Thursday, June 25, 2015

यो अस्मान द्वेष्टी--भयकथा---भुत-पिशाच्च-----नारायण धारप



श्रावण महिन्याच्या अखेरीस कमलाबाई समर्थांच्याकडे आल्या.मध्यमवयीन घरंदाज स्त्री.वयानं पस्तीशीच्या जवळपास असावी.समर्थ नुकतेच दिवानखान्यात येऊन बसले होते.समर्थांकडे येणारे आधीच ताणाखाली असतात.येण्याच कारण कस सांगाव हे त्यांन चटदिशी सुचत नाही.सरळमार्गी पापभिरु माणसं,त्यांच्यावर असला प्रसंग प्रथमच आलेला असतो.ते गांगरलेले असतात.मीच त्यांना मदत करतो.
"समर्थांना भेटायला आलात का?"मी त्यांना विचारल
"हो हो.भेटतील का ते आत्ता?"
"अर्थात ! या ना आत"
हॉलमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या माणसं दाराशीच थबकतात,काहिंच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते,काहिच्या चेहऱ्यावर नवल असत,काही शंकाग्रस्त असतात,काही आनंदी होतात..
कमलाबाई दराशीच थबकल्या,पदराशी चाळा करत म्हणल्या,"समर्थ,मी एकदम अशीच आले आहे,आधी काही लिहलं न्हवत,तेव्हा......"
"पण मी आता मोकळाच आहे की"समर्थ हसत म्हणाले त्यांनी समोरच्या खुर्चीकडे हात केला. 
"या बसा इथं-कशासाठी आला आहात मझ्याकडे?"
"गेलेदोन्तिन महिने ह्यांना....ह्यांना...."त्यांना एकदम रडुच कोसळले
मी जरा पुढं हालचाल कर्ताच समर्थांनी मला खुणेनेच गप्प रहायला सांगितल
पुढे रडायचा आवेग ओसरला,पदरान डोळे पुसतच त्या म्हणाल्या"समर्थ,मला...मला काय करायचं? काही सुचेनासं झालं आहे...मी एकटी...आणि ह्यांना...."
"अस पहा,सुरवातीपासुनच क नाही सांगत,तुमच नाव सांगा,तुमच्या यजमानांच नाव सांगा,ते काय करतात,कसला त्रास होतो ते सांगा"
................
अनंतराव चाळिस वर्षांचे होते,कमलाबाई चौतिस वर्षांच्या होत्या.अनम्टराव मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते.त्यांना मुलबाळं न्हवत.आर्थिक परिस्थिती उत्तम होती.सर्वत्रच होणारे क्षुल्लक मतभेद सोडल्यास दोघांच्यात समरसता होती.मुलबाळाचा मुद्दा गौण झाला होता.संपुर्ण सुखी नसले तरी समाधानी होते-म्हणजे तिन महिन्यापुर्वीपर्यंत.
सकाळी ब्रेकफ़ास्टच्यावेळी अनंतराव म्हटले"काल रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं,इतर वेळीही पडतात,पण हे खडानखडा लक्षात राहिल"
त्यांना स्वप्नात अस दिसल की त्यांना एका लोखंडी पिंजऱ्यात कोंडलेल आहे.पिंजरा अगदी लहान होता.गुडघे मुडपुन हतांची समोर घडी करुन त्यांच शरीर त्या पिंजऱ्यात मावु शकलं होत.अंगावर विटक्या कपड्यांच्या चिंध्या होत्या.पिंजऱ्याचे गज शरीराला चारी बाजुने टोचत होते.पिंजरा एका साखळिन वरच्या छताला एका हुकाला टांगलेला होता.खाली तिन फ़ुटांवर जाडजाड दगडांची फ़रशी होती,भिंतीसुद्धा तशाच प्रचंड घडीव दगडांच्या होत्या.भिंतिना दोन पलिते धडधडत होते.त्यांच्या प्रकाशात फ़रशीवरुन पळत जाणारे उंदिर एवढचं दिसत होत....जाणिव होती ती विलक्षण तहानेची,शरीराला लागलेल्या विलक्षण रगीची,ओलसर थंडीची.पिंजऱ्यातच त्यांना क्षणभर ग्लानी आली.
अनुभव सांगतानासुद्धा अनंतरावांच्या अंगावर काटा आला होता.ऑम्लेटशी नुसता चाळा करत त्यांनी प्लेट बाजुला सारली,दोन कप चहा तेवढाच घेतला.
ते त्यांच्या रोजच्या उद्योगात मग्न झाले.पण हे दोन दिवसच टिकल-पुन्हा ते स्वप्न पडेपर्यंत.
ते पुन्हा त्या पिंजऱ्यात होते,तेच ते अंगाला काचणारे गज,तोच पिवळसर प्रकाश,,तीच ओलिगार फ़रशी .मानेजवळ खाज सुटली होती,मान सरळ होऊ शकत नाही हे त्यांना तोवर अनुभवाने कळल होत.आपण या पिंजऱ्यात कितीकाळ बंदिस्त झालो आहोत हे त्यांना आठवत न्हवत.
मध्यरात्रीच्या शांततेत त्यांना स्वप्नातुन जाग आली,त्या वेदनेचा मागमुस न्हवता,स्वप्नातल्या पिंजऱ्यात त्यांना खुप कष्टान हालचाल करता येत होती.अर्थात हे शक्य नसतं तर ते जिवंत राहुच शकले नसते.कारण ती जख्खड म्हातारी अनापाणी घेऊन आल्यावर त्यांना खाता कसं आल असत? अन्नाच्या नुसत्या आठवणिने पोटात भुकेची कळ उठली.
ती थेरडी येऊन गेलेल्याला किती वेळ झाला?तिच्याखेरीज इकडे कुनी फ़िरकत न्हवत,आणि तिच्या येण्यात तरी कुठे नियमीतपणा होता,क्षणक्षणाला पोटातुन भुकेच्या कळा उठत होत्या आणि मनात भयानक विचार...पुन्हा ती आलीच नाही तर?.....
ते इतका काळ या पिंजऱ्यात खितपत पडले होते की त्यांच्या पुर्वीच्या आयुष्याच्या स्मृतीच नष्ट झाल्या होत्या,कधीकधी तीए म्हातारी दिसली की तोंडातुन आनंदाचा हुंकार आणि हातांच्या बोटातुन एखादा अन्नाचा तुकडा निसटुन खाली पडला की दु:खाचा आवाज....कारण त्या तुकड्यावर ते गलेलठ्ठ उंदिर लगेच झडप घालायचे.
खरोखर त्यांना मृत्युची देणगी हीच दया ठरली असती...नाही नाही नाही ..मनातले विचर त्यांनी बाजुला सारले जर कुठे देव असेल तर त्यांनी त्याची मनोमन प्रार्थना केली,मला जगायच आहे,जगायच आहे ! 
कधी कधी जागृतीआणि स्वप्नावस्था यांच एक विलक्षण मिश्रण त्यांच्या अनुभवात यायच.ते त्या पिंजऱ्यातच सायचे पण त्यांना अन्नपाणी देणारी ती म्हातारी नसायची तर त्यांची पत्नी कमल असायची.कड्याच्या काठावर लटपटणाऱ्या मनाचा तोल कोणत्या दिशेला जाईल याची शाश्वती नसायची.
"अहो ऐकलत का? अहो"त्यांना कोणीतरी गदागदा हलवत होत.त्यांनी डोळे उघडले.
"अहो कितीवेळ हाका मारतेय?"
अनंतरावांची नजर खोली वरु फ़िरली ओळखिच्या वस्तुंवरुन.....
"कितीवेळ हाका मारतेय? कसले विचित्र आवाज काढता..खोल घशातुन आल्यासारखे..आणि हुंदके देऊन रडत होता"
"आता माझं ठिक आहे,मी ठिक आहे"अनंतराव म्हटले
"पुन्हा ते स्वप्न पडल होत का?"
"हो"अनंतराव
"डॉक्टरला का दाखवत नाही?"
"काय गळु आहे का सुज डॉक्टरला दाखवायला? डॉक्टरला भेटलोय सर्व रिपोर्टस नॉर्मल आहेत,मानसिक असेल अस म्हणतात,ते मिश्रा म्हणुन डॉक्टर आहेत त्यांना भेटणार आहे."
पुन्हा असेच दोनचार दिवस गेले,रात्रीची जेवणं झाली,टिव्हीचे कार्यक्रम पाहुन झाले,कमलबाई झोपी गेल्या,आज जागच रहायच अस अनंतरावांनी ठरवल पण त्यांच्या नकळत त्यांना झोप लागली.
त्यांना पिंजऱ्यात जाग आली.सर्व शरीर थंडिने कुडकुडत होत,पोटात तीच भुकेची आग आणि शरीराला रग.आता ते स्वप्न अखंडपणे चाललं होत.त्याचा भंग होत न्हवता,ते पार पार मागे गेले होते,आवाक्यापलिकडे गेले होते..पिंजऱ्यातला कैदी जरासा हलला,जिवघेण्या कळा उठल्या पण त्यांनी पिंजऱ्यातल आयुष्य स्विकारल होत.निशब्द अंधार,एकांत हेच सत्य होत.कधीकाळी आलेले बाहेरचे अनुभव भासात्मक होते.तो पिंजऱ्यात होता,पिंजरा हेच त्याच जग होत.
समर्थसुद्धा कमल बाईंना शांत करु शकले न्हवते.त्यांचे यजमान सकाळी जागेच होत न्हवते,तोंदातुन घरघरल्यासारखा आवाज येत होता.डॉक्टर आले होते त्यांनी तपासणी करुन हॉस्पिटलला हलवले होते तित वेगवेगळ्या तपसण्या होणार होत्या.पण कमलबाई सरळ समर्थांकडे आल्या होत्या.
समर्थ उठले आणि मला म्हटले "आप्पा कमलबाईंना आपण हॉस्पिटलमध्ये सोडुन अनंतरावांच्या कामाच्या ठिकाणी जाऊ"
कमलबाईंना हॉस्पिटलमध्ये सोडुन आम्ही अनंतरावांच्या तब्बेतीची चौकशी डॉक्टरांकडे करुन अनंतरावांच्या कंपनीत गेलो.पर्सनल ऑफ़िसरची चौअक्शी करता जगदाळेंच नाव कळाल,जगदाळे स्पष्टवक्ते होते.
"जगदाळे मला अनंतरावांची खाजगी माहिती हवी आहे,त्यांच्याबद्दल लोकांच मत काय?त्यांचे कोनी वैरी,हितशत्रु वगैरे होते का?"
"अनंतराव फ़ार स्ट्रिक्ट होते,तडजोड त्यांचा स्वभावातच न्हवती" जगदाळे
"एवढ्यात त्यांच कुणाशी काही बिनसल होत का?"समर्थ
"तसे मेमो सगळ्यांनाच येतात..पण..पण ते दासगुप्ता प्रकरण फ़ारच गाजल.तो आमचा पर्चेस मॅनेजर होता,अगदी पुरा करप्ट होता.अनंतरावांनी अधिकारावर येताच त्याला डिसमिस केला,एवढेच नाहितर त्याचे सगळे ड्युज गोठवुन ठेवले,अनंतराव जरुरी पेक्षा जास्त कठोर पणाने वागले"जगदाळे
"दासगुप्तांचा पत्ता द्या"समर्थ
.....................
