Sunday, July 12, 2015

खाडी



नमस्कार मी निकिता जाधव आपणा सर्वासाठी एक हि कथा इथे सादर करीत आहे....हि कथा एका ठिकाणाबाबत आहे... आणि एका मुलीबाबत जी अनोळखीरीत्या त्या जागी पोहोचते...व नकळत ती अनाहूत तत्सम दुष्टशक्तींना आपल्या जीवनात समावून घेते... मी त्या ठिकाणांच नाव सांगून त्याची बदनामी करण्याची इच्छा नाही ठेवत म्हणून ते नाव गुपितच राहील....एक खाडी होती ती आणि अजून पण आहे... ती खाडी दिवसा पहायला गेली तर , खूप सुंदर आणि रम्य वातावरण असलेली... जिकडे बघाव तिथे झाडीच-झाडी आणि त्यातच पाऊस मग ती खाडी अत्यंत हिरवीगार आणि सुंदर दिसायची....तेथे मन खूप प्रसन्न व्हायचे .... तिथे वाहणारी एक खळखळ छोटीशी नदी, तेथील पक्ष्यांचा किलबिलाट ...पण म्हणतात ना...प्रत्येकाचे एक गुपित असत तसच त्या खाडीचे देखील होते... एक अमानवीय गुपित....सकाळी सुंदर दिसणारी ती खाडी ... सायंकाळ होत होत .. आपले रूप बदलायची आणि रात्र तिच्या सोबतीस असताना तेव्हा तर ती खाडी एक उदास खंडर वाटायची... पण उदास आणि धीरगंभीर अशी कि, जणू काहीतरी ती लपवण्यासाठी प्रयत्न करू पाहते ती दिवसा आणि रात्री, ती त्या लपवलेल्या गोष्टीना खुले सोडते....सर्वत्र काळोखच काळोख असायचा त्या ठिकाणी... जणू उजेडाच राज्य येऊन त्या खाडीमध्ये संपते... अतृप्त आत्म्यांची आसरा होती ती खाडी... त्या खाडीपासून काही एक अंतरावर वस्ती आहे...तिथले स्थायिक लोक असे मानायचे कि त्यांचे जवळचे सगेसोयरे जे मृत पावले आहेत ते....पिशाच बनून त्या खाडीमध्ये सामावले जायचे...त्यांचा अतृप्त आत्मा त्या खाडीत फिरायचा... आणि जो कोणी एखादा अनोळखी व्यक्ती किवा नवीन कोणी हि त्या खाडीजवळ जाई तेव्हा तो तिथेच नाहीसा होई... त्या खाडीची तेथील वस्तीच्या लोकांना प्रचीती व्हायची... म्हणून त्या लोकांपैकी कधी कोणी तिकडे फिरकत नसे....रात्रीच काय तर दिवसादेखील पण ते लोक तेथे जात नसत....आधीकाळी त्या वस्तीतील लोक...मासे पकडण्यासाठी तरी तेथे जायचे पण आता मात्र तिकडे त्या खाडीकडे कोणीच फिरकत नव्हत... पण आता खूप वर्ष उलटून गेले होते त्या वस्तीच्या ठिकाणी आता...एक सुंदर असे टावर झाले होते...त्यामध्ये काही जुने लोक तर काही नवीन राहायला आले होते...जे जुने राहणारे लोक होते त्यांना त्या त्या खाडीबद्दल माहिती होती... पण जे नवीन होते त्यांना काहीच माहित नव्हते.. आणि त्या टावरमध्ये काही दिवसांनी एक कुटुंब तेथे १२व्या मजल्यावर रहायला आले होते...त्यांना ती जागा खुप आवडली...त्या कुटुंबामध्ये होती वर्षा नावची मुलगी, तिला तिचे आई बाबा आणि तिचा एक मोठा भाऊ होता...असेच हे छोटेसे कुटुंब तेथे त्या घरात राहायला आले होते...सर्वांनी घराची पाहणी केली त्या घरात तीन रूम होत्या वर्षाने आपल्या स्वतः करिता सोयीस्कर आणि खिडकीतून बाहेरील सुंदर दृश्य दिसणारी एक रूम निवडली....आणि त्यांनी आपले घर हि व्यवस्थितपणे बसवले.... वर्षा खूपच खुश होती....कारण तिच्या आवडीची जागा तिला भेटली होती...असेच खिडकीतून बाहेर लक्ष घालत तिची नजर एका ठिकाणावर खिळली.... जणू ती मंत्र मुग्ध होऊन ते पाहत होती.... ती हिरवळ जागा ते खंडर दिसले.... आणि ती जागा म्हणजे " खाडी ! " पण वर्षा त्या खाडीच्या सौंदर्यास वरवरून भुलली होती... पण आत त्या खाडीतील ते काळे रहस्य तिला माहित नव्हते...पुढे घडणाऱ्या घटनाचा तिने स्वप्नात देखील विचार नसेल केला...वर्षाचे आई बाबा कामाला जायचे आणि वर्षा कॉलेजला आणि तिचा भाऊ प्रथमेश जॉबला जायचा.. सर्वात लवकर घरी येणारी हि वर्षाच होती....म्हणून ती घरी देखील एकटी असायची...तिला घरी एकट राहण अस कंटाळवान वाटायचं....तिला जोडीला कोणी नव्हत...ती रोज एकांतात असायची...आणि आपल्या खिडकीतून बाहेर त्या खाडीचे मोहक रूप टेहाळत बसायची...आणि त्यातल्या त्यात तिला भुतांच्या गोष्टी वाचण्याचा अतोनात छंद होता..तिला भूत हे काय असत ? या बद्दल तिला उत्सुकता असायची... पण तिने भूत कधी पाहिलेल नव्हत...एके दिवशी सायंकाळी जेव्हा सर्वजण घरी आले.. त्यांचे जेवण वगेरे उरकले... वर्षाने आपल्या आईच्या हाताखाली मदत केली... व सर्व काम करून ती तिच्या नियमितपणे खोली मध्ये आली...तिच्या मनात एक विचार आला ... कि , दिवसा इतके मन मोहून टाकणारी हि खाडी रात्रीच्या वेळी कशी दिसत असेल बर या विचाराने तिने खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले... तेव्हा ती खाडी... अत्यंत विद्रुपीकरण झालेली विचित्र पिशाच्चरुपी वाटत होती....सर्वत्र काळोख होता...पण त्या खाडीचे काही पडसाद स्पष्ट दिसत होते...मधेच कुत्रे भुंकत होते....पावसाचे वातावरण असल्याने.... ढग दाटून आले होते...थंड गार वारा वाहत होता... आणि अश्यातच वर्षा त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर त्या खाडीला पाहू लागली ...तिला पाहताच वर्षाच्या मनात एक उदासीनता जाणवली तिला.. एक भीती दरारा निर्माण झाला वर्षाच्या मनात...आणि तेवढ्यात इकडे वर्षाच्या रूममध्ये कोणीतरी प्रवेश केला होता... त्याचे पाउल दबकत दबकत ...वर्षाच्या दिशेने येत होते....वर्षाच्या खोली मध्ये तेव्हा एक अंधारसा होता.... पण नंतर तिच्या मागून कोणीतरी आले.... आणि "व....र्षाSSSS.. " असा आवाज येत एक हात वर्षाच्या खांद्यावर पडला...वर्षा दचकली.. खांद्यावर पडलेला तो हात तो आवाज त्या थंडगार वातावरनामध्ये देखील.. वर्षांच्या अंगास घामाच्या धारा लागल्या तिची मागे वळून पाहण्याची हिम्मत होईना....तरीही घाबरून तिने मागे पाहिले... खोलीमध्ये अंधार होता....वर्षाने नीट निरखून पाहिले तर तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रथमेश तिचा मोठा भाऊ होता... त्यानेच तिला वर्षा अशी हाक मारली .... वर्षा आपल्या भावास पाहून आणखीच चिडली....कारण त्याने तिला एकांतात येऊन घाबरवल होत....वर्षाला असे घाबरलेले पाहून प्रथमेशला हसू सुटले....त्याच हसण खूप चालू होत. पण वर्षाचा रागवलेला चेहरा पाहून त्याने तिची माफी मागितली....आणि पुन्हा अस बोलणार नाही हे देखील म्हणाला...प्रथमेशने तिला होऊन विचारले "काय ग वर्षा ? काय तू एकटक त्या खाडीकडे बघत असतेस ? " इतकी काय हरवून गेलीस विचारात कि जे मी तुझ्या रूममध्ये आलो हे देखील तुला समजले नाही... तेव्हा वर्षा आपल्या भावास बोलू लागली ..."कि हि खाडी अरे सकाळची किती सुंदर दिसते आणि आता बघ ना तिला...किती भयंकर रूप आहे तिचे...." प्रथमेश तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता...तीच बोलून झाल्यावर तो बोलला "कशी बघत बसते त्या खाडीकडे नको अस बघत जाउस उगाच नको ते विचार करते , आणि घाबरत जाते " असे बोलून प्रथमेशने वर्षाला झोपायला सांगितले....व तो तिला गुड नाईट बोलून झोपायला गेला... आणि वर्षा तिला तर झोपच येत नव्हती....तिला खूप उत्सुकता जाणवू लागली होती... आता त्या खाडी बद्दल जाणण्याची तोच विचार करीत करीत वर्षा झोपी गेली आणि रात्री अचानकच तिला...एक आवाज येऊ लागला...जणू कोणी श्वासासकट वर्षाचे नाव फुंकारत आहे हे तिला जाणवले ,,"वर्षाSSSSS ...... त्या आवाजाने वर्षा खडबडून जागी झाली... तिला वाटले भास झाल असेल, आपल्याला म्हणून ती तशीच झोपी गेली... सकाळी उठून वर्षा तिची सर्व कामे आटोपून नाश्ता करण्यास बसली...पण ती टेबलावरील असलेल्या पोह्यांना चिवडत रात्री झालेल्या तिच्या भासाचा विचार करीत होती.....हे तिच्या आईने बघितले कि तिची मुलगी काही विचारात आहे.... वर्षाच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट होते....आणि ते तिच्या आईने हेरले होते...त्यावर तिची आई तिला म्हणाली "वर्षा बाळा मी तुला केव्हाची पाहतेय मगास पासून तू कसल्यातरी विचारात आहेस ? काय झाले आहे ? " वर्षा आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवत "काही नाही ! आई, काही नाही. "असे बोलून ती तिचा नाश्ता संपवून कॉलेजला जायला निघाली....आणि घराबाहेर पडली ... जाता जाता , तिच्या बिल्डिंगच्या खालच्या आवारात एक वृद्ध माणूस तिला दिसला... तो माणूस बराच वृद्ध होता.. असा वाटत होत कि तो तिथलाच एक स्थाईक आहे...वर्षाला वाटले त्या वृद्ध माणसाला त्या खाडी बद्दल काही माहित असेल तर आपण विचारून पहाव विचारायला काय हरकत आहे ? असे म्हणून ती त्या माणसाकडे वळली व त्याच्या जवळ गेली तो आपले काहीतरी काम करत होता.... आणि वर्षाने त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारले " नमस्ते आजोबा , मी वर्षा " त्यावर त्या आजोबाने वर्षाकडे एका अनोळखी नजरेने पाहिले... आणि हुंकारला "हम्म.." त्यावर वर्षा पुढे बोलू लागली "आम्ही इथे नवीन राहायला आलो आहोत असे वाटत आहे कि तुम्ही इथे खूप वर्ष झाली राहत आहात ? "त्यावर तो वृद्ध व्यक्ती उत्तरला "हो मी या नजीकच हे टावर बनण्यापूर्वी पासून राहतोय " वर्षा पुढे म्हणाली "हो का ? बर आजोबा तुम्ही इथे जुने आहात म्हणजे आजूबाजूचा परिसर तुम्हाला नक्कीच माहित असेल ...कसा आहे ते ?" त्यावर आजोबा आपले काम थांबवत वर्षाकडे पाहू लागले...आणि म्हणाले "हो माहित आहे , पण तू का हे विचारतेयस ? " वर्षाने त्यांना ... "नाही आजोबा असच, तुम्हाला त्या खाडी बद्दल माहित असेलच मग तर ...? " वर्षाच्या तोंडून खाडी हा शब्द ऐकताच क्षणी आजोबांच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले...व ते चिंताग्रस्त दिसू लागले...हि कोण मुलगी आहे ? आणि खाडी बद्दल का विचारतेय हि मला ?" पण त्या आजोबांनी वर्षाला त्या खाडीबद्दल सांगण्यास टाळाटाळ केली ...पण आपली वर्षा जिद्दी होती .. ती ऐकनार्यातील नव्हती तिने त्या आजोबाना सांगण्यास प्रवृत्त केले ...आणि असे करत आजोबा मानले व आजोबांनी वर्षाला खाडीबद्दलचा एक न एक इतिहास सांगितला.... तेव्हा वर्षाला कळून चुकले कि ती खाडी पछाडलेली होती....तेथे अतृप्त आत्म्यांचा वास आहे... आणि दर आमावस्या पौर्णिमेला त्या खाडीमध्ये ... विचित्र हालचाली होतात.... हे सर्व ऐकल्यानंतर वर्षाचे डोळे मोठे झाले.... आणि एक भीती तिच्या मनात दाटून आली...तिचे अंग शहारले... ती आजोबापासून निघून आली आणि कॉलेजमध्ये आली पण लेक्चर मध्ये तिचे काही मन लागेना वर्षा घरी आली सायंकाळ झाली होती सर्व जन आले होते सर्वांचे जेवण झाली होती ... तिनेदेखील सर्व कामे आटोपून आपली रूम गाठली....आणि त्या खिडकीतून सगळीकडे बघितले ... आकाशात चंद्र दिसत होता...त्याचा उजेड सर्वत्र पसरला होता...आणि चांदण्या चमचम करीत होत्या.. आणि ते पाहताच वर्षा कॅलेंडरवर पहायला धावली आणि तेथे तरीखेच्या खाली ठळकपणे पोर्णिमा असे लिहले होते...वर्षाला लगेच आठवले ....त्या वृद्ध माणसाने काय सांगितले होते... कि पोर्णिमा आणि अमावस्याच्या रात्री त्या खाडीत हालचाली होतात.... वर्षा आपल्या खिडकी कडे धावली...बाहेर कुत्रे त्या खाडीच्या दिशेने पाहत भुंकत होते....वर्षाला बाहेर फक्त चंद्र प्रकाश दिसत होता.. त्या खाडीकडे काही हालचाली नव्हत्या... ती परत आपल्या बेडवर आली .. आणि भुताच्या गोष्टी वाचण्यात गुंग झाली....बराच वेळ उलटून गेला.. आणि अर्ध्या झोपेत असलेल्या वर्षाला ... घड्याळातील टोल ने उठवले ...तिने पहिले तेव्हा घड्याळात १२ वाजले होते....वर्षा जागी झाली आणि उत्सुकते पोटी .. ती आपल्या खिडकीजवळ आली...तिने बाहेर त्या खाडीकडे पाहिले पण तिला बाहेर पाहून निराशाच भेटली...फक्त कुत्रे भुंकण्याचा आवाज तिला येत होता...तिला वाटू लागले .."काही नाही वाटत तिथे ते वृद्ध आजोबा उगाचच घाबरवत होते...वर्षा खिडकी पासून माघारी फिरणार तितक्यातच तिला खाडीत काहीतरी हालचाल होताना दिसले ...वर्षाला त्या अंधारमय खाडीमध्ये एक वेगळच दृश्य दिसू लागले...एक लहानसा उजेड होता ..जो त्या खाडीमध्ये हलताना तिला दिसत होता ...दिवा होता तो..पण थोडा पुढे जाऊन तो एका नदीजल बंद पडला....त्या नदीत चंद्र प्रकाश पडला होता उजेडाने ती नदी साफ दिसत होती..वर्षाला अजून एक हालचाल तेथे दिसली ..त्या नदीत ..त्या नदीतून काही सावल्या बाहेर पडू लागल्या...आणि हवेत तरंगू लागल्या जणू काय त्या खाडीमध्ये त्याची त्या प्रेतात्म्याची जत्राच भरलेली होती....तेव्हा त्याच क्षणी वर्षाला परत जाणवले कि आपल्या मागे कोणीतरी आहे..त्याची तिला जाणीव झाली...तिला वाटले प्रथमेश दादा आहे पण , वर्षा त्या समजाने मागे वळून बघते तर मागे कोणीच नसत. असते तर एक भयान शांतता..वर्षा खूप घाबरलेली असते...आणि तशीच ती घाबरत तिच्या बेडवर येऊन झोपते...किती झाले तरी तिला झोप येत नसते तिला तिच्या डोळ्यासमोर ते खाडीचे दृश्य दिसू लागते...पण काही वेळ उलटल्यानंतर तिला झोप लागते.. सकाळ होते .. पण सकाळ झाली तरी वर्षा तिच्या रोजच्या वेळेत उठत नाही...तिचे आई बाबा आणि तिच्या भावास वाटते कि वर्षा का नाही आलीय..उठली का नाही आज? तेव्हा ते वर्षाला बघायला जातात..कि काय झाले तिला तिच्या रूममध्ये जाऊन बघतात.तर वर्षा अजून झोपलेली असते... तिची आई तिच्या बाजूला येऊन बसते..आणि तिला उठवायला बघते.. वर्षाला स्पर्श करताच वर्षाच्या आईला कळते कि वर्षाच अंग पोळतय ...तिला ताप आलाय ...तापेमुळे तिचे बाबा लगेच डॉक्टरला बोलवून घेतात आणि तिला तपासतात व औषध गोळ्या देऊ करतात ..वर्षा तशीच बेशुद्धावस्थेत असते डॉक्टर तिच्या घरच्यांना काळजी घ्यायला सांगतात...आणि निघतात वर्षाची आई काळजीत पडते कि काय झाले आहे वर्षाला? आणि तिची आई वर्षासाठी देवाकडे प्रार्थना करते "देवा माझ्या मुलीला बर करा." ..काही वेळ जातो वर्षा शुद्धीवर येते. वर्षाला काहीस बर वाटत असत मग ती थोड खाऊन पुन्हा आराम करत असते ...तेवढ्यात प्रथमेश दादा तिला भेटायला येतो...वर्षाला काहीसे बरे वाटत असते म्हणून ती आपल्या भावास काही सांगायचे ठरवते पण तो तिला तीच न ऐकता आराम करण्यास लावतो...