नमस्कार मित्र मैत्रिणिनो , मी दिपाली तुमचासाठी एक कथा लिहिलेय.
कथेच नाव आहे पुन्हा एकदा
आजची सकाळ राहुल साठी खूप उत्साही होती कारण तो आज
त्याचा मनातली गोष्ट माधवी ला सांगणार
होता त्याला तसा अंदाजा होता कि त्याला निराश नाही होयला लागणार
आणि मग खूप नटून थाटून स्वारी चालली office ला नेहमीचा stop लागला पण
माधवी कुठेच दिसेना त्याला वाटल असेल कदाचित college ला सुट्टी म्हणून
आली नसेल त्याने तिला sms केला आणि नेहमीच्या बस मध्ये जावून
बसला आणि त्याला आठवायला लागली माधवी ची आणि त्याची पहिली भेट ,
नेहमी सारखीच बस मध्ये खचून गर्दी तरीपण राहुल ला फिकीर नाही कारण
त्याला मस्त खिडकीची जागा मिळाली होती तो मजेत headphone लावून
गाणी ऐकत होता गाडी गच्च भरलेली आणि अचानक त्याचा लक्ष गेल
एका मुलीकडे एकदम निरागस चेहरा वय फारतर १७ ते १८ असेल
बिचारी जेवडा जमेल तेवढा प्रयत्न करत होती इतरांचा स्पर्श वाचवण्याचा पण
असफल होत होती राहुल बारकाईने तिचाकडे बघत होता तेव्हा त्याचा लक्षात
आल कि ती जास्त पाठच्या माणसापासून वाचण्याचा प्रयंत्न करतेय
जो गर्दीचा फायदा घेऊन तीचाशी जास्त जवळीक साधत होता ते बगून राहुल च
स्त्री दाक्षिण्य जाग झाल आणि त्याने स्वत उठून
तिला जागा दिली जागा मिळताच माधवीला तात्पुरत जग जिंकल्या सारख वाटल
आणि राहुल ला त्याच जग मिळाल्या सारख वाटल. एकाच बस मधून प्रवास,
नेहमीच दिसन , हळू हळू एकमेकांसाठी जागा राखून ठेवण , मग कधीतरी चहा , मग
लंच आणि मग… हळू हळू फुलत जाणार प्रेम , पण कधीच व्यक्त न केलेलं म्हणून
आज राहुल एकदम ठरवूनच आला होता कि आज
माधवीला प्रेमाची कबुली द्यायची आणि नवीन सुंदर आयुष्याला सुरुवात
करायची , पन हे काय आज तर माधवी आलीच नाही … असेल काहीतरी, sms
तर केलाय बघूया कधी येतो reply
आता मात्र हद्द झाली , कधीही college ला सुट्टी न घेणारी मुलगी अचानक ७
दिवस येत नाही म्हणजे काय फोन नाही sms नाही समजायचं तरी काय… जाव
का तिचा घरी तस एकदा लांबून तीन घर दाखवलं होत मग काय कराव जाव
कि नको … अजून २ दिवस वाट पहावी का … नको जाऊयाच आज…
हो ना हो ना करता शेवटी राहुल आला त्या वाडीत जिथ माधवीचा छोटस घर
होत. तिथे पाउल टाकताना त्याला खूप विचित्र वाटत होत पण शेवटी प्रेम
आणि माधवीचा निरागस चेहरा त्याला घेऊन गेला तिथे आणि पाहतो तर काय
घराला भल मोठ्ठा कुलूप …. आणि आजू बाजूला भरून राहिलेली ती विचित्र
शांतता … राहुल मनाचे तर्क करत बसला गावी गेली असेल का , बाहेर
गेली असेल का …. पण जर गावी गेली असेल तर न सांगता नाही जाणार
आणि असाच विचार करता करता त्याला एक म्हातारी जाताना दिसली त्याने
तिला विचारले कि या घरातली माणसे कुठे गेली आहेत
ती म्हातारी आधी त्याचाकडे टक लावून बघत बसली आणि क्षणभर राहुल
ला ती नजर ओळखीची वाटली पण त्याने तो विचार झटकून
टाकला आणि तिला परत त्या घरातल्या माणसांबद्दल विचारले
आणि त्या म्हातारी ने सांगितलेली हकीकत ऐकून त्याला पायाखालची जमीन
सरकल्याचा भास झाला आणि त्याला कळून चुकले कि त्याचे जग
फुलण्या आधीच उध्वस्त झाले … अस काय सांगितलं त्या म्हातारीने ……
म्हातारी ने सांगितले आर बावा ती लोक खोली सोडून गेली कायमची पोर जळून
मेली न त्यांची मग कशी राहतील या घरात … सकाळची वेळ हुती र पोर
बापासाठी डबा बनवत होती स्टोव न पेट घेतला आणि पोरी ला पन पेटवली लय
धावाधाव केली, पण पोरिन २ दिवसात हस्पितलात जीव सोडला मी हुते न तिथ,
मरताना कोन्चतरी नाव घेत होती … राहुल राहुल म्हणून ….
