Tuesday, March 29, 2016

नमस्कार मित्रांनो, आज जी सत्य घटना मी सांगणार आहे ती 1993 -94 साली घडलेली आहे. 1993 साली लातूर जिल्ह्यात खूप मोठा भूकंप झाला होता, किल्लारी या गावी.
भूकंप इतका अचानक आणि मोठा झाला त्यामुळे हजारो संसार जिवंत गाडले गेले.
या आपत्ती निवारणासाठी अनेक डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवक मदतीसाठी आले होते. अनेक रुग्णवाहिका आणि शववाहिका होत्या.त्यातल्याच एका शववाहिकेचा ड्रायवर सुधीर होता. दिवस रात्र शव किल्लारी हुन लातूर च्या शासकीय रुग्णालयात नेणं हे त्याच काम होत. शेकडो शव मातीच्या ढीगाऱ्यातून काढले जात होते.सुधीर सोबत एक सहायक असायचा. त्या दिवशी रात्री 8 च्या सुमारास ते दोघ एक प्रेत घेऊन शववाहिनी घेऊन निघाले होते.किल्लारी पासून थोडेच पुढं गेले असतील तोच सहायकाला वरिष्ठांचा फोन आला व त्याला तातडीने बोलवलं गेलं.त्यामुळे आता शववाहिनी घेऊन सुधीर एकटाच पुढे निघाला.रात्रीचा अंधार आणि त्यात बाहेर भयाण शांतता.. गाडीत पाठीमागे प्रेत आणि सुधीर चालवतोय... सुधीर तसा धीट होता कारण रोज रोज मृतदेह पाहून पाहून मन खंबीर झालं होत. 
तो किल्लारी पासून आता बऱ्यापैकी पुढे आला होता, पुढच्या फाट्यावर तो लातूर साठी वळणार होता, तेवढ्यात 'फट फट फट फट...फट ' असा आवाज येऊ लागला, सुधीर नी गाडी थांबवली आणि खाली वाकून पाहिलं, तर एक लोखंडी पट्टी निघाली होती आणि तिचा आवाज येत होता, सुधीर नि पट्टी काढून टाकली आणि गाडी चालू करून पुढे निघाला.अगदी 2 च मिनिट झाले असतील, परत आवाज आला, आणि यावेळी जरा मोठ्याने आला...'धप धप धप्पप..' कोणी तरी मागून त्या शववाहिनी च दार वाजवत आहे अस वाटत होत. सुधीर ला वाटलं परत काही तरी निघाल, म्हणून त्याने गाडी थांबवली, खाली तर काही नव्हत, म्हणून त्याने मागचं दार उघडलं आणि आत मध्ये ठीक आहे ना हे पाहण्यासाठी तो थोडा आत मध्ये वाकला, तेवढ्यात ते प्रेताने डोळे मोठे केले आणि हात वर करून सुधीर चा गाळा पकडला. आता मात्र सुधीर प्रचंड घाबरला, त्याला काहीच कळेना हे काय होतंय. त्याने पटकन दार बंद केले आणि पुढे ड्रायविंग सीट वर बसला, गाडी चालू करू लागला तर गाडी चालू होईना.मागून आता जोर जोरात धप धप आवाज येत होता आणि गुरगुरण्याचा आवाज येत होता.भीतीने पूर्ण थरथरू लागला. तेवढ्यात त्याला समोरून एक बैलगाडी वाला येताना दिसला. सुधीर पटकन गाडीतुन उतरला आणि बैलगाडीवाल्याकडे धावला, बैलगाडी वाला खाली उतरला त्याने सुधीर ची विचारपूस केली, तो माणूस चांगला धिप्पाड होता. तो सुधीर ला बोलला कि चल दाखव मला, कोणत प्रेत काय करत ते मी पाहतो..
सुधीर मागून चालू लागला, त्या माणसाने शव वाहिनी च दार उघडलं आणि त्या प्रेताकडे पाहून दात विचकावून मिस्कील हसला. तसे ते प्रेत मोठं मोठ्याने ओरडू लागले, सुधीर चा पूर्ण थरकाप उडाला. त्या माणसाने चक्क त्या प्रेताचा हात घट्ट पकडून तोंडाजवळ नेला आणि खचकन एक लचका तोडला, तस ते प्रेत मोठ्याने किरट्या आवाजात विव्हळू लागले.सुधीर च लक्ष त्या माणसाच्या पायाकडे गेलं तर त्या माणसाचे पाय उलटे होते, आणि तो माणूस खविस होता.
आता मात्र सुधीर पूर्ण गळून गेला, त्या प्रेताचा मोठा आवाज, समोर खविस... सुधीर च्या तोंडातून शब्द निघेना, हातपाय थंड पडलेले. पूर्ण शक्तीनिशी सुधीर तिथून मागे न पाहता पळत सुटला. पुढे रस्ता त्याला उमजत नव्हता,डोकं बधिर झालं होत, समोरून एक ट्रक येताना दिसला.पण आता त्याला सगळंच धोकादायक वाटू लागलं, त्यामुळे तो ट्रकवाल्याकडे न पाहता पुढे पळत राहीला, पण थोड्याच अंतरावर गेला तेव्हा अचानक काही कुत्रे भुंकत त्याच्याकडे येऊ लागले, त्याला भोवळ आली आणि तो पडला.जेव्हा सुधीर ने डोळे उघडले, सकाळ झालेली होती. समोर त्याचेच काही सहकारी, आणि काही लोक होते. त्या ट्रक ड्रायव्हर ने सुधीरला पडलेले पाहिले होते आणि त्याची मदत केली होती. कर्मचाऱ्यांना ते प्रेत शव वाहिनी जवळ छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडलं.
सुधीर जिथे पडला होता तिथंच समोर एक दत्ताच मंदिर होत.सुधीर चे दैव बलवत्तर म्हणून तो वाचला.... त्या कुत्र्यांमुळे ..!!!! Sunil Tarwal
नमस्कार मी वर्धान माने
रत्नागिरीतील राजापुर मधे घडलेली ही अंगावर काटा आणणारी ही घटना।
2007 सालची घटना असेल। त्यावेळी मी सातवीत शिकत होतो. शाळएत जाण्याचा मार्ग हा पर्या(पावसातील व्हाळ किंवा वाहणारे पाणी) वरून जातो..
दुसरा कोणताही रस्ता नसल्याने त्याच रस्त्यावरून आम्हास जावे लागे। संध्याकाळी पारावर गोष्टी करणारे म्हातारे म्हणत की त्या पर्यावर काहीतरी अमानवी शक्ति आहे। पण आमच वय खेळण्या बागड्न्याचे असल्याने आम्ही नेहमीच त्या गोष्टिकड़े दुर्लक्ष केला।
माझा एक जिवलग मित्र अमित आणि मी नेहमीच त्या वाटे वरून शालेत जात असू।
आम्हा दोघाना शिक्ण्यापेक्षा मस्ती करायलाच आवडे। म्हणून एक दिवस आमच्या घरी आजीचे श्राद्ध आहे अस खोट सांगुन आम्ही दोघेही घरी यायला निघालो।
म्हाळवसाचे ते दिवस।
दुपारच्या प्रहरात आम्ही दोघे चालत होतो। सभोवती दाट झाडी।
पोटात भुकेने डोम उसळलेला।
वाटेत काजूची बोंडे, करवंद खात मज्जा मस्ती करत चाललो होतो.
पर्याजवळ आलो। तेवढ्यात अमित म्हणाला की या पर्यामधे एक 'आटकं' नावाचं झाड आहे। त्याची आंबटगोड़ फळ मस्त लागतात.
माझ्याही तोंडाला पाणी सुटल।
पण पारावर ऐकलेल्या त्या अमानवी शक्तीचा विचार माझ्या मनात चमकून गेला।
पण 'आटकं' च्या आंबट गोड़ चविपुढ़े सर्व फ़िक वाटल।
('आटक' हे कोकणात मिळनारे एक फळ आहे। आंबटगोड चवीचं। तिखट मीठ लावून खायला मजा येते).
दोघेही त्या झाडावर चढलो। लाल रक्ताच्या रंगाची ती फळ बघून दोघेही सुखावलो।
दोघानिही फळ काढायला सुरुवात केली।
एक खिसा भरला तस मी खाली उतरलो.
पण अमित मात्र तसाच झाडावर बसून जास्त फळ काढण्याचे अपेक्षेने बसून राहिला। मी तिथल्याच एका दगडावर बसून फळ खावु लागलो।
तेवढ्यात झाडाच्या पाचोल्यातिल कुरबुर माझ्या कानावर पडली। मी दुर्लक्ष केला। पानाची सळसळ वाढली। तस मी मागे पाहिल आणि माजी बोबडी वळली।
हिरव्या रंगाची साडी केस विस्फार्लेली एक बाई नजर रोखून आमच्या दोघंकड़े पाहात होती। मला घाम फुटला। तोंडून शब्द फूटेना। माझा मित्र ते भयावह दृश्य पाहून झाडावरुन खाली कोसळला। दगडावर आपटला. 
त्याच्या डोक्यातून रक्ताचा पुर निघाला। ती भयावह बाई त्या रक्ताकड़े एक टक पाहू लागली। आणि क्षनार्धात ते रक्त चाटून पिउ लागली।।
माझ्या तर हातापायातील अवसानच संपले. रक्त पिवुन झाल्यावर तिने आपला मोर्चा माझ्या बेशुद्ध मित्राकडे वळवला।
हीच ती काहीतरी करण्याची वेळ होती। नाहीतर मी माझ्या मित्राला कायमचा गमवून बसलो असतो।
ती मित्राच्या जवळ पोचली। इतक्यात माझ्या गळ्यात असलेल्या जानव्याची( मुंज झाल्यावर सुतार ब्राम्हण आणि सोनार यांच्या गळ्यात एक धागा बांधतात त्याला यद्नोपवित असे सुद्धा म्हणतात) गाठ हाताशी धरली आणि आजोबानी शिकवल्या प्रमाणे गायत्री मंत्राचा जप सुरु केला। भीती ने उच्चार स्पष्ट होत नवते। तरीही दोनचार वेळा प्रयत्न केला। 
त्या बाइने मोर्चा माझ्याकडे वळवला तसा मी जोरजोरात मंत्रोच्चार चालु केला।
त्या बाईने आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यावर घेतले। कदाचित माझ्या मंत्राचा असर असावा। आणि जोरात ओरडू लागली थांबव थाम्बव।
पण मी मात्र मंत्र चालु ठेवला। आणि माझ्या डोळ्यादेखत ती बाई नाहीशी झाली.
मित्राच्या जवळ गेलो। त्याच्या तोंडावर पाणी मारल। शुद्धित आला। तसा रडू लागला।
डोक्याला भली मोठी जखम झालेली। कसाबसा धरून वगेरे घरी आणला।
झालेला सर्व प्रकार अख्हया गावाला कळला। मित्राच्या जखमेवर गावतल्या ड़ोक्टारने मलमपट्टी केली।
अख्ख्या गावाने कौतूक केल की फक्त तुज्यामुलेच अमित च जिव वाचला आहे।
घरी येउन आजोबाना सांगीतल तर ते बोलले की मुंज झालेल्या मुलाच्या जानव्यामदे खुप ताकत असते। भुत किंवा अतृप्त शक्ति सहसा जवळ येत नाहित।
त्या पर्याजवळ 10 वर्षांपूर्वी एक बाई बुडून मेली होती। 3 महिन्याची गरोदर असताना मेलेली ती बाई अतृप्त इच्छा असल्याने हडळ झाली( गरोदर स्त्री मृत झाली की तिची पुढे हडळ होते).
तिच्या प्रेतावर अंतिम संस्कार न झाल्याने तिने हडळ बनुन सर्वना त्रास देण्यास सुरुवात केली।
पुढे गावकरयानी शालेत जाण्यासाठी एक नवा रस्ता केला। आजही सर्व मूल नविन रस्त्यावरून च शालेत जातात।
जुन्या रस्त्या वर कुंपण घातले आहे।
या प्रकारा बदल ची सत्यता पड़तालुन पाहण्याचा पुढे कुणी प्रयत्न केला नाही पण
आजही तो प्रसंग आठवून अंगाचा थरकाप उडतो।।
·" चकवा "सचिनचं आत्ता लग्न होऊन ५ वर्ष झाली, छोटी पिंकी ...त्याची मुलगी त्याला म्हणाली, " ए बाबा आमच्या वर्गातला आशुतोष आणि त्याची Family त्याच्या आजीला घेऊन त्या अभयारण्यात सहलीला गेलेत, आपण पण जाऊया ना रवीवारी " अभयारण्य आणि सहल हे ऐकताच सचिनचं मन सुन्न झालं, एका क्षणासाठी तो निशब्द झाला आणि त्याला आठवली ती घटना जी कॉलेज मध्ये असताना घडली होती , साधारण १० वर्षांपूवीची ती घटना आत्ता २०१६ साली त्याच्या छातीत धडकी भरून गेली, त्याने स्वाती कडे बघितलं , तिच्या चेह्र्यावरचे भाव हि तसेच काहीसे भयभीत होते , कारण सचिन आणि स्वाती हे वर्गमित्र पुढे प्रेमात पडले आणि लग्नाच्या बेडीत अडकले.इथे मुद्दाम त्या अभयारण्याचं नाव मी टाकत नाही, पण ह्या घटनेनंतर पनवेलच्या त्या मुलांनी उभ्याआयष्यात अभयारण्यात सहलीला जाण्याचा विचारच मनातून काढून टाकला.सचिन ,समीर,स्वाती आणि गुरुवांजली हे चार मित्र पनेवलच्या पिल्लई कोलेजचे विद्यार्थी. चौघांना ट्रेकिंग आणि जंगलात जाऊन रात्री वस्ती करणं, वनात जाऊन जेवण करणं , खेड्यापाड्यात फिरणं ,डोंगर माथा बघणं ह्यात जास्त रस. समविचारी म्हणून ह्यांची मैत्री अधिकच घट्ट झाली.हिवाळ्याचेदिवस, फेब्रवारी महिना साल १९९८, कसल्यातरी सरकारी सुट्ट्या आल्या, सुट्ट्या पण अश्या आल्या कि सलग शुक्रवारपासून ते थेट सोमवारपर्यंत. ह्यावेळी सहलीला त्यांनी पनवेल नजीकचं अभयारण्य निवडलं, पण हि सहल आपण आपल्या कुटुंबियांसोबत करण्याची कल्पना स्वातीने सुचवली, प्रत्येकाच्या घरातील काही सदस्य तयार हि झाले, नजीकच अभयारण्य आहे म्हणून सगळे तयार हि झाले, शुक्रवारी सकाळी १० वाजता समीरच्या बिल्डींग खाली गाडी आली, "टाटा विंगर", समीर आणि त्याचे कुटुंबीय खाली येऊन गाडीत बसले, असं करता करता आत्ता त्या चौघांचेही कुटुंबीय गाडीत बसले, सगळे मिळून साधारण १२-१३ जण होते, गाडी पनवेलहून बाहेर पळस्पा फाटा पार करून मुंबई गोवा हायवेवर असलेल्या नजीकच्या अभयारण्यात पोहोचली. गाडीतून सगळ्यांनी आपापलं सामान बाहेर काढलं, तिकीट घरातून तिकिटं घेतली आणि गाडी वाल्याला सांगितलं"तू उद्या ये दुपारी २ वाजेपर्यंत, आम्ही इथेच असू "आत्ता सगळेजण चालत चालत गप्पा मारत जंगलाकडे निघाले, आजचा बेत म्हणजे जंगलात वस्तीचाच होता. तिकीट घरापासून साधारण २ किलोमीटर आतमध्ये जंगलात पोहोचल्यावर ते सगळे थांबले.थोडा वेळ विश्राम करून पुन्हा निघाले, वातावरण एकदम खेळीमेळीचं,सगळेजण एकमेकांचे मजा मस्करी करत होते , अभयारण्य म्हणजे एकदम दाट जंगल, पाखरांचे आवाज कानावर पडत होते , झाडाझुडपातून माकडं उड्या मारत होते, असानिसर्ग आणि तो पण पनवेल शहराच्या एवढ्या नजीक आहे, आणि आपण इथे कधी आलोच नाही ......सगळ्यांच्यातोंडातून हे एकच वाक्य निघत होतं.बघता बघता साधारण ३ तास चालल्या नंतर आत्ता त्यांना एक मनमोहक जागा सापडली. एका बाजूला डोंगर, घनदाट झाडांची गर्दी, थोड्या अंतरावर संथ वाहणारी नदी आणि शांत आरण्य.बघता बघता संध्याकाळचे ४ वाजले, त्या सगळ्यांनी आपआपले तंबू उभारायला सुरवात केली, आणि बघता बघतातासाभरात तंबू उभे हि झाले.