आणि असा काही विचार करू नकोस हा सल्ला देऊन जातो..पण वर्षा गप्प बसणारी नसते..ती विचार करते कि आपण त्या खाडीत जाऊन बघायचंच कि काय हे ते तिथे काय दिसले आपल्याला .... एखादे वेळ तिथे माणसे पण असू शकतील न म्हणून आपण जाऊन पहायचच तिने तिच्या तापेचा देखील विचार नाही केला..वर्षाने दुसऱ्या दिवशी तेथे जाण्याचा निर्णय घेतला..आणि ती कॉलेज टाईमच्या वेळी निघून जाते खाडीत तेथे जाताच सकाळची मोहून टाकणारी ती खाडी तिला दिसते...खाडीचे ते रूप ती हिरवळीवर जणू फिदाच होते... तिचे ते मोहक सुंदर दृश्य तिला हरवून टाकते ...संमोहित करते तिला...तेथूनच हवेत उडणारे ते पांढरेशुभ्र बगळे ते वातावरण ती थंड हवा ...सगळ तिच्या मनाला मोह्ण्यासाठी माफक होत..सगळीकडे उंच उंच झाडी होती... तरीही थोडे आत जावे म्हणून ती आत मध्ये गेली काही अंतरावरती तिला एक झाडाला झोपाळा दिसला .... हि गोष्ट विचित्र होती कान अश्या या वीरान जागेत कोण झोका बांधून खेळत असेल ....ती तरीदेखील न भिता झोपाळ्याजवळ जाते .. आणि झोपाळ्यावर बसते व हळूहळू झोके घेऊ लागते...तिला तेव्हा खूप आनंद होतो... जसे जसे ती झोके घेऊ लागते.. तसेच तिची नजर एका ठिकाणी खिळते ... एका झाडाच्या खोडाजवळच एक चमकदार वस्तू पडलेली असते... लगबग आपल्या तळहाता इतकी.. आणि गोल अशी. वर्षा झोपळ्यावरून उतरते आणि त्या वस्तूकडे जाऊ लागते .. ती जवळ जाते आणि ती पडलेली चकमदार वस्तू हातात घेते....आणि ती पायातील पैंजण असते.. खूपच चमकदार चांदीची ...वर्षा जेव्हा ती पैंजण हातात घेते त्याचक्षणी तेथील वातावरण बदलू लागते...काळे ढग पसरू लागले... एक थंडगार वाऱ्याच्या झुळुका वर्षाला शिवून जात होत्या ... त्याला घाबरून वर्षा तेथून पळाली आणि आपल्या घरी पोहोचली....तेथेच मध्ये एका रस्त्यात त्या आजोबांनी वर्षाला धावताना पाहिले...वर्षा तशीच आपल्या घरात आली.. आणि कोणाला काही न सांगता आपल्या खोलीत शिरली.. तिला तेव्हा लक्षात आले तिच्या हातात काही तरी आहे तिने मुठ्ठी उघडून पाहिली तर त्यात ती पैंजण होती.. वर्षा दमली होती... ती आधी पाणी प्यायली..मग शांत होऊन आपल्या जागेवर बसली.. व ती पैंजण पाहू लागली...तिने ती तिच्या पायात घातली आणि प्रथम तिने वाजवून पहिली.. "छ्न्न्न ...छ्न्न " आणि नाचू लागली तिचे नाचणे बेताल होते.. ती थांबेना झाली होती... पण अचानक ती भानावर आली व थांबली...आणि तिने ती पैंजण ठेवून आतमध्ये ड्रोवरमध्ये दिली... आणि बाहेर सर्वासोबत परत जेवण करून आली..आणि तिने पहिले कि ती पैंजण बाहेरच होती.. ती तिच्या जागी नव्हती...ती जमिनीवर होती.. वर्षाने त्याकडे थोडे दुर्लक्ष केले आणि ती तशीच ठेवून दिली तिला वाटले पडली असेल आपल्या कडून ठेवताना.. असे म्हणून ती झोपली...आणि पण आज ती खाडीला पहायचे विसरून गेली दमली असल्याने ती लवकरच झोपी गेली...वेळ झाला होता... वर्षा गाढ झोपेत होती तरी देखील.. तिच्या कानात काहीतरी आवाज ऐकू येत होता... एक "छ्च्ह ..." असा ती त्या आवाजाने थोडीशी जाग ली आणि पुढे तो आवाज तिला स्पष्ट पणे ऐकू येऊ लागला ... "छन्न्नSSS " त्या आवाजाने वर्षा आता खडबडून जागी झाली... तो आवाज तिला एकदाच आला होता... आणि तो सुद्धा तिच्याच खोलीमधून..वर्षा खडबडून जागी झाली तेव्हा तो आवाज बंद झाला होता.. तिच्या खोलीमध्ये सर्वत्र अंधार होता...म्हणून काही आजुबाजूचे दिसत नव्हते फक्त खिडकीमधून चंद्रप्रकाश आत येत होता तोच उजेड..त्यात आपल्या खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये शितलला एक प्रतिमा दिसली....जी तिच्या खोलीच्या एकदम कोपऱ्यात उभी होती... त्या संबंधीत प्रतिमेची काही हालचाल होत नव्हती...अंगावरती पांढऱ्या वस्त्राचा पेहराव होता... आणि चेहरा पूर्ण काळोखात बुडालेला...चेहरा अंधारात होता कि केस होते ते जे चेहऱ्यावर आलेले आणि चेहरा झाकत होते...वर्षा ते पाहतच बसली...तिचे मोठे डोळे त्या प्रतिमेलाच घुरत होते...काय आहे ते ? तितक्यात त्या प्रतिमेची हालचाल होत आहे असे वर्षाला दिसले.. वर्षाने आपले .. पांघरून घट्ट आपल्या चेहऱ्यावर ओढून धरले... तेव्हा हळू हळू वर्षाच्या कानी एक आवाज पडू लागला ... "छन्न ... छन्न ...छन्न " जणू त्या संबंधितच्या पायात तेच पैंजण आहेत...जे वर्षाने त्या खाडीमधून आणले होते... वर्षाने पांघरून ओढून घेतलेले आणि तो आवाज आता जोरजोरात येत होता ... ती वर्षाच्या जवळ येत होती.. खूप जवळ अत्यंत जवळ....आली होती ती..ती येऊन वर्षाच्या बेडजवळ ठेपले तिचा वर्षाच्या बेडला एक धक्का बसला आहे असे वर्षाला जाणवले.. वर्षाने आपले पांघरून काढून पाहण्याचा निर्णय घेतला.. आणि तिने हळू हळू आपले पांघरून काढले...व बेडच्या बाजूस पाहिले.. पण तिथे कोणीच नव्हते.. "हुश्ह्ह .....! " असे म्हणत तिने समोर पहिले तर ....वर्षाच्या चेहऱ्यासमोर तिचा चेहरा होता... अत्यंत भयंकर ...तिचे आ वसलेले ते तोंड आतील काळी जीभ ते काळपटलेले दात ..वर्षा ते पाहून जोरजोरात किंचाळू लागली...ते पिशाच्च वर्षाच्या शरीरापासून काहीस्या अंतरावर हवेत तरंगत होते.. त्याचे केस ... वर्षाच्या चेहऱ्यावर उलटले होते...वर्षा किंचाळली... तिच्या किंचाळनयाने घरातील सर्वांना जाग आली ..."काय झाले ? काय झाले ?" असे म्हणत सर्व जन वर्षाच्या खोलीत धावत आले...वर्षा घामाघूम झाली होती...तिचे ओठ थरथर करीत होते... ते प्रेत आता तिच्या ध्यानी मनी .... आणि मुख्य म्हणजे त्यांच्या घरात आता त्याने प्रवेश मिळवला होता....आता खरा सुरु झाला अनर्थ ..वर्षाच्या आईने तिला जवळ घेतले आणि समजावू लागली ... तिला त्यांनी पाणी दिले.. तेव्हा कुठे तिला शब्द फुटले...आणि ती बोलू लागली ... "भू...भूऊ...भूत आई भूत आहे इथ ..." त्यावर प्रथमेश पुढे आला नि म्हणाला "हे बघ शांत हो..तुला वाईट स्वप्न पडल असेल म्हणून तुला तसे दिसले असेल ...शांत हो आणि दिवस भर ते भूताच्या गोष्टी वाचतेस त्याने दुसर काय होणार..." त्यावर केविलवाण्या स्वरात म्हणाली "दादा खरच रे ...मी पाहिलं आहे ..इथेच माझ्या चेहऱ्यावर होत ते .." असे बोलत वर्षाला रडू फुटले...आणि ती हुंदके देत रडू लागली...वर्षाचे बाबा तिच्या जवळ येऊन तीला शांत करीत होते...तेव्हाच प्रथमेश चिंतेत होता... त्याची नजर तेव्हा खाली गेली आणि त्याने पहिले तिथ एक वृद्ध माणूस वरती त्याच्याकडे पाहत होता.. प्रथमेशला समजले नाही "तो कोण होता इतक्या रात्री ..आमच्या घराकडे का पाहतोय.." वर्षा शांत झाली होती... आणि पुन्हा ती झोपी गेल्यानंतर सर्व आपापल्या खोलीत परतले... सकाळ झाली होती.. वर्षाला परत ताप आलेला होता....प्रथमेश आता विचारात होता... आपली बहिण बरेच दिवस झाले असे का वागतेय ? तेव्हा त्याच्या अचानक लक्षात आले तो वृद्ध माणूस जो रात्री त्यांच्याकडे पाहत होता...प्रथमेश तडक उठला ....आणि खाली आला.. त्याने बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केली...व इकडे तिकडे विचारत त्याला त्या वृद्धाचे घर भेटले...आणि तो एका जवळच्या आवारात पोहोचला तेव्हा..तेथे एक छोटेशे घर होते.. प्रथमेश त्याचे दार ठोठावण्यास पुढे झाला ..पण तितक्यातच त्याला आतमधून एक आवाज आला ... "दरवाजा उघडाच आहे आतमध्ये ये..." प्रथमेश चमकला.. त्याने दार आत ढकलले व आतमध्ये आला...प्रथमेश काही बोलणार तितक्यात ते वृद्ध त्याला थांबवत म्हणाले ..."येताना पाहिलं होत मी तुला ...माझ्या घराकडे.. ये बस .. माहित आहे मला तू कशासाठी आला आहेस ?" तुझी बहीण भेटली होती मला तू तिचे ऐकायला हव होतस रात्रीचा प्रकार सगळा तिने खरा सांगितला आहे.... " प्रथमेश उद्गारला "म्हणजे ? म्हणायचं काय आहे तुम्हाला? कि वर्षाने खरच पहिले " त्यावर ते वृद्ध उत्तरले..."मी तिला टाळले होते त्या खाडी बद्दल सांगण्यास पण हट्टी आहे ती खूप ..गेली तिथ आणि घेऊन आली एक अनाहूत शक्ती सोबत..." त्यावर प्रथमेश म्हणाला ..."तुम्ही कस हे सांगू शकता ..? जर हे खर आहे तर सिध्द करा चला माझ्या घरी ..." असे म्हणल्यास ते वृद्ध देखील प्रथमेश सोबत येण्यासाठी तयार झाले... वाटेत जात जात ते दोघे बोलत होते... प्रथमेश त्यांना विचारत होता.. तुम्ही म्हणताय ते खर असेल तर माझ्या बहिणीच्या जीवास धोका ? " प्रथमेशचे वाक्य तोडून ते म्हणाले " हो आहे तिच्या जीवास धोका मी अश्या बऱ्याच केसेस पहिल्या आहेत आणि बऱ्याच जणांना यातून सोडवल पण आहे ... आता पाहूयात तुमच्या घरी काय आले आहे ते ?" असे बोलत बोलत ते घरी पोहोचले.... घरी आल्यानंतर वर्षाच्या आई वडिलांचे गोंधळने स्वभाविक होते.. कोन एक अनोळखी माणूस आपल्या घरात येऊन त्यांना त्यांच्या घरात असलेल्या अमानवी ताक्ती बद्दल सांगिलतल्यास कोणाचा देखील विश्वास बसणार नाही....तरीदेखील प्रथमेशने त्यास आणले होते म्हणल्यास काही तरी तथ्य असेलच . म्हणून वर्षाच्या आई वडिलांनी तात्पुरता का होईना विश्वास दाखवला...तसे त्या वृद्ध माणसाने आपल्या समवेत काही सामग्री देखील आणलेली होती....त्याने प्रथमतः बसून सर्वांशी चर्चा केली .. "आणि त्यांनी सांगतिले ..हे पहा ..तुमच्या मुलीने अस काही वाईट पाहिलं असेल किवा तुमच्या घरामध्ये तस काही असेल तर आपल्याला लवकरच कळेल..पण एक गोष्ट आहे ती प्रेतात्मा आपल्या पैकी कोणालाही वश मध्ये करू शकते... किवा ती वर्षाच्या शरीराचा लपण्यासाठी आधार घेऊ शकते.... "वर्षाचे आई बाबा यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते परंतु मुलीच्या जीवाचा प्रश्न होता...म्हणून त्यांनी ते मान्य केल.. सर्वजन वर्षाच्या खोलीत आले.. वर्षा तेव्हा झोपलेली होती... त्या आजोबांनी आपल्या झोळीतून एक काळी मेणबत्ती काढली... आणि व ती वर्षाच्या बेडच्या एका कोपऱ्यावर पेटवून ठेवली असे करत त्यांनी चारी बाजूला चार मेणबत्त्या लावल्या चारी काळ्या रंगाच्या... व त्यांनी सांगितले देखील... जर ती आत्मा सध्या वर्षाच्या शरीरात असेल तर या मेणबत्तीच्या क्षेत्राबाहेर ती पाउल नाही टाकू शकणार...पण ती वर्षाला नक्की हानी पोहोचवायचा प्रयत्न करेल...ते बोलतच होते कि तितक्यात... वर्षाचे सर्व केस हवेत आले .जणू कोणी मुठ्ठीत धरले असावे ..आणि तसेच तापाने फणफणत असलेली वर्षा तिला कोणीतरी केसांना धरून हवेत उचलले होते... वर्षा मदतीसाठी हात देखील वाढवू शकत नव्हती...ती हवेत होती... तिच्या डोळ्यातून घळघळ...पाणी आले होते..वर्षाच्या डोळ्यात पाणी होते वर्षाला जाणवत होते कि आपल्या शरीरावर कोणत्यातरी अतृप्त आत्म्याचा ताबा झाला आहे वर्षाला खूप त्रास होत होता ती आई बाबा ना हाका मारत होती कि मला वाचवा पण तिच्या घरचे काहीही करू शकत नव्हते असाय होते. तेव्हा लगेच त्यांच्या घरी आलेल्या आजोबांनी वर्षाच्या अंगावर गौमुत्र टाकले तसेच वर्षाच्या अंगात असलेले ते पिसाच ओरडू लागले तेव्हा वर्षाचा ते रूप पाहून घरचे तिच्या खूप घाबरून गेले होते वर्षाचे ते लाल डोळे आणि चेहरा तिचा पूर्ण सुकून गेला होता आणि ते गौमुत्र तिच्या शरीरावर टाकल्याने तिच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या आणि तिचे हात पाय वाकडे झाले होते. केस हि तिचे पासले गेले होते वर्षा आता आक्रमक झाली होती पण वर्षा कोणाला हि ईजा करू शकत नव्हती कारण कि त्या आजोबांनी तिच्या बेड भोवती लावलेल्या काळ्या मेणबत्ती मुळे हे वर्षाला समजतात कि आपण ह्या मेणबत्ती मुळे ह्या लोकांना काही करू शकत नाही म्हणून वर्षात असलेले पिसाच वर्षाला खूप त्रास देऊ लागला आणि ओरडू लागला कि मी नाही सोडणार ह्या मुली ला जीव घेणार तुम्ही किती प्रयत्न करा मी नाही सोडणार ह्या मुली मी ह्या मुलीला मी माझ्या सोबत घेऊनच जाणार बघू तुम्ही मला कसे थांबवणार आणि खी खी खी हसू लागले हे सर्व ऐकून वर्षाच्या घरच्या च्या पाया खालची जमीनच सरकली वर्षाच्या घरचे त्या आजोबांच्या पाया पडू लागले आणि म्हणू लागले कि वर्षाला वाचवा बाबा वर्षाची मुक्तता करा त्या पिसाच पासून आम्हाला आमची मुलगी हवी आहे वर्षा तोपर्यंत हवेत तरंगत होती आणि डोळे फिरवात होती आणि स्वताला बेड वर आपटून घेत होती स्वताचे केस ओडत होती वर्षाच रूप खूप भयानक झला होत असा वाटत होते कि ते पिसाच आता काही वर्षाला सोडणार नाही ते तिला घेऊनच जाणार तेवड्यातच त्या आजोबांनी जोर जोर जोरात हनुमान चाळीसा बोलायालासुर्वात केली आणि हेय ऐकून वर्षात असलेला पिसाच जोर जोरात किंचाळायला लागल ते पिसाच एवढ जोरात किंचाळत होत कि अस वाटत होते कि कानाचे पडदे फटतील अस वाटत होते. तरी हि ते आजोबा हनुमान चाळीसा बोलन काही बंद करत नव्हते ते सुरूच होत तेव्हा वर्षात असलेल पिसाच वर्षाला खूप वेदना देऊ लागल ते पिसाच बाहेर जाण्यासाठी धडपडू लागला पण आजोबांनी लावलेला ल्या मेणबत्ती मुळे बाहेर हि येत येत नव्हते त्याला तसेच आजोबांनी हनुमान चाळीसा बोलता बोलता त्या पिसाच वर गौमुत्र टाकू लागले आणि हे सर्व असह्या होऊन ते पिसाच वर्षाच्या शरीरातून बाहेर आले आणि अचानक गायब झाले. ते पिसाच वर्षाच्या शरीरातून बाहेर येताच वर्षा धाड करून बेड वर कोसळली आणि बेशुद्ध झाली. आजोबांनी प्रथमेश ला तिच्या पायात असलेले पैजण कडून घेयला सांगितले आणि ते पाण्यात विसर्जन करायला सांगितले. वर्ष आता त्या पिसाच पासून मुक्त झाली होती. वर्षाच्या आई बाबांनी वर्षाला जवळ घेतले आणि वर्षाला जाग करण्याचा खूप प्रयत्न केला तशी वर्षाला शुद्ध आली होती वर्षाला काही आठवत नव्हता वर्षाची शुद्ध येतात घरचे तिच्या खुश झाले. मग तिच्या घरच्यांनी आजोबांचे हात जोडून आभार मानले. आजोबांनी वर्षाच्या हाताला एक धागा बांधायला दिला आणि बोलले कि हा धागा वर्षाच रक्षण करेल आणि एक महत्त्वाचा सल्ला दिला कि हे घर जमेल तेवड्या लवकर सोडून द्या. आजोबांचं बोलना ऐकून वर्षांच्या बाबांनी होकारार्थी मान हलवली.

