये म्हातारे चिँच चवीला
कशी आहेत
गं?" ती म्हणाली,"तुला हवी असतीलतर ये वर
आणि घे चव या आंबटगोड चिँचाची." "नको
मला लवकर घरी यचे आहे. उशीर झाला तर आई
ओरडेल." "मी तुझ्या आजीसारखीच आहे असे समज
आणि घे आस्वाद चिंचाचा."
आंबटगोड चिँच कोणाला आवडत
नाहीत,त्यालाही आवडत होती. तशी
त्याला भुक लागलीच होती. तो घरी जायच
विसरला आणि झाडावर चढून त्या
म्हातारीच्या शेजारी जाऊन बसला. "घे बाळ
खा पोटभरुन चिँच. तुला आवडत
असतीलच." "हो आवडतात ना. आम्ही सर्व मित्र
शाळेच्या जवळ असलेल्या झाडावरुन चिंच तोडून
खातो. पण आज नाही खाल्ली." "मग खा
आता. घे लवकर." तिच्या हातातुन त्याने चिँच
घेतली आणि तो खाऊ लागला. तो खाण्यात
गुंग होता की अचानक त्या म्हातारीने
त्याचा हात पकडला आणि ती जोरात चावू
लागली. आता ती खुपच विद्रुप दिसत होती.
तिला पाहून तो घाबरलाच. तिचे मोठे
सुळ्यासारखे दात त्याच्या हातात घुसले होते
आणि ती त्याचे रक्त पित होती. त्याला
असंख्य वेदना होत होत्या पण, तो काही करु
शकत नव्हता कारण तिने घट्ट् पकडून ठेवले होते.
थोडेसे रक्त पिल्यावर ती म्हणाली,"आज मला
रक्त मिळाले.
चार-पाच महिन्यापुर्वी माझ्या नव-याने
मला मारुन ह्या झाडाखाली पुरले होते.
तेव्हापासुन माझा आत्मा अद्रुश्य रुपात ह्या
झाडावर असतो.मला रक्ताची गरज होती व
त्यासाठी शरीर हवे होते. एक म्हातारी येथुन
जात होती. तिला मारुन तिच्या शरीरात
प्रवेश
घेतला. रोज तुला येथुन जाताना पाहते. आज
ठरवलेच तुला जाळ्यात फसवायचे व तु फसलास.
आता तुझी सुटका नाही.तुझे रक्त पिऊन मी
माझा आत्मा तृप्त करेन." येवढे म्हटल्यावर तिने
परत आपले सुळ्यासारखे दात
त्याच्या हातात घुसवले व रक्त पिऊ लागली.
चेतनला कळुन चुकले होते की आपण फसलोय.येथुन
सुटका करुन घेणे गरजेचे आहे. त्याने जास्त विचार
न करता तिच्या हाताला जोरात हिसका
दिला व त्याने सरळ त्या झाडावरुन खाली
उडी टाकली. झाडावरुन पडल्यामुळे त्याला
जबरदसत मार बसला पण, त्याने सारी शक्ती
एकवटली आणि तो जिवांच्या आंकाताने जी
वाट दिसेल त्या वाटेने सैरावैरा पळत सुटला.
त्याच्या शरीरातील शक्ती संपत
चालली होती पण, पळत राहणे हाच एकमेव मार्ग
होता. धडपडत तो हनुमानाच्या मंदिरासमोर
आला. 'देवा मला वाचव. माझे रक्षण कर' हे तो
पुटपुटला आणि भोवळ येऊन तो तिथेच पडला.
प्रकृतीत सुधारणा झाल्यावर
दिप्तीच्या वडिलांनी चेतनला गावी

भयकथा ---- माटी कहे कुम्हारको--- नारायण धारप ---

साहेबांची बदली झाली आहे आणि त्यांच्या जागेवर कोणी जोग नावाचे साहेब रुजू होणार आहेत एवढं अनूच्या कानांवर आलं होतं . पण तिच्या मनात कसली शंकाही आली नव्हती . ऑफिसचे चार्ज दिले घेतले गेले असतील , अगदी वरच्या पातळीवर ओळखी करून देण्यात आल्या असतील , तिच्यापर्यंत त्यातलं काहीच पोहोचण्यासारखं नव्हतं आणि जेव्हा शिपाई सांगत आला की , ' बाई ! साहेबांनी केबिनमध्ये बोलावलंय ! ' तेव्हाही ती स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत केबिनमध्ये गेली होती . इतरांच्या , विशेषतः पुरुषांच्या मतांबद्दलची बेफिकिरी तिच्या रक्तातच भिनल्यासारखी झाली होती . तिला साहेबांवर प्रभाव पाडायचा नव्हता , त्यांची मर्जीही संपादन करायची नव्हती - तिचं काम ती प्रामाणिकपणे करणार होती . त्यामुळे ती इतकी बेसावध होती . पण म्हणून तो धक्का जास्तच तीव्र होता . साहेबांच्या खुर्चीत शरद जोग बसला होता . शरद जोग ! मनातले सर्व विचार गोठले . आपण कोठे आहोत , काय करत आहोत हेच ती क्षणभर विसरून गेली . आधी शरीर बधीर झालं होतं . मग तिला वाटलं , आपण आता चक्कर येऊन खाली कोसळणारच आहोत . आधारासाठी ती भिंतीला टेकून उभी राहिली…. आणि मग मनाच्या अगदी आतल्या गाभ्यातला कठोर निर्धार तिच्या मदतीला आला . लटपटतं शरीर परत ताठ झालं . मनाचा तोल पुन्हा एकदा सावरला होता . तिला जाणवलं की , आपला चेहरा घामाने डवरला आहे . डाव्या हाताने तिने पदराला चेहरा टिपला आणि मग परत एकदा नजर समोर वळवली . शरद जोग . चेहरा अजूनही बदलला नव्हता . केस कपाळावरून जरासे मागे गेले होते . दाढीचा नितळपणा जरासा कमी झाला होता . पण तेच ते किंचित टोकदार नाक . तीच ती अरुंद जिवणी . आणि तेच ते घारे , किंचित जवळजवळ वाटणारे डोळे - जे आता तिच्यावर एक प्रकारच्या मिश्कीलपणे खिळलेले होते . पण म्हणजे त्याला माहीत होतं की , आपण या ऑफिसचे काम करतो आणि मुद्दामच त्याने आपल्याला बोलावून घेतलं होतं - असा धक्का देऊन आपली प्रतिक्रिया काय होते याची गंमत पाहायला ? मनात खोलवर कोठेतरी संतापाचा स्फुल्लिंग जन्माला आला …. नसांच्या शाखाशाखांतून शरीरभर ती धग पसरत गेली - कदाचित तिच्या डोळ्यांत त्याला ती रक्तवर्णी आग दिसली असावी…. कारण तो खुर्चीत एकदम सावरून बसला . घसा साफ करीत तो त्याच परिचित , लाघवी आवाजात म्हणाला , ' अनू ! मला माफ कर हं ! गेले तीन-चार दिवस मी तुला बाहेरच्या ऑफिसात पाहात आहे… तेव्हा म्हटलं , एकदा बोलावून घ्यावं …. पाहावं ओळख तरी पटते का ते ! ' ओळख पटते का पाहणार होता ! वीस वर्षांपूर्वी ज्याला तिने शय्यासोबत दिली होती , ज्याच्या मिठीत ती तासच्या तास सुखावली होती , ज्याने तिच्या कानात प्रीतीच्या आणाभाका हलकेच पुटपुटल्या होत्या , ज्याच्या मुलाची ती आई होणार होती…. त्याची ओळख तिला पटणार नाही ? वीस वर्षंच काय , कालांतरापर्यंत तरी ती त्याला विसरणं शक्य होतं का ? माणूस किती निर्लज्ज , किती नादान होऊ शकतो ? …. मनाच्या तळाखाली लाव्हारस खदखदत होता . कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक झाला असता…. सावधान ! सावधान ! सर्व प्रक्षोभक , स्फोटक विचार दडपून टाकायची मनाला वीस वर्षांची सवय होती … मोठया प्रयासाने तिने मनावर नियंत्रण आणलं . ती बोलली तेव्हा आवाजात कंप होता , स्वरावर ताबा नव्हता , प्रत्येक शब्द तिला घशातून ओरबाडून काढून बाहेर ढकलावा लागत होता - पण ती बोलत होती - 'ओळख कशी विसरणार ? पण - पण इथे भेट होईल ही मात्र कल्पना नव्हती… हा जरासा … जरासा शॉकच होता . ' त्याचा अस्वस्थपणा आता गेला होता . तिच्या मवाळ सुराने , निरुपद्रवी शब्दांनी त्याचा आत्मविश्वास परत आला होता . 'आता ऑफिसातच आहेस… गाठी होतील , नाही का ?' ' हो. ' ती नाही कसं म्हणणार ? 'मग ठीक आहे …. गेलीस तरी चालेल …. ' ती खालच्या मानेनं केबिनबाहेर पडली . ती खुर्चीत बसली होती खरी पण आता तिच्याभोवती ऑफिसमधल्या टेबल-खुर्च्या , टाईपरायटरची खटखट , कर्मचाऱ्यांची ये-जा , टेलिफोनच्या घंटांची खणखण नव्हती…. ती मागे भूतकाळात गेली होती . असं म्हणतात की , माणूस स्वप्नातले प्रसंग रोजच्या व्यवहारातल्यापेक्षा दसपट किंवा शंभरपटही वेगाने , अतिशीघ्रतेने अनुभवत असतो… तो अनुभवाचा पट तिच्या डोळ्यांसमोरून सरसरत गेला …. त्यात भावनांचे किती विविध रंग भरले होते ! ती सतरा वर्षांची होती - वयसुलभ संकोच होता , लज्जा होती , शरीरावर रोमांच उठवणारी स्वप्नं होती… त्यांच्या वाडयात शरद जोग भाडेकरू म्हणून राहायला आला होता . तरणाबांड , उमदा , संभाषणात वाकबगार , लाघवी-आर्जवी आवाजाचा , आकर्षक व्यक्तिमत्वाचा … तिच्या अननुभवी मनावर मोहिनी पडली नाही तरच नवल ! प्रीतीचा गुलाबी रंग होता…. प्रथम स्पर्शाची गहिरी संवेदना होती…. धुंद करणारी मर्दानी शरीराची ती जवळीक…. भीतीने आणि अपेक्षेने धडधडणारं काळीज… कुस्करल्या शरीराच्या वेदनांतून जन्माला आलेलं अतीव सुखाचं सुवर्णकमळ … वर वर सोनेरी दुनियेत घेऊन जाणारा , मनाला बेभान , बेफिकीर बनवणारा तो जादूचा आकाशपाळणा…. पण शेवटी तो पाळणा जमिनीलाच येउन टेकला होता . पायांखाली रेशमी , मुलायम रजया नव्हत्या , कठीण कातळच होता …. शेवटी सोनेरी वर्ख अनुभवाच्या आम्लाखाली ओघळून गेला होता …. दोन पाळ्या चुकल्या याचा अर्थ काय ते समजण्याइतकं तिचं वय खासच होतं . ते एका संध्याकाळी तिने त्याच्या कानात सांगितलं होतं . तिची त्याच्या डोळ्यांवर नजर नव्हती … त्याच्या डोळ्यांत एकाएकी आलेला हिशेबी थंडपणा तिला दिसला नव्हता . त्याने सामान केव्हा , कसं हलवलं ते त्यांना समजलंच नाही . तिला दिसली ती मोकळी , रिकामी , भकास खोली . आई-बाबांपासून ती आपलं गुपित एक दिवससुद्धा लपवून ठेवू शकली नाही . घरात अनर्थ माजला . ती बिचारी मध्यममार्गी , पापभिरू , समाजाला भिऊन वागणारी माणसं - पण भीडेखातर अशीच माणसं अतिशय क्रूर होऊ शकतात , निर्दय होऊ शकतात . संतापाच्या भरात कधी नव्हे तो बाबांनी तिच्या अंगावर हातही टाकायला मागे-पुढे पाहिलं नाही . मग ओळखीच्या कोणी सुचवलेली आंबट… तिखट… खारट औषधंही झाली … मग वेडेवाकडे व्यायामही झाले… पोटाला घट्ट आवळलेला पट्टा … दिवसभर माळ्यावरच्या खोलीतला बंदिवास … पण शरीरात तो नवा जीव वाढतच होता . तेव्हा मग एका आडगावी राहणाऱ्या बहिणीकडे रवानगी झाली . तिथे मग आणखी काही अघोरी उपचार … पण कशाचाही उपयोग झाला नाही … केवळ शरीरावर जखमा मात्र झाल्या . एका काळोख्या रात्री अनू प्रसूत झाली आणि व्याजोक्ती अशी होती की , बालक जन्मतःच मृत होतं . त्यांनी तर तिला ते दाखवलंही नाही . त्याचं काय केलं त्यांचं त्यांनाच माहीत …. पण सुईणीने पोट रगडून-रगडून आतला स्त्राव काढून टाकला तेव्हा अनूला वाटलं की , याबरोबरच आपल्या मनातल्या साऱ्या भावनाही पिळवटून काढल्या जात आहेत . ते मृत बालक जाताना स्वतःबरोबर अनूच्या मनातील सर्व करुणा , सर्व प्रेम , सर्व आशा , सर्व सहानुभूती सारं काही घेऊन गेलं होतं . त्या भयानक आचेत जणू तिच्या मनाचा साचाच वितळला . जेव्हा त्यातून ती बाहेर आली तेव्हा मनाची रचना , जडण-घडण सर्वच बदललं होतं . तिला आता जगाला काही द्यायचं नव्हतं , जगापासून काही अपेक्षाही नव्हती . तिची अलिप्तता काही वेगळीच होती . एका वर्षाच्या खंडानंतर तिचं कॉलेज पुन्हा सुरु झालं . ती ग्रॅज्युएट झाली , यथावकाश एका ऑफिसात क्लार्क झाली . आई-बाबांनी वर्षभर तिचं मन लग्नासाठी वळवण्याचा आटापिटा केला , मग तो नाद सोडून दिला . तिला त्यांच्या रागाची फिकीर नव्हती , धमक्यांची पर्वा नव्हती - शारीरिक आणि मानसिक वेदनेची परिसीमा गाठून परत आलेली ती - ती आता कशाला भिणार होती ? कोठेतरी तिनं वाचलं होतं की वेड लागलेल्या लोकांवर मेंदूची शस्त्रक्रिया करतात . त्यांच्या मेंदूचा एक भाग कापूनच टाकतात - मग ती माणसं अगदी थंड , अगदी मवाळ , अगदी सांगकामे बनतात . तिला वाटायचं मेंदूच्या ज्या भागात हे प्रेम , आपुलकी , सहानुभूती यांचे विकार उगम पावतात , तो आपल्या मेंदूचा भागच छाटला गेला आहे , निकामी झाला आहे . बाबा निवृत्त होऊन घरी बसले , थकले , वारले . त्यांच्या मागोमाग दोन वर्षांतच आईही जग सोडून गेली . आता त्या वाड्यात अनू एकटीच राहात होती . कधी काळी तिला भेटायला येणाऱ्या तिच्या मैत्रिणी मनाशी नवल करीत - या एवढ्या मोठ्या , ओसाड , अंधारलेल्या वाड्यात ही एकटी अनू राहते कशी ? तिला भीती वाटत नाही ? वारा उठला की जुन्या खिडक्यांची पालं खडखडत असतील … उन्हाने तापलेले वासे रात्रीत थंड झाले की करकर आवाज करीत जुन्या कुसांवर विसावत असतील …. वळचणीची पाखरं रात्री अपरात्री फडफडाट