सचिन ,समीर,स्वाती आणि गुरुवांजली पुढे आले आणि ह्या चौघांनी आत्ता पुढचा बेत सर्वांसमोर मांडला.सगळेजण सतरंज्या टाकून गोलाकार बसले, गप्पा रंगल्या. सूर्य डोंगरा आड गेला आणि संध्याकाळी ६ वाजताच अरण्यात काळोख व्हायला सुरवात झाली, काही उमेदवारांनी इकडून तिकडून लाकडं जमवायला सुरवातकेली, आणि मधोमध त्यांनी जाळ पेटवला, ३-४ जण जेवणाच्या तयारीला लागले, सोबत आणलेल्या कोंबड्या कापल्या, एकीकडे ह्या चौघांचे नातेवाईक सतरंजीवर बसून मस्त गप्पा मारत होते, तर दुसरीकडे एक टीम जेवणाच्या गडबडीत, काहीजण चूल पेटवायला लाकडं गोळा करण्यात मग्न होते, आत्ता अंधार पार दाटलेला, पक्षांचे आवाज बंद होऊन रातकिड्यांचे आवाज कानावर पडत होते, आजूबाजूच्या झुडपातून मधूनच सरपटणारे निशाचर पालापाचोळयाचे आवाज करत होते. दिवसा रोमांच निर्माण करणारं ते निसर्गरम्य अभयारण्य रात्रीच्या अंधारात मात्र आत्ता भयावह आणि आपलं आक्राळ विक्राळ रूप दाखवायला लागलं.मोठमोठ्या वृक्षांच्या त्या महाकाय सावल्या वातावरणात अजून भय निर्माण करत होत्या . त्या १२-१३ जणांपैकी काहीजण ह्या वातावरणाचा विलासित आनंद लुटत होते, तर काहीजण मनातून घाबरून जायला लागले होते.दगडं लावून चुले पेटवायला सुरवात झाली, त्यांनी एकूण ३ चुले पेटवले, एकावर मोठं टोप ठेवून त्यावरभात ठेवला, दुसरीकडे टोपात चिकनचा मसाला भाजायला घेतला आणि तिसरा चुला आत्ता पेटायला सुरवात झालीच होती.तिथून साधारण १० फुटांवर बाकी मंडळींची मैफिल रंगली होती. इतक्यात एक आवाज आला....." मी येऊ का"एका बाईचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडला. सगळेच जण एका सेकंदात गप्प झाले , आजूबाजूला बघितलं कोणीच नव्हतं. तिकडे १० फुटांवर जे लोकं जेवणाच्या गडबडीत होते त्यांना पण हा आवाज त्यांच्याजवळऐकायला आला, ते पण थांबले. पण तिकडे कोणीच नव्हतं. आवाज तर एखाद्या वयोवृद्ध बाईचा होता, पण ह्यांच्या गटात तसं वयोवृद्ध कोणीच आलं नव्हतं. काहींनी एकमेकांना प्रश्न केला ..." कोण ओ , कोणी आवाज दिला "" काही समजलं नाही बुवा, आम्हाला पण इकडे आवाज आला"पुढे साधारण ५-१० मिनिटं हा आवाज पुन्हा आला नाही, दुर्लक्ष करून प्रत्येकजण पुन्हा आपल्या मूड मध्ये रमले.आत्ता भात तयार झाला, टोप खाली उतरवलं गेलं, सोबतीला चिकन हि तयार झालं, थर्मोकोलची ताटं सगळ्यांसमोर वाढली, जेवणं वाढायची सुरवात झाली आणि अचानक कसला तरी आवाज झाला, सगळ्यांनी चुल्याकडे बघितलं, चुल्याची राख आणि जळत्या निखाऱ्यांचा ठिणग्या हवेत उडत होत्या, पेटती फाटी इकडे तिकडे उडाली." हे अचानक काय झालं, म्हणून त्यांच्यातले दोघेजण पुढे गेले, त्यांना वाटलं झाडाची एखादी फांदी विस्तवावर पडली असावी, त्यांनी पुढे जाऊन बघितलं पण तिथे तसं काही दिसलं नाही.चुल्याची दगडं इकडे तिकडे गेलेली, पेटती फाटी ३-४ फुटांवर अश्या प्रकारे उडाली होती, कि जसं काय कोणीतरी लाथ मारून चुला उडवला असावा.नक्की काय झालं कोणालाच समजेना, सगळेच जण मनातून दचकलेले, काहींनी थोड्याच वेळात विषयाची मुद्दामटाळाटाळ करत सगळ्यांचं लक्ष जेवणाकडे वळवलं.आत्ता पुन्हा सगळे हसत मस्करी करत जेवायला लागले, गुरुवांजली ने विचारलं " कोणाला काही लागलं तरसांगा हो, लाजू नका "" हो हो नक्की सांगू , तू अजिबात काळजी करू नको " जोशी वहिनी बोलल्या, जोशी वहिनी म्हणजे स्वातीच्या भावाची बायको.जोशी वहिनिंचं बोलणं पूर्ण होताच वरून झाडावरून आवाज आला" मी येऊ का "आत्ता आलेला आवाज म्हणजे एक विचित्रच आवाज होता, एवढ्या मोठ्याने आलेला हा आवज ऐकून सगळेजण झटकनताटावरून उठले आणि झाडाखालून बाजूला पळाले. त्यांच्यातल्या महिला तर मोठ्याने ओरडायला लागल्या, मुलं घाबरून रडायला लागली, तरुण मंडळी आणि मोठी माणसं पण मनातून कचरले. सगळेजण एका घोळक्यात एकाबाजूला एकमेकांना धरून उभे होते.एक जण मोठ्याने ओरडला ..." ए कोण आहे, कोण आहेस कोण तू "झाडावरून एक मिश्कील हसण्याचा विचित्र आवाज आला, सिनेमा मालिकात दाखवतात एकदम तसाच ... आणि एक आवाज आला " राखणदार हाय इथली "अचानक गिरीजा गुरव - सचिनची बहिण, घशातून घोगरा आवाज काढायला लागली, हात पाय ताठ केले डोळे फिरवले आणि केसं मोकळे सोडून गरागरा मान फिरवायला लागली , घोगऱ्या आवाजात बोलायला लागली" वेशीवर रक्त सांडवलव, आत्ता मला मान द्या, मान द्या माझा मान "गिरिजाला झपाटलं हे बघून आत्ता सगळेजण अधिकच घाबरले. सगळेजण तिच्यापासून लांब पळाले. ति तशीच त्याच जागेवर हातपाय ताठ करून मान आकाशाकडे करून उभी होती, तिच्यावर मारलेल्या टोर्चच्या प्रकाशात ती स्पष्ट दिसत होती.काय करावं कोणालाच कळेना, त्यांच्यातल्या बायकांनी तर आपल्या लहानमुलांना पदरात कवटाळून डोळे बंद करून घेतले,पुरुष मंडळी एकमेकांकडे बघून काय करावं ह्याचा विचारकरत होते. दाट अंधार, पायाखालचा रस्ता धड दिसेना, आणि बायका मुलांना घेऊन कसं काय इथून निघायचं ह्याच चिंतेत ते सगळे होते.पण समोर उभं असलेलं संकट बघून त्यांच्यातल्या ३ जणांनी तिथून पळ काढलाच, ते त्या आरण्यातून भूत भूत किंचाळत ओरडत पळत सुटले आणि आलेल्या वाटेच्या दिशेने निघून गेले.आत्ता त्यांच्या शिल्लक राहिले हे ९ जण, त्यात ३ महिला आणि लहान मुलं. गिरीजा त्यांच्या समोर हात पाय ताठ करून डोकं आकाशाच्या दिशेने मान वर करून तशीच उभी होती. आत्ता सगळेच जण भीतीने गप्प बसलेले, किर्र शांतता आणि आकाशातून उडणाऱ्या टिटवीचा आवाज. त्या भयाण शांततेने कानावर दडे बसल्या सारखं सुन्न वाटायलालागलं होतं.इतक्यात पाठीमागून नदीत कसला तरी आवाज ऐकायला आला, हळू हळू आवाज नजीक येतोय जाणवायला लागलं, मासेमारी साठी नदीत कोणाचीतरी मोटर बोट फिरत असावी, ह्यांच्यातल्या सचिन आणि समीर ने क्षणाचा हिविलंब न करता मोठ मोठ्याने आवाज द्यायला सुरवात केली ..." वाचवा वाचवा , कोणीतरी वाचवा , ओ ओ वाचवा " पण ह्यांचां आवाज ऐकताच त्या मोटरबोटीने वेग वाढवला आणि ५-१० मिनिटात तो आवाज लांब निघून गेला.आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी ह्या अरण्यात असे ओरडण्याचे आवाज ह्या आधी कधीच ऐकले नव्हते, ह्या अरण्यात आजपर्यंत रात्री वसतीला कोणीच राहिलं नसावं. आणि आराण्यातल्या भूत कथा काही गावातल्या लोकांना नवीन नव्हत्या.ह्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बहुदा ती बोट ह्यामुळेच निघून गेली असावी.थोड्याच वेळात पुन्हा गिरीजा घशातून घरघर करत आवाज करायला लागली, आवाज दिला" मान द्या " आणि तिचं शरीर थरथर हलायला लागलं ते तसच हलत राहिलं.त्यांच्यातल्या मोहिते काकांनी जवळच असलेलं जेवणाचं ताट तिच्या दिशेने फेकलं. तिने मान खाली वाकवली, पायाजवळ पडलेलं ताट तिने बघितलं, मोहिते काकांनी आणखी एक ताट तिच्या दिशेने भिरकावलं. आत्ता सगळ्यांचं लक्ष गीरीजाकडे लागलं, पुढे काय .....?गिरीजा जमिनीवर बसली, दोन पायाच्या मध्ये ताटं ओढली आणि बकाबका चिकन खायला लागली. दोन्ही ताटातलं चिकन खाऊन झाल्यावर ती उठली आणि मागच्या दिशेने अरण्यात धावत सुटली ....तिच्या मागे मोहिते काका आणि सचिन धावले , " गिरीजा गिरीजा थांब गिरीजा "पण ती भरधाव वेगाने त्या झुडपातून पळत कुठे नाहीशी झाली काही दिसलंच नाही. त्या घनदाट जंगलात आणखी पुढे धावत जायला ते दोघेही घाबरले. इकडे बायका मोठ मोठ्याने पुन्हा रडायला लागल्या. लहान मुलांनी पण कल्ला करून रडायला सुरवात केली, इतक्यात मोहिते काका मोठ्याने ओरडले .." गप बसा , गप्प बसा सगळ्यांनी "आणि एका क्षणात सगळे एकदम गप्प झाले. काय करावं सुचेना, ह्या सगळ्या गोंधळात साधारण एक दीड तास निघून गेला, रात्रीचे ११ वाजले. काय करावं सुचेना.ते लोकं एकमेकांशी संवाद साधून काय करावं हे हळू आवाजत बोलत होते, इतक्यात त्यांना डबक्यातून कोणीतरी पाणी काढतोय असा आवाज कानावर आला, कळशी पाण्यात बुडवल्यावर जसा ..बुड बुड आवाज येतो तसा.त्यांचतले दोघे तिघेजण टोर्च मारत आवाजच्या दिशेने पुढे गेले, थोडं अंतर पुढे गेल्यावर त्यांनी आवाजाच्या दिशेने टोर्च मारली, पाठमोरी बसलेली एक म्हातारी दिसली, कातळाच्या डवऱ्यातून पाणी काढून समोर झुडपात फेकत बसलेली. म्हातारी एखादी आदिवासी असावी, काया एकदम सुकलेली पांढरे फटक आणि अंगावर फाटकं लुगडं.मोहिते बोलले " कोण आहेस "म्हातारीने आवाज दिला " राखणदार "हे ऐकताच त्यांची बोबडी वळली, राखणदार म्हणजे हिच भुताटकी ....त्यांच्यातल्या समीर आणि सचिन ने मोहिते काकांचे दोन्ही हात घट्ट पकडले.पण काका थोडे धीट होते, त्यांनी पुन्हा आवाज दिला..." तुझा मान तुला दिला गिरीजा कुठं आहे "" म्हातारी मोठ्याने हसली आणि तिथून उठून इतक्या वेगाने निघून गेली कि हे लोकं तिच्यावर टोर्च मारतच होते कि ती नाहीशी झाली. डवऱ्याच्या बाजूला झुडपात गिरीजा कातळावर आडवी पडलेली आणि हि म्हातारी तिच्या अंगावर पाणी ओतत बसलेली.म्हातारी तिथून नाहीशी होताच हे तिघे गिरीजा जवळ गेले, तिच्या तोंडाला चिकनचा रस्सा लागलेला आणिअंग पाण्याने भिजलेलं. ह्यांनी तिला उचलली आणि पटापट मागे वळून चालायला लागले....समोर दूरवर त्यांना गाडीच्या प्रकाशासारखं काहीतरी दिसलं, म्हणून पावलं पटापट टाकत ते तिथे पोहोचले, गिरिजाला जमिनीवर ठेवलं. समोर पोलिसांची गाडी उभी होती. ह्यांच्यातले जे तिघेजण तिथून पळून गेलेले , त्यांनी हायवेवरून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना तिथे आणलं होतं.पोलिसांना समोर बघताच त्यांच्या जीवात जीव आला. थोड्याच वेळात पोलिसांनी सगळ्यांना तिथून बाहेर काढलं आणि जबाबासाठी पोलीस ठाण्यात नेलं, गिरिजाला सरकारी हॉस्पिटल मध्ये एडमिट केलं.घडला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला.ठाण्यात उभा असलेला हवालदार त्यांना बोलला, " आहो नको ते उद्योग करायला जाता कशाला जंगलात , तुम्हाला माहिती आहे काय, ह्या अभयारण्यात जनावरांनी कित्येक आदिवासींना खाल्लं आहे,ह्या अभयारण्यात असे भुताटकीचे खूप प्रकार घडतात, नशीब चांगलं होतं ती पोर वाचली"दुसऱ्या दिवशी पहाटे ते सगळे पुन्हा आपापल्या घरी परतले, आणि अश्या पद्धतीच्या सहली उभ्या आयुष्यात पुन्हा कधीच काढायचा नाही हा निर्धार केला.

Ganesh R Retwade
सत्य घटने वर आधारित कथा
!!!बाळंतीन ....!!
स्वातीला अगदी कॉलेज पासून भुतांच्या कथा वाचण्यात रस होता, कॉलेजात
शिकत असताना तर ती फेसबुकवर भूतांवर ब्लॉग पण लिहायची, गावाला गेली की एखाद्या वयोवृद्ध
व्यक्तीने काही अनुभवलेली गोष्ट सांगितली की स्वाती त्या कथेत थोडा मसाला टाकून
लगेच ती उतरवून काढायची. पुढे स्वातीचं लग्न झालं, पण तिने हा छंद काही सोडला नाही.
साल २००४ ला तिचं अविनाश सोबत लग्न झालं आणि ती संसारात रमली.
नवरा तहसील कचेरीत क्लार्क म्हणून कामाला होता, तो कामावर गेला की स्वाती आपला
संगणक चालू करून भूतांवर कथा लिहायला बसायची.
आता लग्न होऊन ३ वर्ष झाली आणि २००७ साली ती गरोदर राहिली. म्हणून
अविनाशने तिला ७ व्या महिन्यातच माहेरी पाठवून दिली. घरात वातावरण आनंदाचं, त्यात ७
व्या महिन्यात माहेरी आलेल्या स्वातीची खूप देखरेख चालली होती. तिची आई तर तिला
दिवसभर गोडधोड खायला घालत होती, वडील बाजारात तालुक्याच्या ठिकाणी गेले की
आवर्जून तिच्यासाठी केळी सफरचंद आणायचे. स्वातीचा नवरा तालुक्याच्या ठिकाणी
खरवलीला कामाला होता. स्वातीचं माहेर, उसर हे खरवली पासून साधारण १०-ते १२
किलोमीटर अंतरावर, गाव तसं खूप लहान, वस्ती असेल साधारण ५०-६० घरांची.
माहेरी येताना स्वातीने सोबत laptop पण आणला होता, भरपूर वेळ मोकळा
मिळायचा, या फावल्या वेळात ती सतत काही ना काही हाॅरर सस्पेन्स कथा लिहून काढायची.
एकदा तिच्या आईने तिला सहज विचारलं. . .
" काय ग स्वाते हे दिवस रात्र बसून काय लिहून काढत असतेस?"