जन्नानी हा प्रकार जादुटोण्याचा दिसतोय



मी अविनाश गुरव आज तुमच्या साठी घेउन आलोय माझ्या मित्रांचे अनुभव
कथा आहे सासवड मधली... माझा मित्र सुभाष हा वर्षातून एकदाच मुंबई वरुण त्याच्या कुटुंबा सोबत गावी सासवड ला जात असत त्याचा मोठा भाऊ कैलास हा ही गावी गेला असताना असाच एक दिवस गावी तो त्यांच्या चार पाच मित्रान सोबत बसला असताना त्यांच्या भुतांच्या कथा हा विषय चांगलाच रंगात आला होता न राहून कैलास बोलला " ये...बंद करा तुमचे हे असले फालतू विषय, भुत बीत काय नसते " एक मित्र म्हणाला " तुला काय माहित आहे तू राहतोस तिकडे मुंबई मधे जिथे रात्र दिवस लाइट असते इथे सात वाजले की अंधार पडतो न ही भुत बाहेर पडतात" कैलास हसत हसतच बोलला " सात वाजताच भुत दिसतात तुम्हाला ,,, ज्या मायला लवकरच बसता तुम्ही " (दारू पियाला बसतात असे म्हणायचे होते त्याला ) दूसरा मित्र म्हणाला " लांब कश्याला जायचे आपला जुना पुल हायना...तो ओड्या वरुण जातो बाजार पेठे कड़े तिथे पण भुत दिस्त्यात दिवसा ढवळ्या ,...आता नविन रस्ता झाल्या मुळ तिकड कोण जात न्हाय.....पण जो जो गेला तो तो मेलाय " कैलास पुन्हा जोर जोरात हसतच बोलला " काय तू पण 'म्हणे जो जो गेला तो तो मेला ' तुम्हाला ना गावात काय Time Pass नाहिये ...म्हणून तुम्हाला हे सर्व सुचतेय...बाकि काही नाही " एक मित्र कैलास ला समजाऊ लागला .." हे बघ कैलास तो जे सांगतोय ते खरे आहे...गावातल्या आड़बाजूला अशी खुप घान जागा आहेत तिथे आम्ही ही दिवसाच पण जात न्हाई " कैलास त्या सर्वांकड़े कुचेष्टेने पाहताच बोलला " अरे आडबाजू घान नाहीत तर तुम्ही अडानी आहात न तुमच्या डोक्यात घान भरलेय " कैलास चे हे शब्द कानावर पडताच त्यांच्यातला एकजण ताडकन उभा राहिला न रागा रागाताच बोलला " ये.....कयल्या...तुला काय रताळ माहीत हाय का...तुला गावातला शाम्या न तो इसन्या कोतवालाचा माहित हाय ना ते त्या पुला वरच्या भूता मुळ मेल्यात ...आणि आश्या लय केसेस (चक्क English) झाल्यात गावात....न आम्हाला आडानी म्हणतोय " अजुन एकजण म्हणाला " ती परटाची सगुना काकी ..फाटी गोळा करायला गेली होती पुला खाली ...न त्या नंतर घरातून बोमब्लत जाइची रात्रीची पूला कड...न मेली आठवडयात" दुसर्यानी सांगितले " त्या सगुनेला तर आम्हीच आनले होते पुला खालून ,,,,तिन्हिसंज झाली तरी घरी कशी आली न्हाय म्हणून आम्ही सात आठ जन गेलो होतो तिला शोधायला न ती पुला खाली बसून बडबड करत होती...आम्हाला सग्ळयांना आवरत नव्हती ती म्हातारी ....अचानक बेशुद पडली तव्हा कुठ उचलून आणली...नाय तर आम्हीच गार झालो होतो तव्हा" कैलास ने त्यांना तो जूना पुल कुठे आहे याची विचारना केलि ...त्याला एकाच अटी वर त्यांनी तो पुल कुठे आहे ते सांगितले न ती अट होती की "तू कधीच तिकडे जायचे नाही"" न कैलासने ते कबूलही केले ... पण या सर्वांना भुत वगेरे काही नसते हे दाखवावेच लागेल असा विचार करुण कैलास त्या पुला कड़े गेलाच मे महिना असल्याने कैलास पुला पर्यन्त जाई पर्यन्त चांगलाच घामाघूम झाला होता
कैलास पुला वर येताच त्याला तिथे कमालीचा गारवा जाणवला ...तो मनातच पुट पुटला की " एवडी मस्त रम्य न ठंड जागेला हे लोक घाबरतात ....मुर्ख साले" तेव्हा दुपारचे 12: वाजले होते सूर्य डोक्या वर होता उन्हाचा चांगलाच प्रभाव पडलेला असताना पुलावर कमालीचा गारवा होता म्हणून कैलास तिथेच थांबला थोड़ावेळ ....आता कैलास ने तिथून निघण्याचा निर्णय घेतला न नितक्यात त्याला तिथे एक कुल्फी वाला येताना दिसला तो कुल्फी वाला जवळ येताच त्याला कैलास ने एक कुल्फी दया म्हणून सांगितले तरी तो कुल्फी वाला पुढेच चाललाय हे पाहून कैलास जोरातच ओरडून बोलला " ओ....कुल्फी वाले ...अहो एक कुल्फी दया बोललो " तो कुल्फी वाला तिथेच थांबला न डेऱ्यातुन कुल्फी काडू लागला कुल्फी वाला कैलास पासून 15/20 फुटावर असेल कैलास एका जागी बसून घामाघुम झालेल्या शरीराला गारवा लागल्याने तो सुखावला होता न सुस्तावला होता त्याने कुल्फी वाल्याकडे उठून न जाता हाताने इशारा करत "कुल्फी आणा इकडे " असे म्हंटले...आणि पुला शेजारील परिसरा वरुण नजर फिरकाऊ लागला.. कुल्फी वाल्याने डेऱ्यातुन कुल्फी काडली न कैलास कड़े देत म्हणाला " घ्या ....शेठ तुमची कुल्फी " कैलासने कुल्फी घेण्यास त्या कड़े नजर केलि न कुल्फी घेन्या साठी पुढे केलेला हाथ विजेच्या गतीने मागे घेतला त्याच्या चेहर्यावर भीती दाटून आली होती त्याने पाहिले की कुल्फी वाला त्याच्या पासून 15/20 फुटवरच बसला आहे पण त्याचा हाथ खुल्फी घेउन कैलासच्या अगदी जवळ आला आहे...कैलासने एक नजर कुल्फी वाल्या कड़े टाकली तर तो जोर जोरात हसत होता... कैलासने आव बघितला न ताव तिथून माघारी धूम ठोकली पूलाच्या एका टोकावर पोहचताच त्याला एक बैलगाड़ी दिसली तो धावतच बैलगाड़ी जवळ गेला न बैल गाडीतल्या माणसाला ओरडून सांगू लागला त्या माणसाचा हाथ लांब झाला म्हणून बैलगाडीवाला मानुस बैलगाडी जोरजोरात पळवत होता न त्याने कैलासला बैलगाडित बस म्हणून इशारा केला न कैलासला गाडीत चडायला स्वताचा हाथ पुढे केला कैलास पाहतो तर काय बैलगाडीतल्या माणसाने देखिल हाथ लांब केला होता .... आता कैलास खुप घाबरला होता त्याने गावाकडे जाणार्या रस्त्याकडे धाव घेतली तसा कुल्फी वाला न बैलगाड़ी वाला कैलास कड़े पाहत जोरजोरात हसत होते ..... आणि मधुनच जोरजोरात ओरडत होते ""थांब.....थांब...""
कैलास जीव मुठीत घेउन पळतच राहिला न गावात आला तो पूर्ण घामाघुम झाला होता धाउन धाउन गुदमरला होता ... घरा समोर येताच कैलासने अंग जमिनी वर जोखुन दिले....थोड्या वेळाने घरच्यानचे लक्ष कैलास कड़े गेले हा असा काय करतोय म्हणून त्याला विचारले तर कैलासने झाला प्रकार घरच्यांना सांगितला न त्याच रात्रि कैलास झोपेतच चालत घरा बाहेर निघाला न त्याला गावातल्या एका माणसाने पाहिले न त्याला विचारले " कुणी कड निघाला म्हनायच येव्ह्ड्या रातच्याला "" पण कैलास त्याच्या कड़े काही लक्ष देत नाही हे बघून त्या माणसाने पुढे जाउन त्याचा हाथ पकडला न म्हणाला ""आरर ....तुला विचारतोय कुठ निघालास "" कैलासने त्याचा हाथ जोरात झटकला न त्याच्या कड़े पाहिले कैलासचा विद्रूप चेहरा न पांढरे फटक डोळे बघून तो जोरजोरात बोम्बलू लागला त्याच्या आवाजाने गाव जागे झाले झाला प्रकार त्याने सर्वांना सांगितला पण तो पर्यंत कैलास खुप पुढे निघून गेला होता गावकरी कैलासच्या शोधात पुला जवळ आले तिथे पाहतात तर काय कैलास एकाच जागेवर भवऱ्या सारखा फिरत होता ...काही वेळातच तो जमीनी वर कोसळला सात आठ जनान्नी त्याला उचलायचा प्रयत्न केला पण कैलास त्यांना हलत देखिल नव्हता त्यांच्यातला एका जाणत्या माणसाने हातात माती घेतली काहीतरी पुट्पुटत ती माती कैलासच्या अंगावर फेकली तेव्हा कुठे कैलासला उचलण्यात लोकांना यश आले .
..हे सर्व झाल्या मुळे कैलासच्या घरचे दुसर्याच दिवशी त्याला मुंबईला घेउन आले त्या नंतर कैलास खुप आजारी राहू लागला घरच्यांनी खुप दवाखाने केले पण डाँक्टरान्ना आजराचे निदानच कळुन येत नव्हते काही जन्नानी हा प्रकार जादुटोण्याचा दिसतोय तुम्ही तांत्रिक मंत्रिका कड़े जा असा सल्लाही त्याच्या घरच्यांना दिला पण त्याचे वडील पेशाने वकील होते त्यांचा या तांत्रिक मांत्रिकान वर विश्वास नव्हता न अश्यातच चार महिन्यांनी कैलासचे दुर्देवी निधन झाले.... ( ही करुण कहानी सांगताना शेवटी शेवटी सुभाषच्या डोळ्यातुन अश्रू आले होते त्याच्या या करुण कहानीने मी कोणाचे मनोरंजन कसे करू शकतो या विचार मूळे मी ही कथा आज सहा महीने पोस्ट नाही केलि .. पण कैलास सारखे अजुन कोण अश्या गोष्टीन कड़े दुर्लक्ष करू नये न आपला जीव गमाऊ नये बस याच उद्देशाने मी स्टोरी आज पोस्ट करत आहे ) . . ...................
अविनाश गुरव

Monday, June 29, 2015

ग्रहण--भयकथा---



नमस्कार मित्रहो मी शितल गायकवाड मी माझ्या जीवनात प्रथमच अशी हि कथा सादर करत आहे .. मला माहित नाही मी ठीक लिहलीय कि नाही पण आशा आहे आपणा सर्वांना आवडावी ..........

आपल्या हातात त्या लहानग्या शितलला घेऊन, त्या बाळाला घेऊन समर्थांनी तिच्यावर एकवेळ पूर्ण कटाक्ष टाकला आणि समोर बसलेल्या विनायकरावाना ... समर्थांनी एका चिंतीत नजरेने पाहिले आणि मुलीचा जन्मवेळ, जन्मकाल दिवस कि रात्र , जन्मस्थळ सर्व विचारून घेतले.... आणि परत विनायकरावाकडे पाहत आपल्या दोन्ही भुवया चिंतेच्या सुरात गोळा करीत उत्तरले... "विनायकराव, मुलीच्या पत्रिकेत विचित्र दुष्टचक्र चालू आहे. जन्माला तिच्या एक दुष्ट काळ लागलाय बघा... हे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय अशी विचित्र कुंडली एकवेळ कुंडलीतील दोष समजल्यावर त्याला उपाय करता येतो पण हे तर भलतच काही तरी आहे.. जणू ग्रहण लागलय मुलीच्या आयुष्याला ... " त्यावर विनायकराव त्या हातातील चिमुकलीकडे ओशाळून पाहत म्हणाले... "समर्थ असे नका हो म्हणू , अहो काही उपाय नाही का यावरती? " त्यावर समर्थ उठले आणि त्यांनी आपल्या उजव्या हाताने जवळ ठेवलेली काठी घेतली व तिच्या सहाय्याने उभे राहिले व लंगडत लंगडत ते बाजूस असलेल्या तुळशीच्या रोपट्याजवळ गेले.. आणि त्यांनी तेथून एक मंजिरा तोडली... व तसेच तेथून ते माघारी फिरले.. व विनायकरावाकडे आले...त्यांनी तेथून येत येत काही मंत्र म्हणले व जवळ येऊन त्यांनी त्या चिमुकलीच्या माथी ते ठेवून त्यांनी डोळे झाकून बरीच वेळ एक प्रक्रिया केली.. आणि अचानक झटका बसावा तसा ते त्यांनी डोळे उघडले... आणि वरती पाहून ते म्हणाले.... या मुलीला सध्या तरी काही संकटे नाहीयेत पण जसे जसे हिचे वय वाढेल तसे एका मागून एक घनघोर संकटे येणार आहेत... विनायकराव तुम्ही चिंता नका करू कारण त्याने देखील जन्म घेतलाय तो हि या मुलीसाठी जन्मला आहे... जो हिचा जीवनसाथी बनेल. आणि या मुलीला त्या घनघोर संकटातून बाहेर काढेल .. या आता तुम्ही.. जसे जसे शितलमोठी होत आली तसे तसे विनायकरावांचे जवळील नातेवाईकांना दगा पोहोचू लागला... कधीहि शितलखुश वाटत नव्हती..आनंद तिच्या जीवनात जणू नव्हताच .. नेहमी घराच्या पाठीमागे असलेल्या पायऱ्यावर बसून ती सतत रडत असायची.. आणि आपल्या आईला नेहमी आपल्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगायची कि "आई , काल आपल्या घरी ते काका आले होते ना, त्यांना पाहून ग मला अचानक उदास वाटू लागले ग जसे कि ते मरतायत पण मी काहीच करू शकत नाहीये... आणि त्याच काकांना मी स्वप्नात अपघातात मरताना पण पाहिले आहे..." शितल जसे आपले स्वप्न आईला सांगी तसेच ते दुसऱ्या क्षणात घडले जात होते.... तिच्या सोबत असलेली ती काळी दुष्ट आत्मा तिला हे सर्व दाखवत होती... वर्षेनुवर्षे उलटून गेली.... १० वर्षाचा काळ उलटून गेला.... शितल तरुणाईत आली अत्यंत सुंदर अशी तरून मुलगी झाली होती ती. मृगनैनी, अप्सराच जशी वाटत होती.. पण तिचा तो चंद्रासारखा चेहरा उदास असायचा नेहमी... आणि मध्ये काही वर्षे निघून गेले.... शितलला तिच्या जवळच्या लोकांचे मृत्यू दिसणे बंद झाले होते..... शितल नेहमी आपल्या रूममध्ये उदास होऊन पडून राहायची...... पण आज अचानक तेच उदभवले... आजदेखील शितलची तीच अवस्था होती.. मनात एक हुरहूर लागून होती.... तिच्या मनात एक उदासीनता दाटून आली होती... जसे कि भर वसंत ऋतूमध्ये अचानक काळे मेघ सूर्यावर एक काळी छाया आणतील अशी.... जणू एक दुखद लहर शितलच्या मनात आली होती.... तिला जाणवू लागल होत... तिला वाटत होत.. आज काहीतरी नक्कीच वाईट होणार.... पण काय ? याची तिला भणक लागली नव्हती फक्त एक जाणीव एक तत्सम जाणीव जी जाणवून देत होती... आज काही विपरीत घडणार कोणासोबत तरी, तिच्या मनाची उदासीनता हेच तिला सांगत होती. तिला ती घटना आठवली जेव्हा ती १७ वर्षाची होती... तो दिवस १८ मे सोमवार होता तो.... अमावस्येच्या त्या काळ्या रात्री गावातील ते ५ डॉक्टर हे आपल्या गावाकडील रस्त्यावरून बाहेरगावी जात होते पाचही जन एकाच गाडीमध्ये होते ते येतच होते परंतु अचानक येताना कस माहित? देव जाणो एका सरळ रस्त्यावर इतर कुठल्या गाडीच्या अनुपस्थितीमध्ये तो अपघात त्यांच्या वाटी आला... आणि जागच्या जागी ते मृत्युमुखी पडले.... त्या नंतर १२ मार्च खुद्द शितलचे काका ह्रदयाच्या धक्क्याने दगावले.....आणि ते अस झाल होत... ' शितल आपल्या रोजच्या सारखी स्वतःत गुंग होती.. पण अचानक रात्री झोपेत १० : ३० वाजता तिची अस्वस्थता भयानक वाढली जणू आता पुढच्या काही क्षणातच विपरीत घडणार कोणासोबत तरी ? कोणीतरी जवळच दगावणार... आणि तसे घडले देखील त्याच वेळी इकडे गावाकडे असलेल्या शितलच्या काकांना हृदयविकाराचा धक्का आला... रात्रीचे साडेबारा वाजले होते तेव्हा शितलच्या दादास आलेला फोन शितलची शंका खरा ठरवणारा निघाला... तिकडून खबर आली होती कि, काका गेले.... पण या सर्व घटनांचा शितलशी काय संबंध आहे ? हो आहे याचा शितलशी संबंध आहे. कारण, हे जे घडलेले त्याची तिला जाणीव झाली होती... त्या अपघाताच्या काही एक दिवसापूर्वी तिने ते स्वप्नात पाहिले होते कि यांच्या सोबत असे होणार आहे.... आणि दुसऱ्याच दिवशी तो अपघात तसाच त्या ठिकाणी झाला...पण आज काय होणार हे नव्हते माहित तिला... कधी स्वप्न यायचं कि जणू कोणी जाणार आहे मृत्यूच्या दारात, तर कधी जाणीव एक वेगळच नक्षत्र होत तिच्या जन्माच वेगवेगळ्या उत्तरांच्या शोधात होत तिचे मन, आज हि होणारी जाणीव एक अनोळखी होती .. तिला हे स्पष्ट कळत नव्हते कि, आज कोणी दगावनार आहे का ? काय वाईट होणार आहे नेमक आज ? आणि कोणासोबत ? जर कळाले तर त्याला, जो कोणी दगावेल किवा ज्याच्या सोबत वाईट होणार आहे त्याला वाचविण्यासाठी तर आपल्याला मदत करता येईल.. असे शीतलच्या मनाला वाटत होते. गावात तिच्या काही विचित्र घटना घडतात हेही तिला माहित होते, गावातील भूतले लोक तिलाच माहित होते तिच्या गावात अजून काही दडलेली रहस्य तिला माहित होती. एक अलौकिकत्व होत तिच्या मध्ये एक अलौकिक शक्ती होती तिच्यामध्ये. तिच्यामध्ये कि तिच्यासोबत सतत नेहमी तिला भासत असे कि कोणी तरी सारखे तिच्यासोबत आहे एक भयानक तत्समान वाईट शक्ती जी नसून देखील तीच अस्तित्व ती दाखवून देत होती. सतत ती तिच्या अंतरमनाशी खेळायची तिला जाणवून द्यायची कि जणू जे काही तिच्या जवळ आहे ते ती सर्व घेऊन जाणार आणि सर्वात शेवटी तिलाच . आज शितलला पहाटेच एक चांगले स्वप्न पडले होते.. तिच्या स्वप्नात ते गृहस्थ आले होते.. कोणी ओळखीचेच होते वाटत .. ती त्यांना ओळखत होती.. स्वप्नात शितलने त्यांची विचारपूस केली... आणि बस तेवढच बोलणे झाले व तिला जाग आली आज पडलेले स्वप्न बाकीच्या स्वप्नापेक्षा चांगले वाटले होते तिला त्यात कोणाच्या मृत्यूची चिन्ह दिसत नव्हती पण जीवनाची हि दिसत नव्हती..... शितलला तेव्हा थोडे बरे वाटले.... पण स्वप्नातील त्या गृहस्थांचा विचार करणे तिने सोडले नाही.. पण तिला त्यांची काळजी वाटली नाही कारण स्वप्नात त्यांच्याशी विपरीत घडलेलं दिसले नव्हते तिला.. म्हणून रोज प्रमाणे उठून ती आपल्या नियमितच्या कामास लागली.... आज ती तिच्या घरच्यांसमवेत दुर्गा मातेच्या मंदिरात जाणार होती.. घरचे म्हणजे तिचे दोन मोठे भाऊ, त्यांच्या बायका (दोन वाहिन्या ) , तिचे आई बाबा आणि स्वतः ती. मंदिरात जाण्यासाठी सर्वजन निघाले होते... घराला टाळे लाऊन ते त्यांच्या रस्त्यास लागले.... शितल आता मोठी झाल्याने ती त्या बंद खोलीतून बाहेर पडली होती... आता तिचे मन थोडे प्रसन्न झाले होते... आपले मोबाईलवर ती कधी कधी स्वतःसोबत असे का घडतय ? का आपल्याला अश्या विचित्र गोष्टी घडणार आहे हे घडण्यापूर्वीच कसे कळते..? याचे उत्तर हि ती नेटवरती शोधायची हा एखादा आजार आहे का अस ती समजायची ... पण काही तिला हाती लागत नसे.. मनोमन ती देवीशी हितगुज करीत होती देवी मला या संकटातून बाहेर काढ.... हे काय घडत माझ्यासोबत का मला अश्या विचित्र गोष्टी दिसतात जाणवतात.. आणि इकडे खाली नेटवरती तिला वेगळ काही भेटतच नव्हत.. म्हणून आपले फेसबुक उघडून ती काही नव्या जुन्या वार्ता मिळतात का ते पाहू लागली.... असे करत तीचा रस्ता देवीच्या मंदिराजवळ येऊन ठेपला .. गाडी मंदिराच्या दारी आली.. भले मोठे एक वडाचे झाड ते मंदिराची भव्यता दर्शवायला काही कमी करीत नव्हते त्या झाडाने अर्ध्या मंदिराची जागा व्यापली होती आणि त्याच्या बाजूने भले मोठे कठडेपारी होती लोक तेथे जेवण वगेरे करण्यास , आराम करण्यास बसायचे इकडे शितल गाडीतून खाली उतरली.. व मंदिरात सर्वांसोबत येऊ लागली आत येताच तींच्या मनाला एक हलके पण जाणवल पण शरीर अस वाटत होत कि कोणी तिच्या शरीरावर बंदी घालतय मंदिरात जाण्यासाठी पन हे क्षणिक झाले... आणि ती आत आली आजूबाजूला, इकडे तिकडे लोक वावरत होते.. तर अश्याच एका ठिकाणी लोक गोळा होऊन काहीतरी पाहत होते.. बाहेरून थोडे थोडेच दिसत होते अस वाटत होत कि बायकांचे केस उडतायत .. अस कि जणू त्या आपले डोके गरागरा गोल फिरवतायत ... थोडे काही लोक बाजूला झाले... आणि शितलला देखील ते दिसले..शितल आणि तिचे घरचे त्या झाडाजवळ थोडावेळ थांबले होत मंदिरात जाण्यासाठी वाट पहावी लागत होती तेथे देवीचे स्नानसंध्या चालू होती.. त्या खाली बसलेल्या ४ ते ५ बायका होत्या.. आणि त्यांच्या अंगात देवी आली होती... म्हणून त्या तस वागत होत्या... भयान होत ते.. पूर्णपणे मोकळी सुटलेली त्यांची केसरचना माथ्यावरती कुंकवाचा भंडारा त्या आपल्या हाता पायाची बोटे वाकडी करून करून आपले पूर्ण शरीर देखील त्या झुलवत होत्या... जस ते त्यांच्या नियंत्रणाबाहेर झालेल्या अवस्थेत होते.. शितलहे सर्व मोठ्या डोळ्यांनी पाहत होती.. त्या बायकांचे ते विचित्र झुलणे तसेच चालू होते त्यांचा तो हुंद्ण्याचा आवाज "हः ...हम्म:.." हे सर्व शितल पाहत होती..आणि अचानक त्या ५ बायका पैकी एक बाई आहे त्याच अवस्थेत थांबली.....आणि तिचा चेहरा शितलकडे आला होता... तिचे पूर्ण केस तिच्या मानेवरून तिच्या चेहऱ्यावर आले होते घामाने तिच्या माथ्यावरील कुंकू रक्ताप्रमाणे नाकावरून ओघळत खाली टपकत होते आणि ती बाई तशीच शांत आपल्या गुडघ्यावर बसून होती.. तेथील जमाव पण हे पाहताच शांत पडला होता आणि ऐकू येत होते ते फक्त त्या एकट्या बाईचे जोरजोरात श्वास घेणे..... तेव्हा तिच्या पुढ्यात एक जाडजुड दिसणारी एक स्त्री आली... आणि ती त्या बाईला बोलू लागली... ती स्त्री त्या बाईला बोलत होती कि त्या खाली असलेल्या बाईने एकदम वरती पाहिले.. तिचे घामाने ओले झालेले केस तिच्या चेहऱ्यावर चिकटून होते.. आणि त्यातूनच तिचा फक्त डावा डोळा पांढरा पडलेला दिसत होता... आणि ओठांवरती आलेल्या कुंकू मिश्रित लाल घामाच्या धारा तिने आपल्या एका डोळ्याच्या नजरेने त्या जाड्या बाईकडे पाहिले.. तिला पाहताच ती स्त्री मागे झाली... आणि त्या खाली बसलेल्या बाईने आपली मान वळवून शितलकडे पाहिले...ती घोरून शितलला पाहू लागली होती... तिची मान नकारार्थी हालू लागली होती... जस कि ती कोणाला तर घाबरतेय.. जस कि त्या बाईला शितलमध्ये काही वाईट दिसले होते.. ती सारखे शितलच्या खांद्याहून मागे तर कधी शितलकडे पहायची... ती बाई घाबरत होती तिचे दोन्ही हात आपोआपच वर आले तिचे दहाही बोटे वाकडी करून ओरडू लागली ... "घोर .... अनर्थ .... घोर अनर्थ..... सगळ जाणार तुझ ते सगळ नेणार तुझ... " आणि एवढे बोलून ती बाई पुढच्या क्षणातच बेशुद्ध झाली.... तेथे जमलेला जमावं तिथले लोक .. सगळेजन एका नजरेने शितलकडे पाहत होते.... ती बाई ती अनोळखी बाई शितलकडे पाहून अस का म्हणत होती ? काय उद्देशाने बोलत होती ती ? ते सर्व घडलेलं शितल एकटीच नाही तर तिच्या घरचे देखील ते पाहत होते.... त्यांनी शितलला आपल्या जवळ घेतले आणि सर्वजन मंदिरात जायला निघाले... मंदिरात जात जात शितलने माघारी वळून या बाईकडे पाहिले.... ती बाई तशीच निपचित पडून होती... आणि शितल तिला पाहतच दर्शनासाठी गेली... दर्शन घेऊन बाहेर आल्यावर तेथे आता कोणीच राहिले नव्हते सर्व ते पटांगण रिकामे झाले होते.... शितलची आई त्या घटनेनंतर शितलला घेऊन चिंतीत राहू लागली... घरी आल्यास आपली आई चिंतेत आहे हे तिच्या लक्षात आलेच होते... घरी आल्यास शितलची आई शितलच्या बाबांना काहीतरी बोलत होती.. "अहो एक विचारू का ? " त्यावर शितलचे वडील शितलच्या आईकडे वळून म्हणाले.... "मला माहितेय तुला शितलबद्दल बोलायचं आहे न ?" त्यावर शितलची आई थोडी चमकली व पुन्हा नॉर्मल होऊन पुढे बोलू लागली.... "तुम्हाला माहितेय जेव्हा शितलचा जन्म झाला त्या काहीदिवसानी आपण शितलची कुंडली त्या भटजीकडे काय नाव त्यांच हो समर्थ त्यांच्याकडे बनवायला गेलो होतो... तेव्हा तुम्हाला आठवते का? ते काय म्हणाले होते? " "विनायकराव मुलीच्या पत्रिकेत एक वेगळीच दशा आहे दुष्टचक्र चालू आहे " त्यावर विनायकराव म्हणाले " हो पण त्याच काय ..?" त्यावर शितलची आई विनायकरावाना म्हणाली.. आपण पुन्हा शितलला त्यांच्याकडे न्यायचं का ? त्यावर विनायकराव देखील होकारले .. पण त्यांना हे माहित नव्हते कि दाराआड उभा असलेल्या शितलने देखील हे सर्व ऐकलेले....
