ही जाहिरात तुमच्याखेरीज अन्य कोणासाठी असु शकणार नही.जणु काहि तुमचं नाव समोर ठेवुनच जाहिरात दिलेली आहे.पहा ना! वय तिशिच्या आत,(बरोबर)अविवाहित,(बरोबर)खेड्यात राहण्याची तयारी असलेला,(खेड्यात काय वाळवंटातही रहाल की,पगार व्यवस्थीत असेल तर) मोडी वाचता येणारा(आता अजाकाल म्हातार्यंशिवाय मोडी कोणाला समजत?पण योगायोगाने तुमच्या विक्षिप्त वडिलांनी तुमच्या मानेवर खडा ठेवुन तुम्हाला तास तास मोडी लिहायल लावलं आहे-आठवतं?) पगार बाराशे रुपये (पण जेवण,राहणे इतर खर्च नाही,कदाचित पगारावर चर्चा होऊ शकते) जहिरातित नाही ते फ़क्त तुमचं नाव(उमाकांत बर्वे,वय एकोणतिस,मॅट्रिक थर्डक्लास,खाजगी क्लासेसमधुन तासावर शिकवणारे,जुन्या लुनावरुन शिकवण्या घेत फ़िरनारे) अर्ज नको,जाहिरातिचे कात्रण घेऊन प्रत्यक्ष भेटा.पसंती झाल्यास ताबडतोब रुजु व्हावे लागेल.
आज तुमच शिकवण्यत लक्ष नाही पण त्याने बिघडत नाही,विद्यार्थ्यांच तरी कोठे लक्ष असत?तुमच्या मनत सतत विचार चाललेला आहे.अत्ताच सगळीकडे सांगायच की उद्यापासुन ,मला येणं जमणार नाही,पण समजा या नव्या नोकरिच जमल नाही,मग परत पायपिट ? मोठी चमत्कारीक समस्या आहे खरी .पण इतक्या वर्षांची मनातली मळमळ वर येते,अशी किती दिवस खर्डेघाशी करनार?मनाशी एक निर्णय घेता अणि सगळ्यांना सांगता-गावाकडे जावं लागणार आहे.उद्यपासुन यायला जमणार नाही.सगळे निर्विकार चेहऱ्याने म्हणतात-"ठिक आहे,पैसे महिनाखेरीस घेउन जा"
मौजे सारवाडी लहानसं गाव आहे. S.T.आत जात नाही.तिवाठ्यावरच थंबते.गाव दिड दोन मैलांवर आहे.एकच टांगा अहे.नशिबाने आज बाजाराचा दिवस नाही.टांग्यात तुमच्यखेरिज चौघच आहेत.अर्ध्या तासाच रस्ता आहे.कोण,कोनाकडे ,कोठले चवकशा होतात."देशमुखांकडे चालओलो अहे"तुम्ही सांगता.त्यांचे चेहरे असे आत का वळतात?डोळ्यांवरच्या पापण्या अशा खाली का येतात? एकाएकी त्यांच्या जिभांना लगाम का बसतात?या देशमुखांना वाळित तर टाकल नाही ना गावाने?कदाचित द्वेष मत्सर असेल. "वाडा गावातच आहे का बाहेर आहे?म्हणजे असं की टांगा तिथपर्यंत न्यायला?"चौघ एकमेकांकडे पहातात-शेवटी टांगेवाला म्हणतो "वाडा गावाबाहेर आहे,पण आपल्यच वाटेवर आहे,मी तुम्हाला सोदतो"संध्याकाळची तिरकस उन्हं पदली आहेत.दोन्ही अंगान वावरं आहेत.एकाएकी टांगा थांबतो.टांगेवाला हाताने एक उजवीकडे जाणारी लहनशी वाट दाखवतो"या वाटेने फ़र्लांगभर अंतरावर देशमुखांचा वाडा लागेल साहेब"त्याच्या हातावर पैसे ठेवुन तुम्ही उतरता,बॅग उतरवुन घेता.
बॅग वजनाने जड आहे.मुलाखत चांगली झाली तर रुजु होन्याच्या विचाराने किमान गरजेच्या सर्व वस्तु तुम्ही बरोबर घेतल्या आहेत.दोन्ही अंगाला शेतांचे बांध आहेत.हे सारंच वातावरण तुम्हाला अपरिचित आहे.तिथे चोविस तास रहाणे तुम्हाला जमणार आहे का? फ़र्लांगभर,टांगेवाला म्हटला होता.किती अंतर झालं?एव्हाना यायला हवा होता-
एका लहानशा चढावर चढुन वाट थांबते.तुम्ही तेथेच थांबता.
समोर देशमुखांचा वाडा आहे.तटासारखी बिनखिडक्यांची भिंत.भिंतीमध्ये उंच कमानिच दार.त्यातली दिंडी उघडी.उघडी दिंडी हे आत यायचच आमंत्रण आहे.नाही का? वाकुन तुम्ही आत प्रवेश करता आणि मग (आधी काहिच दिसत नाही म्हणुन)डोळ्यांनी अर्धप्रकाशाचा सराव होईपर्यंत तसेच उभे रहाता.
समोरचा भाग अंधारलेला आहे.संध्याकाळ आहे म्हणुन.पण त्याशिवाय दोन्ही अंगाना उंच मजले आहेत,आणि मधला बोळासारखा भाग.कुंड़्यातल्या,टांगलेल्या आणि वरच्या जाळिवरुन वेलासरख्या पसरलेल्या अनेक शोभेच्या (किंवा औषधी?एक दर्प येतो म्हणुन)वनस्पतींनी व्यापुन टाकलेला आहे.म्हणुन मधुन दोन फ़ुटांची फ़रसबंद वाट आहे.त्याच वाटेवरुन तुम्ही पुढे जाता.समोर वाड्यांच आतलं दर उघड होत.आत तर आणखिणच अंधार होता.पायरीमागेच तुम्ही साशंक मनाने उभे रहाता.आवाज वरुन येतो.इतका अचानक की तुम्ही दचकता.