स्वातीने तेच जुनं उतर दिलं. . . . " अगं आई, काही नाही सहज भुतांच्या कथा
लिहित असते "
हे उत्तर ऐकून तिच्या आईच्या संतापाचा पारा चढला आणि ती म्हणाली "ती औदसा अजून
तुझ्या डोक्यातून गेली नाय काय, लग्नाच्या आधी कॉलेजात असताना ठीक होतं सगळं, आता
गरोदर आहेस आणि हे काय दळभद्री लिहित असतेस, पोटात बाळ आहे तुझ्या देवा धर्माची
पुस्तकं वाचायची सोडून हे काय भलतंच "
स्वातीने आईचं बोल टाळून तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा उशिरा रात्रीपर्यंत कथा लिहायला बसली.
स्वातीच्या वडिलांच्या घराच्या मागच्या मैदानातच होळीचं मैदान होतं, त्या पलीकडे नदी आणि नदीच्या पलीकडे ५ गावांचं स्मशान. स्वाती खिडकी उघडी ठेवून थंडे वारा घेत लेख लिहित होती, अधून मधून पुढचं सुचावं म्हणून ती खिडकीतून बाहेर बघून विचार
करायची, पुन्हा लिहायची. त्या रात्री साधारण १२ - १२:३० झाले असतील. खेडे गावात लोकं
लवकर जेवणं आटोपून झोपून जातात, म्हणून गावात कसलाही आवाज ऐकू येत नव्हता, बाहेर
रातकीड्यांचा आवाज, आणि होळीच्या मैदानात भटकी कुत्री दिसत होती. स्वातीला सस्पेन्स असं काहीतरी दिसलं वाटलं की तिला रोमांच यायचा. लेख लिहिता लिहिता साधारण १- १:३० च्या सुमारास त्या होळीच्या मैदानात कुत्री रडायला लागली. सगळेच्या सगळे कुत्रे एकदाच रडायला लागले. त्यांच्या आवाजाने तिच्या आईची झोपमोड झाली. पलीकडच्या खोलीतून ती काहीतरी बडबड करायला लागली आणि पुन्हा झोपली. कुत्र्यांचा आवाज त्या मैदानात खुपवेळ येत होता म्हणून स्वातीने घराचा मागचा दरवाजा उघडला आणि ती दरवाजात उभी राहून निरखून बघत होती, जवळच थोड्या अंतरावर तिला कुत्र्यांचा कळप वर तोंड करून रडताना दिसला. मैदानात चंद्राचा प्रकाश पडलेला. तिने एक खडा उचलला आणि त्या कुत्र्यांना फेकून मारला. दगड फेकून मारताच त्या कुत्र्याचं रडणं थांबलं. स्वाती पुन्हा घरात आली, दरवाजा बंद करणार इतक्यात तिला दरवाजातून आत कोणीतरी चालत आल्याचा भास झाला. ती मनातून थोडी घाबरली, तीने पुन्हा बाहेर डोकावून बघितलं, वळून मागे घरात बघितलं पण
काहीच दिसलं नाही. दरवाजा बंद करून ती पुन्हा खाटेवर येऊन बसली, laptop मांडीवर
ठेवला आणि पुन्हा आपला लेख लिहायला बसली. लेख लिहिताना तिची नजर laptop कडे
होती पण बाजूला उघड्या खडकीत कोणीतरी उभं असल्याचा तिला भास झाला, नजरेने
बाजूला काहीतरी हालचाली होत आहेत असं वाटायला लागलं, पण खिडकीकडे बघण्याची तिची हिंमत होईना. आता तो कुत्यांचा कळप तिच्या खिडकीपाशी येऊन रडायला लागला. एकदाच रडायला सुरवात केलेल्या त्या कुत्र्यांच्या आवाजाने तिच्या आईची झोपमोड झाली आणि ती उठून स्वातीच्या खोलीत आली, आई खोलीत येताच त्या खिडकीची झाप खाड करून जोराने आपटली गेली. . . . एवढा जोरात आपटलेल्या त्या झापेच्या आवाजाने स्वाती दचकली आणि हातातला laptop गादीवर टाकून ती झटकन उभी राहिली.
तिच्या आईला खिडकीत कोणीतरी दिसलं होतं. . . ती स्वातीला म्हणाली. . "स्वाती खिडकीत कोण होतं गं? "
स्वाती म्हणाली " कोणीच नाही "
तिची आई पुन्हा म्हणाली. . . " नाही नाही स्वाती कोणीतरी होतं खिडकीत,
आणि ती कुत्री पण रडत होती, पोरी वाईट लक्षण आहे, तू चल इथून चल आमच्या सोबत आपण बाजूच्या खोलीत जाऊन झोपू "
स्वातीपण मनातून थोडी घाबरली होती, तिने laptop बंद केला आणि ती तिच्या आई सोबत बाजूच्या खोलीत झोपायला गेली.
तारीख होती १८ जुलै २००७,
स्वातीचं बाळंत होण्याची चिन्ह दिसू लागली, हळू हळू तिच्या पोटात कुरकुर
व्हायला लागली, लगेच तिच्या वडिलांनी गावातीलच रिक्षा बोलावली आणि ते तिला गावातल्याच सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर शिंदेंनी तिला तपासली आणि वेळ दिली संध्याकाळी साधारण ७-८ च्या दरम्यान डिलीवरी होईल. तिच्या वडिलांनी अविनाशला फोन करून कळवलं, अविनाश कामावर होता, म्हणाला संध्याकाळी कामावरून थेट गावात येतो.
आता संध्याकाळ झाली ८ वाजले आणि स्वातीच्या पोटात दुखणं चालू झालं, डॉक्टर आले, आणि
नर्सने तिला OT मध्ये नेलं. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला नदी होती, स्वातीला आत OT मध्ये
घेऊन गेले, तिच्या ओरडण्याचा आवाज यायला लागला आणि बाहेर खिडकीच्या मागे कुत्र्यांचा कळप जमून मोठ्याने रडायला लागला. कुत्र्यांचा रडण्याचा आवाज बाहेर बसलेल्या लोकांना स्पष्ट ऐकू येत होता, तिची आई तोंडातल्या तोंडात त्या कुत्र्यांना शिव्या द्यायला लागली. . . . . .
"ही मेली कुत्री काल पासून रडत आहेत, जा हो बघा जरा, दगड घाला आणि हाकला त्यांना "
स्वातीचे वडील उठून बाहेर गेले आणि कुत्र्यांना दगड मारणार, इतक्यात ते
थांबले, त्यांनी बघितलं की OT च्या खिडकी बाहेरून कोणीतरी बाई आत त्या खोलीत चोरून डोकावत होती. अंधुक चंद्राच्या उजेडात त्यांना ती स्पष्ट दिसत नव्हती पण लांब केस आणि अंगावरची साडी त्यांना स्पष्ट दिसत होती. ते मोठ्याने ओरडले. . . " ए. . कोण आहे. . . ए "
त्यांनी आवाज दिला आणि ती आकृती तिथून क्षणात नाहीशी झाली, दगड न मारताच तो कुत्र्यांचा कळप भुंकत भुंकत नदीच्या कडेने पळत सुटला. . . . .
स्वातीच्या वडिलांना हा प्रकार काहीसा विचित्र वाटला. . . . पण त्यांच्या डोक्यात टेन्शन होतं स्वातीच्या बाळंतपणाचं. ते आत आले आणि बाकडावर बसले.
बाहेर आपल्याला काय दिसलं हे स्वातीच्या आईला सांगणार इतक्यात नर्स बाहेर आली आणि म्हणाली " मुलगा झाला आहे " थोड्यावेळाने तुम्ही आत जाऊ शकता.
स्वातीच्या आई वडीलांचा चेहरा आनंदाने फुलला, कारण मुलीची पहिलीच डिलीवरी होती, इतक्यात जावई बापू आले, येताना सोबत मिठाई घेऊनच आले होते. आनंदाने उत्साहित झालेल्या अविनाशने संपूर्ण हाॅस्पीटल मध्ये असलेल्या स्टाफला मिठाई वाटली. . . . थोड्या वेळाने त्यांना आत जाण्याची परवानगी मिळाली आणि त्यांनी बाळाला पाहिलं,
बाळ
गोंडस होतं, सुदृढ होतं.
बघता बघता रात्रीचे ११ वाजले, स्वातीची आई म्हणाली
"मी थांबते हिच्या जवळ तुम्ही दोघे जा घरी, सकाळी या तुम्ही"
आणि ते दोघे तिथून निघून गेले. स्वाती आणि बाळ खाटेवर होते, बाजूचा बेेड
रिकामा होता, स्वातीच्या आईने तिथेच चादर टाकली आणि ती आडवी पडली. रात्र वाढत
गेली. . . . . . आणि ती रात्र काळरात्र बनायला लागली. आपलं भयाणक रूप धारण करायला लागली.
रात्री हाॅस्पीटल मध्ये फक्त २ नर्स होत्या, आज नेमकं तिथे अजून कोणी रुग्ण ही नव्हते. आता
त्या हाॅस्पीटल मध्ये फक्त स्वाती तिची आई आणि त्या २ नर्स.
बघता बघता २ वाजले, स्वातीच्या आईला कसला तरी आवाज आला म्हणून
तिने डोळे उघडले, तिला त्या हाॅस्पीटलच्या खोलीत कोणीतरी फिरत असल्याचा भास झाला,
तिने तसंच खाटेवर पडून आपली नजर त्या खोलीत फिरवली, बल्बच्या उजेडात तिला सावली
फिरताना दिसत होती पण आकृती दिसत नव्हती. तिला भीतीने घाम सुटला, तिने हळूच
स्वातीला हात लावला. . . पण स्वाती गाढ झोपेत होती, आता मात्र पायाचा घसपटण्याचा
आवाज स्पष्ट ऐकू यायला लागला. खाटेवर बाळ आहे या विचाराने मनातली भीती झटकून तिची आई ताड करून उठून खाटेवर बसली. एक माणसाच्या आकृतीची सावली खोलीतून बाहेर जाताना दिसली पण आकृती काही दिसली नाही . . . . तीने स्वातीला हाक मारली. . . . आणि २ हाताने हलवून तिला उठवलं. .
" स्वाती. . ए स्वाती. . . . आगं उठं, बाय, इथे कोणीतरी आलं होतं खोलीत"
स्वाती झोपेतच होती, डोळे न उघडता ती म्हणाली. . . " अगं नर्स असेल, आली
असेल राउंड मारायला, झोप तू "
तिच्या आईला पण वाटलं आली असेल एखादी नर्स. . . म्हणून ती पुन्हा खाटेवर आडवी पडली. किमान १५-२० मिनिटं ती तशीच डोळे उघडे ठेवून पडून राहिली आणि कधी तिचा डोळा लागला समजलं नाही. थोड्या वेळाने पुन्हा तिला जाग आली. पुन्हा तोच पायाचा घसपटण्याचा आवाज आणि खोलीत फिरणारी सावली दिसायला लागली. आता मात्र तिची
आई उठून उभी राहिली. . . तिने बघितलं ती सावली आता स्वातीच्या बाळाजवळ होती, बाळ
स्वातीच्या पुढ्यात होतं आणि स्वातीने त्याला आपल्या पदरात घेतलं होतं. सावली स्वातीच्या खाटेजवळ तशीच उभी होती.
स्वातीची आई घाबरली आणि मोठ्याने किंचाळली, स्वाती झटकन उठली आणि म्हणाली
" काय झालं आई "
इतक्यात ती सावली समोरच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि
अचानक गायब झाली. बाहेरून २ नर्स धावत आल्या. . . .
" ओ काय झालं, इतक्या मोठ्याने
कोण ओरडलं? काय झालं "
स्वातीच्या आईला घाम सुटलेला पाय थरथर कापत होते, " इथे सावली उभी
होती, बाळाच्या जवळ उभी होती. . . . . . . . . . "
बाळाच्या जवळ सावली उभी होती हे ऐकताच स्वातीने बाजूला खाटेवर
बघितलं, खाटेवर बाळ नव्हतं.
ती मोठ्याने ओरडली. . . " आई, बाळ कुठे आहे? "
बाळ खाटेवर नाही हे बघताच त्या नर्सने खाटेखाली बघितलं, पण बाळ तिथे सुद्धा नव्हतं.
आता मात्र आरडाओरड सुरू झाली, स्वातीची आई मोठ्याने ओरडली. . . . "
भुताटकी झाली, हो भुताटकी झाली इथं, मी बघितली डोळ्याने, सावली फिरत होती या खोलीत "
तिची आई आणि त्या २ नर्स धावत हॉस्पीटल मधून बाहेर निघाल्या आणि जवळच असलेल्या घराचा दरवाजा वाजवून त्यांना उठवलं, झाला प्रकार सांगितला, आणि
बघता बघता गावात बोंबाबोंब झाली. अख्खा उसर हाॅस्पीटलच्या बाहेर जमा झाला, अविनाश आणि स्वातीचे वडील पण धावत आले. बाळ गायब झालं हे ऐकताच गावातले १०-१२ लोकं हातात टाॅर्च घेऊन हाॅस्पीटलच्या मागच्या बाजूला धावत गेले, धावाधाव चालू झाली. इकडे
Ankita Shede Jawalkar
Ankita
अविनाश आणि स्वातीचे वडील स्वातीच्या खोलीत गेले, स्वाती केस मोकळे सोडून मान खाली घालून खाटेवर बसलेली.
अविनाश तिच्या जवळ गेला तिचं सांत्वन करत म्हणाला " काही होणार नाही, मिळेल आपलं बाळ. . . . . "
हे ऐकताच खाटेवर बसलेल्या स्वातीने मान वर केली, आणि दात विचकत हसायला लागली. . . . . .
घोगर्या आवाजात बोलायला लागली. . . . " मिळालं मला माझं बाळ "
पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलत होती. . . . . . . " मिळालं मला माझं बाळ "
आणि एका विलक्षण आवाजात हसायला लागली. . . . स्वातीचं हे रूप बघून गावातल्या म्हातार्या बायका एका क्षणात समजून गेल्या की हिला झपाटलंय. हाॅस्पीटलच्या मागच्या बाजूला गेलेल्या लोकांना नदीच्या बाजूला झुडपाजवळ कुत्र्यांचा कळप दिसला, त्यांनी त्या कुत्र्यांना दगड मारून हाकललं आणि टॉर्च मारत त्या जागेवर पोहोचले. तिथे झुडपात त्यांना ते बाळ दिसलं, ताबडतोब एकाने अंगावरचा टाॅवेल काढला आणि बाळाला त्यात
उचललं, बाळाचा काहीच आवाज येत नव्हता. . . लगेच त्यांनी हाॅस्पीटलच्या दिशेने धाव घेतली. . . . . . .
माणसं धावत आत आली, बाळाला खाटेवर झोपवलं आणि नर्स ना बोलवलं. . . .
. नर्स धावत पळत आल्या त्यांनी बाळाला तपासलं, पण उशीर झाला होता. स्वातीच्या बाळाचे प्राण गेले होते. इकडे स्वाती खाटेवर गुडघ्यात मान घालून दात विचकत खिदळत होती. . . . . . ..
लोकं त्या खोलीच्या बाहेर उभे राहून बघत होते पण आत जायची कोणाचीच हिंमत होईना.
हळूहळू सरकत सरकत काही लोकं आत शिरले. . . . . . स्वाती खाटेवर उभी राहिली. . . . तिने हात पाय एकदम ताठ सरळ केले. . . . केसं झटकून मागे टाकली आणि डोळे पांढरे करून घोगर्या आवाजात पुन्हा बोलायला लागली. . . . . .
" माझं बाळ मिळालं मला. . . . .हा हा हा हा हा हा हा हा"
काय करावं कोणालाच सुचेना, गावात कोणी मांत्रिकही नव्हता जो त्यांची मदत करू शकेल. आता साधारण ५ वाजायला आले होते. . . .
लोकं वाट बघत होते सुर्यप्रकाश होण्याची. हळू हळू आकाशात प्रकाश व्हायला लागला आणि गावातल्या ६-७ लोकांनी पकडून स्वातीला रस्सीने बांधली. . . . आणि आता तिला गावातल्या जागृत गावदेवीच्या मंदिरात घेऊन निघाले, सगळा गाव मागून चालत होता, आणि त्यांच्या बाजूने थोड्या अंतरावरून २-३ कुत्री भुंकत होती.
निरोप मिळताच तालुक्याच्या ठिकाणाहून ७ वाजता शिंदे डाॅक्टर पण आले,
त्यांनी बाळाला तपासलं आणि सांगितलं “नाही, बाळ गेलं.”
