देव उपासना
शेवटचा भाग २८
देवचे बाबा हळूच उठून मंदिरात गेले आणि शंकराच्या मूर्तीमधून तो त्रिशूळ काढून आणून उपसनाला दिला...
"राहुल तू माझ्या सोबत जंगलात येतोयस का..!!" उपासनाने विचारले...
"हो हो... हि पण काय विचारायची गोष्ट आहे..." राहुल बोलला...
"चल मग आपल्यांना उशीर नाही केला पाहिजे..." उपासना बोलली...
"चल मी तुझ्या सोबत येतो..." राहुल उत्साहाने बोलला...
"मी पण तुमच्यासोबत येणार..." देवचे बाबा बोलले...
"नको बाबा तुम्ही राहू द्या तुम्हाला तर नीट चालता पण येत नाही.. तुम्ही इथे थांबा आम्ही निघतो... आम्हाला लवकरात लवकर जंगलात पोहोचणं जरुरी आहे... आणि आम्हाला पिशाच्चला पण शोधायचे आहे..." उपासना बोलली...
"नाही मी पण येणार... राहुल तू मला आधार दे..." देवचे बाबा बोलले...
उपासना समजून चुकली होती कि बाबा सोबत असल्याने तिला जंगलात जाण्यासाठी उशीर होईल...
"राहुल तू बाबांना आण मी पुढे जाते..." उपासना त्रिशूळ घेवून जंगलाकडे पाळायला लागते...
"अरे थांब तू एकटी काय करणार..." मागून देवचे बाबा तिला ओरडून आवाज देतात...
"हे सर्व विचार करण्यासाठी वेळ नाही आहे... तुम्ही समजत नाही आहात..." उपासना पळता पळता बोलते...
राहुल बाबांना आधार देतो आणि जंगलाच्या दिशेने जायला लागतो..
"बाबा ती एकदम बरोबर बोलत होती तुम्हाला इथेच थांबलं पाहिजे होतं..." राहुल बोलला...
"माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे आणि मी इथे थांबून काय करणार..."
उपासना त्या दोघांपासून खूप पुढे निघून येते... आणि जंगलाच्या खूप जवळ येवून पोहोचते...
"कुठे घेवून गेला असेल तो देवला... कोणत्या दिशेला जावू..." उपासना जंगलाच्या बाहेर उभी राहून विचार करत असते..
उपासना कोणताच निर्णय न घेत सरळ जंगलात घुसते... ती मागे वळून पाहते, 'कदाचित खूप मागे राहिलेत ती लोकं... वाट पाहू कि पुढे जावू... नको नको मला पुढे जायला पाहिजे... देवला ह्यावेळी मदतीची खूप गरज आहे..."
उपासना दाट जंगलात उतरते... आपल्या देवसाठी... पण जंगलाच्या शांततेमुळे ती शहारते... ती पहिल्यांदाच ह्या जंगलात आली आहे... निश्चितच ती घाबरणार... पण ती आपल्या देवसाठी हातात त्रिशूळ घेवून पुढे जात आहे...
"हा तर खूप मोठा जंगल वाटत आहे... कुठे घेवून गेला असेल तो पिशाच्च देवला... काय करू मी... अरे परमेश्वरा मला मदत कर.." उपसनाला काहीच समजत नव्हते कि काय करावं.. सर्वीकडे दाट जंगल होतं... खूप मोठे मोठे झाड... दिवसा पण त्या झाडांमुळे काळोख वाटायचा...
"देव...!" उपासना खूप जोराने किंचाळली...
दाट जंगलात उपसनाचा आवाज खूप मोठ्याने घुमला... पण उपसनाला प्रतिउत्तर काहीच मिळाल नाही...
'अरे परमेश्वरा कुठे घेवून गेला असेल तो... काही तरी मदत करा माझी...' उपासना बोलली...