"दाराच्या आत दोन पावलांवर उजव्या हाताला जिना अहे.सतरा पायऱ्या आहेत.जिना संपल की उजवीकडेच खोलिचं दार अहे.त्यातुन या"
उजव्या बाजुच्या खोलिचा पडदा हलत असतो.त्या पदद्यामागुनच कोणी बोललं का?तुम्हाला येताना कोनी पहात होत का? पण ही काहि प्रश्नोत्तर करायची वेळ नाही.आसपासच्या झाडांचा दर्प नाकाला झोंबु लागला आहे.तुम्ही त्या दारातुन आत शिरता.
सतर पायऱ्या चाचपडतच तुम्ही पुढे जाता.पायाखाली पायऱ्या करकरतात तेव्हा तुम्हाला समजतं की जिना लाकडी आहे.पायर्या ओलसर चिकट आहेत..
मनाशी सतरा मोजुन झाले की तुम्ही थांबता,उजवीकडे वळता.आता तुम्हाला फ़िक्कतसर प्रकाश दिसतो.दारावर पातळसर पडदा आहे.तो हाताने दुर करुन तुम्ही खोलीत पाय टाकता आणि समोर पहातच रहाता.
खोलिची डवीकडची सर्व भिंत देवांच्या तसबिरी,मुर्ती यांनी भरलेली आहे,खाली मोठे देव्हारे आहेत,चौरंग आहेत,खाली ओळिने निरांजन लावलेली आहेत.दहा ज्योतींऐवजी तुम्हाला शेकडो लखलखते प्रकाश बिंदु दिसतात.
"माझ्या यजमानांनी जुन्या आठवणी लिहुन ठेवल्या आहेत,त्यांच लेखन रुक्ष आहे,त्यांनी बरचं काही लिहुन ठेवल आहे, पण मोडीत आहे,त्यांचे सर्व कागदपत्र वाचावे लागतील,मला त्यांचे लेखन प्रसिद्ध करायच आहे"
तुम्ही जारसे घुटमळता,एकदम त्यांच्याकडे पहाता तेव्हा तुमच्यावर खिळलेले त्यांचे मोठे,काळेभोर डोळे,त्यांच्या चमचमणाऱ्या असंख्य ज्योती पाहुन चक्रावता,मग एखादा पडदा ओढल्यासारखे डोळे लहान होतात.
"यजमान साठ वर्षांपुर्वी वारले.मी इतके दिवस थांबायला नको होतं.आत वाटत फ़ार उशीर नाही न झाला?मला काहि.....काही होण्याआधिच हे काम पुरं झालेल डोळ्यांनी पहयच आहे."
"पण समजा ,मी त्यांचे कागदपत्र माझ्यबरोबर घेऊन गेलो तर?
"नाही-मी जाहिरतीत अट घातली होती,इथेच रहायला हवं,इथे वापरायला हवी तेवढी जागा आहे"
"ठिक आहे"तुम्ही म्हणता.तुम्ही कोणत्या मोहात सापडला आहात?
त्या घडवंचीवरची लहानशी घंटी वाजवतात.मग दाराकडे पाहुन म्हणतात"उमाकांत आता इथेच रहणार आहे,तिसऱ्या मजल्यावरच्या खोल्या त्याला उघडुन दे,मग वाड्यातली सगळी व्यवस्था दाखव आणि बाहेरचा दरवाजा बंद करुन ताक.
तुम्ही नवलाने मागे वळुन पाहता.पावलांचा अजिबात आवाज न करता कोणीतरि तुमच्या मागेच उभं राहिल आहे,प्रकाश इतका कमी आहे की तुम्हाला त्याच्या चेहऱ्याची कल्पना येत नाही.
"हं" तो माणुस घोगऱ्या आवाजात म्हणतो"चला माझ्यामागे"
तुम्ही वळता,त्याच्यमगुन चालायला लागता.
वाड्यात विज घेतलेली नाही.काहि कोनाड्यात किंवा छताला टांगलेले दिवे आहेत.तिसरा मजला येतो"ही तुमची खोलीतो त्याच खरखरत्या आवाजात तुम्हाला सांगतो."आठ वाजता जेवणं असतात"
तुम्ही एकटेच उभे आहात,खोलिला एकच खिदकी आहे,मगाशी मावळतीला आलेला सुर्य मावळलेला आहे.खोलित प्रशस्त पलं आहे.शाल रजई आहे.धुळिचा कणही नाही.खोलि एवढ्यातच तयार केलेली दिसते.खिदकीतुन नजर बाहेर जाते.बाहेर माळराणाखेरिज काही नाही.तुम्ही झब्बा पायजमा बाहेर काढता,टॉवेल सबण घेऊन गार पाण्याने हात पाय तोंड धुता.सात वाजले आहेत.जेवणाला अजुन तासभर आहे,मऊशार गदीवर शरीर सैल सोडता,......अंधार....दचकुन तुम्ही जागे होता,सात चाळिस झालेले आहेत.
