Thursday, May 28, 2015

पापी... (संपूर्ण) (एक गूढ सत्य) (थरारक आणि रहस्यमय कथा) 1

पापी... (संपूर्ण) (एक गूढ सत्य) (थरारक आणि रहस्यमय कथा)


नोट - ह्या कथेचा मूळ लेखक दुसरा आहे... मी फक्त एक अनुवादक आहे, त्यांची परवानगी घेवूनच मी हि कथा मराठीत अनुवाद करत आहे... हे वाचकांनी ध्यानात ठेवावे...

मूळ लेखक - नाव माहित नाही
अनुवादक - दत्ता उतेकर 

 पापी... एक गूढ सत्य थरारक आणि रहस्यमयी कथा

अध्याय पहिला पराभव

भाग पहिला

पूर्ण खोली गडद काळोखाने भरलेली होती... एका बेडवर लागेल्या छोट्याश्या बल्बच्या अंधुक प्रकाशात फक्त तो बेडच दिसत होता... त्या बल्बचा प्रकाश एवढा अंधुक होता कि फक्त त्या बेडशिवाय तिथे काहीच दिसणं कठीण होतं... त्या बेडवर एक मुलगी गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून आकसून बसली होती. त्या अंधुक प्रकाशात आणि एअर कंडीशनवाल्या त्या खोलीतपण त्या मुलीच्या कपाळावर घर्मबिंदूचे थेंब पाहून
कोणालाही तिच्यातल्या भयाचा अंदाजा येवू शकत होता...

"शैलजा मी काय सांगतोय ते नीट ऐक..." त्या काळोखातून एक भारी भक्कम आवाज आला...

"आता बेडवर झोप आणि आपले डोळे बंद कर..." तिथूनच पुन्हा अजून एक आदेश आला आणि त्या मुलीने लागलीच त्या आदेशाचे पालन केले... जसं काय ती त्याच आदेशाची वाट पाहत होती.

त्या मुलीला जसं सांगितलं जात होतं तसंच ती आपले डोळे बंद करून बेडवर झोपली. तिला असं करतांना पाहून असं वाटत होतं कि ती मुलगी कोणत्या तरी असहाय्य कारणामुळे निषेद करू शकत नव्हती. काहीच क्षणानंतर तिला जाणवले कि एक गरम श्वास तिच्या सर्वांगावरून फिरून गेला आहे, आणि काही अस्वस्थ क्षणानंतर तिला वाटलं कि जसं कोणीतरी तिचे पाय घट्ट पकडले आहेत. तिच्या काही समजायच्या आधीच तिचे पाय कोणत्यातरी वस्तूने बेडला बांधले गेले. ह्या प्रसंगाने ती एवढी घाबरली गेली कि तिच्या तोंडून एक किंकाळी फुटणारच होती कि तिच्या तोंडावर कोणाचातरी एक वजनदार हात पडल्यामुळे ती किंकाळी तिच्या तोंडातल्या तोंडातच घुटमळली गेली.

"शु$$हह्ह्ह ... मला तुला काहीच इजा पोहचवायची नाही आहे... माझी अशी कल्पना आहे कि मी अश्या मुलीचं चित्र काढू जी माझ्या बेडवर बांधलेली आहे... यु नो इट्स अ काइंड ऑफ फेटिश.." तो व्यक्ती तिला शांत करण्यासाठी बोलला.. आणि त्याचे ते शब्द कामी आले, कारण त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आता कमी झालं होतं...

आता त्याने पहिले त्या मुलीचे पाय बांधले आणि मग नंतर हात आणि सगळ्यात शेवटी त्या मुलीच्या डोळ्यावर एक पट्टी पण बांधली... आता त्याच्या बेडवर एक हात, पाय आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली एक मुलगी होती. त्याने मागे होवून काही अंतरावून त्या मुलीला निहारले.

"परफेक्ट..." त्या व्यक्तीच्या तोंडून अनायसंच निघाले.

त्या व्यक्तीने एक काळा कोट चढवलेला होता, ज्याच्या खिशातून त्याने एक बॉलसारखी वस्तू काढली. तो हळू हळू त्या मुलीकडे जात होता... त्या मुलीला काहीच समजत नव्हते कि शेवटी तिच्या सोबत होतंय तरी काय...?? अचानक त्या व्यक्तीने तिच्या गालावर एक जोरदार चपराक लगावली. जसंच त्या मुलीने वेदनेने आपलं तोंड उघडलं त्या व्यक्तीने त्या चेंडू सारख्या वस्तूला तिच्या तोंडात खुपसून तोंड टेपने बंद केलं.

आता त्या व्यक्तीने दुसऱ्या खोलीत जावून एक वाडगा आपल्या सोबत घेवून आला. त्या वाडग्यामधून त्याने एक मेणबत्ती काढली आणि तिला जळवून ती बेडच्या उश्याशी ठेवली... आणि त्या प्रकाशात त्याने आसपासच्या सर्व वस्तूंवर एक नजर फिरवली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक संतुष्टीचे भाव आले.

