Saturday, May 30, 2015

भाग ७ देव उपासना

भाग ७ देव उपासना
संतोष, आदित्य आणि सईच्या गायब होण्याची बातमी पूर्ण गावात एखाद्या वणव्यासारखी पसरली होती. पण कुणालाच हे माहिती नव्हतं कि भाऊ साहेब पाटलांची मुलगी संगीता सुद्धा गायब आहे. संगीताच्या गायब होण्याची बातमी फक्त भाऊ साहेबांच्या वाड्या पर्यंतच होती. वाड्यात सर्वजण चिंतीत होते, आणि चिंतीत का नाही असणार...?, संगीताला पाहण्यासाठी लोकं येणार होते आणि संगीता कुठेच सापडत नव्हती.
५ जानेवारी १९०१
सकाळचे दहा वाजले आहे...
"अरे तुम्ही उठलात..." पल्लवी विश्रामच्या पाया पडत बोलली...
"हो उठलो का...? (तोंड वाकडं करत) आणि हे रोज रोज नाटक नको करूस पाया पडण्याचं..." विश्राम चिडत बोलला..
"हे नाटक नाही आहे..." पल्लवी निराश होत बोलली...
"गप्प बस्स मला सकाळ सकाळ तुझ्या तोंडी लागायचं नाही आहे..." विश्राम अजूनच चिडत बोलला...
"बाबा संगीताला घेवून चिंतीत आहेत..." पल्लवी मान खाली घालून बोलली...
"का काय झालं...?" विश्रामने विचारले...
"संगीताला पाहण्यासाठी लोकं येणार आहेत पण..."
"पण काय...!!" विश्रामने रागाने तिचा हात पकडून विचारले...
"पण ती घरात नाही आहे..." पल्लवी आपला हात सोडवत बोलली...
"काय बोलतेस तू..., असेल इथेच कुठेतरी, चल जा तू आपलं काम कर.." विश्राम एवढं बोलून आपल्या वडिलांच्या रूमच्या दिशेने निघाला...
भाऊ साहेब पाटील त्यांच्या रूममध्ये आपल्या खुर्चीवर बसले आहेत आणि त्यांच्या समोर त्यांचा खास माणूस राहुल उभा आहे. विश्राम रूममध्ये घुसतो तेव्हा तो पाहतो कि त्याचे बाबा राहुलला काही तरी बोलत आहेत...
"राहुल जा मंदिराच्या चारही बाजूला पुन्हा एकदा बघ, संगीता तिथेच कुठे तरी जवळच असेल..." भाऊ साहेबांचा चेहरा एकदम रागाने लाल लाल झाला होता...
"ठीक आहे मालक..." राहुल विनम्रतेने बोलला...
"काय झालं बाबा..." विश्रामने विचारले...
"कोणास ठावूक हि संगीता सकाळी सकाळी कुठे निघून गेली..." भाऊ साहेब चिंताक्रांत होत बोलले...
"अच्छा... तर हि पल्लवी एकदम बरोबर बोलत होती..." विश्राम बोलला...
"काय बरोबर बोलत होती, तिला दटावून आणि बजावून ठेव, खूप तोंड वर करून बोलते..." भाऊ साहेब आवेशात बोलले...
"मालक मी निघू...!!" राहुलने विचारले...
"हो-हो निघ, माझं तोंड काय बघत बसला आहेस, लवकरात लवकर बघून ये, आणि हो पंडितला पण विचार कि त्याने संगीताला पाहिलं आहे काय..." भाऊ साहेब बोलले...
"होय मालक..." राहुल आदरपूर्वक आपलं डोकं झुकवून तिथून निघून गेला...
पूर्ण दिवस निघून जातो... मंदिरासोबतच भाऊ साहेबांची माणसं पूर्ण गावच पालथा घालतात, पण त्यांना संगीताचा पत्ता नाही सापडत. वाड्यात आलेले पाहुणे पुन्हा निघून जातात. काळजीचं वातावरण त्या वाड्यावर वाढायला लागतं...
"असं कसं झालं, सांगितल्याशिवाय कुठे जावू शकते संगीता...?" विश्राम तावातावाने बोलत होता...
भाऊ साहेब चेहऱ्यावर चिंतेचं भाव घेवून चुपचाप बसले आहेत...
तेव्हा तिथे सईचा मोठा भाऊ घनश्याम येतो, तो विनम्रतेने आपली मान झुकवत बोलतो, "भाऊ साहेब जर राग नाही येणार असेल तर एक गोष्ट बोलू का..."
"हो-हो बोल काय गोष्ट आहे...?" भाऊ साहेब बोलले...
"मला माहिती पडलं आहे कि रमेश कुलकर्णीचा मुलगा संतोष पण गायब आहे.." घनश्याम बोलला...