दासगुप्तांच्या पत्त्यावर पोहचलो तेव्हा दुपारचा एक वाजला होता.घंता वाजवताच दासगुप्तांनी स्वतः दार उघडलेआणि म्हणाले "येस?"
"तुम्ही एवढ्यात ज्या कंपनीत काम करत होता तिथे अनंतराव नावाचे गृहस्थ जि.एम. होते ना?"समर्थांनी दार बंद करत विचारले
"हो"दासगुप्ता सावध झाले होते.
"तुमचे त्यांच्याशी मतभेद्झाले होते का?"
"हो"दासगुप्तांचा संताप उघड दिसत होता
"त्यांची आजची अवस्था माहित आहे तुम्हाला?"
"नाही,काय झाल त्यांना"दासगुप्ता किती अधीर झाले होते
"गेले काही दिवस त्यांना बरं वाटत न्हवतं,आज तर त्यांना ऍडमिटच कराव लागल"
"अस्स!"हातावर हात चोळत दासगुप्ता म्हणाले. त्यांना आनंद झाल्यासारखा दिसतोय का?
"तुमच्या मनातुन त्यांचा सुड घ्यायचा होताका?"समर्थ
"माझ्या?सुड? दासगुप्तागडबडुन म्हणाले "छे छे भलतचं काहितरी"
"स्वतः नाही हो ! पण दुसऱ्या कोणाकरवी"समर्थ
"छे छे नाही नाही"दासगुप्ता नुसतेच गडबडले न्हवते ते आता घाबरले होते"तुम्ही कोण आहात?जा पाहु इथुन,मला काहीही बोलायच नाही आहे"
समर्थ जागचे हलले न्हवते
"तुम्हाला जा म्हणुन सांगतोय ना ! दासगुप्ता पुन्हा ओरडले
"नाही,बसा समोरच्या खुर्चीवर"समर्थ गरजले
फ़टका बसल्यासारखे दासगुप्ता खुर्चीत बसले
"तुम्ही आहात तरी कोण?"दासगुप्ता
"माझ नाव समर्थ आहे,ते मह्त्वाच नाही पण मला तुमच्याकडुन एक नाव आणि पत्ता हवा आहे"समर्थ
"छे छे काहितरीच"दासगुप्ता घाबरले होते"कसल नाव कसला पत्ता?"
"माझ्याकडे पहा,निट पहा"समर्थ
वळत वळत दासगुप्तांची नजर समर्थांच्या नजरेला मिळाली आणि तिथच गुंतली.
मी क्षणभरच समर्थांच्या चेहऱ्याकडे पाहिले,त्यांचे डोळे भयंकर झाले होते,ते बोलले तेव्हा त्यांचा आवाजही दाहक झाला होता.
"दासगुप्ता तुम्ही कोणाकडे गेला होता,तो कुठे रहातो?"
दासगुप्ता मान हलवत होते गळा चोळत होते.चेहऱ्यावरुन घामाचा ओहोळ वहात होता.
समर्थ आता उभे राहिले त्यांनी त्याच आवाजात पुन्हा विचारल 
"दासगुप्ता तुम्ही कोणाकडे गेला होता,तो कुठे रहातो?"
यापुढचे क्षण वर्णन करण कठिण जाणार आहे.कारण नक्की काय झाल मलाही समजल नाही.दुपारच्या प्रखर उन्हात उजळलेली ती खोली एका क्षणात पार अंधारली,साधा अंधार नाही बोचरा आणि दाहक अंधार.माझी शुद्ध हरपण्याच्या बेतात होती मी भितीने डोळे मिटुन घेतले,डोळे मिटता मिटता मला दिसल की समर्थांनी आपले हात दोन्ही बाजुंना आडवे पसरले आहेत,चेहरा वर केलेला आहे.....
वेळेच भान गेल.शरीराची पंचेद्रिये कल्लोळ करुन उठली होती.अननुभुत संवेदनांचा मारा होत होता,मेंदुचे विचारमार्ग असल्या मानवी संवेदनांसाठी न्हवतेच...मला नाही वाटत मी मृत्युच्या इतक्या निकट आलो होतो.दासगुप्ता खुर्चीत एखाद्या चुरमुडलेल्या भुशाच्या बाहुली सारखे वेडेवाकडे पडले होते.
"नाव काय?"समर्थांनी त्याच कठिण आवाजात विचारलं
"शेरभ"दासगुप्ता उत्तरले
तो शब्द ऐकताच समर्थांचे डोळे एकदम बारिक झाले.शरीरात एक नवा ताठपणा आला
"कुठ रहातो?"
"पुलापलिकडेच्या बेटावर"दासगुप्ता
समर्थांनी हात खाली केले,ते जायला वळले तेव्हा मला दिसल की त्यांच्याही चेहऱ्यावर घामाचा बारिकसा ओलावा आलेला आहे
...............
"अप्पा तिन वाजले आहेत,सकाळपासुन अन्नाचा कण पोटात नाही,आपण वाटेतच काहितरी घेऊ,एवढ्यात बंगल्यावर परत जाता यायच नाही" समर्थ
वाटेत आम्ही एका गाडीवर फ़ळांची डिश घेतली
दासगुप्ता ज्याला पुल म्हटले होते ती एक खुण होती.तो एक जुना वापरात नसलेला रेल्वेचा पुल होता,त्याच्या पुढ नदीच पात्र विस्तृत होत होत आणि पात्रात लहान मोठी अशी बेटं होती,मच्चीमारांच्या एकदोन टपऱ्या सोडल्या तर बाकिची ओसाड होती.फ़क्त एक बेट मोठ होत,खाजगी होत...


समर्थांनी त्यांची पिशवी हातात घेतली आणि ओलसर मातीतुन झाडांच्या रांगातुन आम्ही नदीच्या काठावर आलो.
"माझ्या स्पष्टीकरनाची वाट पहात असशील अप्पा,नाही?सगळा अगदी ठरावीक साचा आहे,कितीतरी वेळा आपण पाहिलेला" समर्थ
"मी कितीतरी वेळा पाहिल असेल पण मला आत्ता यातल काही समजत नाही"मी
"कुणीतरी आपल्यावर अन्याय झाल्याची समजुत करुन घेतो,सुडाला प्रवृत्त होतो.एखाद्या वाममार्गी साधकाची,मांत्रिकाची मदत घेतो.हे मांत्रिक सापासारखे असतात-दिसायला भयानक पण त्यातले फ़ारच थोडे विषारी,जहरी असतात"समर्थ
"त्या दासगुप्ताने काय नाव सांगितल?"
"शेरभ.म्हटल तर ते नाव आहे,म्हटल तर नाही.अथर्ववेदकालापासुन चालत आलेल्या मांत्रिकांच्या-यातुधानांच्या परंपरेतलं ते एक पद आहे. एखाद्या संस्थेचा अध्यक्ष असावा तसे,काहि मांत्रिकच ते नाव वापरतात,ते पद मृत्युपर्यंत सिद्ध असतं"समर्थ
"पण ते नाव ऐकताच तुम्हाला काहितरी जाणवलं’
"ते नाव वापरणारा बलशाली असावाच लागतो,त्या सर्वांचा आयुष्यमार्ग एकच असला तरी त्यांच्यात सहकार्य नसत,संघर्ष त्यांच्या एकमेकांतच होतो,जो सर्वात बलशाली तोच या संघर्षात टिकतो"
"अनंतरावांच्या प्रकरणात याचाच भाग आहे?"मी
"हो नक्कीच,आधी शंका आली होती पण ती फ़क्त शंकाच होती,कमलबाईंजवळ अनंतरावांनी पाहिल्याच काहि स्वप्नांच वर्णन केल होत,एक गोष्ट उघड आहे त्यांच्या स्वप्नांत ते एक अखंड अनुभव मालिका जगत आहेत,आता अनंतरावांच्या स्वप्नात प्रगती किती झाली हे समजायला मार्ग नाही त्यासाठी जिथं या स्वप्नांचा उगम होतो तिथच आपल्याला जायला पाहिजे,या शेरभच्या बेटावर "समर्थ
"पण अनंतरावांच्या स्वप्नांवर शेरभच कस नियंत्रण येऊ शकत?"
"अप्पा रोजच्या स्वप्नांपेक्षा ही स्वप्न वेगळी आहेत,खरतर यांना स्वप्न म्हणनच गैर आहे,हे काहीतरी बाहेरच आहे कृत्रिम आहे,त्यांच्यावर लादलेल आहे"
"पण कस?"
"कस?अरे कितीतरी मार्ग आहेत,पण बहुतेक त्याने मोहिनीतंत्राचा वापर केलेला आहे.कोनत्या ना कोनत्या सबबीवर त्याने त्यांच्या घरात प्रवेश केला असावा,त्यांना मोहिनी अवस्थेत नेऊन काही पोस्ट हिप्नॉटिक्स कमांड दिल्या असाव्यात-आणि मग निरोप घेताना त्यांना त्या प्रसांगाची विस्मृती दिली असावी,त्यांनी उच्चारलेला संकेतात्मक शब्द,आवाज,क्रिया,प्रसंग समोर आलं की अनंतराव त्या मोहिनी अवस्थेत जात असतील,आपण काय ते आता पहाणारच आहोत"समर्थ
"आताच?"मी
"अर्थात,अनंतरावांचा बचाव झाला तर आज रात्रीपर्यंतच होऊ शकेल,त्यांची बाह्य जगाची जाणिव आता पुर्ण गेली आहे.ते त्याच्या पुर्ण कह्यात गेले आहेत.आज रात्रीच तो आपल कार्य पुर्ण करणार"समर्थ
"मला वाटल.मघाशीच-त्या दासगुप्तांच्या खोलित-"मी
"त्यानं दासगुप्तांच्या वाचेवर बंधन घातल होत.त्याचा यातला सहभाग त्याला गुप्त ठेवायचा होता.त्याच नाव सांगायला लागताच दासगुप्तांचा गळा आवळल्यसारखा झाला होता.मी जर तेथे नसतो तर दासगुप्तांनी प्राण गेला असता तरी त्याच नाव उच्चारलं नसत"समर्थ
"पण तिथ झाल तरी काय?ते काळी छाया-"
"अप्पा अस काहितरी होणर याची मला कल्पना होती.त्या शेरभच्या यंत्रणेतला दासगुप्ता हाच कच्चा दुवा आहे.त्यांच्या यातुशास्त्रात दयामाया नाही."यो अस्मान द्वेष्टी यं च वयं द्विष्म:! जो आमचा द्वेष करतो आणि आम्ही ज्याचा द्वेष करतो-अस त्यांच सुत्र आहे.आपल्या नावाचा दासगुप्ता गौप्यस्फ़ोट करेल म्हणुन त्याच दासगुप्तांवर लक्ष होत."
"पण आपण तिघेच तर तिथे होतो"मी
"तुझी खात्री आहे?समर्थ माझ्याकडे पहात म्हणाले,त्यांच्या शब्दांनी अंगावर काटा आला.त्या शेरभचा कोणीतरी हस्तक तिथे हजर होता पण ओळखु न येणाऱ्या स्वरुपात किंवा अदृश्यपणे .पुढचे प्रश्न मी विचारलेच नाहित.त्यांनी तो आकार सांगितला असता.समजा ते म्हनाले असते तिथला कोपऱ्यातला दिव्याचा स्टॅंड खरोखरचा स्टॅंड न्हवताच तर?.........मी त्यांच्यासारखा गोष्टी तिथल्यातिथ विसरु शकत न्हवतो.या अशा कित्येक वस्तु रोजच्या व्यवहारात येत असतात.प्रत्येक वस्तुबद्दलच शंका यायला लागली तर............
