महाविद्यालयीन युवकांनी नक्की वाचावी अशी काही!
(घटना संवेदणीय आहे म्हणून काही त्यामुळे जास्त खोलीत जायची गरज नाही. खरी कि खोटी याची फेरतपासनी नको.)
एक असा किस्सा ज्याने महाविद्यालयीन तरुण वर्गात खळबळ माजवली होती, घटना अशी काही खूप जुनी नाही पण नवीदेखील नाही. साधारण २००५ ची आहे. पश्चिम बंगाल मधील आपला एक मित्र(मराठी) हि कथा सांगत आहे, त्याने पण हि कोठून तरी ऐकली आहे. तो ज्या महाविद्यालयात शिकतो त्या महाविद्यालयातील हि घटना आहे. पश्चिम बंगाल मधील हि घटना आहे, एका नामांकित महाविद्यालयातील हि घटना त्या काळी खूप चर्चेचा विषय ठरली होती.
त्या महाविद्यालयात सुभाष नावाचा एक विद्यार्थी होता, तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी अतिशय हुशार, चार चौघांहून वेगळा, कोणाच्यातहि जास्त न रमणारा, स्वतः आणि स्वतःचा अभ्यास भला अस त्याच तत्व होत. स्वभावाने आणि परीस्थीने देखील अतिशय गरीब होता, आई विधवा होती. तो एकुलता एक दिवा होता. त्यामुळे घरी आईचा लाडका, महाविद्यालयात शिक्षकांचा लाडका होता. अशा लाडक्या लोकांचे त्यांच्या स्वभावामुळे अर्थातच शत्रू तयार होतात. तसेच त्याचेही शत्रू त्याच्या विरोधात तयार होत होते. तो सगळ्यांचा लाडका असल्याने काही लोक त्याच्यावर जळत असत, त्यातीलच एक नाव देबोसीस, हा देबू म्हणजे मोठ्या बापाची बिगडी औलाद होता, आपण पैश्याच्या जोरावर काहीही करू शकतो असा त्याचा ठाम गोंडस गैरसमज होता. तो सतत सुभाष च्या विरोधात काही न काही काड्या करीत असे.तो सतत सुभाष वर नजर ठेऊन असत.तो सुभाष ला पडण्याची संधी शोधात असे.
तो त्याच अभ्यासाच काम नियमित पणे बजावत असे. तो विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षाला होता, अभ्यासाचा त्याच्यावर प्रचंड ताण होता. अपेक्षांचे ओझे वाहत होता तो. कधी प्रयोगशाळेत उशीरपर्यंत थांबून त्याला अभ्यास आणि प्रयोग करावे लागत असे. असेच तो एके रात्री त्याचे विज्ञानाचे प्रयोग करीत महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत थांबला होता, तो एकटाच तिथे होता, त्याचे आजूबाजूला कुठेच लक्ष नव्हते, आणि तो त्याचे प्रयोग करण्यात गुंतला होता.अचानक प्रयोगशाळेचा दरवाजा उघडला गेला पण सुभाष च त्याच्याकडे लक्ष नव्हत, उघडलेल्या दरवाजातून देबोसीस आणि त्याचे काही साथीदार प्रयोग शाळेत घुसले.त्यांनी सुभाष ला पकडले व त्याला पिडायला सुरवात केली, त्याला डोक्यात फटके देणे, त्यच्या पाठीवर मारणे, त्याला त्याच्या व्यंगावरून चिडवणे चालू केले. थोडक्यात त्यांनी त्याच्यावर ragging चा प्रकार सुरु केला होता, जो सुभाष साठी खूप असह्य होत. तो खूप आरडा-ओरड करीत होता, पण त्याचा काही फायदा होणार नव्हता, कारण त्याला प्रयोगशाळा उघडी करून देऊन शिपाई पण त्यांच्या रूम्स मध्ये झोपण्यासाठी गेले होते, इकडे देबोसीस आणि त्याचे मित्र सुभास ला ना-ना तर्हेने त्रास देत होते, त्यांनी सुभाष ची कपडे फाडली, त्याला पूर्ण उघडा केला आणि चोप द्यायला सुरवात केली, सुभाष हतबल होता, तो काहीही करु शकत नव्हता.तो फक्त मदतीसाठी देवाचा धावा करीत होता, पण देवही त्याच्या मदतीला आला नाही. त्याच्या अंगावर आता जखमा होऊ लागल्या होत्या. त्या जखमांमधून रक्तस्त्राव होत होता. तो वेदनेने विव्हळत होता. आता देबोसीस चा एकच वार त्याच्यावर झाला आणि सुभाष हे जग सोडून यमसदनी गेला.. मोठ्या बापच्या पोरांची असली लफडी जिवंत कधी होत नाहीत, हे प्रकरण जागीच अकस्मात मृत्यू म्हणून दाबला गेल.