आठला पाच कमी असताना तुम्ही खोलीबाहेर पडता.जिन्याने तुम्ही खाली उतरता.दिशेचा जरासा गोंधळ होत असतो,काही अंढाऱ्या खोल्यांतुन जरा अस्वस्थच वाटतं,पुर्वी मोठं घराणं असेल,शेकड्यांनी मानस वस्तीला असतील पण आता एक दोनच राहिली असावीत,पण मग दोन तिनच खोल्य वापरात ठेवायच्या ! मध्येच तुमचे विचार तुटतात-विव्हळण्याचा आवाज येतो,तुम्ही खोलित येताच ते आवज थांबतात,पण अंधारातुन पाच सहा हिरवट पिवळट रंगाच्या लहान मोठ्या होणाऱ्या डोळ्यांच्या जोड्या तुमच्यावर खिळलेल्या असतात,तुम्ही खोलितुन जायची वाट पहात?तुम्ही घाईने खोली ओलांडता.
आता तुम्हाला दिसतं की उजव्या हाताला जेवनाची खोली आहे,चार पाट आणि चार ताटं मांडलेली आहेत,ताटांवर झाकणं आहेत.आतल्या दारापाशी तोच मघाचा(किंवा दुसरा कोणीतरी)नोकर तुम्हाल हाताने पाटावर बसायची खुण करतो.तुम्ही पाटावर बसता,तुमच्या मागोमाग एक तरुणी खोलित येते(तिच्या हालचालिंचा एवढासाही आवाज तुमच्या कानावर आला न्हवता)तुमच्याकडे पाहुन अर्धवट हसते,तुमच्या शेजारच्या पाटावर बसते.
"मी-मी उमाकांत बर्वे"
"मावशिने सांगितलं आहे"ती म्हणते"
"श्रीमती देशमुख तुमच्या मावशी"
"हो-मी त्यांची भाचि -निशा"
पानात चपात्या,कोशिंबिर,लिंबाची फ़ोड,भाजी,वरण ,ताक आहे.
"सुरवात करायला हरकत नाही"निशा
"पण आणखी दोघं यायची आहेत ना?"तुम्ही
"मावशीची प्रकृती चांगली नसते,ती एखाद वेळी यायची ही नाही"चौथ्या ताटाचा खुलासा निशा करत नाही.तुम्ही जेवता पण अन्नावर तव मारत नाही,अजुन या घरात तुम्ही परके आहात.तुम्हाल खुप वाटत निशाची चौकशी करावी,तुम्ही स्त्रीलंपट नाही पण बुजरेही नाही.ती याच घरात रहायल असते क विचारावं,तस असेल तर तर तुमचा इथल मुक्काम अगदीच निरस होणार नाही.मनात जन्माला आलेल्या आकर्षणाचं तुम्ही मनाशी नवलं करता.
"जेवण झाल्यावर मावशीने तुम्हाला त्यांच्या खोलित बोलावलेल आहे"निशा पानावरुन उठता उठता म्हणते.इतक्यात जेवण झालं?खरच की! वेळ कस झटपट निघुन गेला.तुम्हीही उठता.
तुम्ही श्रीमती देशमुखांच्या खोलिपाशी जाता."ये ,आत ये ,उमाकांत"आतुन आवज येतो.तुम्ही आत जाता.अजुन ती निरांजन तेवत आहेत.तुम्ही जवळ जाता,त्या वर तुमच्याकडे पहात आहेत,त्यांच्या नजरेत काय भाव आहेत उमगत नाहित.किंचित शंका?किंचित समाधान?किंचित उपहास?का सगळा तुमच्याच मनाचा खेळ?
"खोलि व्यवस्थित आहे ना? त्या
"हो-हो"
शहरातल्य सोयी इथे नाहित" त्या
"एवढं काही अडत नाही त्यांच्यावाचुन"
"मग आजपासुन कामाला सुरवात करनार ना?आपल्याला फ़ारसा अवधी नाही"श्रीमती देशमुख
तुम्ही काहिच बोलत नाही.त्या एका हातने गळ्याभोवतीचा काळा गोफ़ काढतात,तो पुढे करतात,तुम्ही तो हातात घेतल्यावर कळत की तो किती जड आणि गार आहे.त्यात एक जुन्या प्रकारची पितळी किल्लि गुंफ़लेली आहे.
"मधल्या दिवानखान्यात डाव्या हाताच्या भिंतित कपाट आहे,त्याच्या कुलुपाची ही किल्लि आहे,निळ्या कापदाच्या रुमालात माझ्या यजमानांचे कागद बांधुन ठेवले आहेत,त्यांच्यातला वरचा गठ्ठा सुरवातीस घे"
तुम्ही दिवानखान्यात जाता,प्रकाश कमीच आहे,अंदाजनेच कुलुपात किल्लि घालता,दार उघडताच उंदरांचा चिक चिक आवाज,आत रुमालांची थप्पि दिसते,त्यातला वरचा तुम्ही काढुन घेता,उंदरांनी कुरतडलेले नसले म्हणजे बरे मनाशी विचार करता,कपाटातली हवा दुर्गंधीची असली तरी रुमालाला एक प्राचिन सुगंधाचा काही शेष येतो.किल्लि देशमुख बाईंना देता.
"छान"त्या म्हणतात"आज रात्री हे वाच.उद्या दुपारच्या जेवनानंतर बोलु,आता गेलास तरी चालेल"
काही न बोलता तुम्ही बाहेर पडता.
तो अनामिक गडी किंवा निशा कोठे आहे?रात्रीचा प्रकाश असल्याखेरीज वाचन कस होनार? त्यांना शोधायला हवं.या वाटेतल्या अंधाऱ्या खोल्यांपेक्षा मिनमिणते का होईना दिवे असलेल्या खोल्या बऱ्या.समोरच्या दारचा फ़िकट प्रकाशित चौकोन दिसतो पण द्न्ही बाजु पार अंधारात आहेत,टक लावुन पाहिल्यास काहि उभे,काहि बसके आकार दिसतात ते काय खुर्च्या आहेत कि शेतमालाची पोती? मध्येच एका कोपऱ्यात खसखस ऐकु येते आणि क्षणमात्र डोळ्यांच्या लालसर ठिनग्या दिसतात,गडप होतात,तुम्ही नजर घाईने वळवता आणि खोलि भरकन ओलांडता.
