नमस्कार मी पवन हि घटना ६ वर्षांपूर्वीची असून हा अनुभव माझ्या काकांच्या आयुष्याशी निगडीत आहे
" विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत " तबल्याच्या ठेक्यावर ..ताल मृदुंगाचा आवाज करत सर्व भजन मंडळी तल्लीन होऊन भजन म्हणत होती ..आज दिलीप काकांचा आवाज असा काही लागत होता कि आजच्या कार्यक्रमाला रंग चढला होता ...त्या एकूण भजनाच्या कार्यक्रमाला आज नेहमीपेक्षा बरीच लोक हजर होती ..
मंदिरातल प्रसन्न वातावरण आणि लोकांची वाढलेली गर्दी पाहता ..त्या भजनी मंडळीचा उत्साह आणखीनच वाढला होता दिलीप काकांचा सूर आणि बाकी मंडळींच्या वाद्याचा ताल दोन्ही जमून गेल्यासारखं अगदी समांतरपणे चालल होत कि अचानक काकांचा सूर अडकला ...काका थांबले ..कोणालाच कळेना पण आता पर्यंत बेभान होऊन गाणाऱ्या काकांचा आवाज अचानक गेल्यासारखा बंद झाला .. तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता ..
" काय झाल काका मधीच ?" , चांगला रंग चढलेला भजनाला" एक जन म्हणाला .. "दिलीप इसारलास व्हय र ओळी , चल म्या
सुरु करून" काकांचा एक मित्र म्हणाला
" न्हाय रहाव्द्या आता ते दुसर घ्या एकाद , काय काका ?"
तिसरा म्हणाला त्याने काकांकडे पाहिलं .. काका अजूनही शांत होते ..त्यांना विचारलेल्या एकही प्रश्नाच उत्तर त्यांनी दिल नाही पण त्यांचा तो गंभीर चेहरा आणि एका विशिष्ठ ठिकाणी खिळलेली नजर बर्याच लोकांनी ताडली होती आणि त्यातला एक जन म्हणालाच " काका काय झाल काय , बर हायसा न्हव्ह ?" तो म्हणाला पण काका काहीच म्हणाले नाही त्यांनी नुसतच त्या माणसाकडे पाहिलं आणि त्यांना अचानक ग्लानी आली बसल्या जागी काका कोसळले आणि मग मंदिरात एकच गडबड झाली ..पडलेल्या काकांना उचलण्यात आल .. गावातल्या वैदू कडे त्यांना न्हेन्ह्यात आल .. रात्र सरली .. त्या अक्ख्या रात्री काका शुद्धीवर आलेच नाहीत आणि मग जसजशी सकाळ झाली तसतसे काका शुद्धीवर आले पण चेहऱ्यावर अजूनही ती चिंता ती भीती कायम होती ते अजूनही कोणाशी काही बोलण्याच्या त्या मनस्थितीत नव्हते .. सुदृढ
शरीराच्या या माणसाची हि अशी अवस्था पहिल्यांदाच झाली होती