या घटनेला काही दिवसच लोटले होते, कि आता सुरु झाला होता खेळ लपाछपीचा. ज्या प्रयोगशाळेत सुभाष ला मारण्यात आला होत. त्या प्रयोगशाळेत ना-ना तर्हेच्या घटना घडायला सुरवात झाली होती. देबोसीस चे काही मित्र प्रयोगशाळेत प्रयोग करीत असताना अचानक कोणीतरी त्यांचा हात धरला व त्याच्या स्वतःच्याच हत्त असणार्या acid च्या बाटल्या त्यांनी स्वतःच्या पायावर ओतून घेतल्या. ती घटना मात्र अतिशय दूरदैवी घटना मध्ये मोडण्यात आली, त्या दोन मुलांचे पाय पूर्ण पणे होरपळले गेले होते, आता त्यांच्या लक्षात आले होते कि हे त्यांच्याबरोबर काय घडत आहे. एके रात्री एक शिपाई प्रयोगशाळा बंद करण्यासाठी प्रयोगशाळेजवळ आला तेव्हा त्याला तिथे कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला.त्याने आतमध्ये डोकावून पहिले तेव्हा त्याला तिथे सुभाष खाली मान घालून रडताना दिसला, त्याला सुभाष रडताना दिसला, शिपायाने आत डोकावताच त्याचा रडण्याचा आवाज वाढला, तो खूप मोठ्याने रडत होता, शिपाई त्याला घाबरला आणि कसलीही हाल-चाल न करता जाण्यासाठी मान फिरवली, इतक्यात पाठीमागून त्याला कोणाचा तरी आवाज आला, शिपायाने मागे वळून पहिले असता, तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून सुभाष चा होता. सुभाष त्या शिपायाला थामाबयाला सांगत होता, त्याची मान अजून खाली होती, सुभाष उठून शिपायाकडे चालत येऊ लागला, त्याच पूर्ण अंग रक्ताने लालेलाल झाले होते, त्याने त्याची मान वर केली, आणि त्यापुढे शिपायाने जे काही पहिल ते पाहून तो खूप घाबरला. सुभाष च्या डोळ्यातून रक्त येत होते, तरी त्याचे डोळे लाल होते, हाताची बोटे मधेच तुटून लोंबत होती, ओठ फाटून त्यातून रक्त येत होते, आत मत्र शिपायची बोबडी वळली, तो तिहून पळणार इतक्यात सुभाष ने त्याचा गळा पकडला आणि तसाच मागे सरकवत नेले, शिपायाच्या तोंडातून आवाज निघत नव्हता, त्याचा तर जीवच गोळा झाला होता, सुभाष ला असा पाहून शिपाई तर अर्धमेलाच झाला होता. तो काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता, सुभाष च्या डोळ्यातून आता पाणी येत होत, सुभाष आता पुन्हा रडट होता,'काका मला न्याय पाहिजे, त्या रात्री मी एवढ ओरडलो पण तुम्ही कोणीच मला वाचवयाला आला नाहीत.' तो शिपाई काही बोलणार एवढ्यात सुभाष ने त्याचा गळा परत आवळला, आता शिपाई जणू मरणाच्या गर्तेत सापडला होता, म्हणजे जेमतेम गेलाच होता.. पण सुभाष ला काय वाटले देव जाने, त्याने शिपायाला सोडूले, आणि गुडघ्यांवर बसून ढसा ढसा रडायला लागला. 'मला न्याय हवा आहे, मला न्याय हवा आहे', एव्हढेच काय ते तो बोलत होता.