करीत असतील …. घरभर घुमणारे हे आवाज …. हिला भीती कशी वाटत नाही ? त्यांना काय माहीत , की ती मनाने अशा भयाण प्रदेशात जाऊन आली होती , की त्यापुढे या सर्व कल्पना फिक्या ठराव्यात ? मनाभोवती एक कठीण कवच तयार झालं होतं … सामान्य भावना काचेवर पडलेल्या पाण्यासारख्या त्यावरून ओघळून जात होत्या …. काहीही अंश मागे न ठेवता . कोळपून गेलेल्या निखाऱ्यासारखी मनातली धगच लोप पावली होती . स्वतःचाच नाश करणारी एक विलक्षण अलिप्तता मनात आली होती . कोणाचा सहवास नको होता , जवळीक नको होती , कोणाच्या स्पर्शाचा तर विचारही असह्य होत होता . परिचितांपैकी फारच थोडयांना तिचा पूर्वेतिहास माहीत होता . अगदी सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांची होईपर्यंत तिच्या मैत्रिणी तिच्या लग्नची गोष्ट तिच्यापाशी काढीत . ' तू अजून छान दिसतेस . ' त्या म्हणत , ' तुझा बंध अजून शिडशिडीत आहे …. केसांची महिरप अजूनही छान आहे …. कोठेही तू सहज पसंत पडशील … अशी एकटया एकटयाने सारा जन्म का काढणार आहेस ? ' पण तिच्या नजरेत चाललेले भाव पाहून त्यांचे शब्द अडखळत व शेवटी थांबत . एखादया अळीने जमिनीखाली विवरात निवारा घ्यावा तशी ती स्वतःच्याच अंधाऱ्या कोषात गुरफटून बसली होती . एका फसव्या सुरक्षिततेच्या भावनेने . आणि एका तडाख्यात क्रूर नियतीने तिचा कोष टरकावला होता , तिला उघड्यावर आणलं होतं . नजर फिरवणाऱ्या गतीने भूतकाळातले हे प्रसंग तिच्या नजरेसमोरून सरकले होते . हातांनी डोकं गच्च धरून , टेबलावर कोपरं टेकवून ती बसली होती . पुढच्या काही तासांत आपण काय केलं हेही तिला आठवत नव्हतं . तिला जरा भान आलं तेव्हा ती घरातल्या खोलीत रेडिओसमोर आरामखुर्चीत बसली होती . शेवटी मनाने या गोष्टीचा स्वीकार केला होता की , केवळ दुर्लक्ष करून , मातीत डोकं खुपसून बसून , हा प्रसंग टळणार नाही . त्याला सामोरं जायलाच हवं , मुकाबला करायलाच हवा . शरदशी गाठ तर आता रोजच पडणार होती . मनातली जुनी जखम हिसकली गेली होती . वाहायला लागली होती . शरदची रोजची गाठ म्हणजे त्यावर मीठ चोळण्याचाच प्रकार होता . अर्थात नोकरीची तिला आवश्यकता नव्हती . पण केवळ नोकरी सोडण्याने तिच्यामागचा हा ससेमिरा संपणार होता का ? तिने दोन पावलं मागे घेतली तर तो दोन पावलं पुढे येणार नाही कशावरून ? मागच्या ओळखीच्या सबबीवर तो तिच्या घरी येणार नाही कशावरून ? पण माघार घ्यायचा विचार तिच्या मनाला शिवलाही नव्हता . एकदा तिने एकाकीपणे खूप खूप सोसलं होतं … आता पुन्हा नाही . पण शरद पुढे काय करतो यावर बरंच अवलंबून होतं . त्याला त्याच्या गतकृत्याचा काही पश्चात्ताप होत होता का ? आपल्या भेकडपणाची काही शरम वाटत होती का ? ज्या परिस्थितीत ती सापडली होती त्याबद्दल मनात काही अनुकंपा होती का ? का तो अजून आपल्या पुरुषी तोऱ्यातच होता ? अजूनही त्याच्या हिशेबी स्त्री म्हणजे क्षणभर चैनीखातर उपभोगण्याची वस्तूच होती ? फळ चोखून फेकून द्यावं तितक्या बेफिकीरपणे वागण्याची ? आणि तिची अटकळ होती की हा शरद कोणत्याही कसोटीला उतरणार नाही . हिणकस ते हिणकसच . वर्खावर फसणारा मूर्ख . तिचा अंदाज चुकला नव्हता . पहिल्याच रविवारी सकाळी तो वाडयावर हजर झाला . अनूला फारसं नवल वाटलं नाही . बाहेरच्या व्हरांड्यात दोघं समोरासमोर खुर्चीवर बसले होते . संभाषणात सुरुवातीस जरासा अवघडलेपणा होता…. पण शरदच्या बोलण्यात , अनूच्या नाही . ' खूप दिवस झाले नाही भेटल्याला ? पंधरा वर्षं ? ' ' वीस . ' ती ठामपणे म्हणाली . ' कसे दिवस जातात नाही ? ' ती काहीच बोलली नाही . काय बोलणार ? 'एकटीच असतेस इथे ? आई ? बाबा ? ' ' दोघेही वारले . ' 'मग विवाह वगैरे - ?' तिने नुसती मान हलवली . नाही . तिने जास्त स्पष्टीकरण दिलं नाही . ' ऑफिसात किती दिवस आहेस ?' ' आता पंधरा वर्षं होत आली . ' 'काय योगायोग आहे नाही ? ' त्याचा आत्मविश्वास क्षणाक्षणाला वाढत होता . ' माझी या गावी बदली होणं आणि त्याच ऑफिसात तू…. ' ' मी गावातून हललेलीच नाही . ' ' वेल् , मी परत आलो आहे…. पूर्वी आपण एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो नाही ? मधून मधून भेटायला हरकत नाही . नाही का ?' ' नाही , काहीच हरकत नाही. ' ती शांतपणे म्हणाली . हलकट , नादान , स्वार्थी , भेकड , मनात ती शिव्यांची लाखोली मोजत होती . ' वाडयात एकटीच असतेस ? ' दारातून खोलीत नजर टाकीत तो म्हणाला . त्याच्या मनात काय होतं ते तिने बरोबर ओळखलं . ' हो , एकटीच असते . ' ती शांतपणे म्हणाली . काही वेळाने ती उठत म्हणाली , ' चहा आणते हं . ' तिने बाहेर चहा आणला तेव्हा तो स्वतःशी गुणगुणत होता . अनू इतर काहीही विसरली असली तरी हे विसरली नव्हती . खुशीत आला की स्वतःशीच गुणगुणायची शरदची सवय जुनी होती . चहा झाल्यावर शरद जायला निघाला . खुर्चीला वळसा घालून जाताना त्याच्या हाताचा हलकासा स्पर्श तिच्या कोपराला झाला . एखादया तीव्र आम्लाचा थेंब पडल्यासारखी तिथे झाल्यासारखं तिला वाटलं . दातांनी घट्ट दाबून तिने स्वतःला आवरलं . तो गेल्यावर बेसिनपाशी राहून ती साबणाने तिथला भाग कितीतरी वेळ पुन्हा पुन्हा धूत होती . आरशातल्या स्वतःच्या चेहऱ्याकडे तिने एकदाच पाहिलं - मग पुन्हा नजर वर केली नाही . आरशातल्या प्रतिमेच्या डोळ्यांत अगदी मागे काहीतरी आलं होतं . सागरतळाच्या कर्दमातूनच अचानक वर पृष्ठावर आलेल्या एखादया अभद्र हिडीस आकारासारखं काहीतरी… *** दोनच दिवसांनी ऑफिस सुटल्यावर तो तिच्या वाड्यावर आला . तिच्या अपेक्षेपेक्षा एखादा दिवस लवकर - पण तेवढाच . यावेळी तो एखादया सराईतासारखा घरात वावरत होता . ( एकदा तो खरोखरीचाच सराईत होता ! तिला धक्का बसून जाणवलं ) त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं याचा अनूने जास्त खोलात जाऊन विचार केलाच नव्हता - म्हणजे तिची हिंमत झाली नव्हती - एखादया अंधाऱ्या जागेत जाण्यासारखं ते होतं…. तिथे समोर काय येईल याची शाश्वती नव्हती… पण आतापुरतं ती त्याच्या वागण्याचं , त्याच्या बोलण्याचं ( आणि तो स्वतःशीच धरून चाललेल्या गोष्टींचंही ) निरीक्षण करीत होती . आता त्याच्यासमोर बसताना , त्याच्याशी बोलताना , गतायुष्यातल्या प्रसंगांवर चर्चा करताना तिला अवघड वाटत नव्हतं . ' म्हणजे , तू लग्न केलंच नाहीस ? ' त्याने विचारलं . तो विचारणार याची तिला खात्रीच होती… अनेक वेळा त्या प्रश्नापर्यंत येऊन तो बुजल्यासारखा दूर झाला होता . ' मला पुरुषांच्या सहवासात आकर्षण राहिलं नव्हतं . ' त्याच्या नजरेला नजर देत ती शांतपणे म्हणाली . त्याचीच नजर आधी घसरली . ' तेव्हा… तेव्हा मला अचानक जावं लागलं…. ' तो पुटपुटला . ' मला दिवस गेले आहेत हे कानांवर येताच तुम्ही गेलात…. ' ' पण मला कळवलं असतंस तर खात्रीने परत आलो असतो ! ' ' फक्त आपला पत्ता द्यायचा विसरला होतात . ' ती त्याच शांत आवाजात म्हणाली . ' म्हणजे काय आहे…. त्यावेळी लग्नाची जबाबदारी पेलली नसती…. ' ' कदाचित मी तुमच्यावर लग्नाची सक्ती केलीही नसती… नुसते जवळ राहिला असतात तरी मला धीर आला असता.. ' ' मला… मला कशाचीच कल्पना नव्हती… ' हलकेच . ' नाही…. तुम्हाला कशाचीच कल्पना नव्हती… ' ती म्हणाली . मग एक उसासा सोडून ती सावरून बसली . ' पुरे झाली माझ्या कर्माची हकिकत…. तुमच्याबद्दल काही सांगा की ! ' ' पत्नी…. विमल… फटकून वागते… मला कधी समजून घ्यायचा प्रयत्नच करीत नाही…. संसारात सुख कसं मिळेल , सांग ना ! ' तिच्या त्याच्याबद्दलच्या अपेक्षा किती तंतोतंत खऱ्या ठरत होत्या ! ' कदाचित तुम्हीही तिला समजून घेत नसाल . ' ' वा ! असं कसं म्हणतेस ! घर आहे , पगारदार नवरा आहे… आणखी काय हवं ? बरोबर आहे… आणखी काय हवं ? दावणीला बांधलेली गायच की नाही ! छपराचा गोठा आहे , गव्हाणीत आंबोण आहे… आणखी काय हवं ? ' आहे तरी कोठे घर ? ' त्याने नागपूरच्या महल भागातला एक पत्ता सांगितला . अनूने तो नीट लक्षात ठेवला . शरदच्या मिठ्ठास , लाघवी आवाजातील मखलाशीकडे तिचं अर्धवटच लक्ष होतं . त्याला काय हवं असणार याची तिला आधीच कल्पना आली होती . त्याची नजरच पुरेशी बोलकी होती…. अनूच्या मनात संकोच नव्हता, भीती नव्हती , काळजीही नव्हती… स्वतःबद्दल तिला पूर्ण विश्वास होता . मनात खोलवर दुसरेच विचार चालले होते . त्यांचीच तिला भीती वाटत होती . त्या क्षणी तिला वाटलं , आपल्या शरीराचा ताबा दुसऱ्याच कोणीतरी घेतला होता…. तिची इच्छा नसतानाही तिने शरदबरोबर शनिवारी संध्याकाळी सिनेमाला जायचं कबूल केलं होतं . नदीकाठच्या एका अरुंद बोळाच्या शेवटाला ते घर होतं . रंग कधी दिलाच नव्हता . वरच्या झाडाच्या सावलीने प्रकाश आणखीनच कमी होत होता . अनू दाराच्या आत उंबऱ्यापाशीच बसली होती . त्याने तिला तिथेच बसायला सांगितलं होतं . बोलावलं असतं तरी ती आत गेली असती का नाही शंकाच होती . आत अंधार होता . खोली कडवट उग्र दर्पाने भरली होती . आत विजेचा दिवा नव्हता . एक लहानशी तेलाची चिमणी होती . कदाचित त्याला परवडत नसेल . कदाचित छंदिष्टपणाही असेल . पण मिणमिणता प्रकाशच बरा . या खोलीत जी बोलणी होत , ज्या क्रिया होत ते सर्व अंधारातच झालेलं बरं , तिला वाटलं . ' तू अशी शिकली सवरलेली…. कोर्टकचेऱ्या करणाऱ्यांपैकी…. इकडची वाट कशी काय घेतलीस ? ' तो घोगऱ्या आवाजात विचारत होता . ' मला जे हवं ते तुमच्याजवळ आहे म्हणून . ' ' माझे पैसे दयायला तुला परवडेल… पण मागाहून जन्मभर ज्या यातना सहन कराव्या लागतील त्यांचा विचार केला आहेस का ?' ' गेली वीस वर्षं काय सोसते आहे मग मी ? ' ती संतापाने म्हणाली , ' त्याला जाऊ दे त्यातून…. ' ' पण पुरुषांच्या शरीरावर…. ' तो थांबला . ' अशक्य नाही ना ? ' ' अशक्य काय आहे ? मातीचं तर बाहुलं ! ' ' तुम्ही भीत नाही ना ? तुम्ही कच खात नाही ना ? ' ' पोरी , तुला कल्पनासुद्धा येणार नाही अशा गोष्टी मी केल्या आहेत आणि धोका असला तर तो मला नाही - तुला आहे ! चांगलं बांधून घेतल्याशिवाय आम्ही यात पाऊल टाकत नाही समजलं ? ' ' समजलं . ' अनूचा आवाज तितकाच थंड होता . ' सांगा . ' ' नीट विचार कर हं…. अर्ध्यावर सोडता येत नाही …. ' आठ दिवसांतच शरदची मजल अनूचा हात हातात घेण्यापर्यंत पोहोचली होती . गेल्या कित्येक वर्षांत अनूच्या नजरेत अशी लकाकी दिसली नव्हती . तिच्या शरीराला अशी उभारी दिसली नव्हती . तिचं शरीर आतून एका अनामिक शक्तीने रसरसल्यासारखं वाटत होतं . बिचारा शरद ! त्याला वाटलं , ही अजून आपल्यावर भाळलेलीच आहे…. मनात जरासा रुसवा आहे… तो काय पाहता पाहता दूर करता येईल…. उताराला लागलेल्या वाहनासारखी अनू त्या एका मार्गावर अविरोध चालली होती . त्या गतीचीच मनावर भूल येत होती . शरदची प्रत्येक चाल तिच्या अपेक्षेप्रमाणेच होत होती…. तोही तिच्यासारखाच स्वतःच्याच एका भ्रमचक्रात सापडला होता . त्याला प्रोत्साहन द्यायची आवश्यकताच नव्हती . मग एका संध्याकाळी निरोप घेताना शरदने अनूला क्षणभर हातांच्या मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले . तो जाईपर्यंत अनूने स्वतःवर कसातरी ताबा ठेवला…. आणि मग बाथरूममध्ये जाऊन चेहरा साबणाने कितीदा