....शितलने दाराआड उभे राहून ते सर्व ऐकले होते... विनायकराव आणि शितलची आई शितलचे आईबाबा ना हे सगळ माहित होत...तरी देखील आपल्या आईबाबांनी आपल्या पासून हि गोष्ट लपवून ठेवली... याच शितलला बरेच दुख झाले... पण तरीही .. आतमध्ये त्यांचे चाललेलं बोलण शितल शांतपणे ऐकत होती... तिने ऐकले तसे .. विनायकराव शितलच्या आईला बोलत म्हणाले ..." अग ऐक आपण शितलची कुंडली परत आपण समर्थांना दाखवावी का .. त्यांनी आपल्याला पहिल्यांदा जे सांगितले तसेच होतय... आपली शितल जसी जसी वयाने वाढतेय तसे तसे संकटाचे घोर ढग आपल्यावर आल्याच आभास होतोय मला .. " त्यावर शितलची आईदेखील चिंतेच्या सुरात म्हणाली "हो ना अहो आज जे मंदिरात घडलय ते तर पाहीलच आहे आपण... " यावर शितल हि इकडे चिंतातूर झाली.. तिला जणू आपण स्वतः गुन्हेगार आहोत असे वाटू लागले.. आणि तसेच तिने आपला तेथून काढता पाय घेतला... आणि आपल्या रूमकडे जड पावलाने जाऊ लागली... काय करावे हे तिला सुचेनासे झाले.. तरीही ती जाता जाता एक विलक्षण गोष्ट घडली... ती जसे जसे रूमकडे जाऊ लागली तेव्हा भिंतीवर तिला स्वतःची साउली पडलेली दिसत होती... सामान्य माणसाला एकच साउली असते हो ना... पण आज शितलला जमिनीवर देखील एक साउली दिसू लागली होती.. तिच्याच पाया पासून सुरुवात झालेली त्या साउलीची आणि ती पूर्ण जमिनीवर पसरलेली होती... शितलला समजेना आपल्याला दोन साउल्या कश्या आहेत.... हे काय आहे ? .. याचा विचार करून शितल जवळ पेटत असलेल्या लाईटच्या बल्ब जवळ गेली.. तेव्हा त्याच क्षणी ती साउली जणू शितलच्या अंगापासून एकदम विभक्त झाली.. आणि सळसळ करीत.. ती तिच्या पासून दूर झाली आणि बाजूच्या काळोखात सामावली गेली... शितल ते पाहून घाबरली... तिचे डोळे त्या दृश्याने वटारले गेले.. आणि परत ती आता भीतीच्या भरलेल्या मनाने आपल्या रूमकडे गेली.. आत जाताच तिने दरवाजा लाऊन घेतला... व आपल्या बेडवर आली.. आत तिने सर्व खिडक्या उघडल्या... व लक्ख सूर्यप्रकाशाने रूम प्रकाशित केली... तेव्हा फक्त आता तिचीच साउली तिला दिसली... आणि तिने थोडा धिराचा श्वास घेतला.. व आपला लैपटॉप बाहेर काढला... तिने नेट चालू करण्यासाठी आपला फोन त्यास जोडला व इंटरनेट चालू केले... आजच्या युगातील हे आधुनिक जाळे तंत्रज्ञान इंटरनेट वरील गुगल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते.. आपल्याही प्रश्नाचे उत्तर येथे भेटू शकेल अश्या आशेने... शितलने गुगल चालू केले.. आणि त्यावरील चौकटी कप्प्यात तिने आपल्याला हवा तो प्रश्न टाकला आणि इंटर प्रेस केले... क्षणार्धातच बऱ्याच साईट्सच्या लिंक निळ्याशार अक्षरामध्ये तिच्या समोर स्क्रीनवर झळकू लागल्या.... त्यापैकी पहिल्या असलेल्या लींकवर शितलने क्लिक केले... आणि ती लींक ओपन होऊ लागली... ती लोड होई पर्यंत शितलला एक लहानपणी घडलेली घटना आठवली... शितल तेव्हा एक १२ - १३ वर्षाची होती...तेव्हा ती तिच्या मैत्रिणी सोबत म्हणजे अनघासोबत तिच्या घरी जवळच असलेल्या हिरवळीच्या ठिकाणी त्या दोघी खेळत होत्या. सुंदरशी झाडी आणि हिरवळ पटांगण होते तेथे आणि त्याच दरम्यान अनघाचे घर हि जवळच होते इतके जवळ कि अनघाची आई खिडकीतून काम करत करत.. त्या दोघीकडे लक्ष ठेऊ शकत होती... इकडे बागडत या दोघींचे झोका खेळणे चालू होते... त्या दोघींनी बारीबरीने खेळण्याचे ठरवले होते... सर्वात आधी शितल झोक्यावर बसलेली होती.. अनघा मागून तिला झोके देत होती... इकडे मुलीचे खेळणे पाहून अनघाची आई हि त्या दोघींना पाहत बसली.... बरा वेळ झाला आता बारी आली होती अनघाची.. अनघा झोक्यावरती बसणार होती आणि मागून शितल तिला झोके देणार होती... अनघा झोपाळ्यावर बसली आणि तिने शितलला झोका देण्यास सांगितले. तशी शितलदेखील पुढे सरसावली आणि तिने .. झोक्याच्या दोरखंडास हात लावला... कि त्याच वेळी... तिच्या अंगी एक सळसळ झाली.. आणि समोर तिला एक दृश्य दिसून येऊ लागले...झोका आपोआप हालला जातोय... आणि अचानकच अनघा उंचच उंच गेलेल्या झोपाळ्यावरून एका झपाट्याने खाली कोसळली आणि कोसळताच क्षणी तिचे डोके एका मोठ्या दगडावर आदळले .. व त्याच वेळी तिचे डोके ठ्क्क असा आवाज करीत फुटले... व त्यातून रक्ताची धार त्या दगडावर वाहत असलेली शितलला दिसली... कि तितक्यातच अनघा "अग शितल कुठे हरवलीस, चल मला झोका दे पाहू ... " अनघाच्या बोलण्याने शितल भानावर आली ...त्या दृश्याने शितलच्या अंगाचे पाणी पाणी झाले होते.. ती घाबरून मागे मागे जाऊ लागली .. आणि इकडे अनघा तिला बोलवू लागली... घरात असलेली अनघाची आई या दोघीत काय चाललय ते पाहत होती... इकडे शितल झोक्यास हात लावण्यास काही तयार होईना..पण अचानक आजुबाजूची झाडी... सुईइईइ आवाज करू लागली.... जणू त्या झाडीच्या अधूनमधून वाऱ्याच्या झुळका येऊ लागल्या.. आणि वरती आकाशात काळे ढगाळ वातावरण निर्माण झाले... त्या झुळकानी तो झोका.. हळूहळू हलू लागला... जणू त्याला कोणीतरी झोका देतय.. असे हलत होता.. तो शितल हे सर्व घाबरून पाहत होती... अनघा तिला अजून जोरजोरात झोका दे म्हणत होती... पण तिला काय माहित मागे कोण झोका देत होत ते.... इकडे .. अनघाची आई हे सर्व दुरून पाहत होती.... तिलादेखील ते विचित्र वाटू लागले झोका आपोआप कसा हलला जातोय.. अनघाच्या आईला चिंता होऊ लागली.. इकडे झोक्याचा आता वेग वाढत चालला तशी अनघाची आई तिकडून धावत येऊ लागली... "अनु ... बाळा मी आले ग .." असे ओरडत ती धावत येत होती.. तेवढ्यात शितलला झोक्याच्या पलिकडच्या बाजूस एक प्रतिकृती दिसून येऊ लागली....तिच्या सोबत नेहमी असणारी ती साउली तिच्या पुढ्यात उभी होती..... पूर्ण अंग काळ्या वस्त्रांनी झाकलेले... ते वस्त्र एका विचित्र डाबरट काळ्या द्रवाने ओले झाले होते.... त्याचा तो ओरबाडलेला रक्तबंबाळ चेहरा लालबुंद दिसत होता.... त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटले होते.. आणि पुढच्याच क्षणात त्या उंच गेलेल्या झोक्यावरून अनघा झपाट्याने खाली आली.... व जसे शितलला दिसले होते.. त्याच प्रमाणे अनघासोबत तसे घडले..... आणि इकडे धावत आलेली अनघाची आई देखील जागीच मुलीची अशी अवस्था पाहून धक्क्याने खाली कोसळली.... इकडे ती लींक ओपन होताच शितलच्या लैपटॉपने एक आवाज केला.... आणि ती लींक ओपन झाली... शितल ती ओपन झालेली लींक पाहून तिच्या छातीत धस्स झाले....ती थरथर कापू लागली.... समोर एक इमेज आली होती.... आणि ती तीच साउली होती तीच प्रतिकृती होती.. जी तिने लहानपणी पाहिली होती.... आता मात्र तिचा यातील विश्वास वाढला तिला पक्के समजून चुकले कि आपल्या सोबत काय घडतय हे सगळ ? तरी निश्चित करण्यासाठी तिने ती इमेज बंद केली आणि खाली असलेली पोस्ट वाचायला सुरुवात केली.... तिथे खाली लिहिले होते कि .... . "THE DEATH SHADOW OF ECLIPS "-- "ग्रहणाची मृत्युछाया "
"THESE EVIL SHADOW PASSES THOSE PERSONS WHO BORNS AT THE MIDNIGHT OF THE MOON ECLIPS THESE ARE CURSED PERSON BY THAT EVIL SHADOW "
याचा अर्थ असा निघतो कि.. या दुष्ट मृत्युछाया.. त्याच व्यक्तीच्या जन्मकुंडलीत लागतात जे लोक चंद्रग्रहणाच्या मध्यरात्री जन्मले जातात... त्याच वेळी या दुष्ट साउल्या वाईट आत्म्याच्या गुलाम असतात ... त्याच वेळी या देखील नरकातून पृथ्वीवर येतात.. या प्रकारच्या साउल्या एक श्राप असतात एखाद्याच्या जीवनातील... आणि खाली हि लिहले होते कि ,
"IT TAKES THE EVERYTHING FROM THAT PERSON WHO IS POSSES D BY THAT SHADOW AND EVEN IT TAKES LIFE OF THAT PERSON"
याचा अर्थ कि , हि दुष्ट्छाया त्या संबंधित व्यक्तीच्या जवळीकांचे जीवन प्रथम संपवते..आणि त्यानंतर त्याच
व्यक्तीचा जीव घेत.. किवा पिढे नि पिढे त्याला जिवंत ठेवून तडपावते ..." हे मृत्यूचक्र त्या व्यक्तीच्या मरणानेच संपू शकते.... शितल हे सर्व वाचतच होती.. कि ती पोस्ट संपली... आणि खाली पाहिले तर .. तेथे त्यांची एक टीप होती... "our SOME EXPERTISE HAVE FOUND SOME CLUES AND SOLUTION ON IT YOU CAN LEAVE YOUR COMMENTS DOWN HERE " "आमच्या काही तज्ञ लोकांना यावर काही उपाययोजना सापडत आहेत पण त्या अजून आमलात आणले नाहीयेत आपण आपल्या कमेंट्स खाली पोस्ट करू शकता .." त्यावर शितलने खाली असलेल्या कमेंट्स वाचण्यास सुरुवात केली... खाली खूप लोकांनी त्यांच्या व्यथा प्रदर्शित केल्या होत्या...त्या कमेंट्स द्वारे शितलला प्रत्येक एकाचे हाल दिसून येत होते... तर त्या अश्या होत्या ... "प्लीज.. या दुष्ट आत्म्याने माझे सर्व जवळचे हिरावून घेतले आहे.. माझे आई वडील माझी बायको मुल... मला मरायचं आहे तरी हि आत्मा मला मरू देत नाही ... मला झोपू देत नाही .. मला तडपवतेय हि .. " आणि अजून अश्या होत्या .. "ओह माय गॉड इट्स हेयर ... सेव्ह मी सेव्ह मी .. जीसस ... हेल्प मी एनीबडी फॉर god सेक हेल्प मी .. " खूप लोकांच्या कमेंट्स तेथे होत्या .. हे सर्व पाहून शितलच्या डोळ्यात घळघळा पाणी आले...अश्रू तिच्या त्या सुंदर काळ्याभोर डोळ्यातून गालावरून ओघळत खाली टपकत होते... आणि तसेच शितल देखील आपली कमेंट खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये टाकू लागली ... "I M HAVING THESE SAME PROBLEM, PLEASE HELP ME !!" शितलने टाकलेली कमेंट्स तिथे पोस्ट झाली.. शितल काहीवेळ थांबून कोणाचा रिप्लाय येतोय का त्याची वाट पाहू लागली... पण इकडे तितक्यात घरातून गाडी बाहेर जातेय असा आवाज शितलला आला .. ते विनायकराव होते शितलचे वडील ... ते आणि शितलची आई हे दोघे आता समर्थांना भेटण्यासाठी निघाले होते... ते जातायत हे पाहून शितल धावत बाहेर आली... शितलला आलेले पाहून विनायकराव थोडे दचकले... "काय ग शितल बाळा एवढ गडबडीत धावत का आलीयस " त्यावर शितल उत्तरली " कुठे जाताय आई बाबा तुम्ही दोघे ?" आपल्या मुलीच्या या अश्या अचानक विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येईना तरीही त्यांनी तोडक्यामोडक्या भाषेत तिला सांगयचा प्रयत्न केला कि आम्ही असेच कामा साठी जातोय बाहेर ... तोवर इकडे शितलच्या आईने आपल्या पदराआड शितलची कुंडली लपवून घेतली होती... शितल वडिलांच्या उत्तरास प्रत्युत्तर म्हणत बोलली " समर्थ भटजीकडे " त्याचक्षणी विनायकराव आणि शितलच्या आईने एकमेकाकडे पहिले... त्यांना आता कळून चुकले होते कि .. आता हे लपवण्यात काही अर्थ नाही शक्यतो तिने आपले बोलणे ऐकलेले दिसतेय... विनायकराव एखाद्या माफीच्या अंतकरणाने पुढे येऊ लागले त्यांच्या चेहऱ्यावर एक पश्चात्ताप झळकत आला होता.. तरी हि जड शब्दाने ते मुलीला बोलण्यास पुढे आले.. आणि मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवून बोलू लागले... प्रसंग दुसरा ... शितल हि आता त्यांच्या समवेत समर्थ भटजींना भेटण्यासाठी जाऊ लागली होती... विनायकरावनी तिला सांगितलेले सर्व आठवत होते... शितलचा जन्म चंद्र ग्रहणाच्या रात्री झाला होता... आणि जेव्हा ती जन्मली तेव्हा समर्थांनी तिची कुंडली बनवली होती... आणि तेव्हाच त्यांनी मुलीच्या जन्मास लागलेला हा श्राप देखील कथित केला होता ... विनायकरावानी हे सगळे आपल्या मुलीच्या भल्यासाठीच लपवून ठेवले होते.. तिला जर हे कळले असते तर ती कधीच आनंदी राहू शकली नसती ..." शितलला आपल्या वडिलांचे हे घराबाहेर असताना सांगितलेले आठवत होते.. तेव्हा अचानक तिला त्या कमेंट्स बद्दल लक्षात आले... तिने आपल्या फोनद्वारे ती लींक ओपन केली... आणि पहिले तर तिच्या कमेंटला एक रिप्लाय आला होता... "i have the solution for your problem..." शितलने ती कमेंट पाहिली आणि जणू एक उत्साही संचार तिच्यात निर्माण झाला... आणि पाठीचा कणा ताठ करून ती बसली .... तेव्हा तिच्या चेहर्यावर एक तत्सम उत्साह उमटला होता.. तिला जाणून घ्यायचं होते कि हा कोण आहे ज्याच्याकडे आपल्या या संकटावर निवारण आहे.... तिने त्याच्या प्रोफाईल वरती क्लिक केले .. आणि त्याचे प्रोफाईल ओपन झाले ... त्याचा प्रोफाईल फोटो म्हणून त्याची एक डावी बाजू होती.. त्याचा डाव्या हाताचा दंड होता .. आणि त्यावर..... स्वयंभू बजरंगबली चे गोंदण होते...