ती लोका गेली पोरा आता हित कोण न्हाय तू जा आपला तुझा वाटन …… राहुल
खरच सुन्न झाला होता मारताना सुद्धा माधवीचा ओठी आपल नाव होत म्हणजे
आपण काय गमावलं याच त्याला गणितच मांडता येत नवत त्याच बधिर अवस्थेत
तो कधी घरी आला आणि कधी बेडवर झोपला त्यालाच नाही कळल
आणि त्याला जाग आली ती एका मंजुळ हाकेन हो हो नक्कीच हा आवाज
आपल्या माधविचाच तीच हाक मारतेय … माधवी माझी माधवी कुठे आहेस ग तू ये
न माझाकडे नाहीतर मी वेडा होईन ग, अक्षरशहा राहुल वेड्या सारखाच ओरडत
होता flat असल्यामुळे आजू बाजूच्या लोकांना काही कळल नाही … ओरडून
ओरडून दमला आणि परत झोपला आणि त्याला स्वप्न पडल हो त्याच्याच
माधवीच ती त्याला कळवळून सांगत होती कि राहुल माझा घरी ये
मला तुला काहीतरी सांगायचं आणि अचानक तिने पेट घेतला आणि तिची राख
झाली राहुल ताडकन उठून बसला पण त्याचा कानात तेच तिचे स्वर बोलत होते
कि "राहुल माझा घरी ये मला तुला काहीतरी सांगायचं"
राहुल सकाळी उठला थोडा फ्रेश झाला आणि तो विचार करत
बसला कि माधवी ने तर मला घरी यायला सांगितलाय पण मी कस जाऊ
तिचा घराला तर कुलूप आहे आणि दिवस उजेडी कुलूप फोडलं तर लोक
मला पकडतील मग शेवटी त्याने निर्णय घेतला कि रात्री जायच आणि गुपचूप
कुलूप फोडून आत जायचं आणि मग पुढे काय याच उत्तर त्यालाही माहित नवत
त्याला फक्त त्याच्या माधवीची ती स्वप्नातली इच्छा पूर्ण
करायची होती घरी जाण्याची....