तरी धुतला , ओल्या टॉवेलने पुन्हा पुन्हा पुसला . मनातली शिसारी काही केल्या कमी होत नव्हती . आपण जे काही मनात योजलं आहे ते आपल्या हातून पार पडणार आहे की नाही याची तिला शंका वाटत होती… मनाची तयारी होती , शरीराच्या प्रतिक्रिया तिच्या नियंत्रणाबाहेर गेल्या तर ? त्याने अनूला पदार्थांची एक यादी दिली होती . मध , कोरफड , आवळा यांसारख्या काही वस्तू सहज उपलब्ध होत्या . पण बाकीच्या ? एक एक करीत तिला त्या जमवाव्या लागल्या . काही मुळ्या होत्या , काही झाडांच्या साली वाटत होत्या , काही फळं होती…. काही प्राण्यांचे अवयव होते…. त्यांच्यासाठी मात्र तिला आपल्या मुस्लीम आणि ख्रिस्तीयन सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागली . तिची मागणी ऐकताच त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या . पण अनूने त्यांना काही स्पष्टीकरण - समर्थन दिलं नाही आणि तिने माघारही घेतली नाही . शेवटी सर्व वस्तू हातात तर आल्या . मग ते कुटणं , खलणं , उकळवणं , गाळणं , वाळवणं , त्याची वस्त्रगाळ भुकटी करणं , मधात मिसळून ठेवणं . " त्या " रात्री तीन तास आधी दोन चमचे घ्यायचं - गर्भधारणा हमखास होण्यासाठी . गळाला लागलेल्या माशाला खेळवावं तशी ती शरदला खेळवत होती . कधी त्याच्या सलगीला प्रतिसाद देई तर कधी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असे . प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या एखादया पारदर्शक आवरणाखाली ठेवलेल्या घड्याळातील चक्रांची हालचाल जशी सहज स्पष्ट दिसते , तितके शरदचे विचार आणि इच्छा तिला स्पष्ट दिसत होत्या . तो दिवस ( किंवा ती रात्र ! ) अनू लांबणीवर टाकत होती ते केवळ त्याच्या शरीराचा स्पर्श , शरीराची जवळीक जास्तीत जास्त टाळण्यासाठीच . आणि मग एका सकाळी मनातला खोलवरचा कोणता तरी खटका दाबला गेला आणि तिने आपला निर्णय घेतला . आजचीच रात्र . . . . भाद्रपदातली अंधारलेली , पावसाळी , किंचित उदासवाणी संध्याकाळ . ऑफिसमधून बाहेर पडताना अनू शरदकडे पाहून नुसती हसली होती . साडेसहाला तो तिच्या वाडयावर हजर झाला . निसर्गही तिला पळवाट राहू देत नव्हता की काय कोण जाणे . पावसाने अशी काही झड धरली की , बाहेर पाय टाकणं मुश्कील . अनूने चहा केला…. मग आठला पुन्हा एकदा चहा केला . ' आता कशाला लॉजवर जाता ? ' शेवटी ती म्हणाली , ' इथेच राहा आजची रात्र . इथे कसलीच अडचण नाही . ' परवलीचे शब्द . जेवायला तिने साधेच पदार्थ केले होते . पण शरदचं कशाकडं लक्षच नव्हतं . ताटातले पदार्थ तो हलवत होता , प्रत्येक घास पाण्याबरोबर घशाखाली ढकलत होता . ' तुला… तुला… अवघड नाही ना वाटणार माझ्या राहण्याने ? ' ' मला ? अवघड का वाटावं ? तसं पाहिलं तर मला आणि या घरालाही तुम्ही परके थोडेच आहात ? ' ' ते खरं आहे म्हणा…. पण… पण… ' ' बायका संकोचतील… पण तुम्ही ? पुरुषासारखे पुरुष ?' तो काहीच बोलला नाही . जेवण झाल्यावर तो बाहेर रेडिओ लावून बसला . तिने स्वयंपाकघरातली आवराआवर केली आणि मग टॉवेलला हात पुसत पुसत ती बाहेर आली आणि म्हणाली , ' तुमची मागची खोली तयार करते बरं का ! ' तो काहीच बोलला नाही . अनू त्या खोलीत गेली . याच खोलीत तिच्या आयुष्याचा संक्रमणकाळ गेला होता . इथेच तिचा स्त्रीत्वात प्रवेश झाला होता. इथेच तिने अतीव सुखाचे आणि दारूण निराशेचे क्षण अनुभवले होते . मनाला हिसका देण्याची शक्ती त्या आठवणीत इतक्या दीर्घ कालावधीनंतरही होती . काय झालं असतं आणि प्रत्यक्षात घडलं काय ! वाया गेलेली , वैराण , वीस वर्षं ! सर्व आयुष्याची माती ! मनातला निर्धार जर जरा कमजोर झाला असला तर तो त्या खोलीतल्या दहापंधरा मिनिटांच्या वावरानंतर पक्का झाला . तिने पलंगावरची चादर काढून टाकली . तिथे कपाटातली धुतलेली , इस्त्रीची चादर घातली . उशा हाताने थोपटून सरळ केल्या . एक पातळसर शाल पायागती उलगडून ठेवली . पलंगाच्या रेलिंगवर लहान नॅपकिन ठेवला , शेजारच्या स्टुलावर तांब्या-भांडं ठेवलं . मग ती माजघरात आली . अंधाऱ्या , कोपऱ्यातल्या कपाटात ती बाटली ठेवली होती . तिच्यातले दोन चमचे तिने वाटीत काढून घेतले , वाटी स्वयंपाकघरात नेली , डाव्या हातात तिखट मिरची घेतली , डोळे घट्ट मिटून वाटीतला द्राव घटाघटा घशाखाली उतरवला आणि दातांनी मिरची कचाकचा चावली. नाकाडोळ्यातून पाणी आलं . जिभेची कशी आग आग झाली . त्या कल्लोळातच ती चव मनाबाहेर घालवण्याची ताकद होती त्याच्या समोरच्याच खुर्चीवर ती बसली होती . आताच्या संदर्भात रेडिओवरील संगीत अर्थशून्य पण आवश्यकच होतं . संभाषणात खंड पडला की , येणारी निःशब्दता शरदला अस्वस्थ करीत होती . शरीराचा सारखा बदलत होता ; हातांची , पायांची , मानेची सतत अस्वस्थ हालचाल करीत होता . अनू शांतपणे बसली होती . ' मागच्या खूप आठवणी येतात नाही ? ' तो शेवटी म्हणाला . ती काहीच बोलली नाही . ' अनू , माझी चूक झाली . ' तो शेवटी म्हणाला , ' आता त्याला इतकी वर्षं होऊन गेली आहेत… तू , मी , जग , संसार , सारंच बदललं आहे . काळाचं चाक तर उलटवता येत नाही…. ' ' तशी वेळ पुन्हा आली तर ती चूक तुम्ही करणार नाही ? ' ' नाही… नाही… नक्कीच नाही… ! तू माझ्याशी बोलतेस कशी याचंच मला नवल वाटतं ! एखादीने संतापाने आक्रस्ताळेपणा करून शिव्यांची लाखोली वाहिली असती !. ' ' संतापानं काय साध्य होतं ? आपल्याच मनाला पीळ घालून घ्यायचा… आता इतकी वर्षं गेली…. प्रेम , राग , माया-दवेष सारंच बोथट होतं…. आणि समजा तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसतात… कोणास ठाऊक माझ्या आयुष्याला कोणती दिशा मिळाली असती ! आणि मी सुखी झालेच असते अशी कोण खात्री देऊन सांगू शकतं ? ' रेडिओने अकरा वाजता आपले कार्यक्रम संपवले . शरद खुर्चीवरून उठला , एक आळस देत म्हणाला , ' झोपावं आता , नाही ? पण अनू , माझ्यावर तुझा राग नाही हे ऐकून मला फार बरं वाटलं - ' शरद गेल्यावर पंधरा-वीस मिनिटं अनू तशीच बसून होती . मग तिने उठून दिवा मालवला , दारांचे कड्या-बोल्ट तपासले आणि ती आपल्या खोलीत आली . आपल्या मागं तिनं दार नुसतं लोटून घेतलं . . . . अनूला झोप लागली नव्हती . झोप लागणं शक्यही नव्हतं . सुमारे दीड तासाने ती ज्या आवाजाची वाट पाहात होती , तो आवाज आला . खोलीचं दार सावकाश सावकाश करकरत उघडलं . बाहेरच्या अंधुक प्रकाशाविरुद्ध तिला शरदची छायाकृती दिसत होती . अजूनही ती स्वतःला थांबवू शकली असती , अजूनही ती मागे फिरू शकली असती . ' जा .' एवढा एकच शब्द पुरेसा झाला असता . पण ओठ घट्ट मिटून घेऊन अनू गप्प पडून राहिली . ' अनू ? ' शरदचा आवाज घोगरा झाला होता . ती काहीच बोलली नाही . तो जवळ आला , तिच्या पलंगाच्या कडेवर बसला . कॉट करकरली . तरीही अनू काहीच बोलली नाही . ' अनू ? ' त्याने पुन्हा विचारलं आणि तिच्या गालावर हलकेच हात ठेवला . पहिलीच पायरी अतिशय अवघड होती… तेही तिने केलं . आपला हात त्याच्या हातावर टेकवला . मग तिला प्रत्यक्ष काहीच करावं लागलं नाही . फक्त नाटक करावं लागलं . त्या मूर्खाची कल्पना होती की , ही भोळीभाबडी अनू आपल्या स्पर्शाने सुखावली आहे . आपल्या हातांच्या मिठीत अगदी विरघळत आहे . हळूहळू त्याचा बावरेपणा कमी झाला , आत्मविश्वास परत आला - तसतसा त्याच्या स्पर्शातला राकट धसमुसळेपणा वाढत चालला… पंधरा - वीस मिनिटं …. पण अनूला वाटलं ती कालांतरापर्यंत ताणली गेली आहेत , कधी संपणारच नाहीत. शेवटच्या क्षणीचं त्याच्या गळ्याभोवती हात टाकायचं नाटकही तिने हुबेहूब वठवलं . तो दूर झाला तेव्हा ती एवढंच म्हणाली , ' आता इथे थांबू नका…. मला एकटीला झोपू द्या . ' . . . सकाळी पाऊस पडला होता . चहा होताच शरद गेला . रात्रीचा उल्लेख दोघांपैकी कोणीच केला नाही . उंदीर गट्ट केलेल्या मांजरासारखा शरद सुस्त , स्वसमाधानी दिसत होता . आपल्या पुरुषार्थाचा त्याला अभिमानही वाटत असेल… खाशा बैठकीत एखादा पेग जास्त घेतला की , खुलवून सांगता येण्यासारखा प्रसंग… अमकीतमकीला कशी हातोहात वश केली ते… तिला समजत होतं आपण स्वतःला विनाकारण क्लेष करून घेत आहोत.… पण शरदमागे तिने दाराचा बोल्ट सरकवला तेव्हाच कोठे तिच्या मनाला आणि शरीराला दिलासा मिळाला वाट पाहणं सर्वात कठीण होतं . पहिली पाळी चुकली - पण तो योगायोग , मानसिक ताणाचा परिणाम असण्याची शक्यता होती . पण लगोलग दुसरी पाळी चुकली तेव्हा तिची खात्री झाली , पण तरीही तिनं एकदा वैदयकीय तपासणी करून घेऊन खात्री करून घेतली . मग संध्याकाळची तिने परत एकदा त्या नदीकाठच्या अंधारलेल्या घराला भेट दिली . तो त्याच्या मिणमिणत्या चिमणीपासून हलला तरी होता का नाही कोणास ठाऊक . ' झालं ? ' ' हो , डॉक्टरी तपासणीही झाली . ' ' अजून विचार बदललेला नाहीस ? शेवटपर्यंत जायचं ठरवलं आहेस ? ' ' हो . ' ' पापांची क्षमा हीसुद्धा एक घोर शिक्षा होऊ शकते… त्याचं मन त्याला जन्मभर छळत राहील . ' ' त्याची जात तसली नाही… आणि गोष्टी आता फार पुढे गेल्या आहेत . ' ' ठीक आहे . आज रात्री झोपताना हे घे…. उद्याचा आणि नंतरचे दोन चार दिवस वाईट जाणार आहेत . . ' काय करायचं ते त्याने तिला सांगितलं . स्मशानातली काळी माती , विषारी वेलांची पानं , काटेरी झुडपांचे काटे आणि इतर सर्व तिलाच घेऊन यायचं होतं . आठ दिवसांनी ती आली तरी चालणार होतं . परत येताना विचार करता करता अनूला वाटायला लागलं की , ही सर्व जमवाजमव , हा सर्व अभद्र वस्तूंचा संच हा एक वेगळा बाह्यसंकेत आहे . खरी कार्यकारी शक्ती आपल्या मनातल्या द्वेषाचीच आहे . . . . वेदना होतील तो म्हणाला होता…. पण या तर असह्य होत्या . ही तर वेदनेची परिसीमा होती . संध्याकाळनंतर तर ओटीपोटाशी गरम पाण्याची पिशवी धरून ती पलंगावर कासावीस होऊन अक्षरशः गडाबडा लोळत होती . शरीर तापानं फणफणलं होतं . शेवटी शेवटी तर तिला तोंडात रुमालाचा बोळाच कोंबावा लागला . रात्री बारा वाजता शरीरातून एक तापलेली सळई आरपार गेल्यासारखी तीक्ष्ण वेदना झाली…. तिला क्षणभर वाटलं , आपली आता शुद्धच हरपणार आहे… पण बेशुद्धीच्या काठावरून ती लटपटत मागे आली . वेदनेची तीव्रता कमी कमी होत गेली…. अॅस्पिरीनच्या दोन गोळ्या आणि सोनारीलची एक गोळी तिने गार पाण्याबरोबर घेतली आणि मांडीवर मांडी घट्ट दाबून ती झोपली . सकाळी केवळ ताप आणि थकवा होता . टॉवेलवर एक रक्ताळलेला मांसल गोळा होता . तो तिने चाकूने खरडून काढून बाटलीत भरून ठेवला आणि टॉवेलवर रॉकेल ओतून टॉवेल जाळून टाकला . दोन दिवस ती पडूनच होती . मग ताप ओसरला . शरीरात हळूहळू शक्ती आली . दहा दिवस ती ऑफिसमध्ये गेली नव्हती . शरद दोनदा येऊन गेला होता . फ्ल्यू आहे एवढंच ती म्हणाली होती . त्याच्या मदतीच्या सूचनेला तिने नकार दिला होता . आवश्यक ते सर्व साहित्य तिनं जमा केलं होतं . शेवटचे दोन-तीन दिवस ती स्वतःशी खूप विचार करीत होती . यापुढचं पाऊल निर्णायक होतं - मग माघार घ्यायची संधी मिळणार नव्हती . तिने नागपूरमधल्या आपल्या एका मैत्रिणीला पत्र लिहून शरदचा पत्ता कळवला होता आणि त्या पत्त्यावर जाऊन माहिती काढण्यास सांगितलं होतं . दुसऱ्या आठवडयात मैत्रिणीचं उत्तर आलं . ' किती दिवसांनी - वर्षांनीच आठवण झाली गं माझी तुला अने ! तुझं काम केलं बरं का…. आणि हा कोण शरद जोग आहे ना , त्याच्यापासून अगदी जपून राहा बरं का ! त्याच्या घरच्या पत्त्यावर गेले होते… त्याची बायको घरात होती… अने , काय गं तिची दशा ! नुसती प्रेमाने चौकशी केली तर ढसाढसा रडायलाच लागली की गं ! काय घराची अवकळा ! भांडी नाहीत , सामान नाही , कपडेलत्ते नाहीत…. तिकडे राहतो तरी का ? का तिलाच एकटीला गोठ्यातल्या गाईसारखं तिथं बांधून ठेवलंय गं ? त्याच्यापासून जपून राहा गं ! नंबर एकचा बदफैली , व्यसनी , खोटारडा आहे बरं का तो ! …. ' . . . त्याने तिला अकरा वाजताची वेळ दिली तेव्हा मात्र तिच्या मनाने जराशी कच खाल्ली होती… पण ती क्षणभरापुरतीच . त्याने दिलेल्या वेळी ती तिथे हजर झाली होती . स्मशानातल्या मातीत नदीचं पाणी मिसळून तिला त्याने लगदा बनवायला सांगितला . मग लगद्याची बाहुली बनवायला सांगितली . गोळ्याचं डोकं , लहान लहान हात , पाय , पोट , अगदी लहानशा जननेंद्रियासह . मग त्याने बाहुलीच्या पोटाला चाकूने चीर पाडायला सांगितलं . ' आता काढ तुझी ती बाटली …. त्यात ते भरून ठेवलं आहेस ना ? वाळलं असलं तर पाण्याचे दोन थेंब टाक - चाकूने खरवडून काढ बाहेर…. घे… घे… हातात घे… त्याची गोळी कर . त्याला बोटाने स्पर्श करण्याच्या क्षणी मात्र ती खरोखरच कचरली . पण शेवटी तिने तो लगदा हातात घेतला . ' भर ते बाहुलीच्या पोटात…. कर बंद पोट आता…. ' डोळ्यांच्या जागी दोन काचेचे हिरवे मणी बसवले होते . दातांच्या जागी दोन लहान गारगोट्या बसवल्या होत्या . अणकुचीदार . ' जा आता हात धुऊन ये आणि ही काळी साडी नेस . ' खोलीत दोन पाट मांडले होते . एक मोठा . एक लहान . मोठया पाटावर त्याने अनूला बसवलं . लहान पाटावर मातीची बाहुली बसवली . ' आता शांत बसून राहा . काही बोलू नकोस . काही विचारू नकोस . बरोबर मध्यरात्री मी जे जे सांगेन तेवढं माझ्या मागोमाग म्हणायचं . त्याचा अर्थ सांगीन- अर्थ समजून घेऊन म्हणायचं… इतर एक अक्षरही बोलायचं नाही… मागे-पुढे , खाली-वर , डावी-उजवीकडे पाहायचं नाही… समजलं ? मग बस पाटावर शांतपणे . ' अजूनही तिचा संपूर्ण विश्वास बसत नव्हता . विश्वास बसणं खरोखरच कठीण होतं . काही पाला , काही मुळ्या , काही रक्ताळलेले मांसल अवशेष… बाराला पाच मिनिटं कमी असताना तो उठला… डोक्यावरच्या छपरातलं एक कौल त्याने सरकवलं . खोली वरच्या अवकाशाला खुली झाली . ' आधी त्या शक्तीला आवाहन करायचं…. बोलवायचं… शब्दशः अर्थ असा होईल… अरे , काळोखाच्या फटीतून वावरणाऱ्या…. इथं त्याचं नाव !… आता माझ्यासमोर हजर हो… तुझ्यासाठी एक पात्र बनवलं आहे त्यात प्रवेश कर… जुन्या कराराप्रमाणे तुला रक्तामांसाची जागा दिली आहे… आता माझ्यावर तुझी वखवखलेली हिंस्त्र नजर वळवू नकोस… कार्याच्या अखेरीस तुला तुझा बळी मिळणार आहे… आता नीट ऐक पोरी . माझ्यामागून एक-एक शब्द स्पष्टपणे म्हण . ती भाषा तुला समजणार नाही . त्यातलं नाम कोणतं , विशेषण कोणतं , संबोधन कोणतं, क्रियापद कोणतं हे कळणार नाही - ज्याला तू जागवणार आहेस त्याचं नावही कळणार नाही… कारण त्याचा मनोमन विचारही धोक्याचा आहे…. तेव्हा आता म्हण…. ' किती विलक्षण शब्द ! जिभेला गाठी पाडणारे हेंगाडे उच्चार…. व्यंजनांच्या ओळीच्या ओळी…. आणि मध्येच केव्हातरी बाहेर सोसाटयाचा वारा उठला . घरावरच्या झाडांची पानं सळसळली , फांद्या करकरल्या…. छपराला केलेल्या चौकोनी खिडकीतून त्या वादळी वाऱ्याचा एक अंश खोलीत आला… खोलीभर भिरभिरला… किती गार ! अंगावर शहाराच आला ! ' पुन्हा एकदा म्हणूया - हं - ' पुन्हा त्या विलक्षण शब्दपंक्तीचा उच्चार…. आणि मध्येच , अगदी अचानक एक विलक्षण तीव्र वेदना तिच्या पोटातून गेली… कोणीतरी अणकुचीदार काटेरी शस्त्राने पोट आणि आतडी खरवडून काढल्यासारखी… आता शब्दाशब्दागणिक वेदनेच्या लाटा शरीरावरून जात होत्या . खोलीत गार वारा भिरभिरत होता . चिमणीची ज्योत फडफडत होती . लहान पाटावरच्या बाहुलीचे लहानसे हातपाय हलत होते . हिरव्या काचमण्यांचे डोळे चमकून उठत होते . अनूचा श्वास धपाधप येत होता . हातापायात पेटके येत होते . त्याने हात वर केला . खोलीत विलक्षण शांतता पसरली . ' आता पुढचा भाग . तुझी वेळ झाली की मिळेल त्या मार्गाने बाहेर ये . तुझा बळी घे आणि परत तुझ्या काळोखाच्या फटीत नाहीसा हो . तुला क्षणमात्र जीवन आणि पोषण देणाऱ्या माझी ही आज्ञा तुला पाळलीच पाहिजे . तुझा बळी तू घे आणि या जगातून नाहीसा हो . ' ' आता म्हण…. ' तिचा प्रत्येक उच्चार तो बारकाईने ऐकत होता . त्याने तिला पाच वेळा त्या ओळी पुन्हा पुन्हा म्हणायला लावल्या , ' एकाही अक्षराची , एकाही कानामात्रेची चूक होऊन चालणार नाही…. नाहीतर ते जन्मभर तुझ्या उरावर बसेल… ' तो म्हणत होता . मग शेवटी त्याचं समाधान झालं . नंतर त्याच्या आवाजात जराशी नरमाई आली . ' अनू , तू त्याच्यावर फारच भयंकर सूड घेतला आहेस . आयुष्याची उरलेली वर्षं तुला सुखासमाधानाने जाणार नाहीत . हा क्षण तू कधीही विसरू शकणार नाहीस . ईश्वर तुझ्या मनाला शांती देवो . ' तो खोलीतल्या सामानाची आवराआवर करीत होता . शेवटी तो म्हणाला , ' आता तू गेलीस तरी चालेल . ही बाहुलीही बरोबर घेऊन जा . महिन्याभरातच तुला बदल दिसायला लागेल . ' ' तुमचे पैसे द्यायला केव्हा येऊ ? ' ' सगळा कारभार आटोपला म्हणजे सावकाश ये… माझ्या पैशांची मला कधीच घाई नसते… आणि काळजीही नसते . ज्या कागदी खोक्यात तिने सामान नेलं होतं , त्याच खोक्यात ती बाहुली घालून अनू खालच्या मानेने त्या घराबाहेर पडली . घड्याळाची काचेची लहानशी शोकेस रिकामी करुन अनूने त्या शोकेसमध्ये ती बाहुली ठेवली होती . निरर्थक आहे हे माहीत असूनही तिने शोकेसला बाहेरून एक लहानसं कुलूप लावलं होतं . किती तकलादू ! त्या बाहुलीत वास करून असलेल्या प्रलयंकारी शक्तीला लहानसं कुलूपच काय , एक फूट जाडीचा सेफ व्हॉल्टचा पोलादी दरवाजाही रोखू शकला नसता . दिवसातून एकदा तरी अनू काचेचं लहानसं दार उघडून त्या बाहुलीकडे पाहात असे . मनाची अवस्था दोलायमान होती . काय बदल दिसेल किंवा काही बदल दिसेल का नाही याची तिला काहीच कल्पना नव्हती . कधी कधी तिला वाटे हे सारं थोतांडच आहे - भोळसटासारखा आपण त्यावर विश्वास ठेवत आहोत . काहीही होणार नाही…. ( आणि कदाचित तेच बरं नाही का होणार ? तिला वाटे . ) पण एका सकाळी ( सुमारे दीड महिन्याने ) तिचा सर्व संशय फिटला . बाहुलीच्या सपाट पोटाला खालच्या अंगाला किंचित फुगीरपणा आला होता . अंगावर शहाऱ्यामागून शहारे येत होते . ती राक्षसी आणि विकृत शक्ती कार्यप्रवण झाल्याचा हा प्रत्यक्ष पुरावा होता . त्या मध्यरात्री तिने आवाहन केलं होतं आणि त्याला साद देऊन काहीतरी या जगात आलं होतं . काहीतरी प्राचीन , अमानवी , महाशक्तिमान . झाडाखालच्या अंधारलेल्या घरात मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात त्याने अनूला काही काही सांगितलं होतं ते तिला आता आठवत होतं . ' सर्वसाधारणपणे नखाचा तुकडा , केसाची एखादी बट , रक्ताचा एखादा थेंब वापरतात . आपण तर त्याचं बीजच वापरणार आहोत…. एखाद्या शिकारी कुत्र्याला कपड्याचा वास देऊन पाठलागावर सोडतात ना ? मग आपण तेच करीत आहोत…. शरीराचा हा अंश मिळाला की ते त्या व्यक्तीचा वेध घेत बरोबर त्याच्यापाशी पोहोचतं… अंतर कितीही असो… माग कसा काढतं मला विचारू नकोस आणि एकदा संपर्क स्थापन झाला की , बाहुलीचं नातं स्थापन होतं . सर्व शारीरिक बदल त्या बाहुलीत प्रतिबिंबित होतात . नाती कशी उलटी होतात पाहिलंस ना ? आधी बाहुली हा केवळ संकेत असतो… दिशा दाखवणारा बाण…. बाहुलीवर केलेले उपचार इतरत्र प्रकट होतात…. पण नंतर तिकडे होत असलेले बदल बाहुलीत दिसायला लागतात… ' तिला शब्दन् शब्द आठवत होता . म्हणजे आता शरदला - . . . ऑफिसमध्ये गेल्या दोन महिन्यांत कामाव्यतिरिक्त ती शरदशी बोललीच नव्हती . त्याच्यात बाह्यतः तरी तिला काही बदल दिसला नव्हता . पण आज ? आज काही फरक दिसणार होता का ? पण शरद ऑफिसला आलाच नाही . पुढील घटनांची नांदी ? ती रात्र आणि त्यानंतरच्या अनेक रात्री अनूला फार वाईट गेल्या . स्वप्नं पडत होती . स्वप्नं भयानक होती , पण त्यांच्यातला लहानसा अंशही सकाळी जाग आली की आठवणीत राहात नसे . दुसऱ्याही दिवशी शरद ऑफिसला आला नाही . ऑफिस रेकॉर्ड चाळतानाच तिला त्याच्या लॉजचा पत्ता मिळाला . त्या पत्त्यावर जाण्याआधी तिने बराच वेळ विचार केला होता . कारण बाहुली खरोखरीच त्याची अवस्था दाखवत होती का याचीही शहानिशा होणार होती . ( एक अंधुक आशा - प्रत्यक्षात तसं नसेलही ! कारण मनाभोवती आता एक भयाचं कंकण आलं होतं . ) ती सकाळच्या वेळी गेली . शरद खोलीतच होता . तिला पाहताच त्याची जराशी धावपळ झाली . कदाचित तिची भेट त्याला अपेक्षित नसावी . मग समोरासमोर बसल्यावर तिला दिसलं की , त्याचा चेहरा किंचित फिकट , ओढल्यासारखा दिसत आहे . ' तुम्ही ऑफिसात आलाच नाहीत म्हणून - ' ' प्रकृती बिघडलीय एवढयात - ' बोलता बोलता तो उठला . ' थांब हं - येतोच . ' तो बाथरूममध्ये गेला . सिंकमध्ये नळ सोडला होता . तरीही ओकण्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचला . शरद टॉवेलने तोंड टिपत बाहेर आला . तो बसला खरा , पण त्याच्या जीवाला स्वस्थता नव्हती . त्याची उभारी , त्याचा आत्मविश्वास कोठच्या कोठे गेला होता . आजाराचा विषय अनूने पुन्हा काढला नाही . पाच - सात मिनिटांनी तिने त्याचा निरोप घेतला . खुर्चीत हताशपणे बसलेली त्याची आकृती पुनः पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर येत होती मनात कीव येत होती , पण ती अस्थानी होती . केवळ कोंडीत सापडला होता म्हणून तो हवालदील दिसत होता . त्याची खरी जात सर्पाचीच होती . काही उपायाने तिला ती भारणी मागे घेता आली असती तर ( तिला त्याची शंकाच होती ! ) तो मोकळा होईल…. पण त्याच्या स्वभावात काहीच बदल होणार नाही…. मैत्रिणीने पत्रात वर्णन केलेली विमलची , त्याच्या पत्नीची आकृती तिच्यासमोर आली… बाहुलीत आता दिवसादिवसागणिक बदल होत होता . . . शरद आठवडयातून तीन-चार दिवस गैरहजर राहात होता . त्याला दीर्घ मुदतीच्या रजेवर जावं लागणारसं दिसत होतं . अपेक्षेप्रमाणे त्याच्या रजेचा अर्ज आलाच. तो नागपूरला जाणार होता त्या सकाळी अनू त्याच्या लॉजवर गेली . पूर्वी त्याचे कपडे अगदी अंगासरसे , मॉड असत . आता अंगात एक सैलसर गुरुशर्ट होता . ते शर्ट आता कदाचित जास्त घट्ट होत असतील . चेहऱ्यावर एक रसरसता तजेला होता . कितवा महिना ? चौथा ? पाचवा ? ' तुम्ही रजेवर जाताहात म्हणून समजलं - ' ' प्रकृतीच ढासळलीय - ' ' पण डॉक्टरांना दाखवलं असेल ना ? ' ' पाच - सहांना तरी दाखवलं . नुसतं पैसे घेतात शेकड्यांनी . एकालाही काही समजेल तर शपथ ! काहीही झालं तरी म्हणतात ! सगळ्या टेस्ट झाल्या…. अगदी नॉर्मल आहे म्हणतात ! ' तो बाबा काय म्हणाला होता ? इतर कोणाला दिसणार नाही . इतर कोणाला समजणारच नाही आणि शेवटच्या क्षणी तो एकटाच असणार… मानवाच्या हातातल्या , समजातल्या या गोष्टीच नाहीत . त्याला सांगण्याची वेळ आली