एका हाताल दार दिसत,तुम्ही ते उघडुन पहाता,गारेगर हवेचा झोत अंगावर येतो,बाहेर एक बाग आहे,बगेत उंच झाडं आहेत,पण हे चुक नाही का?तुम्ही दुसऱ्या मजल्यावर नहि का? मग ही बग कशी?अंदाजा अंदाजाने पुढे जाता,तुमच्या खोळिकडे जाणारा जिना लागतो,खोलित येता.
स्टुलावर निशा बसलेली आहे.ती आता किती वेगळी दिसतेय,या वाड्यातल्या रहस्याचा तिही एक भाग आहे काय?हातातला कागदांचा रुमाल पलंगावर ठेवता.
"वाड्याची व्यवस्था कोण पहातं:"तुम्ही विचारता
"मी व्यवस्था पहात नाही-पण काही कमी आहे का?निशा
"या खोलित एक मोठा दिवा हवा आहे"
"उद्य त्याची व्यवस्था करिन" निशा
"तुम्ही इथेच रहाता का? की मावशिला भेटायला आला आहात?
"मी?"ती जरा चमत्कारीक आवाजात हसते"मी तर इथेच असते"
तुम्ही तो विषय ताणत नाही.पण इतर काहि गोष्टींचा खुलासा हवा
"सगळ्या खोल्यांतुन इतका अंधार कसा?
"मला काहिच कल्पना नाही"निशा
या निशाला विचारण्यात काही अर्थ नाही.
"तुम्ही बाहेरुन आलेला आहात?" निशा
"हो आजच संध्याकाळी आलो"तुम्ही
"बाहेर-बाहेर कस असतं?"निशा (किती निरागस प्रश्न)
"कस असतं म्हणजे काय" तुम्ही
"मी....मी... कधी बाहेर गेलेलीच नाही" निशा
"अस कस असेल?चार भिंतीच्या आत कोणी इतकी वर्ष कस राहु शकेल?’ तुम्ही
"नाही,खरंच नाही-बाहेर कस असत जरा सांगता का?" निशा
सुर्य,चंद्र,ढग,वारा,खेडी,शहरं,वाहनं,रस्ते आणखी काय काय सांगणार?
"मला कधी बाहेर घेउन जाल? "निशा(तुमची तंद्री तुटते)
"तुमच्या मावशीच्या परवानगीखेरीज?थांबा हं किती सोप्पी गोष्ट आहे,खालच्याच एका खोलिच दार बाहेर बागेत उघडतं,चला माझ्याबरोबर,आत्तच दाखवतो बाहेर काय काय असतं"
ती नवालाने तुमच्याकडे पहाते मान हलवत ती म्हणते "वाड्यातुन कोठुनही बाहेरचं काहीही दिसत नाही"
"चला तर माझ्याबरोबर"तुम्हीही हट्ट सोडत नाही आणि उठता.
ती तुमच्या मागोमाग येते.
तुमची खात्री असते की याच खोलित माघाशी तुम्हाला बगेत उघडनार दार दिसल होत.मगाशी गार गार वाऱ्याचा झोत अनुभवलेला अजुन स्पष्ट आठवतय.पण त्या भिंतीत आता दिसनार दारं खुप जुनं पिवळट दिसत आहे,त्याल स्पर्श करायची तुमची इच्छा नसते तरीहि तुम्ही ते दार उघडता-समोर दोघेजण उभे असतात...तोंडाशी आलेली किंचाळी आवरता,समोर आरसा आहे,त्यात तुमची प्रतीबिंब दिसत आहेत-पण आरशाच्या काचेत दोष असला पाहिजे-नाहितर चेहरे असे विकृत दिसले नसते.
झब्ब्याच्या बाहिने तुम्ही घाम पुसता.निशा शेजारीच उभी आहे.अर्थात तिला दाखवण्यासारखं आता कहीच नाही,तरीही तुम्ही तिला सांगताच"माझीच जागेची कहितरी गफ़लत झालेली आहे,मगाशी येथेच कोठेतरी दार होत आणि ते दार एका गच्चित उघडत होत"
"अं..हं..वाड़्यातुन बाहेरच काहिहि दिसत नाही"निशा
"पण माझ्या खोलितिल खिडकितुन तरी बाहेरच दिसत,चला दाखवतोच तुम्हाला"तुम्ही
पण ती अजुनही मानेने "नाही-नाही’म्हणत आहे.तुम्ही घाइने वर येता आणि जागेवरच थांबता,जिथे संध्याकाळी खिडकी होती तेथे आता आरसा आहे.तुम्ही जवळ जाऊन पहाता, याच्याही काचेत दोश असला पाहिजे कारण याच्या कचेतुन परावर्तीत होणारी खोलि रंग झडलेली,जाळी जळमटांनी भरलेली दिसत आहे,आणि मान जराशी हलवताच असा भास होतो की खोलीत तुमच्या व्यतीरिक्त आणखीही कोणी वावरतं आहेत...तुम्ही डोळे मिटुन घेता......घाम आलेला आहे...अंगावर येथेही गार वारा येतो आहे...तुम्ही सावकाश डोळे उघडता.निशा गेलेली आहे.