"आज काही करायचा विचार आहे तुमचा समर्थ?"
"अनंतरवांच्या केसचा क्रायसिस आज रात्रीच येणार आहे यात मला शंका नाही.वेळेची कमतरता जाणवते.शेरभच्या आक्रमक आणि संरक्षक शक्तीची कल्पना नाही.बेटाभोवती कोण कुठे किती कसल्या रुपात आहेत याची कल्पना नाही.बेटाभोवती संरक्षक रचना असणारचं ती शोधुन काढत भेदायला हवी.मल नेहमीची शारीरिक मानसिक आणि उपकरणांची तयारी करायला अवधी मिळाला नाही,त्या देवरच्या देवीच्या तळघरात सापडलो होतो त्या प्रसंगाची आठवण येते आहे."
समर्थ बोलता बोलता बेटाच निरिक्षण करत होते,मल वाटत नाही त्यांनी अडचणिंचा पाढा वाचला असला तरी कार्य थांबावायचा विचार मनात केला असेल.
समर्थ एकदम पुढे वाकले
"अप्पा ते बघ" समर्थ बोट दाखवत होते.एक लहानशी नाव बेटाच्या दिशेने चालली होती.नाव वल्हवणारा एकटाच होता.बेटाच्या किनाऱ्याच्या धक्क्याला नाव लागली.त्यान एका खुंटावर दोरीचा फ़ास टाकला आणि नावेकरी झांडात गडप झाला.
"त्यानं बरोबर काही नेल नाही.त्यांना काय हव याची यादी करुन तो बरोबर आणिल.आणिशहरातुन सामन बेटावर पोहचवणार असेल."
समर्थांच्या डोळ्यांत चमक आली."अप्पा चल बेटावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला,चल"
समर्थ उठले आणि नाव ज्या किनाऱ्यावरुन गेली होती त्या दिशेने निघाले.
समर्थांनी केलेला अंदाज बरोबर निघाला.ती नाव बेटावरुन परत निघाली.ती किनाऱ्याला लागली तेव्हा आम्ही तिथे हजर होतो.
नावाड्याने नाव किनाऱ्याला घेतली आणि मळकट पंचा खांद्यावर टाकुन तो झाडीतुन निघाला.
"जरा इकडे येतोस का?"समर्थ म्हणाले तो थांबल आणि तिथुनच आमच्याकडे पहायला लागला.काळा रुंद ओबडधोबड चेहरा,डोक्याचे केस पिकलेले,डोळे लालसर तारवटलेले,हाडापेराने मजबुत.
"आता वेळ नाही आपल्याला"तो मग्रुर आवाजात म्हणाला आणि जायल वळाला
समर्थ पुन्ह म्हणाले "जरा इकडे येतोस का?"
खांद्यावरचा पंचा त्याने झटकल्या सारखा केला आणि पुन्हा मग्रुर आवाजात म्हणाला "कुनाला अरे जारे करतोस रे? काय तुमच्या घरचा नोकर आहे का?"
"नोकर,अरे तुला जोडे पुसायला सुद्धा ठेवणार नाही मी"समर्थांच्या आवाजात तुच्छता होती ती त्याला झोंबली.
"तुझ्या आयला"अशी शिवी हासडुन तो समर्थांच्या अंगावर धावुन आला.तो जवळ येईपर्यंत समर्थ तसुभर हलले नाहित,अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा हात विजेच्या चपळाईने वर आला आणि एक जबरदस्त ठोसा त्याच्या कानशिलावर बसला.दगडाच्या भिंतीशी टक्कर झाल्यासारखा तो जागच्या जागी उभा राहिला,त्याचे डोळे पांढरे झाले आणि तो खाली कोसळला.
समर्थांनी त्याला ओढुन झाडाला टेकवुन बसवला आणि त्याचा पंचा पाण्यत भिजवुन त्याचा जोरदार फ़टका त्याच्या तोंडावर मारला.दोन फ़टके बसताच त्याने डोळे थोडे किलकिले केले.क्षणभर त्याला समोरच्या देखाव्याचा अर्थबोध झाला नाही.पण समर्थांनी त्याला सवड दिलीच नाही.
"इकडे पहा"समर्थांचा आवाज धारदार आणि शक्तीने भारलेला होता.त्याची बजर आज्ञाधारक पणे समर्थांच्याकडे वळली.सुशिक्षित,विकसीत,उत्क्रांत झालेली मनंसुद्धा त्या नजरेसमोर वाकली-चुरमुडली-मोडलेली मी पाहिली आहेत हा तर साधा अशिक्षित रांगडा नावेकरी.क्षणार्धात त्याची ईच्छाशक्ती लुप्त झाली.
"तुझ नाव काय?" समर्थ
"बन्सी"
"बेटावर कशासाठी गेला होतास?’
"रोजची यादी आणायला’
"सामान घेउन परत कधी जातोस?"
"साडेसहाच्या सुमाराला"
"तिथ सामान कुणाला देतोस?"
"तिथल्या खोलितल्या टेबलावर सामान ठेवतो"
"तिथ कोणी नसत?"
"तिथ एक काळा पडदा असतो,पडद्यामाग काय आहे मला माहित नाही"
"परवलीचा शब्द काय आहे? आजचा परवलीचा शब्द?"
"पवीनस"
"त्याचा उच्चार कुठे करयचा?"
"नावेतु किनाऱ्यावर पाय टाकताना"
"बन्सी मी काय सांगतोय ते ऐकु येतयं?"
"हो"
"सुर्य अस्ताला जाईपर्यंत झाडाखाली बस आणि तिथुन सरळ घरीए जा,मी तुला भेटलो आहे हे विसरुन जा.तुला कोणीही भेटल नाही.सांग तुल कोणीही भेटल नाही"
"कोणीही भेटल नाही"
"तु आता काय करशील?"
"सुर्य मावळेपर्यंत झाडाखाली बसेन आणि मग सरळ घरी जाईन"
"तु बेटावरच सामान का आणल नाहिस? कारण आज त्यांना काहिही नको होत"
"आज त्यांना काहिही नको होत"
"आता जा"
बन्सी त्याच क्षणी वळुन झाडाखाली जाऊन बसला.
..............
सुर्य अस्ताला कलला होता.लवकरच नदी अंधारात जाणार होती
"चल अप्पा,आता जायची वेळ झाली"समर्थ म्हणाले
आता आम्ही शेरभच्या-शत्रुच्याच भुमीवर पाय टाकणार होतो.
एक असा संघर्ष जिथे चुकीला माफ़ी न्हवती.जिथ दुसरी संधी मिळत न्हवती.जिथ केवळ प्राणच नाही-त्यामागचा हजारो वर्षांचा मानवाचा वारससुद्धा पणाला लागत होता.संघर्षाच क्षेत्र अमर्यादीत पसरलेल होत.वापरल्या जाणाऱ्या शक्ती संहारक होत्या.साधनं अकल्पनिय होती.रोजच्या व्यवहारातल्या वस्तु शक्तीन भारल्या जात होत्या,कितीतरी आठवणी समोर येत होत्या.खानविलकरांच्या दगडी आसनाच्या हातावरचा दगडी चित्ता एकदा गुरगुरला होता.सेलवारच्या तळघरातील शक्तीदेविची महाकाय मुर्ती आपला चौथरा सोडुन निर्दालनाला निघाली होती.अशा कितीतरी आठवनी
पण समर्थ निघाले होते,तयारीविना.....आणि अर्थात मीही त्यांच्या मागोमाग निघालो होतो.
आम्ही नाव नदीत ढकलली,पाच सात मिनिटात नव समोरच्या जेटीला लागली,दोरखंडाचा फ़ास समर्थांनी खुंटीवर टाकला आणि उठत ते म्हणाले "चल अप्पा"
नावेतुन पाय बाहेर टाकण्याआधी ते थांबले आणि अत्यंत स्पष्ट आवाजात म्हणाले
"पवीनस"
काय होईल,कल्पना कहिच नाही.काहिही झालं नाही.आम्ही किनाऱ्यावर आलो.झडीतुन वाट काढत आम्ही निघालो.
माझा आजवरचा अनुभव सांगत होता,तो कोण शेरभ होता तो तारेची कुंपण,भिंती,गजांचे अडथळे नक्कीच वापरणार नाही पण त्याने आपल्या बेटाची संरक्षण रचना वेगळ्याच पद्धतिने नक्किच केलेली असणार.
पुढे एका मोकळ्या जगेत एक बसकं घर होत.,दार उघडच होत.अत्यंत साधं घर .......पण बाह्य रुप कधी कधी फ़सवं असतं.
समर्थ सरळ आत गेले.खोलीत प्रकाश अत्यंत मंद होता,खोलिच्या मध्यभागी टेबल होत आणि समोरच या भिंतीपासुन त्या भिंतीपर्यंत काळा पडदा होता.
खोलीत वेधण्यासारखी एकच गोष्ट होती काळा पडदा.माझी नजर त्यावरच खिळुन राहिली.खोलीत वारा न्हवता पण मला वाटल पडदा सावकाश हलत आहे जणु काही आताच कोणी पडद्यामगे गेल आहे.आणि तो पडदा अपारदर्शक असला तरी सारख वाटत होत कोणीतरी त्यामगुन आपली नजर आमच्यावर रोखलेली आहे.जणु काही पडद्यावरची नजर क्षणभर हलली तरी पडद्यामागुन ते...जे काही होत ते ....बाहेर येईल.
मला कोणीतरी हलवत होत."अप्पा...अप्पा..."त्या गदागदा हलवण्याने मान लटपटत होती.मनात काहितरी तुटल आणि मी भानावर आलो,समोर समर्थ उभे होते.माझ्याकडे चिंतेने पहात होते.मला हळुहळु सर्व आठवलं,नक्किच त्या पडद्यामगे काहितरी होत आणि ते धोक्याच होत.
समर्थ झपाझपा चालत पडद्याकडे गेले.मी नको म्हणण्याच्या आतच त्यांनी तो पडदा एका अंगाला सरकावला.
तोंडाशी आलेली किंकाळी मी आवरली.बापरे पडद्यामागे ते होत काय?
माग मतीचे तिन उंच चौथरे होते.आधी वाटल चौथर्यावर तिन बुटकी माणसं बसलेली आहेत पण मग ध्यनाताल ती माणसं नाहेत पुतळे आहेत....पुतळेही नाही ...बाहुल्या आहेत.
असे हिडीस,विद्रुप,विकृत भयानक चेहरे मी कधीही पाहिलेले नाहित.
आणि त्या कलाकारच्या चुका न्हवत्या ते मुद्दाम केलेले होते.
एक बाहुली मातीची होती,एक लाकडाची आणि एक चिंध्यांची,त्यांची शरीर बेढब होती,दात किडके,वाकडे,डोळे तिरळे होते.एकीच्या तोंडावर बिनडोळ्यांची नुसती खोबणच होती.त्यांच्या डोक्यावर केस न्हवते,नाक नकटी फ़ेंदारलेली होती.
