Wednesday, May 27, 2015

भाग ~ ~ ३ भय....!

स्वाभाविकच आहे जसं व्हायला पाहिजे तसेच झाले, माकडीण घाबरली पण तिचे पाय साखळीने बांधले असल्यामुळे ती पळू शकत नव्हती. पाणी हळू हळू ट्याण्क मध्ये भरत गेलं आणि माकडीणने मुलाला आपल्या हथाने उचलून घेतलं. पाणी जेव्हा अजून वर आलं तेव्हा तिने आपल्या मुलाला स्वतःच्या डोक्यावरती ठेवलं. शिपाई पाणी टाकत गेले आणि खूप लवकर पाणी माकडीणच्या डोक्यावरती गेले.

थोड्या वेळपर्यंत तिने आपल्या मुलाला आपल्या डोक्यावरती उचलून उभी राहिली कारण मुलगा पाण्यापासून बाहेर राहू शकेन. पण थोड्यावेळाने जेव्हा तिचा श्वास कोंडला गेला तेव्हा तिने आपल्या मुलाला एका बाजूला फेकले आणि हाथ पाय मारत ती स्वतःला पाण्याच्या वरती आणण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तिला आपला मुलगा पाण्याखाली बुडतोय हे तिला भान नव्हतं.

ठीक तशीच अवस्था माझी पण झाली आहे. आपल्या आई वडिलांच्या रूम कडे जाता जाता मी अचानक थांबलो आणि त्यांच्या रूममधून जमिनीवरून वाहत येणारं रक्त बघत होतो. मला समझत नव्हंत कि मी काय करू. मला माहिती होतं कि रूम मध्ये फक्त माझे आई वडील आहेत आणि हे रक्त पण फक्त त्यांचच असू शकतं. तिथे उभा राहून मी फक्त त्या रक्ताकडेच बघत होतो.

मी एकाच जागी मूर्ती बनून उभा राहिला होतो, माझा श्वास वर खाली होत होता.. आणि हृदय जोर जोरात धडकत होतं.

ह्यावेळी मी काही विचार किंवा काही करू शकलो असतो तोच माझ्या आईची एक जोरदार किंकाळी मला ऐकायला आली. सगळ्या रूम मध्ये माझ्या आईची एक भयावह किंकाळी ऐकायला आली, हे ऐकूनच अंदाजा आला होता किंचाळणारी खूप पिडीत आहे आणि मदतीसाठी हाक मारते.

आणि त्या किंकाळीने माझ्या विचार करणाऱ्या वृत्तीला एक नवीन दिशा दिली. तिथे उभा मी पहिले विचार करत होतो कि आत्ता काय करू पण आत्ता मनात एक विचार आला होता. भय माझ्या पूर्ण शरीरात पसरला होता, हृदयाचे ठोके वाढत गेले आणि अंगावर शहारे आले आणि माझ्या आतमधला जनावर बाहेर आला.

मी त्यावेळी पण अर्धा झोपेतच होतो. कफ सिरपचा नशा माझ्या अंगात अजून पर्यंत होता.

मी मागे वळून परत माझ्या रूम कडे पळालो आणि आतमध्ये येवून सरळ माझ्या बेडवर जाऊन पडलो आणि कोण्या छोट्या मुलावानी मी  अंगावर चादर ओढून दिवाळाकडे तोंड करून लपलो. डोळे मी एकदम घट्ट बंद करून झोपलो होतो.

तुम्ही विचार करणार कि असं तर कोणी एक १० वर्षांचा पोरगा करेल. ह्याच्यामध्ये तुमचा काहीच दोष नाही आहे , कारण तुमच्या जीवाला कधीच धोका नाही झाला आहे. तुमच्या बरोबर तर कधी असं झालं नसेल कि तुमच्या स्वतःच्या आई वडिलांच्या रूम मधून रक्त वाहत असेल, आणि तुमच्या आईची एक किंकाळी तुम्ही ऐकली असाल, तुम्हला माहिती आहे हि कि हे सगळं करणारा तुमच्या घरात अजून आहे आणि तुम्हाला माहिती आहे कि तुमची एक छोटीशी चूक तुमचा जीव घेवू शकते.