होती . ' मला माहीत आहे तुम्हाला काय झालं आहे ते . ' ' तुला ? तुला काय समजतंय त्यातलं ? ' त्याच्या आवाजात तुच्छता होती . ' मला नाही तर कोणाला समजणार ? शरद , माझी नागपूरची एक मैत्रीण विमलला भेटून आली - तिने मला पत्रात सगळं काही कळवलंय - ' ' ती अर्धवट विमल ! ती नाही नाही ते बरळणारच ! ' ' नाही . तिने सांगितलं ते खरं आहे . कारण मला स्वतःला तुमचा अनुभव आला आहे . आणि हा तुमचा आजार ही माझीच करणी आहे . आता जरा शांत बसा…. आणि मी काय सांगते ते नीट ऐका - ' ' तुम्हाला काय वाटलं तुमच्यावर भाळून मी तुमच्या रतिशय्येवर आले ? मी तुम्हाला इतकी भोळसट वाटले की अपमानित , एकाकीपणे , स्वतःशी कुढत काढलेली वीस वर्षं मी तुमच्या एका दृष्टीक्षेपाखाली पार विसरून जाईन ? स्वतःच्या प्रौढीत , दिमाखात , गर्वात माणूस इतरांना किती तुच्छ लेखत असतो ! आपल्या पापांचा कधी काळी जाब द्यावा लागेल हे त्याच्या ध्यानीमनीही नसतं ! कसे काढले असतील मी ते दिवस ? रात्री रात्री रडून , जागून काढल्या ! कितीदा तरी जीव द्यायचा मोह झाला… पण तेवढंही धैर्य नव्हतं माझ्यात ! माझ्या अल्लड भोळेपणाचा तुम्ही फायदा घेतलात पण तेही मी तुम्हाला माफ केलं असतं - कारण चूक माझी होती . पण नंतरची तुमची वागणूक ! ती कोणत्याही परिस्थितीत क्षम्य नव्हती ! भयानक अवस्थेत मला एकटं सोडून तुम्ही निघून गेलात…. त्याची मी तुम्हाला कधीही माफी केलेली नाही… आणि आता दैववशात वीस वर्षानंतर आपली भेट झाली…. तुमच्यात काहीही बदल झालेला नाही ! वेलीवरचं फुल खुडून , हुंगून , कुस्करून पायदळी टाकण्याची तुमची तीच वृत्ती कायम आहे…. नाही - मी तुम्हाला कधीही क्षमा केलेली नाही… आणि म्हणून…. ' अनूने त्याला सर्व काही सांगितलं . त्याचा विश्वास बसत नव्हता . ' छ्या ! सगळ्या थापा ! ' तिने त्याला ते विधी आणि उपचार आणि मंत्र वर्णन करून सांगितले . ' पण हे चेटूक आहे ! भानामती आहे ! जादूटोणा आहे . ' ' तुम्ही त्याला काहीही नाव द्या . ' ' पण माझा असल्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही ! ज्याचा विश्वास नाही त्याच्यावर याची काहीही मात्रा चालायची नाही ! ' ' तुमच्या विश्वासाची जरुरीच नाही ! माझा आहे ! खुशाल स्वतःच्या भ्रमात राहा ! समोर लक्षणं दिसताहेत त्याच्याकडे खुशाल दुर्लक्ष करा ! सकाळचं मळमळणं , ओकाऱ्या , हातापायातले वांब , चेहऱ्यावरची टवटवी - कोणतीही पहिलटकरीण तुम्हाला याचा अर्थ सांगेल , पण काही दिवस थांबा . ते पोटातल्या पोटात फिरायला लागलं , लाथा मारायला लागलं की मग तुमचा विश्वास बसेल . ' ' तुला वेड लागलं असलं पाहिजे ! ' ' मला नाही - पण तुम्हाला मात्र खचितच लागणार आहे ! ' ' नालायक ! रांड ! चल चालती हो ! ' ' जाणारच आहे - पण एक गोष्ट सांगायची बाकी आहे - ' ' काय सांगायचं ते सांग आणि चालती हो ! ' ' त्या बाहुलीचं सांगत होते ना - त्यात मी जरा बदल केला आहे . तुम्हाला तुमच्या पौरुषाचा अभिमान आहे ना - ते ठेवलंय - पण - पण… त्या गर्भाला बाहेर यायची वाट ठेवलेली नाही… मी एका पुस्तकात वाचलं… त्याला बर्थ कॅनाल म्हणतात… तो तिथे नाही - ' अनूने त्याचा निरोप घेतला तेव्हा शरद नुसता विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहात होता . त्याला तिच्या शब्दांचा खरा अर्थ समजला की नाही याची तिला शंकाच वाटत होती . अर्थात अर्थ समजूनही काही उपयोग नव्हता . त्याला कोणाचीच मदत होण्यासारखी नव्हती . पुढच्या तीन-साडेतीन महिन्यांत अनूचं वजन दहा पौंडांनी घटलं . चेहरा सुरकुतला . कोठेही लक्ष एकाग्र करणंच अशक्य झालं . बाहुली असलेली काचपेटी टेबलावर ठेवून ती तासच्या तास त्या बाहुलीकडे पाहात राही . बाहुलीच्या पोटाचा नगारा झाला होता . एकदा चमचमणारे डोळे आता निस्तेज झाले होते . आता तिच्या मनातला सर्व संशय फिटला होता . हा अघोरी अतूट बंध स्थापन झाला होता . शरदच्या शरीरातलं स्थित्यंतर समोर प्रतिबिंबित होत होतं . दिवसा ती मनावर कसातरी ताबा ठेवू शकत होती… पण रात्रीच्या दुःस्वप्नांना कसा आवर घालणार ? आता त्याचा विश्वास बसला असेल… आता त्याची मनःस्थिती काय असेल ? घटनांचा शेवट त्याच्या ध्यानात आला असेल का ? दिवस उलटत चालले तशी तिची झोप उडत चालली . शरीरावरचं मांस झडत चाललं होतं . ती जराजर्जर दिसायला लागली… कधी कधी तिला वाटे , आपणही त्या शापापासून अलिप्त नाही आहोत…. शेवटी तिने ती काचपेटी कॉटशेजारच्याच एका टेबलावर ठेवली . त्या रात्री तिला विलक्षण अस्वस्थता जाणवत होती . काहीतरी भयानक , काहीतरी अति अशुभ घडणार आहे असं सावट मनावर येत होतं . पण तिला आधी कल्पना यायला हवी होती . मध्यरात्रीचा क्षण हाच त्याचा क्षण होता . तेव्हाच ते झालं . ती त्या बाहुलीकडे पाहात होती . लहान ओबडधोबड ओठ एकाएकी वासले… त्या काळ्या विवरातून एक अति क्षीण , अति तार स्वरातली एक किंकाळी आली . पोटात आतून एक फुगवटा आला , तो फुटला . खळखळ आवाज करीत पेटीची काच तडकली , फुटली . एखादी गारेगार वावटळ खोलीत भिरभिर फिरली . खिडकीचं दार दाणदिशी बाहेर उघडलं गेलं . ती वावटळ जाताना जणू अनूची शुद्ध घेऊन गेली होती . विस्फारल्या डोळ्यांनी तोंडावर हात ठेवून समोर पाहणारी अनू बेशुद्ध होऊन तशीच्या तशी मागे गादीवर कोसळली . समाप्त

Monday, June 1, 2015

Mahesh Ramrao Kulkarni
साधारण 1983-84 चा काळ ! मी 6वी-7वीत असेन तेव्हा. आमचं गाव खेडचं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या. आम्ही मुलं-मुलं जमून वाड्यात खेळत बसलो होतो.दूपारचं रणरणतं ऊन असल्यामुळे बाहेर जायची सोयचं नव्हती. वाडा चौसापी असल्यामुळे माझे मीञ हमखास माझ्याकडे दुपारी खेळायला यायचे. आम्ही खेळत बसलो होतो, एवढ्यात एक किँकाळी ऐकू 
आली. काय झालं म्हणून सगळे धडपडून उठलो. घरात वामकुक्षी घेणारी मोठी माणसे, माझी ताई, आई, बाबा धावतच बाहेर आले आणि दरवाज्यातून बाहेर धावले,आम्हीही त्यांच्या पाठीमागे गेलो. शेजारच्या राधाकाकीच्या घरातून खूप धूर येत होता,जणू काही घरचं पेटलय असच वाटत होतं, आजुबाजुच्या लोकांनी काही क्षणात दरवाजा फोडला आणि धुराच्या, आगीच्या लोटाबरोबर बाहेर पडल्या त्या राधाकाकी. किँचाळत ओरडत त्या आंधळ्यासारख्या इकडे- तिकडे पळत होत्या. पडत होत्या, उठत होत्या. त्यांना आगीने पुर्ण वढून टाकलं होत. ते दृश्य बघुन आईने 
आम्हाला घरात ढकलल आणी बाहेरुन कडी लावली. मग मी माळवदावर जावून पाहु लागलो, लोकांनी बादलीने पाणी आणुन राधाकाकीच्या अंगावर ओतले. आग तर विझली पण काकी धाडकन जमीनीवर बेशुद्ध पडल्या.
तीला दवाखान्यात नेण्यात आले, 2 तासानी बातमी आली की राधाकाकी गेल्या. संध्याकाळी त्यांना घरी आणले व सर्व सोपस्कार पुर्ण करुन त्यांना स्मशानात नेले.त्या दिवशी सर्व गाव 
आमच्या वाड्यासमोर लोटलं होतं. राधाबाई थोडीसी वेडसर पण कामाला वाघ असलेली 
बाई होती. वेड्याच्या भरात तीने पेटवुन घेतल होत म्हणे. तिचा नवरा कामाला आणि मुलं रानात गेली होती, त्या वेळेस तिने पेटवून घेतलं होतं. दोन दिवस असेच शांत गेले, 
चौथ्या दिवशी कोळीकाकानी ( राधाकाकीचा नवरा ) आईला आवाज दिला,'मालकीणबाई येवू का जरा ? ये की रे दत्तू ! विचारायच काय त्यात. कोळीकाका वाड्यात आले ढाळजेत खाली मान घालून बसुन राहीले. आईने त्यांना पाणी दिले अन म्हणाली," जे झालं ते वाईट झाल दत्तू. आता मुलांकडे लक्ष द्यायला हवे. मन घट्ट कर."कोळीकाकांनी मान वर केली अन म्हणाले," ती आली होती राञी." कोण ? आईने सहज विचारले. तीच ! राधा !! कोळीकाका भयाण स्वरात म्हणाले. " राधा ? " "हो! रात्री मला अचानक जाग आली. वाटत होत कोणीतरी फिरतय आसपास. उठलो आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात बघितलं तर कोप-यात कोणीतरी खाली मान घालून बसलं होतं. मोकळे केस, हिरवी साडी कोणतरी बाई बसली आहे हे जाणवत होतं, मला वाटल स्वप्न बघतोय, पुन्हा झोपणार एवढ्यात लक्षात आलं की तीची हलचाल होतीय. 
तीची मान हळूहळू वर होत होती, राधा होती ती. खोल दरीतुन आवाज यावा तसा 
आवाज आला,' घाबरु नका धनी, मी काय नाय करणार, मुलांचा ओढीने आलेय मी.' 
राञभर राधा मुलांच्या भोवती फिरत होती त्यांना थोपटत होती. नवल म्हणजे मुलंही शांत झोपली होती. 
मी माञ राञभर जागाच होतो. पहाटे कधीतरी ती निघुन गेली. माझ्या आईला धक्काच बसला, ऐकलेल सर्व अविस्वासनीय वाटत होत.आई म्हणाली, घर बदल दत्तू, मी शब्द टाकते तुझ्यासाठी. दिस पुरे व्हायचेत तीचे. दिस घातल्याबीगर कसा घर सोडू मालकिणबाई ? 
यावर आईला पण काही उपाय सुचला नाही. थोडा वेळ बसुन दत्तूकाका निघून गेले.
दहा दिवस झाले.
राधाकाकीच दहावं झालं
आणि त्याच दिवशी दत्तूकाकांनी गाव सोडलं, जाताना घरी आले, म्हणाले, ' रोज राञी येत होती अन पहाटे जायची, आता इथे रहाणे शक्य नाही त्यामुळे गाव सोडतोय. एवढं बोलून ते निघून गेले
दोन दिवस असेच गेले. रोज राञी आम्ही अंगणात झोपायचो. दुसरे दिवशी राञी आम्ही सर्वजण झोपी गेलो. राञी मला अचानक जाग आली, कोणीतरी आईच्या नावाने हाक मारत होत. आई उठून बसली होती आणि भयचकित नजरेने दरवाजाकडे पहात होती.
पुन्हा आवाज आला, "काकी ओ काकी... जरा बाहेर या की." ( गावात बरेच जण माझ्या आईला काकी म्हणुन ओळखतात. )
मी आईला विचारले, कोण आहे ग ? आईने ओठावर बोट ठेवत हळु आवाजात सांगीतले, गप्प बैस ! राधा आहे ती. माझ्या अंगावर सरसरुन काटा आला. अन माझ्याही नकळत आई अरे अरे म्हणेपर्यंत मी दरवाज्याकडे झेपावलो. जुन्या काळच्या वाड्यात दरवाजाला कोण आलय हे बघण्यासाठी होल असायचे त्यातून मी बाहेर बघीतले.
बाहेर 'ती' होती. वाड्याच्या तीन पाय-यांच्या खाली ती इकडुन तीकडे फिरत होती. सरपटत, पाय ओढत घासत पुढे सरकत होती. पुटपुटत होती, कुठं गेली माझी मुल ? धनी बी दिसत नाहीत. मधुनच आवाज देत होती, काकी ओ काकी जरा बाहेर या हो. माझी मुलं दिसत नाहीत कुठच.
तीला कदाचीत माझी जाणीव झाली असावी, अचानक ती दरवाजासमोर थांबली अन गर्रकन वळुन माझ्याकडे पाहु लागली, थेट माझ्याकडेच पहात होती ती.
तीच्या चेह-यावर चंद्राचा प्रकाश पडला होता. अर्धवट जळालेला चेहरा, जळालेले केस, कपडे आणि पाढंरीशुभ्र नजर. मनाला आरपार भेदून जाणारी, पकड घेणारी नजर. 
धाकले मालक मला आत घ्या की ! ये म्हणा मला. माझ्या डोक्यात घणाचे घाव घालावेत तसे पुन्हा पुन्हा शब्द कोसळत होते, मनात घुमत होते. माझा हात माझ्या मनाविरुद्ध कडीकडे तसूतसूनी सरकत होता, मनावर भितीचा अंधार अधिकच गडद होत होता. 
माझी ही अवस्था कदाचीत आईच्या लक्षात आली असावी, तीने खसकन मला मागे ओढले, अन एक धपाटा मारला. मी भानावर आलो. पुन्हा अंथरुणावर जावून बसलो. अंगात चांगलेच कापरे भरले होते, मी आईला सांगीतले ती मला घरात बोलवा म्हणत होती. आई म्हणाली, ' मग बोलवायच की, ये म्हणायच ! आणि ती आली असती तर ? आई हसली, म्हणाली " अरे महेश आपल्या घरात स्वयंभू गणेशाची 300 वर्षापुर्वीची मुर्ती आहे ढाळजेत, त्याचे अधिष्ठान आहे आपल्या घरात. दर वर्षी आपल्या घरात भागवत सप्ताह होतो, ज्या जागेत भागवत सप्ता होतो त्या जागेत 12 वर्षे अमानवी काहीही येवू शकत नाही.