इकडे स्वातीला लोकं मंदिराच्या दिशेने घेऊन चालले होते आणि ती घोगर्या आवाजात जोर काढून लोकांना धक्के मारत होती. . . . . खिदळत होती, चालता चालता वाटेत ३-४ फुट उंच उंच उड्या मारत होती. . . चवताळलेल्या स्वातीला आवरता आवरता गावातल्या लोकांच्या नाकी ९ आले. बघता बघता मंदिर जवळ आलं आणि मंदिर जवळ येताच अचानक स्वाती बेशुद्ध होऊन खाली पडली. . . . . बाजूने भुंकणारी कुत्री भुंकत भुंकत नदीच्या दिशेने पळून गेली. . . . . . . .
गावातल्या म्हातार्या बायकांनी आवाज दिला. . . " गावदेवी पावली, पावली ग
माझी माय पावली, पोरीची सुटका झाली "
बया गेली पळून. . . . . . . पोरगी मोकळी झाली. . . . . . .
लोकांनी स्वातीला उचलून मंदिरात नेली, देवीचा अंगारा तिच्या माथ्यावर लावला आणि तिला थेट हाॅस्पीटल मध्ये घेऊन आले.
डॉक्टरांनी तिला तपासून एक इंजेक्शन दिलं. थोड्याच वेळात स्वाती शुद्धीवर आली आणि आपल्या बाळाची आठवण काढायला लागली.
आपलं बाळ गेलं या दुःखाने अविनाश आणि स्वाती मनातून पार खचून गेले, तर
इकडे स्वातीची आई, तिच्या वडिलांना सांगत होती, ते जे काही होतं ते काल पासून पोरीच्या मागावर होतं. काल रात्री मी खिडकीत पण बघितलं होतं काहीतरी होतं तिथे.
जे काही आजूबाजूला आमानवीय फिरत होतं त्याची चाहूल स्वातीला पण ओळखता आली नाही आणि शेवटी तिच्या बाळाचा जीव गेला.
हाॅस्पीटलच्या नर्सच्या माहिती नुसार १ वर्षापूर्वी इथे एक दिवस बाईकवर एक बाई आणि एक माणूस आला होता, बाई गरोदर होती, तिला प्रसूती कळा यायला सुरवात
झाली म्हणून ते लोकं इथे आले, पण बाईकच्या गचक्यांनी तिचं Complication वाढलं आणि
इथे बाई आणि तिचं मुल दोघेही expire झाले. शिंदे डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्या
लोकांनी इथे यायलाच उशीर केला होता. तो माणूस मुंबईचा होता, इथे कोकणात फिरायला
आलेला, नंतर त्यांचे नातेवाईक आले आणि ते लोकं त्यांना इथून घेऊन गेले. . . . . .
बहुतेक तीच बाई इथे भूत झाली असणार. . . . . . .
ही घटना गावातल्या लोकांना
पण माहिती होती, पण त्यानंतर वर्षभरात तिथे हाॅस्पीटल मध्ये कोणाचीच प्रसूती झाली
नव्हती. म्हणुन इथे भुताटकी आहे याची कोणालाच काहीच माहिती नव्हती.
अधून मधून होळीच्या मैदानात कुत्री रडायची पण त्याकडे लोकांनी कधी एवढं
लक्ष, दिलं नव्हतं.
त्या दिवसापासुन त्या हाॅस्पीटल मध्ये एकाही गरोदर बाईला कोणी घेऊन जात
नाही, एवढंच काय गावातली गरोदर बाई रात्रीच नाही दिवसा पण होळीच्या मैदानाकडे जात
नाही.
Ankita Shede Jawalkar
***समाप्त*** ###
मी सुजित जमादार मित्रहो मी तुम्हाला आज एक वेगळाच किस्सा सांगू इच्छितो जो माझ्या मावशीच्या मुला सोबत झाला होता..
मित्रहो ज्या प्रमाणे आपल्या हिंदू समाजात भूत प्रेत मानल जात त्याच प्रमाणे आपल्या मुस्लीम समाजाच्या बांधवामध्ये देखील " जिन्न " हा प्रकार आढळून येतो..अस म्हणल जात कि काही प्रसिद्ध ठिकाणच्या मस्जिद च्या दरवाज्यामध्ये किवा उंबऱ्यात किवा त्या मस्जिदच्या आवारात 
रात्रीच्या वेळी अल्लाहचे गुलाम असणारे ते जिन्न नामक भूत कैद असतात... जिन्न मध्ये देखील बरेच प्रकार आढळून येतात. काही चांगले तर काही वाईट असतात.. जर वाईट जिन्न कधी एखाद्याच्या मागे लागले तर त्याच आयुष्य उध्वस्त करून टाकतात.. 
तर आजची हि घटना त्यावरच आधारित आहे माझी मावशी आणि तिचा मुलगा म्हणजे माझा मावस भाऊ साहिल (नाव बदललेले ) हे नळदुर्ग(ठिकाण बदललेले ) येथे राहत होते... माझा मावस भाऊ चांगला नौकरीला लागलेला होता..जॉब पण लागला होता त्याला..
शनिवार-रविवार मित्रांसोबत तो बाहेर फिरायला करायला जायचा...साहिल नाव होत त्याच...
तर असाच एक दिवशी सोमवारी संध्याकाळी जॉबवरून तो घरी आला.. हि घटना त्याच्या आईने मला सांगितली होती. जॉब वरून घरी आल्यावर तो दोन एक दिवस त्याच्या खोलीतून बाहेर यायला तयार होत नव्हता... आईने त्याच्या दरवाजा ठोठावला तरी तो बाहेर येत नसायचा.. रात्री अपरात्री त्याच्या खोलीतून चाबकाचे आवाज यायचे..
त्याच्या आई-बाबांनी म्हणजे माझ्या मावशीने व काकांनी त्याच दार कसतरी उघडल आन ते आत गेले.. आणि त्यांनी पाहिलं.. साहिल फक्त बेडवर पडलेला असायचा... आणि त्याच शरीर जस कि कोणीतरी चाबकाने मारतय अस उडायचं... माझ्या मावशीने साहिलला जाऊन धरल पण तो चाबकाचा आवाज तसाच यायचा फक्त 
आणि साहिल तडफडायचा.. अस एकूण ५ दिवस चालल.. साहिलच ऑफिसला जान बंद झाल...होत. माझ्या मावशीने म्हणजे साहिलच्या आईने त्याला सगळ्या दवाखान्यात नेले .. देव-देव केले... सगळ करून झाल.. सहाव्या दिवशी.. तो आपल्या बेडवरून उठला.. आणि घरात फिरायला लागला.. माझी मावशी जागीच होती..
तिला वाटल होत साहिल उठला आहे....जशी साहिलची आई बाहेर आली तिला दिसून आल.. कि पण आज तो स्वतःच किंकाळत सुटला होता.... वेगळच बरळत होता तो उर्दूमध्ये तर कधी वेगळ्याच भाषेत ओरडत होता.. दात खात होता स्वतःच्या अंगाचा चावा घेत होता..साहिलच्या आईने त्याला पकडल आरडा ओरडा केला...त्याचे वडील आणि आजूबाजूचे पण काही लोक आले त्यांनी त्याला पकडून बेडवर थेट बांधलच होत. त्यांच्या शेजारी लोकांपैकी एक जन मुस्लीम बांधव होता.. 
त्यान समजून गेला कि हा काय प्रकार आहे.. त्याने आमच्या मावशीस सांगितले.. कि जवळच एक दर्गा आहे तिथ अल्लाहचे काही अनुयायी राहतात त्यांना " मौलाना " म्हणतो आम्ही. तेव्हा आमच्या मावशीने सर्व उपाय करून पहिले होते तर हा देखील एक करून पहावं... साहिलला घरात बांधून ठेवण्यात आल होत...
आणि त्या माणसाच्या सांगण्यावरून मावशी दर्ग्यामध्ये गेल्या..तिथ त्या माणसाने त्याच्या ओळखीच्या एका मौलाना ला भेटवल...ते मौलाना दर्ग्यामध्ये एका कोपऱ्यात हातात माळ घेऊन जाप करत बसले होते...आमच्या मावशीला पाहताच त्यांनी सांगितल कि मला माहितेय तुम्ही इथ का आलाय ते आमच्या मावशीसोबत आलेल्या त्या माणसाने सांगितल कि ते मौलाना इथले प्रसिद्ध मौलाना आहेत "ये हमारे..! कुरेशी मौलाना है ! " 
त्याचं नाव कुरेशी होत.. त्यांनी आमच्या मावशीला पाहताच त्यांना सांगितल कि आपके घर मे एक बुरा साया है! ज्यो कि एक जिन्न है !" आमची मावशी अवाक राहिली होती...मित्रहो काही सिध्द मौलाना असतात ज्यांनी आपल्या कडे अशी सिधी मिळवली असते कि समोरच्या व्यक्तीच अंतरमन ते जाणू शकतात 
.पण आमच्या मावशीला ते समजल नाही कि जिन्न काय प्रकार आहे हा असला...ती माझ्या मुलाला वाचवा म्हणून त्यांच्या समोर रडली होती.. ते मौलाना त्यांच्या घरी यायला तयार झाले..आणि ते दुसऱ्या दिवशी आपल्या सोबत दर्ग्यातून काहीतरी साधन घेऊन आले.. त्यांनी दर्ग्यामधून मंत्रबद्ध पाणी आणलेले होते... आणि मोरपिसांचा गुच्छा..
घराच्या दारात पाय ठेवताच त्यांनी आपले डोळे मिटले.. आणि त्यांच्या देवाच्या नामाचा सतत जाप करू लागले... साहिलच्या वडिलांना म्हणजे माझ्या काकाना ते पसंद नाही पडल म्हणून ते घरातून मावशीचा राग राग करत निघून गेले..मावशीने त्या मौलाना साहेबाना साहिलची खोली दाखवली...
आणि त्यांना त्याच्या खोलीत नेल... साहिलचा अवतार न बघण्यासारखा झाला होता...त्याच्या अंगावरील कपडे फाटलेले होते.. जागो जग चाबकाचे व्रण उमटले होते... साहिलची आई ते पाहून ढसढस रडतच होती.. मग ते मौलाना पुढ आले... व त्यांनी आपल्या जवळ दर्ग्यातून आणलेले पाणी...ते त्यांनी एकवेळच त्यांच्या देवाचे नाव घेतल आणि ते पाणी त्यांनी साहिलच्या अंगावर टाकल.. माझ्या मावशीने सांगिलत साहिलच्या अंगातून धूर निघत होता... आणि तो ओरडायचा. 
"आका.... बक्ष ...." त्या मौलानाने दुसऱ्यांदा तसाच पाणी शिंपडल त्याच्या अंगावर... तेव्हा तो इतका ओरडला कि खिडक्याची तावदान हललेली जाणवली "एय आका...! " साहीलच्या अंगातून विविध आवाज निघू लागले होते.. त्याच्या शरीरात घुसलेले ते भयंकर माफीची मागणी करत होते...तेव्हा ते मौलाना म्हणाले "कौन है तू ? कीस बात के लिये तुने इस बच्चे को जकड रखा है बता...! वरना अल्लाह कसम तुझे यही जला दुन्गा..! "
तो जिन्न साहिलच्या आतमधून ओरडून ओरडून फक्त आका आका अस म्हणत होता... त्यान तसच आपल नाव ओरडून सांगितल " सुलेमान.." त्या मौलानानि आपल्या जवळच्या मोर पंखाने साहिलच्या अंगावर झप झप मारायला सुरुवात केली तो पवित्र मोरपंख होता...
तो साहिलला लागत नव्हता मात्र त्याचा आतमध्ये असणाऱ्या त्या जिन्नला सुलेमानला आतोनात लागत होता.... त्याने अखेरीस साहिलच्या शरीरातून बाहेरचा माग धरला... आणि एकवेळ एक छोटासा प्रकाश झाला.. आणि तो त्या खोलीच्या खिडकीतून आवाज करीत बाहेर पडला त्या सकट ती खिडकी देखील फुटली...
एकदोन दिवसानंतर साहिलचे अंगावरील घाव भरत आले... त्याच्या मित्राकडून समजल कि मागच्या शनिवारी त्यांनी बाहेर जायचं ठरवल होत ... आणि तिथली एक मश्जीद प्रसिद्ध होती...तिथ अस म्हणन होत कि रात्रीच्या वेळी भूत दिसतात आणि तिथले दिवे आपोआप उजळतात... हे अवाक पाहण्यासाठी साहिल व त्याचे काही फ्रेंड्स गेले होते... त्याचे फ्रेंड्स बाकी सर्व बाहेरून बघत होते.. पण साहिल त्या मश्जीदच्या उंबरठ्यास शिवून आला... मित्रहो अस मानल जात कि प्रत्येक मश्जीदच्या दारात एक गुलाम जिन्न असतो जो अल्लाह चा सेवक असतो.
आणि मित्रानो आमचे आजी आजोबा जस सांगतात तस म्हणल जात कि नळदुर्ग येथील एक मश्जीद जिन्नने एका रात्रीमध्ये बांधली आहे.. हे कितपत खर आहे माहित नाही माझा हा हेतू नाहीये कि त्या जागे बाबत अंधश्रद्धा पसरवावी..पण हे मी अस ऐकून आहे.. तर साहिल त्या ठिकाणी जाताच त्याला शक्यतो जिन्नची बाधा झाली..
जिन्न हे गुलाम असतात त्या एकप्रकारच्या आत्मा असतात साहिलला चाबूक पडायचे हे तुम्ही वरती वाचल आहे.. पण ते चाबूक हि देवाकडून असलेली त्या गुलाम जिन्न ला शिक्षा होती.. अस हि म्हणतात कि जिन्न स्वतःच्या मुक्ती साठी मानव शरीराचा सहारा घेऊ शकतात.. आणि चाबूक पडणे हि त्यांची एकप्रकारे गुलामगिरीची निशाणी असते.. जी त्यांच्या आका कडून (अल्लाहद्वारे )त्यांना भेटते...मित्रहो मी हा अनुभव खूप घाईघाईत सांगितला आहे. आणि जेवढ झाल आहे ते साफ साफ शब्दात सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे... धन्यवाद !!
नमस्कार मी परेश बागुल, माझ्या आधी च्या कथे ला मिळालेल्या प्रतिसादा ला प्रेरित होउन पुन्हा एक चित्त थरारक कथा सादर करत आहे. कथा पुर्णपने काल्पनिक असुन याचा वास्तविकते सोबत कुठला ही संबंध नाही.
आपली आज ची कथा आहे समीर बद्दल. समीर हा अत्यंत प्रमाणिक व मेहनती प्रवृत्ति चा असल्यामुळे त्याला पुण्या (देहुरोड) मध्ये आयुध निर्माणी फॅक्टरीत (Ordnance Factory) स्टोर किपर चा जॅाब मिळाला होता. समीर च मूळ गाव बंाबरूड होत. बंाबरूड या गावात अज़ुन सुद्धा फारश्या सोय सुविधा नव्हत्या. अश्या वातावरणात वाढला असुन समीर ने आज एका नामांकित कंपनी मध्ये जाॅब मिळवला होता. यावरून च त्याच्या बुद्धी व कुशलते चा अंदाज लाऊ शकता.
समीर दर ६ महिन्यात त्याच्या आई-वडिलांना भेटायला येत असे. समीर चा आई वडिलां मध्ये खुप जीव होता, समीर चे शिक्षण पूर्ण करण्या साठी आई वडिलांनी खुप कष्ट केले होते आणि समीर ला पण या सगळ्या ची ज़ाणिव होती. समीर चे वडील गावात राहुन सुद्धा त्यांचे विचार महान होते, त्यंाच्या आग्रहा मुळे च समीर ने काळज़ा वर दगड़ ठेउन शहरात जाॅब करण्या चा निर्णय घेतला होता. आई वडिलंाची सतत आठवन येत असुन पण समीर मन मारून जाॅब करत होता. अश्या परस्थितीत समीर ला धीर मिळत होता तो साक्षी कडून. समीर जिथे रूम घेऊन राहत होता तिथेच त्याच्या शेजारी साक्षी आपल्या आई वडिलां सोबत राहत होती. साक्षी व समीर एक दुसर्या ला २ वर्षां पासुन ओळखत होते. साक्षी खुप साधी भोळी पण गोड मुलगी होती. मनातल्या मनात ती समीर वर प्रेम करायला लागली होती पण समीर ला अजुन याची कल्पना नव्हती. समीर एकठा असल्याने साक्षी त्याची खुप काळजी घेयची , कुठला पण नविन पदार्थ बनवल्या वर समीर ला न चूकता स्वताच्या हाताने खाऊ घातल्या शिवाय तीला चैन पडत नसे. एवढच नाही तर तीने तीच्या घरच्यांना पण समीर बद्दल सुचवले होते, साक्षी ला समीर आवडत असल्याची कल्पना साक्षी च्या आई वडिलांना होती. त्यांना पण समीर ला आपला ज़ावई करून घेन्यात काही आपत्ती नव्हती. समीर तसा होताच सूसंस्कारी. व दिसायला पण छान होता आणि तो नियमित पणे न चूकता महादेवा च्या देउळात जात असे. त्याच्या अश्या वागन्या मुळे समीर ने साक्षी च्या आई वडिलांच मन जिंकल होत.