"तुला बोलायचे तरी काय आहे...?" भाऊ साहेब रागाने बोलले...
"क्षमा करा मालक... पण कुठे ह्या सर्वांमध्ये संतोषचा तर हात नाही ना...!!" घनश्याम हात जोडत बोलला...
"म्हणजे काय... साफ साफ का नाही बोलत तू...?" भाऊ साहेब अजूनच चिडत बोलले...
"काल मंदिराच्या बाहेर माझ्या काकांनी संतोषला संगीता ताईच्या सोबत बोलतांना पाहिलं होतं..." घनश्याम थोडा घाबरत बोलला कारण जर हि बातमी खोटी निघाली तर त्याची काय हालत होणार आहे हे त्याला चांगल्या प्रकारे ठावूक होतं...
"त्यात काय नाविण्य आहे संगीता त्याला ओळखते, एकदा जेव्हा ती शेतात रस्ता भटकली होती तेव्हा संतोषनेच पुन्हा तिला घरापर्यंत सोडून गेला होता..." भाऊ साहेब बोलले...
"मालक एक गोष्ट अजून आहे जी तुम्हाला सांगू इच्छितो..." घनश्याम बोलला...
"हो हो सांग..."
"काकांनी झाडाच्या मागून त्यांची वार्ता ऐकली होती, त्यांच्यानुसार ते लोकं रात्री शेतात भेटायची वार्ता करत होते..." घनश्याम हि गोष्ट बोलून चुकला होता तो आत्ता फक्त भाऊ साहेबांच्या प्रतीक्रीयाची वाट पाहत होता.
"काय वायफळ बोलत आहेस तू, तुझं डोकं धडापासून वेगळं करून टाकण्यात येईल जर हि गोष्ट खोटी ठरली तर..." भाऊ साहेब रागाने बोलले... तसा घनश्याम थरथर कापायला लागला...
"क्षमा करा मालक... पण जे मला माहिती पडलं तेच मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पाहिजे तर माझा जीवच घेवून टाका पण जरा ह्या गोष्टीवर पण लक्ष ठेवून असा..." घनश्याम बोलला...
भाऊ साहेब आणि विश्रामचा पूर्ण चेहरा रागाने लाल लाल होतो. दोघेही घनश्यामची गोष्ट ऐकून आवेशात आलेले असतात..
"बाबा बघितलं उपकार करून काय फायदा झाला, ह्या गाववाल्यांना नेहमी आपल्या पायाखालीच ठेवलं पाहिजे होतं. आता सर्व तुम्ही माझ्यावर सोडून द्या, मी आत्ताच त्या हरामखोर संतोषच्या बहिणीला पूर्ण गाववाल्यांसमोर नग्न करून खेचत इथे आणतो..." विश्राम आवेशात बोलला...
"विश्राम शांत हो, जर खरोखर ह्यामध्ये त्या संतोषचा हात असेल तर आम्ही कोणालाही सोडणार नाही..." भाऊ साहेब त्याला शांत करत बोलले...
विश्राम दात खाउन गप्प बसतो.
"आपल्या काकांना इथे घेवून ये, आम्ही स्वतः त्यांच्याशी वार्ता करणार..." भाऊ साहेब घनश्यामला बोलले.
घनश्याम आपल्या काकांना बोलावून आणतो..
त्याचा काका घाबरत घाबरत भाऊ साहेबांसमोर येतो आणि मान खाली करून चुपचाप उभा राहतो...
"काय ऐकलं होतं काल तू मंदिराच्या बाहेर, सगळं खरं-खरं काय ते सांग..." भाऊ साहेबांनी विचारले.
"हो मालक... मी संगीता ताईला संतोषशी वार्ता करतांना पाहिलं होतं. मी झाडाच्या मागे उभा राहून त्यांची वार्ता पण ऐकली होती. संतोष, ताईला रात्री शेतात येण्याचं बोलत होता. बस एवढंच ऐकलं होतं मी मालक... आणि मला काहीच नाही माहित..." काकांनी आपली गोष्ट पूर्ण केली.
"जर हि गोष्ट खोटी ठरली तर आम्ही तुमचे असे हाल करणार कि तुम्ही विचार पण नाही करू शकत..." भाऊ साहेब रागाने बोलले.
"मालक... तुमच्याशी खोटं बोलून आम्ही कुठे जाणार, आम्ही तर तुमचे गुलामच आहोत ना..." काका बोलले...
"ठीक आहे-ठीक आहे, निघा इथून..."
"हो मालक..."
एवढं बोलून काका तिथून निघून जातात.