तुम्ही पलंगावर बसलेला आहात.तुम्हाला सिगारेटच व्यसन नाही.पण आता ती हवीहवीशी वाटत आहे.दोन चार झुरके मारल्यावर नाडी ताळ्यावर येते.तुम्हाला शेजारीच ठेवलेला कागदी रुमाल दिसतो,फ़सवाफ़सवीच्या वाड्यात निदान तो तरी खरा आहे.तुम्ही तो जवळ घेता.कापडाच्या चुन्याचुन्यातुन धुळ साचलेली आहे.साठ वर्ष,इतकी वर्ष हा रुमाल अस्पर्षित राहिला?त्याला कसर कशी नाही लागली?रुमालाच्या गाठिला तुम्ही हात लावता तेवढ्यात खोलितल्या दिव्याची वात लहान मोठी व्हायला लागते.तुम्ही रुमाल हातात घेउन धुळ झटकता,स्पर्श हाताला किती मुलायम लागतो,मग हाताला काहितरी कशिदाकाम लागतं,तुम्ही वाकुन पहाता,दिव्याची वात एकदम बारिक होते,हा काय प्रकार आहे?तुम्हाला संताप यायला लागतो,तुमची जिद्द जागी होते.तुम्ही काडी पेटवता,सर्र्र्र्र्र्र्र वारा येतो....काडी विझते.तुम्ही स्पर्शानेच कशिदाकाम काय आहे ते पहाण्याचा प्रयत्न करता.कापडावर विणलेली ती अक्षर आहेत.आधी बोटांना ती वळणं उमजतच नाहीत.मग लक्षात येतं -ही मोडीची वळणं आहेत,मग त्याचा अर्थ लागतो.
"रात्री रुमाल उघडु नका"
तुमच शरिर ताठ होतं.याची तुम्ही खासच अपेक्षा केलेली न्हवती.कोनत्याच घटना साध्या न्हवत्या.तुम्हाला मोडी समजत नसतं तर?तुम्ही रुमालाची गाठ सोडण्याच्या क्षणी खोलितिल सारा अवकाशच वखवखल्यासारखा झाला होता ! समजा कपडा उलगडला असता तर....गाठ बांधने म्हणजे बंधन..त्याल खस अर्थ आहे.काहितरी बांधुन ठेवने,जेरबंद करणे ! अस काहितरी त्या कापडाच्या गाठित बांधलेल आहे की गाठ उकलताच ते एखाद्या धुराच्या उसळत्या लोटासारखं आपल्या अक्राळविक्राळ रुपात उत्सर्जित झालं असत.
पण ह कल्पनेचा अतिरेक आहे काय? तुम्ही नवल करता,पण इथं काय अशक्य आहे?जिथे दार खिडक्यांचे आरसे होतात ,जिथ सर्व काळोखात दडलेलं आहे,जिथे सुर्यप्रकाशाला प्रवेश नाही,तिथे याही गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा.साठ वर्ष नसेल पण तो रुमाल खुप वर्ष कपाटात बंद आहे हे नक्कि,आता त्या सुगंधाचाही अर्थ लागतो,चंदन केशर हे देवांचे प्रिय गंध,पुण्याची शुचितेची प्रतिकं.मग देशमुखबाईंच्या खोलितील भिंतींव लावलेल्या तसबिरिंचि आठवन येते पण तुम्ही अगदी साहजिकपणेच धरुन चालला आहात की त्या देवादिकांच्या तसबिरी मुर्त्या आहेत,पण पुढे जाऊन निट पाहिलं आहे का?
विचार भिरभिरतच तुमच्यावर येतात,आता रात्र झालेली आहे,आणि रात्र मानवाची सततची वैरिण राहिलेली आहे.जेव्हा ज्ञानेंद्रियच फ़सतात तेव्हा कशावर विसंबायच?आणि अशा जागेत तुम्हाला रात्र काढायची आहे.
क्रमशा: ....................................
(लेखक-नारायण धारप)

दिवा बारिक करुन तुम्ही शेवटी आडवे होता.तुमच मन विलक्षण उत्तेजित अवस्थेत आहे.दिवसभराच्या घटनेतुन थोडाफ़ार अर्धवट अर्थ निघु शकत होता तो एवढाच,की वाड्यातल्यानाच तो रुमाल उघडुन हवा होता,पण त्यांना ते शक्य न्हवतं.,रात्री त्या बाईंनी तुम्हाला कामाला सुरवात करायला सांगितली हेच संशयास्पद न्हवतं का?योगायोगाने तुम्ही बचावलात.तुम्ही उठता स्टुलावर ठेवलेला तो रुमाल उशाखाली ठेवता.त्यात काहीतरी सहाय्यक शक्ती आहे अशी तुमची समजुत झालेली आहे.मनाला धिर येतो.
जाग्रुतीतुन निद्रेत,निद्रेतुन स्वप्नात केव्हा प्रवेश करता ते कळतच नाही.
स्वप्नात आधी फ़क्त एक पांढराशुभ्र,अस्थींचा पंजा दिसत असतो.तो पंजा तुमच्या ऊशाजवळचा गादीचा भाग चाचपुन पहातो.मग अतिकृश चेहरा,तुकतुकित बिनकेसांच्या टाळुचा चेहरा,डोळ्यांच्या जागी खोबनी असलेला चेहरा जवळ येतो,मग अतिशय मुलायम हात तुमच्या गालांवरुन फ़िरत आहेत.कानाला लागुन मऊसर ओठ भलत्याच गोष्टे कुजबुजत आहेत,तुमचे हात रेशमी कायेभोवती पडतात,सुगंधी केसांचा धबधबा चेहऱ्याभोवती कोसळत येतो,मग एकच प्रश्न ध्यानात रहतो"रात्री खोलीत याल ना?रात्री रुमाल उघडाल ना?
