Thursday, May 28, 2015

पापी... एक गूढ सत्य भाग सहावा

पापी (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय दुसरा नंबर्स आणि चिन्ह

भाग सहावा

"तुम्ही आम्हाला मदत करायला तैयार आहात हे कळल्या पासून मी एवढा आनंदित आहे कि काय सांगू तुम्हाला डॉ. अवधूत सर..." संत्या एकदम खुश होत बोलला, जेव्हा त्याच्या सेलवर डॉ. अवधूत सरांचा फोन आला होता तेव्हा आणि त्याच वेळी ते दोघे तडकीफडक सरळ त्यांच्याकडे येवून पोहोचले.... डॉ. अवधूतला पण तीच शंका होती जी संत्याला होती...

"हे पहा... मला कोणाला भेटायला नाही आवडत पण तुम्ही जे काही चित्र पाठवले होते त्यांना मी इग्नोर पण नाही करू शकत..." डॉ. अवधूत आपल्या त्याच ओळखीच्या गंभीर शैलीत बोलले... "तुमच्या जवळ आणखीन किती माहिती आहेत त्या सर्व मला जाणून घ्यायच्या आहेत..."

"तुम्ही पहिल्या मुलीच्या मृत देहाचं चित्र तर पाहिलंच असाल, तिचा गळा कापून तिचं रक्त काढण्यात आलं होतं, त्या उलट दुसऱ्या मुलीचं तिची छाती कापून... पहिली मुलगी वेश्या होती आणि दुसरी एक अनाथ जिला एका पंडितने काळजीने तिला मोठं केलं होतं... पण अचंबित करणारी गोष्ट म्हणजे ह्यांच्याच रक्ताने खुन्याने भिंतींवर काही नंबर्स आणि चिन्ह रेखाटले होते त्यांचे चित्र तर पाठवलेच आहेत तुम्हाला..." संत्या बोलला...

"तुम्ही पहिल्या मुलीचं जिची हत्या झाली आहे तिच्या विषयी आणखीन काही माहिती जमा नाही केली काय...?" डॉ. अवधूत...

"मी समजलो नाही तुमच्या गोष्टीला.. हे जरुरी आहे काय....?" संत्याने प्रश्न केला...

"जसं तुम्ही दुसऱ्या मुली विषयी सांगितलं कि ती मुलगी अनाथ आहे आणि तिला पंडितने वाढवलं... मग पहिलीच काय...? ती वेश्या होती ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही तिचं नाव गाव काय आहे वैगेरे माहिती गोळा केली असेल कि नाही...?"

"तिचं नाव शेवंता, ती तरवडे गावाची, ह्याच्या व्यतिरिक्त जास्त माहिती आम्ही गोळा केली नाही... पण हे सर्व विचारण्याच्या पलिकडचं कारण जरा मला सांगाल का...?" संत्याने पुन्हा प्रश्न केला...

"तुम्ही माझ्या जवळ आला आहात त्यामुळे निश्चितच तुम्ही माझी पुस्तकं किंवा माझे लेख वाचले आहेत.. आणि तुम्हाला एवढी तरी कल्पना लागलीच असेल कि खुनी काही कमी नाही... हा खुनी मुलींची हत्या फक्त आणि फक्त त्यांच्या रक्तासाठीच करत आहे, त्यामुळे ह्या वरून तरी हे सिद्ध होतंय कि ह्या मागे काळ्या जादूचा उपयोग होणार आहे, आणि काळ्या जादूमध्ये रक्ताचाच जास्त वापर होतो, किती तरी वेळा ह्याचा उपयोग जादू करण्यासाठी होतो आणि काही वेळा आपल्या जादूचं अजून सामर्थ्य वाढवण्यासाठी करतात... तो खुनी त्या रक्ताने जे काही करणार आहे त्याची तीव्रता केवढी असेल मला माहित नाही... पण त्याने भिंतींवर बनवलेल्या नंबर्स आणि चिन्हांनी फक्त एवढंच सांगू शकतो कि ती व्यक्ती एक जुनी खेळाडू आहे काळ्या साम्राज्याची... खूप वर्षांपासून ती व्यक्ती हे काम करत आली असेल... हे काळी जादू शिकवणारी कोणती संस्था किंवा शाळा तर नाही आहे, त्यामुळे हि तुम्हाला गुपचूप लपून छपून शिकावी लागते, पण ह्या व्यक्ती ला तर आपल्या जन्म झाल्या पासून हि काळी जादू ध्यानी आहे..." डॉ. अवधूत सरांच्या स्पष्टी कारणाने संत्या पण अस्वस्थ झाला...

"पण सर रक्ताचं आणि काळ्या जादूचं काय घेणं देणं...? काळी जादू तर कोणाचं केस घेवून किंवा त्याचे कपडे घेवून मग स्मशानात बसून काही मंत्र उच्चारून होते ना...?" संत्याने आपली आशंका जाहीर केली...

"मी तर एवढंच सांगेन कि तुमचे ज्ञान ह्या विषयी खूप कमी आहेत, माझ्या सोबत या..." एवढं बोलून डॉ. अवधूत आपल्या घरातील छोट्याश्या ग्रंथालयात गेले आणि त्यांच्या मागोमाग ते दोघे...