आता वळूयात मूळ कथे कडे, समीर ने यावेळेस पण नेहमी प्रमाणे गावाला जायचे ठरवले, हि बातमी मिळताच साक्षी थोडी उदास झाली व मनाला धीर देत समीर ला भेटायला आली व स्वताची काळजी घे व इतर गोष्टींचे निर्देश देउ लागली. समीर ने सगळी तयारी करून साक्षी व तीच्या आई वडिलांचा निरोप घेतला, साक्षी पण स्वताचे अश्रु लपवत हाथ हालवून समीर ला बाय करू लागली व पोहचल्या वर काॅल कर असा निर्देश दिला. समीर ला ट्रेन ने १ दिवसाचा प्रवास करावा लागत असे आणि त्यात नेमक यावेळेस समीर ची ट्रेन चक्क ३ तास उशीरा पोहचली होती. १ दिवसा चा प्रवास करून समीर पाचोरा पोहचला. पाचोर्या वरून समीर च मूळ गाव २० कि.मी च्या अंतरावर होते. रात्री चे १ वाजले होते अश्या परस्थितीत गावा कडे जाणारी कुठली च बस व रिक्षा मिळणे शक्य नव्हते म्हणुन समीर ने चालत जाण्या चा निर्णय घेतला. समीर ला खात्री होती वाटेत कोणी बाइक सवार मिळेल च लिफ्ट घेण्यासाठी.थोडा अंतर चालल्या वर समीर ला एका बाइक चा आवाज़ आला व त्याने हाथ करून बाइक वाल्याला थांबवले व पुढे परंतर सोडण्या ची विनंती केली. समीर ला लिफ्ट मिळाल्या मुळे तो खुश होता पण समीर च दुर्दैव च म्हणावे कारण तो बाइक चालक अंतुर्ली गावाचा राहणारा होता जिथुन समीर चे गाव १० कि.मी होते. बाइक चालक ने समीर ला अर्ध्या रस्त्यात सोडले व पुढे सांभाळुन जाण्यास सांगितले. बाइक चालक पिलेला असल्याने समीर ने त्याची चेतावनी ला मनावर नाही घेतले आणि गावाकडे ज़ाण्यास निघाला. रस्त्यात एक पण रोड लाइट नसल्याने सगळीकडे गडद आंधार होता, समीर कस बस मोबाइल च्या टाॅर्च च्या उजेडात हेडफोन ने साँग्स ऐकत चालत होता. सगळी कडे भयान शांतता असल्याने फक्त समीर च्या पाउलांचा झप झप आवाज़ स्पष्ट पणे ऐकु येत होता. आजू़ बाज़ू घनदाट झाडान मधुन चित्र विचित्र आवाज़ येत होते पण समीर वर याचा काही परिणाम होत नव्हता, तो बस एका लय मध्ये चालत होता. त्यावेळेस गावामध्ये हडळ, पिशाच, चकवा, हाकामारी सारखे भूता खेतांचे प्रकार खुप प्रचलित होते ज्यांची समीर ला बिल्कुल कल्पना नव्हती. गावा मधल्या लोकांनी हे प्रकार अनुभवले होते म्हणुन रात्री त्या रस्त्या वरून येण्या ची हिम्मत कोणी करत नसे. समीर च्या नकळत पाउला पाउला वर त्याच्या माघे चित्र विचित्र आकृत्या, पिशाच व हडळी त्याचा घात करण्या साठी पाठलाग करत होत्या पण त्यांना यश मिळत नव्हते, त्याच्या माघे पण एक कारण होते. असे म्हणतात जोपरंतर एखाद्या व्यक्ति च्या मनात भय भावना येत नाही तोपरंतर कुठला च भूत किवा प्रेत त्या व्यक्ति चा घात करू शकत नाही. आपल्या मनातले भय या अमानविय नराधमांना शक्ती प्रदान करत असत.
पण समीर च्या चेहर्या वर भय चा कुठलाच भाव नव्हता, शहरात राहत असल्याने त्याला या गोष्टींचा काही अनुभव व कल्पना पण नव्हती. तसा समीर पण शारीरीक व मानसिक पणे दृढ होता. कानात हेडफोन असल्याने आपल्या अवती भोवती काय घडतय याचा त्याला बिल्कुल पण भान नव्हता. समीर ने आता निम्मी रस्ता पार केला होता कि तेवढ्यात मोबाइल ची बॅटरी ने पण साथ सोडला व मोबाइल आॅफ झाला.
त्याच्या वर घात करण्या साठी दृष्ट शक्ती आतुरते ने वाट पाहत होत्या. आता त्याला वातावरणातला गारवा ज़ाणवत होता व गडद आंधारा मुळे त्याचा अात्मविश्वास पण खचत चाल्हा होता, त्याला कळुन चूकले होते कि त्याचा पाठलाग केला जातोय. पण चालत राहण्या शिवाय काही पर्याय उरला नव्हता.
तेव्हा त्याच्या कडुन एक चूक घडली, त्याने माघे वळून बघितले. तेव्हा त्याला दिसल्या त्या विद्रूप आकृत्या....! आता तो खुप घाबरला होता व आपली ट्रॅवेल बॅग जागीच सोडुन धावत सुटला, धावतांना त्याला कळून चूकले कि आपण त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा येत आहे. त्या विचित्र गुरगुरण्या च्या आवाज़ा ने त्याचा थरकाप उडवला होता, तो थकुन एका झाडा खाली बसुन आपल्या मृत्यु ची वाट पाहु लागला, भिती ने त्यावर पूर्णपने ताबा मिळवला होता आणि आता त्याच्या वर घात करणे सोपे होते. तेव्हाच एका विचित्र आकृती ने त्याच्या वर घात केला आणि त्याच्या शरीरात प्रवेष केला. समीर आता शारीरीक व मानसिक रित्या त्या शक्ती च्या ताब्यात होता व त्या अमानविय शक्ति ने समीर द्वारे आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला. समीर आता बदलला होता, तो उठुन माघे गेला व आपली बॅग घेउन घरी जाण्यास निघाला, थोड्याच वेळात तो घरी पोहचला व त्याने दार ठोठावले. इतक्या रात्री कोण आले असेल असा विचार करत समीर च्या आई ऊठल्या व त्यांनी विचारले कोण आहे? पण समोरून काहीच उत्तर नाही आले. असे २-३ वेळा झाले. समीर च्या आईंना हा हाकामारी चा प्रकार वाटत होता.
त्यांनी दारा च्या फटीतून बघितले तर त्यंाना समीर दिसला, त्याचा आवतार विचित्र दिसत होता. विस्कटलेले केस, मळके कपडे व लाल शार डोळे आणि तो तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत सारखा मानेला हिसका देत होता. हे दृष्य पाहुन समीर च्या आई जोरात किंचाळल्या, त्यंाची किंचाळी ऐकुन समीर चे वडिल धावत च आले. समीर च्या आई भिती ने थरथरत होत्या, त्यांना शब्द उच्चारणे पण कठीन जात होते, त्यावर समीर च्या वडिलांनी विचारले काय झाले तेव्हा दारा कडे बोट दाखवत त्या थरथरत्या आवाज़ात स..स...समीर ऐवढच बोलु शकल्या. हे ऐकताच समीर च्या वडिलांनी धाडकन दार उघडले व बघितले की समीर वरांड्यात कोसळलाय. त्यंानी पटकन त्याला उचलुन घरात खाटे वर झोपवले व त्याला शुद्धी वर आणन्या चा प्रयत्न करू लागले पण काही केल्या तो शुद्धीवर येत नव्हता, तो झोपेत सुद्धा थरथरत होता म्हणुन समीर च्या वडिलांनी त्याला पांघरवल व सकाळ होयची वाट बघु लागले. सकाळ होता च समीर च्या घरी चंागलीच गर्दी जमली होती, समीर अजुन पण बेशुद्ध होता. तेवढ्यात समीर चे वडिल आपल्या सोबत वैद्य घेऊन आले. वैद्य ने समीर ला तपासले तर ते पण आश्चर्यचकित झाले कारण त्याची ह्रदय स्पंदने व श्वास घेणे नैसर्गीक रित्या कार्य करत होते व तो पुर्णपने ठीक होता. वैद्य समीर च्या वडिलांना आश्वासन देत म्हणाले कि तो फक्त बेशुद्ध झालाय आणि लवकरच शुद्धी वर येईल.
इकडे साक्षी त्याच्या काॅल चा वेट करत होती व तीला त्याची काळजी वाटत होती, तीने त्याला काॅल पण करून बघितले पण त्याचा मोबाइल आॅफ येत होता. तीने सकाळ पासुन काही खाल्ले पिले नव्हते. संध्याकाळ झाली तरी समीर शुद्धी वर आला नव्हता. समीर च्या आई रडुन रडुन बेहाल झाल्या होत्या. बघता बघता रात्र झाली, समीर चे आई वडिल त्याच्या शेजारी झोपले होते. समीर ने अचानक डोळे उघडले व आपल्या आवती भोवती बघु लागला. भाग - ३ (शेवटचा)
पण समीर आता पिशाच च्या वश मध्ये होता व त्याला लागली होती रक्ता ची तहान. त्याची चालण्या ची चाल बदलली होती, तो एका अशक्त वाघा सारखा घरात रेंगाळत चालला होता. रेंगाळत रेंगाळत तो घराच्या मागच्या गोठ्यात पोहचला होता. तेवढ्यात गोठ्यातल्या गायी म्हशींच्या किलबिलाट ने समीर चे वडिल जागे झाले, त्यांनी बघितले की समीर बिस्तार्यात नाहीये. ते ताबडतोब आवाज़ा च्या दिशे ने धावले. गोठ्यात पोहचताच त्यांची बोबडी वळली, समीर ने एका वासरू चा घात केला होता. समीर ने वासरू ची चीर फाड करून लचके तोडत होता, खुप भयानक दृश्य होत ते. समीर पूर्ण पने रक्ताने माखला होता. त्याने वळून वडिलांन कडे बघितले व विचित्र पणे हासत लचके तोडु लागला. समीर च्या वडिलांनी तिथुन पळ काढला व आपल्या पत्नि ला उठवले आणि बाहेर जाउन मदती साठी आरडा ओरड करू लागले. सगळ्या गल्लीतली लोक त्यांच्या घरा भोवती एकत्र झाली, सगळे विचारू लागले काय झाल ? काय झाल ? पण समीर चे वडिल बोलण्या च्या परस्थितीत नव्हते. ते सोबत ३-४ लोकांना गोळा करून गोठ्या परंतर घेउन गेले, तिथले दृश्य पाहुन सगळेच स्तब्ध झाले. त्यांनी समीर ला आवरायचा प्रयत्न केला पण तो कोणाला ज़वळ येउ देइना, वाघा सारखे पंजे मारून त्या लोकांना जवळ येउ देण्यास अडवत होता जणु एखादा वाघ चूकुन मानसांच्या वस्तीत शिरलाय. शेवटी असंख्य प्रयात्ना नंतर त्याला लोकांनी धरले व तिथेच गोठ्यात एका खांँब ला बांधुन ठेवले. आपल्या मुला ची अशी दुर्गती पाहुन समीर ची आई ढसा ढसा रडत होती. समीर च्या वडिलांना कळुन चूकल होत हा सगळा काय प्रकार आहे. सकाळ होताच समीर पुन्हा बेशुद्ध झाला. समीर च्या वडीलांनी गावाच्या वेशी जवळ एका खंडर मध्ये वास करणार्या भगत ला सोबत घेउन आले व समीर बरा झाल्यास त्याला १वर्षा परंतर दर आठवडा बोकड्या च मटण कबूल केले. भगत आपल्या विद्या मध्ये सिद्ध होते. भगत ने वेळ वाया न घालवता समीर च्या घरी यज्ञ मांडला व यज्ञा समोर समीर ला बसवुन मंत्रांचा जाप करू लागले. तसाच थोड्यावेळात समीर शुद्धी वर आला आणि विचित्र आवाजात किंचाळु लागला. भगत ने त्या पिशाच ला समीर चे शरीर सोडायचा आदेश दिला, पण समीर फक्त स्वताचे ओठ चावत दातमिठ्या खात हसत व किंचाळत होता. शेवटी भगत ने आपल्या झोल्या मधुन कसली तरी भभूती काढली व समीर च्या आंगावर टाकली तसा समीर तडफडला व घोगर्या आवाज़ात भगत ला चेतावनी दिली- "दिवसा माझी शक्ती कमी अाहे म्हणुन आता माझ्यावर जोर आज़मवतोयेस, रात्र होताच पहिले तुझ काळीज़ काढुन ज्या खंडर मध्ये तू तप करतोस तिथेच तुझी समाधी बनवुन टाकेल, अज़ुन पण वेळ आहे स्वताचा जीव वाचव अाणि निघुन जा इथुन. " एवढ बोलुन समीर पुन्हा बेशुद्ध झाला. हे ऐकताच भगत धावत सुटला व जाता जाता बोलला कि हे शक्तिशाली पिशाच आहे याला मी नाही बंधीस्त करू शकत मला माफ करा.