बेड वर झोपून माझा डोळा लागला असता पण माझ्या दरवाज्यावर कोणाची तरी चाहूल मला जाणवली. माझ्या रूम मध्ये खूप काळोख होता पण बाहेरच्या हॉलमध्ये लागलेल्या बल्बने थोडा उजेड येत होता. चाहुलाने मी माझे डोळे उघडले तर मला ४ गोष्टींची जाणीव झाली.

पहिली हि कि माझ्या दरवाजासमोर कोणी उभा होता, ज्याला मी काळोख असल्या कारणाने नीट बघू शकत नव्हतो. बस काळोखात फक्त एक सवाली दिसली.

दुसरा विचार असा कि मी स्वतःला समझावत होतो कि हे सगळं, एक स्वप्न आहे, एक भ्रम आहे पण नाही हे सगळं एक सत्य होतं. मी खरोखर रक्त बघितलं होतं आणि हे खरं होतं कि दुसऱ्या रूम मध्ये माझे आई वडील मेले असतील.

तिसरा विचार असा कि मी बेड वर झोपलो तेव्हा दिवाळाच्या दिशेने तोंड करून झोपलो होतो, पण आत्ता मी दरवाजाच्या दिशेने तोंड करून झोपलो होतो. हे कधी झालं मलाच नाही कळलं.

आणि चौथा सगळ्यात महत्वाचा विचार असा कि आत्ता माझा जीव पण धोक्यात आहे.
तो जो कोणी पण होता आत्ता माझ्या रूम मध्ये आहे. त्याच्या पायांच्या आवाजाने मी अंदाजा लावला होतो कि तो माझ्या रूम मध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत आहे. मी मनातल्या मनात हाच विचार करत होतो कि कुठल्या हि क्षणी मला बेड वरून खाली खेचलं जाणार, मारायला लागणार किंवा आवाज देवून उठवणार.

डोक्यात विचारांचे परत एकदा चक्र फिरायला लागले. मला समझत नव्हते कि मी काय करू. काय एकदम पटकन उठून दरवाजा उघडून बाहेर पळून जाऊ आणि जोर जोरात ओरडणे चालू करू. ओरडणे... तेव्हा मला लक्ष्यात आलं होतं कि माझी आई पण जोरात ओरडली होती. ती खूप जोरात ओरडली तरी अजून पर्यंत कोणी आलं का नाही..? मला एक एक करून आमच्या शेजाऱ्यांचे नाव आठवत होते. आपल्या शेजाऱ्यांची नावं आठवत होतो आणि हीच प्रार्थना करत होतो कि कोणी तरी जागेल, कोणी तर येईल.

मला ओरडण्यावर सगळ्यात ज्यास्त विश्वास होता कारण, ओरडण्याने कोणी तरी जागेल कोणी तरी येईल.

पण माझे विचार खोटे ठरत होते, कोणाचाही येण्याची मला चाहूल नाही लागत होती. आणि मला कोणीही बिछान्यावरून अजून पर्यंत खाली खेचलं गेले नव्हंत. फक्त मला त्याची चाहूलच वाटत होती कि तो रूम मध्ये इथे तिथे फिरत आहे. हे मला माहित होते कि तो माझ्या रूम मध्ये आहे काहीतरी करत आहे पण काय करतोय हे मला माहित नव्हते.

मला का काहीच करत किंवा बोलत नव्हता हेच मला काही समझत नव्हंत. माझा गळा सुखला होता आणि मला परत लघवीला लागली होती.

ओह नो... आय नीड टु गो द बाथरूम अगेन...

हे विचार येताच मीने माझे पाय माझ्या पोटाजवळ घेतले आणि झोपण्याचा प्रयत्न करत होतो जसं एक छोटा मुलगा आपले पाय दुमडून झोपतो तसा.

