देव उपासना
भाग २४
"बरं वाटलं हे ऐकून कि तुझ्या जवळ इथे थांबण्याचं काहीतरी कारण आहे..." उपासना बोलली...
"अशी गोष्ट नाही आहे... मला तुझी पण काळजी आहे..."
"जर असं आहे तर तू दरवेळी माझ्यासोबत राहू शकतो काय...?"
"तू दरवेळी ह्या संबंधाला बंधनात का बांधत आहेस... समजण्याचा प्रयत्न का नाही करत आहेस... मी आता एकांतवासी आहे..."
"कारण मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून... आणि मला तुझा हा एकांतवास समजत नाही... जो कोणाचं हृदय तोडतो.." उपासना बोलली...
उपसनाने प्रेमचा हात पकडला आणि आपल्या हृदयावर ठेवून बोलली, "बघ प्रत्येक क्षणी ह्या हृदयात बस तुझंच प्रेम वसलेलं आहे आणि तू आहेस कि माझी तुला काहीच काळजी नाही आहे... पहिले तर तू असा नव्हतास... सर्व ह्या एकांतवासामुळे झालं आहे... कसला एकांतवास आहे हा जो प्रेमालाच संपवतो आहे..."
देवचा हात उपसनाच्या हृदयाच्या सोबतच तिच्या उरोजांवर पण होता... आणि त्याची जाणीव होताच त्याने आपला हात लगेच पुन्हा मागे खेचला... त्याचा हात थरथरायला लागला होता...
"हे काय करतेस... हे सर्व माझ्यासाठी पाप आहे..." देव तिच्यावर डाफरत बोलला...
"मी तर फक्त तुम्हाला आपलं हृदय दाखवत होती स्वामीजी कदाचित तुम्हाला दुसरीच जाणीव झाली... कसला हा एकांतवास आहे..." उपासना बोलली...
"मला तुझ्यासोबत काहीच गोष्ट करायची नाही आहे... मी जातोय..." देव बोलला...
"देव माझी गोष्ट ऐक माझा अर्थ तो नव्हता... थांब ना..." उपासना विनंती करत बोलली...
देव उपसनाचे बोलणे न ऐकल्यासारखे करत थोडाच पुढे गेला असेल कि समोरून राहुल पळत पळत त्याच्या जवळ आला आणि बोलला, "स्वामीजी अनर्थ झालं..."
"काय झालं राहुल...?" देवने विचारले...
"तुमच्या सोबत जे तुमचे सहकारी आले होते ना... ते ना... ते ना..." राहुलच्या तोंडून शब्दच फुटेना...
"हो हो बोल काय झालं...?"
"ते सर्व मारले गेलेत स्वामीजी... वाड्याच्या जवळ जो रस्ता गावाच्या बाहेर जातो तिथे सर्वांचे मृतदेह वाईट अवस्थेत पडलेले आहेत... असं वाटतं कोणत्या वाघाने त्यांना चीरफाडून खाल्लं आहे..." राहुल बोलला...
एका क्षणासाठी तर देव एकाच जागी थिजल्या सारखा उभा राहिला, " हे काय बोलतोयस... शुद्धीत तर आहेस ना..."
"मी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहून आलोय स्वामीजी..."
"अरे भगवंता अजय आणि विजयच्या आई वडिलांना मी काय उत्तर देणार..." देव बोलला...
उपासना पण पळत पळत देवच्या जवळ आली आणि बोलली, "काय झालं देव...?"
देव काहीच बोलला नाही...
"स्वामीजींच्या सोबत जे सहकारी होते त्यांच्या सोबत अनर्थ झालं आहे..." राहुल बोलला...
"मी त्यांना काल थांबवलं पाहिजे होतं... बोलत होते रात्रीच पोहोचून जावू पुढल्या गावात... मला त्यांना थांबवले पाहिजे होते... माझं डोकं कुठे आहे आजकाल..." देव बडबडला...
"देव तुझी काहीच चुकी नाही आहे..." उपासना बोलली...
"गप्प बस तू.... तुझ्यामुळे झालं आहे हे सर्व... माझं डोकं खराब करून टाकलं आहेस तू..." देव रागाने बोलला...
हे ऐकताच उपसनाचे डोळे पाणावले आणि ती पुन्हा मागे वळून आपल्या घराकडे निघाली...
"चल राहुल मला स्वतःला पहायचे आहे कि त्यांच्या सोबत काय झाले आहे..."
"चला स्वामीजी पूर्ण गाव तिथेच जमला आहे..." राहुल बोलला...
देव राहुलच्या सोबत तिथे पोहोचतो.. रस्त्यावर सर्वीकडे मांसाचे चिथडे पसरले होते... खूप भयंकर दृश्य होतं....
"तुम्हाला काय वाटतं स्वामीजी, हे कोणत्या वाघाचं काम आहे...?" राहुलने विचारले...
"असू पण शकतं आणि नसू पण..." देव बोलला...
खूपच भयंकर दृश्य होतं तिथे ज्याने कोणी ते दृश्य पाहिलं त्यांचा थरकाप उडाला होता...
भाऊ साहेब आणि पुरुषोत्तम पण तिथेच उपस्थित होते... देवला पाहून ते त्याच्या जवळ आले...
"असं वाटतंय कोणतीतरी वाईट शक्ती तुझ्या आणि तुझ्या मित्रांच्या मागे लागली आहे... अजूनही वेळ नाही गेली निघून जा इथून नाही तर तुझी पण हालत हीच होईल..." भाऊ साहेब बोलले...
"वाईट शक्ती तर तुझ्या पण वाड्यावर आहे पाटील पाहिलंत ना कसा खेचत घेवून गेला तो भूत विश्रामला... राहिली गोष्ट माझी अशी अवस्था होण्याची... तर मी ह्या गोष्टीला नाही घाबरत... तू सांभाळून राह... तुझ्या वाड्यापासून खूप जवळ आहे हा रस्ता... उद्या कुठे तुझ्या वाड्यात असं न घडो..."
"तुझी एवढी हिम्मत..." भाऊ साहेब रागाने बोलले...
"माझी हिम्मत तर तू कालच पहिली आहेस.. माझं डोकं आधीच खराब झालं आहे निघून जा इथून नाही तर इथेच तुझी जिवंत समाधी लावेन..." देव बोलला...
"चला दादा सर्व गाववाले ह्याच्या सोबत आहेत कुठे गडबड झाली तर..." पुरुषोत्तम बोलला...
"तुला मी बघून घेईन... आणि राहुल तू... माझ्या तुकड्यांवर जिवंत होतास... आज ह्याचे तळवे चाटत आहेस..." भाऊ साहेब बोलले...
राहुल काहीच बोलला नाही... भाऊ साहेब आणि पुरुषोत्तम तिथून निघून गेले...
क्रमशः...
No comments:
Post a Comment