वैद्याने अति जागरणा मुळे त्रास झाला असावा असा काहीसा अंदाज बांधला .काका घरी आले ते कोणाशी काही बोलत नव्हते आणि त्यांची प्रकृती पाहता कोणी नेमक काय झाल असाव हे विचारण्याच्या भानगडीत हि नाही पडल ..पण ह्या सगळ्याचा फटका मात्र भजनी मंडळाला बसला दिलीप काकांसारखा आवाज अख्या गावात कोणाचा नव्हता ..पण ह्या प्रकारानंतर काकांनी आता भजन म्हणन हि सोडून दिल होत ..परिणामी काकांविना दर्जा कमी झाल्यामुळे .. भजनाच्या सुपाऱ्या कमी मिळू लागल्या आणि हळूहळू मंडळ बंद पडल . मधल्या काळात काकांशी बोलण्याचा बऱ्याच जणांनी निष्फळ प्रयत्न हि करून पहिला होता ..पण काकाचं वागणंच बदलल होत ..एकट राहाण ..विचारात हरवन .. चेहऱ्यावर भीती असंन असा काहीस त्याचं वागण लोकांच्या मनात ना ना प्रकारच्या शंका तयार करत होत ..
भुताखेताची लागण झाल्याचा समज हि लोकांमध्ये झाला होता .. पण तरीही सुशिक्षित काकाचं कुटुंब वैद्याचाच उपचार करत होते ..मंडळ बंद झाल्याने त्या मंडळातली लोक उदास झाली होती . भजन मंडळ पुन्हा सुरु व्हाव अस साऱ्यांनाच वाटत होत ..हळू हळू दिवस जात होते .. आणि मग एके दिवशी काकांच्या दरवाजावर थाप बसली ..दरवाजा उघडला गेला .. एक साधारण तिशीतला तरुण घरात शिरला .. थेट काकांच्या खोलीत ...त्याने पाहिलं काका खुर्चीत डोळे मिटून बसले होते ..त्यांच्या समोर न जाता तो मुलगा म्हणाला
" काका , तुमच्याशी बोलायचं थोड
" कोण ?" काकांनी दचकुन मागे वळून न पाहता विचारलं . " अहो काका मी निलेश , हे बघा घाबरू नका ..मला तुमच्याशी बोलायचं "..निलेश एवढाच म्हणाला कि काका भीतीने ओरडलेच ..
"ए दूर हो ... तू तू का मागे लागलायस माझ्या ..आ " काका घाबरत म्हणाले ..
त्यांनी घरात इतरांना आवाज दिला ...सगळेच काकांच्या खोलीकडे धावले .त्यांनी पाहिलं काका थरथरत उभे होते . एका विशिष्ट ठिकाणी त्यांची नजर खिळली होती .. ते कोणाकडे तरी बोट दाखवून बोलत होते
"हा बघा तो .. मी म्हंटल ना हा मला दिसतो .."
"कोण ?" काकांच्या आवाजाने गावातलेच एक गृहस्थ अण्णा हि तिथे आले होते आणि त्यांनी कोण अस न राहवून विचारलं ..
"निलेश , गेल्यावर्षी वारला तो , दिसतो म्हणे ह्यांना... कसलं खूळ आलंय ह्यांना काय माहित" काकांचा मुलगा काहीसा वैतागत म्हणाला ..निलेश नाव ऐकून अण्णा हि बिथरले .वर्षभरा .पूर्वीचा भजनी मंडळींचा झालेला अपघात आणि त्या अपघातात निलेश चा झालेला मृत्यू हा सगळा प्रसंग त्यांना झटक्यात आठवला ते काहीच न बोलता तिथून निघाले ..

अण्णांकडून हि माहिती अख्या गावाला कळली ..गावातल्या लोकांचा देवांप्रमाणे भुताखेतांवर हि विश्वास होता ...काकांच्या विचित्र वागण्याचा अर्थ आता हळू हळू सगळ्यांच्या ध्यानात येऊ लागला होता ...काही महिन्यापूर्वी त्या गावातला तसेच त्या भजनी मंडळातला तो मुलगा म्हणजे निलेश अपघातात मरण पावल्याच सर्वांनाच ठावूक होत .. पण तो दिलीप काकांना का दिसतो .नक्की काय भानगड आहे याचा अंदाज बांधता येत नव्हता .. घडत होत ते नक्कीच गंभीर होत ..
काय कराव कोणालाच सुचत नव्हत ..निलेश ची आत्मा का भटकत असावी ..? नक्की काय झाल होत तेव्हा ?...
त्याची कोणती इच्छा तर अपूर्ण नाही राहिली ..? भर राहिली असेल तर त्या इछेचा काकांशी काय संबंध ..?
प्रश्न असे बरेच होते ..आणि ह्या प्रश्नावर गावात चर्चा हि होऊ लागल्या होत्या ...आणि अशाच एका चर्चेत गावच्या पाटलांनी सर्वांसमोरच हा प्रश्न केला कि हे सगळ दिलीप काकांसोबत का घडतंय ..? काही आहे जे दिलीप काकांना माहित असेल ..पण आपल्या पासून लपवलं जात आहे ?" पाटील सगळ्यांकडे पाहत म्हणाले ..घडणाऱ्या गोष्टींपेक्षा प्रश्न नक्कीच अचंबित करणारा किंवा अनपेक्षित असा बिलकुल नव्हता .. पाटलांचा हा प्रश्न खरतर सगळ्यांच्याच मनात होता पण कोणी तो ओठावर आणला नाही इतकाच .. आता पाटील हे म्हणालेच म्हंटल्यावर आणखीन एक जन म्हणाला ..