"अस्स !"समर्थ स्वतःशीच म्हणाले खांद्याला लटकावलेल्या पिशवीतुन त्यांनी एक पुडी काढली,तिच्यातल भस्म त्यांनी चिमुट चिमुट भर त्या बाहुल्यांवर टाकल आणि तोंडाने ते काहितरी पुटपुटत होते.
बदल झाला तो क्षणार्धात झाला.बदलाच वर्णन शब्दांनी करण कठीण,कारण दृष्टीला काहीच दिसलं नाही.
पण एका क्षणात त्या बाहुल्यांमधली भयानकता गेली होती.त्या आता साध्या लाकुड मातीच्या मानवी प्रतिकृती राहिल्या होत्या.त्या बाहुल्यांची भिषणता त्यांच्यात वावरणाऱ्या रसरसत्या पिशाच्च शक्तीत होती,कोणीतरी मंत्रोपचारनं भारुन त्या बाहुल्या इथे ठेवलेल्या होत्या.
रक्षणासाठी?शक्य होत
आणि त्यांच्यातल गुपीत एखाद्या अनभिज्ञाला माहित नसेल तर?त्यान जर इमारतीत चोरुन प्रवेश केला तर?
...तर काय झाल असत त्याची सुरवात मी डोळ्यांनी पाहिली होती.
आमच्या प्रवेशाबरोबर पडदा हलायला लागला होता.
काही क्षणातच या बाहुल्यांनी आपले चौथरे सोडले असते आणि पडदा दुर करुन त्या पुढं आल्या असत्या..........भिंगातुन पहाता दुरच चित्र मोठ व्हाव तसे त्यांचे आकार वाढले असते........
खरोखरच आकांत झाला असता.
शेरभच घर होत ते.......................

समर्थांनी त्यांच्या पिशवीतला एक ताईत काढला.तो मला गळ्यात घालायला सांगितल."गंगाधररावांच्या घराची आठवण आहे ना अप्पा?"ते म्हणाले"ही जागा शेरभची आहे.वस्तुतल्या जडद्रव्याचा कणनकण त्याचा आहे.ही हुकुमत कुठपयंत चालते याची तुला कल्पना नाही.इथं काहिही होऊ शकेल.नीती अनीतीच्या,चांगल्या वाईटाच्या ज्या काही मुळ कल्पनांवर आपली संस्कृती अधिष्टित आहे तिच्यावरचा विश्वास ढळु देऊ नकोस."
समर्थांना एवढं गंभिर मी क्वचितच पाहिलं होत.....
त्यांनी मला त्यांच्या मागोमाग येण्याची खुण केली.आम्ही आत गेलो.आतली खोली खुपच प्रशस्त होती.तिच्या मध्यभागी खाली जाणारा जिना होता.खोली पारच अंधारलेली होती.टॉर्चच्या प्रकाशात आम्ही त्या तळघराकडे जाणाऱ्या जिन्याने निघालो.विस पायऱ्या संपल्या तेव्हा खाली एक खोली आली.तिथ खाली जाणारा आणखी एक जिना होता.तळघराखाली तळघरं.त्या जिन्याने अम्ही खाली गेलो.पुन्हा विस पायऱ्या संपल्या तेव्हा खाली एक खोली आली.तिथ खाली जाणारा आणखी एक जिना होता.आम्ही आता नदीच्या पात्राच्याही खाली आलो असलो पाहिजे.पण खाली हवा कुंद न्हवती,गार होती पण ताजी होती,याचा अर्थ इथ पोहचणार्या आणखिही वाटा असल्या पाहिजेत.या शेवटच्या खोलीतुन अनेक दारं उघडत होती.शेरभच्या वास्तुची खरी व्याप्ती जमिनीखालीच होती.
बांधकाम प्रचिन असलं पाहिजे.प्राचिनतेचा अंदाजही अशक्य होता,भिंती मोठमोठ्या घडीव चिऱ्यांनी बांधलेल्या होत्या..खालची फ़रशी पायांना ओली लागत होती.
समर्थ चारी बाजुंना पहात मला म्हणाले "अप्पा सांभाळुन रहा,ही भयंकर जागा आहे,फ़ारच भयंकर" आणि मग जरा वेळान "अप्पा टॉर्च मालवतो आहे,माझ्या शेजारीच रहा"
खट...... टॉर्च मालवल गेला.काजळी काळोख म्हणजे काय ते मला आत्ता समजल.,श्वास सुद्धा न घेता मी उभा होतो,मग अत्यंत दुर अंधारात अस्पष्ट असा चौकोन दिसायला लागला,प्रकाश अत्यंत क्षिण असला पाहिजे.
"चल अप्पा"समर्थांनी माझा हात हातात घेतला.आम्ही त्या चौकोनाकडे निघालो.
ते एक दार होत.आत एक बोळ होता,त एकदा,दोनदा वळला आणि मग आम्हे एका मोठ्या खोलीत आलो.आणि ती खोली पहाताच माझ्या पोटात भितीने गोळा आला.
अनंतरवांना स्वप्नात दिसणारी ती खोली होती.
भिंतीत खोचलेले पलिते धडधडत होते आणि खोलीच्या मध्यभागी एक मोठा पिंजरा टांगलेला होता.पिंजरा रिकामा न्हवता.आम्ही आणखिन जवळ गेलो,मध्येच मी पाऊल दचकुन मागे घेतल,एक गलेलठ्ठ उंदिर माझ्या पायाजवळुन सरसरत गेला.
पिंजऱ्यात एका माणसाचं मुटकुळं होत.गुडघे मुडपुन बसण्याइतपतच जेमतेम जागा होती.त्याच्या हातांची छातीशी घडी केलेली होती.मान एका बाजुला कलली होती.शरीरात मांस तर न्हवतेच,हाडावर त्वचा ताणुन बसवीलिशी दिसत होती.तो इतका निश्चल बसला होता की मला भलतीच शंका आली.पण आत्ता काहे बोलण्याची वेळ न्हवती.
समर्थांच्या नजरेत पिंजऱ्यातल्या त्या अभागी जिवासाठी अपार करुणा दाटुन आली.समर्थांनी तळघराच निरिक्षण केल,क्षणभर मला भास झाला की काय करायच हा आजवर कधी न पडलेला संभ्रम त्यांना पडलेला होता.शेवती ते मागे सरले आणि मला एका कोपऱ्यात नेल.
"अप्पा,तुझ्या लक्षात आल ना,अनंतरावांच्या स्वप्नाची निर्मिती इथेच होते,अनंतराव-दासगुप्ता-शेरभ ही साखळी आता पुर्ण झालेली आहे,समोरचा तो विदिर्ण देह पहा.तो देह त्या क्रुर पिंजऱ्यात कोंडलेला आहे आणि अनंतरावांची अस्मिता त्या देहात कोंडलेली आहे......तुला शंका येईल,या देहात आधी वसत असलेला आत्मा,प्रज्ञा यांच काय झाल?अप्पा भार्गव आणि चंद्रकांताच्या प्रकरणात आपण देहांची अदलाबदल झालेली पाहिले आहे,हा प्रकार तितका साधा नाही,अप्पा मला वाटत नाही हे अजुन तुझ्या अनुभवात आलेल आहे.अप्पा या शरीरात मुळ आत्माच न्हवता ! ते एक कलेवर होत,तो एक मृतदेह होता"
विश्वासाच्या भिंती ढासळत होत्या,हे मी काय ऐकत होतो.
"अप्पा हे कस शक्य आहे अस म्हणशिल,सहज शक्य आहे,या शेरभच्या तुलनेत भार्गवत तर एक अत्यंत सामान्य मांत्रिक होता,अनंतरावांची एक भेट त्याला पुरेशी होती,त्या भेटीत त्याने अनंतरावांना सर्व आज्ञा देऊन ठेवल्या असणार.त्यानं अनंतरावांच्या देहाचे काही अंशही बरोबर आणलेले असणार.केस,एखादं नख,रक्ताचे पाच सात थेंब,त्वचेचा एखादा तुकडा...भानावर आल्यावर अनंतरावांना एखादी लहानशी जखम दिसली असेल,दुर्लक्ष करण्या एवढी सामान्य,या आत्मारहित देहात तेवढे अंश रुतवले की अनंतरावांची अस्मिता बरोबर इथ प्रवेश करणार,तिकडच्या शरीरात मागे राहिल एक क्षिण धुगधुगी......"
मी ऐकत असलेल अंगावर काटा आणणार होत.
"अप्पा मला शंका नाही हे पिंजऱ्यातल कलेवर शेरभच्याच अत्याचारी छळाला पुर्वी कधितरी बळी पडलेल्याच आहे,कुणाला माहित हे कधी झाल कदाचित कित्येक दशकापुर्वी ही झालेल असेल.
"पण समर्थ ते शरीर कुजुन कस गेल नाही?"
"तो मृतदेह एका "बंधनात"ठेवला तर तिथ किटक जंतुना प्रवेश मिळणार नाही.त्या मघाच्या बाहुल्या आठवतात ना? त्याच्यात काय वावरत होत?त्यांच्यात कोणते प्रेरणा होती.मानवपेक्षाही खालच्या दर्जाची निर्बुद्ध अस्तित्व यांचे गुलाम असतात.त्यांच्यापैकी एखादं या रिकाम्या शरीरात त्यान ठेवल असेल."
समर्थ पुढे म्हणाले "अनंतरावांना स्वप्नात अस वाटत की आपण कितीतरी वर्ष त्या पिंजऱ्यात आहोत आणि ते खरच होत.त्या आठवणी त्यांच्या नसतील,त्या आठवणी या अभागी देहात साठवलेल्या होत्या आणि आठवण म्हणजे काय? समज तुम्ही एका अंधाऱ्या गुहेत आहात,गुहेच्या भिंतेवर चित्रे आहेत पण ती कधी दिसतील तर त्यांच्यावर उजेड पडल्यावरच ना? आठवणींच असच आहे.आठवणी मेंदुत साठवलेल्या असतात पण ती पेशी उद्दिपित झाल्याशिवाय आठवण जागी होनार नाही,हे काम आपली अस्मिता करते,त्या मृत देहाच्या मेंदुत बंदिवासाच्या,छाळाच्या.तहानभुकेच्या आठवणी आहेत.त्याच अनंतराव स्वतःच्या आठवणी म्हणुन स्विकारत होते.....असा हा क्रुर शेरभ आहे !
समर्थांचा चेहरा बदलला,कातलासारखा कठिण झाला.
"अप्पा त्याच क्रोर्यच त्याच्या नाशाला कारण होनार आहे.तो पहिल्याच खेपेला अनंतरावांचे आयुष्य संपवु शकला असता पण त्याला त्यांना छळायचे होते म्हणुन त्यने त्याने त्यांना जेमतेम जगत ठेवले.आता त्याची हौस पुरली असे दिसते कारन आज अनंतराव बेशुद्धीत गेले आहेत,अप्पा आज रात्री आपण इथे असनार आहोत."