....गाडीत बसलेली शितल आपल्या हातातील फोनमध्ये त्या कमेंट करणाऱ्या व्यक्तीचे प्रोफाईल चेक करीत होती.... त्याच्या प्रोफाईल पिक्चर मध्ये त्याच्या डाव्या हाताची बाजू होती. आणि त्यावर लखलखीत असे स्वयंभू हनुमान गोंदलेले होते... 
ते उठून दिसत होते.. शितलने त्याला बोलण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.... आणि इकडे गाडीत ते तिघे जात होते .. कि तितक्यात घडले असे नभांचा रंग बदलू लागला.. काळसर ढग मृत्युछाये प्रमाणे जमिनीवर पसरत होते.. आणि तसेच शितल ज्या गाडीमध्ये बसलेली होती.. त्याच गाडीपर्यंत आता ती सावली आली होती..
आणि पुढच्याच क्षणात शितलला दिसले.. कि समोरून एक भला मोठा ट्रक त्यांच्या दिशेने येतोय... तो ट्रक येतच होता... तो जवळ आला आणि त्याच पुढच्याच क्षणात शितलच्या गाडीचा चेंदामेंदा झाला... व शितल तिची आई व बाबा विनायकराव तिला समोर मृत्युमुखी पडलेले दिसले.. शितल तात्काळ शुद्धीवर आली.. आणि तिने
लगेच पुढचा मागचा विचार न करता... शितलने गडबड केली... आणि लगेच ...ड्रायव्हरच्या हातातील स्टेरिंग आपल्या हातात घेऊन .. ग्र्र्रर्रररर असे गोल फिरवले .. आणि तेवढ्यात ती ट्रक समोरून आलीच होती व शितलने गाडी बाजूला घेतली.. आणि थोडक्यातच एक समोरून ट्रक आली... व गाडीला एका हाताच्या
अंतरावरून कट मारून गेली... क्र्ररर्रच्च्च ... असा ब्रेकचा आवाज येत गाडी बाजूच्या झुडपात जाऊन धडकली... सर्वजण स्तब्ध झाले होते... सर्वांचा मृत्यू एका क्षणाच्या कालावधीने टळला होता... विनायकराव आणि शितलची आई हे दोघे तर थरथरू लागले होते...ड्रायवरच्या अंगास घामाच्या धारा लागल्या होत्या....शितलने
सर्वांना पाहत एक मोठा आवंढा गिळला.. आणि परत आपल्या सीटवर आली... त्यावर विनायकरावांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले .."आता काही झाले तरी, समर्थांना भेटायचेच ... " असे म्हणत त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढून रोडवर घेण्यासाठी सांगतिले.... त्याने देखील भीत भीत पुन्हा गाडी रोडवर घेतली....आणि यावेळी
सावकाशपणे चालवू लागला...बराच वेळ झाला...शितलने फोनवरती पाहिले तेव्हा एक मेसेज आला होता... त्याच व्यक्तीचा.... "hi... " त्यावर शितलने इकडून त्यास मेसेज केला... "डू यु रिअली हेव सोलुशन फॉर माय प्रॉब्लेम ...कि तू फक्त माझी चेष्टा करतोयस " त्यावर तिकडून एक रिप्लाय आला.. "नाही मी तुझी चेष्टा
नाहीये करत .. मी खूप जणांना झालेला हा त्रास पाहिला आहे...." शितलने त्याला त्याचे नाव विचारले ... "तुझे नाव काय आहे ? इथे दिसत नाहीये ..." त्यावर तो उत्तरला ... "मी ....गौरव.. " गौरव एक परानोर्माल एक्स्पर्ट आणि एक सनकी होता. खराच सनकी होता तो..जेव्हा पासून त्याचे सर्व कुटुंब एका आत्म्याच्या कचाट्यात
सापडले होते.. आणि त्याने आपला सर्व परिवार गमावला होता... लहान बहिण ,आई वडील मोठा भाऊ...तो स्वतंत्र होता तो..दगडाचे काळीज असलेला असा होता गौरव बर ते असो... शितलने त्याचे नाव वाचले आणि त्यास आपले देखील नाव सांगितले... आणि ती त्या सावलीबद्दल त्याला विचारू लागली... पण प्रथम "तुला काय
माहित आहे ? या सावलीबद्दल आणि कशी हेल्प करणार आहेस तू माझी? " शितलने विचारले ... त्यावर गौरव म्हणाला "मी तरी सध्या तुला एवढच सांगू शकतो कि तू खूप मोठ्या संकटात आहेस .. खूप मोठ्या आणि तुझ्या सोबत तुझा पूर्ण परिवार देखील..." या सावलीचे प्रथम शिकार तुझे कुटुंबीय होतील..." आणि या
जीवनमरणाच्या खेळाचा जर तुला अंत करायचा असेल तर आपल्याला अवश्य भेटावे लागेल... तुला भेटूनच आपण यावर तोडगा काढू शकतो... शितल त्या उत्तर देत म्हणाली .."मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू..." तिकडून गौरव म्हणाला "कारण तुझ्याकडे दुसरा कोणताही उपाय नाहीये ... थोड्या वेळात तुला ते कळेलच जो कोणी
पुढचा मेल्यानंतर " त्याचे हे वेडेवाकडे बोलणे शितलला पटले नाही म्हणून तिने फोन बंद करून टाकला... आणि समर्थांच्या दिशेने जाणाऱ्या वाटेस ती पाहत राहिली.. मजल दरमजल झाली... आणि एका खेड्यात गाडी गेलीय असे दिसून येऊ लागले... गंगखेड म्हणून अस नाव होत त्या ठिकाणच्या एका पिवळ्या पांढऱ्या
दगडावर... आणि से करत करत गाडी अजून पुढे आतमध्ये गेली... तेव्हा खूप छपरांची जुनाट घरे त्यांच्या नजरेस पडू लागली.... आणि असे करत करतच ते एक दोन वळण घेत एका ठिकाणी पोहोचले जेथे थोडेसे पटांगन होत ... आणि त्याच पटांगणात एक छोटेशे जुनाड घर होते... खुप जुन्या काळचे वाटत होत.. विनायकरावनी
गाडी थांबवली तेव्हा इकडे तिकडे पाहताच त्यांनी एका माणसाला तेथून जाताना पाहिले आणि "ओ भाऊ ... ओ .. जरा ऐकता का ? " त्यावर तो जाणारा माणूस विनायकारावाची हाक ऐकून जागीच थांबला.... आणि त्यांच्याकडे येऊ लागला... आणि जवळ येऊन म्हणाला .."हम्म बोला कि...काय म्हणताय ? " त्यावर विनायकराव
म्हणाले "अहो इथे समर्थ भटजी...कोठे राहतात ..." त्यावर त्या माणसाने त्या सर्वांकडे एकत्र पाहिले आणि त्यांच्या मागे असलेल्या जुन्या घराकडे बोट दाखवत तो म्हणाला .. "ते बघा ते घर दिसतय ना त्याचंच आहेय पण सांभाळून म्हातार वेड झालय स्वतःलाच बडबडत असतय.. " विनायकारावानी मागे वळून त्या घराकडे पाहिले
... तेव्हा त्या घराला फक्त लाकडी कुंपण लावले गेले होते... आणि जिथे तिथे फक्त तुळशीचेच रोप त्याना दिसत होते... शितलने कुंपणाच्या फाटकाला हात लावला.. तसेच आतमध्ये .. खाटवर झोपलेल्या समर्थांना एक झटका बसला आणि त्यांचे डोळे उघडले .... घोंगडीच्या आतमध्ये त्यांनी स्वतःस घुमटले होते... तेवढ्यात क्षणात
... ते ताडकन उठले... त्याच्या तोंडून ते उद्गार बाहेर पडले .... "ती दुष्ट आली ... लवकर.... लवकर... घाई करा,,, घाई करा " असे बडबड करीत त्यांनी बाजूला ठेवलेली आपली एक कुबडी घेतली आणि काखेत घालून त्याच्या सहाय्याने लंगडत लंगडत आत देवघरातील देवाऱ्याजवळ गेले.. आणि तेथेच एक तांब्याचे पात्र ठेवले
होते... त्यां नी धडपडत ते जाऊन घेतले.... आणि देवारयातील कमंडलूमधील सर्व पाणी .. त्या पात्रात ओतले... समर्थ .. बडबड करत होते... "ती आली ... घाई करा ... "ओउह्म .ह्रेम ... नमः तध न राक्ष्तिया रक्षम छायातः अन्तःमम " हे असे काही मंत्र बडबडीत त्यांनी त्या पात्रातील कमंडलू मध्ये फुंकले... त्याचक्षणी इकडे शितल
आणि तिचे आईवडील वृंदावना पर्यंत आले... त्याच वेळी त्यांना दारात कोणीतरी उभे असलेले दिसले... ते समर्थच होते... त्यांनी शितलने आपले पुढे पूल टाकताच क्षणी हातातील पात्र तिच्या पुढ्यात भिरकावले... आणि त्या पात्रातील लालबुंद पाण्याने... एक रेख तेथे ओढली गेली ... आणि "खबरदार ...!! जर एक पाउल पुढे
टाकलस तर .. लांब हो त्या पोरीपासून ... शिव शंभो ची शपथ आहे .. जळून खाक होशील...." समर्थ एका कुबडीच्या साहय्याने उभे होते.. व ते शितलकडे बोट दाखवून बोलत होते... त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते... शितलने पुढे पाय टाकताच समर्थ अजून भडकले .. आणि तसेच ते रागारागात खाली आले... आणि
काही मंत्र पुटपुटत .. शेवटच्या पायरीवर येऊन... त्यांनी आपल्या हातातील कुबडीने... फरशीवर एक दणक आदळला... "दन्नSSSS " आणि त्याच वेळी... त्यांच्या लाकडी कुबड्याच्या तळातून .. वेगवेगळ्या प्रकारच्या पांढर्याशुभ्र सावल्या निघाल्या.... आणि त्या सावल्या सर्व शितल, विनायकराव आणि शितलच्या आईच्या
शरीरातून आरपार झाल्या.... त्याच वेळी त्या तिघांच्या हि शरीरातून एक सुन्न करणारी झनक गेली.. पण शितलच्या डोक्याला मुंग्या झनझनल्या.. आणि तिच्या शरीरात गेलेल्या पांढऱ्या सावल्यांनी शितलच्या सावलीतून एक काळी सावली ओढत आणि हवेत उडत दूरवर नेली.... आणि त्याच वेळी शितल अशक्त झाली... व खाली
कोसळली... विनायकरावानी आपल्या मुलीला सावरले.. व तिला आपल्या खांद्यावर हात टेकवून उचलले. तेव्हा समर्थदेखील पुढे आले.. आणि त्यांनी शितलला आत आणण्यासाठी परवानगी दिली.... व ते तिला आतमध्ये घेऊन आले... आत येताच समर्थांनी.. थोडेसे पाणी आणून शितलच्या चेहर्यावर शिंपडले... तशी तिला शुद्ध
आली.... आणि तिला पाणी पाजले..." त्यावर समर्थांनी शितलच्या माथी हात फिरवला.. आणि "तुमची मुलगी खूप मोठी झालीय विनायकराव.." आणि विनायकरावकडे आणि शितलकडे स्मित हास्याने पाहत समर्थ उठले... व त्यांनी विनायकरावाना बसण्याची व्यवस्था केली.. व स्वतः त्यांच्या पुढ्यात बसले... आणि म्हणाले ..
"पाहिलत विनायकराव .. ती सावली... ती ग्रहणाची मृत्यूछाया " ... ते नाव ऐकताच शितल तरतर उठून बसली ... कारण नेटवर तिने जे वाचले होते .. तेच नाव समर्थांनी इथे घेतले होते... ".....ग्रहणाची मृत्यूछाया... " यावर शितलला थोडे थोडे त्या गौरवचे म्हणणे पण लक्षात येऊ लागले जसे कि त्याचा आणि समर्थांनी सांगितलेल्या त्या
मृत्यूछायेचा ... संदर्भ गौरव शीच येत होता.... तिला वाटू लागले.. आपण त्याला भेटल पाहिजे का ? पण त्याने अजून एक काहीतरी म्हणालेला कोणाचा तरी मृत्यू यावर लगेच ती सर्वांसमोर म्हणाली .. "बाबा !.. आई ! आज .. कोणाचा तरी मृत्यू होणार आहे ...कोणीतरी नक्कीच मरणार आहे ..." त्यावर सर्वांचे लक्ष शितलच्या उदगाराकडे वेधले गेले .. त्यावर समर्थ म्हणाले "काय ? अस कस म्हणतेयस ? कोणाचा होणार आहे मृत्यू .." त्यावर शितल उदास रीतीने खाली पाहत म्हणाली " नाही ! मला माहित नाही.. पण होणार आहे.. अस मला वाटतय .." समर्थांनी विनायकरावकडे शितलची कुंडली मागून घेतली... आणि पाहू लागले.. तेव्हा अचानक त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलला.. ते ताडकन उठले .. व जवळच असलेल्या.. एका जुन्या कपाटाकडे लंगडत लंगडत गेले... त्यांनी कपाट खोलले.. कपाट उघडताच त्यातून एक तेलकट डब्बा बाहेर पडला आणि खाली सांडला... फरशीवर सर्वत्र ते पसरले .. समर्थांचे पाय त्यावर घसरत होते... तरीही स्वतःला सावरत ते कपाटात पाहू लागले ... .... त्याच्या आत खूप खोलवर त्यांचे एक ओम अक्षर असलेल्या कपड्याचे एक गाठोडे बाहेर काढले... पण जसे त्यांनी ते गाठोडे सोडले... त्याच वेळ कुजलेल्या आणि सडलेल्या कागदांचा भुगा बाहेर पडला... समर्थ यावेळी खूप निराशवादी झाले... समर्थांनी आपला हात डोक्याला लावूनच ते खाली बसले.... विनायकराव उठून समर्थाजवळ गेले .." काय झालय समर्थ ?..." समर्थ उत्तरले "...आपली शेवटची आशा देखील कुजली विनायकराव... आजच्या तिथीमध्ये शितलच्या कुंडलीमध्ये काही बदल झाले आहेत.. आणि बदल काही सकारत्मक आहेत.. ते आलेले ग्रह .. त्यांची दिशा याची विद्या माझ्या या पुस्तकात गेलीय... या पुस्तकाची प्रत ... या देशात कोणाकडे आहे मला हि माहित नाही ..." त्यावर शितलची आई म्हणाली ... "मग आता ? .." "आता मी काहीच करू शकणार नाही...." सर्वांचे चेहरे उदास झाले ... समर्थ पुढे बोलू लागले... विनायकराव झाले असे आहे कि...जिथ भर दिवसा अंधार असलेल्या जंगलात एक सूर्याच कवडसे जरी असेल तर ते खूप मोठी आशा घेऊन आलेले असते... ज्यावेळी शितलला ती दुष्ट सावली जुडली आहे त्याच वेळी एक विलक्षण शक्ती देखील शितलला भेटली आहे... हि दैवाची कृपा आहे .. कि आणखी काही माहित नाही लाखातून एकच असा जन्म घेतो ज्याच्याकडे अशी हि विलक्षण शक्ती असते ... शितलच्या कुंडलीमध्ये त्या शक्तीचे संकेत आहेत .. पण ती कोणती शक्ती आहे... हे फक्त माझ्या त्या पुस्तकात लिहले गेले होते...पण तेच आता राहिलेले नाही.. म्हणून या गोष्टीवर तोडगा हि काढू नाही शकणार मी... आणि मी वाहिलेल्या त्या रक्षात्मक सावल्या कितपत त्या मृत्यूच्या सावलीला रोखून ठेवतील मी काहीच सांगू शकणार नाही .. मला क्षमा करा .." विनायकरावांचा धीर खचत चालला होता... त्यांनी समर्थांना नमस्कार करून तेथून काढता पाय घेतला... आणि ते तिघे हि समर्थांचा आशीर्वाद घेऊन बाहेर येऊ लागले... ते तिघेही बाहेर पडताच क्षणी समर्थांनी आपले फाटलेले गाठोडे उचलले... आणि ते कपाटात ठेवायला गेले.. कि इकडे अचानक शितलला काही दिसू लागले... एक दृश्य .. आणि त्यात ... शितलने ते पाहिले आणि परत आतमध्ये पळत सुटली काय झाले असे विचार करीत विनायकराव आणि शितलची आई देखील त्यांच्या मागे धावले ......ते तिघे हि आत पोहोचले तेव्हा .. आत समर्थ कपाटाजवळ मृत अवस्थेत पडलेले दिसले....त्यांचे डोके जमिनीवर आदळून पूर्ण फरशीवर रक्त ओसंडले होते.... हे सर्व पाहून शितल बाहेर धावतच आली ... तिला उलटी आलेली ... शितलला दिसले असे होते कि ... समर्थ कपाटामध्ये ते कागदे ठेवण्यास जात होते .. आणि त्याच वेळी खाली पडलेल्या त्या तेलकट पदार्थांच्या थरावर त्यांचा पाय पडला आणि ते घसरले ... पण त्यांनी चपळाईने कपाटचा दरवाजा पकडला खरा .... ते जसे थोडेसेच हलले त्या क्षणी त्यांना आपल्या जवळ एक काळीकुट सावली उभी असलेली दिसली .. तोच रक्तलेला भयाण चेहरा ते क्रूर हास्य , आणि तो काळा पेहराव ते पाहताच कपाटाचा दरवाजा ...क...ड्क...ड आवाज करीत तुटला... आणि समर्थ परत घसरून पडले व ते थेट डोक्यावरच.. आणि तेव्हा त्यांचे डोके फुटले व ते जागीच ठार झाले .... शितलला आता काहीच समजेना झाले काय करावे .. तिच्याकडे शेवटची एकच आशा उरली होती .... आणि ती म्हणजे ..... "गौरव ....
शितल , विनायकराव आणि शितलच्या आईने तेथून काढता पाय घेतला..
विनायकराव तर निराशवादी.. झाले होते.. शितलला घेऊन ते परत निघाले होते...
शितलच्या आजूबाजूने एक विलक्षण गोष्ट तिला जाणली.. घरची आठवण तिला
अचानक सतवू लागली.. आता पुढे काय घडणार होते तिला याची जाणीव होऊ
लागली.. एक अस्वस्थता दाटलेली होती तिच्या मनात... जणू घरातीलच सदस्य
आता जाईल कि काय ? असे तिला वाटून आले ... तिने यावेळी ठरवले आता
काही झाले तरी त्या गौरवशी संपर्क साधायचा... म्हणून ते तिघे हि घराकडे जायला
निघाले होते... पण वाटेतच अजून एक दुविधा निर्माण झाली होती... यापासून ते
अनभिज्ञच होते.. शितल गाडीमध्ये बसली विनायकराव देखील परत तिने आपला
फोन काढला. आणि त्यात गौरवला एक मेसेज केला ..... "कुठे भेटायचे ? " .. यावर
इकडे ओनलाईन असलेल्या गौरवच्या चेहऱ्यावर एक मिश्कील हास्य उमटले..