"हा तर उपासनाचा आवाज आहे... असं वाटतंय स्वामीजी तिला नाही सापडले..." राहुल बोलला...
"पागल झाली आहे ती... एकटीच पळत सुटली आहे... पिशाच्चला शोधणं काय सोप्प काम आहे..." बाबा चिडत बोलले...
"काही तरी केलं पाहिजे बाबा... जसं आपण चालत आहोत मला नाही वाटत कि आपण ह्या जन्मात स्वामीजींना शोधू शकू..."
दुर्दैवाने उपासना जंगलाच्या विरुद्ध दिशेने जात होती आणि राहुल आणि बाबा दुसऱ्या दिशेने... तिघांच्याही मनात चिंता आणि भय एवढी होती ते लोकं कोणत्याच निर्णयावर येत नव्हते...
राहुल आणि बाबा चालता चालता थकून जातात आणि एका झाडाखाली उभे राहतात...
----------------------------
दुसरीकडे उपासना चालता चालता जंगलाच्या मधोमध पोहोचली होती...
'अरे परमेश्वरा असं वाटतंय संध्याकाळ होत आली आहे... आणि देवचा कुठेच पत्ता नाही... जर देवला काही झाले तर मी पण ह्या जंगलात आत्महत्या करेन...' उपासना विचार करत करत जातंच होती कि तिला हसण्याचा आवाज ऐकायला आला...
"हा हा हा हे हे हे... काय कसं वाटतंय आत्ता... तू तर खूप लवकर बेशुद्ध झालास... कधी पासून वाट पाहतोय कि आता शुद्धीवर येशील आणि मी तुला खायला सुरुवात करेन... सांग कुठून सुरुवात करू... ह्या हातांपासून सुरुवात करू काय, ज्यांनी माझ्या डोळ्यात धूळ टाकली होती... अजून पर्यंत डोळे चुरचुरत आहेत... सांग काय टाकलं होतंस माझ्या डोळ्यात"
देव जमिनीवर पडला होता आणि त्याच्या डाव्या बाजूला पिशाच्च बसला होता... देवने सर्वीकडे पाहिले... सगळीकडे मोठमोठे झाड होते... एवढं दाट जंगल त्याने पहिल्यांदा पाहिलं होतं... देवने उठण्याचा प्रयत्न केला पण तो उठू शकला नाही... त्याला धड आपले हात पाय पण हलवता आले नाहीत...
"काय झालं उठायचं आहे तुला ऑ?... उठ उठ.. हा हा हा हा हा... चांगला खेळ आहे ना... सांग कसं वाटतंय..." पिशाच्च बोलला...
"तू जिवंत वाचणार नाहीस... मी तुला जिवंत नाही सोडणार..." देव रागात बोलला...
"कोण मारणार मला.. तू... ऑ... हुंह..." पिशाच्च चिडला आणि त्याने आपल्या एका हाताने त्याच्या डोक्यावर वार केला.... हाताचा वार असा होता कि कोणी तरी हातोडा मारला आहे... देवच्या डोक्यातून रक्त वाहायला लागलं... आणि तो पुन्हा बेशुद्ध झाला...
"ऑ... हा तर पुन्हा बेशुद्ध झाला... मला भूक लागली आहे... पण ह्याला तेव्हाच खाणार जेव्हा हा शुद्धी वर येईल... ह्याला आपल्या शरीरात माझ्या दातांची जाणीव झाली पाहिजे... तेव्हाच मला मजा येणार... माझ्या डोळ्यात धूळ टाकतो... हुंह..."
"त्याला सोड नाहीतर..." पिशाच्चला आपल्या मागून आवाज येतो... आणि तो लगेच मागे वळतो...
"नाहीतर काय देविजी... तुम्ही काय करणार आहात... हा हा हा..."