हातातल टॉर्च फ़िरवत समर्थांनी तळघराचा शोध घेऊन एक विद्रुप बाहुली शोधली,कधिकाळी शेरभने ही वापरली असेल,कोपऱ्यातली एक जागा समर्थांनी "त्यांच्या"पद्धतिने शुद्ध करुन घेतली.एक भस्माची आकृती काढुन त्यात त्या बाहुलीची स्थापना केली,समर्थांनी टॉर्च देऊन तिचा प्रकाश बाहुलीवर धरायला सांगितला.समर्थ तिथेच उभे होते का,काय करत होते,मला यातल काहिच दिसल नाही मात्र त्या आसपासच्या अंधारात काहिकाही आवाज येत होते.,माझा हात थरथरायला लागला.त्या बाहुलिच्या विदृप चेहऱ्यात बदल होत होता.त्या निर्जिव वाटणाऱ्या चेहऱ्यात रसरसता जिवंतपणा येत होता,तिच्यात एक प्रेरणा येत होती.
"अप्पा टॉर्च मालवुन टाक आणि बाहुलिजवळ उभा रहा"
मी टॉर्च मालवुन टाकला,पलित्यांच्या प्रकाशात समर्थ मी आणि ती बाहुली यांच्याभोवती एक आकृती रेखाटत होते.ते स्वतः त्या बाहेरच होते.
"अप्पा आताच्या क्षणापुरता मी अनंतरावांचा संबंध त्या बाहुलीशी जोडलेला आहे.अनंतरावांना धोका पोहचु नये म्हणुन ही योजना आहे.तुम्ही दोघे या आकृतिच्या आत सुरक्षित आहात.लक्षात ठेव काहिही दिसलं तरी या आकृतिच्या बाहेर यायच नाही’
" अप्पा संघर्षाचा शेवट काय होईल माहित नाही,तुझ्यावर एक जबाबदारी आहे,जर तशी वेळ आलीच तर जमेल त्या मार्गाने ही बाहुली आपल्या बंगल्यातल्या मागच्या खोलीत ने आणि अनंतरावांना त्या खोलीत घेऊन ये,शेवटची अदलाबदल तिथे होईल आणि मग या बाहुलीचा नाश करुन टाक."
आणि एवढच बोलुन समर्थ अंधारात निघुन गेले.एक साधा निरोप घ्यावा तसे ते निघुन गेले.
मला त्यांच्या शब्दांचा अर्थ कळायला सुद्धा काही अवधी जावा लागला आणि तो कळाला तेव्हा माझी अवस्था अशी झाली की..............
मला काही सुचेनासे झाले पण मनाशी निश्चय पक्का होता समर्थांनी दिलेल्या हुकुमाबर वागण्याचा त्यात बदल होनार न्हवता.
किती काळ गेला त्या तळघरात? मन सारखे बिथरत होते,स्वतःशीच चाललेला संघर्ष...............
त्या तंद्रितुन एका आवाजाने शुद्धीवर आलो.कुणाच्यातरी फ़रफ़टत चाललेल्या पावलांचा आवाज त्या तळघरात घुमत होता,ती पावले हळुहळु त्या पिंजऱ्याकडे येत होती.संघर्षाला तोंड फ़ुटले होते आणि मी माझा वाटा नक्कीच उचलणार होतो.
ती पावले जवळ आली.शेवटी पलित्यांच्या प्रकाशात आली.
एक जख्ख म्हातारी,वाखासारखे केस,सुरकतलेली त्वचा,अंगावर फ़ाटके कपडे,एका हातात पाण्याचे भांडे.........मी खचितच या म्हातारीची अपेक्षा केली न्हवती.
पिंजऱ्याजवळ येऊन ती कशाची तरी वाट पहात असल्यासारखी उभी राहिली.सर्वत्र नजर फ़िरवुन तिने भांड्यातल पाणी त्या पिंजऱ्यातल्या कैद्याच्या अंगावर शिपंडल.
त्या साध्या कृतीची प्रतिक्रिया स्फ़ोटक झाली.मला तर ती पुर्ण अनपेक्षित होतीच पण त्या म्हातारीलाही त्याने धक्का बसलेला दिसला.
पिंजऱ्यातल्या त्या कैद्याच्या देहाच्या तोंडातुन एक भयानक,भेसुर अमानवी आवाज आला.ते सर्व शरीर त्या पिंजऱ्यात घुसळायला लागलं.तडफ़डायला लागल.
ती थेरडी धक्का बसल्यासारखी दोन पावल मागे सरकली,तिची नजर सर्व तळघरावरुन फ़िरली,आकृतितल्या आमच्या दोघांवरुनही फ़िरली,अंगावरुन गरम हवेच झोत गेल्यासारख वाटलं.तिला आमच आस्तित्व जाणवल नाही.समर्थांची ती एक संरक्षक योजना असेल,त्या एका नजरेचा जो चटका बसला त्यावरुनच कळाल ही साधी थेरडी नाही.
तिने मागे सरकुन कपड्याखालुन काहितरी काढलं आणि पिंजऱ्यातल्या त्या देहावर फ़ेकण्यासाठी हात माग घेतला.
-आणि त्याच क्षणी समर्थांचा आवाज आला : "शेरभ"
ती म्हातारी त्याच पवित्र्यात गोठली.
"शेरभ तो तुझ्या छायकांपैकिच एक आहे,त्याचा नाश करु नकोस"
त्या म्हातारीचा हात सावकाश खाली आल.आणि मग तिच्या शरीरात केवढा बदल झाला.
आत गेलेले खांदे सरळ झाले,पाठिचा बाक गेला,एका हाताने डोक्यावरचा टोप काढला,दुसऱ्या हाताने अंगावरचे फ़ाटके कपडे कढुन टाकले.
पलित्याच्या प्रकाशात एक उंच,सडसडित,संपुर्ण काळ्या वेषातला डोक्यावर एकही केस नसलेला पुरुष उभा होता.
आवाजाच्या रोखान तो वळाल आणि म्हणाला"ठिक आहे मी थांबतो,तु इथपर्यंत पोहचलास या क्षणापर्यंत मला तुझ आतित्व जाणवल नाही,या पिंजऱ्यातल्या कैद्याचिही तु सुटका केलीस अर्थात तु तयारीनिशी आलेला असणार.तु कोण आहे?"
"मी समर्थ आहे"
"समर्थ,अस्स शेवटी आपली गाठ पडली,टाळता आल असत तर बरं झाल असत-पण ही भेट शेवटी अपरिहार्यच होती नाही का? "
समर्थ अंधारातुन प्रकाशात आले.पांढरा पायघोळ अंगरखा,पांढर धोतर....शेरभच्या कपड्यांशी केवढा विरोधाभास ! दोघे एकमेकांकडे पाहत होते.कदाचित वेगळ्या पातळीवरुन एकमेकांच्या शक्तीकेंद्रांची चाचपणी करीत असतील.
"इथली जागा कशी सापडली?"शेरभ
" दासगुप्तान सांगितली"
’"पण-"शेरभ
"हो हो तिथ तु काय ठेवल होतस ते मल अधीच समजल होत,मीच दासगुप्ताला वाचवल नाहीतर त्याच्या तोंडातुन शब्दही निघाला नसता"
"आता त्याला बघतो"शेरभ
"तु त्याच काहिही कर,त्यानच ही सुरवात केलेली आहे."
"पडद्यामागच्या त्या तिन बाहुल्या?"शेरभ
"त्या मला थांबवु शकल्या असत्या अस तुला खरच वाटत?"
"अं-नाही,आणि अनंतराव कुठे आहेत?"शेरभ
समर्थांनी आमच्यावर टॉर्च मारला,शेरभ सावकाश आमच्याजवळ आला.त्या रेखाकृतीपासुन काहि पावल दुर राहुन आमच्याकडे पाहु लागला.
"तुझा नाश केल्याशिवाय ते माझ्या हातात येणार नाहिततर"शेरभ
"हो’समर्थ हसत म्हणाले
"इतकं तुला त्यांच महत्व आहे? या क्षुद्र लोकांकरता इतका धोका का पत्करायचा? आपल्याला एखादी तडजोड नाहि का करता येणार?"शेरभ
"कशासाठी?तु अनंतरावंना हात लावु शकत नाहिस"
"आणि तु या तळघराबाहेर जाऊ शकत नाहिस"शेरभ
"ते मला महत्वाच वाटत नाही"समर्थ
"तेच तर मला समजत नाही"शेरभ
"तुला समजायचही नाही"
"ठिक आहे,काही तडजोड केली तर?तु,तुझा मित्र आणि अनंतराव इथुन जाऊ शकता."शेरभ
"
त्यात तडजोड कसली? आम्ही जाणारच आहोत."
"
तुझ्याबरोबर कोणीही नाही,एव्हाना मला समजलं असत.तु मला फ़सवण्याचा,भिववण्यचा प्रयत्न करत नाहिस.तुझ्यात हा एवढा अत्मविश्वास कुठुन आल?"स्वतःशीच मान हलवत तो त्या पिंजऱ्याकडे वळला.शेरभन आतला तो अजुन आचके देणारा मृतदेह एका हातान बाहेर ओढुन काढला आणि फ़रशीवर टाकला.त्या देहाला एकदोन शेवटचे झटके बसले आणि मग ते निश्चल झाल.खऱ्या अर्थाने मृत झाल.समर्थ म्हणाले होते तसे त्यात वास करत असलेला तो कोण छायक देहाच आधार सोडुन गेला असला पाहिजे कारण त्या कलेवरात अविश्वसनिय बदल घडला,जणु काहि आतली उभारीच गेली.मंस आक्रसल,हाडांचा भुगा झाला,त्यातुन एक काळपट द्रव ओघळत होता.भयानक दुर्गंधी सुटली होती.
शेरभच्या सर्व क्रिया योजुन केल्या असल्या पाहिजेत कारण तो देह खाली पडत असताना शेरभ त्याला हव्या असलेल्या फ़रशिच्या चौकोनावर आला होता.चौकोनातच काही गुप्त कळ असली पाहिजे कारण एकाएकी तो फ़रशीचा चौकोन त्यावर उभ्या असलेल्या शेरभसह खाली गेला आणि एक दोन सेकंदानी जेव्हा पुर्वस्थळी आला तेव्हा तो रिकामा होता.शेरभ गडप झाला होता.
"अप्पा जागचा हलु नकोस."आणि समर्थ सावाकाश मी होतो त्या कोपऱ्याकडे आले.
"आपल्याला इथं पाहुन त्याला धक्का बसला असेल नाही?"
"आपाल्याला पाहुन बसला नसेल पण आपल्या येण्याची त्याला चाहुल लागली नाही याने मात्र बसला असेल"समर्थ
"समर्थ त्या पिंजऱ्यातला तो देह?"
"मी सांगितल ना हे छायक म्हणजे या यातुधानांचे गुलाम असतात.त्यांच्यातला एखादा शेरभने वापरला असावा.या तळघराखालीहि आणखी पातळ्या आहेत.तिथं त्याने असे आणखिही अर्धमृत देह साठवुन ठेवले असतील."समर्थ
"समर्थ किती भयंकर आहे हे"
"एकदा माणुसकीची मर्यादा सोडली की पुढे काही सिमाच रहात नाही.नाही का?" समर्थ
"आता तो काय करील अशी तुमची कल्पना आहे?"
"गंगाधररावांचा वाडा आठवतो का? तशीच ही सर्व वास्तु आहे.सर्व त्याच्या हुकुमतीखालची.माझी खात्री आहे तो आपण इथपर्यंत कसे आलो याचा शोध घेईल,माझे कोणी सहकारी,सहाय्यक बेटावर इतरत्र आहेत का याचा शोध घेईल आणि मग आपल्या नाशासाठी सिद्ध होईल."समर्थ
"अप्पा चल उशीर नको ती बाहुली उचल " समर्थांच्या आवाजात एक त्वरा आली.ती बाहुली मी उचलली.