जाग येते ती पहाटेच्या गारव्याने,दोन्ही हातांनी छातीशी काहीतरी आवळुन धरलेल आहे,तो कागदाचा रुमाल आहे.रेशमी निळ्या कापडावर विणलेलं आहे "रात्री रुमाल उघडु नका"
तुम्ही पलंगावर बसता.निरगाठ हलके सोडवता.चंदन केशराचा सुगंध स्पष्टपने जानवत आहे.आत एक आडवा पुठ्ठा आहे.त्यावर लाल रेषात "श्री"लिहिलेल आहे.वरचा पुठ्ठा हलकेच उचलुन बाजुला ठेवता.काळ्याभोर शाईत लिहिलेला मजकुर.तिस चाळिस पानेच लिहिलेली आहेत.तुम्ही कुतुहलाने शेवटच पान आधी पहाता.शेवटी "श्रींची ईच्छा.श्रींची ईच्छा.श्रींची ईच्छा."हेच शब्द तिनवेळा लिहिलेले आहेत.पहिल्या कागदावर १९२१ सालातील तारीख आहे.देशमुखबाई म्हणत होत्या ते खर असेल तर स्वतः श्री.देशमुख १९२९ साली म्रुत झाले म्हणजे त्यांच्या जिवनातील शेवटच्या आठ वर्षांच्या घटना या कागदातुन वर्णन केलेल्या असणार.मजकुर वाचायची तुम्हाला घाई झालेली आहे.
शेवटचा कागद तुमच्या हातातुन गळुन पडलेला आहे.अशा गोष्टी शक्य आहेत?घडु शकतात?
तुम्ही पुन्हा कागद समोर ओढता.
"युद्धावरुन परत आलो तेव्हा सर्वच गोष्टी नव्याने पहायला लागलो.अलामेनच्या सर्व कॅम्प मध्ये मुस्तफ़ा माझ्याबरोबर होता,मृत्यु सतत आमच्याभोवती घिरट्या घालत होता.अशावेळी उद्या आपण जगात असणार नाही या भितीने मनतील सर्व गोष्टी आपण परक्याजवळ व्यक्त करतो..
मी वयाच्या चाळिसाव्या वर्षी ताराशी विवाह केला.तेव्हा ती फ़क्त पंधरा वर्षांची होती.मला मानसशास्त्राची काहिहि जाण नाही.शारीरिक गरजा होत्याच त्या समजुन घेण्याच तिच वय झालेलं नसेल का?विवाहानंतरच्या अनपेक्षित अनुभवांनी तर तिच्यात विक्रुती आलेली नसेल ना? आता समजतं तिच्या,मध्ये हा विकृतीचा धागा पहिल्यापासुन होता.तिला पैसा,स्वास्थ्य,एकांत हेच हवं होत.
विवाहानंतर पाचच वर्षांनी महायुद्धास प्रारंभ झाला.पाच वर्षातले बरेचसे दिवस मला फ़िरतीवर रहावं लागल.जे काही थोडे दिवस घरी होतो तेव्हा सर्वकाळ शरीरसुखाखेरीज कशाचाही विचार करत न्हवतो.म्हातारा इमानी सादबा काहिही सांगायला लागला तरी दुर्लक्ष करत होतो.त्या गोष्टी ऐकल्या होत्या,दुर्लक्ष केलेल्या होत्या पण विसरलेलो न्हवतो."मालकं,चिन्ह चांगली नाहित.बाईंची लक्षण चांगली नाहित.इथे रात्रीचे कोण कोण येतात,काय पुजा आणि बळी,काय जागर चालतो,काय सांगु मालक?तसल्या रात्री आपली खोलीबाहेर पडायची हिंमत होत नाही.सांगत येत नाही,जिन्यावर,बोळात नहितर कोपऱ्यात कोन आडवं येईल.सांभाळुन रहा मालक"
म्हादबाच कशाला मलाही समोर दिसत न्हवत का? डोकेदुखीच्या सबबीवर स्वतःला कोंडुन घेन,तिची ती रात्रीची नहाणी,तिच्य हातावर मेंदिने रंगवलेल्या खास आकृत्या,दारापाशीच जोपासलेल्या त्या वनस्पती.पण झोपेच सोंग घेतलेला कसा जागा होनार?मी दुर्लक्ष करत होतो कारन तिच्या तरुण शरीराने मला गुलाम बनवलं होत.
आधी आधी मुस्तफ़ा काहिच बोलत नसे...पण ज्या रात्री त्याला खंदकातुन ओढुन ओढुन काढला,त्याला वाचवला तेव्हापासुन त्याच वागण बदललं.मला तो "देशमुख एफ़ेंडी"या नावाने हाक मारायला लागला.एके दिवशी खार्टुमला असताना मला म्हनाला "देशमुख एफ़ेंडी तुम्ही माझे प्राण वाचवले अहेत.मला त्याची परतफ़ेड करायची आहे.आज रात्री एके ठिकाणी माझ्याबरोबर चलता?प्लिज मला संधी द्या"
मी त्याच्याबरोबर गेलो.स्थानिक लोकंची वस्ती लागली.तिथे विजच काय साधे दिवेही न्हवते.अरुंद बोळातुन मुस्तफ़ा मला एका लहानशा घरात घेऊन गेला.गालिच्यावर एक खुप वृद्ध बसलेला होता.पांढरेशुभ्र केस,असंख्य सुरकुत्यांची जाळी असलेला चेहरा.माझ्याकडे बोट करुन मुस्तफ़ाने त्या वृद्धाला काहितरी संगितल.वृद्धाचे अर्धवट मिटलेले डोळे उघडले ,अर्धवट पुटपुटत त्याने काळ फ़डक झटकल आणि फ़डक्याकडे बोट केल.
आधी फ़डक हलत होत मग स्थिर झाल मग पांढऱ्या काचेसारख शुभ्र झाल मग एक चौकोनी खिडकी.........पण ती खिडकी एका ओळखिच्या ठिकाणी उघडत होती.हिंदुस्थानतील माझ्या झोपण्याच्या खोलीत पण तिथे हे काय चालु होत? देवा !! देवा !!! हा साधा व्यभिचार न्हवता.मी तो माफ़ केला असता पण हे काहीतरी अघोरी..अमानवी..भयानक होत.ते शरीराच समर्पण आणि ते भयानक विधी...खिडकीवर पडदा सरकत होता पण मला ते दृश्य दिसत होत पुन्हा पुन्हा.....
मी मान खाली घातली.मुस्तफ़ा म्हणला ’चला देशमुख एफ़ेंडी"आम्ही बाहेर आलो.शरीर घामाने निथळल होत.आम्ही कॅंपवर येताना मुस्तफ़ा बोलत होता"एफ़ेंडी,वाईट वाटत,पण तुमच्या पत्निने वाईट संगत धरलेली आहे.तुम्ही कॅम्पवर सांगायचा तेव्हाच मला शंका आलेली,तुम्ही असेच परत गेलातर तुम्हाला धोका होण्याची शक्यता आहे आणि मी गप्प कसा राहु.मी त्या वृद्धाला सांगितल आणि त्याने ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं.असल्या गोष्टी पुर्वी होऊन गेलेल्या आहेत, काही आता होत आहेत"मुस्तफ़ाने एक जाड लिफ़ाफ़ा माझ्या हातात दिला’एफ़ेंडी देवाच्या क्रुपेने तुम्ही युद्धातुन वाचलात तर जाताना हे पाकिट फ़ोडुन वाचा,माझ्यावर विश्वास ठेवा"
खार्टुममंतर आमची युनिट बदलली.मला त्याच बरचं वाटल,मुस्तफ़ाला तोंड दाखवन अशक्य होत.माझ्या घरी माझ्या पुरुषत्वाची चाललेली विटंबना.मनात संताप जन्माला आला होता.सुड घेतल्याखेरीज मल जगन तरी कस शक्य होईल?
आम्ही हिंदुस्तानात पोहचताना डेकवर मी तो लिफ़ाफ़ा उघडुन पाहिला.त्यातिल मजकुराचा अर्थ असा होता.
"तुमच्या श्रद्धांप्रमाणे आतल्या कागदांची पुजा करा.वाटा वेगवेगळ्या असल्या तरी परिणाम तोच आहे.खालच्या कागदावर काही अक्षरं आहेत.ती त्याच क्रमाने म्हनायची आहेत.मधल्या लाल चौकोनात अत्तरासाठी वापरतात तशी एखादी काचेची कुपी ठेवा.काम झाल्यांच तुमच्या स्वतःच्याच लक्षात येइल.काचेच झाकण मेणाने सिल करा.किमान साठ वर्ष तरी तुम्हाला धोका नाही.तुमची बेगम वाईट मार्गावरुन चालली आहे.त्यंना परत फ़िरायची संधी नाही.निवड करायची वेळच आली तर त्या तुमची निवड करणार नाहित.तुमच बळी घ्यायलाही त्या मागेपुढे पहाणार नाहित.,साठ वर्षांची मर्यादा तुम्हाल पुरेशी आहे.देव तुमच भल करो"
मुंबईत पोहच्ल्यावर मी घरी तार केली नाही कि कळवल नही.दोनशे मैलांचा प्रवास करुन घराजवळ पोहचलो.दोन तिनदा कडी वाजवल्यावर कुणीतरी दरवाजा उघडला.तो म्हादबा न्हवता."कोण हव आहे?’मला त्याचा प्रश्न अजिबात आवडला नाही.पन नोकराशी वाद करायची माझी ईच्छा न्हवती."मी देशमुख य वाड्याचा मालक,जा आता म्हादबाला पाठवुन दे"तोच वरच्याखिडकीतुन ताराचा आवाज आला"अगबाई तुम्ही"
अस माझ युद्धावरुन घरी आगमन झाल.म्हादबाला पुर्वीच कामावरुन काढुन टाकलं होत.सगले लोक नविन होते.ताराही किती बदलेली होती.क्षणाक्षणाला हवीशी वाटत होती पण त्या अवलियाच्या कपड्यावर उमटलेली भयानक दृश्य डोळ्यासमोरुन गेली न्हवती.हाच गोरापन देह तिने कोणाकोणाच्या स्वाधिन केला होता.या कोमल हातांनी काय काय असुरी कृत्ये केली होती.या लालसर ओठांतुन काय काय अभद्र शब्दांचा उच्चार केला होता.मी तिच्या स्पर्शापासुनही दुर सरकत होतो ते तिच्या लक्षात आल्यावाचुन राहिले नाही.