आणि परत काहीतरी ओढण्याचा आवाज आला. बाहेर होल मध्ये परत कुणाला तरी ओढण्याचा प्रयत्न करत होतं. माझे डोळे अजून पर्यंत बंद होते आणि मला काहीच सुचत नव्हंत कि मी काय करू. डोळे उघडून बघू काय...? त्याने मला पाहिले तर...?

मनातल्या मनात मी ओळखून चुकलो होतो कि लवकरच तो क्षण येणार आहे जेव्हा मला त्याचा सामना करायला पडणार आहे. पण मी असा झोपून तो क्षण टाळत होतो. वा हीच प्रार्थना करत होतो कि माझ्या झोपण्याच्या नाटकामुळे मला तो जिवंत सोडेल.

कारण मी तर झोपलो होता, मी तर काही पाहिले हि नाही.

नंतर मला लक्षात आले कि मी ज्या रूम मध्ये झोपलो आहे तिथे खूप अंधार आहे आणि जरी मी डोळे उघडून बघितले तरी कोणाला माहिती पडणार नाही आहे कि झोपलो आहे कि झोपण्याचं नाटक करत आहे. आणि असाच आपल्या मनाला समजावून मी आपले डोळे अर्धे उघडले.

तो दरवाजाच्या समोरच उभा होता, नाईट बल्बचा हल्का हल्का  प्रकाश त्याच्यावर पडत होता आणि एका क्षणासाठी मी समझलोच नाही कि मी काय पाहत आहे. खरोखर काही बघत आहे कि हा माझ्या डोक्यातला एक भ्रम आहे.

तो माणूस नव्हता, हो माणसासारखा होता पण माणूस नव्हता, असूच शकत नाही. सगळ्यात पहिले माझे लक्ष गेलं ते त्याच्या अंगावरती एक कपडा सुद्धा नव्हता. तो वर पासून खाल पर्यंत पूर्ण नग्न होता, आणि टकला होता.

नाही खरं म्हणजे त्याच्या पूर्ण शरीरावरती केसंचं नव्हते, डोक्यापासून पायापर्यंत केसंचं नव्हते. फक्त लाल रंगाची चामडी जी उजेडात लालच दिसत होती. तो उंची मध्ये माझ्याहून खूप उंच होता पण वाकून चालत होता.

आणि नंतर मला त्याच्या वाकून चालण्याचं कारण समझल, तो कुबड्या होता. तो कमरेपासून खाली वाकला होता, आणि उंटासारखं एक कुबड त्याच्या कमरेवरती दिसत होतं.

अजून एक खास गोष्ट, त्याचे हाथ खूप मोठे मोठे होते ज्याच्यामध्ये तो काहीतरी पकडून ओढत माझ्या रूम मध्ये आणत होता. माझे आई वडील वयोमानाप्रमाणे खूप लट्ठ होते, खास करून माझी आई, पण तरी तो एकदम आरामात त्या दोघांच्या हातांना पकडून ओढत आणत होता.

त्या दोघांना हळू हळू ओढत त्याने माझ्या रूम मध्ये आणले होते, मी आत्ता हि अजून पर्यंत आपले डोळे अर्धे उघडे करून झोपलो होतो. माझ्या डोळ्यांना आत्ता काळोखाची सवय झाली होती, त्यामुळे रूम मध्ये  हलक्याशा उजेडात पण मला चांगलं दिसत होतं.

मला आत्ताही समझत नव्हंत कि तो माणूस होता कि काय होता आणि तो काय करायचा प्रयत्न करत होता.

माझ्या आईला त्याने ओढत माझ्या रूमच्या मधोमध आणून ठेवलं होतं, त्यीच्या शरीरातून अजूनही रक्त वाहत होतं आणि ओढून आणल्यामुळे दरवाजावरती पण लाल रंग दिसत होता. माझ्या आईच्या मृत देहाला रूमच्या मधोमध सोडून त्याने माझ्या वडिलांच्या मृत देहाला त्याच्या दोन्ही हाताने उचलून माझ्या बेडजवळ आणलं.