रात्री ११. ३० ला राहुल परत त्या घरापाशी आला सोबत आणलेल्या अवजाराने
कुलूप तोडलं आणि आश्चर्य म्हणजे एवड भक्कम कुलूप तोडायला त्याला २
मिनिट पण लागले नाहीत आणि तो आत गेला आणि अचानक चित्रपट
पाहावा तशी दृश्य त्याचा डोळ्यासमोरून सरकायला लागली
माधवीची लगबग चालली होती डबा बनवायची बाबांची आवडती ची भाजी बनवत
होती ती पोळ्या तर कधीच झाल्या होत्या तिचे बाबा प्रातर्विधी साठी गेले होते
घरात सावत्र आई होती आणि तिचा उडान टप्पू भाऊ होता जो लौकिका अर्थाने
माधवीचा मामा होता तिची आई आणि मामा गप्पा मारत बसले
होती आणि माधवी बिचारी सकाळ पासून काम करून मेटाकुटीला आली होती पण
तरीही ती काम करत होती तिचा लाडक्या बाबा साठी आणि हो मनातल्या मनात
एक हुरूप होताच तिच्या राहुल ला भेटायचा प्रत्यक्षात कधीच बोलन झाल
नाही पण तिलाही राहुल च प्रेम समजल होत आणि त्याच आशेवर ती आनंदाने
जगायला लागली होती भाजी करून झाल्यावर तिने स्टोव बंद
केला आणि ती अंघोळीला गेली, तिची अंघोळ झाल्यावर ती बाहेर आल्यावर
तिची आई अंघोळीला गेली नुकतीच
न्हायलेली माधवी गुलाबाचा फुलासारखी टवटवीत दिसत होती आणि तोच
टवटवीत पणा तिला घातक ठरला तिचा त्या घाणेरड्या सावत्र मामाची नजर
तीचावर पडली अनासाये घरात कोणीच नवत बहिण अंघोळीला गेलेली तो त्याने
डाव साधायचा ठरवला गुपचूप दाराला कडी घातली आणि मागून येउन
माधवी ला पकडली अचानक झालेल्या या प्रकाराने माधवी गडबडली आणि तिने
सुटण्याचा प्रयत्न केला, इकडे राहुल ची घालमेल चालली होती पण तो तर
जखडायला सारखा हलुच शकत नवता,
तो असहायतेने पाहत बसला जे जे घडतंय ते
माधवी खूप घाबरून गेली होती आणि मामा ला विनवत
होती कि मामा मी तुला मुली सारखी आहे आणि तो नराधम फिदी फिदी हसत
म्हणाला मधु मी फक्त नर आणि मादी हेच नात मानतो मुकाट्याने तयार
हो नाहीतर मला जबरदस्ती करावी लागेल माधवी ने खूप धडपड केली पण
ती त्या दणकट नाराधमासमोर हतबल ठरली आनि अचानक तिला कुठूनस बळ
आल …… तिला आठवला तिचा राहुल, नाही मी माझा राहुल ची आहे
त्याचाशिवाय मला कोणी हात नाही लाऊ शकत या विचाराने तिने एकदम
मामाचा पोटात कोपर मारलं आणि तो कोलमडून पडला ती धावत धावत बाहेर
पडायला लागली पण त्याने तिला परत पकडलं आणि या वेळी त्याचा हातात चाकू
होता आणि धडपडी मध्ये निरागस स्वप्न पाहणाऱ्या माधविचा पोटाला तो चाकू
चिरत गेला आणि तिचा श्वास मंद झाला तेव्हा तिचा सावत्र मामा भानावर
आला आणि त्याला त्याची चूक कळून आली पण तेव्हा उशीर
झाला होता माधवीच श्वास मंद झाला होता आणि समोर आ वासून
उभी होती तिची सावत्र आई …….
दोघा बहिण-भाऊ ना कळत नवत काय कराव माधवी चे
बाबा कधीही येण्याची शक्यता होती पटकन तिच्या सावत्र आई
ला कल्पना सुचली तिचे स्टोव माधवी वर रिकामा केला शांतपणे
तिला माचीसची काडी लावली आणि जेव्हा आग जास्त
भडकायला लागली आणि धूर बाहेर जायला लागला तशी तिने आरडा ओरडा चालू
केला कि माझा लेकीला वाचवा हो …पण वेळ तर निघून गेली होती लोक
जमा झाली पटापट तिचा अंगावर पाणी मारायला सुरुवात केली गोंधळ ऐकून
रस्त्यावर गप्पा मारत बसलेले माधवीचे बाबा धावत आले आणि समोरच दृश्य
पाहुन बेशुद्ध झाले,माधवीला लगेच हॉस्पिटल ला हलवण्यात आल.