त्याने मेसेजला रिप्लाय केला ... "याचा अर्थ ...कोणी तरी .." असा अर्धवट मेसेज
त्याने तिला केला होता.. इकडून शितलने तो सीन केला ... व "हो तू म्हणाला तसेच
झाले आहे .. पण तुला कस माहित होत ? " गौरवचा तिकडून मेसेज आला ...
"द्वेतार शहर ! या ठिकाणी भेटूयात आपण उद्या ..." .. त्यावर शितल "ठीक
आहे....शक्य झाले तर येईल .." गौरव तिकडून उद्गारला ... "तुला तुझ्या संकटाच
निवारण करायचं असेल तर तुला मला भेटावच लागेल अन्यथा होणाऱ्या पुढल
घटनांना तू स्वतः कारणीभूत असशील ..." शितल ने तो मेसज वाचला आणि
त्यावेळी दोघे हि ऑफ लाईन झाले... शितल विचारात पडली .... " या अश्या
परिस्थितीत ! मी त्याला भेटणे बरोबर राहील का ? " शितल आपल्या बाबांना
विनायकरावाना बोलू लागली... "बाबा मला द्वेतार शहराला जायचं आहे...? तिथे
कोणी तरी आहे जो माझी मदत करणार आहे ..?" त्यावर विनायकरावांच पुत्रीप्रेम
झळकू लागल.. त्यांच्या मनातील काळजीनं ओठावर शब्द आले.. "अग शितल
बाळ .. या अश्या परिस्थितीत तुला एकटीला तेथे जाणे बरोबर नाही वाटत हे ...?
कोण आहे तुझी मदत करणारा त्यालाच इकडे बोलावून घे ? " ... शितल उत्तरली
... "बाबा ! तो यायला तयार नाहीये, तो म्हणतोय मलाच तिकडे जावे लागेल !
माझ्या संकटाचे निवारण त्याच्याकडे आहे बाबा ! " त्यावर विनायकराव हताश
झाले... मुलीला अस एकटीला कसे पाठवावे.... बघता बघता ते त्या खेड्यातून
बाहेर आले.. आणि रस्त्याला लागले..... जात जात विनायकरावांच विचारचक्र सतत
घुमत होत. मुलीला असे कसे पाठवावे... पण न राहवून त्यांनी विचार पक्का केला...
सर्वजण घरी पोहोचले.. आजची रात्र उलटून जाणार होती.. उद्या शितलला
परवानगी मिळणार होती... आणि तिच्यासोबत आणखीन कोणीतरी जाणार
होते...आणि तो होता तिचा मोठा भाऊ... राहुल आणि सोबत तोच गाडीचा
ड्रायव्हर... शितल आणि तिचे आईबाब आता घरी पोहचले होते... रात्र झाली होती..
शितल . मनातल्या मनात घुसमटली होती ... तिला एक आभास जाणवत होता..
एक तत्सम आभास कि या रात्री काहीतरी विपरीत घडणार आहे.... बराच वेळ
झाला सर्व जेवणाच्या टेबलावर जमा झाले सर्वामध्ये शितलचा मोठा भाऊ " राहुल
! " तो देखील होताच तिथे तेव्हा विनायकरावांनी वाढलेल्या ताटास हात
लावण्यापूर्वी एक कटाक्ष शितलकडे टाकला.... शितल जेवणाच्या ताटास आणि
राहुलकडे वळले . राहुलला म्हणाले ... "राहुल मला तुझ्याशी काही तरी बोलायचं
आहे .. जेवण झाल्यानंतर माझ्या खोलीमध्ये ये..." राहुलला आज आपल्या वडिलांनी
अचानक असे बोलवले यावर थोडी अचंबक उत्सुकता त्याला आली .." तरी
राहुलने जास्त काही न बोलता होकारार्थी मान हलवली ... . सर्व जन
आपापल्यापरीने जेवून उठले... शितल हि उठली पण तिच्या चेहऱ्यावर
उदासीनता तशीच होती.. जणू मावळला होता तिचा चेहरा सुकलेल्या फुलाप्रमाणे
झाला होता...राहुलचे लक्ष आपल्या बहिणीच्या उदास चेहऱ्याकडे गेले होते...
त्याला थोडी आशंका वाटू लागली "बाबा आपल्याला शितल बाबतीत तर काही
सांगणार नाहीत न ...तरी देखील जाऊन पाहावं " असे विचार करीत जेवन
झाल्यानंतर राहुल विनायकरावांच्या खोलीकडे गेला.... आत मध्ये विनायकराव
आरामखुर्चीमध्ये आपल्या डाव्या बाजूस असलेल्या लाकडी कपारीवर हाताचा
कोपर ठेवून बसून विचारात गुंगलेले होते....आणि तितक्यात राहूल आतमध्ये
आला.. "बाबा ..." राहुलने खुर्चीत बसलेल्या विनायकरान हाक मारली .. पण
पहिल्या हाकेस त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही... म्हणून राहुलने दुसरी हाक
मारली आणि .. विनायकराव थोडे शुद्धीत आल्या प्रमाणे झाले व राहुलला पाहून ते
म्हणाले "ये बस ...इथे तुला काही तरी सांगयचं आहे .. जे फक्त तुझ्या पर्यंतच
राहील..." त्यावर राहुल आपल्या वडिलांच्या शेजारी असलेल्या खुर्चीत बसला...
आणि "राहुल ! तुला माहित आहे, जेव्हा शितल जनमली होती तेव्हा तू कळता
होताच .. " राहुलचा सांषक संदेह आता खातरीमध्ये तबदील झाला होता ... "कि
बाबा आपल्याला शितलबद्दलच बोलणार होते..." त्यावर राहुल म्हणाला .."हो बाबा
माहित आहे मला ...तेव्हाच काय ?" त्यावर विनायकरावानी सर्व काही सांगण्यास
सुरुवात केली ... "राहुल जेव्हा शितलचा जन्म झाला होता... तेव्हा त्या रात्री खग्रास
चंद्रग्रहण होते ... ... " आणि असे करीत करीत विनायकरावानी राहुलला
शितलच्या लहानपनी पासून कशी ती उदास उदास रहायची ... तिच्या डोळ्या
समोर तिच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला होता... शितल उदास एका कोमेजलेल्या
फुलासारखी रहायची तेव्हा पासून ते अपघाती मृत्यू झालेले डॉक्टर , मंदिरातील
घडलेली घटना , त्यांचा ट्रकद्वारे होणारा अपघात आणि नुकताच झालेला समर्थांचा
मृत्यू या पर्यंत त्यांनी सर्व काही राहुलला सांगून टाकले ... आपल्या बहिणीच्या या
अश्या त्रासास आपण कधी जाणवले पण नाही .. स्वतःच्या बहिणीची हि व्यथा
ऐकून राहुलच्या डोळ्यात घळाघळ पाणी आले... त्याने विनायकरावांच्या हातावर
हात ठेवले आणि "बाबा ! तुम्ही हे सगळे घडलेले आज मला सांगताय ! जेव्हा माझी
बहिण मृत्यूच्या जबड्यात अडकलीय तेव्हा..." विनायकरावाचे डोळे देखील भरून
आले .. व जड ओठांनी ते बोलू लागले ... "राहुल योग्य वेळ नव्हती रे भेटत ... पण
आता तुला खरे एका भावाच कर्तव्य पार पडायचं आहे..." राहुलने ओल्या
डोळ्यांनी होकार दिला.. आणि तिथून उठून शितलच्या खोलीकडे जाऊ
लागला.... आतमध्ये शितल बेडवर आपल्या गुडघ्याला दोन्ही हात गुंडाळून
बसली होती...तिच्या पापण्या ओल्या होत्या डोळे सुजले होते ... जणू ती खूप
रडली होती... राहुल तिच्या जवळ येऊन बसला .... आणि त्याने तिच्या माथी हात
ठेवला... आणि म्हणाला .. "बाबांनी ! मला सगळ काही सांगितल आहे ... आपण
उद्या जाउयात त्या द्वेतारला त्या माणसाला भेटूयात आपण " आणि शितलच्या
अंगी एक उत्स्फूर्तता आली .. ती रडतच आपल्या भावाचे आभार मानत त्याच्या हि
बिलगली.. राहुलने शितलला झोपण्यास सांगितले "शितल झोप आता तू सकाळी
लवकर जायचं आहे आपल्याला ..." असे बोलून राहुल चालला गेला.. ... शितल
झोपली होती थोड्यावेळानंतर...१२ :३० वाजता इकडे शितलच्या खोलीमध्ये
शितल काहीतरी स्वप्नात पाहत होती... कोणीतरी वयोवृद्ध ग्रहस्थ आपल्या
पलंगावर पहुडलेले घड्याळाच्या टोलाने जाग येऊन ते उठले होते.... आणि
हातात टोर्च घेऊन काहीतरी शोधायच्या दृष्टीने इकडे तिकडे फिरत होते..... पण
त्या खोलीत त्या गृहस्थाना काही सापडत नव्हते...म्हणून त्या गृहस्थांनी आपल्या
खोलीतून बाहेर पाउल टाकले व ते बाहेर आले .. शितल स्वप्नात होती...ती हे
सगळ स्वप्नात पाहत होती....तिला त्या गृहस्थांचा चेहरा ठीक दिसत नव्हता ... पण
ते गृहस्थ शितलला ओळखीचे वाटत होते... ते तसेच तेथून बाहेर पडले .. आणि
आजूबाजूस असलेल्या खोल्यांमध्ये पाहू लागले शितलला असे वाटू लागले कि ते
गृहस्थ वाजणारे घड्याळ त्याला चावी देण्यासाठी शोधत होते... आणि अखेरीस
अंधारात कोपऱ्या कोपऱ्याने गेल्यावर त्या गृहस्थाना ते घड्याळ सापडले व ते त्या
घड्याळाला चावी देऊ लागले... पण तितक्यात शितलने तिथे अजून काहीतरी
पहिले .. जे त्या गृहस्थांच्या पाठीमागे अवतरले होते... एक काळीकुट्ट छाया हातात
.. एक धारदार तीक्ष्ण लोखंडी वस्तू घेऊन त्या गृहस्थाकडे चालत येत आहे...
शितल हे सर्व स्वप्नात पाहत होती आणि पुढच्याच क्षणी त्या काळ्या छायेने मागून
येऊन ती धारदार वस्तू ... त्या गृहस्थांच्या शरीराच्या आरपार केली... त्यांचे
अंतेन्द्रीय सर्व त्या धारदार वस्तूस चिकटून बाहेरू ओसंडली होती.... शितलची
अवस्था तडफडत असलेल्या माश्या सारखी झाली होती.. तिचे अंग घामाघूम झाले
होते.. त्या गृहस्थाने मागे वळण केले .. आणि तेव्हा शितलला ते दिसले .. व ते
गृहस्थ होते खुद्द "विनायकराव...." शितलचे डोळे एका हिसक्याने उघडले गेले
.... तिच्या ह्रदयाची धडधड अतोनात वाढली होती... आणि तितक्यातच १ वाजला
आणि नको तेच झाले बाहेरील हॉलमधून ..... "टंग..sssss ...टंग
......ssss " असा एक मोठा टोल पडला ...रात्रीचा एक वाजला
होता... विनायकराव आपल्या पलंगावर पहुडले होते.. पण त्या वाजलेल्या टोलने
त्यांना अचानक जाग आली.. बाजूला शितलची आई... झोपलेली होती.. पण तो
टोल अचानक रात्रीचा कसा काय पडला ? हे पाहण्यासाठी विनायकराव
उठले...आणि हातात टोर्च घेऊन ते बाहेर आले इकडे तिकडे अंधारात त्या टोर्चचा
प्रकाश झोत मारून पाहू लागले... आणि तसेच हॉलमध्ये आले... आणि त्यांना ते
घड्याळ देखील सापडले... त्यांनी चावी देणार तितक्यात मागून ती काळी सावली
आली.. ती वार करणार तितक्यातच .. तिकडून दारातून धावत शितल त्या
सावलीच्या अंगावर आली .. आणि ती सावली वर करणार तितक्यात शितलने
जोरात ओरडत ... त्या सावलीला .. आपले सर्व बळ एकटवून दूर धक्का दिला..
त्या सावलीला शितलचा स्पर्श होताच क्षणी... एक पांढरी शुभ्र ठिणगी त्या हॉलमध्ये
प्रकाशित झाली.. आणि ती सावली .. अचानक धूर बनून खिडकीचा काच तोडून ..
बाहेर नाहीशी झाली... विनायकराव अचंबित झाले होते.. आता अर्ध्या क्षणापूर्वी
त्यांच्यावर मृत्यू ओढवलेला होता... हे त्यांना कळताच ते भान हरपून बसले ...
शितलच्या ओरडण्याने घरातील सगळे जन जागे झाले आणि तेव्हा घडलेला प्रकार
विनायकरावनी सर्वाना टाळत बहाना केला.... पण त्या रात्री कोणी झोपले नव्हते...
न राहुल न आपल्या आई बाबा जवळ त्यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेली
शितल.. कोणीच नाही सकाळ झाली... राहुल आणि शितल द्वेतार येथे जाण्यास
निघाले....द्वेतार एक विभिन शहर होत शितलच्या शहर पासून ८० किमी च्या
अंतरावर शितलने आपल्या फोनवरून त्यास मेसेज केले .. "मी द्वेतारला येत
आहे..." त्यावर गौरवचा देखील रिप्लाय आला ... "८३७९९३३७०१ हा माझा फोन
नंबर आहे... द्वेतार मध्ये असलेल्या त्र्यंबक मंदिरात ये ... मी तेथेच बाहेर तुझी वाट
पाहत असेल तिथे येताच मला फोन कर ... " "OK ..." असे म्हणत
शितलने त्याचा नम्बर सेव्ह करून घेतला....आणि फोन बंद केला .... बराच वेळ
गेल्या नंतर शितल आणि राहुलदादा ते द्वेतार मध्ये पोहोचले ... काही क्षणातच
त्यांनी शिवमंदिर देखील गाठले ...आणि तेथे पोहोचल्यावर शितलने गौरवला फोन केला ...
गौरव ने कॉल रिसीव्ह केला.... आणि बोलला ... मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येतोय मागे पहा ... शितलने मागे पाहिले...एक पांढरा शुभ्र शर्ट घातलेला एक २७ वीतील तरून .. बलदंड कसलेला बांधा कोरवी चेहरा.. लांब सडक नाक नि सावळासा .. व खाली आकाशी जीन्स घातलेली ,.. असा दिसणारा एक तरुण मंदिराच्या पायऱ्या चढत वरती मुख्य द्वाराकडे येत होता ....त्याच्या उजव्या हातात फक्त एक लाल दोर मनगटावर गुंडाळले होते... मजबूत बांधा असलेला असा होता गौरव बजरंगबलीचा एक भक्त ...त्या भरलेल्या गर्दीतून फक्त तो एकटाच असा होता ... चेहर्यावर भक्तीचे ते झळकत होते त्याच्या गौरवला येताना पाहूनच शितलला जाणवू लागले.. एक आनंदी उत्साह तिच्या मनात जणू एक प्रसन्नता आली होती... गौरवने शितलला पहिले आणि ओळखले होते.. कारण तिच्या कानास तिने तसाच फोन धरला होता... आणि गौरवला पाहत होती .. गौरवच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते... न त्याच्या मनात भावना... शितलला पाहून त्याला फक्त एकच वाटत होते.. हिला मदतीची गरज आहे . आणि आपण एक मदतगार ... बस्स ... 
गौरव पायऱ्या चढत-चढत शितलच्या दिशेने येत होता.... सोबत राहुलला देखील त्याने पाहिले..... वरती येत तो त्या दोघांच्या जवळ पोहोचला... गौरवने शितलकडे आणि राहुलदादाकडे पाहिले.... दोन्ही हात जोडून तो उद्गारला " मी गौरव ! " राहुलने आपला हात पुढे केला आणि गौरवशी हात मिळवला..... माझ्या बहिणीचे जीवन
वाचवने आता तुमच्या हातात आहे... राहुल आणि शितल या दोघांचा हि चेहरा दीन वाटत होता.... गौरव त्या दोघांना म्हणाला .... "हम्म ... ठीक आहे चला माझ्या सोबत " मंदिरापासून ते तिघेही गाडीतून निघाले.... गौरव त्यांना काही काही वळणे मार्ग सांगत होता.... तसे तसे ते गाडी नेत होते... आणि काही वेळ गेल्यानंतर एक जुनेसे
पण चांगले घर आले... बाहेरून त्या घराला पाहत एक शांतता वाटत होती.... असे कि घरात कोणीच नाहीये.. घर देखील आजुबाजूला असलेल्या विरळ वस्तीमध्ये होत.. गौरवच्या घरामागे सबंध हिरवळ आणि डोंगररांग पसरली गेली होती... शितल तो देखावा पाहून जणू आपले दुख काही काळाकरीता विसरूनच गेली होती.... गौरव
देखील आपल्या घराचे फाटक उघडतच मागे शितलच्या झालेल्या प्रसन्न चेहऱ्याला निहारत होता.....त्याने आपले फाटक उघडले... राहुल व शितल दोघेही.. फाटकातून आतमध्ये आले...आत पाउल ठेवताच शितलकरिता अचानक एक वेगळा प्रसंग जन्मला त्यात शितल उभी होती तशी तिची नजर वरती गेली आणि तिला खिडकीत एक तिच्यापेक्षा
थोडी लहान वयाची मुलगी उभी असलेली दिसली....शितल ते पाहून झटक्याने राहुलदादाकडे सरकली..... शितल जशी दचकून मागे सरकली तसे पुढच्या क्षणात तो प्रसंग नाहीसा झाला आणि वरील खिडकीमध्ये असलेली मुलगी देखील... राहुलदादाने शितलला असे दचकलेले पाहून विचारले.. " काय झाले शितल ? " राहुलदादा
थोडे अचंबित झाले व त्यांना परत संदेह आला.... कि शितलने ती सावली तर नाही परत पाहिली...म्हणून त्यांनी शितलला परत विचारले "कि अजून तेच दिसले तुला ? " शितल आपल्या भावाकडे वळून म्हणाली "नाही दादा .. यावेळी वेगळच कोण तरी होत ..." त्यांच्यासमोर गौरव दार उघडून उभा होता... आणि मागे चलत असलेल्या
शितल आणि राहुलदादाचे संभाषण ऐकत होता....त्याने एक कटाक्ष टाकत शितलकडे पाहिले ... आणि खाली आला.... व म्हणाला ... "काय पाहिलेस तू ? " त्यावर राहुलदादा म्हणाला." काही नाही " त्यावर गौरव म्हणाला.... "तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन माघारी जाऊ शकता .." कारण तुम्ही इथे पिकनिकला नाही आलात ....इथे
तुम्ही मदतीसाठी आला आहात, तिला जे दिसत ते मला कळाले पाहिजे... त्या शिवाय मी तिची काहीच मदत करू शकणार नाही.... त्यावर शितल म्हणाली... "मी एक मुलगी पहिली .. इथून वरती त्या खोलीमध्ये गौरवने तिला परत विचारले "ती कशी होती दिसायला .." शितल पुढे सांगणार कि तितक्यातच ,
"व्हूह....व्हुऊ ... " असा घरातून आवाज आला .. तो .." व्हाऊ ... व्हाऊ " असा भुंकण्याचा आवाज आला ...आवाज येताच गौरव गालातल्या गालात हसला...त्याने आत पाहिले..... आणि आतमध्ये असलेल्या टाइल्सच्या फार्श्यांवर .... एक भुरकट भुरकट रंगाची प्रतिमा दिसली... सर्वांनी थोडे पुढे होऊन पाहिले.. आणि आतमधून
..काळसर, भुऱ्या रंगाचा ..ताठर दिसत असलेला ..झुपकेदार शेपटीचा....केसाळ असा रॉकी बाहेर आला....तो गौरवचा पाळीव कुत्रा होता... एकदम तीक्ष्णता असलेला..गौरवच्या प्रत्येक पेरानोर्मल कार्यात रॉकीचे खूप मोलाचे सहभाग होते गौरवचा लाडका.. गौरवला पाहताच त्याच्या पायाशी रॉकीने लोटांगण घ्यायला सूरु केले... रॉकी गौरवच्या पायात स्वतःला गुंडाळत होता...गौरवने देखील मायेने
त्याच्या मानेवर हात फिरवला ... आणि शितलकडे वळत म्हणाला ... "हा माझा एकमेव कुटुंबातील सदस्य ... रॉकी याच नाव .. या आतमध्ये " असे म्हणत गौरव तेथून उठला .. तेव्हा राहुलदादा .. रॉकीजवळून आला पण रॉकीने त्याला काही केले नाही... पण अचानक .."घुर्रर्र ...घुरर्र्रर्रर " असा आवाज आला तो आवाज रॉकीचा
होता रॉकी गुरगुरला.. गौरव जागीच थांबला ... तेव्हा त्याला एक क्षण लक्षात आला .. जेव्हा तो रॉकीला घेऊन एका पिशाचास शोधण्यासाठी गेलेला होता तेव्हा देखील रॉकी त्या पिशाचला पाहून असाच गुरगुरला होता ... गौरव मागे वळला .. तेव्हा रॉकी शितलकडे पाहून गुरगुरत होता..पण जसे शितलने पाउल पुढे टाकले ... तसा
रॉकी अचानक उठून तिच्या आडवा आला ... आणि .. जोरजोरात तिच्या पायात पाहून भुंकू लागला ... "गौरव हे सर्व पाहतच होता.. त्याला हे कळून चुकले होते.. कि रॉकीने काही तरी पाहिलंय जे शितलच्या सानिध्याने या घरात येऊ पाहतय ..." गौरव तोंडात हळूच पुटपुटला .. "जय बजरंगबली ..." आणि त्याने रॉकीला जोरात
ओरडून... आज्ञा दिली ... "रॉSSSSकीssss.. छोव .. " त्याच क्षणी रॉकीचे कान टवकारले आणि रॉकीने आपल्या उभ्या होत्या त्या जागेवरूनच एक उडी घेतली ..आणि शितलच्या मागे तिच्या सावलीवर उडी मारली.. आणि असे दिसून येत होते... कि रॉकीने जणू शितलची सावली चावू पाहत होता.. अचानकच तेथे
शितलची सावली आकार बदलू लागली...शितलच्या सावलीमधून एक सावली विभिन्न झाली ती सावली शितलच्या इर्द गिर्द फिरू लागली.. गौरव ते पाहतच स्वतः पायऱ्या उतरून त्या सावली जवळ येऊ लागला...अचानक वाऱ्याच्या झुळुकासमवेत ..ती सावली जणू ओझळ झाली.. गौरव राहुलदादा इकडे तिकडे पाहू लागले.. पण
त्यांना काही दिसले नाही गौरवने रॉकीला घेतले व आतमध्ये आला...त्या पाठोपाठ शितल आणि राहुलदादा देखील आत आले.. आत येत शितलला समोर एक फोटोफ्रेम दिसली... शितल पुढे होऊन ती पाहू लागली..त्यात एक मुलगी होती .. आणि आजूबाजूला देखील काही फोटो होते...पण त्या फोटोमध्ये एक निराळी गोष्ट होती..
