Saturday, May 31, 2014

हि घटना हैद्रबाद मध्ये २००९ साली घडली आहे.

हि घटना हैद्रबाद मध्ये २००९ साली घडली आहे. खरी समजा किंवा खोटी समजा. पण हि घडली आहे एवढ! एक soft. engg. मरणोत्तर आयुष्य काय असते हे पाहण्यासाठी कायम उत्सुक असायचा. त्याला नेहमी माणूस मेल्यानंतर त्याचे काय होते?, याची उत्सुकता असायची. या उत्सुकतेपोटी तो कित्येकदा तरी अनोळखी चिता जळताना पाहत असे व ते जाळून गेल्या तरी तिहते स्मशानात बसून राही, कि काही तरी दिसेल या आशेने. पण त्याची नेहमी निराशाच होत असे. तो ह्या उत्सुकतेच्या इतका आहारी गेला होता कि, एक दिवस त्याने त्याचे जीवन संपवले. घरात स्वतः ला बंद करून गळफास घेतला, आणि शेजारीच मरणोत्तर आयुष्य जगण्यासाठी आत्म्हत्या करीत आहे म्हणून चिट्ठी लिहून ठेवली. हि घटना घडली आणि त्याच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. हाता -तोंडाशी आलेला मुलगा असल्या फालतू वेडापायी मरणाच्या स्वाधीन झाला हे त्याच्या कुटुंबियांना न पचण्यासारखे होत. पण त्यांच्याकडे आलेला दुख: पेलावाण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. ते दुख: कसा तरी पेलवत होते. हळू हळू दुख:च वातावरण निवळत असताना, माशी शिंकावी अश काही घटना घडत गेल्या, ज्या वेळोवेळी रितेश जिवंत असल्याच दाखवून देत होत्या.. पण यावर कोणी फारस लक्ष दिल नाही. पण हे अस घडल होत. ज्याने आत्महत्या केली त्याच नाव रितेश अस होत. तो पण फेसबुक प्रेमी होता. हयात असताना तो ज्या वेळेत फेसबुक वर लॉग इन असायचा त्याच वेळेत त्याचा स्टेटस मरणोत्तर काळात देखील ऑनलाईन दिसू लागला. काहीच दिवसात त्याच्या मोबाईल फोनच बिल पण घरी येऊन पडले. हे कमी कि काय म्हुणुन रितेश च्या बहिणीला झोपेत तिच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवत आहे असे आभास होऊ लागले काही दिवसांनी सकाळी झोपेतून उठल्यावर रितेश बहिणीला घर आवरत असताना तिच्या उशीखाली एक चिठ्ठी सापडली जी कि रितेश च्या हस्त्क्षारात लिहिली होती. आणि त्य्मध्ये लिहिले होते कि, 'मी कुठेही गेलेलो नाही, मी सदा इथेच आहे, तुमच्या सोबत. तुम्ही मला घाबरू नका.आणि मी तुला खूप मिस करतो (त्याच्या बहिणीला उद्देशून).' हे वाचून त्याची बहिण खूप घाबरली तिने तिच्या आईला सगळी हकीकत सांगितली. रितेश च्या कुटुंबीयांनी ह्या घटनेची प्लोईसात माहिती देण्याचा निर्णय घेतला. ठरल्या प्रमाणे पोलिसात खबर देण्यात आली. पोलिसच शेवटी ते. हसणारच होते, पण त्यांना ह्याची विचारपूस करण त्यांना भाग होता. त्यांनी मोबाईल कंपनी कडून माहिती मागवली तेव्हा त्यांना रितेश च्या मोबाईल वरून एकाच number वर सतत फोन जात असल्याचे निदर्शनास आले, तेव्हा त्यांनी तो number ज्या व्यक्तीचा होता त्या व्यक्तीला संपर्क साधला असता माहिती मिळाली कि, टी व्यक्ती म्हणजे, रितेश ची प्रेयसी आहे, जी कि बँगलोर ला असते. रितेश बर तिचा दररोज बोलना होता, हे ऐकून पोलिसच चाट पडले. त्याने काही कळेना झाले. म्हुणुन त्यांनी तिला हैद्राबाद ला बोलावले. त्याच रात्री तिला रितेश च्या number वरून फोन गेला कि, 'उद्या ताबडतोब मला भेटायला ये.'. तिला काहीतरी गडबड आहे असे वाटले. म्हणून टी पण लगेच हैद्राबाद ला रवाना झाली. इकडे पोलीस त्यांच्या तपासाचा एक भाग म्हणून रितेश च्या घरची चौकशी करायला त्याच्या घरी गेले. आणि त्याची खोली तपासंयासाठी विनंती केली. तो गेल्यापासून त्याची खोली त्याच्या घरच्यांनी आवरून साफ करून बंद ठेवली होती. पोलिसांनी ती तपासण्यासाठी उघडली आणि त्यांचे डोळे फिरले. त्याच्या खोली मध्ये घुसताच पोलिसांना त्याच्या खोली मधील ते सगळे सामान विस्कळीत पडल्याचे सापडले. त्याच्या खोली मध्ये त्यांना कॉफी चा मग मिळाला, त्यावरून वाटत होत जणू कॉफी आताच प्यायली आहे, पोलीसाना त्याचा laptop चालू अवस्थेत सापडला, तिथेच मोबाईल फोन देखील सापडला आणि ह्या सगळ्या वस्तू रितेशच अजूनही त्या खोली मध्ये असणार अस्तित्व दर्शवत होत्या. ते पाहून पोलिस पण विचारात पडले, पण ते पेशाने शेवटी पोलिसच , त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमागे एखादी व्यक्तीच आहे जी त्याला चांगले ओळखते.