"बाबा आता सर्व माझ्यावर सोडून द्या..." विश्राम रागाने बोलला आणि तसाच झपाझप पावले टाकत बाहेर निघून गेला..
भाऊ साहेब फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले, कदाचित त्यांची पण हीच इच्छा होती कि संतोषच्या घरच्यांना अद्दल घडवलीच पाहिजे, त्यामुळेच त्यांनी विश्रामला जातांना नाही टोकले.
"घनश्याम, विश्राम सोबत जा आणि हो आपले काही खास माणसं पण सोबतीला घे.." भाऊ साहेब बोलले.
"हो मालक"
"तुझ्या बहिणीचं काही समजलं कि नाही...?"
"ती तर पक्का कुठे तरी त्या आदित्य बरोबरच असेल मालक, तो मला कुठे सापडला ना त्याला तिथेच जिवंत गाडून टाकेन..." घनश्याम रागाने आपली मुठ आवळत बोलला.
"ठीक आहे... आता जा आणि विश्रामवर लक्ष ठेव..."
"तुम्ही चिंता नका करू मालक.."
एवढं बोलून घनश्याम तिथून निघून जातो.
------------------------------------------------
दुसरीकडे शेतात उपासना आणि तिचे बाबा निराश हताश बसले आहेत, सकाळ पासून संध्याकाळ झाली आहे पण संतोषचा कुठेच पत्ता नाही. उर्मिला आपल्या आईकडे घरी निघून गेली आहे. ते दोघेही ह्या गोष्टी पासून अनभिज्ञ आहेत कि एक खूप मोठं वादळ त्यांच्या घराकडे येत आहे, जो... जर नाही थांबला तर भयंकर रूप घेईल.
"बाबा दादा कुठे जाऊ शकतो...?" उपासना विचारते.
"काय माहित पोरी, आता तर जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा तोच सांगू शकतो कि कुठे गेला होता, चल आपण घरी जाउयात. मी जेवून पुन्हा येईल. असं वाटतंय आज रात्री मलाच शेतात थांबावं लागणार...?" कुलकर्णी चिंताक्रांत होत बोलला.
तेव्हा तिथे त्यांच्या शेजारचा मुलगा बाळू तिथे पळत पळत येतो.
"ताई-ताई तुमच्या घरामध्ये पाटलांची लोकं हंगामा करत आहेत..." तो धापा टाकत बोलला...
"कसला हंगामा बाळू... हे काय बोलतोयस...?" उपासना बोलली...
"तो...तो भाऊ साहेबांचा मोठा मुलगा उर्मिला ताईचे कपडे फाडून तिला खेचत घेवून जात आहे, तुम्ही घरी नका जाऊ..."
हे ऐकून कुलकर्णी घराच्या दिशेने पाळायला लागतो.
"बाबा मी पण येते..." उपासना ओरडून बोलते...
"नाही पोरी तुला माझी शपथ... तू इथेच थांब, मी बघतो कि काय गोष्ट आहे ती..." कुलकर्णी पळता पळता थांबून बोलतो आणि पुन्हा आपल्या घरच्या दिशेने पळत सुटतो.
"बाळू तू पण जा, काळोख होत आलेला आहे..." उपासना बोलली.
"ताई तुला इथे भीती नाही वाटणार..."
"नाही वाटणार... बाळू तू जा..."
"जर भीती जरी वाटली ना तरी... घरी नको येवूस ताई..." एवढं बोलून बाळू रडायला लागतो, उपासना त्याची गोष्ट समजून त्याला मिठी मारते आणि ती पण रडायला लागते.
"जा बाळू काळोख होत आला आहे... पळ लवकर..."
बाळू गेल्यानंतर उपासना एकटी शेतात बसून हाच विचार करत असते कि, 'अरे देवा भगवंता...!! आज हे आमच्या सोबत काय होत आहे...?, ताईची काळजी ठेव नाही तर आम्ही भावजींना काय उत्तर देणार..'
--------------------------------------------------------
इथे जेव्हा कुलकर्णी घरी पोहोचतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्याची बायको घराच्या दरवाजा जवळ पडलेली असते. कोणीही तिच्या जवळ नाही. भाऊ साहेबांच्या भीती पायी कोणीही तिला पाहायला येत नाही.
जेव्हा कुलकर्णी आपल्या बायकोला उठवण्याचा प्रयत्न करतो तर त्याला समजतं कि... कि त्याची बायको गतप्राण झाली आहे.
"अरे देवा आज हि कोणत्या पापांची शिक्षा आम्हाला देत आहेस..." कुलकर्णी तिथेच बसून रडत बोलतो.
पण त्याला जेव्हा आपल्या मोठ्या मुलीची उर्मिलाची आठवण येते तेव्हा तो ताडकन उठून भाऊ साहेबांच्या वाड्याच्या दिशेने पाळायला लागतो.