मी असा घाबरलो कि माझी एवढीपण हिम्मत नाही झाली कि मी माझे डोळे बंद करू. कोणत्या पुतळ्या प्रमाणे जे घडत आहे ते मी एकदम गप चूप  बघत होतो.

मला समझत नव्हंत कि माझे वडील जिवंत आहेत कि नाही. त्यांचे डोळे पूर्णपणे उघडे होते, पण काय त्या डोळ्यांमध्ये अजून पर्यंत जीव बाकी आहे हा एक मोठा प्रश्न होता.

त्याने माझ्या वडिलांना ओढत माझ्या बेडच्या जवळ माझ्या पायाखाली आणलं आणि त्यांना माझ्या बेडच्या मदतीने बसवलं.

त्यांना ह्या प्रकारे बसवलं होतं कि त्यांची हनुवटी माझ्या बेडवर थोडीशी ठेवली होती आणि बाकीचं शरीर असाच लोंबकळत ठेवलं होतं. एक क्षणासाठी मला असं वाटलं कि ते माझ्या बेडवर हनुवटी टेकवून मला बघत काहीतरी जरुरी चर्चा करत आहेत.

नंतर तो माझ्या आई जवळ गेला आणि तिला उचलून त्याने माझ्या रूममध्ये असणाऱ्या आराम खुर्चीवर बसवलं. खुर्चीचं तोंडपण माझ्याच दिशेने होतं. असं वाटतं होतं जणू ती माझ्याकडे बघत आहे आणि काहीतरी खूप जरुरी चर्चा करत आहे. तिचे हि दोन्ही डोळे उघडे होते, पण ती जिवंत होती कि मृत हे मला कळत नव्हते.

रूमची सेटिंग अशी होती, जसं कि मी बेड वर पडलो आहे, बेडच्या खाली माझी वडील मला बघत आहेत, आणि खुर्सी वर बसून माझी आई आमच्या दोघांकडे बघत आहे. जसं एक परिवार एकत्र बसून काहीतरी वार्ता करत आहेत.

तो रूमच्या दिवाळा जवळ उभा होता जणू रूम ची सेटिंग बघत आहे. जणू कोणी पेंटर आपली पेंटिंग झाल्यावर लांब उभा राहून कसा निरखून पाहतो कि आपली पेंटिंग कशी झाली आहे. ठीक बनली आहे कि चुकीची? चांगली बनली आहे कि खराब...?

कुठे काही चूक तर झाली नाही आहे...?

तो पण असाच उभा आम्हाला बघत होता. आपल्या पेंटिंगला बघत होता. त्या पेंटिंगला ज्यामध्ये एक मुलगा आपल्या बेडवर पडला आहे, वडील खाली बसले आहेत आणि आई खुर्चीवर.

मी अजूनही रूम च्या एका कोपऱ्यात काळोखामध्ये होतो, आणि त्याने काहीच हरकत केली नव्हती त्याला अजून हि असंच वाटत असणार कि मी अजूनही झोपलो आहे. श्वास कोंडून मी अजूनही अर्धे डोळे उघडून बघत होतो.

माझ्या आई वडिलांच्या मृत देहामधून अजूनही रक्त खाली जमिनी वर पडत होतं. तो असाच काही वेळ उभा राहिल्या नंतर पुढे आला आणि त्यांच्या रक्ताला त्याने आपल्या हातात उचललं. नाही उचललं नाही त्याने आपल्या बोटांना त्यांच्या रक्त मध्ये अश्या प्रकारे बुडवलं जसं एक पेंटर आपला ब्रश कलरमध्ये टाकतो.

लाल रंगाच्या रक्ताने त्याच्या हातांना ब्रश बनवलं ज्याला पुढे होऊन त्याने दिवाळा वरती घासायला लागला. मला समझत नव्हंत कि तो काय करतोय पण त्याच प्रकारे करतोय जसं काही पेंटिंग करत आहे.

त्याची हि कृती हि ह्या रूमची पेंटिंगची शेवटची कृती होती.