मुख्य म्हणजे आपले कुलदैवत जगदंबा माता आहे. येईल का ती घरात ? 
माझी मान नकारार्थी हलत होती. आईने मला झोपायला सांगीतले. ती राञ अशीच घालमेलीत गेली.
त्यानंतर एक दोन राञी असेच आवाज यायचे, आम्ही दुर्लक्ष करायला लागलो नंतर आवाज येणे बंद झाले.
लहान मुलांच मन पाण्यासारख असतं, काहीही मनात रहात नाही. मी ही घटना विसरुन गेलो.
...
दोन वर्षानंतर... 
एका संध्याकाळी...
एकदा विटिदांडू खेळताना मी मारलेली विटी राधाकाकीच्या घरात जावून पडली. त्या घरात कोणीच जात नसे, त्यामुळे मीच विटी आणायला गेलो. घर अर्धवट पडलेले. छत, भिंती ढासळलेल्या, दरवाजा उखडलेला.
मी घरात शिरलो. समोरच पडलेली विटी उचलली अन मागे वळलो. थांबलो. दरवाजाच्या कोप-यात ती बसलेली दिसत होती. हिरवी साडी, हातभर बांगड्या, मळवट भरलेला जळका चेहरा आणि आरपार जाणारी नजर. तीची पाढंरीशुभ्र नजर माझा वेध घेत होती, मान कलली होती, ती उठत होती अन माझ्याकडे झेपावत होती. क्षणात ती कोप-यात होती, क्षणात तीचा चेहरा माझ्यापासून 1 फुटावर होता.
तीच्या अंगातुन काळे धुराचे लोट बाहेर पडत होते, मला वेढुन टाकत होते, मला श्वास घ्यायला ञास होवू लागला कोणीतरी आपला जीव खेचुन बाहेर काढतय याची जाणिव होवू लागली, त्याच वेळेस मला एक भयानक, जिवघेणी किंकाळी ऐकू आली. माझ्याभोवतीचे धुराचे पडदे नाहीसे झाले, तीच्या अमानवी शरीरातुन आगीच्या ज्वाळा निघत होत्या, जळत होती ती. माझ्या मानेभोवती आग जाणवतेय अस वाटल्यामुळे मी माझ्या गळ्यात पाहिले तर माझ्या गळ्यात असलेली तुळजाभवानीची माळ लखलखत होती, तीचा प्रकाश तीला वेढुन टाकत होता. ती क्षणभरातच नाहीशी झाली. मी कसाबसा घराबाहेर आलो आणि बेशुद्ध पडलो. 
!! समाप्त !!
आपल्या पेज चे एक वाचक आदित्य देशमुख यांनी पाठवलेला एक अनुभव 
अंधार: मित्रांनो ही एक सत्य घटने वरती आधारित कथा आहे 
ही कथा आहे कळंदी नागपूर जवळील गावातील पिंट्या पांडेची शाळेत कधीच न गेलेला मुलगा. त्या सोबत घडलेली ही खरी घटना आहे.पिंट्या त्याच्या आजोबासोबत राहत होता घरात फक्त त्याचे आजोबा आणि तो 
त्याच्या आजोबांकडे 3 एकर जमीन होती. दोघेही शेतात एकसाथ मजुरी करत होते. एकदा सकाळी पिंट्या आजोबास घेऊन तालुक्यास गेला होता. आणि ते रात्री शेवटच्या बसने गावात परतले. गावात तेव्हा रस्त्यावरती दिवे कमीत कमी होते. अंधारातून वाट काढत ते दोघे जात होते. पण तेवढ्यात आजोबा थांबले. आणि एक टक समोरील चिंचेच्या झाडाकडे पाहू लागले. त्यांना काहीतरी दिसले हे मात्र नक्की होते. पिंट्या ने विचारले काय आहे आजोबा तिकडे. पण आजोबांनी पिंट्यास काही सांगितले नाही आणि ते सरळ पिंट्यास घेऊन घरी घाईघाईत आले.. आजोबांनी काहीच संगितले नाही पिंट्या आणि आजोबा झोपी गेले. दुसर्‍या दिवशी पिंट्या आपल्या मित्रासोबत कामास निघाला आणि परत घरी येताच तो पार चकरावला. कारण त्याच्या आजोबांनी गळफास घेतला होता. पिंट्याचा आधार देवाने त्याच्याकडून हिरकावून घेतला होता... पिंट्या खूप दुखी झाला होता. त्याने अतोनात विचार केला की का आजोबांनी आत्महत्या केली असावी अशी काय परेशानी झाली त्यांना की त्यांना एवढा मोठा पाय उचलावा लागला... ... पिंट्या रडून रडून हिरमुसला गेला होता... त्याला आई वडील देखील नव्हते ते देखील वारले होते...त्याला त्याच्या आजोबांनीच लहानचे मोठे केले होते... आपल्या नशिबाला दोष देत पिंट्या घरातून बाहेर पडला... त्याच मन आता फक्त दारूकडे वळू लागले होते.... तो काही दिवस दारू ढोसून रडत बसायचा... पण नंतर काही..दिवसांनी तो कामास परत लागला...पण रात्री तो दारू पिऊन घरी परतू लागला वाटेत त्याला तेच चिंचेचे झाड दिसले,... तो तेथून तसाच जाऊ लागला.. की त्या अंधारातून त्यास कोणीतरी हाका मारू लागले..... एवढ्या अंधारात आपल्याला कोणीतरी हाक मारताय हे पाहून पिंट्या बघण्यासाठी पुढे सरसावला... तेथे दिव्याचा एक खांबावरील दिवा बंद चालू बंद चालू होत होता..त्यातच पिंट्या पाहण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला जे दिसले ते पाहून पिंत्याची पूर्णपणे दारू उतरली....पूर्ण पणे नग्न असलेला एक माणूस तेथे झाडाखाली बसला होता पूर्ण अंग पांढरे राखडलेले... त्याचे तोंड पूर्ण पणे रक्ताने भरलेलं होत... त्याच्या पुढ्यात एक कुत्रे मेलेले पडले होते तो माणूस त्या कुत्र्याचे लचके तोडत तोडत पिंट्या कडे पाहत हसत होता.. पिंट्यास काही समजेना झाले होते.. तो त्या माणसाकडे एकटक बघत उभा होता... त्याला काही कळेनसे झाले होते.. असे वाटत होते की एकवेळ मला झटका येऊन मी बेशुद्ध व्हावे.. की हा समोरून नाहीसा व्हावा अथवा याने एकदाचा आपला जीव घ्यावा... पण ती भीती काशी तरी जावी हीच प्रार्थणा पिंट्या देवाकडे करत होता... पण कसे बसे उरले सुरले आवसान घेऊन पिंट्या जोरात ओरडला आणि ओरडत ओरडत पळत सुटला... आणि थेट घेरी आला..तो गावात आला आणि भीतीने ओरडू ओरडू त्याने गावकर्‍यांना संगितले.... गावकरी त्याचे बोलणे ऐकून बिथरले... काही धीट लोक त्याच्या सोबत गेले हातात काठी लाठ्या घेऊन... ते सर्व गेले तेथे एका कुत्र्याचा मृतदेह अर्धांग दिसले गाववाले थोडे समजून चुकले की इथे काही तरी झालय... पण ते सर्व परत आले... सकाळी पिंट्या भीत भीतच कामावर् गेला... तेव्हा त्याचे शेतात.. एका आंब्याच्या झाडाखाली त्याला एक माणूस गांजा पित बसलेला दिसला.. जेव्हा पिंट्या त्या माणसाकडे गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा तोच माणूस होता ज्याला तिने रात्री पाहिले होते कुत्र्यास खाताना.. पण या वेळी तो साध्या वेशात होता आणि लुंगी गुंडाळून चिलम पित होता... पिंट्याने भित भीत बाजूचा मोठा दगड उचलला.. तेवढ्यात तो माणूस त्याला म्हणाला "ऐसी गलती करने की सोचना भी मत वरना कयामत आ जायेगी " पिंट्या थांबला आणि दगड हातात ठेवूनच बोलला... "भोसडीच्या कोण आहेस तू साल्या रात्री कुत्रं खात होतास ना मी तुला आज चांगलाच धडा शिकवतो" तेवढ्यात तो माणूस म्हणाला तेरा दादा तुझसे बहोत प्यार करता है पिंट्या मेरा नाम कालबाबा .. .. बस उसिने मुझे भेजा है मेरी बात समझ मै यहा तुझे आने वाली मुसीबत से बचाने आया हू.." पिंट्या पूर्ण गोंधळून जाऊ लागला होता... पिंट्या ने त्यास गालिच्छ भाषेत शिव्या घातल्या.... त्याच्या बोलण्याने तो बाबा निघून गेला...आणि पिंट्या वैतागून कामास लागला.. त्या घडलेल्या घटनेने त्याने पुन्हा पिण्यास सुरुवात केली... असाच एकदा पिंट्या दारू ढोसून.. घरी जात होता जाता जाता त्याला असे वाटू लागले की आपल्या डोक्यावरी कसला तरी पक्षी उडत आहे 
त्याने वरती पाहिले तर पांढरीशुभ्र साडी आणि तिचा पदर फड फड आवाज करत होता.. ती साडी वारा वागेरे काही नसताना हवेत तरंगत होती.. काही क्षणातच ती त्याच्या समोर येऊन पडली... पिंट्या नशेत असल्याने त्याने ते दुर्लक्ष केले.. आणि घरी गेला दुसर्‍या दिवशी पण तसेच झाले रोज रोज त्याच्या समोर ती रस्त्यात साडी उडत येऊन पडू लागली.. एकदा तो घरी आला त्याला घरात काहीतरी असल्याची चाहूल लागली... त्याने पूर्ण घर पाहिले पण घरात कोणीच नव्हते... तो घरात आला आणि झोपला पण त्याला अचानक दरवाजा धाड करून तुटण्याचा आवाज आला... तो सावध होऊन बाहेर आला पण बाहेर काहीच नव्हते.. आणि दरवाजा जसच्या तसा होता.. दरवाज्या समोर एक स्त्री होती जी पिंट्या कडे पाहत रडत होती.... आणि पिंटू फार घाबरला ,.., त्याला काही कळेना त्याने दारातूनच आवाज दिला कोण आहे तिकडे की समोरून त्यास एक आवाज आला तुझ मरण ...पिंट्या पुढचा शब्द बाहेर काढणार तेवढ्यात त्याच्या मानेवरती कसला तरी धारदार सुळयांचा वार जाणवला तो त्या वेदनेने विव्हळला.... त्याच्या बाजूला एक प्रेत उभे होते जे त्याच्या मानेत आपले सुळे खुपसून त्याने रक्त पित होते... की तेवढ्यात दारात कालबाबा आला.. आणि त्याने जवळील अंगारा त्या प्रेताच्या अंगावरती फेकला... की ते प्रेत दूर फेकले गेले... तरी ही त्या प्रेताने पिंट्या वरती दूसरा वार केला... तेवढ्यात कालबाबा ही काही करू शकला नाही... ते प्रेत पिंट्याचे रक्त पिऊ लागले.... की कालबाबाने पिंट्याकडे एक तलवार घरंघळत फेकून दिली... आणि ओरडून त्यास सांगू लागला .. पिंट्या ले तेरे भगवान का नाम और कर इज शैतानी रूह के दो टुकडे ते प्रेत .. पिंट्याचा जीव घेतच होत की.. पिंट्याने भवानी मातेच नाव घेतले आणि उरल्या अवसानने ती तलवार प्रेताच्या शरीरावरून फिरवली.... की तिचे क्ष्ंनार्धात दोन टुकडे झाले...आणि भयानक किंचाळी करत ते प्रेत नाहीसे झाले पण पिंट्याची मान देखील कापली गेली होती.. त्या प्रेतामुळे... त्याच्या चावामुळे तेव्हा कालबाबा पुढे आला आणि त्यास बोलू लागला "मुझे माफ करदेना पिंटू मे तुझे बचा नाही सका " वो रूह एक वैषया की थी जिसका तेरा बाप दीवाना था उसने पैसे की वजह से तेरे बाप को पुरे गाव के सामने बदनाम किया उसीका बदला लेणे तेरे बापने उसे जिंदा जमीन मे गाड दिया था . और उसिने तेरे मा बाप को फिर ..आत्मा बनकर मार डाला.. तेरे दादाजी तुझे वहासे यहा इस गाव लाये तकि तू उससे बचा रह... लेकीन वो आत्मा यहा पार आ ही गयी उसे तूम सबकी मौत से ही मुक्ति मिल सक्ती थी... जाब एकदिन तू और तेरे दादा बाहर से गाव मे आ रहे थे तभी तेरे दादा ने उसे पेड पे देखलीया था लेकीन उसने तू घर मे नही था तब उसने तेरे दादा को मार डाला उससे पेहले तेरे दादाने मुझसे मदद मांगी थी.,,, मै तो सिर्फ एक तांत्रिक अघोरी हू... मै ना तुझे बचा सका ना तेरे दादा को...मै तेरा गुन्हेगार हू बच्चे... पिंट्या रडत रडत त्या कालबाबा चे आभार मानू लागला... आणि हसत हसत त्याने प्राण सोडून दिला...