खरं म्हणजे शेरभ गडप झालेल्याला बराच वेळ झाला होता.पण एव्हाना त्याची काहिच हालचाल ऐकु येत न्हवती.अनपेक्षित काहि झाल की माणसाचा तोल जातो....कदाचित त्याचा तोच हेतु असेल.
त्या तळघरात जायला अनेक वाटा असव्यात हा समर्थांचा अंदाज खरा ठरला.तळघरातुन अनेक बोळ जात होते.कोणता सुरक्षित होता हे सांगता येत न्हवतं.एका बोळात आम्ही दहा पंधरा पावलं पुढे गेलो.जरा विव्हळण्यासारखा आवाज आला."अप्पा जर इथच थांब"मला सांगुन समर्थ पुढे गेले.चार पाच मिनिटात ते परत आले.त्यांना काय दिसल कोणास ठाऊक पण त्यांचा चेहरा विलक्षण कठिण झाला होता."इथुन वाट नाही’मग आम्ही परत तळघरात आलो.
समर्थांना घाई झाल्यासारखी दिसली.ते भराभरा चालत होते.आमच्या मागं अंधारातुन एक आवाज येत होता.पाठलागाचाच असावा.पण अस्वस्थ करनारी गोष्ट ही कि तो पावलांचा आवाज वाटत न्हवता.त्याची व्याख्याच करता येत न्हवती.
एका वळणापाशी समर्थ थांबले आणि त्यांनी टॉर्चचा प्रकाश मागे टाकला.
टॉर्चच्या प्रकाशातुन तिन बसक्या,बुटक्या,विदृप बाहुल्या एक प्रकारच्या वेड्यावाकड्या गतिनं आमच्या मागोमाग येत होत्या.आता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव यांत्रिक न्हवते,आता त्यांच्या हास्यात भेसुरपणा होता.डोळ्यांत राक्षसी चकाकी होती.हालचालीत असुरी अधिरता होती.
समर्थांनी टॉर्च माझ्या हातात दिला आणि माझं तोंड समोर वळवुन मला पुढं ढकललं."अप्पा मी सांगितलेल लक्षात ठेव.इथुन बाहेर जायचा मार्ग शोधुन काढ.मी माग रहातो.तुझ्या वाटेत काय नैसर्गिक अडथळे येतील तेवढेच.इतर काहिही अडथळे येणार नाहित हे नक्कि.जा.वरती ती होडी आहेच.तिथुन बंगल्यावर जा.ही बाहुली त्या आतल्या खोलीत ठेव आणि अनंतरावांना तिथ आण.....जा"
आता त्यांची आज्ञा पाळायलाच हवी होती.समर्थांना एकट्यांना मागे त्या अघोरी आकारांशी मुकाबला करावा लागणार होता.पण त्यांनी ती पर्वा कधी केली होती.
एकही शब्द न बोलता मी पुढे चालु लागलो.
तळघराबाहेरची वाट जरा शोधाशोध केल्यावर सापडली.बेटाच्या पृष्ठभागावर पोहचलो तेव्हा दमछाक झाली होती.
दम खाल्ल्यावर निरिक्षण केल असता अस दिसल की मी नदीच्या अलिकडेच आलेलो होतो.हे सुदैवच म्हणायला हवं.
माझ्या घडाळ्यात साडे दहा वाजले होते.टॅक्सी मिळण्याची शक्यता कमीच होती.एखादा फ़ोन मिळाल असता तर राहुलसेठना फ़ोन करायचा विचार होता.झाडाझुडापातुन वाट काढत मी मी एका लहान रस्त्यापर्यंत पोहचलो.
पहिल्या बंगल्यात फ़ोन न्हवता.दुसऱ्या बंगल्याची घंटा वजवली माणसं सधन वाटत होती.दार उघडणारे गृहस्थ चाळिशीचे असावेत.दार उघडताच त्यांची नजर माझ्या हातातील बाहुलीवर गेली.डोळ्यांत आश्चर्य आणि मग संशय आला.
"मला एक फ़ोन करायची परवानगी द्याल का?"मी
"आत्ता?"त्यांची नजर बाहुलीवरच होती.
"हो माझ्या परिचितांना गाडी घेऊन बोलवायच होत"
"या या करा ना फ़ोन"ते घोगऱ्या आवाजात म्हणाले.मी राहुलसेठच्या बंगल्यावर फ़ोन लावला.
"अप्पा जोशी का?"राहुल सेठने फ़ोनवर माझा आवाज ओळखुन म्हटल
"हो"
"समर्थांच काम?"राहुलसेठ
"हो,सेठ गाडी हवी अहे"
"कुठे आहात पत्ता सांगा"राहुलसेठ
मी बंगल्याच्या मालकांना विचारुन त्यांना पत्ता सांगितला
"अप्पा विस मिनिटात पोहचतो"राहुलसेठ
बरोबर बारा मिनिटांनी राहुलसेठची काळी गाडी माझ्याजवळ येऊन उभी राहिली ते स्वतःच आले होते.

गाडिनं पहाता पहाता समर्थांचा बंगला गाठला.राहुलसेठ माझ्याबरोबर आत आले.दिवानखान्याच्या आत एक मोठी खोली होती आणि तिच्याच एका भिंतीत समर्थांच्या त्या खास खोलिच दार होत.मोठ चमत्कारिक दार.ज्या खोलित समर्थ आणि मार्तंड यांची निर्णायक गाठ पडली होती,ज्या खोलित समर्थांनी "मावशिंना"माणसांत आणल होत,ज्या खोलित समर्थांनी गंगाधरपंतांच्या नातवाला शुद्ध केल होत.नवल म्हणजे मी त्याच बंगल्यात रहात असुनसुद्धा क्वचितच आत प्रवेश करत असे.
मी ती खोली उघडली.मनात एकदम प्रसन्नता आली.ते असं काहितरी होत जे शब्दांच्या पलिकडंच होत.मनाचा आणि शरीराचा थकवा पळुन गेला.खोलितील चौरंगावर मी त्या बाहुलिला ठेवल.अर्धं काम पुरं झाल होत.
"समर्थ कुठे आहेत अप्पा?" राहुलसेठ
"वाटेत मी सर्व सांगतो तुम्हाला आता आपल्याला एका हॉस्पिटल्मध्ये जायच आहे"
गाडि रस्त्यात असताना मी राहुलसेठला सर्व कथन केल.
"काय माणुस आहे?"राहुलसेठ स्वगत म्हणाले.त्यांच्या मुलावर प्राणांतिक संकट आल होत तेव्हा समर्थांनीच शरीराची ढाल करुन सर्व आघात झेलले होते.राहुलसेठच्या मुलाला वाचवल होत.
अनंतराव आय.सि.यु. मध्येच होते.बाहेरच्या खोलित कमलाबाई सुन्न नजरेने बसल्या होत्या.अनंतरावांना डिस्चार्ज द्यायला तिथले डॉक्टर तयार न्हवते पण राहुलसेठ "नाही" हा शब्द ऐकायलाच तयार न्हवते.त्यांच्या ओळखी,वागण्यातला दरारा असा होता की दहा पंधरा मिनिटात डॉक्टरांना परवानगी द्यावीच लागली.आमच्या मागुन ऍम्ब्युलन्स बंगल्यावर आली.माझ्यामागोमाग स्ट्रेचर त्या लोकांनी आताल्या खोलित आणुन ठेवल आणि ते निघुन गेले..
त्या खोलित आता मी राहुलसेठ कमलबाई आणि अनंतराव होतो.अर्थात चौरंगावर बाहुलीही होती.
समर्थ म्हणाले होते त्या खोलित अदलाबदल होईल आणि माझा त्यांच्या शब्दांवर विश्वास होता.
........................
ती थेरडी किती तासांपुर्वी दिवसांपुर्वी आली होती ते तो पार विसरुनच गेला होता.घशाची कोरड,पोटातली कालवाकालव..........त्याला वाटत होत आपल्या काळजचे ठोकेही आता मंदावत आहेत.
फ़रशीवर पावलांचा आवाज येत होता.आता डोळे उघडण्याचिही त्याच्यात शक्ती न्हवती.त्यानं एवढ्यात पावलांचे आवाज अनेकवेळा ऐकले होते पण कोणी आल न्हवत.मेंदुतच खऱ्याखोट्याचे गल्लत व्हायला लागली होती.आत तर एका न्हवे तर दोघांच्या पावलांचा आवज यायला लागला होता.
आता त्याचा शेवट जवळ आला होता.पण त्याची अस्मिता अनंतात विलिन झाली न्हवती.
सुखदु:ख,समाधान असमाधान,आशा निराशा या भावनांना अर्थ न्हवता.त्याने ती अवस्था स्विकारली होती.
पण मातीत खोलवर रुजलेल्या बिजाला धुमारे फ़ुटावेत तसे त्या अस्मितेला तंतु फ़ुटत होते.त्या तंतुच्या शेवटी जाणिव होती.
डोळ्यांसमोर प्रकाश होता.माणसांचे चेहरे होते....किती हसरे चेहरे !
कानावर आवाज होते,किती सुखद आवाज.
हवेवर गंध तरळत होता.....किती मोहक सुगंध !
मग कमलचा चेहरा समोर आला.
अनंतराव शुद्धीवर आले होते.
अनंतरावांच्या समोरच चौरंगावर ती बाहुली होती.समर्थ म्हणाले होते बदल आपोआप होईल.ही खोली साधी न्हवती.आधी त्या खानविलकर-मार्तंडन काही तंत्रमंत्रान हे खोली स्थलकालपटावरुन अलग केली होती.मला आठवते ती सकाळ.....जेव्हा मी आणि चंद्रकांतन दार उघडल होत आणि आमचयसमोर एक अमर्याद काळी पोकळी पसरली होती.नंतर समर्थांनी या खोलीवर काही संस्कार केले होते.
त्या दोन निश्चल आकारांकडे आम्ही पहात होतो.
एका क्षणात ते झालं आणि काही होत आहे याची कल्पना येण्याआधी ते संपलही.सर्व खोली भिंत चौरंग सर्व काही क्षणमात्र अंधुक झाल आणि दुसऱ्याच क्षणी पुर्ववत झाल.विजेच्या सॉकेटला चुकुन स्पर्श झाला की क्षणात प्रभावी शक्ती शरीराच्या नसानसांतुन वाहाते पण केवढा आकांत माजतो,त्याहुनही प्रभावी अशा कोणत्यातरी शक्तीचा संचार त्या खोलितल्या अवकाशात झाला होता.आपलं कार्य करुन ते शक्ती लोप पावली होती.
अनंतरावांनी डोळे उघडले होते.
"अहो........."कमलबाईंना एकदम रडुच कोसळलं
मी राहुलसेठना म्हनालो "सेठ मला आता तातडीच काम आहे,जरा यांच्याक्डे बघता का?"
राहुलसेठ लगबगिन पुढे झाले.
मला त्या बाहुलीचा नाश करायचा होता.ती बाहुली शेरभच्या अनेक घातकी हस्तकांच वाहन बनु शकत होती.म्हणुल बाहुलिला उचलुन मी खोलीबाहेर निघालो पण मी दारात असतान राहुलसेठनी कशासाठी तरी "अप्पा"अशी हाक मारली.मी तिथच थांबलो.
