Saturday, May 31, 2014

Alok Yenpure सांगतायत...

कधी कधी मनुष्याला त्याच्या सोबत घडलेली घटना हि खरी आहे कि तो संमोहन नावाच्या प्रकाराला बळी पडलाय ह्याच कोड काही केल्या सुटत नाही. हि कथा आहे माझ्या अगदी जवळच्या दोन मित्रांना आलेल्या अनुभवाची. अजय आणि विवेक ह्यांची. दोघांनी नुकतीच १२ वी ची परीक्षा दिली होती. सुट्ट्या लागलेल्या होत्या. दोघांनी ठरवल कि आपण रोज सकाळी पर्वती(पुण्यामधली एक छोटीशी टेकडी ज्या टेकडीवर विष्णूच, महादेवाचं, विठ्ठलाच आणि कार्तिकेयाच पेशवेकालीन मंदिरे आहेत) चढायची. विवेक राहायला होता सुखसागर नगर ला आणि अजय बिबवेवाडी मध्ये महेश सोसायटीत. त्यामुळे दोघांनी अस ठरवल कि विवेक ने अजय च्या घरी येयच नि त्याला पीक-अप करून पुढे पर्वतीच्या रस्त्याला लागायचं. (कारण सुखसागर नगर हे बिबवेवाडी च्या पुढे असल्यामुळे त्यांनी अस करायच ठरवल).

विवेक पहाटे साडेतीन वाजताच पाणी भरायला उठायचा. तो रात्री झोपायच्या आधी नळ सोडून ठेवायचा. पाणी आल कि पाण्याच्या आवाजानेच विवेक ला जाग येयची. पाणी भरून झाले कि तो अजयच्या घरी जायचा त्याला पीक-अप करायला, त्याला पिक-अप करून हे पर्वती पायथ्याला साधारण साडे चार-पावणे पाच च्या सुमारास पोहोचाय्चे. पर्वती दोन ते तीन वेळा चढायची नि नंतर पर्वती च्या मागच्या बाजूस जाउन थोडा वेळ काहीतरी उचापत्या करायच्या आणि मग घरी परतल्यावर पुन्हा एक झोप काढायची असा त्यांचा दिनक्रम चालू झाला.

पर्वती च्या मागील बाजूस एक व्यायामशाळा आहे. तिथून पुढे खडकाळ मातीचा रस्ता तळजाई आणि वाघजाई डोंगराकडे जातो. (पर्वती ते तळजाई असा अर्ध्या तासाचा ट्रेक पण बरेच लोक करतात). त्या व्यायामशाळेच्या जरा पुढे एक मोठ झाड आहे.अजय आणि विवेक, त्यांचे राउंड मारून झाले कि इथे येउन या झाडाच्या फांदीला काही वेळ लटकत बसायचे. पूर्ण पर्वती वर जरी अंधार असला तरी इथे मात्र व्यायामशाळेच्या बाहेरची ट्यूब लाईट रात्रभर चालू असायची. त्या ट्यूब लाईट चा प्रकाश कमी कमी होत अगदी त्या झाडाच्या थोड अलीकडेच संपायचा. ह्या दोघांना अगदी लख्ख प्रकाशाची गरज नव्हती पण झाडाची फांदी दिसण्या इतपत तरी उजेड होता.

अजय आणि विवेक अशा वेळी पर्वती चढायला सुरुवात करायचे कि त्यावेळी तिथे कोणीही नसायच. जे लोक रोज नियमितपणे पर्वती चढायला येत असायचे ते पण सव्वा पाच-साडे पाच नंतर चढायला सुरुवात करायचे. हे दोघ एकटेच पर्वती चढायचे आणि एकदा चढून झाली कि व्यायाम्शालेपाशी जाउन त्या झाडाच्या फांदीला लटकत बसाय्चे. एकटेच. आजूबाजूला त्यांच्या शिवाय कोणीही नसायच. असायचा तो फक्त आजुबाजुचा काळाकुट्ट अंधार.