"मानलं पाहिजे... माझ्यासमोर आज पर्यंत असं कोणीच तोंड वर करून बोललं नाही आहे... एक हा आहे आणि एक तू... दोघेही एकापेक्षा एक आहात... पण मला खेद आहे कि तुम्ही दोघेही माझ्या पोटात जाणार आहात... पण पहिले मी ह्याला खाणार... तू ह्याच्या बाजूला येवून झोप, नंतर तुझी पाळी येणार..."
उपासना त्रिशूळ आपल्या मागे लपवते... कारण तिचा इरादा त्याला समजला नाही पाहिजे...
'मला कुठल्याही प्रकारे ह्या पिशाच्चच्या जवळ जायलाच पाहिजे... काय करू...' उपासना विचार करते...
"पिशाच्च जी खूप ऐकलं आहे तुमच्या विषयी तुम्ही खूप भयानक आहात पण असं काही दिसत तर नाही..." उपासना बोलली...
पिशाच्च देव जवळून उठला आणि उपसानाकडे बघत बोलला, "घ्या आत्ता... हिला मी भयानक नाही वाटत... माझा आवाज ऐकून तर जंगलातला सिंह पण पळून जातो, मग माणूस कोणती वस्तू आहे... आणि मी तुझ्यासमोर एवढी भयानक गोष्टी करतोय... ह्याहीपेक्षा जास्त भयानक अजून काय असू शकतं..!!"
"तरी पण तुम्हाला अजून दुसरं काही तरी केलं पाहिजे..." उपासना बोलली...
"जसं कि... काय करू मी आत्ता ते पण सांग..."
"चेहऱ्यावर अजून थोडी जरब असली पाहिजे... सगळ्या गोष्टीवर तुम्ही फक्त हसत असता... हे चांगलं नाही वाटत... ह्यामुळे तुमचा दरारा कमी होतो..."
"थट्टा करतेस ना तू... खूप चांगलं..." पिशाच्च उपसनाच्या जवळ येतो आणि तिचे केस पकडतो...
"मुली पिशाच्चशी कधीच थट्टा करायची नाही... आपली चिंता करायची असते..."
उपासना वेळ न दवडता तो त्रिशूळ पिशाच्चच्या पोटात घुसवते आणि बोलते, "ते तर ठीक आहे पण काही पिशाच्चला पण आपली चिंता करायला पाहिजे..."
"हे काय केलंस तू... हे काय मारलंस पोटात... आह..." पिशाच्च वेदनेने कण्हत होता....
"महादेवचा त्रिशूळ आहे... परमेश्वराचं नाव घे आणि निघ इथून..." उपसनाने पिशाच्चला दोन्ही हातांनी दूर ढकललं...
"आह... तुला काय वाटतं तू ह्याला वाचवू शकतेस... आह... माझं विष आहे ह्याच्या शरीरात... मी जरी ह्याला खाल्लं नसतं तरी हा सकाळपर्यंत मेला असता..."
उपसनाने रागात एक लाथ पिशाच्चच्या तोंडावर मारली आणि बोलली, "दुसर्यांच्या मृत्यूची पार्टी मनवायची नसते... आपली चिंता करायची असते..."
"तू ह्या जंगलातून बाहेर नाही जावू शकत... हा त्रिशूळ माझ्या पोटातून काढ.. मी तुम्हा दोघांना गावी सुकरूप सोडतो..."
उपासनाने त्रिशूळ पकडला आणि जोर लावून थोडा अजून पिशाच्चच्या पोटात खुपसला... पिशाच्च खूप जोराने किंचाळला...
पिशाच्चची किंचाळी पूर्ण जंगलात घुमली... त्याची किंचाळी राहुल आणि देवच्या बाबांनी पण ऐकली... ते तीव्र गतीने किंचाळीच्या दिशेने अंदाज लावत पळत सुटले...
"देव... देव उठ काय झालं आहे तुला... देव... अरे परमेश्वरा वाचव माझ्या देवला..." उपासनाचे डोळे भरून आले आणि ती रडायला लागली...
"हा हा हा हा... लवकरच मरणार तो... हे हे हे..."