इथे दुसरीकडे साक्षी अजुन समीर चा काॅल नाही आला म्हणुन बावरी झाली होती, तीला कल्पना आली होती कि समीर नक्कीच कुठल्या तरी संकटात आहे म्हणुन तीने स्वता जाउन तपास लावायचे ठरवले. घरी ट्रीप चा बहाणा सांगुन साक्षी समीर च्या गावी रवाना झाली. इकडे समीर ची हालत दिवसें दिवस खराब होत चाल्ली होती, त्याला सतत रक्ता च्या उलट्या होत होत्या. १ दिवसाचा प्रवास करून साक्षी समीर च्या गावी पोहचते. गावकर्यां कडुन समीर बद्दल कळता बरोबर साक्षी बेभान धावतच समीर च्या घरी पोहचते. गर्दी मधुन वाट काधत ती पुढे येते व समीर ची झालेली अवस्था पाहुन जागीच स्तब्ध होते अणि बेशुद्ध होउन ज़मीनीवर कोसळते. तीला बघताच समीर चे आई वडील तीला ओळखुन घेतात.(समीर ने बर्याच वेळा आई वडिलान कडे तीचा उल्लेख केला होता) शुद्धी वर येताच ती पण ढसा ढसा रडु लागते, समीर ची अशी अवस्था तीच्याकडुन बघितले जात नव्हती, त्याला एका पिसाळलेल्या कुत्र्या सारखे बांधुन ठेवले होते. साक्षी त्याच्या जवळ जाणार इतक्यात समीर च्या आईं ने तीला आवरल व शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या. ती समीर कडे जायचा हट्ट करू लागली पण तीला महीत नव्हत कि तीचा समीर त्या दृष्ट शक्ती च्या ताब्यात आहे. शेवटी गावातल्या एका वृद्ध व्यकती ने समीर ला गावातल्या प्राचीन महादेवा च्या मंदिरात नेण्याचा परामर्श दिला. तीथे एक साधु बाबा राहतात जे कित्तेक वर्षांपासुन मंदीर चा रख रखाव करत होते. त्यावेळी सगळ्यांना तेच योग्य वाटले, समीर च्या वडिलांनी एक टोळी बनवली व समीर ला तीथे घेउन जाण्यास निघाले. साक्षी च्या हट्टा पाही त्यांनी तीला पण सोबत घेतले. रात्र खुप झाली होती, कंदीलच्या प्रकाशात सगळे मंदिरा च्या मार्गा वर चालत होते. वाटेत समीर स्वताला त्यांच्या तावडीतुन सोडवुन जंगलाच्या दिशे ने धावु लागला व थोड्याच वेळात नाहीसा झाला, सगळे जंगलाच्या दिशेने धावु लागले. साक्षी पण धावता धावता त्यांच्या पासुन वेगळी झाली, ती पण समीर ला हाका मारत त्या घनदाट जंगलात समीर ला शोधु लागली. तेवढ्यात अचानक समीर ने साक्षी वर हल्ला केला व तीला खाली पाडले तसा तो पण दुर वर जाउन पडला, कारण साक्षी च्या हातात होती रूद्राक्ष ची माळ जी समीर ने तीला दिली होती. समीर उठला व परत झाडांवर एखाडी माकडा सारखा सर सर चढुन एका झाडा पासुन दुसर्या झाडावर झडप घेउ लागला, समीर आता आक्रामक झाला होता. साक्षी पण त्याच्या माघे धावत होती. धावतांना ती बोलत होती समीर मला महितीये तू मला ऐकु शकतोस, त्या दृष्ट शक्ती ला तुझ्यावर ताबा नको मिळवु देउ. साक्षी चे हे शब्द समीर च्या कानी पडताच त्याचा वेग कमी झाला व तो झाडावरून खाली पडला व स्वताच्या आवाज़ात कन्हत बोलला- मी स्वताला या पिशाच च्या स्वाधीन केलय, माझ्यासाठी स्वताचा जीव धोक्यात नको घालवु, तू प्लीज़ जा माघारी, मी नाही वाचनार आता. तेवढ्यात साक्षी बोलली कि तू अशी हार नको मानु, तू त्या दृष्ट पिशाच सोबत लढ, ते तुझ शरीर आहे आणि त्यावर फक्त तुच ताबा मिळवु शकतो. साक्षी चे शब्द समीर ला बळ देत होते व तो आतल्या आत स्वताच्या शरीरा वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. समीर वेदने ने तळमळत होता, या संधी चा फायदा घेत साक्षी ने आपल्या हातातली माळ समीर च्या गळ्यात घातली. तसा समीर पण विज़ेचा झटका लागल्या प्रमाणे तडफडु लागला. साक्षी मदतीसाठी हाक मारू लागली व तेवढ्यात समीर चे वडिल आणि बाकीची टोळी तीथे पोहचल्या. क्षणा चा पण विलंब न करता समीर ला तसच बेशुद्ध अवस्थेत महादेवा च्या मंदिरात नेण्यात आले. समीर ची अवस्था बधताच मंदिरा च्या साधुंने यज्ञ ला सुरूवात केली आणि आपल्या जवळ असलेल्या एका जुनाट पुस्तकातुन देवाच्या मंत्रा चा जाप करु लागले व तसा समीर पण वेदने ने तडफडत होता. मंत्र उच्चारणा ला वयतागुन समीर शेवटी जोरात किंचाळला व पूर्ण बळाने त्याने ती माळ तोडुन टाकली. त्याला धरुन ठेवलेल्या लोकांना त्याने वरबडुन ज़खमी केले व त्या साधूंचे शीर धडापासुन वेगळे केले. आता शेवट ची आशे ची ज्योत पण व्हिज़ली. तेवढ्यात साक्षी ला एक युक्ती सुचली, तीने समीर च्या वडिलांना त्रिशुल घेउन मंदिरा च्या द्वार ची राखण करण्यास सांगितले आणि समीर ला कस पण करूण रोखुन ठेवायला सांगितले. समीर मंदीर च्या छता ला जाउन टेकला होता. साक्षी ने ते पुस्तक हाती घेउन योग्य त्या मंत्रांचा जाप सुरु केला, मंत्र समीर च्या कानी पडताच तो पुन्हा तडफडु लागला व त्याने साक्षीवर हल्ला केला. यावेळेस त्या निर्दयी ने साक्षी चे पोट फाडुन तीचा कोथळा बाहेर काढला. साक्षी रक्ताने माखली व जंमीनीवर कोसळली. हे पाहताच समीर च्या वडिलांनी काळज़ावर दगड ठेउन समीर च्या मांडीवर त्रिशुल ने वार केला व त्याला तीथे च रोखुन ठेवले. साक्षीने कसबस स्वताला सावरले व पुन्हा मंत्रजाप सुरू केला. यावेळेस ती यशस्वी ठरली अाणि तो दृष्ट पिशाच समीर च्या शरीरातुन बाहेर पडला व महादेवा च्या मूर्ती समोर येता क्षणी भस्म झाला. समीर लगेच भाणावर आला व त्याने बघितले साक्षी मरणाच्या दारात उभी आहे, त्याने तसच तीला मिठीत घेतले व ढसा ढसा रडु लागला. त्याला रडताना पाहुन साक्षी बोलली- समीर रडु नको आता तर तू खुश असायला हव. त्या पिशाचा च्या तावडीतुन तुझी सुटका झालीये. माझी नेहमी एकच इच्छा होती ती म्हणजे तुझ्यासोबत लग्न करण्याची, जी पुर्ण नाही होउ शकली याचीच खंत वाटते, मला माफ कर जे मी माझ प्रेम व भावना तुझ्यासमोर उशीरा जाहीर केल्या. तेवढ्यात समीर ने जवळ असलेला शेंदुर तीच्या कपाळात भरला. साक्षीच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहु लागले व स्मितहास्य करीत तीने प्राण त्यागले. समीर तीला मिठीत घेउन वेड्या सारखा रडु लागला. तो ताडकन उठला व समोर पडलेल्या त्रिशुल स्वताच्या पोटात घालनार एवढ्यात त्याच्या वडिलांनी त्याला आवरले, समीर एक च हट्ट करत होता कि मला माझ्या साक्षी जवळ जायचय.
समीर च्या वडीलंानी त्याला शांत केले व त्याला समज़वु लागले- त्या पोरी ने तुझ्यासाठी स्वताच्या जीवाचा बलिदान केलाय, तीची इच्छा होती तू ज़गाव, तीचा बलिदान व्यर्थ नको जाउ देउ पोरा. एवढ ऐकताच समीर शांत झाला व तीला मिठीत घेउन रडु लागला. साक्षी ने समीर साठी स्वताचा प्राण गमवला होता, शेवटी याला च तर प्रेम म्हणतात.
समाप्त !
नमस्कार मिञानो मी सुशिल. माझ्यासोबत घडलेली एक घटना सांगतो, ७ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. मी ७ वीत होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या, त्या निम्मीत्ताने मी गावी गेलो होतो. जळगाव मध्ये अंबारे हे माझ गाव आहे.दीवसभर गावात पोरानसोबत हींडायचो आणी घरी आल्यावर खुप जेवायचो. ऊन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही सर्व मुल राञी बाहेरच झोपायचो, पण त्या राञी आम्ही झोपताना भुताच्या गोष्टी सांगत झोपलो होतो. राञीचे साधारण दोन वाजता मला कुञ्यांचा मोठमोठ्याने भुंकायचा आवाज येऊ लागला. :आवाज कमी व्हावा म्हणुन मी गोधडी तोंडावर घेऊन झोपलो ,थोड्या वेळाने मला कुञ्यांचा रडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज एवढा प्रचंड होता की, मला गोधढी पांघरुन सुध्दा तो आवाज कानात घुमत होता. कुञ्यांना हकलण्यासाठी मी जशी गोधडी बाजुला सारली तशी " समोरच दूश्य पाहुन माझी बोबळीच वळाली " समोर च्या घराबाहेर एका खाटेवर एक बाई बसली होती. आणी तिच्या आजुबाजुला दोन भले मोठे कुञे रडत बसले होते.त्या बाईने सफेद साडी घातली होती. आणि केसही सफेद होते तीचा चेहरा गोरा होता मोठे मोठे डोळे आणी काळे काळे दात पाहुन मी र-तभ्द पणे तिच्याकडे पाहत होतो. पाहता पाहता तिने मला हाताने बोलवायचा इशारा केला, आणि बघता बघता ती बाई माझ्या नजरेसमोरून अचानकपणे गायब झाली आणी मी त्याच जागी बेशुध्द झालो जेव्हा जाग आली तेव्हा मी आजींच्या कुशीत होतो. झालेला सर्व प्रकार जेव्हा मी आजींला सांगीतला तेव्हा, आजींनी सांगीतल की ती "डाखीन "होती. बर झाल तु तिच्या जवळ नाही गेलास नाहीतर तुला मारून खाल्ल असत तुला, ती गोष्ट जेव्हा मला आठवते तेव्हा माझा थरकापच ऊडतो त्या नंतर मी गावी गेलो माञ बाहेर मुळीच झोपलो नाही.-सुशिल-
माझा भाऊ तुषार हा ३१ डिसेंबर ची पार्टी करायला त्याच्या मित्राकडे म्हणजेच संदीप कडे गेला होता...
तुषार हा प्रकल्प्गस्त म्हणून गावातच एका कारखान्यात अकौंटटनट म्हणून कामाला लागता होता..मोठी कंपनी गावात आली असल्यामुळे आणि एमकॉम शिकला असल्यामुळे तो ह्या पदावर चांगल्या पगारात चिकटला होता....३१ तारीख जरी असली तरी आज ऑफिस मध्ये मंथली क्लोजिंग होते हे तुषार च्या लक्षात आले नव्हते..म्हणून साहेबाने त्याला उशिरापर्यंत थांबायला सांगितले आणि ताळेबंद फ़ाय्नलाइज करायला सांगितले...इथे घड्याळात ७.३० वाजले होते आणि त्याला मित्राचा फोन आला कि तू येतो आहेस कि नाही...मी सर्व तयारी केली आहे तू फक्त फरसाण आणि मसाला शेंगदाणे घेऊन ये...तुषार बोलतो अरे मला अजून एक तास भर जाणार आहे तोवर तुम्ही सुरवात करा मला इथे बॉस ने बेलन्स शिट ट्यालि केल्याशिवाय जायचे नाही असा बजावून सांगितले आहे....तितक्यात त्याच्या मित्र संदीप ने एक शिवी हासडली, तुषार साल्या तुझ हे नेहमीच आहे...आणि तुझा तो फोम्न्या बॉस पण ....तुषार ने हसत फोन ठेवला आणि तो त्याच्या कामाला लागला ..तो ऑफिस मध्ये एकटाच होता आणि त्यांचा शिपाई प्यून भोलाराम पासवान...भोला हा उत्तर भारतीय होता पण कामाला सदैव हसतमुखी तयार असायचा..भोला तुषार ला म्हणाला कि साहब आपके लिये कॉफी लेके आता हू गरमागरम आपको भी काम करणे भी स्फूर्ती आ जायेगी...त्यावर तुषार ने हसून होकार दिला...तुषार एकीकडे वाउचर वेरीफाय करत होता,आवश्यक तिथे एडजस्टमेंट करून घेत होता...आणि आता सारखे अद्यावत सोफटवेयर असल्यामुळे तुषार हि कला अवगत झाली होती...एकीकडे तुषार कम्प्युटर वर कि बोर्ड रटवत होता आणि भोला पण एकीकडे त्याच्याशी गप्पा मारत होता...त्यावर अचानक भोला म्हणाला कि साहेब तुम्ही आज रात्री घरी जाऊ नका ..इथे ऑफिस मध्येच थांबा वाटल्यास मी तुमचे जेवण बाहेरून ऑर्डर करून मागवतो आणि तसे पण आज ३१ डिसेंबर आहे त्यामुळे हॉटेल्स पण उशिरा चालू असतील...तुषार त्यावर म्हणाला कि देख भोला आज मुझे जान हि ही...तिकडे माझे दोस्त माझे वाट पाहत आहेत...तुषार एक टिचकी एन्टर बटनावर मारून म्हणाला देख भोला फायनल ड्राफ्ट रेडी हो गया...अपना काम तमाम अभी अपुन छूउ..मंतर....आणि त्याने एक एक सोफ्ट कोपी कंपनीच्या डायरेक्टर,सीइओ,आणि बॉस ला मेल केली ..तोवर घड्याळात ९ वाजले होते ...भोला बोलला साहब तुम्ही थांबा प्लीज माझ ऐका आज तुम्ही जाऊ नका...वाटल्यास तुम्ही हवी ती पार्टी इथे करा ..एक एक पेग मला पण होऊन जाइल....आता रात्र झाली आहे ऑफिस मध्ये कोण येतेय पाहायला आणि अश्या रात्री तुमचे बाहेर जाने बरे नाही...तुषार ची थोडी हटली आणि म्हणाला देख भोला तुझे दारू चाहिये तो ये ले पैसा देता हू ....ये नौटंकी मुझपे मत आज्माना...और मुझे जाणे दे ....तेव्हा भोला म्हणाला साहेब वोह अपना तरवळ तिठा है ना,उधार एक इमली का पेड है ...तुषार म्हणाला हो माहित मग त्याचे काय...तसा भोला म्हणाला साहब उधार सुना है अजिबो गरीब किस्से होते रेहते है दर रात को...कोई लडकी वाह पे दिखती है..नाजाने बहुत सी घटनाए होती आ राही है ....त्यावर तुषार हसून बोलला कि भोला तुझे पिणे से पेहले हि चढ गयी तू भी घर जाके सो जा...और आज ३१ है...कोई भूत वूत नही होता है...सब घर के भूत आज के दिन रस्ते पे रेहते है...एवडे म्हणून तुषार ने बाइक ची चावी घेतली नि निघाला....संदीप चे फार्महाउस १६ किमी अंतर्वर होते....तुषार ने बाइक स्टार्ट केली आणि घड्याळात वेळ पाहून त्याने एक्सिलेतर वाढवला आणि बेफाम बाइक पळवत सुटला...रस्त्याला वाहने तशी कमी होती पण बर्यापेकी वर्दळ होती...संदीप चे फार्म हाउस मेन हायवेपासून ५ किमी आत होते...तसा तो तरवळ फाट्यावरून आत घुसला आणि घड्बडीत रस्त्यावरून बाइक नेऊ लागला...तेवड्यात अचानक समोरून एक डुक्कर पुढ्यात आला आणि रस्त्याच्या मधोमध आडवा पडून राहिला...तुषार बोलला च्या आयला हा पण आताच मध्ये थब्कल घालून बसला...डुक्कर मोठमोठ्याने गुरगुरत होते...तुषार सारखा एक्सिलेतर वर जोर काढून हेड लाईट फोकस करत होता ...मोठमोठ्याने होर्न वाजवत होता....तरीपण डुक्कर काही हटायला तयार नाही...तेवड्यात तुषार च्या मोबिल वर संदीप चा काल आला..संदीप बोलला तुषार आहेस कुठे निघालास ना मगाशीच मग कुठे मारतोय्स...तुषार बोलला कि अरे यार संदीप मोठा घोळ होऊन राहिलंय,रस्त्यात डुक्कर आडवा पडलाय पण उठायचे नाव घेत नाही...आणि एकदम रानटी दणकट डुक्कर आहे साला...आपलीच फाडेल इथे म्हणून शांत पाने तिथेच उभा राहून अडकलोय...त्यावर संदीप बोलला अरे साल्या तू थांब तिकडेच मी आलो..माझी बंदूक घेऊन...३१ डिसेंबर ची पार्टी नक्कीच जोरात सेलिब्रेट करू...तुषार बोलला अरे नको यार..कोणी पहिले तर आपले बारा वाजतील...थांब मी आलोच...तितक्यात तुषार ने फोन ठेवला आणि समोर पाहतो तर काय डुक्कर गायब..तुषार विचारात पडला साला आता इथे होता मग गेला कुठे...असो बर झाल गेला तो..आपला मार्ग मोकळा म्हणत त्याने बाइक स्टार्ट केली आणि जाऊ लागला ...तेवड्यात समोरून मोठा लाईट चा फोकस त्याच्या डोळ्यावर पडला..कारण समोरून शेवटची फेरी असलेली एसटी बस येत होती...म्हणून तुषार ने त्याला साईड दिली..तितक्यात एसटी वाला अचानक थांबला आणि तुषार ला बोलला कि ओ साहेब कुठे जात आहात...तो म्हणाला मी आता तरवळ ला निघालोय..एसटी चालक म्हणाला कि पुढे जात असाल नीट सांभाळून जा तुमच्या रिस्क वर..किवा नाही गेलात तरी चालेल...त्यावर तुषार बोलला कि का काय झाले...एसटी वाला म्हणाला कि मला मगाशी भुताटकी दिसली नारंगी चीन्चेजवळ ..त्या चिंचेच्या झाडाजवळ....तुषार बोलला म्हणजे ...एसटी ड्रायवर बोलला कि झाडाजवळ एक जखिण उभी आहे....मी पहिले तसे एसटी ना थांबवता सुसाट पळवत इथे कसाबसा आलोय...आणि तो एसटीवाला निघून गेलाआता तुषार ला थोडी भीती वाटू लागली...संदीप ला विचारू म्हंटले तर संदीप आपली आयुष्यभर टेर खेचत राहील ह्या हिशोबाने तो एकटाच देवाचे नाव घेऊन कसा बसा पुढे निघाला....थोडे पुढे आल्यावर तुषार ला कसला तरी वास येऊ लागला...हो तसाच जसा एखाद्या मैताला मडक्यात त्या तूप धुपाचा वास येतो तसा...म्हणून त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे गेली तर पाहतो तर काय....पांढरी शुभ्र हळद पिंजर टाकलेली तिरडी सजवलेली होती त्यावर फुले होती आणि बाजूला ते मडके पण होते...आणि मुख्य गोष्ट म्हणजे आजूबाजूला कोणी चीट पाखरू पण नव्हते....दूर लांबवरून तुषार ला २-३ मशाली दिसू लागल्या त्या जस जश्या जवळ येत होत्या तश्या त्या अधिक स्पष्ट दिसत होत्या..आता अगदी स्पष्ट दिसले कि त्या मशाली कोणाच्या हातात दिसत नव्हत्या तर आपुनच हवेतल्या हवेत येत होत्या आणि गोल गोल फिरत पण होत्या...तुषार झाला एकदम कावराबावरा आणि त्याची चड्डीच काय बाई ती पिवळी व्हयाची बाकी राहिली होती....तुषार थरथरत्या हाताने बाइक स्टार्ट केली आणि पुढे जाऊ लागला...मनात देवाचे स्मरण करत होता...आणि अजून पुढे गेल्यावर त्याला एक विचित्रच दृश्य दिसले...ते म्हणजे एका लाकडी खुर्चीवर एका स्व्वाशीन मुलीला अगदी हिरवी साडी नेसून नटवून कपाळात कुंकवाचा माळा भरून सजवून ठेवली होती ....पण आजू बाजूला एक माणूस कोण दिसत नव्हता हे पाहून तुषार ला घाम्घामून घाम फुटला....त्या बाईचे डोळे तसेच उघडे निपचित पडलेले होते.आजूबाजूला श्रीराम जयराम श्रीराम असा आवाज येत होता पण दिसत तर मात्र कोण नव्हते...मोठमोठ्याने कोण तरी मुली बाया रडत होत्या...तुषार ने ना राहवून आवाज दिला कि ए कोण आहे रे....साल्या कोण आहे तो समोर ये ...मला माहित आहे आज ३१ डिसेंबर आहे म्हणून हे सर्व गेम खेळतोय...बाहेर ये रे कोण आहे तो ..मग बघतो तुला....आता तुषार ने ठरवले कि काही झाले तरी बाइक थांबवायची नाही आणि थेट संदीप च्या फार्म हाउस लाच थांबायचे....त्याने पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि तो जाऊ लागला...अचानक तुषार च्या कानाजवळ बांगड्यांचा खन्न खन्न आवाज आला तसा त्याचा बाइक चा कंट्रोल सुटला आणि कशी बशी पाय घासत पुसत बाइक थांबवली...पुन्हा त्याने बाइक चालू केली....आणि कोणतरी स्त्रीपुरुष अश्या मिश्र आवाजात बोलू लागला....पण नेमके काय बोलणे होते ते त्याला समजत नव्हते.....तुषार ने हिम्मत केली आणि ताकद एकटवून बाइक पुन्हा चालू केली आणि मोठमोठ्याने देवाचे श्लोक म्हणत संदीप च्या फार्म हाउस ला पोहचला आणि धावतच संदीप आणि त्याच्या मित्रांसमोर हा आडवा घामाघूम होऊन पडला ....तसे सर्व जन तुषार काय झाले,,,काय झाले तुषार बोल नां...विचारू लागले....तुषार शांत केले आणि त्याला थोडी बियर दिली ...तेव्हा कुठे स्थिर झाला..आणि घडला प्रकार सांगितला....तेवड्यात संदीप बोलला ...ओह्ह शिट्ट ..म्हणजे च्या आयला हा झेंगट खरा आहे तर....तुषार त्यावर उत्तरला काय रे काय खरे आहे...संदीप बोलला अरे आता परवाचीच गोष्ट आहे ..नारिंग गावात ३१ डिसेंबर एन्जोय करायला आलेल्या एका जोडप्याला काही लोकांनी अडवले आणि त्यात त्या विवाहित बाईला अनैसर्गिक पाशवी कृत्य करून तिला तिथेच ठार मारले आणि त्या माणसाला पण तिथेच ठार करून मारले...अरे जस्ट पर्वा मंगळवारची गोष्ट आहे...२९ ची ....तुषार पण बोलला यार साला खरोखर मी वाचलो नाहीतर आज माझा मुद्दा होता....तेव्हा संदीप बोलला कि सगळेजण आज पिउन जेवून इथेच झोप आणि सकाळीच जावा....नाहीतर च्या आयला तुमच्यातला एक जन अजून मारून तिथे भूत बनून मानगुटीवर बसायला मोकळा...असे म्हणत सर्वांनी हसत चेस केले आणि दारू चा ग्लास तोंडाला लावला..
