Sunday, May 31, 2015

ADD AS A FRIEND
-    Story by Viraj Kanekar 
गोष्ट पहिली..
मी श्रीधर गावडे ... !!
आता मी सावरलोय... सावरलोय म्हणजे काय... तर adapt झालोय .. आलेल्या परिस्थितीला बदलेल्या स्थितीला... दुसर काय असतं आपल्या हातात...फक्त बदललेल्या परिस्थितीला बघायचं .. कधी थोडं .. कधीफार... पण त्या क्षणी बसलेला धक्का जबरदस्त होता... थंड धक्का.. थंडगार सुई पटकन टोचावी.. मेंदूत.... थंडगार सुई.. आधी डोक्यात टोचणारी मग थंड धक्का देणारी...

फेसबुक पण बोअर होत चाल्ल होतं .. काय ते दररोजच करणार...तेच तेच.. शेअर , लाईक , कमेंट... माणसांच्या आयुष्यात काहीतरी नवीन पाहिजे... दररोज ... विचित्र... सणसणीत....लोक पण विचित्र असतात....मुलींच्या पोस्ट असल्या कि त्याला लाईक , कमेंट चा पाउस... गुरासारखा HMM HMMM करत  असतात ...  खोटे फोटो ठेवतात... खोटी माहिती... अगदी फेक account पण करतात... निर्बुद्ध लेकाचे ... सगळफसवं... दिखाऊ...

हा हा हा... बघा ... तुम्ही पण फसलात...तुम्हाला वाटला असेल .. कि ह्या हुशार mature मुलाला हे ढोंग आवडत नाहीइथेच फसलात.. दिसत तसं नसत...समोर दिसला ते सत्य मानता ...अहो मी पण असाचआहे.. असाच म्हणजे वर च्या सारखा... कदाचित  पावले पुढेच... मला ह्याच फसव्या दिखाऊ थोडक्यात 'virtual ' जगात जगायला आवडत.. आता फेसबुक  जग फसवं आहे...आणि आपण खर रहाव म्हणजेघोर फसवणूक आहे... आणि समजा.. जर मी दाखवलं असत.. माझ खर रूपम्हणजे खर शिक्षणखरा फोटो.. खरी माहिती... तर कुणी विचारल असत का? ( कुणी म्हणजे विशेषतः मुलीनीआता खरा  फेमसआहे ... जग खोत असाल म्हणून काय झालं...?
 मग मी मस्त छान फोटो शोधलाखोट्या माहितीने account सजवलं.. मग मी एका " अप्परक्लास मध्ये जाऊन पोहचलो .. या दरिद्री मध्यमवर्गातकाळ्या रंगातसाध्या कॉलेज अश्या lifestyle     
मध्ये मला जे मिळायची सुतराम अपेक्षा  नव्हती  ते मला या खोट्या जगात - १९ इंचाच्या box मध्ये आणि १०८ बटणाच्या जगात सापडले... अनेक चांगले मित्र ( त्याहूनछान मैत्रिणीमाझ्या लिस्ट मध्ये जमू लागले .. मजा यायची...  वास्तव जगातला अपमानदुर्लक्षबापाचा मारदुसर्यांचा पैसा.. पाहून वाटणारा... हेवा.. मग येणारfrustration ... छे छे.. इथे काहीच नसत...
हे जग किती मस्त... मी एकटाच राजा... इथे मी राज्य करतो.. अनेकांशी गप्पा मारतो.. त्या दिवशी मज्जा आली ... आमच्या कोलेजची ... ती "वंतासमुलगी.. हो तीच... 'मी म्हणजे किळस  अशी वाटणारी ... माझ्या फेसबुक च्या जगात ' जवळचीमैत्रीण बनलीय... " Lets Meet " म्हणते...  आता तुम्हीच सांगा.. मी भेटलो हिला तर फेफरयेऊन पडेल... मूर्ख कुठली... मजाच आहे... ना.. हल्ली मी वास्तव जग कोणते हेच विसरलो आहे...  त्या बाहेच्या कुरूप जगात नकोच... २४ तास इथेच राहायचं .. खोट.. पणमनात हव तसं खर.. आपल्याला हव तसं खर .. आपल्याला हव ते नाव .. हव ते जग... हवा तो सोबती... हव ते शिक्षण ... कुणाच्या बापाची ( अगदी माझ्यापण ) हिम्मतनाही हात लावायची... मी इथेच राहायला लागलोय आता मरूदे च्यायला.. हेच बर्र.. रात्री झोप नाही यायची.. आता कारण मिळालंय.. अगदीच डोक दुखलं.. झोपच येत नसेलतर डॉक्टरने गोळ्या दिल्यात .. झोप पण ' कृत्रिमझालीय आता.... 
पण हेच बघा .. म्हटलं ना... काहीतरी नवीन हव असतं...सणसणीत.. नवीन .. तेच तेच करून कंटाळा येतो... तेच झाला... या खोट्या जगाच्या तेच तेच पानाचा कंटाळा येऊलागला मला... नवीन हव असता ...काय वेगळ करणार...