उपासना उभी झाली आणि पुन्हा त्रिशूळ पिशाच्चच्या आणखीन आतमध्ये खुपसला... तो पुन्हा जोरात किंचाळला.. काही क्षणातच त्याने दम तोडला... पण त्याचा देह तिथून गायब झाला... कदाचित यमाचे दूत त्याला उचलून नरकात घेवून गेले...
मग उपासनाने काश्यातरी प्रकारे देवला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं आणि जंगलातून मार्ग काढत काढत ती गावाकडे पोहोचते... ती त्याच प्रकारे त्याला उचलून गावाच्या वैद्याकडे घेवून जाते... दुसरीकडे राहुल आणि देवचे बाबा त्यांना शोधून शोधून थकले होते त्यामुळे तेही पुन्हा गावाकडे परतले...
वैद्य देवला उपसनाच्या खांद्यांवर पाहून अचंबित होतो... वैद्य देवला उपसनाच्या मदतीने खाटेवर झोपवतो... उपासना पूर्ण गोष्ट वैद्यला सांगते... "माझ्याकडून जे होईल ते मी करेन" असं वचन देवून वैद्य आपल्या कामाला लागतो...
राहुल आणि देवचे बाबा पण कश्यातरी प्रकारे जंगलातून बाहेर येतात... आणि बाबांना राहुल वैद्यकडे घेवून येतो... पण वैद्यच्या घराच्या बाहेर उपसनाला पाहून दोघेही अचंबित होतात...
"तू इथे काय करत आहेस जंगलात शोधून शोधून थकलो आम्ही तुला..." देवचे बाबा बोलले...
"मी देवला घेवून आली आहे... पण आता तो शुद्धीत नाही आहे.. वैद्य उपचार करत आहेत... आणि उपासना त्यांना पूर्ण कहाणी ऐकवते.."
बाबा आणि राहुल उपसनाची गोष्ट ऐकून हैराण होतात... पण त्यांच्या डोळ्यात देवची बातमी ऐकून आनंद पण दिसतो...
"तू पिशाच्चला मारलंस विश्वास नाही बसत आहे माझा..." बाबा बोलले...
तेव्हा वैद्य बाहेर येवून त्यांना सांगतो कि, "तुम्ही देवला घेवून जावा इथे माणसं येत जातात..."
तेव्हा ते लोकं देवला घेवून जातात...
तेव्हा ते लोकं देवला घेवून जातात...
----------------------------
राहुलने पूर्ण गोष्ट घरी येवून पल्लवीला सांगितली... तिथे उपासनाने पण घरी येवून सर्वांना गोष्ट सांगितली... सगळेचजण आश्चर्यचकित होते हे ऐकून...
"मालकीण बाई आता तुम्ही निघून जाणार ना..." राहुल बोलला...
"नाही... मी तुझ्याशी लग्न करणार आहे..." पल्लवी बोलली... हे वाक्य ऐकून राहुल खूप खुश झाला...
---------------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी देवच्या बाबांनी पण देवला पूर्ण हकीकत सांगितली... देव मनातल्या मनात विचार करू लागला कि, 'किती वाईट वागलो मी तिच्यासोबत... आता ह्याचे पारणे आपण कसे फेडणार... फक्त एकंच उपाय आहे तिच्याशी लग्न करून...'
सकाळी संतोष, संगीता, उपासना, राहुल आणि पल्लवी आणि पूर्ण गावातील लोकं मंदिरात हजर झाले होते.... कारण संतोष व संगीता, राहुल आणि पल्लवी लग्न करत होते... आणि ह्यामध्ये भाऊ साहेबांना पण काहीच आपत्ती नव्हती... दोघांचे हि लग्न पूर्ण झाले मग देवच्या बाबांनी आपल्या हातांनी देव आणि उपासनाचं लग्न लावून दिलं...
समाप्त...
No comments:
Post a Comment