माझ नाव रुपाली - मी मुंबईत राहते - आणि इथे जास्त भुतांच्या गोष्टी ऐकायला सुधा मिळत नाहीत किवा आपण हि कधीतरीच असे विषय काढतो . शहरी भागात भूत आता फक्त पुस्तक आणि आणि आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टीन मधेच उरली आहेत . पण याहून हि एक वेगळे जग आहे . भूत आहेत आणि माझा त्यांच्या वर विश्वास आहे . कारण जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती . माझ्या साबोत घडली आहे जेव्हा मी ८ वीला शिकत होति. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या कि मजा करण्यासाठी माझ्या आईच्या गावी म्ह माझ्या आजोळी मालवण ला जायचो . आज्जीचे घर तसे जुन्या काळातलेच होते. खूप मोठे , समोर छोटीशी बाग , आणि बाजूला गुरांचा वाडा . आणि त्यात भरपूर गाई आणि बैल होते. आम्ही मुंबईचे म्हटल्यावर मुलांची मजा दिवस भर बागेत खेळायचो , मामाने गाईचे दुध काढायला शिकवले . आणि खूप दंगा मस्ती सुधा करायचो . त्यावर्षी हि आम्ही उन्हाळ्यात तिथे गेलो होतो . पण यावेळी आम्हाला घरच्या मोठ्या माणसांनी गु जाऊ नको असा कडक आदेशच दिला होता . तिथे लहान मुलांना जाण्यास बंदी केली होती . म्हणून मी आजीला त्या बद्दल विचारले तर तिने सांगितले कि गेल्या ६ महिन्यापासून जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो . २ दिवसात मरतो . आणि त्यामुळे गाई सारख्या हंबरत असतात आणि माणूस तिथे गेला कि त्याला शिंगणे मारायला येतात . म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका . तेव्हाही वाड्यात २० गाई होत्या . आणि त्या दिवशी अजून एक बछडा जन्माला आला . आम्ही मुल आनंदी झालो पण तो आनंद फार काळ टिकला नाही . कारण सकाळी तो बछडा मृत अवस्थेत वाड्यात पडला होता. आता सहन शक्ती संपली होती मामाने आजीला सांगितलं कि हे काही साध सुध नाही आहे . नक्कीच काहीतारी भयानक आणि अमानवीय घडतंय आपण मांत्रिकाला बोलावून पूजा करून घेवूयात . मांत्रिक आला आणि जसा त्याने त्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश केला तसा त्याला विचित्र अनुभव आला . तो लगेच बाहेर पडला आणि म्हणाला उद्या बुधवार आहे उद्या सकाळी सकाळी मी इथे येती आणि काय करायचं ते बघतो . दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता तो मांत्रिक आला . मी हि जागीच होते कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे हे मला सुधा जाणून घ्यायचे होते . तो आधी गुरांच्या गोठ्यात , मग बागेत आणि नंतर विहरी जवळ गेला त्याच्या हातात एक काठी होती . विहरी जवळून तो पुन्हा गोठ्यात आला . थोडा वेळ तो त्या गोठ्यात तसाच डोळे बंद करून उभा राहिला . आणि नंतर घरी आला आणि आजीला सांगितले . हे प्रकार साधेसुधे नाहीत बछडे मारत आहेत कारण तुमच्या गुरांच्या गोठया शेजारी जे झाड आहे त्यावर एक भयानक पिशाच्च आहे आणि त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत . तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारले मग गाई का मरत नाहीत फक्त बछडे का मरतायत . त्वः तो म्हणाला प्रत्येक पिशाच्च नवीन जीवनाला तरसलेल असत . त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्यानचे तो प्राण घेतोय . तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक पूजा घातली कि सगळ ठीक होईल . त्यामुळे ते पिशाच्च तिथून निघून जाईल . त्याने सांगितलं कि पूजा आता चालू कृत पूजा संपायला २ दिवस लागतील . त्याने पूजेच्या सामानाची लिस्ट मामाकडे दिली . थोड्याच वेळात मामा ते समान घेऊन परत आला . मांत्रिकाने ९ वाजता पूजा सुरु केली तो कसले तरी विचित्र मंत्र म्हणत होता . ते सुधा जोरात जेव्हा त्याने मंत्र बोलण्यास सुरवात केली तेव्हा ज्या घटना झाल्या त्या कधी प सुधा केला नव्हता . अचानक आमच्या घरावर लहान लहान दगड येवून पडू लागले आणि लगेच थांबले सुधा . आम्हाला वाटल कि कोणी तरी मस्ती करत असेल. पण ५ मिनिटांनी परत पुन्हा तेच झाल लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव होऊ लागला . मामा धावत जाऊन घरावर चढला पण तिथे कोणीच नव्हत . पण तरु सुधा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान लहान खडे पडताच होते ते कुठून येत होते ते कळतच नव्हत . हे तर काहीच नव्हत कारण जसा मांत्रिक मंत्र पुटपुटत होता तसा आता दगडांचा वर्षाव थांबला सगळे घरात येवून पूजेला बसले . पण अचानक घरावर थाप थाप असा आवाज झाला आणि घाण वास सुधा येवू लागला मामाने बाहेर जावून पहिले आणि तो चक्रावला कारण आता घरावर चक्क मानवी मल ( संडास ) येवून पडत होता आणि खूप दुर्गंधी पसरत होती . हे सगळ दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने १२ वाजता थांबवली . मांत्रिकाने सांगितलं जे काही घडतंय ते तो पिशाच्च करतोय पूजेत विघ्न आणण्यासाठी. कोणीही बाहेर पडू नका . मी उद्या येईन परत . त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण खडे आणि वाळू यांचा मधून मधून वर्षाव होतच होता. पण मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव रात्री नाही झाला . दुसरा दिवशी त्याने पूजा सुरु केली आणि पुन्हा तेच होऊ लागले . आम्ही मांत्रिकाला सांगितले कि यावर काही उपाय करा . तेव्हा तो बोलला हे थांबवू शकत नाही ते चालूच राहणार . आणि सांगितले कि त्याच्या खूप दुखतंय जस कोणीतरी काठीने त्याला मारतय असा वाटत होत . पण त्याने पूजा चालूच ठेवली आता दगड मातीचा वर्षाव थांबला होता . पण मांत्रिकाच्या डोळ्यातून पाणी येत होत जस कोणी तरी त्याला खूपच मारतय . ३ वाजता त्याने पूजा आटोपली आणि ३ मंतरलेले खिळे घेतले आणि उठून गोठ्याजवळ गेला आणि एक गोठ्याला आणि दुसरा झाडाला ठोकला . आणि उरलेला १ खिळा त्याने घरच्या उंबरठ्याला ठोकला . आणि तिथेच पडला लोकांनी त्याला उचलले आणि पाणी दिले तो म्हणाला आता ते पिशाच्च तुम्हाला त्रास देणार नाही . त्याने घातलेली बनियन काढली आणि आम्ही पाहून थक्क झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क काठीने खूप मारल्याचे वळ उठले होते . त्याला मामाने उचलून त्याच्या घरी नेले आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते घेतले नाहीत . तो म्हणाला पैशांचा मोह नसलेला बरा . त्या दिवशी पासून त्या घटना बंद झाल्या आणि काही दिवसातच गाई ने परत बछड्या ला जन्म दिला आणि आम्ही सुखावलो . आणि त्याला काही झाल सुधा नाही आवडली असेल तर नक्की प्रतिक्रिया द्य
No comments:
Post a Comment