काचाची फ्रेम असून देखील बाहेरून येणाऱ्या सूर्यकिरणाचे प्रतिबिंब त्यात उमटलेले दिसत नव्हते एवढच नाही तर खुद्द शितलला स्वतःचे देखील प्रतिबिंब दिसले नव्हते..शितलच्या लगेच लक्षात आले हि तर तीच मुलगी होती जिला तिने बाहेर पाहिले होते...शितलने गौरव ला तत्काळ बोलवले आणि सांगितले... हीच मुलगी होती
जिला मी पाहिले होते... त्यावर राहुल आणि गौरव उठून त्या फोटो ला पाहण्यासाठी आले तेव्हा ...."हि माझी लहना बहिण होती... आणि आता ती या जगात नाहीये..." असे गौरवच उद्गार बाहेरपडताच शितलत्या फोटोपासून दूर झाली.. पण दूर होताच तिला एक भास झाला ... या फोटोमधील असलेल्या मुलीची नजर .. तिरकी
झाली होती..व ती शितलज्या दिशेने जाईल त्याच दिशेस फिरली होती.. गौरवने तिला आपल्या जवळ बोलवल ..आणि राहुलदादा व शितल दोघांनाहि सांगू लागला.. "हे बघा .. शितल जेव्हा ग्रहणाच्या वेळी जन्मली आहे ..तेव्हा तिच्याशी एक विशिष्ट सावली जी एका दुष्ट आत्म्याची आहे ...अशी सावली हि पाताळातून ग्रहणाच्या
दिवशी काही प्रकारच्या शुद्ध आत्म्याच्या म्हणजे नवजात आत्म्याच्या शोधात असतात .. आणि नवजात आत्मा फक्त असते ती नवजात शिशुची आणि शितलची शक्यतो त्यांनी का निवड केली हाच प्रश्न उरतोय ? तुम्ही तिची कुंडली आणली आहे ना ? या साठी आपल्याला एका व्यक्तीला भेटाव लागेल... " त्यावर राहुलदादा म्हणाला
"हो आणलीय आम्ही कुंडली आणि कोणाला भेटायच... तु या मध्ये काही करू शकत नाहीस का ? " त्यावर गौरव म्हणाला मी फक्त त्या आत्म्याला शितल पासून वेगळ करू शकतो पण नष्ट नाही करू शकत आणि नष्ट फक्त एक जणच करू शकतो..आणि गौरवने एक नाव घेतले " विधुर !" राहुलदादा त्यावर प्रश्नांवला .."हे
कोण आहेत ...? " गौरव त्यावर उत्तरला "हे एक महान ज्योतिषी आणि भटजी होते...त्यांना अश्या प्रकारच्या गोष्टीची अफाट माहिती होती..." राहुलदादा पुढे त्याचे वाक्य तोडत म्हणाला .. "होते म्हणजे आता काय झाले त्यांचे ? कुठे आहेत ते ? " गौरव म्हणाला ... "मला माहित आहे ते कुठे असणार ? " त्यावर ते तिघे हि घराबाहेर
पडले .. बाहेर रॉकी आता शांतपणे बसून होता... शितलने त्याच्या जवळून जात त्याच्या केसाळ मानेवर हात फिरवला.. तिच्या कोमल हाताच्या स्पर्शाने .. रॉकी . गडगड लोळू लागला .. त्याने आपले अंग शितलच्या हातावरती टाकून दिले.. 'आउन्न्न...आउनन्न.. " असा आवाज करू लागला... गौरवने रॉकीला दूर केले व शितलला
चलण्यास सांगितले... जात जात गौरवने शितलला विचारले ... "तू मघाशी माझ्या बहिणीला पाहिलस न ? ..." असे बोलत ते गाडीजवळ आले ... शितल त्याच्याकडेच पाहत होती... गौरवने तिला गाडीत बसण्याचा इशारा केला.. शितल मुकाट्याने आत बसली.... गौरव च्या मनात एक प्रश्न उभा राहिला ..."विधुर .. कोठे आहात तुम्ही
? ".... आणि प्रसंग दुसरा ... (बारमध्ये ) "ए ! चल बाहेर ... बाहेर टाका रे या हरामखोराला ..फुकटची दारू ढोसायला येतो साला ..." असे म्हणत काही जणांनी एका ५०शितील वय असलेल्या एका माणसाला बारच्या बाहेर फेकले..तो खाली दारू पियुन जमिनीवर पडला होता...त्याला धड स्वत:ला सावरता येत नव्हत तरीही तो
आपले वाढलेले पांढरे काळे केस कसे बसे सावरत .. अंगातील मळका कोट झटकण्याचा अपयशी प्रयत्न करीत उठला.. आणि मागे असलेल्या त्या बारच्या मालकास शिव्याशाप देत जाऊ लागला ... आणि थोड्या अंतरावर एका खराबश्या चोर गल्लीत घुसत तो व्यक्ती आपल्या घराकडे पोहोचला... त्याने दार उघडे पाहिले व
थोड दचकला.. आणि आत येऊन स्वतःच शिव्या देत सुटला कि, अचानक अंधारात समोर उभा असलेल्या गौरवने एक बादली भरून थंड पाणी त्याच्या अंगावर फेकले ... "एय .. कोण आहे बे हा ? तुझ्यातर आता " असे म्हणत तो पुढे आला.... आणि धडपडत पडणार कि गौरवने त्याला येऊन संभाळले.... व नीट उभे केले.. "विधुर !
मी आहे गौरव ..." त्यावर गौरवला त्याने आपले डोळे चोळून पाहिले... " ग गो ...गौरव " गौरवने विधुरला उचलून खुर्चीत ठेवले.. आणि म्हणाला ... "मला तुमची मदत हवीय ..." पण दारूच्या नशेत असणाऱ्या विधुरला काहीच समजत नव्हते गौरव पुढच काही बोलणार कि तितक्यात विधुर झोपी गेले ... आणि एक दीड तासांनी ते
शुद्धीवर आले .. व डोक्याला हात लावून ते उठले.. समोर गौरव, शितल आणि राहुलदादा बसले होते.. गौरवने एका चहावाल्यास बोलवून घेतले होते... तो ती विधुरकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता... पण लगेच चहा ठेवून तो निघून गेला...विधुर उठले व म्हणाले "कशाला आला आहे परत इथे तुला माहितेय न मी आता ते काम
करीत नाही ? नाही मी भटजी फटजी कोणी .." त्यावर राहुल त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला ... "मृत्यूछाया बद्दल आहे हे ..तुम्ही तर याच्याशी परिचित आहात ना ?" त्यावर ते नाव ऐकताच विधुरांच्या समोर आठवणींच गाठोडे पडले व त्यांना आपला परिवार आठवला आणि सर्वात मुख्य म्हणजे त्या परिवारास लागलेली श्राप म्हणून
ती काळी छाया .. त्यावर विधुर गौरवकडे वळले आणि म्हणाले .. "बोल काय झाले आहे ? त्या छायेबद्दल आज अचानक कस ?" त्यावर गौरवने शितल बद्दल एक न एक शब्द विधुरांच्या कानावर घातला..सर्व सांगून झाले ... विधुर दाराशी उभे होते .. आणि गौरव त्यांच्या मागे उभा होता . विधुर म्हणू लागले .. "एक वेळ मी हि माझा
परिवार गमावला आहे, यामध्ये पण आज तस नाही होऊ देणार मी, या पोरीसोबत " असे म्हणत विधुरने शितलची कुंडली मागितली... आणि कुंडली पाहताच विधुरने त्यावरून एक ... विलक्षणता त्याला जाणवली सर्व रेखांकन , सर्व अक्षरे ,मुद्रा कुंडलीची पद्धत हे सर्व ओळखीचे वाटत होते त्यांना ते एक एक पान चाळून पाहत होते ..... म्हणून त्यांनी राहुलकडे पाहिले आणि विचारले... "हि कुंडली कोणी बनवली आहे..." त्यावर राहुलने पुढे होऊन म्हणाला.... "समर्थ भटजीनी...." ते नाव ऐकताच विधूर जागीच ताडकन उभे राहिले... त्यांच्या नसानसात एक उत्साह एक आशावादी उत्साह संचारला होता... ते तसेच पुढे आले... व त्यांनी गौरव राहुलदादा आणि शितलकडे पाहत म्हणाले... "समर्थ माझा भाऊ आहे...." हि सर्व लिखावट , रेखांकन सर्व मी ओळखतो... माझा मोठा भाऊ आहे समर्थ.... कुठे आहे तो ? तुम्हाला माहित आहे ? " राहुलदादा त्यावर उद्गारला "माफ करा विधुर आम्हाला पण तुमचे भाऊ समर्थ आता हयात नाही राहिले ...त्या सावली मुळे समर्थांनी देखील आपले प्राण गमावले आहे.... " विधुर ते ऐकून दुखी झाले पण मनात त्यांच्या त्या सावली बद्दल द्वेष अजून वाढला ...काही काळापूर्वी त्यांना गैरसमज झाला होता कि त्यांचे भाऊ हे देखील गमावले आहेत ....पण समर्थ जिवंत होते... त्यावर शितलच्या डोक्यात एक गोष्ट चमकली... ते पुस्तक .... ती विधुराना लगेच म्हणाली ... "म्हणजे तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल माहित असेलच ना.." त्यावर विधुर म्हणाले .. " कोणते ते? " विधुरानी खाली डोळे फिरवत आठवण्याचा प्रयत्न करू लागले ... त्यांचे लक्ष परत त्या कुंडलीकडे गेले त्यांच्या डोळ्यातून तेव्हा घळाघळा पाणी आले आणि विधुरने ती कुंडली परत वाचली.. त्यांना आशेची एक किरण दिसू लागली ... होती... शितलच्या कुंडलीत झालेले बदल जे समर्थांना जाणवले होते .. तेच बदल विधुराना देखील जाणवले होते ..एक सप्त बिंदू तारांकन सहा ताऱ्यांचे बिंदू आणि त्या मध्ये मुख्य एक तारा .. असे ते तारांकन बनत होते...आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आले ... कि शितल कोणत्या पुस्तकाबद्दल बोलतेय... विधुरांनी ती कुंडली तशीच हातात घेतली .. आणि आपल्या खोलीतील .. एका जुन्या पेटाऱ्याजवळ गेले... त्यावर अत्यंत धूळ माती आणि आणि कोळ्यांचे जाळे होते... त्यांनी हातानीच ते आजू बाजूला केले ... व तो पेटारा त्याची कुंडी काढून तो उघडला ... आणि त्यात बरेच कपडे गाठोडे होते..त्यांनी ते सर्व बाजूला काढून फेकले. .. व ते पुस्तक पाहू लागले ...पण अचानक त्यांनी एक कपडा हि काढला व तो बाहेर फेकला .. आणि त्याच बरोबर अचानक "धप्प ..." असा आवाज आला ...आणि विधुराने ... व गौरवने तिकडे आलेल्या आवाजास पाहिले... विधुरांनी गौरवकडे एका नजरेने पाहीले ... व गौरव तसा पुढे आला .. व खाली बसून त्याने त्या कपड्याचे एक एक .. पदर बाजूला सारले ... शेवटचा पदर हटताच.. सर्वांसमोर ते पुस्तक आले .... ते पुस्तक मुख्य पुस्तकाचे नक्कल होते... पण तेच होते... गौरवने ते उचलले ... पण ते सही सलामत होते .. शितल त्या पुस्तकास पाहत होती... तिला वाटत होते .. मुख्य पुस्तकाप्रमाणे हे देखील...तर नाही नष्ट होणार ... पण नाही तसे झाले नाही... ते खरच सही सलामत होत... शितलच्या मनात आता आनंद उमटू लागला होता.... तिची मेलेली आशा आता परत जिवंत झाली होती.... गौरवने ते पुस्तक बाहेरच्या खोलीत असलेल्या टेबलावरती आणले तेथे सूर्यप्रकाश निखरत होता... आणि मध्यभागी ठेवले... विधुरांनी त्या पुस्तकावरील धूळ सर्व काढली आणि त्यावरती नाव होते .. विधिपुराणम विधुरानी त्यास दोन्ही हात जोडून नमस्कार केला ... आणि ते उघडले ... बरेच पान उलटल्यानंतर .. त्यांना हवे ते भेटले .... पुस्तकाच्या मध्यभागीच ते तारांकन सर्वाना दिसले... आणि विधुरांनी आपल्या हातातील कुंडलीतील तारांकन त्या पुस्तकातील तारांकनाशी मिळवून पहिले.... आणि ते सारखेच होते... विधुरांनी वेळ न घालवता त्या आकृतिबंध रेखांकनाखाली दिलेल्या सूचना वाचल्या .... आणि त्या प्रमाणे त्या सावलीबद्दल त्यांनी जाणून घेतले.. कि ती कशी उदभवते , तिचे संक्रमण , तिची शक्ती , तिचा श्राप आणि ती कशी सावलीमध्ये जगते सावलीचा अंधारच तिचा आसरा आहे असे सांगितले होते त्यामध्ये हे सर्व काही होत त्यामध्ये पण त्या तारांकनाचा वेगळाच अर्थ दिला होता खाली लिहलेल्या सूचनामध्ये कि अश्या वेळी जन्म घेणारा जीव " दूरसमय दृष्टी" घेऊन जन्मतो ... अश्या जीवास होणारा मृत्यू कळू शकतो .. पुढे कोणाचा मृत्यू घडणार आहे हे कळू शकते... आणि हे तारांकन हे देखील दर्शवते..कि या माहमध्ये (या महिन्यात ) पुन्हा तोच चंद्रग्रहणाचा .... मुहूर्त येतोय .. आणि यावेळी हि मध्यरात्रीच ग्रहणकाल सुरु असताना ती सावली ... त्या जीवापासून काही कालावधी साठी संपूर्णपणे वेगळी होते...त्यावेळी ती तिच्या मूळरुपात येते आणि त्यावेळीच त्या मृत्यूछायेचा अंत होऊ शकतो....
एवढे सगळे बोलून झाल्यानंतर विधुरांनी ते पुस्तक बंद करू ठेवले... आणि गौरवकडे वळले... "गौरव याचा उपाय तर आता सापडला आहे. उद्याच्या मध्यरात्री येणाऱ्या चंद्रग्रहणाच्या वेळी, ती आत्मा! शितलपासून संपूर्णपणे वेगळी होईल... तेव्हाच ते कार्य आपण करू शकणार.. आणि आजची रात्र हि मृत्यूच्या तांडवाची रात्र आहे ..
आज विचित्र घटना घडण्याची शक्यता आहे... तेव्हा सर्व संभाळून रहा ... उद्या आपण त्या छायेचा नायनाट करूयात..फक्त आजची रात्र जाउद्या.. त्यावर शितल पुढे होऊन म्हणाली.. "हो आपण ते करूच... पन तोवर तुम्हाला काय झाले तर ?" गौरव तिला म्हणाला "म्हणजे ?" त्यावर शितल म्हणाली "झाले असे कि ज्या व्यक्तींनी
माझी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.. त्या लोकांना त्या आत्म्याने त्या छायेने मारून टाकले आहे... मग तुम्हाला काय झाले तर ? " त्यावर विधुर म्हणाले... "आता कोणाला काही होणार नाही..." आणि गौरवच्या खांद्यावर हात टाकत ते म्हणाले..."हा पहाड सारखा माणूस कशाला आहे ... आपल्या रक्षणासाठी तर आहे हा ? "
त्यावर शितल गौरवकडे पाहत थोडेसे स्मित हास्य करीत लाजली....आणि तरीही काही धोका होऊ नये म्हणून विधुरांनी शितलला सांगितले..अंधार त्या सावलीचे शस्त्र आहे.. तुम्ही सतर्क राहा.. मी उद्या येईल आपण सर्व कार्य...गौरव तुझ्या इथे उरकून घेऊयात...." आणि हे झाल्यानंतर गौरव, शितल आणि राहुलदादानी त्यांचा
निरोप घेतला... व ते गौरवच्या घराकडे येण्यास निघाले.... आणि गाडीत बसून ते तिघेहि घरी पोहोचले... रॉकीदारातच पडून होता... गाडीचा आवाज ऐकून रॉकी .. अचानक उठला.. आणि गौरवकडे धावत आला...गौरवने हि त्या कुरवाळले आणि ते पुढे आले .. रॉकीजणू आता जास्तच त्याच्या पायात .. घोटाळत होता... गौरवला
रॉकीचे म्हणणे समजत नव्हते.. खरेतर रॉकी त्यांना आत जाण्यापासून अडवत होता.. हे गौरवच्या लक्षात नव्हते आले ... आणि ते तसेच आतमध्ये जाऊ लागले.... पण रॉकी ..गौरवने त्याच्या पट्ट्यास धरले होते.. व त्याला आत नेण्याचा प्रयत्न करू लागला .. आपले दोन्ही पाय पुढच्या उंबरठ्यावर अडकून रॉकी थांबला होता...