टीप: काही ठिकाणी चोर्या मार्या करून तरुण मुलीला बाईला रेप करून मारले जाते तिथे अश्या घातला सरास होत असतात...आणि हि पण

Thursday, January 21, 2016

राज
नमस्कार मित्रांनो या आधी ज्या स्टोरी मी पेज ला दिल्या त्या सत्य आहेत कि नाही ते माहित नाही पण जेव्हा हि घटना घडली तेव्हा मला समजले कि खर आयुष्यात कधी काय घडेल काही सांगता येत नाही ...
सप्टेबर 2014 ला माझी फ्रेंड पूजा चा ऑफिस मधून मला कॉल आला . ती बोल्ली “मला घ्यायला ये लंच मधे.” तिचा आवाज घाबरलेला होता. मी विचारल “काय झाल?”. तर तिने काही न सांगता कॉल कट केला. मी विचारात पडलो कि झाल तरी काय असेल. कारण या आधी कधी तिने एवढ्या लवकर ऑफिस मधून कॉल पण केला नव्हता आणि आली पण नव्हती. मी थोड्या वेळा आधीच तिच्या ऑफिस जवळ पोहचलो. ती लंच टाइमला बाहेर आली. ती अतिशय घाबरलेली होती तिच्या चेहऱ्या वरून तर असे वाटत होते जणू ती आताच रडेल. मी काही न विचारता bike स्टार्ट केली आणि तिला घरी घेऊन आलो . तिची अवस्था पाहून तिच्या आईने विचारले “काय झाल तुला?”. तेव्हा ती रडायला लागली. आणि तिने जे सांगितले ते ऐकून तर आम्हाला पण विश्वास नाही झाला. पुजाची बेस्ट फ्रेंड निशा आज ऑफिस ला आली नव्हती. खूप कॉल केले तरी रिसीव्ह करत नव्हती. आणि जेव्हा ती आली तेव्हा तिचे केस विस्कटलेले होते. चेहेऱ्या वर वेगळेच भाव दिसत होते. ती आली आणि शेजारच्या चेयर वर मान खाली घालून बसली.
जेव्हा पूजा ने विचारले, “काय झाल काय हा अवतार?”. हे ऐकून तिने पूजा चा हात पकडला आणि काही समजायच्या आधी चेयर वरून तिला खाली फेकून दिले. आवाज ऐकून ऑफिस मधला स्टाफ तिथे आला. पूजा रडायला लागली. जेव्हा म्यानेजर ने विचारले “का केल असे?” तर निशा पुरुषाच्या आवाजात बोलू लागली. “ये मेरी हे इसे कोई कुछ कहेगा तो जान से जायेगा” आणि आणि जोर जोरात हसू लागली आणि घुमू लागली. हे बघून काही मुली रडायला लागल्या तर काही खूप घाबरून गेल्या. एक मुलगी हनुमान चालीसा बोलायला लागली तेव्हा निशा ने तिच्या अंगावर धावत जावून तिच्या हातात नख घुसवले. नख लागताच हातातून रक्ताची धार सुरु झाली. निशा ने लगेच तिच्या हातून येणाऱ्या रक्ताला जीभ लावली आणि ते प्यायला सुरवात केली. तेवढ्यात काही मुलांनी तिला पकडले आणि तिला एका कॅबीन मध्ये बंद केल. निशा चा वडिलांना कॉल केला आणि सर्वी घटना सांगितली. तेव्हा ते तिला ऑफिस मधून घरी घेऊन गेले. पूजा खूप रडत रडत हे सर्व सांगत होती. 10-12 दिवस पूजा ऑफिस ला नाही गेली. जेव्हा ती ऑफिस ला गेली तेव्हा तिची फ्रेंड निशा पण आलेली.. पण ती आता पूर्णपणे ठीक झालेली होती. रात्री मी पण निशा च्या घरी गेलो. पण जेवा तिच्या वडिलांनी 3 दिवसात काय काय घडले हे सांगितले तेव्हा तर आम्हाला तिथे बसायला पण भीती वाटत होती.
जेव्हा निशा ऑफिस मधून घरी गेली. तेव्हा तिला खूप ताप आला होता. ती बेडरूम मध्ये जाऊन झोपून गेली. पण तिच्या वडिलांना काळजी वाटत होती म्हणून ते डॉक्टर ला घरी घेऊन येण्या साठी गेले. आई पण घर कामात व्यस्त होती. पण जेव्हा तिचे वडील घरी आले तेव्हा निशा बेडरूम मधे नव्हती. आजुबाजू चे लोक पण शोधू लागले. टेरेस वर पहिले तेव्हा ती पाण्याच्या टाकी वर बसून हसत होती. हे बघून तर तिचा वडिलांचा थरकाप उडाला. जेव्हा ते तिला घेण्यसाठी वर जात होते तेव्हा ती मुलाच्या आवाजात जोरात ओरडली “ए बुद्ढे उपर आया तो लडकी को नीचे फेक दुंगा. इसे कोई छू नही सकता. अब इस पे मेरा राज हें. अगर कोई उपर आया तो लडकी को फेक दुंगा यहा से नीचे” हे ऐकून तिचे वडील तिथेच रडायला लागले. आणि बोल्ले “तुला जे पाहिजेल ते देईल पण तू तिला मारू नको.” खूप काही समजावल्या नंतर. त्या आत्माने 2 कोंबड्या मागितल्या. त्या आणून त्याला दिल्या तेव्हा निशा परत घरी आली. आणि घरी आल्या वर त्या जिवंत कोंबड्यांच्या मानेत दात घुसवत त्यांच्या रक्त पिवू लागली हे सर्व बघून तिच्या आई वडील रडून रडून बोलू लागले आता आमची मुलगी गेली. ती आता खूप भयानक दिसू लागलेली. रक्ताने माखलेला चेहरा आणि विस्कटलेले केस. त्यात जोर जोरात हसणे. जेव्हा तिचे वडील तिला समजवायला गेले तर तिने त्यांचा गळा पकडला. तिथे असलेले आजु बाजूच्या लोकांनी पकडून तिला बेडरूम मधेच बंद करून ठेवले.तिच्या वडिलांना काही सुचत नव्हते. पण घडलेली घटना संपूर्ण एरिया मधे पसरली सर्वे लोक घर बाहेर येवू लागले.वेगवेगळा सल्ला देऊ लागले. तेव्हा एका मांत्रिकाला बोलवलं गेल... त्या मांत्रिकाला यायला रात्र होऊन गेली. जेव्हा तो मांत्रिक बेडरूम चा दरवाजा खोलून आत गेला तेव्हा रूम मधे निशा एका कोपऱ्यात बसून मान गोल गोल फिरवत होती. मांत्रिकाने तिला विचारलं “कोण आहे तू.?”
तेव्हा ती पुरुषाच्या आवाजात बोल्ली, “ मे कोई भी हु पर ये लडकी मेरी हें और जो कोई हमारे बीच मी आयेगा उस का अंजाम वो खुद देखेगा.” तेव्हा अचानक निशा च्या हात वर चाकूच्या वारा सारखे निशाण येवू लागले आणि त्यातून रक्त यायला लागलं. मांत्रिक ने लगेच एक लिंबू मंतरून तिच्या अंगावर फेकला. तेव्हा निशा अजून जोरात हसायला लागली. आणि बोल्ली “बस इतना हि तुझे दिखता हु मी”. आणि बाजूच्या बेड ला आग लागली. मांत्रिक घाबरून मागे झाला आणि बोलला “छोड दे बच्ची को”. तर तो बोलला “अब थोडी देर ओर रुका तो तुझे भी जला दुंगा. मे अकेला नही हु मेरे साथ कई शक्तीया हें यह पे”. मांत्रिक ने डोळे बंद करून मंत्र बोलले तर त्याला रूम भरून आत्मा जाणवले. मांत्रिक बाहेर आला आणि निशा च्या वडिलांना बोलला “आत्मा खूप शक्तिशाली आहे आता काही पर्याय नाहि माझ्याकडे.माझ्या सारखे याच काही नाहि करू शकत... तुम्ही देवा कडे प्रार्थना करा हें बोलून तो निघून गेला”.
थोड्या वेळा नंतर आतल्या रूम मधून आवाज यायला लागाला. जोर जोरात ओरडायचा. जेव्हा खिडकीतून पहिले तर निशा हवे मधे तरंगत होती आणि हसत होती. मध्येच स्वता:चे केस ओढायची तर मधेच हातात दात घुसवून रक्त प्यायची. दुसर्या दिवशी शेजारच्या मदतीने गावावरून दुसरा भगताला घरी आणले जेव्हा निशा त्याचा समोर आली तेव्हा ती घाबरून एका बाजूला बसली. भगत ने विचारलं, “कोण आहे तू ?” तेव्हा ती बोलली “मी शेहजाद हु ये मेरी हें अब. मुझे इस से प्यार होगया हें. और इसे में किसी भी हालत मी नही छोडूंगा.” भगत ने हातातला चिमटा जेवा निशा च्या हाताला लावला तेव्हा ती जोर जोरात ओरडायला लागली आणि थोड्याच वेळात हसायला लागली. भगत ने हें बघताच तो मागे सरकवला निशा चे वडील तिथेच होते त्यांनी विचारलं “काय झाल?” तेव्हा तो बोलला. “हा एकटा नाहि आहे तिचा अंगात. त्याने खूप ताकत असलेले जीन बोलावून ठेवले आहेत त्याच्या मदतीला”. हे बोलण्या आधीच रूम मधली लाईट गेली आणि अचानक तिथे पूर्ण अंधार होऊन गेला. रूम मधे अचानक पाण्याचा आवाज यायला लागला निशा हसतच होती एका बाजूला बसून कसे तरी ते लोक रूमच्या बाहेर आले. आणि जेव्हा खाली पहिल तर रूम मधून रक्त बाहेर येऊ लागलं होत. भगत ने पण आता सांगून दिला कि हा जीन हिला घेऊन जाणार आहे .त्याने खूप मोठ्या शक्ती मागवून ठेवल्या आहेत त्याच्या मदतीला. मी त्याला काही केल तर बाकीचे मला सोडणार नही . असं सांगून तो पण निघून गेला समोरचं दृश्य एवढे वाईट होत कि तिचे वडील जागेवर कोसळले. आणि देवा कडे प्रार्थना करू लागले. “वाचवा गुरुदत्ता तुझ्या शिवाय कोणी नाही आमचा”
दुसऱ्या दिवशी पण पूर्ण रात्र जागून ते निशा चा रूम बाहेर बसले होते. तिची आई तर बेशुद्ध होण्या च्या मार्गा वर होती. अचानक 5-6 वाजता सकाळी सूर्य प्रकाश दारात येण्यातच होता तितक्यात एक भगवे कपडे घालून हातात कमंडलू घेऊन एक साधू उभा राहिला. त्याला बघून तिच्या वडिलांना वेगळच जाणवलं. डोळ्यात तेज आणि डोक्यावर जटा. जणू कोणी मोठा संन्याशी वाटत होता. दारातूनच त्याने विचारलं “कुठे आहे ती?”. तिचा वडिलांना काही समजला नहि. तर तो संन्यासी परत बोलला “कुठे ती मुलगी?”. तेवह तिचे वडील त्यांना बेडरूम मधे घेऊन गेले. त्यांना बघताच निशा तिचा वडिलांच्या अंगावर धावून आली आणि बोल्ली "कौन लाया इसे यन्हा ?” तेवढ्यात त्या साधू ने राख तिच्या अंगावर फेकली तेवा निशा जमिनी वर बसून ओरडायला लागली “छोड मुझे ये मेरी हें ओर मी इसे ले कर जाऊंगा हमारे बीच जो भी आयेगा वो जिंदा नहि बचेगा”. साधू ने शांत पणे विचारलं आणि बोलला “जाने दे ये बच्ची को ये तेरे दुनिया कि नहि हें” तर तो आत्मा बोलू लागला “अब ये मेरी हें इसे मुझ से कोई अलग नहि.कर सकता” आणि रूम मधे जोरात हवा सुरु झाली रूम मधला फ्यान आणि वस्तू हवेने हलू लागले. निशा आता स्वता:चाच गळा दाबायला लागली. आता ती गळा पकडून जमिनी पासून 2 फुटांवर उडत होती. साधूने लगेच अंगारा काढून निशाच्या अंगावर फेकला तशी निशा परत खाली पडली आता कमंडलू मधून पाणी निशाच्या अंगावर मंत्रून फेकला तशी ती तडफडू लागली आणि “जाने दे जाने दे” असं बोलू लागली. साधू ने परत कमंडलू मधले पाणी मन्तरल आणि रूम मधे सर्वी कडे फेकला तसं तसं ओरडण्या चे आवाज यायला लागले. आता साधू ने तिचा एक केस कापून त्याला मंत्र बोलत एका डब्यात टाकला आणि त्याला बंद केला तसा जोर्रात आवाज करत एक प्रकाश निशाच्या शरीरातून त्या डब्यात बंद झाला. निशा चे वडील धावत निशा कडे गेले ती बेशुद्ध अवस्थेत होती. साधू बोलला “आता मी जातो माझ काम झाले आहे”. त्या नंतर निशा वर ट्रीटमेंट केली आणि ती आता परत ऑफिस ला जायला लागली. देवाने केलेल्या मदती मुळे निशा चे वडील आता रोज मंदिरात जातात.
Story Writer – Raaj
Translated by - Sachin Wagalode
नमस्कार मित्रहो , मी मनिष सुर्वे आज आपणासमोर एक खरीखुरी कथा सदर करीत आहे
हि घटना आहे साल १९९९ मधली म्हणजेच आजपासून १६ वर्षांपूर्वी घडलेली आहे , मुख्य म्हणजे आजची घटना हि कोकणातल्या नामांकित अश्या घाटापेकी एक कशेडी घाट शी निगडीत आहे.कशेडी घाट तर अपना सर्वाना माहितच आहे जो नेशनल हायवे १७ वर आहे .
अमित,नेहा आणि प्रकाश हे तीन भावंड मुंबईत त्यांच्या परिवार सोबत राहायला होते, तर असेच एकेदिवशी अचानक अमित ला गावावरून फोन आला कि त्याच्या चुलत भावाचे लग्न ठरले आहे आणि लवकरच अचानक साखरपुडा हि ठरला आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी ताबडतोब वेळ मिळेल तसे निघून या असे अमित चे चुलत भाऊ प्रदीप ह्याने सांगितले आहे.अमित ला हि बातमी समजली तेव्हा तो खुश झालाच होता पण अचानक सुट्टी मिळणार तरी कशी हा प्रश्न होता,मग कशी बशी त्याने बॉस कडून रजा मंजूर करून घेतली आणि घरात हि सर्वाना कळवले. अमित चे आई बाबा म्हणालेत कि तुम्ही तिघे जन जमल्यास जाऊन या मग लग्नाला तर आम्ही येतच आहोत ,मग अमित ठीक आहे म्हणाला आणि नेहा व प्रकाश ला घेऊन निघाला.अमित ने नुकतीच त्याची कोरीकाराकरीत स्कोर्पियो घेतली होती. सर्व तयारी करून हे तिघेजण रात्री जेवण आटोपून ९.३० वाजता गावी राजापूर ला जाण्यासाठी रवाना झाले .आणि त्या वेळी आताच्या इतके ट्राफिक हि नव्हते असल्यामुळे रस्ता पूर्णपणे मोकळा होता ....एव्हाना मुंबई सोडून अमित ला एक तास भर झाला होता आणि मेन हायवे ला गाडी लागली होती ....कर्नाळ्याच्या त्या खिंडीतून घनदाट जंगलातून त्यांच्या रहस्यमय प्रवास चालू झाला होता....शहराचा गोंगाट सोडून मस्त पेकी गाडी आता कोकणच्या निसर्ग्कुशीत शिरली होती...मधूनच खिडकी उघडली कि थंडगार हवेचा झोत झुळकायचा....शुद्ध हवा मनाला आणि तनाला रोमांचित करणारी होती आणि इथे मात्र अमित पुरता ताशी १००-११० च्या वेगाने बेफाम गाडी पळवत होता .
साधारण मध्यरात्री १.३० कि २.०० च्या दरम्यान अमित ने त्याची स्कोर्पियो पोलादपूर जवळ एका ढाब्यावर थांबवली आणि चहा घेतला...कारण थंड हवेच्या गार गार स्पर्शाने त्याला झोप अनावर होत होती ....अमित ने चहा आटोपून पुन्हा एका गाडीत पेट्रोल भरले आणि टायर नीट चेक केलेत ..कारण कुणास ठाऊक ह्या पुढचा प्रवास जितका वळणदार आहे तितकाच घातक हि असेल..मग अमित ने गाडी सुरु केली आणि पुन्हा आपल्या प्रवासाला लागला ,५-६ किमी अंतर पुढे गेल्यानंतर कशेडी घाट सुरु कृपया वाहने सावकाश चालवा.असा बोर्ड दिसू लागला आणि चालू झाला तो नागमोडी वळणांचा वळणदार प्रवास .....प्रकाश आणि नेहा हि एव्हाना गाडी इकडे तिकडे डोलू लागल्यामुळे जागे झाले होते...नेहा ने गाडी ची काच खाली सरकवली होती....खिडकीतून बाहेर पहिले तर नुसता काळाकुट्ट अंधार दिसत होता....घनदाट झाडी गर्द अशी दिसत होती ...झाडांच्या फांद्या जणू काही अश्या पसरल्या होत्या कि खरोखरच एखादी हडकुळी म्हातारीच त्या प्रत्येक झाडावर बसली असावी...त्या पूर्ण घाटातून क्वचितच एखादा ट्रक किवा एसटी बस पास व्हायचीध्येच पाखरे आणि रातकिड्यांचा किलबिलाट कानावर पडायचा .....काही अंतर पुढे गेल्यावर अमित ची गाडी अचानक बंद पडली ,त्याने पुन्हा स्टार्ट केली तरी सुरु होईना ..अमित पुटपुटला नि म्हणाला कि हिला पण आताच इथे ह्या घाटात बंद पडायची होती ....नेहा आणि प्रकाश हि गाडीतून बाहेर पडले आणि अमित ला विचारू लागले कि काय प्रोब्लेम झालाय रे दादा.तर अमित म्हणाला कि काही नाही इंजिन गरम झाले असावे बहुतेक...प्रकाश म्हणाला कि आताच तर मगाशी ढाब्यावर आपण सर्व विश्रांती घेतली,इंजिन मध्ये पाणी टाकले ,पेट्रोल भरले मग अजून काय प्रोब्लेम असेल...तितक्यात समोरून एक म्हातारी हातात कंदील घेऊन येताना दिसली आणि जशी ती समोर आली तशी गाडीची हेडलाईट अचानक गेली ..तेवड्या इथे हे तिघे हि घाबरलेत...आता फक्त ती म्हातारी त्या कंदील च्या उजेडात दिसत होती ...तिचे केस पूर्णपणे मोकळे सोडलेले होते आणि कपाळावर भलामोठा कुंकवाचा टिळा लावला होता..तीला पाहून सर्वच घाबरले होते पण बोलणार कोण...शेवटी अमित ने हिम्मत करून विचारले कि आपण कोण आणि इतक्या रात्री इथे काय करत आहात? त्यावर म्हातारी म्हणाली कि मी इथे जोगतीण म्हणून सोडलेली आहे आणि मी इथे खालतीच जंगलात राहते ....पण तुम्ही मुल इतक्या रात्री इथे थांबून काय करत आहात ..तेव्हा अमित म्हणाला कि आमची गाडी बंद पडलीय ....मग म्हातारी म्हणाली कि तुम्ही इथे क्षणाचा हि विलंब न करता इथून निघा आणि थांबू नका ...ती आता येणार आहे तिची आता वेळ झालीय ...हा घाट नाही हा घात आहे ...ह्या घाटाने बर्याच जणांचे घात केलेत आहेत ....तेव्हा तुम्ही इथून निघा..आणि म्हातारी पलीकडच्या रस्त्याने जाऊ लागली ,तितक्यात प्रकाशचे लक्ष सहजच तिच्या त्या उलट्या वाकड्या तिकड्या पायांकडे गेले आणि प्रकाश च्या अंगातून विजेची तार जशी चमकावी तसे झाले आणि त्याने अमित ला खुणावले तसा अमित हि पाहतच राहिला आणि पुढे अंधारात ती म्हातारी नाहीशी झाली कि कोण देव जाणे....आणि दुसरी कमालीची गोष्ट अशी कि म्हातारी गेल्याबरोबर लगेचच अमित ची गाडी स्टार्ट झाली आणि ते पुन्हा प्रवासाला लागलेत ..खूप वेळ झाला प्रकाश आणि अमित गप्प नि अधून मधून एकमेक्नाकडे पाहायचेत ..मग न राहवून नेहा ने त्यांना प्रश्न विचारला कि काय झालेत तुम्ही दोघे गप्प का आहात?
तेव्हा प्रकाश म्हणाला कि नेहा ती मगाशी भेटलेली म्हातारी मनुष्य नसून भुताटकी होती....तीला वाटले हा मस्करी करतोय मग अमित ने हि सांगितले कि प्रकाश म्हणतोय ते खरेय....त्यावर प्रकाश म्हणाला कि जमेल तितक्या लवकर हा घाट उतार म्हणजे झाले...आणि पुढे रस्त्याला लागून एक स्मशान लागले ...तिथे एक चिथा जळत होती आणि चिथा जिथे जळत होती तिथे त्या लोखंडी रॉड वर एक पांढरीफट लांब केस वाली पिवळ्या साडी मध्ये एक हडळ त्यात पाय सोडून बसली होती आणि मोठमोठ्याने हसत होती ....आणि तिचा आवाज अर्धा पुरुषाचा आणि अर्धा बाईचा असा येत होता....हे पाहून अमित चा हात स्टेरिंग वरून थरथरू लागला होता ...आता ह्या तिघांना काहीच सुचत नव्हते .....क्षणभर प्रकाश ने स्वताला चिमटे काढून पहिले आणि आपण स्वप्न नाही पाहत आहोत हे जाणवले आणि त्याचा आयुष्यात सर्वप्रथम विश्वास बसला कि जगात खरोखर भूत आहेच...आणि वेळ काळ कशी खराब असते बघा ना...अचानक तीच बाई(हडळ) गाडीच्या समोर येउन ठाकली आणि अमित कार्काछ्कन ब्रेक मारलेत ...आणि हेडलाईट च्या प्रकाशात ती बाई समोर तिचे अक्राळविक्राळ रूप धारण करून उभी होती ....तिचा चेहरा पूर्णपणे केसांनी झाकलेला होता आणि तिचे डोळे पूर्णपणे पांढरे फट होते...ती हळू हळू गाडीजवळ येत होती आणि अमित हि हळूहळू गाडी रिवस मध्ये मागे नेत होता ...पण ती बाई सुद्धा हळू हळू पुढे येतच होती ....पण गाडीत जोवर पपई चा कोवळा बांधलाय लाल फड्क्यामध्ये तोवर काही होणार नाही ह्याची खात्री अमित ला होती ...पण ती बाई मात्र अक्राळविक्राळ हास्य करत होती. पुरुष आणि बाई ह्याच्या मिश्र आवाजात मोठमोठ्याने किंकाळी फोडायची...मी नाही जाऊ देणार ,मी नाही जाऊ देणार तुम्हाला...इथे नेहा गाडी मध्येच हे सर्व पाहून बेशुद्ध झाली होती ...प्रकाश ची छाती मात्र जोर जोरात धक धक धक धक करत होती आणि ते त्याला स्पष्ट जाणवत होते ....अंगातून पूर्णपणे जीव निघून गेलाय असे त्याला जाणवत होते ,इथे अमितची हि अवस्था काही वेगळी नव्हती ...प्रकाश इतका बिथरला होता कि त्याने गाडीच लघुशंका केली ....मग अमित ने गाडीच्या सर्व काचा लावून घेतल्या ...केबिन मध्ये देवासमोर अगरबत्ती लावली,गाऱ्हाणे घातले आणि गाडी स्टार्ट केली तशी ती हडळ अजूनच चेकाळली आणि अमित ने कशीबशी गाडी वाकडी तिकडी नेत तीला आरपार केली आणि तरी सुद्धा ती हडळ गाडीच्या काचेवर मोठमोठ्याने हात मारत होती ....अमितचे हाथ नुसते थरथरत होते ,,त्याला धड स्टेरिंग पण धरता येत नव्हते...गाडी पळवायला सुरवात केली आणि कसा बस एकदाचा कशेडी घाट संपला आणि दिवानखावटी गावाच्या पायथ्याशी आलेत ...आणि मग अमित ने जी गाडी बेफाम पळवायला सुरवात केली ती थेट भरणा नका,खेड इथे थांबला आणि रील्याक्स झाला आणि प्रकाश ला धीर दिला आणि शांत केली...इथे नेहा मात्र अजून हि बेशुद्ध होती मग अमित ने तिच्या तोंडावर पाण्याच्या हबका मारला आणि ती शुद्धीव आली .... भरणा नका पेट्रोल पंपावर काही लोकांना घडला प्रकार सांगितला तेव्हा लोकांनी हि त्यांना धीर दिला आणि सर्व हकीकत ऐकून त्यांना मग सांगितले कि हा कशेडी घाटामध्ये वरचेवर अपघात होताच असतात आणि त्यात हि ५-६ महिन्यांपूर्वी एक म्हातारी बाई आणि तिची सून घाटाच्या पायथ्यापाशी मुंबई ला जायला निघाले होतेत आणि त्या एसटीची वाट पाहत होत्या....वाट पाहता पाहता कधी अंधार पडला हि समजले हि नाही ...त्यात तिची सून हि नुकतीच ३ महिन्यंची गरोदर बाई होती ....तितक्यात अचानक २-३ ट्रक वाले काही मदराशी आलेत आणि म्हणालेत कि अम्मा जी कहा पे जाना है...मुंबई जाणा है तो मे छोड देत हु हम भी उधार हि जा रहे है ....म्हातारी ला ते योग्य नाही वाटले म्हणून ती नाही म्हणाली ...मग त्या मद्राशी लोकांना त्यांच्या अविश्वास पाहून अजूनच राग आला आणि तिच्या सुनेला ते जबरदस्ती ट्रक च्या केबिन मध्ये बसवू लागले आणि म्हातारी त्यांना प्रतिकार करू लागली पण त्यांच्या पुढे म्हातारीचा निभाव लागला नाही आणि तिच्या सुनेला त्यांनी गाडीत बसवले आणि निघून गेली...पण बिचारी म्हातारी मात्र त्या ट्रक च्या मागे धावू लागली आणि तिचा तोल जाऊन ती पलीकडे जाऊन पडली आणि समोरून येनाराच्या एका ट्रक च्या चाकाखाली तिचा मृत्यू झाला...ते ट्रक वाले पुढे काही अंतर जाउन थांबले आणि त्या गरोदर बाईवर अमानवी पार्श्वी बलात्कार केला आणि तीला मारून तिथेच सोडून दिले ..आणि त्याच दिवसही पासून त्या मेलेल्या गरोदर बाईचा आत्मा हडळ बनून त्या घाटामध्ये फिरत असतो...नेहमी नाही पण क्वचितच अमवस्या आणि पौर्णिमेला हि घटना घडते ....म्हणून साहेब तुम्हाला एक सांगतो कि जर तुम्ही कधी कोणता घाटामधून प्रवास करत असाल तेव्हा घाट सुरु होण्याआधी प्रत्येक घाटाच्या आधी पायथ्यापाशी एक मंदिर लागते...हो प्रत्येक घाटा मध्ये एक छोटेसे मंदिर असतेच...ज्या त्या जागेवाल्याचा मान असतो ....आणि मंदिरात पाया पडून दर्शन घेऊन आमचा प्रवास सुखाचा होवो अशी प्राथर्ना करावी ....विचाराने मती गुंग झाली होती पण तरीही अमित ने थोडा धीर सावरला आणि कसाबसा सकाळी ८ वाजता गावी राजापूर ला पोहोचला .
निष्कर्ष: तर मित्रानो हि होती आजची कथा आणि हो हि खरी खुरी घडलेली कथा आहे...कोकणातील मुंबई गोवा हायवेवरील कशेडी घाट हा आजही डेंजर मानला जातो कारण दिवसागणिक तिथे अपघात होत असतात आणि मेलेले तृप्त आत्मे वास करून असतात...असे म्हणतात कि अजून हि केव्हा तरी कशेडी घाटा मध्ये एक पूर्ण पांढरे वस्त्र घातलेला माणूस गाडीच्या समोर येउन गाडी अडवतो...माहिती करून घायायची असल्यास पोलादपूर किवा खेड कशेडी इथले गावचे कोण तुमचे ओळखीचे असेल त्यांना विचारून घ्यावे ....आपण म्हणतो तसे नसते पण घाटामध्ये हि असे अनेक भयानक अनुभव प्रत्येकाला येत असतात...पण वेळकाळ चांगली असेल तर तो देव हि आपल्या पाठीशी असतोच...
समाप्त.