नमस्कार मित्रानो मी कनिश्क हिवरेकर हा अनुभव माझ्या शेजारील मित्रासोबत आणि माझ्या डोळ्यासमोर घडलेला आहे तोच मी येथे सादर करू इच्छितो या घटनेला खूप काळ उलटून गेला आहे तर पुढीलप्रमाणे.... मी माझी आई, लहान भाऊ , आणि वडील, असे आमचे छोटे कुटुंब आहे .. माझे वडील सारकारी नोकरी करतात , त्यांची बदलीचे काम असते , काही महिन्यांपूर्वी त्यांची बदली उस्मानाबादला झाल्यामुळे आम्ही सगळे उस्मानाबाला शिफ्ट झालो . हि घटना साधारण ३ महिन्यांपूर्वीची . पण मला या गोष्टींची भीती वाटतच नाही कारण २००८ मधे मला आजोबाच्या अनुवांशीकतेमुळे Major mood Depressive disorder हा मानसीक आजार जडला आहे , यामुळे मला कुठल्या गोष्टी बाबत ना राग ना प्रेम ना जास्त भीती वाटते ..मी स्वतःच्या आजोबाच्या मृत्यू वरही रडलो नव्हतो हे खर आहे पण सध्या मी ठीक आहे. आमच्या इथे फक्त दोनच शेजारी आहेत .. एक शेख आणि दुसरे चव्हाण . आमचे घर खूप भयाण मोकळ्या वातावरणात आहे . शेख यांचा परिवार लहान आहे .. दुसरे चव्हाण त्याना एक मुलगा आहे राहुल,... तो २२ वर्षांचा म्हणजे माझ्याच वयाचा आहे .. आम्ही जेव्हा नवीन राहायला आलो तेव्हा घरात शिफ्ट व्हायला न पाणी , लाइट कनेक्षन घेऊन द्यायला त्याने मदत केली.. माझा चांगला मित्र झाला तो ... मी सतत त्याच्या घरी जायचो , त्याचे वडील ड्यूटी साठी बाहेर जायचे तेव्हा तो घरी एकटा असायचा न किचन मधे एक काकू काम करत असायची... मी जेव्हा पण त्याच्याकडे जायचो तेव्हा त्या काकू फक्त किचन मधेच दिसायची ... मी एकदा त्यांना मागून पाणी ही पिलो होतो... असे २-३ दिवस गेले आम्ही त्याच्या घरी दिश- tv असल्याने tv पाहायला जात होतो ... एके दिवशी मी राहुल ला पाणी मागितले तो बोलला आत्ता आणतो.. मी त्याला थांबवल आन् म्हंटले " तू कशाला जातोयेस ? काकू ना सांग ना " .... तो बोलला कुठल्या काकू.. मे दचकून बोललो , अरे तुझी आई , आणि कोण ?? किचन मधे रोज पाहतो त्याना मी काम करताना... ..तो माझ्याकडे आश्चर्याने बघत होता ...तो बोलला अरे माझी आई तर चार वर्षांपूर्वी हार्ट अटॅक ने वारली आहे.. मे तडकन उठलो आणि त्याला बोललो "अरे काय बोलतोस ?? वेड लागलाय का तुला??....मग ती बाई कोण आहे"?? त्याने मला फोटो दाखवला मला सगळ कळुन चुकले कि ती बाई दुसरी तिसरी कोण नसुन त्याच्या आईच भुत आहे.. मला माझ्या आजारामुळे काही भिती वाटली नाही फक्त आश्चर्याने अंगावर काटा आला ...मला काही सुधारत नव्हते .. राहुल ला घरात एकटे सोडून तरी कस चालेल म्हणून मी त्याला घरात मेणबत्ती शोधायला सांगितली , त्याने मला एक मेणबत्ती दिली मी सगळे घर बंद केले... राहुल नको नको म्हणत होता .. मी त्याला देवघरात जायला सांगितले मी मेणबत्ती पेटवली न प्रत्येक रूम च्या कोपर्‍यात गेलो , शेवटी किचन मधे एका कोपर्‍यात मेणबत्ती झपकान विझली... न मला अंधुक अंधुक दिसायला लागले... मला त्या बंद खोलीत हवा जाणवत होती एकदम थंडगार... मी राहुल ला हाक मारली... त्याला म्हणतल जर काही देवाचे लॉकेट वगेरे असेल तर गळ्यात घालून ठेव आणि मी ..घरी जायला निघालो ..राहुल रडवेला झाला .. त्याला दरदरून घाम फुटायला लागला .त्याने माझा हात घट्ट धरला ...म्हणायला लागला .. "मला पण घेऊन..चल..यार... मला आता खूप भीती वाटतेय ..., " मी त्याला समजावले कि अरे तुझी आई आहे तुला काही करणार नाही ... मला हलका हलका हसण्याचा आवाज ऐकू आला न् तीच थंडगार हवा... मला थोडे वेगळेच वाटले... मी राहुल ला बोललो चल माझ्या घरी जाऊयात ... इथे थांबलो तर काही खैर नाही आपली ... चल लवकर... त्याला बजावले कि अजिबात मागे बघू नकोस घरातून बाहेर येताना...त्याने मला घट्ट पकडले... आम्हाला घरातून निघताना. एसी सारखी थंड हवा लागत होती... न आता गुरगुरण्याचा आवाज येत होता... आता मात्र मी त्याला जवळपास ओढतच बाहेर आणले.... .आम्ही दोघे माझ्या घरी आलो घरी आणले..घरी आल्यावर आई त्याची अवस्था बघून म्हणाली कि अरे काय झाले ... मी तिला सगळा प्रकार सांगितला .... ती तर जाम भडकली न मला ओरडया लागली ... काही पण काय बरळतोय असले काही नसते .. मी तिला म्हंटले अग ह्याची हालत बघ जरा चेहऱ्यावरचा रंग उडालाय ... न पूर्ण थरथर कापत आहे ... आई ने त्याच्या मस्तकाला हात लावला तर अक्षरशः त्याच अंग पोळत होते... त्याला आम्ही लगेच दवाखान्यात घेऊन गेलो ... त्याच्या वडिलांना फोन केला .... ते आल्यावर आम्ही त्यांना त्या घटनेबद्दल काहीच सांगितले नाही फक्त सांगितले कि सकाळ पासून त्याला ताप आली आहे.. मग त्यानी राहुल ला घरी नेले ... मी हि राहुल च्या सोबत गेलो पण तो मला सोडायलाच तयार नव्हता ...त्याचे वडील विचारत होते कि अरे झालाय काय ते तर सांग.. मी फक्त एवढच बोललो की काल आइसक्रीम खाल्याने घसा दुखत होता न कोल्ड झाला होता .त्यामुळे थोडी ताप आली ..त्याना ते खोट वाटल तरी ते गप्प राहीले ..त्यांना ड्यूटी ला वापस जायच होते ...ते गेले मग मी राहुल ला tv लावून दिला ....जरा movie लागल्याने आमचे एंटरटेनमेंट झाले... घरात उजेड राहावा म्हणून मी प्रत्येक खिडकी ,दारे. उघडली...बाहेर कोणी तरी फाकीर बाबा आले होते भिक्षा मागत होते... राहुल धडपडत त्यांच्याकडे धावला ... न विनवणी करू लागला आमची मदत करा मदत करा.. तो फकीर आश्चर्याने त्याला बघत होता ( *मित्रहो हे असे फकीर किंवा पीर, मौलाना हे सर्व आपल्या बाबतीत सांगू शकतात काही खास तपस्या द्वारे त्यांनी आपल्या मध्ये असे सामर्थ्य निर्माण केलेले असते आणि काही जन तर खुद्द जीन भूत प्रेतांना आपले गुलाम बनवून ठेवतात मित्रहो अजून एक गोष्टी काही माफक खूप जुन्या झालेल्या दर्गाह च्या दारात जीन वावरत असतात तर मग पुढे* ) ..मी त्यांना पाणी दिले ... त्यानंतर त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला.. तो मला म्हंटला कि .कल देखा ना तूने उसे? तुझे पता चला है ना वो यहा है? इसको बुखार उसी कि वजह से आया है, है ना?" मी फक्त त्यांना अचंबित होऊन पाहत होतो आणि त्याच सुरात मी मान हलवली आणि हो म्हणालो तसेच तो हे हि बोलला कि तेरी ये बिमारी तेरे दादा कि वजह से है... है न ? न गुस्सा , ना दुख होणे कि तेरे भगवान है ना उसने तुझे पत्थर का दिल दिया है.. ... आता मीही त्याला विनवणी केली कि आमची मदत करा ते आत आले नी त्यांनी त्यांच्या मोर पंखाने फक्त.. धूर केला... मी त्यांना किचन मध्ये घेऊन गेलो ... तर आम्हा सगळ्याला थंडगार वारे लागले... त्यांनी तो धूप मोर पंखाने पसरवला.. आणि ते उर्दू भाषेत काही तरी मंत्रा म्हणत होते.... मला काही कळेचना.. थोड्या वेळाने.. सगळा धूर गेला पूर्ण किचन रिकामे झाले... न राहुल ने गचकन मागून येउन त्या फाकीर बाबा गळा धरला ...ते बाबा त्याच्या डोळ्यात न डोक्यावर पंखाने मारत होते. मी दोघांना दूर केले.. त्या बाबांवर मी खूप चिडलो, त्यानी राहुल कडे बोट केल तर राहुल च्या तोंडातून रक्त येत होते .. न डोळे रागाने लालबुंद झाले होते .. आणि तो रडत होता... गुरगुरत होता .. तो फाकीर मला म्हणाला .. देख आइस ..तेरे दोस्त को वो लेकर ही जायेगी.... मी ..राहुल ला हाका मारल्या...तो बेशूध पडला. होता . समोर च्या शेख यांचा मोठा मुलगा शौकत आला.. त्याने आत सगळे पहिले होते.. त्याने विचारल काय झालाय याला ?? अस का वागतोय हा ?? ... मग मी त्याला सगळे सांगितले .. तर त्याने हि यावर विश्वास ठेवला ..कारण तो बोलला कि , मी एकदा रात्री २ वाजता बाथरूम ला गेलो होतो खिडकीतून सहज लक्ष गेले तर कोणतरी कोण तरी बाई घरावर उभा राहून.. वेगळ्या भयानक आवाजात रडत होती रे.....भास असेल म्हणून बाहेर येउन मी रूम च्या खिडकीतून बघितले रे कनिश्क.... ती बाई केस मोकळे सोडलेली... होती.. तिचे डोळे फुल्ल सफेद झाले होते.....न सगळे ओठ फाटून दात बाहेर आलेले होते .. न हसत होती ती... मला पहिले कळेचना ,,.माझा आवाजच निघेना .... कोण आहे रे ती बाई ??? .. मी त्याला बोललो चव्हाण काकू ; राहुलची आई .. तो पण घाबरला.. फाकीर बाबांनी मला.एक केस असलेले काताडे दिले... त्यानी त्याचे ३ तुकडे केले.. न आम्हा तिघांना दिले ... राहुल ला उठवून मी पाणी पाजले....आणि त्याच्या पॉकेट मधे तो तुकडा ठेवला.... ते बाबा गेले न मला जाता जाता बोलले कि ." सून बच्चे कभी कभी प्यार वो चाहे किसी का भी हो उसे बुराई मी बदलते देर नहीं लगती इसकी माँ का प्यार ही उस रूह में बदल क्र इसे ले जाना चाहता है ... वो अब तेरे दोस्त के अंदर नही घूस पायेगी...आज तू इनके पास ही रेहना .. मे तेरे दोस्त के लिये दुवा करूंगा...संभालके रेहना बच्चे " आणि ते निघून गेले.... संध्याकाळ झाली मी घरी जेवायला गेलो. शौकत राहुल जवळ थांबलेला... मला कानात फक्त हसण्याचे आवाज ऐकू येत होते... मला जेवावेसेच वाटेना ..मी आईला बोललो अग आई तो राहुल आजारी आहे न एकटा. आईने मग माझ्यासाठी आणि राहुल साठी डब्बा दिला... त्यात पांढरा शुब्र भात न चपाती भाजी दिली होती ...मी राहुल कडे गेलो.. शौकत पण घरी जाऊन मग जेवून आला ... थोडावेलातच मला सडलेला कुबट वास आला ... मला वाटले हा वास किचेन मधून येत असेल .. पण किचन मधे वास येत नव्हता ..मग मला शौकत म्हणाला बहुदा तुझ्या डब्ब्यामधून वास येतोय ...मी झट दिशिने डब्बा उघडला तर डब्यातला ताजा गरम भात सडून गेला होता... त्याचाच वास येत होता .....(*मी या पेजवर वाचलेले भात हा लवकर भ्रष्ट होतो आणि त्याचा वापर काळ्या विद्येत केला जातो....*) त्या दोघांना भीती वाटायला लागली जशी जशी रात्र जवळ येत होती तशी त्यांच्या घश्याला कोरड पडत होती.. मी त्याला माझ्या घरी तरी कसे न्यावे .. कारण घरी मावशी न तिची फॅमिली आली होती.... रात्रीचे ८ वाजता आम्ही तो भात बाहेर फेकून दिला व राहुल ने जेवण करुन घेतले...मग आम्ही tv पाहत बसलो होतो .. सर्व काही ठीक होते ...मी विचार केला कि जरा किचन मधे जर जाऊन यावे .. खर तर तिथे मी मुद्दामच गेलो .. एका ठिकाणी स्तब्ध उभा राहिलो...न जरा डोळे झाकले ... मला कानात कुजबुजल्याचा आवाज आला... मी डोळे उघडले...आणि मी जे पहिले ते पाहून.. एखादा धडधाकट माणूस मेला असता... माझ्या समोर काकू. भयानक रित्या हसत उभ्या होत्या त्यांचे हात रक्ताने माखलेले होते ..फाटलेले ओठ ..त्यातून खालच्या दातांची रांग बाहेर आली होती .भयानक डोळे .. मी फक्त पाहत राहिलो... त्या माझ्या इतक्या जवळ आल्या की जणू आता नरडीचा घोट घेणार आहेत... पण मी त्यांना तसे पाहत होतो हे बघून...त्यांचे हसनेच बंद झाले.,..त्या मला भेसूर न भयानक आवाजात म्हणाल्या , " अरे पोरा तू कहीही कर ..मात्र मी माझ्या पोराला घेऊन जाणारच ... मी तिला हळू आवाजात म्हणालो ...काय होणार आहे अश्याने ...तू स्वार्थी बनू नकोस ..चालती हो इथन .... त्या इतक्या गुर्गुर करत होत्या ....आमची शाब्दिक चकमक उडत होती .त्या आवाज चढवून मला..ओरडत होत्या..मग मी हि पूर्ण ताकद लावून .. जोरात ओरडलो...पण त्या मला हात लावत नव्हत्या ... त्या सारखे खिशाकडे बघून दात खात होत्या..कारण फकीर बाबांनी आम्हाला ते कातडे दिले होते ... ती बोलली आत्ता तरी तुम्ही याच्या मूळ वाचताय ...पण माझा टाइम आहे थोड्या वेळाने.. बघा मग तुमच काय करते ते .. त्या कधी गेल्या ते समजलेच नाही नाही.. मी गटा गटा दोन बाटल्या पाणी पिलो ... घसा गरम झाला होता न कोरडा फट पडलेला.,..मी मागे बघितले... तर शौकत घामा घूम होऊन थर थर कापत होता... न मला पाहत होता ..मला तो दबक्या आवाजात म्हणाला ..क्या है तू? है कौन तू यार? अब पता चला राहुल क्‍यू तुझे जाने नई दे रहा ... तुजे डर केसे नही लगता भाई.. त्याला मी माझ्या आजरा बद्दल.सांगितले.. यार बचा लेना हमको .असी बोलू लागला ... ..मी त्याला पाणी दिले.. न किचन मधल्या सगळ्या धारदार गोष्टी पेटीत बंद केल्या... न शौकत च्या घरावर टाकल्या,. न बजावले . घरातली एक ही लाइट आता बंद करायची नाही...मग आम्ही राहुल जवळ जाऊन tv पाहू लागलो .. थोडा वेळातच आम्हाला झोपा लागल्या तेव्हा रात्रीचे १.३० वाजत आले होते.. त्या नंतर ती रात्र वैर्याची होणार होती यापासून आम्ही अनभिज्ञच होतो ...