भाऊ बहिणीने रचलेल नाटक चांगल वटल होत लोकांचा असाच समज
झाला होता कि जेवण करताना माधवी जळून मेली. ज्या घरात
लाडक्या लेकीचा आठवणी पदोपदी होत्या त्या घरात बापाला राहवत नवत मग
ती मंडळी घर सोडून निघून गेली … रात्रीचा १ वाजला होता आणि राहुल भानावर
आला तेव्हा त्याला दिसल्या फक्त रिकाम्या खोल्या पण त्याला सगळ समझल
होत कि त्याचा माधवीचा बळी घेतला गेला होता तो तिथच धाय मोकलून रडू
लागला आणि अचानक त्याला भास झाला माधवीचा हो ती तीच होती त्याचा कडे
असहायतेने पाहत उभी होती पूर्ण भाजलेली त्याचा अंगाचा थरकाप उडाला तिने
त्याला हाक मारली राहुल …. मी तुझी माधवी आहे …
माझा या रूपाचा तिरस्कार नाही करणार न रे … क्षणभर राहुल
विसरला कि माधवी मेली तो आनंदाने ओरडला आणि म्हणाला माधवी माझ खूप
प्रेम आहे तुझावर चल माझाबरोबर मला तू कशीही दिसलीस असलीस तरी चालेल
पण आता मला सोडून नको जाऊ
माधवी ला हे ऐकून खूप वाईट वाटले कि किती प्रेम करतो हा माझावर पण
मी आता याची नाही होऊ शकत, कधीच नाही, तिने एक
उसासा टाकला आणि ती म्हणाली राहुल मी तुझाबरोबर येन आता शक्य
नाही पण मला मुक्ती मिळवून देन तुला शक्य आहे हे ऐकून राहुल भानावर
आला आणि तिला म्हणाला माधवी मी तुझासाठी जीव द्यायला पण तयार
आहे….
माधवी - तुझा जीव घेऊन मला मुक्ती नाही मिळणार राहुल उलट मेल्यावर
सुद्धा मी नरकयातना भोगेन
राहुल - मग सांग ना मधु मी काय करू?
माधवी - एका अटीवर सांगेन ,
राहुल - कोणती अट ,
माधवी - मला मुक्ती मिळाल्यावर तू तुझ आयुष्य आनंदाने पुन्हा एकदा सुरु
करायचं जर हे वचन देत असशील तरच मी तुला माझा मुक्तीचा मार्ग सांगेन
राहुल - नाही मधु हे शक्य नाही तुझाशिवाय जगन हि कल्पनाच मी सहन
नाही करू शकत , माधवी - मग ठीक आहे जा इथून निघून मी इथेच तडफडत
राहीन कायमची नको करू मला मदत मुक्तीसाठी जा निघून जा ,
राहुल - नाही नाही मधु मी तुझ एकेन मी मी करेन आयुष्याला नवीन सुरुवात पण
तू मला सांग मला तुला तडफडत राहिलेली नाही बघायची मी तुला वचन देतो …
हे ऐकल्यावर माधवीचा चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं आणि तिने सांगितलं
त्या नराधम भाऊ बहिणीला माझा समोर इथे घेऊन ये त्यांना मारल्याशिवाय
माझा आत्म्याला शांती नाही मिळायची. माझी सावत्र आई खूप धोरणी आहे
ती लोक आता गावाला राहत आहेत मी तुला पत्ता देते मी त्यांना तिथेही जावून
मारू शकले असते पण आधीच तिने त्या घरात मंतरून घेतलाय त्यामुळे मला तिथे
जाने शक्य नाही त्यामुळे तू त्यांना इथे घेऊन ये, राहुल ने मान
डोलावली आणि क्षणात माधवी दिसेनाशी झाली राहुल बाहेर
आला आणि कडीला ते कुलूप अडकवून ठेवले जेणेकरून कुलूप लावलेले आहे
असा लोकांना भास व्हावा आणि राहुल घरी येउन झोपी गेला
सकाळी राहुल जागा झाल्यावर त्याला त्याचा उशाशेजारी एक कागद
भेटला त्यावर माधवीचा गावाचा पत्ता होता राहुल फ्रेश झाला आणि तडक बस
पकडून माधवीच्या गावाला पोचला थोडीशी विचारपूस केल्यावर
त्याला एका मुलाने तिचा घराजवळ आणून सोडले घराच्या बाहेर खाटेवर माधवीचे
बाबा बसले होते खूप खंगला होता तो माणूस आणि लेकीचा अकाली जाण्याने
थोडासा वेडसर पण झाला होता राहुल चा आवाज इकडून माधवीची आई
आणि तिचा तो मामा बाहेर आले राहुल सर्व काही आधीच ठरवून आला होता
मामा - कोण वो पावन तुम्ही ?