अर्धा खोलित अर्धा खोलिच्या बाहेर.
काही अपघात योगायोगानच टळतात.मी खोलीबाहेर गेलो असतो तर काय झालं असत सांगता येत नाही.
मी दारात उभा होतो,बाहुलिचा अर्धा भाग...चेहरा व हात बाहेर होते.
आणि त्या अर्ध्या खोलिबाहेर असलेल्या भागात चेतना आली होती.
डोळे गर्रकन फ़िरुन माझ्यावर खिळलेले होते.लहानसे हात बोट पसरुन माझ्या गळ्याच्या दिशेला वळत होते.अत्यंत वाईट क्षणांपैकि एक क्षण.
खरा प्रकार लक्षात यायला सेकंदाचाही अवधी लागला नाही.
खोलिच्या आतला अवकाश सुरक्षित होता पण बाहेरचा नाही.आमच्या बंगल्याभोवती शेरभच्या शक्तिच क्षेत्र एका ढगासारखं पसरलेल होत.बाहुलिचा नाश खोलितच करायला हवा.
मी पाऊल मागे घेतल....पण पुराच्या पाण्याच्या प्रवाहासरखी एक जबरदस्त ओढ मला बाहेर खेचत होती,राहुलसेठ माझ्या मदतिला धावले नसते तर माझा टिक लागला असता की नाही शंकाच आहे.निदान ती बाहुली तरी माझ्या हातुन खासच सुटली असती आणि अघोरी शक्तीने भारली जाऊन आमच्या नाशासाठी बाहेरच्या बंगल्यात दबा धरुन बसली असती.पण सुदैवाने ते टळलं.
मी खोलिच्या कोपऱ्यात त्या बाहुलीला ठेवुन तिच्यावर स्पिरिट ओतुन तिला काडी लावुन दिली.तीची राख व्हायला पाच मिनिटसुद्धा लागली नाहित.
मी राहुलसेठना म्हटल "सेठ आता एक शेवटची विनंती आहे,अनंतरावांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची जबाबदारी तुमची,मला आता समर्थांच्या मदतीला जायला हवं"
"अप्पा असं बोलु नका,ते तर मी करतोच पण तुम्ही एकट्याने जाऊ नका,आमचे केशवराव येतील ना हवी तेवढी माणसं घेऊन तुमच्या मदतीला"
"नाही मला एकट्यालाच गेल पाहिजे ,वेळ फ़ार महत्वाचा आहे "
अनंतरावांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करुन राहुलसेठनी मला नदीकिनारी सोदल,जातना त्यांनी फ़ार ओढेवेढे घेतले पण खाली काय धोका होता ते मला माहित होत.
त्या तळघराच दार शोधुन काढायला जरा वेळ लागला पण शेवटी ते काळ विविरं समोर आल,पायऱ्या पायऱ्या उतरत मी खाली आलो.मी तळघरत पोहचलो होतो.सर्वात धोक्याची जागा,शेरभची जागा.समर्थांनी त्याचा कट उधळला होता आणि त्यांचा मदतनिस मी...मीही त्याच्या शत्रुत्वाच्या छायेत आलो होतो. मृत्यु तर होताच पण मृत्युपेक्षाही भयंकर असं काही असेल यावर कोनाचा विश्वास बसनार नाही पण ते सत्य आहे.शेरभसारखा मांत्रिक शरीराची आणि मनाची फ़ारकत करु शकत होता.मन अस्मिता प्रज्ञा एका निर्जिव आकारात कायमची गोठवुन ठेवु शकत होता.पण म्हणुन काय भेकडासारखा वर लपुन रहायच? काय त्या जिण्याला अर्थ होता?
आणि माझी मदत होनार न्हवती कशावरुन ? सर्व तिर लोहाचा केला तर तो हलणारच नाही कारण त्याच्या मागे साधं लाकुडच हवं असत,शुद्ध सुवर्णात हिण कसाचा एखादा कण घातला की शुद्ध सोन्याला कठिणता येते.आपलं मुल्यमापन आपण कशाला करायच?
माझ्या मनात खास अशी दिशा न्हवती कारण मला माहिती होत की माझ्या येण्याची वार्ता शेरभच्या कानावर जाणारच होती एव्हाना गेलीसुद्धा असेल,तो किंवा त्याचा हस्तक माझा शोध घेत येतीलच.उजव्या हाताला एक वळण घेताच मेनबत्तीचा प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात--.....................
समर्थ उभे होते.समर्थ !
भिंतीपाशी ते काहीतरी करत असावेत,त्यांना पाहताच मनावरच ओझं एकदम खाली उतरल्यासारख वाटलं.समर्थ जवळ असताना मला कशाच भय न्हवत.
"अप्पा प्रकाश मालवुन टाक"समर्थांचा आवाज आला.विचारही न करता मी प्रकाश मालवला.त्या एका क्षणानंतर मला विचार करायच सुचल.
समर्थांनी मला बाहेर जायला सांगितल होत.माझ्यावर एक महत्वाच काम सोपवल होत.ते पुर्ण झाल की नाही ते त्यांनी मला विचारल नाही.हातात घेतलेल्या कार्याइतक समर्थ इतर कशालाही महत्व देत नाहित.आणि त्यांनी मला माझ्या येण्याच कारणही विचारल नाही,त्यांना माहित होत मला धोका होता आणि ते स्वतःपेक्षाही माझी जास्त काळजि घेत.
मला आठवल आत्ता ते पहाताना निर्विकारपने माझ्याकडे पहात होते.त्यांचा चेहरा आणि निर्विकार? सुर्य कधी काळा दिसेल का?हिरा कधी निस्तेज होईल का?
मघाची सुरक्षिततेची भावना केव्हाच गेली होती.मी आता निट त्यांच्याकडे पाहिल समोरचा चेहरा समर्थांच्या चेहऱ्याशी तंतोतंत जुळत होता पण काहितरी कमी होत.ती नक्कल वाटत होती.समर्थांची अशी भ्रष्ट नक्कल करण्याचा कोणाला अधिकार होता? मनातला संताप तिव्र उफ़ाळुन आला.
"कोण आहेस तु?"म्हनत मी समोर झेप घेतली.संतापानं बेभान झालेल्या मनात भितीला जागाच न्हवती.माझ्यात तितकी आक्रामक शक्ती न्हवतीच पन कदाचित मानसिक पाशावरुनच समर्थांच्या शक्तीचा एखादा अंश माझ्यातुन वाहत गेला.इतका वेळ समोर उभा असलेला समर्थांचा आकार थरथरला...चुरमुडला..भुग्यासारख पातळ तंतुसारख काहितरी खाली पडलं.मागं राहिल्या त्या तिनचार उंच काटक्यांचा एक सांगाडा.
आपण किती सहज फ़सलो या विचारन मनात राग साचुन आला होता.त्या रागाच्या भरात मी मेणबत्तीने त्या काटक्यांच्या सांगाड्याला आग लावली,कल्पना होती की त्या भुरुभुरु जळुन जतिल पण त्या लवक्र पेटच घेत न्हवत्या,पेटल्या तेव्हा धुरकट पिवळट ज्योतीने जळत होत्या.आणि एखादं चामड..केस..पिस..पंख जळावे तशी दुर्गंधी सुटली होती.शरीर भितीने शहारलं होत.हा भयानक प्रकार होता.त्या काटक्या साध्या नसाव्यात,कदाचित त्या पोकळ असव्यात अणि आतल्या पोकळित अस्थी चर्म केस रुधिर असे मानवी अवशेष भरले असावेत.या भयनक मार्गाचा केवळ पृष्ट्भागच मी नखानं नुसता खरवडला होता याची जाणिव झाली.
माझा शोध पुढे चालु झाला.मी शेवटच वळण घेतल.धडधडत्या पलित्यांच तलघर समोर आलं.मी बिचकतच आत पाय टाकला आणि शांतपणे उभा राहिलो.
"तु आलाच ना परत?" समर्थांचा आवज मागच्या बाजुन आला.समर्थ माझ्या मागच उभे होते.हसत होते.माझं मलाच नवल वाटल मघाच्या त्या नकली आकाराला आपन फ़सलो कसे?
"तिकडचे काम झाले?"
"हो अनंतराव अत शुद्धीवर आले आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये पोहचवल आहे.
"ती बाहुली?"
"तिचा त्या खोलितच नाश केला.बाहेर न्यायला लगलो तर...."
"ती माझीच चुकी आहे,तेवढ सांगायच राहुन गेलं होत."
""पण समर्थ इतक वेळ तुम्ही येथे काय करत आहात?"
"चल दाखवतो"ते हसत म्हनाले.
तिथल्याच एका रुंद जागेत त्यांनी पंधरा सोळा असाव्यत लहान मेणबत्त्या एका विशिष्ट रचनेत मांडल्या होत्या आणि त्य संथ ज्योतिंनी जळत होत्या.
समर्थांनी मला हाताला धरुन पुढे नेले......एका सरळ रेषेपाशी फ़रशी संपत होती.त्या रेषेपुढे एक खोल काळी गर्ता होती.खाली टाकलेला टॉर्चचा प्रकशाही त्या काळ्या खोलित गडप होत होता.मी अशा जागा पाहिल्या होत्या.मंतरहाटच्या डोंगरातली गुहा,मावशिंच्या इथे कामाला असलेल्या वेड्या रघुची गुहा.ही खोल विवरं भलतीकडेच जातात.त्यांच्या तळाशी काहिकाहि भयानक वेटोळी घालुन बसलेल असतं.
मी त्या गर्तेच्या काठावरुन मागे सरकत होतो,पण समर्थांनी माझ्या पाठिवर हलकेच ठेवत म्हटलं "अप्पा जरा थांब आणि पहा,आधीच तळघर अंधारलेल त्यातल हे विवर....मला वाटत नाही लक्षावधी वर्षांत तिथं कधी प्रकाशाचा अंधुकसाही किरण पोहचला असेल."
आधी मला त्या विवरात काहिहि दिसल न्हवत पण आता काही अंधुक रेषा दिसायला लागल्या,रम्गित धुराची वेटोळी वर सरकत होती,त्यांचा खरा आकारही समजत न्हवता,तो अवढव्य असला पाहिजे,आता त्यांच्यातले बारकावे दिसत होते.मोठ्या लालसर वर्तुळात एक काळा गोल....डोळाच की ! पण किती थंड..किती निर्विकार...किती अमानवी.
"आपलं विश्व अनेक मितीत पसरत गेलेल आहे अप्पा,तयत अनेक दारं आहेत,त्यापैकी एकाची ही किल्लि आहे,दार खोलताच ते हजर झालं आहे,आता त्याला भक्ष्य हवं आहे,आणि मी ते त्याला देणार आहे"समर्थ
"शेरभ?" मी नवलानं म्हणालो
"होय शेरभ ! " उत्तर देताना समर्थांचा चेहरा कठिण कातळासारखा झाला होता.
"चल आपण शेरभला आणु"समर्थ
आम्ही त्या मेणबत्त्यांच्या रचनेशेजारुन चाललो होतो मला त्यातला कहिही क्रम वा अर्थ दिसत न्हवत,मला तिकडे पहाताना समर्थ म्हणाले "तोही त्यातलाच भाग आहे अप्पा"
"शेरभसाठी?"