मित्रहो हा अनुभव एका सत्य घटनेच्या आधारवर कथित केला आहे त्या घटनेतील प्रसंग येथे नाटकीय रुपात दर्शवले आहेत ...` अस म्हणतातच कि संकट कधी सांगून येत नाहीत आणि आमच्या सोबत त्या रात्री तसच काहीतरी होणार होत याची भनक तर आम्हाला लागलेली होतीच झोप हि तर उडाल्या मध्ये जमा होती आम्ही झोपलो कसेबसे पण उघड्या डोळ्यांनीच सारखी इवलुश्या हालचाली कडे कोठे एखाद्या कोपरयात पाल वळवळत होती तर खिडकीतून येणारा सुईईईइ....सुईईई करत असेलेला आवाज सर्व मनात धाक निर्माण करीत होत सारखे सारखे मनात तोच विचार होता कि आता पुढे काय होणार या झपाटलेल्या घरात त्या दुष्ट आत्म्या बरोबर आम्हीं असे हे तिघे आणि तिघांच्या जीवाला धोका आता आम्ही तिघांनी एकमेकांना सांभाळावे कि स्वतःला रात्र झाली खरी आम्ही झोपी हि गेलो खिडकी उघडीच होती विचार होता आजूबाजूने कोणी एखादा ओळखी पाळखीचा गुजरत असेल तर हाक मारून बोलवाव त्याला मदतीस. शौकत अल्लाह जवळ मनोमन प्रार्थना करीत होता मी खोलीतील लाईट लावण्यासाठी उठलो व बटनाच्या बोर्डाजवळ गेलो आणि बटन दाबताच एक हि बल्ब लागला नाही लाईट गेली होती तेव्हा मला वाटले पुन्हा त्या आत्म्यान काही कहर तर नाही केला. नाही तस नाही झाले खरच लाईट गेली होती. मी माझ्या अंथरुणात येऊन पडलो खिडकीतून चंद्राच थोडस कवडस आत येत होत... तितक्यातच त्या भयान शांततेत टाचणी पडल्याचा हि आवाज ऐकु येईल अश्या शांततेत एक भयान अशी गोष्ट घडली. आमच्या कानाचे परदे फाडत मेंदू पर्यंत झनझन करत मुंग्या आणणारी कान सुन्न करणारी , काळजाचा ठोका चुकवणारी एक जीवघेणी किंकाळी आमच्या तिघांच्या कानी पडली आम्ही तिघांनी झपझप कानावर हात ठेवले राहुल तर रडण्याच्या तयारीत होता. त्याने आपले कान झाकून पूर्ण डोक गुडघ्यात दाबून घेतले शौकत मोठमोठ्यान त्याच्या देवाचा धावा करू लागला. पण राहुल आणि शौकत इतके घाबरून गेले होते कि उठून ते सैरावैरा इकडे तिकडे धावू लागले त्यांनी माझ्या कडे लक्ष न देताच दाराकडे धावले आणि पटापट दार उघडून स्वतःचा जीव वाचवण्याच्या उद्देशाने घराच्या बाहेर पळू लागले पण बाहेर जाणारा दरवाजा उघडण्याचे नाव घेईना झाला होता. मला माहित होते कि काही केल तरी ती आम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. तरीही मी त्यांची मदत म्हणून दरवाज्यावर धाड धाड लाथा मारू लागलो आम्ही तिघांनी स्वतः जीवतोड प्रयत्न केला दरवाजा उघडण्याचा पण असंभव होत ते राहुल वेड्यासारख ओरडत होता ..ए दार उघड रे .. कोण आहे का बाहेर दार उघड शौकत आणि राहुल इतके वेडे झाले होते आणि इतके घाबरले होते राहुल वेड्यासारख बडबडत होता जणू तो जीवनासाठी भिकच मागतोय इतका तो रडत आणि ओरडत दारावर थापा मारत होता.. कि जणू तो आता मरेलच.. मला त्याला शांत करायचं होत पण तो काहीच ऐकत नव्हता... मी माझ्या खिशातून ती फकीरबाबाची कातडी काढली आणि राहुलला दिलासा देण्याचा प्रयत्न करू लागलो मी त्याला म्हणालो फक्त सकाळ पर्यंतच वाट पाहू सकाळ झाल्यास आपण बाहेर पडू तू काही काळजी करू नको .. पण तो आता जास्तच करू लागला होता.. मला दुसरा पर्याय नव्हता मला त्याला मारावस वाटत होत जेणे करून तो शांत झाला असता पण देवाच्या कृपेने तो शांत झाला . आणि जसा तो शांत झाला तसाच एक हसण्याचा आवाज हळू हळू समोरच्या अंधारातून आमच्या दिशेने येताना मला जाणवू लागला.. मी राहुल आणि शौकत ला माझ्या मागे केले. आता जे होईल ते होईल एक तर ती आत्मा राहील नाही तर मी राहुल माझा हात झटकून दुरीकडे पळत सुटला घर तस मोठ होत..मी आणि शौकत राहुलच्या दिशेने धावलो जर त्या आत्म्याच्या तावडीत तो सापडला तर काही खर नाही म्हणून आम्ही त्याच्या मागे गेलो तर राहुल एका कोपऱ्यात दाबून बसला होता शौकत तसा ताकतवर होता त्याने राहुलला जबरदस्तीने उचलले आणि आम्ही तिघे तिथेच जवळच्या खोलीकडे जाऊ लागलो आम्ही जस जस पुढ जाऊ लागलो तास तास आम्हाला मागून कोणी तरी आमच्या सोबत चालत येतय हे आम्हाला कळत होते शौकत ने मला इशारा केला मी त्याला हाताने खुणवून सांगितले कि काहीही झाले तरी मागे पाहायचं नाही आम्ही त्या खोलीजवळ आलो आणि तातडीने आत शीरलो आणि दार लावून घेतल मला बाहेर कोणीतरी फिरतय हेच समजत होते तेव्हा मी विचार केला दरवाजा उघडणे हि मोठी चूक असू शकते पण दरवाज्याची पूर्ण कडी लावणे हि तर चूक नव्हती न मी दरवाजाची कडी लावली .. दरवाजा बंद करताच मी मागे वळलो त्याचक्षणी तो आवाज बंद झाला मी थोडा सुटकेचा निश्वास घेतला पण मला मी दरवाज्याच्या जवळ असल्याने मला काहीतरी खुसपूस असा आवाज आला कि तिकडून शौकत मला म्हणला "कनिश्क ..भाई इधर आ " मी त्याला माझे बोट ओठावर ठेवत त्याला "शूसुस्स्सSSSSS " शौकत त्याच क्षणी शांत झाला राहुल आणि शौकत मला पाहत होते खिडकीतून आलेला थोडासा चंद्राचा प्रकाशच आमच्या खोलीतील उजेडाचा पर्याय होता.. राहुल आणि शौकत माझ्याकडे पाहत होते मी तेव्हा दरवाज्याच्या जवळ जाऊन कान लावले कि पलीकडे कोण आहे आणि कोणाचा आवाज आहे. मला पलीकडे खुसपूस करण्याचा आवाज येत होता .. मी अजून थोड शांततेत नीट ऐकण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा "ए दार उघड .... दार उघड दार दार उघड माझ पोरग दे मला " त्या आवाजाचा खुसपूसपना आता वाढत चालला होता आता तो आवाज अत्यंत जवळ आला होता कि दारावर तो आवाज आलाय हे मला स्पष्टपणे कळत होते. मी थोड अजून कान दारवर लावून ऐकू लागलो पण आवाज येईना झाला होता.. थोडी शांतता झाली आणि त्याच एका क्षणातच ती माझ्या कानातच ओरडली .....तिचा तो मोठा जीवघेणा आवाज "ए माझ पोरग दे माझ पोरग ..." असे किंकाळ करीत पलीकडे असलेली ती आत्मा दारावर मोठमोठ्याने थापा मारू लागली. मी धक्क्याने मागे झालो तिच्या रडण्याचा आता आवाज येऊ लागला होता.. आणि असह्य असा आवाज त्या आत्म्याच्या किंकाळण्यातून येत होता ती रडत होती आणि जोरजोराने दरवाज्यावर स्वत:ला आदळून घेत होती आणि तो दरवाजा देखील कोणत्याही क्षणी ती तोडेल अस वाटत होत आम्ही रात्रभर दरवाजाच्या पलीकडे ती आत्मा आमच्या मरणावर टपलेली होती.. रात्र गेली आम्ही कसे झोपी गेलो होतो आम्हाला कळलेच नाही पण त्या रात्री नंतर सगळ काही बदलल होत.. सकाळी राहुलचे वडील आले होते आता मात्र आम्हा सर्वात एक जोश आला आणि आम्ही शौकत ने राहुलने आर्व झालेली घटना काकांना सांगून टाकली. काकाना आमच्यावर विश्वास बसत नव्हता यानंतर त्यांनी रागाच्या भरात शौकतला घरातून काढून टाकले . त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या आई बाबानजवळ माझी तक्रार केली मला आईने जोरदार कानाखाली लावली होती आणि पूर्ण बजावले कि मी त्यांच्या घराकडे फिरकू पण नाही .. हे आता खूपच वाईट झाल होत...(आम्हाला घरी पाठवल्या नंतर तीन दिवसांनी ) राहुल घरात एकटाच होता त्याचे वडील एकूण तीन दिवस कामासाठी गेले नव्हते का काय झाले होते ? कोणास काही ठाऊक नव्हते मला त्या तीन दिवसामध्ये राहुल कधीच बाहेर आलेला दिसला नाही त्याच्या कडे जाण्यासाठी देखील ताकीत होती. तरी आमचे वडील आणि राहुलचे वडील भेटले तेव्हा त्यांनी सांगितले कि राहुल ला तीन दिवस झाले ताप आलाय आणि ते तीन दिवस काय काय झाले ते त्यांनी आमच्या वडिलांना सांगतीले (त्या तीन मधील पहिल्या दिवसात राहुल किचनमध्ये त्याच्या वडिलांना काही आणण्यासाठी गेला त्याच क्षणी त्याला फिट्स आले होते त्याचे अंग पूर्ण तडफडत होते त्याच्या वडिलांनी तेव्हा कामास न जायचे ठरवले. त्याच वेळी त्यांनी चव्हाण काकांनी राहुलला दवाखान्यात नेले तेथे कळाले कि राहुलला झटका बसला आहे भीतीचा असे डॉक्टरांनी सांगितले . दुसऱ्या दिवशी तो पूर्णपणे तापेने बेशुद्ध होता .. आणि तिसऱ्या दिवशीच्या रात्री तो शांतपणे आपल्या घरी आणण्यात आला तेव्हा चव्हाण काकाना वाटले राहुल ठीक झाला आहे त्या रात्री जेव्हा काका आणि राहुल झोपले तेव्हा रात्री काकाना जाग आली आणि त्यांनी पाहिले कि राहुल उठून बसला होता व सारखे आपल्या आईच्या फोटोकडे पाहत होता आणि तो रात्र भर त्याच्या वडिलांच्या उशीस बसून बडबड करायचा बाबा मला आई घेऊन जाणार बाबा मला आई घेऊन जाणार आहे ..मला वाचवा मला वाचवा असे काहीही तो बडबड करायचा त्यानंतर ) हे झाले तीन दिवसातील घडलेले त्यानंतर चौथ्या दिवशी राहुलचे बाबा अत्यंत चिंताग्रस्त होते... संध्याकाळी सहा वाजले होते राहुलच्या घरातून आरडा ओरडीचा आवाज आला कि काही सेकंदातच राहुल घरातून बाहेर पडला आणि घराच्या मुख्य दरवाज्यासमोर उभा राहिला आम्ही सगळे घराबाहेर आलो आणि राहुलने जे त्यावेळी केले ते पाहून सगळ्यांचे डोळे उघडे ते उघडेच राहुलने पूर्ण घराभोवती धावत फेऱ्या मारायला सुरुवात केली. आणि ते हि उलट्या पावलांनी तो शक्य तितक्या ताकतीने जोरात धावत होता त्याच्या चेहर्यावर जणू त्याच्या मनातील भाव उमटत होते जस कि हे सर्व कोणीतरी त्याच्याकडून करवून घेतय त्याचे पाय काट्यात दगडावर आपटले जात होते ते रक्तबंबाळ होत होते राहुलचे वडील त्याच्या मागे धावत होते पण तो काही थांबण्यास तयार नव्हता.. मी हि धावलो राहुल ज्या दिशेने धावत होता त्याच दिशेने त्याचे वडील त्याकडे जात होते पण मी विरुद्ध दिशेने जाऊन राहुलला पकडल तेवढ्यात तिकडून शौकत देखील धावत आला.. आम्ही दोघांनी राहुल ला गच्च आवळले राहुल इतका झटपट करीत होता पण आम्ही दोघांनी पुन्हा राहुलच्या वडिलांनी देखील त्यास पकडले ..तेथेच तेव्हा माझी मावशी देखील उपस्थित होती. तिला भूतप्रेताच सर्व कळायचं तिला राहुलला पाहताच समजून गेल कि त्याला बाधा झालीय मावशीने त्याच दिवशी राहुलच्या वडिलांची भेट घेतली त्यांच्यात काय बोलन झाल हे मला माहित झालच त्यानंतर राहुलला त्याच्या घरात कोंडण्यात आला मला त्याची कीव येत होती पण हे सगळ त्याच्या भल्यासाठीच तर होत रात्रीच सर्व उरकायच होत ती बुद्धपोर्णिमा होती... मावशीने सर्व झाडफुके आणली होती त्या पूर्वी मावशीने मला त्यांच्या काकुच्या फोटोस जाळायला सांगितले मी काकूंच्या सर्व वस्तू जाळण्यास घेतल्या मावशीहि म्हणाली बर केलस. रात्री मावशी मी आमच्या घरचे राहुलचे वडील शौकत आणि मी असे राहुलच्या खोलीत गेलो आत राहुलने सर्व अस्थाव्यस्थ करून ठेवल होत आणि थोडेशे रक्तांचे शिंतोडे देखील उडाले होते.. राहुलने स्वतःच्याच हाताचे लचके तोडले होते आणि रडत रडतच बेशुद्ध पडला होता. राहुलच्या वडिलांनी त्याची जखम बांधली ती बांधताच राहूल उठला आणि त्याने काकाचां गळा दाबण्यास सुरुवात केली आम्ही सर्वांनी घाईघाईने राहुल ला हॉलमध्ये आणले व मावशीने सर्व सुरु केले मावशीने आजूबाजूने काही बाहुल्या आणि काही कपड्यांची वेणी बनवली होती त्यात ज्वारी आणि गहू सारखे दाणे भरले गेले होते आणि हळद कुंकुवाचा नारळ आणी पाच लिंब त्याच्यासमोर एका चांदण्याच्या आकृती वर ठेवले होते हळूहळू मावशीच्या अंगात देव येऊ लागलेत असे वाटत होत मी हे सर्व प्रथमच पाहत होतो मावशी बड्बड करीतच राहुल च्या अंगावर हळद आणि कुंकू फेकू लागली मावशीच्या तोंडून एक न एक शिवी त्या आतम्यासाठी येत होती .. समोर राहुलच्या अंगात त्याची आई भयंकर रीतीने आरडाओरडा करीत होती राहुल कोणालाच आवरला जात नव्हता.. तरी हि मावशीचे प्रयत्न चालूच० होते.. बराच वेळ झाला पण काही फरक पडेना शेवटी मावशीने जोरजोरात आई जगदंबेचा धावा करण्यास सुरुवात केली राहुल खूप तडफडू लागला ते वातावरण अत्यंत भयानक झाले होते... सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला होता पण अखेरीस ती दुष्ट शक्ती हरलीच आणि राहुलची आई त्याच्या शरीरातून मुक्त झाली व राहुल या दुष्टचक्रातून कायमचा मुक्त झाला... राहुलचे वडील मला बोलू लागले त्यांनी माझ ऐकले नव्हते म्हणून पण आता सर्व काही ठीक झाले. जेव्हा हि सर्व क्रिया संपली तेव्हा त्या पाचपैकी एक लिंबू करपले होते आणि काळे पडले होते शक्यतो असे होते कि त्या आतम्याने बाहेर पडण्यासाठी याचाच आधार घेतला ते फक्त एकच लिंबू असे होते ज्यावर हळद कुंकू लावले गेले नव्हते ते पूजेतील सर्व सामान मावशीने स्मशानभूमीत नेऊन पुरले . त्यांतर चव्हाण काकानी घराची वास्तुशांती करवून घेतली राहुलचे सध्या लग्न झाले आहे व तो सुखात आहे त्यानंतर कधीच चव्हाण काकू दिसल्या गेल्या नाही.