राहुल - मी राहुल , माधवीचा मित्र मी एक insurance agent आहे माधवीने
माझाकडे insurance काढल होत ५ लाखाचं आणि त्याला नॉमिनी म्हणून
तिचा बाबांना ठेवलं होत मला कळाल कि माधवीचा जळून मृत्यू झाला मग
तिचा बाबा ना ५ लाख मिळू शकतात फक्त तिचा बाबांना माझा सोबत याव लागेल
पण त्याची परिस्थिती पाहता तुम्ही पण त्यांच्या सोबत आलात तर चालेल
हे एकूण भावाबहिणीचे डोळे चमकले … ५ लाख …. अबबबब एवडी मोठी रक्कम
…पैशासाठी हपापलेली त्यांची मने हा हि विचार नाही करू शकली कि college
मध्ये शिकणाऱ्या माधवी कडे ५ लाखाचा insurance काढण्यासाठी पैसे कुठून
आले, पैसा माणसाचे डोके फिरवतो हेच खरे … ती दोघ आनंदाने
माधवीचा बाबांबरोबर यायला तयार झाली त्याच दिवशी दुपारी सगळे निघाले
बस मध्ये राहुल ने सांगितले कि insurance ची एक
कॉपी मी माधवीला दिली होती ती बरोबर घेतलीत का तर माधवीचा मामा मधेच
म्हणाला अवो पावन मधु ने insurance काढलेला सुदिक आम्हाला माहित
नवता मग कापी कसली घेणार वो …हे ऐकल्यावर राहुल म्हणाला माधवीने
मला सांगितलं होत कि तिने मी तिला दिलेली कॉपी घरात कुटेतरी ठेवलेय
तुम्ही म्हणता तुम्हाला माहित नाही म्हणजे ती कॉपी घरातच असली पाहिजे
आपण एक काम करू आधी घराकडे जाऊ तुमच्या ती कॉपी घेऊन मग पुढचे
सोपस्कार पार पाडू … घराकडे जायच म्हटल्यावर माधवीचा आई
ला धडकी भरली पण ५ लाखाचा प्रश्न होता त्यामुळे
ती काही बोलली नाही बरोबर रात्री ११ वाजता मंडळी घराशेजारी पोचली पण
घराला कुलूप आणि चावी तर आणलेली नाही पण तो प्रश्न राहुल ने
सोडवला तो बोलला सगळी झोपलेत कुणाला कळणार आहे आपण कुलूप फोडलं तर
आणि तस पण तुम्ही घराचे मालक आहात त्यामुळे जरी कोणी बघितलं
तरी हटकनार नाही……. पण तिथे भरून राहिलेल्या विचित्र शांततेमुळे
माधवीचा आई ची पाचावर धारण बसली होती ती म्हणाली आता नको आपण
उद्या दिवसा येऊ नी हे सगळ करू …… राहुल - अहो पण
काकी मला उद्याचा सकाळी फॉर्म देयचा आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे
उद्या जर सकाळी सकाळी नाही दिला तर ५ लाख विसरा तुम्ही,
हे ऐकून भावाने बहिणीला समजावले आणि राहुल ने 1 घावातच कुलूप फोडले
( कुलूप आधीच फोडले होते त्यामुळे 1 घावातच काम आटोपले ) दार सताड
उघडल आणि राहुल भावा बहिणीला बोलला तुम्ही दोघ आता जाऊन कागद शोधून
आणा मी इथेच थांबतो बाबांजवळ ……… आणि आश्चर्य म्हणजे दोघंही कुरकुर
न करता आत जायला तयार झाली
आत आल्यावर दोघांनी कागद शोधायला सुरुवात केली ते दोघ शोधाशोधी मध्ये
इतके मग्न झाले होते कि दार हळू हळू बंद झालाय याकडेही त्याचं लक्ष नवत
मधेच मामा ला न्हाणीघरात आवाज ऐकायला आला त्याने ताई ला विचारलं कि तू
आवाज ऐकलास का तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता मामाने ती बघत