"नाही..त्याच्या हस्तकांसाथी.तो त्यांना बरोबर आणिल किंवा पुढे पाठवील किंवा माहुन बोलाविल.ते त्याच्यात अडकणार आहेत.अवकाशातल्या एखाद्या अतिजड वस्तुच्या गुरुत्वाकर्षणात लहान कण,धुमकेतु,उल्का इत्यादी सापडतात ना?तसाच हा प्रकार आहे."
समर्थांनी हलक्या आवाजात हाक मारली " शेरभ ! शेरभ"
आवाज भिंतीवर परावर्तीत होऊन पुढे जात होता.माझी खात्री होती ती समर्थांची हाक त्या तळघराच्या खालच्या वरच्या लहानमोठ्या सर्व शाखांतुन घुमत घुमत गेली.
"हो.....हो....हो ! थांबा ! " तो किंचाळला.
शेरभन डोक्यापाशी घट्ट धरलेले हात खाले घेतले,त्याचा चेहरा घामेजलेला होता.
"हे काय आहे समर्थ?"शेरभ
"मी तुला हाक मारली"समर्थ थंड आवाजात म्हटले
"ठिक आहे मी आलो आहे"तो उर्मट आवाजात म्हटला
"शेरभ केलेल्या दुश्कर्मांचा तुला पश्चाताप होत असेल त्याचे प्रायश्चित्त भोगायला तु तयार असशिल तर तुल संधी देने माझे कर्तव्य आहे.जी प्राचिन परंपरा तु मनतोस त्याच परंपरेला अनुसरुन मी तुला हे शेवटच निर्वाणीच आवाहन करतो.ही शेवटची संधी आहे"
शेरभला संताप अनावर झाला,समर्थांच्या दिशेने थुंकत तो म्हणाला "मिळाल तुझ उत्तर तुला?"
"जशी तुझी इच्छा !"
मग ते सावकाश चालत शेरभच्या दिशेने गेले,त्यांच्या उजव्या हातात एक काळ्या सुताची गंड्यासारखी माळ होती.ती त्यांनी शेरभच्या गळ्यात घातली.त्या एका क्षणात शेरभच्या चेहऱ्यात अविश्वसनिय परिवर्तन झाल,त्याचा चेहरा पांढराफ़टक पडला.
"पण .....पण समर्थ ! हा अतिरेक आहे"गळ्यातली काळी माळ हाताळत शेरभ म्हणाला.वरकरणी साध्या वाटणाऱ्या त्या क्रियेत काहीतरी विलक्षण संकेत होता.
""तुम्ही एकदम सर्वसवाचे बाजी लावता,मधला काही मार्ग नाही का?,समर्थ ,समर्थ माझं ऐका तुम्ही दोघ जाऊ शकता.तुम्ही दोघंही"शेरभ
समर्थ काहिही न बोलता त्या काळ्या गर्तेच्या काठावर येऊन उभे राहिले
"तु मनाशी नवल करत असशिल अप्पा,या समोर मेणबत्त्या दिसतात ती एक रचना आहे,मला शेरभ एकटा हवा आहे...त्याला एकट्यालच याव लागेल....तुला आठवत महालकरीने छोट्या तारकेचा बळी देण्यासाठी जे जागवलं होत त्यालाच मी आत्ता जागवलं आहे.तो माझ्या बाजुचा नाही...शेरभच्याही नाही.तो तटस्थ आहे.आमच्यापैकी एकाचा स्वाहाकार करायला तो आला आहे."
"पण शेरभ दुर राहु शकत नाही?"
"नाही,त्याच्या गळ्यात मी ती काळी माळ घातली नाही का? तो बंधनाचा,गुलामगिरीचा एक संकेत आहे.मी स्वतःची काळी माळ त्याच्या गळ्यातुन उतरवली पाहिजे किंवा त्याने माझा संपुर्ण नाश केला पाहिजे.तोपर्यंत तो माझा गुलाम रहाणार आहे"
"म्हणजे आता संघर्षाशिवाय पर्याय नाही त्याला?"
"हो...दोघापैकी एकच मागे राहिपर्यंत.
"शेरभ चल ये"समर्थांनी हाक मारली
अनिच्छेने का होईना तो त्या हाकेसरशी आला.त्याची पावलं अडखळत होती पण तरीही तो आला.अर्थात तो एकटा आला नाही.मी त्याच्याबरोबर जे कोनी होते-सहाय्यक-सोबती-गुलाम त्यांच वर्णन करत नाही.बाहुल्या होत्या आणखिही काही काही आकार होते.काहिंच्या केवळ बाह्यरेषाच होत्या.
"पुढे ये"समर्थांचा आवाज वाढला होता.
त्याला त्या मेणबत्त्यातुनच याव लागल.त्याचे सहकारीही पुढे आले आणि एक विलक्षण गोष्ट घडली.एखादं चित्र तुमच्यापासुन लांब लांब जाव तसं झाल.त्या मेणबत्त्यांच्या संथ ज्योतिंच्या चक्रव्युहात सापडलेले ते सहाय्यक-गुलाम फ़िरत फ़िरत दुर जात होते.क्षणभर मला भास झाला की मी आकाशातल्या ताऱ्यांकडेच पाहत आहे.
"नाही-नाही-नाही"शेरभ ओरडत होता
समर्थ मंद हसत म्हणाले "हो,शेरभ,हो"
समर्थ आणि एकटा शेरभ त्या गर्तेच्या काठावर एकमेकांसमोर आता उभे होते.
शेरभची नजर आता संताप,द्वेष,चिड यांनी नुसती धगधगत होती.
समर्थांनी दोन्ही हात वर उचलले आणि तोंडाने विलक्षण वर्णोच्चारांना सुरवात केली.मानवी कानांसाठी ते आवाज न्हवते.मी दोन्ही कानांत बोट घट्ट घालुन घेतली.
आसापासची हवा थंड पडली,मेणबत्त्यांच्या ज्योते फ़डफ़डायला लागल्या,त्रिमित अवकाशात काहितरी नविन पदार्पण करत होत.ते काय होत याची मला अंधुकशी कल्पना होती पण शेरभला होती का?
आणि ते सावकाश सावकाश वर आलं.
हे काय भलतच जागवलं होत समर्थांनी?
स्वतःभोवतीच गिरक़्या घेणारी हिरवट पिवळ्या रंगांची वलय गर्तेतुन वर येत होती.त्या वलयांत ते डोळ्यांसारखे वातनारे लालभडक गोल आकार होते.तो जगड्व्याळ आकार वर येतच होता.पाच फ़ुट पंधरा फ़ुट..असं वातत होत की हा आकार मागेही खुप लांबपर्यंत पसरलेला आहे.हा हिमनगाचा केवळ माथाच होता.उर्वरीत भाग आणखीच "कुठंतरी"पसरत गेलेला आहे.
शेरभनं मघाचा तो सामंजस्याचा पवित्रा सोडला होत.आता मला दिसलं की ति ही एक फ़सवणुकच होती.तो त्याच्या खऱ्या स्वरुपात उभा होता.ताठ,अभिमानी,गर्विष्ठ !
तिथे आता वेळ थांबला.मंदावला.ताणला गेला.
अवकाशाचे धागे विस्कळित झाले.
शरीरावरुन गरमगरम हवेचे झोत जात होते.पायाखालची जमिन हादरलिशी वाटली.समर्थांच्या मेणबत्त्या विझल्या होत्या.
शेरभच्या हस्तकांची वाट खुली झाली होती का? माझी भिती सार्थ होती.कारन शेरभ आता एकटा वाटत न्हवता.त्याच्या आसपासही कोणीकोणी होते.पण समर्थही एकटे न्हवते.
शब्दांनी किती आणि काय वर्णन करणार?
एकाएकी मला जाणिव झाली की काहितरी अतीप्रचंड अवाढव्य चेंदामेंदा करनारी वस्तु आपल्या मस्तकावर कोसळणार आहे,प्रतिक्षिप्त क्रियेने मी डोळे घट्ट मिटुन घेतले.
त्याच अवस्थेत असताना एक आर्त प्रदिर्घ किंकाळी कानावर आली.आसपास लखलखता प्रकाश झाला.काहितरी अगदी जवळ आल आणि गेल.शरीराच्या नसानसा तप्त रसात घुसळल्यासारख्या झाल्या.
मग सर्व कोलाहल थांबला.
मी सवकाश मान वर करुन पाहिल.
शेरभ त्या हिरवट धुर्मवलयांत तरंगत होता.त्याच शरीर अर्धपारदर्शक वाटत होत किंवा तो हिरवट धुर त्याच्यातुन आरपार जात असेल.
पहाता पहाता त्याची आकृती दुर दुर निघुन गेली.दिसेनाशी झाली.
समर्थ फ़रशीवर खाली कोसळले.
मी त्यांच्या कपाळावर हात ठेवला,कपाळ बर्फ़ासारख थंदगार पडला होता.शरीराला झतके बसत होते.त्यांची नाडी मंद झाली होती.मी चटकन त्यांच्या पिशवीतुन पुर्वी त्यांनी ज्या बाटलीतुन दोन लहान चपट्या पांढऱ्या गोळ्या घेतल्या होत्या, त्या त्यांच्या तोंडात एकामागुन एक सरकावल्या.
एक जिवघेणी प्रतिक्षा...........
पाच सहा मिनिटानी समर्थांचा श्वास नियमीत झाला.मिनिटभरान त्यांनी डोळे उघडले.त्यांच्या डोळ्यात ओळख होती,आभार होते.
आम्ही तळघराच्या वर आलो तेव्हा पहाट झाली होती.हवेत गारवा होता.समर्थांना आता विचारण्यासारखं फ़ारसं न्हवत.एकच शंका मनात होती."समर्थ,महालकरीन जागवलेला तो आकार लहान होता,इथुन कितीतरी अंतरावर होता.,इथे तो कसा काय प्रकटला?"
"आप्पा हे सर्व अविष्कार आपल्या नेहमीच्या मर्यादीत जगबाहेरचे आहेत,"बाहेर" ही केवळ कल्पना आहे.सरावानं सोपा वाटणारा संकेत आहे.समज येण कठिण आहे.तिथं,त्या क्षेत्रात,आपल्या स्थळाच्या काळाच्या कल्पना गैरलागु आहेत.तिथला एक-कोणताही बिंदु आपल्या विश्वातल्या यच्चयावत बिंदुंना समिप आहे.शेवटी शेरभ हरला आणि त्याचा बळी बनला.मी म्हनेन की त्याला त्याच्य प्रमादांना योग्य असं प्रायश्चित्त मिळालं.बाकी तपशिलात जाण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे? "
.......................
महिन्याभराने अनंतराव आणि कमलाबाई समर्थांकडे आले.(त्यांना पुर्ण बरं व्हायला तितका कालावधी लागला) अर्थात त्यात नवल काहिच न्हवतं.समर्थांनी त्यांच्या सर्व शंकांच निरसन केल.सर्व प्रश्नांना उत्तर दिली.ते गेल्यावर समर्थ म्हणाले,
"अनंतरावांना समजण्याचा हक्कच आहे.त्यांनी फ़ार फ़ार यातन भोगल्या आहेत.भविष्यात त्यांना याचा खात्रिने उपयोग होईल"
समाप्त

No comments:

Post a Comment