"आमच्या विषयाच्या बाषेत काळ्या जादूला डार्क ऍक्ट म्हणतात, तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं तर खूप खालच्या स्थराच काम आहे... पण तुमच्या विचारांच्या हि पलीकडे काळ्या जादूचं साम्राज्य आहे... तुम्ही जे काही सांगितलं ते फक्त एक सामान्य माणसाचं एक साधारण काम आहे पण जर तुम्ही अजून खोलवर जाल तर काळ्या जादूत पण किती तरी वेगवेगळे प्रकार आहेत... जसं कि नाईट म्याजीक, डेथ म्याजीक, ब्लड म्याजीक आणि सर्वात भयानक डेमॉनिक (आसुरी) म्याजीक... खरं म्हणजे ह्याचे असले अजून खूप सारे प्रकार आहेत पण अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगणं मी जरुरी नाही समजत.. पण जसं कि त्या चित्रात पाहिलं आहे, त्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आणि रक्त काढण्यात आलं आहे त्याचा उपयोग सोप्प्या भाषेत सांगणं म्हणजे तो ब्लड म्याजीक आणि ब्ल्याक म्याजीकचा एकत्र प्रयोग तो डेमॉनिक (आसुरी) म्याजीक पूर्ण करण्यासाठी करत आहे..." डॉ. अवधूतच्या ह्या माहितीने त्या दोघांचे शरीर थरारले होते...

"डेमॉनिक (आसुरी) म्याजीक असतं तरी काय...?" ह्यावेळी शिऱ्याने प्रश्न विचारला... जो पूर्ण वेळ गप्पच होता...

"कोणत्या हि आत्म्याला बंदीतून सोडवून त्याला पुन्हा आणणे..." डॉ. अवधूतने त्यांना स्पष्ट शब्दांत समजावून सांगितलं...

"तर तुमचं म्हणणं असं आहे कि, हा जो कोणी हत्या करत आहे तो कोणत्या तरी आत्म्याला पुन्हा आणायला पाहत आहे..."

"हो, आणि ह्या चिन्हांकडे पहा ज्या कि ह्या चित्रांमध्ये दोन हाडं क्रॉस ठेवून बनवले आहेत, सगळ्यात वरती काही नंबर्स आहेत, त्याच्या डाव्या बाजूला एक चिन्ह आहे, काही गोलाकार आणि Ω असा. मग खालच्या बाजूला आणखीन एक चिन्ह आहे = असा जो कि दोन रेघांनी बनलेला आहे जो कि सरळ सरळ आत्म्याशी निगडीत आहे. पहिली रेघ शरीराला दर्शवते आणि दुसरी आत्माला, ह्याचा सरळ सरळ अर्थ असा होता कि हि काळी जादू कोणत्या ना कोणत्या तरी आत्म्याला पुन्हा बोलावण्यासाठी केली जात आहे.." डॉ. अवधूतने ते चिन्ह एका कागदावर बनवत त्यांना समजावून सांगितले.

"आता हे दुसऱ्या चित्रात पहा, इथे नंबर्स वेगळे आहेत आणि उजव्या बाजूला Ð असल्या प्रकारचं चिन्ह आहे आणि त्याच्याच खाली एक = ह्या चिन्हा मधलं अंतर पहिल्यापेक्षा थोडं कमी झालं आहे, ह्याचा अर्थ असा आहे कि ती आत्मा आता शरीरापासून जास्त लांब नाही आहे..." डॉ. अवधूतचं स्पष्टीकरण ऐकून ते दोघे अचंबित होतात.

"पण हे नंबर्स काय सांगतात...?"

"मी नंबर्स विषयी काही सांगू शकत नाही, हे नंबर्स स्वतःच एक गुपित आहे, पण ती माहिती सर्वात मोठं रहस्य आहे. मी बोललो नव्हतो तुम्हाला हा खूप जुना खेळाडू आहे... काळ्या जादूमध्ये आत्माला संदेश पाठवण्यासाठी पहिल्या चरणात नंबर्सचा उपयोग होतो, हे एक कोड प्रमाणे असतात, जशी बायनरी भाषा नसते कॉम्प्युटरमध्ये तशीच, बस त्याच प्रकारे आपल्यांना हे नंबर्स पण डिकोड करायला लागतील..."

"पण मग Ω आणि Ð ह्या चिन्हांचा अर्थ काय होतो...?"

"Ω ह्या चिन्हाचा असा खास काही अर्थ नाही आहे, हा चिन्ह तर प्रत्येक काळी जादू करणारा माणूस आपापल्या परीने वापर करतो, हा चिन्ह कदाचित कोणत्या तरी शहराचं नाव दर्शवत आहे किंवा कोणत्या तरी शहराची माहिती यात दिली आहे किंवा असंच काहीतरी जे मी व्यवस्थित सांगू शकत नाहीये..."

"ह्याचा अर्थ असा कि त्या खुन्या मागे कोणती ना कोणती तरी भयाण शक्ती त्याच्या पाठीशी आहे..." शिऱ्याने पुन्हा आपली शंका जाहीर केली...

"होय लक्षपूर्वक ह्या नंबर्स ना पहा सुरुवातीला हे सांगतात कि हे कुठून आहेत आणि त्यांचा खुन्याशी काय संबंध आहे... जर खुन्याला पकडायचं असेल तर आपल्यांना पहिले हे नंबर्स डिकोड केले पाहिजेत..." डॉ. अवधूत अजूनही ते नंबर्सच पाहत होते...

"म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो कि ह्या केसमध्ये तुम्ही आमची मदत करायला तैयार आहात...?" संत्याने एका नवीन जोशात विचारले...

"होय माझ्याकडे ह्याच्या पलीकडे काहीच उरलं नाही आहे..."

'मी अजून कोणत्याच प्रियाला ह्या हिंसक माणसाचा शिकार होतांना नाही पाहू शकत...' डॉ. अवधूत आपल्या मनातल्या मनातच बोलले...


क्रमशः...

No comments:

Post a Comment