तो आत्ता अर्ध्या वाटेपर्यंतच पोहोचतो कि त्याच्या शरीरातील आत्मा पण कापायला लागते.
तो बघतो कि त्याची मुलगी उर्मिला तिच्या शरीरावर एकही कपडा नाही, विवस्त्र अवस्थेत आहे आणि विश्राम तिच्या पाठीवरती चाबूक मारून मारून तिला पुढे पुढे जाण्यासाठी बोलत असतो. हे सर्व दृश्य पाहून त्याच्या पायामध्ये जणू जीवच उरला नाही आणि तो तिथेच रस्त्यावर कोसळतो, आणि आपली शुद्ध हरपतो.
"चल साली रांड, थांबलीस तर इथेच तुझा बलात्कार करेन..." विश्राम रागाने ओरडून बोलला.
"मला सोडून द्या मी तुमचं काय वाईट केलं आहे..." उर्मिला हात जोडून दयनीय अवस्थेत त्याच्याशी प्रार्थना करत होती.
"ह्या गावातील मुलींची तर त्यांनी काहीच न करता पण मी त्यांची ऐसी तैसी करतो, तुझ्या भावाने तरीपण खूप मोठी चूक केली आहे..." विश्राम तिचे केस जोराने पकडून दात खात बोलला...
तिला पण माहिती होतं कि छोट्या मालकाशी वर तोंड करून बोलणं ठीक नाही आहे पण तिच्या जवळ काहीच उपाय नव्हता. तिची इज्जत पूर्ण गावासमोर उतरलेली होती. तिला पूर्ण गावासमोर विवस्त्र फिरवलं गेलं.
कुलकर्णी काश्यातरी प्रकारे उभा राहतो आणि पळत येवून विश्रामच्या पायाला पकडतो.
"माझ्या मुलीला सोडून द्या छोटे मालक, हिने तर तुमचं काहीच वंगाळ केलं नाही आहे, संतोष सापडताच मी त्याला लगेच तुमच्या जवळ घेवून येईन." कुलकर्णी स्फुंदत बोलला.
"तू काय त्याला माझ्या जवळ आणशील हरामखोर, चल पळ इथून नाहीतर तुझ्या बायकोवानी तू पण मरशील..." विश्राम त्याच्यावर थुंकत बोलला आणि त्याने एवढ्या जोराने कुलकर्णीच्या तोंडावर लाथ मारली कि तो तिथेच बेशुद्ध होवून पडतो.
"बाबा तुम्ही इथून निघून जा...?" आपल्या बाबांची अशी हालत पाहून उर्मिला हुंदका देवून रडायला लागते.
"चल साली पुढे हो... नाही तर तुझी चामडी इथेच सोलून टाकेन.." विश्राम तिच्या पाठीवर चाबूक मारत बोलतो.
ती तिथेच धडपडून पडते....
"असं वाटतंय हिचं इथेच काम करायला पाहिजे..." एवढं बोलून तो आपला पायजामा काढायला लागतो.
विश्राम उर्मिलाचे केस पकडून तिला आपल्या समोर झुकावतो आणि मागूनच क्रूरतेने तिच्यात शिरतो.
तिथे चारही बाजूला उर्मिलाच्या किंकाळीचा आवाज घुमतो. गावातील सर्व लोकं आपापल्या घरात दारं खिडक्या बंद करून बसले आहेत. विश्रामच्या चारही बाजूला फक्त भाऊ साहेबंचीच माणसं असतात.
उर्मिला मागे वळून बघते, तिचे बाबा अजूनही बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत.
"अरे देवा माझ्या सोबत जर हेच सर्व करायचं होतं तर मला जीवनच का दिलं. मला तसंच मारलं असतं. हि मृत्यू पेक्षा घाणेरडी शिक्षा का भेटते मला." उर्मिला स्फुंदत स्फुंदत मनातल्या मनात स्वतःला कोसत असते.
विश्राम आपली वासना शांत करून बाजूला होतो आणि आपल्या माणसांना हुकुम देतो, "लवकरात लवकर हिच्या छोट्या बहिणीला पण शोधून आणा, ऐकलं आहे कि ती पण खूप सुंदर आहे, तिची पण हीच हालत करायची आहे." आणि हसायला लागतो.
"हो मालक तुम्ही चिंता नका करू ती पण लवकर सापडेल..." घनश्याम पण त्याच्या हसण्यात शामिल झाला.
उर्मिला जमिनीवर झोपून जाते.
"चल उठ... तुला वाड्यापर्यंत चालत जायचे आहे..." विश्राम बोलला.
क्रमशः

No comments:

Post a Comment