(भन्नाट बुद्धी पोलिसांची, बंद खोलीत कोण असणार, त्याच्या घरातल्यांशिवाय?). पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतल्यावर अजून काही चीठ्या सापडल्या त्या तर अजून संभ्रम निर्माण करणाऱ्या होत्या. त्या चीठ्या जणू त्याने स्वतःच लिहिल्या होत्या. पोलीस त्यांची चौकशी (अर्धवट?) आटोपून गेल्यावर अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे, रितेश ची बँगलोर ला असणारी त्याची प्रेयसी अचानक येऊन त्याच्या घरी पोचली, तिला अजून काहीच माहित नव्हते. ती जेव्हा घरी पोचली तेव्हा रितेश च्या घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केल्यावर कळले कि, कालच फोन वरून रितेश ने तिला भेटायला बोलावले होते. हे ऐकून रितेश च्या घरच्यांना तर धक्काच बसला. तिचा फोन पहिला असता. तिला रितेश च्याच number वरून फोन गेल्याचे समजले. तिला रितेश च्या घरच्यांनी काही सांगायच्या आतच तिला परत रितेश च्या फोन वरून फोन आला, तिने तो उचलून कानाला लावला तोच, त्याच्या घरच्यांनी फोन speaker वर ठेवण्यास सांगितले, आणि समोरून रितेश चा आवाज ऐकून त्याच्या घरच्याना रडू आवरले नाही, व ते रडू लागले, तिला काहीच कळत नव्हते काय चाललय ते. ती रितेश ला काहीतरी बोलणार इतक्यात रितेश तिला बोला, "कि तू मला भेटण्यास चुकीच्या ठिकाणी आली आहेस, तुला मी तिथे नाही भेटणार." आणि तिला दुसरा पत्ता देऊन तिथे बोलावलं. तो पत्ता तर त्या स्मश्नाचा होता, जिथे रितेश ला जाळण्यात आले होते.. रितेश च्या घरच्यांनी तिला काही सांगायच्या आतच टी तिथून निघाली. ती त्याला भेटण्यासाठी खूप उत्सुक होती, त्यामुळे ती थेट स्मशानाजवळ येऊन पोहचली. तो रस्ता स्मशानभूमी आणि जरा मुख्य परीसरापासून दूर असल्यामुळे तिथे वर्दळ खूप कमी होती. ती थोडी बिचकत होती, पण तिला त्याला भेटण्याची ओढ होती. म्हणून ती तिथे गेली होती. सुमारे एक दीड तास झाला तरी रितेश आला नाही म्हणून तिने त्याला फोन केला आणि एवढ्यात रितेश तिला समोरून येताना दिसला, तिच्या चेहऱ्यावर हास्य खुलले. ती खुश झाली होती. रितेश आज तिला खूप खुश दिसत होता. तो तिच्याजवळ आला आणि तिला म्हटला आज मी इथे तुला घेऊन जायला आलो आहे., तू येशील का माझ्याबरोबर??? हे ऐकताच ती खुश होऊन त्याला होकार देत पुढे सरली पण आश्चर्य घडले कि टी त्याच्या आरपार गेली... आता तिला कळेना काय घडत आहे.. टी घाबरली. आणि रितेश कडे पहिले तर रितेश रुपडे पूर्ण वेगळे झाले होते, तो पहिल्यापेक्षा खूप विद्रूप दिसत होता, त्याचा घसा सुजला होता, गळयाजवळून मधेच थोडेसे रक्त टपकत होते. त्याच्या डोळे तर पूर्ण पांढरेच झाले झाले होते, आणि तो या सगळ्यात विक्षिप्त हसत होता... तिला आता कळून चुकले होते कि आपल्यामागे इथे रितेश ला काय झाले आहे... एकंदर सगळा पट तिच्या डोळ्यासमोरून गेला आणि ती तिथून जीवाच्या आकांताने धावू लागली, कुठे पळावे काही सुचत नव्हते, एकतर अनोळखी शहर होते, अनोळख्या वाटा होत्या, धावावे तर कुठे??? दिसेल त्या वाटेने ती धावत होती. रितेश देखील तिच्या मागे पळत होता आणि ओरडत होता, तू माझीच आहेस, माझीच राहणार. आणि आज मी तुला माझ्याबर घेऊन जाणार, पण टी जणू वार्याची झुंझत धावत होती... तिला कशाचेच भान नव्हते. ती धावत धावत मुख्य शहरात आली तेव्हा तिच्या जीवात जीव आला. तिला आता रसता दिसत होता. तिने सरळ रिक्षा पकडली आणि रितेश घरीई न जाता पोलीस स्टेशन ला गेली. आणि घडलेली सांगितली. पोलिसांनी तिला वेड्यात काढून तिला समजावले आणि रितेश घरी आणून सोडले, तिने लगेच घडली हकीकत त्याच्या घरच्याना सांगितली तेव्हा तिच्या घरच्यांना हि सगळा खरा वाटला आणि त्यांनी त्याच पिंडदान कार्याचा ठरवला. तेव्हा त्याच्या पिन्दादानास्ठी सगळे नदीवर गेले असता, त्याच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता, तेव्हा रितेश ची प्रेयसी बोलली कि पुढच्या जन्मी तुझी जोडीदारीण म्हणून मीच असेल. तिने असे बोलताच कावळ्याच्या थव्याने घास उचलला... पुन्हा सगळे जसे होते तसेच झाले.. तो अस्तित्वात असल्याचा आभास पुन्हा कोणालाच झाला नाही.. त्याची प्रेयसी आता पुण्यात मोठ्या हुद्द्यावर एका नामांकित कंपनी मध्ये कामास आहे... *समाप्त*




No comments:

Post a Comment