" मला वाटत निलेश च्या मृत्यू बाबत चौकशी झाली पाहिजे , मग कळेल काकाच का ?" .. त्या माणसाने काकांना सरळ सरळ आरोपीच्या पिंजर्यातच उभ केल ..
" नाही पण मला काय वाटत अस एखाद्या बद्दल असा अंदाज बंधन चुकीच आहे , निलेश चा अपघात झाला तेव्हा काकांसकट २ घ अजून सिरिअस होते ..सर्वाना माहित आहे मग अशा वेळी हा मुद्दाच चुकीचा आहे "
गावातातले गुरुजी समजूतदार पणे म्हणाले ..
" हो मला हि वाटत , अस काही झाल नसाव " दुसरा एक जन म्हणाला .. "
हम्म .. जर काही झालंच नाही तर निलेशची आत्मा अशी का भटकेल . ती काकांना का त्रास देईल ? "
पाटलांनी पुन्हा हा प्रश्न उपस्थित केला ..
"काहीवेळा न घडलेल्या गोष्टी हि कारणीभूत ठरतात पाटील " अण्णा म्हणाले .
"म्हणजे ?" पाटलांनी विचारलं
" एखाद्याची इच्छा अपुरी राहिली कि अस घडू शकत " अण्णा पुढे म्हणाले ..सगळेच स्थिर होऊन अण्णांकडे पाहत होते .
" मग काय इच्छा असेल अशी .. काय नव्हत घडल तेव्हा ?" पाटील पुढे म्हणाले ..
" भजन ?" अण्णांनी सगळ्यांकडेच पाहत विचारलं ... उपस्थितांपैकी बऱ्याच जणांच्या डोक्याची चक्र भरभर फिरली .. आणि मग एकजण त्या शांततेचा भंग करत म्हणाला .

"असू शकत ... निलेशच्या तेराव्याला भजन झाल न्हवत ..कारण तेव्हा झालेल्या अपघातात बर्याच जणांना लागल होत त्यातल्या दोघांची प्रकृती हि गंभीर होती दिलीप काका सुद्धा ...आणि निलेश मात्र मरण पावला होता .." तो माणूस बोलत होता ..
वातावरण एकदम स्तब्द झाल होत .. पण बहुतेकांचा चेहरा त्या माणसाच्या म्हणण्याशी सहमत वाटत होता ..
"मग आता करायचं काय .." पाटील हलक्या आवाजात म्हणाले ..
" भजन ...निलेशच्या येणाऱ्या पहिल्या श्राद्धाला भजन कराव" अण्णा उपाय काढत म्हणाले ..पुढे काही बोलण्यासारख नव्हतंच.
चर्चा संपली ..आणि चर्चेत ठरल्याप्रमाणे ... त्या दिवशी निलेश च्या घरी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला ..
त्यावेळेस दिलीप काकाही उपस्थित होते ..सुरुवातीला ते एका बाजूला गप्पच बसून होते पण एक दोन भजनानंतर त्यंच्या तोंडातून भजनाच्या ओळी आपसूकच फुटू लागल्या ..नंतर काकांनी एक भजन हि गायल ... आज इतक्या दिवसांनी काकांचा आवाज पुन्हा पहिल्यासारखा लागत होता ...लोकांना काही महिन्यांपूर्वीचे दिलीप काका
पुन्हा दिसत होते पण निलेशच्या घरात असून हि निलेश मात्र काकांना दिसला नाही ..

तेव्हाच काय कधीच नाही दिसला कदाचित त्याची हीच इच्छा अपूर्ण राहिली होती
No comments:
Post a Comment