दुसरा दिवस उजाडला, शिपायाने हि हकीकत स्वतःच्या बायकोला, कोणालाही न सांगण्याच्या अटीवर सांगितली, आणि पुन्हा महाविद्यालयात आपल्या ड्युटीवर गेले. आता प्रयोगशाळा एकदम मोकळी होती तिथे कोणीही नव्हते, हि वेळ साधून शिपायाने देबोसीस आणि त्याच्या मित्रांना सांगितला कि,'तुम्हाला तुमचा एक जुना मित्र प्रयोगशाळेत शोधत आहे'. हे ऐकल्यावर देबोसीस आणि मत्राणी कसलाही विचार न करता प्रयोगशाळेत धाव घेतली. देबू आणि त्याचे मित्र प्रयोगशाळेत पोहोचताच बाहेरून कोणीतरी कडी लाऊन घेतली, कोणी ते माहित नाही. दार लावताच देबू ला पण कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला, तेव्हा त्याने आवाजाकडे पहिले, आणि त्याचे शिवांबू गळीत झाले. त्याची जम टरकली होती, कारण त्याच्या पुढे सुभाष होता, सुभाष आता मधुनच हसायला लागला. त्याची मारताना जशी अवस्था होती तशीच अवस्था आता पाहून देबू आणि त्याचे मित्र थरथरायला लागले होते, त्यांना काय करावे ते सुचत नव्हते. त्यांनी इकडे तिकडे उगाच धावाधाव करायला सुरवात केली,. ते ओरडत पळत होते. आणि सुभाष हसत होता, सुभाष ने देबू चा गळा पकडून त्याला फरफटत नेउन दरवाजावर आपटले, पुन्हा उचलून त्याला त्याचे कपडे काढून त्याच्या नरडीचा घोट घेतला, आता सुभाष च्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. समोर घडत असलेले पाहून देबू चे मित्र पण बेशुद्ध पडत होते, एकाचा तर जागीच मृत्यू झाला, बाकीचे बेशुद्ध पडले.
सुभाष ने बाकीच्या मित्रांना काही केला नाही, आणि त्याने जाण्यापूर्वी एका भिंतीवर लिहिले कि, "गरीबाला कमजोर समजू नका, तुमच्या पापाची फळे मिळाल्याशिवाय तुम्हाला मुक्ती अशक्य आहे." आणि तो तिथून निघून गेला.
त्यानंतर तो परत कधीच कोणाला दिसला नाही.
देबू च्या मित्रांनी शुद्धीवर आल्यावर, त्यांना नित बोलता येत नव्हते, हालचाली करता येत नव्हत्या, त्यांचे वागणे जरा विचीत्र्यासार्ख झाला होता. त्यांना आता पूर्ण पणे वेड लागले होते, झाला प्रकार त्यांनी कसाबसा तुटका फुटका सागितलं होता. या प्रकरणाची तपासणी झाली, पण हाती काही लागला नाही. त्या शिपाई काकांची निर्दोष मुक्तता झाली, ते आता घरी बसून असतात, त्यांचा वय आता ५० च्या आसपास आहे. त्यांनी हि कथा बर्याच लोकांना सांगितली आहे. हि कथा स्टोरी च्या रुपात अनेक वाहिन्यांवर प्रदर्शित देखील करण्यात आली होती.
*मित्रानो मनोरंजन करून घ्या फेर्तापासनी नको*
No comments:
Post a Comment