तेव्हा माझ्या छातीत एकदम जोरात दुखायला लागलं. माझा खोकला जो आत्ता पर्यंत थांबला होता तो आत्ता बाहेर येत होता.

आणि खोकल्या संगती मला माझ्या पोटात कळ आली ज्याणे मला आठवण झाली कि मला बाथरूम मध्ये जायचे आहे. मी घाबरून आपले डोळे परत मिटून घेतले कारण मला माहित होतं कि माझ्या खोकण्याने त्याच लक्ष माझ्याकडे वेधलं जाईल.

तो समझून जाईल कि मी जागा आहे आणि त्याच्या नंतर तो जे काही करणार त्या भीतीने मीने आपला खोकला दाबला आणि डोळे बंद केले.

रूम मध्ये किती तरी वेळ दिवाळा वरती काही तरी ओरबडण्याचा आवाज येत होता.

मी फक्त गप चूप पडून वाट बघत होतो. कसली वाट ते मला हि माहित नाही.

मला आत्तापण समझत नव्हंत कि मी काय करू. रूम मध्ये रक्ताचा गंध पसरला होता आणि मला जसं भीतीने लकवा मारला होता. खोकला आणि लघवीला मी कश्याप्रकारे तरी दाबून ठेवलं होतं कारण मला माहित होतं कि ज्या वेळी मी त्याला जाणवलं कि मी झोपलो नाही आहे, त्याच क्षणी मी जिवंत राहणार नाही.

मी इथेच मरणार आणि आजू बाजूला मला वाचवणारा कोणी नसणार.

एवढा वेळ विचार करून सुद्धा मला जिवंत राहण्याचा उपाय नाही सापडत होता. फक्त एकच रस्ता होता, एकदम उठून दरवजा कडे पळत जाऊन, जोर जोरात ओरडू. ह्या आशेने कि शेजारी माझ्या आवाजाने तरी मला वाचवायला येतील.

धोका होता पण हाच एक उपाय माझ्या जवळ होता. मी उठून अचानक पळालो तर तो मला पकडू नाही शकणार कारण झोपलेला व्यक्ती अचानक उठून पळू नाही शकत.

जर इथे झोपून राहिलो तर पक्का मी मरणार कारण हा जो कोणी आहे, तो माझी उठण्याचीच वाट बघत आहे. वाट बघतोय कि मी कधी उठणार आणि त्याची पेंटिंग बघणार. रक्त बंबाळ झालेला हा कमरा बघून ज्याच्या नंतर हा मला मारून त्याची पेंटिंग पूर्ण करेल.

घाबरत घाबरत मीने माझे डोळे परत अर्धे उघडले. रूम मध्ये तर काळोख होता म्हणून एक क्षण मला काहीच दिसलं नाही. नंतर जस जसं डोळ्यांना काळोखाची सवय झाली तेव्हा मला दिसायला लागलं. त्याच्या श्वास घेण्याचा आवाज येत होता. मला माहिती आहे कि तो माझ्या रूम मध्ये होता पण दिसत नव्हता. मी रूम मध्ये नजर फिरवू लागलो ह्याच आशेने कि कदाचित तो मला काळोखात कुठल्या तरी काण्या कोपऱ्यात दिसेल तर मला माहिती असायला पाहिजे कि तो कुठे आहे.

तेव्हा माझी नजर दिवाळाकडे वेधली गेली तो माझ्या आई वडिलांच्या रक्ताने दिवाळावरती काही तरी बनवत होता.

मला आत्ता काळोखात स्पष्ट दिसायला लागलं होतं, तो त्या वेळी काही बनवत नव्हता काहीतरी लिहित होता, जे वाचण्याच्या आगोदरच मी माझे डोळे बंद केले होते. लाल रक्ताने सफेद दिवाळा वर मोठ मोठ्या अक्षराने लिहिले होते....

"कधी पर्यंत झोपायचं नाटक करणार...?"

समाप्त

No comments:

Post a Comment