असलेल्या दिशेने बघितलं तर ती दाराकडे बघत होती जे बंद होत आणि पूर्ण
अळ्याने भरून गेल होत घाणेरड्या वळवळनाऱ्या अळ्या ज्यामधून खूप
घाणेरडा वास येत होता आणि तेवढ्यात न्हानिघरातला आवाज
मोठा झाला आणि पाण्याबरोबर हुम्म्म हुम्म्म असा विचित्र आवाज पण येऊ
लागला …… मामा पण खूप घाबरला होता पण तरी सुद्धा तो धीर करून
न्हानिघराचा दिशेने गेला जाता जाता त्याचा पायाशी काहीतरी वळवळल त्याने
खाली बघताच त्याला दिसले केस, जे लांब होते आणि आपोआपच वळवळत होते
तो गेल्यापावली परत आला आणि बघतो तर काय त्याची बहिण
भिंतीला एका जागी जखडल्या सारखी उभी होती आणि चारी बाजूनी तिचा अंगावर
अळ्या, पाली, झुरळे चढत होती तिचा तोंडातून शब्द फुटत नवता ती असहायतेने
भावाकडे बघत होती आणि अचानक तिचे डोळे मोट्ठे झाले इतके कि वाटल
आता फुटतील कारण तिने बघितलं भावाचा मागून कुणीतरी रांगत येत होत पूर्ण
जळालेल कुणीतरी, आणि अचानक रांगण संपवून ते जे कोणी होत ते उभ राहील
मामा पण बहिणीचा बाजूला ढकलला गेला दोघंही आता line मध्ये
उभी होती आणि त्यांचा समोर होती माधवी ……. पूर्ण जळलेली ……
दोघांच्या जाणिवाच बधिर झालेल्या …… अंगावरून किडे फिरतायत याची पण
त्यांना शुद्ध नाही उरली
दोघानाही वाटत होते कि जे चाललाय ते एक स्वप्न आहे पण या त्यांचा भ्रमातून
माधवीने त्यांना बाहेर आणलं आणि जेव्हा सत्य
परिस्थिती कळली तेव्हा त्यांना वाचा फुटली दोघही दयेची भिक मागायला लागले
आणि एकमेकावर आरोप ढकलायला लागले पण माधवी कुणालाच
क्षमा नवती करणार कारण तिचा स्वप्नांचा चक्काचूर
केला होता त्या दोघांनी आणि तिचा बाबांना आणि राहुल ला एकट केल होत…….
माधवीचा जळालेला चेहरा खूपच भयानक दिसत होता तो चेहरा बघूनच दोघ
अर्धमेली झाली अचानक दोघांच्या शरीरावर अपोआप ओरखडे उमटायला लागले
जस काही कोणीतरी त्यांचावर चाकू चालवताय त्या दोघानाही वेदना सहन होत
नवत्या आणि माधवी एकदम विकट हास्य करत होती आणि म्हणत होती अशाच
वेदना झाल्या होत्या मला, मी भोगल आता तुम्ही दोघ भोगा आणि अचानक
त्या दोघांना त्यांचं शरीर ओलं झाल्यासारख वाटलं रॉकेल चा वास येऊ
लागला आणि बघता बघता दोघांच्याही शरीराने पेट घेतला आणि काही वेळाने
तिथे उरली फक्त राख आणि माधवीच समाधानच हसू ……
आणि आता वळूया आपला कथानायक राहुल कडे
ज्या क्षणी ती दोघ घरात शिरली त्याच क्षणी राहुल माधवीचा बाबा ना घेऊन
आपल्या flat वर गेला……. त्याने माधवीला वचन दिल्याप्रमाणे
तिला मुक्ती मिळवून दिली आणि नवीन आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात पण
केली, ते सुद्धा माधवीचा बाबांची जबाबदारी घेवून …….
कशी वाटली कथा नक्की सांगा … all comments are appreciated
positive and negative also..

Nice 1
ReplyDelete