असाच विचार  करत hoto त्याच वेळी.. एक पोस्ट पाहिली मी...  वाईट होती बातमी...
वाशीच्या राजे शिंदे महाविद्यालायचे चार तरुण - तरुणी पोहायला गेले होते.. बुडून मेले म्हणे... 
नावे पण आली होती...  आणि RIP .. लिहिलं होतं...  डोक्यात विचार आला ...
अरेच्या .. ह्यांची पण फेसबुक account असणार... ती अनाथ होणार... कशी काय?
म्हणजे बघा... आज तुम्ही password टाकून तुमच account  उघडला... काम केलं बंद केलं...आता तुम्ही विचार करणार कि उद्या पुन्हा उघडायच..पण उद्या सकाळी तुम्हीमेलात... मग तुमचा फेसबुक कोण उघडणार...असंच राहता ते... झोंबी सारख... झोंबी.. धड मेला पण नाही... धड जिवंत नाही... मला आधीझोंबी ' शब्दाची मजा वाटली मगकीव...  छे छे ... 'तुम्ही मेलातही काय तुमच्या फेसबुक ची काय चूक आहे... बिचार... त्याने किती आनंद दिला तुम्हाला.. नवीन जग दिला... आणि त्याला तुम्ही असंअर्ध्यावर सोडून दिलात... जरापण विचार नाही केलाततुम्ही मेल्यावर त्या निष्पाप account  च काय होणार ? कोण ते उघडून बघणार.. कृतघ्न  आहात तुम्ही...
तेवढात एक वीज चमकली डोक्यात... वाह.. काय कड्डक आणि सणसणीत आहे... मी काय केलं... त्या मेलेल्या मुलांच्या बातमीतल नाव पाहिलं..
सुबोध पाटील ' ... टाकला सर्च वर ... - सुबोध पाटील  आले... आता मेलेला सुबोध कसं ओळखायचा.. ?  नशीब सुबोध ने ' studying engineering from Raje-Shinde technical institute' टाकल  होतं ... केलं 'add as a friend '... कोणतरी ऐकेल तर  वेडा  म्हणेल... सणकी , विक्षिप्त...  पण मजा वाटली.. कुणी केलाय का असा...?आपल्याला वेगळं करायची हौसच आहे भारी... मग ते उरलेले तीन जणांना पण पाठवलं... किती विचित्र... अशी Friend  Request .. जी कधीच नाही Accept होणार ... विचित्र वाटला.. पण आवडला.. काहीतरी जगावेगळ केल्याचा आनंद.. अद्भुत... 
आता नवीन नादच लागला...मी मेलेली लोक शोधू लागलो... पेपर वाच.. TV बघ..कोण मेलाय ते बघ... मग शोध त्याला... तरुण असला तर अजून छान... मला मेलेली लोकहवी होती...कोण नाही सापडला असातर मला चूक चुकल्यासारख वाटायचं...  स्मशानातला मांत्रिक जसा मुडदा येण्याची वाट पाहतो.. तसं झाल होत... मी फेसबुक चा मांत्रिकहोतो .... मेलेल्या लोकांशी मैत्री करणारा... 

आता गम्मत सांगतो... धक्काच तो..
हल्ली काय झालाय काय माहित... तरुण मुलं मरत नाहीत... मेलेली फेसबुक वर भेटत नाहीत.. छे... कंटाळा आलं होतं... ...डॉक्टर पण वेडाच आहे... एक गोळी घे म्हणे...अरे मी अद्भुत जगाचा शोध घेणारा मांत्रिक आहे... आणि म्हणे एक गोळी...  हल्ली गोळ्या घेऊन पण झोप नाही येत..त्या दिवशी नुसताच बटन चाळे करत  होतो... तेवढ्यातएक notification  आली... धक्काच बसला... 
आधी वाटला गम्मत करताय कुणीतरी.. 
' subodh patil added you as friend " ... सुबोध पाटील...? अरे हा तोच का?. बुडून मेलेला.. नाही नाही.. कोणतरी वेगळं असेल.. पाटील नाही म्हटला तरी १० मध्ये एकसापडेल... पण... हे काय... कोलेज पण तेच..? साला कुणीतरी घेतोय कापण नाही... हे माझा गुपित नाही कुणाला ठाऊक...
विचार करत होतो... तेवढ्यात आणखी.. - -  -१२ - २० - ३६-५५ notification ... फटाफट वाढल्या... साला... भे***  अरे ही तीच पोर ना... मेलेली...
सर्व मेलेली माणसं माझी request accept कशी करत आहेत... भूत ... ? 
एक थंड शिरशिरी गेली मेंदूतून... 
अंग थंड पडत चालला होतं.. म्हटलं ... थंड सुई टोचली असं वाटला...
मला भीती वाटत होती... पण बाकी भावना गोठल्या होत्या... माझ्या लिस्ट मध्ये ६० मेलेली लोक आली होती...
माझे हात गोठले...
आणि त्या नंतर जे झालं... जे तुमच्याबरोबर झाल असत तर...
मेलाच असतं तुम्ही... मी म्हणून ठीक होतं... 
एक वेगळीच notification आली....
" you have been added to dead facebook" 
विचित्रच ना... डेड फेसबुक... ? कशाला बर... अरे मला जाउद्या..
हे काय... माझे बाकीचे जिवंत ६०० मित्र गायब झाले ...
फक्त ६३ जण.. होते... सर्व मेलेले... तेच ते... 
मी काय करतोय इथे... आहे काय हे...?

सुरवातीला हे जड गेला... पण तुम्हाला मी सुरवातीलाच म्हटला ?
आता मी सावरलोय... सावरलोय म्हणजे काय... तर adapt झालोय .. आलेल्या परिस्थितीला बदलेल्या स्थितीला... दुसर काय असतं आपल्या हातात....

गोष्ट दुसरी..
मी रफिक शेख..
मला वेगळी सवय लागलीय... मी मेलेल्या लोकांना add करतो...मजा येते..
काल ही बातमी पहिली... आणि मग सुचल .... मेल्या नंतर काय होत असेल फेसबुक account च ?
हा बघा हीच बातमी... 
झोपेच्या  गोळ्या जास्त घेऊन श्रीधर गावडे नावाच्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू "

No comments:

Post a Comment