साधारण १५ ते २० दिवस झाले असतील, ह्याचं दिनक्रम व्यवस्थित चालू होता. पर्वती २ वेळा चढायची आणि व्यायाम्शालेपाशी जाउन झाडाला लटकत बसायचं. त्यांच्यात रोज स्पर्धा लागायची कोण सगळ्यात जास्त वेळ फांदीला लटकतय ह्याची.

एकदा हे थोडे लवकरच पायथ्याला पोहोचले. रोजच्या प्रमाणे आजही ते दोनदा चढले आणि मग व्यायाम्शालेपाशी आले. आजही त्यांच्यात जास्त वेळ लटकायची चढाओढ लागलीच होति. तीनदा चारदा लटकन झाल होत नि एकदा शेवटच लटकून घराकडे निघायच अस त्यांनी ठरवल. दोघांनी उडी मारून फांदी पकडली नि काउंटडाऊन चालू झालं. पहिला अजय उतरला. घरी निघायच म्हणून तो पाण्याची बाटली, नाप्कीन सामान वगैरे आवरू लागला. आवारत असताना मधून मधून तो विवेक ला हाक मारत होता. "हं, चल, उतर आता, आज तूच जिंकलास" अस म्हणून अजय निघायच्या तयारीत थाम्ब्ला. विवेक काय अजून उतरत नाही म्हणून अजय स्वताहाचे कपडे हाताने झटकून साफ करत बस्ला. कपडे झटकून झाल्यावर त्याने विवेक कडे एकदा पाहिलं तर विवेक अजून फांदिलाच लटकत बसला होता. "ए, चल रे, उशीर होतोय, आवर पटकन" विवेकच हु नाही कि चू नाही. "अरे बास, बच्चन पेक्षा उंच होशील चुकून" अजय ने थोडी गम्मत केलि. पण विवेक कडून काही केल्या प्रतीसादच मिळत नव्ह्ता. अजय ने विचार केला कि हा काहीच का हालचाल करत नाहीये. अजय ला थोडी धाकधूक व्यायला लागलि. त्याने आता विवेक ला घाबरवायच ठरवलं जेणेकरून हा फांदी सोडेल नि निघायला तयार होइल. अजय हळूच व्यायाम शाळेपाशी गेला, एका दगडावर चढून त्याने ट्यूब लाईट थोडीशी फिरवली. ट्यूब लाईट बंद झाली, काळाकुट अंधार पसरला. अजय हळूच व्यायाम शाळेच्या मागे जाउन लपला. आता विवेक नक्कीच उतरला असणार म्हणून ह्याने हळूच डोकावून पाहिल आणि ……… जे त्याला दिसल त्याने त्याचे डोळेच पांढरे झाले. त्या काळ्याकुट अंधारात लटकलेला विवेक त्याला जणू झाडाला लटकवलेल्या एखाद्या प्रेतासारखा भासला. आता मात्र अजय चीच फाटली. तो पटकन ट्यूब लाईट पाशी गेला नि त्यांनी घाई घाईत ट्यूब फिरवून चालू केली. ट्यूब चालू झालेली पाहून त्याने विवेक कडे एक कटाक्ष टाकला आणि अजय चे होते नव्हते ते सगळे केस उभे राहिले. फांदीवर एवढा वेळ लटकत असलेला विवेक गेला कुठे…. त्याने आजूबाजूला पाहिल तर कोणीच दिसत नव्हत. अजय आता थर थर कापायला लागला. हाताच्या धक्याने ट्यूब लाईट पक्षाने पंख फडफडावे तशी क्षणभर फडफडली. अजय ला अजूनच भीती वाटायला लागली. जे काय घडतंय ते पाहून त्याला अस वाटत होत कि आपण कोणत्यातरी वेगळ्याच जगात आहोत. तो चटकन ट्यूब पासून दूर झाला. झाडावरून सुकलेल पान पडल्यासारखा आवाज झाला तस अजय ने झाडाकडे पाहिल आणि त्याला विवेक दिसला. तो अजूनही फांदिलाच लटकलेला होता. अजय खूप घाबरला. त्याने विचार केला कि विवेक ला घेऊन इथून लगेच निघाल पाहिजे. त्याने विवेक ला बेबीच्या देठापासून ओरडून हाक मारायला सुरुवात केली. विवेक चा तरी पण काहीहि प्रतिसाद नव्हता. विवेक ची मान कललेली होति. हळुवार पणे, एका लयीत तो झुलत होता. अजय ला डाउत आला, विवेक ला काही झाला तर नसेल ना. त्याचा मनात आता भयानक विचार येयला लाग्ले. तो विवेक कडे गेला आणि त्याच्या डोळ्यात पाहिल. विवेक चे डोळे उघडेच होते पण त्यात जीव च नव्हता. शेवटचा उपाय म्हणून अजय ने विवेकच्या पाठीवर जोरात थाप मारली तसा विवेक खाली उतरला. विवेक खाली उतरला तेव्हा त्याची मान कललेल्यच अवस्थेत होति. विवेक ने मान वर करून अजय कडे पाहिलं तर अजय विवेक कडे च एकटक बघत होता. अजय ने विवेक चे डोळे पाहिले तर त्याला कळून चुकल कि विवेक खूप घाबरला होता. दोघेही क्षणाचा विलंब न करता विजेच्या चप्लाइनॆ धावत सुटले. व्यायाम शाळेपासून दोन ढंगाच्या अंतरावर दोघे उजव्या बाजूला जिन्याकडे जायला वळले. जसा अजय उजव्या बाजूला वळाला तसा अचानक त्याच्या समोर एक टोर्च धरलेला बाबा आला. अजय घाबरून जोरात ओरद्ला तसा तो बाबा पण दचकला. त्यांना कळेनाच कि हि मुल एवढ्या जोरात का धावत चालली आहेत ते. अजय आणि विवेक ला काहीच सुचत नव्हत. त्यांना फक्त लवकरात लवकर पर्वती उतरायची होति. एकदाचे ते पर्वती उतरून त्यांच्या साय्कलीन्पाशी आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सायकलींच कुलूप उघडलं नि मार्गस्त झाले.

वाटेमध्ये अजय ने विवेक ला विचारल "का रे तू एवढा घाबरला होतास उतरल्यानंतर?" विवेक म्हणाला "अरे मला अस वाटल कि मी एक प्रेत आहे. मी उतरायचा प्रयत्न करत होतो पण अस वाटत होत कि मला हातच नाहीयेत, माझ शरीर हवेत अधांतरी लटकट्य. मी लाख प्रयत्न करत होतो उतरायचा पण मला कुठलाच अवयव हलवता येत नव्हता. शेवटी एक जोरदार फटका बसल्यानंतर माझे हात सुटले नि मी खाली उतरलो. " हे ऐकून अजय चमकला. आपल्याला पण असाच भास झाला होता असा अजय ने विचार केला. एवढा योगायोग कस काय होऊ शकतो. अजय भानावर येउन विवेक ला म्हणाला कि "अरे, तो फटका मीच तुला मारला होता." विवेक म्हणाला "काय???" पण का रे फटका मारलास ?" अजय म्हणाला कि " अरे मी तुआ केवढ्या हाका मारल्या, किती वेळ मी तुला चल चल म्हणत होतो, तुझा काही रेसपोंस च नव्हता, शेवटी मी तुझी गम्मत करायची म्हणून लाईट पण बंद केली, लाईट बंद केल्यावर मला पण तू एका प्रेतासार्खाच भास्लास म्हणून मी घाबरून पुन्हा लाईट चालू केली नि तुला फटका मारून खाली उतरवलं." हे ऐकून विवेक सुन्न झाला. त्याच्यानंतर त्याची ताटातूट होईपर्यंत विवेक काहीच बोलला नहि.

पाच सहा दिवसांनी मला अजय चा फोन आला, " अरे विवेक ने तीन दिवसांपासून अंथरून पकडलय, येतोस का माझ्यासोबत त्याला भेटायला ………."





No comments:

Post a Comment