जेणेकरून तो आत येण्यास नकारत होता.. रॉकीसारखा सारखा आतमध्ये पाहताच मागे मागे जाऊ लागयचा... गौरवने जास्त आटापिटा न करत त्याला तिथेच बाहेर सोडले...रॉकी गौरवला आत जाताना पाहून भुंकू लागला.. पण गौरवने त्यावेळी रॉकीकडे लक्ष दिले नाही....आणि ते आतमध्ये आले..दिवसभरात झालेल्या त्यांच्या
कामामुळे ते बाहेरून मनामध्ये एक आशेची लहर ठेवून होते.... शितलदेखील आता प्रसन्न वाटत होती...तिला आता वाटत होते.. एकदाचे आपण या संकटातून बाहेर सुटणार.... आणि तितक्यात शितल घरातील वरच्या खोलीकडे जाणाऱ्या पायऱ्याजवळ उभा होती....आणि तितक्यात तिला पायऱ्यानच्या दुसऱ्या टोकास एक मुलगी
उभी असलेली दिसली.. असे वाटत होते...त्या मुलीला कोणी तरी बेदम मारले आहे.. तिचे ते सुजलेले तोंड ओठातून आलेले रक्त... इकडे राहुल आणि गौरव एकमेकाशी काही बोलण्यात गुंगले होते.. आणि शितल इकडे त्या मुलीस पाहत होती...ती गौरवच्या बहिणीचीच आत्मा होती...राहुलइकडे गौरवला त्याच्या कुटुंबाबद्दल
विचारत होता... गौरव हि उत्तरला "माझ्या कुटुंबात माझी लहान बहिण आणि माझे आई, वडील आम्ही इतकेच होतो...मी माझी बहिण आम्ही सगळे खूप खुश होतो... माझी बहिण सतत नेहमी हसत राहायची ....पण एकदिवशी अचानक माझी बहिण घाबरलेली राहू लागली.. ती कधी आमच्या तिघापासून वेगळी होत नव्हती... तिला
एक असुरक्षितपणा जाणवत होता... तेव्हा मी काहीच नव्हतो...ना पेरानोर्मल एक्सपर्ट न कोणी... " राहुल हुंकारला "हम्म्म ...पण मग झाले काय होते ?" गौरव त्याला बोलू लागला...माझ्या बहिणीच्या खोलीत तिच्यासोबत एक आत्मा पण रहायची एक दुष्ट काळी आत्मा जिने माझ्या बहिणीच्या आत्म्याला जखडले होते... आम्ही तिच्या
जवळ असून देखील काही करू शकत नव्हतो....ती आत्मा माझ्या बहिणीला रोज त्रास द्यायची...माझ्या बहिणीच्या आत्म्याला ती दुख पोहचवायची.. शेवटीमाझ्या बहिणीने कंटाळून आपले प्राण त्यागले...त्या धक्क्याने माझे आईबाबा देखील गेले.... मी एकटा पडलेलो होतो.. तेव्हा विधुर आले व त्यांनी मला सहारा दिला.. आणि दुष्ट
आत्म्यांशी लढण्यासाठी तंत्र.... माझ्या घरात ती काळी दुष्ट आत्मा माझ्या बहिणीच्या मृत्यूनंतर देखील होती... मी प्रथम तिचा नायनाट केला... इकडे शितल त्या मुलीस पाहतच होती.. त्या मुलीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आले होते..त्या मुलीने शितलकडे हात केला ... शितलतिला पाहतच होती... त्या मुलीच्या मागे अंधारात
तिला कोणीतरी उभे असलेले दिसले...अचानक त्या मुलीच्या मागून दोन हात आले....लालभडक आणि लांब नखांचे ते हात होते...त्या पैकी एक हात त्या मुलीच्या माथ्यावर आला आणि दुसरा तिच्या पोटावर .. शितल पुढे सरसावणार तितक्यात त्या मुलीची किंकाळी निघाली.... आणि त्या दोन्ही हातानी त्या मुलीला अंधारात खेचत
नेले... शितल ते पाहतच होती.. कि तिला अंधारात दोन पांढरेडोळे व हसताना एक पांढऱ्या दातांचा जबडा दिसला...शितल घाबरून मागे पडली... तेवढ्यात गौरव ते पाहून उठला आणि तिच्याकडे धावत आला ..."काय झाले शितल ? " शितलला त्याने विचारले राहुलदादा हि तोवर तेथे आला...शितलने गौरवकडे पाहीले व आपला
हात उचलत वरती केला आणि त्या पायऱ्याच्या टोकास आपले बोट केले... गौरवने तेथे निरखून पाहिले.. पण त्यास काही दिसले नाही..त्याने तिला विचारले "काय पाहिलस तू तिथे ?" त्यावर शितल उत्तरली "तुमची बहिण ..आणि ती काळी सावली .." त्यावर गौरवच्या दोन्ही भुवया उडाल्या.... गौरवने शितलला काही दुसरा शब्द न
बोलता त्याने राहुलदादा आणि शितलला त्यांची त्यांची खोली दाखवली... रात्रहि खूप झाली होती... गौरव तिला म्हणाला "काही काळजी करू नकोस, मी पाहून घेईल....मी आज रात्रभर जागाच राहील " असे म्हणत त्याने शितल व राहुलला झोपण्यास पाठवले... राहुलने दारातच उभा असलेल्या रॉकीकडे गेला.. "रॉकी ! बाळा
आजची रात्र कसोटीची रात्र आहे... " रॉकी त्याच्या गौरवच्या डोळ्यात डोळे घालून जणू त्याचे बोलणे समजत आहे असे ऐकत होता... आणि भुंकून त्यास प्रतीसाद देत होता..."रॉकी मला आज तुझी खरी गरज आहे...आपल्याला त्या सावलीला शितलपासून दूर ठेवायचं आहे... आणि काय माहित रे अचानक माझ्या मनात तिच्यासाठी
एक आपले पण जागत आहे... माझा साथ देणार ना.. चल मग आतमध्ये माझ्यासाठी " रॉकीने जणू त्याच म्हणणे मान्य केले... आणि तो देखील उंबरठा ओलांडून आतमध्ये आला....गौरवच्या एका हातात रॉकीच्या गळ्यातील पट्टा तर दुसऱ्या हातात टोर्च होते....असाच तो घराच्या प्रत्येक कानाकोपर्यातून टोर्चचा तो उजेडाचा मोठा
'गोल' इकडे तिकडे फिरवत पाहत होता.. शितलने नेमके काय पाहिले होते ते....पण त्याच्या शोधास यश आले नाही काही. इकडे शितलने मन दुसरीकडे रमवावे याकरिता .. बाहेरून येणाऱ्या चंद्रप्रकाशास निहारत होती.. त्याची ती सुंदरता .. पण अचानकच तिच्या मनामध्ये गौरवबद्दल काही विचार येऊ लागले...आणि तिने
तश्याच स्थितीमध्ये... आपल्या फोनला हेडफोन लावून ते कानात घालून ऐकू लागली...त्या ऐकत असलेल्या गाण्याच्या सुरास मिळती जुळती साथ देत... शितलहि मंजुळ आणि मधुर आवाजात गुणगुणू लागली...त्याचवेळी बाहेरून जात असलेल्या गौरवने तो आवाज ऐकला "इतक्या रात्री कोण गातय.." असा विचारकरीत तो
आवाजाचा मागोवा घेत शितलच्या खोलीजवळ पोहोचला त्याने दाराला आपले कान लावले आणि हळूच दार उघडले.. आतमध्ये खिडकीत उभी असलेली शितल चंद्राची सुंदरता पाहत गाणे गुणगुणत होती.... आणि त्या चंद्रप्रकाशात शितल अजूनहि सुंदर दिसत होती... तिचा गोरा रंग अजून निखळला होता... आणि गौरव तर
मंत्रमुग्ध होऊन तिला पाहू लागला होता... जणू तिच्याविषयी त्याच्या मनात एक प्रेमाची कळी उमगू लागली होती... तितक्यात शितलला कळाले कि आपल्याकडे कोणीतरी पाहतय... असे तिला भासले म्हणून तिने मागे वळून पाहिले तर दारात गौरव होता... गौरवची थोडी भांबड उडाली.. असे शितलला पाहून.. आणि तो थोडा
घाबरत गोंधळत म्हणाला .... "नाही म मी ! फक्त असाच आल होतो.... सर्व काही ठीक आहे का? ते पहायला " आणि असेच बोलत शितलचे बोलणे न ऐकता तेथून निघून आला...त्यावर शितलने त्याला हाक मारली ... "गौरव !" गौरव तिच्या पहिल्या हाकेसच थांबला आणि मागे वळला "हम्म काय ?" त्यावर शितल उत्तरली
"तुम्ही जे माझ्या साठी करताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद !! मी तुमची आभारी राहील " त्यावर गौरव म्हणाला..."अजून हि धोका टळला नाहीये...सर्व काही उद्याच कळेल " असे म्हणत तो निघाला व शितलदेखील झोपी गेली.. दुसरा दिवस उजाडला ... आणि तो दिवस होता खग्रास चंद्रग्रहणाचा... सकाळी सर्वजण उठले होते..
आणि अचानक दाराची बेल वाजली तेव्हा तेथे दारात उभे होते "विधुर !" सर्व साहित्य आणि ते मुख्य पुस्तक घेऊन ते आले होते... गौरवने त्यांना आत येण्यास सांगितले.. पण त्यांनी घराच्या आतमध्ये पाठ केली आणि आपले तोंड बाहेरच्या दिशेस केले.. व उलट्या पावलांनी त्यांनी घरात प्रवेश केला... आणि आत दोन्ही पाय पडताच
त्यांनी घराचे सर्व प्रकाश उजळन्यास सांगितले...विधुरांनी घराच्या प्रत्येक एका खिडकीदारावर लाल कुंकवानी स्वस्तिकचे चित्रांकन आखले...विधुर त्यावर म्हणाले...मी जेव्हा तुमच्या दारामध्ये आलो मला तेव्हाच समजले ती काळी सावली याच इथेच घरात आसरा घेऊन वावरतेय.... काही आत्मा मानवी नियमांना पूरेपूर जाणवून
असतात... आपण घरात कसे प्रवेशकरतो हे सर्व नियमितचे ते जाणून असतात.. पण आपण त्या नियम विरुद्ध केले तर ते त्यांच्या ध्यानी पडत नाही म्हणून मी घरात पावले ठेवताना उलटे पावले ठेवले .. व त्या आत्म्यास त्या सावलीस भनक हि लागलेली नाहीये कि मी घरात आलो आहे....तिला हे कळताच ती इथून निसटली
असती...पण ती अजूनहि इथेच आहे मला जाणवतय... आणि या स्वस्तिकाची हि सीमा तिला बाहेर जाऊ देणार नाही.. सर्वांनी आपापली तयारी केली होती...तेव्हा विधुर त्यांना सांगू लागले.. जेव्हा ग्रहणकाल सुरु होईल त्याच वेळी ती काळी सावली व तिचा पूर्ण श्राप हा शितल पासून वेगळा होईल.... तेव्हाच आपण त्या वाईट
शक्तीचा नाश करू शकू ... पण आपल्याला काही पवित्र आत्म्यांची मदत घ्यावी लागेल... मी माझ्या यज्ञाद्वारे एक शक्तीशाली पोजीटीव्ह एनर्जीचाओरा तयार करेल.. आणि तो ओरा चंद्रग्रहणाच्या उर्वरित प्रकाशाचा असेल... आणि तो ओरा मला एका चांगल्या आत्म्यामध्ये टाकावा लागेल... आणि ती चांगली आत्माच त्या ताकतीच्या
सहाय्याने त्या काळ्या सावलीस नष्ट करू शकेल... "पण... आपल्याला आता चांगली आत्मा कोठून भेटेल...? विधुर ! सायंकाळ झालीय, अशी आत्मा आपणास भेटणे अशक्य आहे." असे गौरव अवतरला "या जगात काहीच अशक्य नाहीये गौरव..."चांगली आत्मा आपल्याला बोलवून घ्यावी लागेल.. पण ती भेटणार कशी..." त्यावर
शितल म्हणाली .. मला माहित आहे "गौरवची बहिण....! 'निहारिका' " आपण तिची आत्मा बोलवू शकतो कारण ती आजदेखील अतृप्त होऊन या घरात वावरत आहे....ती वेगवेगळ्या कृत्याद्वारे मला तिची पिडा जाणवून देतेय... निहारिकाच एक पवित्र आत्मा आहे जी आपली यात मदत करेल... मला आज कळाल याच कारण, कि
निहारिकाची आत्मा मला का सारखी दिसत होती... आपल्याला तिची गरज पडणार आहे म्हणूनच " आणि तितक्यात वेळ होत येत होता... विधुर तात्काळ आपल्या कामास लागले... व त्यांनी आपल्या यज्ञकुंडात विविध सामग्री टाकली व ती पेटवली आणि आजूबाजूला.. मीठ आणि मेणाचे रक्षात्मक तारांकन बनवले...आणि विधुर
ध्यान लावून मंत्र म्हणू लागले व ते निहारिकाची आत्मा बोलवू लागले...कि त्याचवेळी घराच्या एका कोपर्यातून एक भयंकर किंकाळी सुटली...ती चिर्र चिर्र करीत सगळ्यांच्या कानाचे पडदे फाडेल असा आवाज करीत घुमली... "याआअह्ह्हSSSSS " तो एखाद्या सर्वत्र असलेल्या खिडक्यांचे तावदाने काचेचे फुटू लागले.... सर्वत्र
काचांचा ढीग जमू लागला होता.. काही काचांवर स्वस्तिक रेखाटले असल्याने त्या काचा सुरक्षित राहिल्या...पण संपूर्ण ठिकाणी अंधारच अंधार जमा झाला होता... त्या अंधारात राहुलने व गौरवने शितलला हाक मारली पण शितलचा काहीच प्रतिसाद येत नव्हता अचानक रॉकीदेखील भुंकणे बंद झाले... आणि त्यातच विधुर कंदील
घेऊन उठले...त्यांचे यज्ञ कुंड तसेह अग्नी ज्वाला झळकावत होते ... कि त्यातच सर्वांच्या कानी काही ऐकू आले .... "रात्रीस ....खेळ चाले .. हा गूढ चांदण्याचा ... संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा ..." आणि विधुराना साक्षात समोर कंदिलाच्या प्रकाशात एक भयंकर प्रेत दिसले... पूर्णपणे रक्ताळलेले ...आणि काळेकुट... आणि
त्या प्रेताने पुढच्याक्षणी कोणाला काही न कळता शितलला आपल्या सोबत अंधारात ओढत नेले...तेथे फक्त शितलची किंचाळी सर्वाना ऐकायला आली... गौरव ओरडला "शितल..SSS .." त्याने लगेच विधुराना कळवले विधुर मुहूर्त जवळ येतोय .. मी आणि राहुल जाऊन शितलला शोधतो... राहुलने कंदील घेतला... व तो
इकडे तिकडे धावत शितलला शोधू लागला... गौरव ही धडपडीत शितलला टोर्चने पाहत होता... गौरव वरती पळत गेला... तेव्हा त्याने उजेडाचा गोल इकडे तिकडे फिरवला.. आणि पहिले ... पण अचानक त्याच्या हातास झटका बसून तो गोल त्याच्या बहिणीच्या फोटोजवळ गेला .. तेव्हा निहारिकाच्या फोटो खाली ... जमिनीवर
मांडी घालून ते प्रेत ...बसले होते....त्याने कोणास तरी मांडीवर बसवून आपल्या मिठीत घेतले होते... आणि ते मागे पुढे मागे पुढे झुलत होते.... विचित्र दिसत होते ते एक तत्सम भीतीदायक गोष्ट होती ती...आणि त्याच्या कुशीत त्याने आपल्या नखेदार क्रूर पंज्यानी शितलला धरून ठेवले होते... त्याचा चेहरा ओरबाडलेल्या जखमांनी
भरलेला रक्तबंबाळ दिसत होता.. शितल त्याच्या जखद्यामध्ये होती.. आणि ती भीतीने रडत होतीपण शितल साठी निर्माण झालेल्या त्याच्या मनातील प्रेमाने त्यास ताकद दिली ... व गौरवने पुढच्याच क्षणात चतुराईने त्या प्रेतावर धावा केला...आणि त्याच्या जवळ पोहोचताच क्षणी ते प्रेत शितल पासून वेगळे झाले आणि नाहीसे झाले
... व शितल जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली... गौरवने तिला उचलले... तो पुढे जाऊ लागलाच कि तितक्यात गौरवचे दोन्ही पाय त्या पिशाचाने त्या सावलीने पकडले .. व ते जोरात ओढून त्याला तोंडावर पाडले.. त्याचवेळी शितलहि बाजूला होऊन पडली .. गौरवचे नाक तोंड फुटले गेले. व त्याच्या तोंडून व नाकातून रक्त येऊ
लागले.. गौरव खोकत खोकत उठण्याचा प्रयत्न करत होता..त्यावेळी राहुल ने गौरवचा आवाज ऐकला व तो त्या दोघांच्या मदतीला धावून आला... त्या प्रेताचे ते अक्राळविक्राळ रूप पाहून तो जागीच स्तब्ध झाला.... त्या प्रेताने आपला अणुकुचीदार पंजा त्याच्या दिशेने वाढवला .. व एका झपाट्याने राहुल दूर पायर्यावरून खाली
घरंगळत गेला... आणि इकडे विधुरांनी निहारिकाची आत्मा बोलवण्यात यश मिळवले होते... व त्यांनी चंद्रग्रहणातील उरलेल्या प्रकाशद्वारे ती उर्जा देखील निर्माण केली होती.. फक्त उशीर होता.. तो निहारिका आणि त्या सावलीचा सामोरा समोर येण्याचा.. इकडे गौरव त्या सावलीशी झुंज देत होता... ते प्रेत आपली अनुकुचीदार
पंज्यानी गौरवव असंख्य वार करीत होते.. पण तितक्यातच एक उर्जेचा आणि प्रचंड प्रकाशाचा गोळा.. तेथे निहारिकाच्या फोटोजवळ निर्माण झाला... त्या प्रकाशाची उर्जा ते प्रेत ती .. अभिशापि सावली सहन करू शकत नव्हती....त्या प्रकाशाच्या गोळ्याने काही उजेडाच्या किरणांनी त्या प्रेतावर प्रहार केले.... आणि तितक्यात
विधुरदेखील वरती धावत आले होते...तो प्रकाशाचा गोळा इतर कोणी नसून निहारिकाच होती.... अचानक ते प्रेत विचित्रपणे इव्ह्ळू लागले.. त्याचा आवाज असह्य होत जाऊ लागला होता.... आणि त्याच वेळी चंद्रावरील ग्रहण देखील सुटले ... आणि खाली जणू सर्वांना भूकंपाच धक्का बसला .. व जमीन थरथरत फाटली... त्यात
द्रवरुपी लाव्हा दिसून येत होता जळजळीत लाल तांबडा लाव्हा... स्वतःला सावरत गौरव त्या प्रेताच्या मागे उठून उभा राहिला.. तेव्हा त्याने काही क्षण डोळे झाकले... व बजरंगबलीचे ध्यान केले.. "सब सुख लहे तुम्हारी सरणा तुम रक्षक काहु को डरना ... आपन तेज संहारो आपै तीन्हो लोक हाकते कापे.." असे उच्चार करीत
गौरवने त्या प्रेतास जळत्या लाव्हामध्ये ढकलून दिले... .. "तुझी जागा इथ नाहीये जा परत नरकात..." तेवढ्यात शितल हि शुद्धीवर आलेली होती... राहुल तसाच बेशुद्धावस्थेत पडून होता... तो प्रकाशाचा गोळा हळू हळू कमी होत ... दूर आकाशात नाहीसा होत गेला... त्या गोळ्यात गौरवला आपल्या बहिणीची प्रतिमा दिसली... व
त्याचे डोळे ओलेचिंब होऊन भरून ओघळले... व तेव्हा त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी मऊ स्पर्शी हात पडला...ती शितल होती... जी त्याला धीर देत होती... घराची पूर्ण अवस्था बिघडून गेली होती...काहीच राहिले नव्हते.. गौरवने राहुलदादास हॉलमध्ये आणले.. सकाळ झाली होती .. एक नवीन दिवस उजाडला होता .. एका
नवीन आशे सोबत रात्रीच्या त्या चंद्र ग्रहणासकट आज शितलच्या आयुष्याचा तो अभिशाप तिच्या आयुष्याचे ग्रहण देखील कायमचे सुटले होते.... त्यानंतर शितल राहुल व गौरव शितलच्या घरी आले समर्थांनी सांगितल्या प्रमाणे गौरवच शितलचा जीवनाचा साथीदार बनला होता... विनायकरावांनी त्या दोघांचे शुभमंगल लावून दिले... आणि अश्या रीतीने... आज ग्रहण हि कथा देखील येथेच संपते ... समाप्तः आपली लेखिका :::: शितल गायकवाड धन्यवाद !!!!