'चला मग आता खरी मजा सुरु करूयात...' एक स्मित हास्य देत तो स्वतःशीच पुटपुटला.

आता त्या व्यक्तीने त्या मुलीच्या शेजारी बसून आपला एक हात त्या मुलीच्या मानेवर ठेवला आणि त्या हाताला असा फिरवायला लागला जसं तो तिथे काही तरी शोधत आहे... अचानकच त्याचा हात जसंच त्या मुलीच्या मानेखाली पोहोचला त्याने शोधण बंद केलं. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच स्मित हास्य उमटलं. त्याने लगेच आपले डोळे बंद करून मंत्रोच्चारण सुरु केलं आणि दुसऱ्या हाताने त्याच वाडग्यामधून एक मोठा सुरा बाहेर काढला.

काही क्षणानंतरच त्या व्यक्तीचे मंत्रोच्चारण आणखीनच वाढले गेले... त्या मुलीचं शरीर जसं आग कशी भडकते तसं भडकत होतं... तिने स्वतःला सोडवण्यासाठी आपले हात पाय मारण्याची धडपड सुरु केली. त्या मुलीला समजून चुकलं होतं कि तिच्या सोबत आत्ता काही तरी वाईट आणि खूप भयंकर घडणार आहे... स्वतःला सोडवण्यासाठी ती आपली सर्व शक्ती पणाला लावून ती दोर तोडण्याचा प्रयत्न करत होती पण तिची शक्ती त्या दोरीसमोर अपुरी होती.

तो व्यक्ती तिच्या प्रतिकाराला दुर्लक्ष करून आपले मंत्रोच्चारण अजून जोराने बोलायला लागला आणि त्याचवेळी त्याने तो सुरा त्या मुलीच्या मानेवर सपकन फिरवला. त्या वेदनेमुळे ती मुलगी अजून जोराने आपले हात पाय आपटून आपटून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीने भळाभळा गळणाऱ्या रक्ताला त्या वाडग्यात भरू लागला.

ती व्यक्ती आपल्या मनात एकदम द्वेष बाळगून होती... त्याच्या वागणुकीवरून तरी असं वाटत होतं हे सर्व काही त्याच्यासाठी काहीच नाही आहे...

ती मुलगी आता अजून जोराने आपले हात पाय आपटत होती... तिच्या शरीरासोबतच तिची आत्मा पण त्या वेदनेला सहन करत होती... त्या मुलीची अशी हालत झाली होती कि तिच्या शरीरातील आत्मा तिला सोडून जाण्याचा मार्ग पाहत होती पण त्या आत्म्याला पण मार्ग दिसतच नव्हता... जसं जसा वेळ जात होता त्या मुलीची प्रतिकार करण्याची क्षमता आता कमी होत जात होती.. अजूनही त्या जखमेतून रक्त प्रवाह सुरु होता पण वेग कमी झाला होता...

तो वाडगा आता त्या मुलीच्या रक्ताने पूर्णपणे भरला होता... त्या व्यक्तीने तो वाडगा सावधपणे बाजूच्या टेबलावर ठेवला... आता आपल्या दुसऱ्या खिशातून त्याने एक पेंटिंग ब्रश काढून त्या मुलीच्या रक्ताने भिंतीवर काहीतरी लिहिलं आणि त्या मुलीच्या जखमेला टेप लावून बंद केलं.. ती निष्प्राण मुलगी आता बेडवर पहुडली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सरळ सरळ सांगत होते कि ती मरण्याच्या पहिले तिने खूप वेदना सहन केल्या असतील आणि आता तिच्या आत्म्याने शरीरातून मार्ग काढून पळ काढला होता... कारण त्या आत्म्याने आपला पराभव स्वीकारला होता...

ती व्यक्ती काही वेळासाठी त्या खोलीतून बाहेर निघून गेली आणि जेव्हा आतमध्ये आली तेव्हा त्याच्या हातामध्ये एक स्प्रेची बाटली होती. त्याने पूर्ण खोलीत स्प्रे मारण्याच्या आगोदर सर्वीकडे एकवार नजर फिरवली कि काही सुटल तर नाही ना... पूर्णपणे तपासून झाल्यावर त्याने पूर्ण खोलीत स्प्रे मारला आणि तो ब्रश आणि सुरा आपल्या खिशात ठेवला... आणि त्या मुलीला ज्या दोरीने बांधलं होतं तिथून तिची सुटका केली.

"च्च च्च बेच्चारी..." एवढं बोलून तो त्या खोलीतून बाहेर आला...

अजूनही ती खोली पूर्णपणे गडद काळोखात होती, त्यात त्या बेडवर अर्धनग्नावस्थेत त्या तरुणीचे प्रेत पडले होते, तिला सोडून काही पण दिसणं कठीण होतं... मुलीचं पूर्ण तोंड आणि बेडवरची चादर तिच्या रक्तांनी माखली होती... त्या मुलीचे डोळे अजूनही उघडे होते आणि त्या डोळ्यात मरण्याच्या पहिले तिला झालेली असहाय्य वेदना आणि दुखः साफ दिसू शकते...

क्रमशः...

10 comments: