Sunday, May 31, 2015

देव उपासना भाग २२

देव उपासना
भाग २२
वाड्यात...
"ह्या हरामखोर विश्राममुळे तिचे हाल हाल होवून शेवटी ती मरण पावली, त्यामुळे मी ह्याचे पण हाल हाल करून मारणार..." दत्तू बोलला...
"हे बघ मी तुझे दुखः समजू शकतो... पण ह्या प्रकारे तुला काहीच प्राप्त नाही होणार..." देव त्याला समजावत बोलला...
"मग काय मी ह्या हरामखोराला असाच सोडून देवू... तू जर पाहिलं असतंस ना कि माझ्या अक्षता सोबत काय झालं ते तर तू असं बोलला नसतास..."
"मी तिला नाही मारलं हा खोटं बोलतोय... मला वाचव..." विश्राम पलंगा खालून बोलला...
"तू नाही मारलंस तर अजून कोणी मारलं... तुझ्यामुळेच आम्ही जंगलात पळालो होतो आणि त्या भयंकर जनावराने चीर फाडून खावून टाकलं माझ्या अक्षताला... माझ्या डोळ्यासमोर झालं हे सर्व... किती वेदना झाल्या असतील मला ते बस फक्त मलाच माहिती आहे..." दत्तू बोलला...
"हम्म... कोणत्या जनावराची वार्ता करतोयस तू..." देवने विचारले...
"मला फक्त एवढं माहिती आहे कि तो खूप भयानक आणि भयंकर आहे... अक्षता शेतात सारखी सारखी किंचाळते कारण तिला वाटतंय कि तो प्राणी तिथेच कुठे तरी जवळपास आहे... जर ह्या गावातील लोकांना तुला वाचवायचं असेल तर जा आणि गावातील लोकांना जमवून चेतावणी दे नाही तर कोणीच नाही वाचणार.. ह्या विश्रामला तर मी नाही सोडणार.." दत्तू बोलला...
"हा कोण बोलत आहे दिसत तर कोणीच नाही आहे..." पुरुषोत्तम बोलला...
"दिसणार कसा भूत आहे तो... आणि जर दिसला ना तर इथेच मूत्र विसर्जन करशील तू..." विजय बोलला...
"गप्प बस आमच्या वाड्यात येवून आमचीच टिंगल खेचत आहेस..." पुरुषोत्तम डाफरत बोलला...
"स्वामीजी हे काका सांभाळतील ह्या भुताला तुम्ही चला इथून..." विजय बोलला...
"नको स्वामीजी माझ्या नवऱ्याला वाचवा... मी मानते कि ह्यांनी चूक केली आहे... पण ह्यांना एकदा संधी द्या ते ह्या पुढे असं नाही करणार..." पल्लवी बोलली...
"बेचाऱ्या उर्मिलाला नग्न घेवून आला होता हा वड्यापर्यंत... चला स्वामीजी ह्याच्या पापांची हीच शिक्षा आहे... भूतानेच मारलं पाहिजे ह्याला..." विजय बोलला...
"विजय तू जरा शांत हो... मी आहे ना इथे..." देव बोलला...
"होय स्वामीजी तुम्ही तर आहात इथे मी फक्त बस असाच..." विजय बोलला...
"दत्तू जो पर्यंत मी इथे आहे तो पर्यंत तू इथे काहीच करू शकत नाही..." देव बोलला...
"मग तू जा इथून मी नाही बोलावले तुला इथे... विश्रामचा मृत्यू निश्चिंत आहे.. जो पर्यंत हा जिवंत असणार तो पर्यंत माझी आणि अक्षताची आत्मा भटकत राहणार..." दत्तू बोलला...
"मी असे पर्यंत तू हे काम नाही करू शकत..." देव बोलला...
"देव... माझी मदत कर... नाहीही... आह आह..." एक आवाज येतो... देव इथे तिथे पाहतो पण कोणीच दिसत नाही...
"हा आवाज तर उपासनाचा आहे..." देव विचार करतो...
"स्वामीजी हा आवाज असं वाटतंय मागल्या बाजूने येत आहे..."
"मागल्या बाजूला तर शेत आहे..." पल्लवी बोलली...
"विचार काय करतोयस देव जा आणि वाचव आपल्या उपसनाला... ह्या पापी विश्रामसाठी इथे का उभा आहेस..." दत्तू बोलला...
"हा एकदम बरोबर बोलतोय स्वामीजी चला निघा इथून..." विजय बोलला...
"नको प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा..." पल्लवी पाया पडत बोलली... पण काही समजायचा आधीच दत्तूने विश्रामला मागल्या दरवाजातून खेचत घेवून शेताकडे गेला...
"सोड मला... मी तुझ्या अक्षताला नाही मारलं होतं... मग माझ्या मागे का लागला आहेस..." विश्राम रडकुंडीला येवून विनंती करायला लागला...
"चल ठीक आहे मग तुला जंगलात जावून आपटतो.. तो प्राणी तुझी पण चीर फाड करून खावून टाकेन तेव्हा तुला कळेल..." दत्तू बोलला...
"स्वामीजी काही तरी करा ना..." पल्लवी बोलली...
"काहीच समजत नाही आहे कि होतंय तरी काय..." देव बोलला...
"चला स्वामीजी शेतात जावूयात... उपसनाचा आवाज पण तिथूनच आलेला होता..." विजय बोलला...
"ठीक आहे चल..." जो पर्यंत देव आणि विजय शेतात पोहोचतात त्या आधीच दत्तू विश्रामला घेवून जंगलात घुसलेला असतो...
"इथे तर कोणीच नाही आहे... कुठे घेवून गेला तो विश्रामला... आणि उपासना पण कुठेच दिसत नाही आहे..." विजय बोलला...
"इथे कोणतीच उपासना नव्हती... हे सर्व भूतांची एक क्लृप्ती आहे आपलं लक्ष भटकवण्यासाठी..." देव बोलला
"हम्म... चला मग ह्या भुताला चांगलाच धडा शिकवूया... स्वामीजी..." विजय बोलला
देव आणि विजयच्या मागोमाग पल्लवी, पाटील साहेब आणि पुरुषोत्तम पण तिथे आले...
"कुठे घेवून गेला तो माझ्या नवऱ्याला..." पल्लवीने चिंतीत होवून विचारले...
"कदाचित जंगलात घेवून गेला आहे... तरी पण पहिले आपण शेतात पाहून घेवू... पाटील आपल्या माणसांना प्रत्येक कानाकोपरा शोधून काढायला सांग..." देव बोलला...
----------------------------
दुसरीकडेच जंगलात...
"हे बघा आपल्यांना जास्त विलंब ना करता लवकरात लवकर इथून निघायला पाहिजे..." आदित्य बोलला...
"ठीक आहे... जशी तुमच्या सगळ्यांची मर्जी, पण कोणत्या रस्त्याने जाणार आणि जर तो भयंकर प्राणी रस्त्यातच भेटला तर..." संतोष बोलला...
"हे बघ थोडा तरी धोका आपल्यांना पत्करावाच लागणार... चला माझ्या मागोमाग मला असं वाटतंय मला गावाचा रस्ता माहिती आहे..." आदित्य बोलला... सर्व जण गुहेतून निघून आदित्यच्या मागो माग चालायला लागतात...
"मला असं वाटतंय मी इथे आलेलो आहे..." आदित्य बोलला...
"बघ काही चूक नको करूस नाही तर सगळे जण मरतील..." संतोष बोलला...
"हो आठवलं ते झाड मी पहिले पण पाहिलं आहे... या माझ्या मागे मागे आपण गावापासून जास्त लांब नाही आहोत..." आदित्य बोलला... शेवटी भटकत भटकत ते सगळे जण गावाच्या एकदम जवळ पोहोचले...
"ते बघा... ते आपलं गाव... पोहोचलो ना आपण..." आदित्य बोलला...
"तू आपल्या घरी जाशील...??" संतोषने संगीताला विचारले...
"घरी का जाणार... मी तर तुझ्यासोबत तुझ्या घरी जाणार..." संगीता संतोषचा हात पकडत बोलली...
"ठीक आहे ये मग..." संतोषने संगीताचा हात एकदम घट्ट पकडत बोलला.
"माझी गोष्ट ऐक... आता माझ्या घरी चल... गावातील वातावरण बघून घरी जा... जरूर पाटीलच्या माणसांनी वादळ आणलं असणार... माझं घर गावापासून वेगळं आहे... काहीच चिंता करण्याची गोष्ट नाही आहे..." आदित्य बोलला...
संगीताने संतोषकडे पाहिले आणि इशाऱ्यानेच त्याची गोष्ट मानण्यासाठी सांगितलं...
"तू बरोबर बोलतोयस... तुझं घर सुरक्षित राहील... संगीता तू आपलं तोंड आपल्या ओढणीने लपव त्यामुळे तुला कोणीच ओळखणार नाही..." संतोष बोलला...
"सई तू आपल्या घरी जा आणि कोणाला पण संतोष आणि संगीता विषयी काहीच सांगू नकोस... आणि आपल्या भावाला तू काही तरी गोष्ट सांगून टाक... माझं नाव नको घेवूस नाही तर तो इथे पण येईल..." आदित्य बोलला...
सईने संगीताला मिठी मारून बोलली, "परमेश्वर तुमच्या प्रेमाला सुरक्षित ठेवेल... आपली काळजी घ्या..."
"तू पण आपली काळजी घे..." संगीता बोलली... आणि सई निघून गेली...
"संतोष तू इथेच थांब मी पहिले संगीताला सोडून येतो... तू सगळ्यांची नजर वाचवून चुपचाप थोड्यावेळाने ये..." आदित्य बोलला...
"ठीक आहे मी इथेच उभा राहतो... तुम्ही निघा... आणि हो गावातील लोकांना त्या भयंकर प्राण्या विषयी पण तर सांगायचे आहे..." संतोष बोलला...
"ते काम तू माझ्यावर सोडून दे... मी सांभाळून घेईन... आता तुला फक्त भाऊ साहेबांपासून वाचून राहायचे आहे..."
संगीता चेहऱ्यावर ओढणी बांधून चुपचाप आदित्य सोबत निघून गेली... आदित्य संगीताला आपल्या घरी आणतो...
"तू आराम कर... खूप थकली असशील... मी संतोषला पण इथे सुरक्षित आणण्याची व्यवस्था करतो..." आदित्य बोलला...
क्रमशः...

No comments:

Post a Comment