एक दोन दिवस उलटल्यावर अपेक्षित प्रश्न तिने केला"माझ्यापासुन दुर दुर रहाता,माझी काही चुक झाली का? मी या प्रश्नाला काय उत्तर देणार? पण मनात एक कल्पना आली आणि मी तिच अंमलात आणायची ठरवली.त्यात आमच्या नेहमिच्या डॉक्टरांना सामिल करुन घेतले.मी गावी परत आल्यावर आठ दिवसांनी डॉक्टरांचे पत्र घरी आले.ते मी टेबलवरच राहु दिले.संध्याकाळी ती घाइने माझ्या खोलीत आली तिच्या हातात ते पत्र आणि रिपोर्ट होता."हे पाकिट तुझ्या हातात कस पडल तारा? मी नाटकीपनाने विचारल."म्हणुन तुम्ही माझ्यजवळ येत न्हवता?,एवढे मोठे लष्करी अधिकारी पण शेवटी पुरुष ते पुरुषच,उकिरडे धुंदाळायला जाणारच" तारा मला हिणवत होती जिने देवाचा मार्ग सोडला होता.,जिने शरीर सैतानाच्या स्वाधिन केल होत,जिने अघोरी बळि दिले होते.मी रागाने म्हटलो "तारा,तु आता जा,आपन आता वेगळ रहावं हेच चांगल,माझ्या हातुन चुक झाली हे मला मान्य अहे"
अस हे विभक्त जिवन सुरु झाल.म्हादबाचा खुप शोध केला पण पत्ता लागला नाही,त्याला काही दगाफ़टका झाल्याची भिती होती.मी माझ्यसाठी एक खास नोकर ठेवला.वाड्यातल्या मागच्य तिन खोल्यात माझा मुक्कम हलवला.तिच्या दृष्टीनेही हे सोयिस्करच होत.दिवसांतुन दोन वेळच्या जेवनावेळी आम्ही एकमेकांना भेटत होतो.खालच्या मजल्यावरच्या खोलित एक मोठा चौरंग किंवा वेदी सरखी रचना तयार होत होती हे मला दिसलं.
त्यांनी वेळ दिवस काहिच सुचवल न्हवत पन ज्या अमानवी शक्तीची तारा सेविका बनली होती ती शक्ती बांधण्याची प्रकिया असनार,असल्या शक्तिंचा वावर मध्यनरात्री,अमावस्या अशा अशुभ रात्री खास असणार त्याच वेळी त्यांना बांधायला हव,तीच रात्र मी निवडली.रात्री स्नान केल,पुजेच साहित्य तयार होत.सर्व दार बंद करुन घेतली.समया शिलगावल्या आणि पाटावर कागद ठेवले.मनातल्या मनात देवाच स्तवन करुन कागदांची पुज केली.सर्व शंका बाजुला केल्या आणि क्रमाने त्या कागदावरील शब्दांचे उच्चार करायला सुरवात केली.काय होणार याची मला काहिच कल्पना न्हवती.रानटी आदीवासीच्या हातात बंदुक देण्यासारखच हे होत.पण पुन्हा पुन्हा उच्चार करु लगलो तशी मल लय सापडु लागली.काहि क्षणात आसपास बदल झाला.खोलित काहितरी आलं.समयाच्या ज्योती फ़डफ़डु लागल्या.खोलित काहितरी होत,कोपऱ्याकोपऱ्यातुन छताला चिकटुन ते घिरट्या घालत होत.त्याच्या जवळीकिने केस उभे रहत होते.मग एकदम अशी जाणिव झाली कि आपल्या माथ्यावर एक भलमोठा धबधबा कोसळत आहे.काहितरी कोसळत होत पण ते माझ्या शरिरावर नाही.सर्वच घटना वर्णन करायला आपल्यापाशी शब्द नसतात,पण काहितरी त्या काचेच्या कुपित लोटल जात होत,कोसळत होत.मुस्तफ़ाने लिहिल होत काम झाल की समजेल..... तसच झालं.समोरच्या कुपित काहितरी आहे ,आपल्या चिमुकल्या लालभडक नख्यांच्या पंज्यांनी काच सारखी चाचपुन बघत होत.नशिब की प्रकाश स्पष्ट न्हवता.पण सुचक आकार रात्रीची झोप उडवायला पुरेसा होता.कारण मी हा आकार त्याच्या खऱ्या आक्राळविक्राळ रुपात ताराच्या विवस्त्र शरीरावर झेपावताना पाहिलेला होता.त्या खास मंत्राच्या प्रभावखाली ते त्या कुपित कोंडल गेल होत.कुपी फ़ार फ़ार घातकी होती ती सुरक्षित जागी लपवुन ठेवायला हवी.या कागदांचाही नाश करायला हवा,नको,नाश नको कारण हा मंत्र बंधनाचा आहे मुक्तिचा नाही.हे कागद गठ्ठ्याच्या शेवटी ठेवणार आहे.फ़क्त त्याच्यवर देवाच चित्र चिकटवणार आहे.तारा त्याला स्पर्शही करणार नाही."
तुम्ही वाचन थांबवुन हाताने कागद उलगडुन पाहता.खाली कागदावर गणपतीच चित्र चिकटवलेल आहे.ते चित्र तिथेच ठेवुन तुम्ही वाचनाकडे वळता.आधीच्या घटनेला दोन आठवडे होऊन गेले आहेत.
"तारा आज सकाळीच समोर आली तेव्ह विलक्षण अस्वस्थ दिसत होती.त्यांच काहितरी गणित चुकलेल आहे.अजुन ताराला माझा संशय आलेला नाही."
त्यानंतरचा कागद महिन्याच्या अंतराने लिहिलेला आहे.
"ज्या प्रसंगाला मी बिचकत होतो त्याला आज तोंड द्यावच लागलं.ताराला माझा संशय आलेला आहे.
जराशा हिशोबी नजरेनच तिने मला विचारलं "तुम्हाला हे केव्हा समजलं?"
"काय समजलं?"मी सोंग घेउन विचारल.
"आता लपवलपवीत काही अर्थ नाही.मी कालच डॉक्टरांना भेटले,जरा डोळ्यात पाणी आनल तर लगेच पाघळले,त्यांनी तुमच्याच अग्रहावरुन रिपोर्ट दिल्याच कबुल केल.म्हणजे तुम्हाला सगळ्याची कल्पना होती.तुम्हाला केव्हा अणि कस समजलं? मला त्याचीही पर्वा वाटली नसती पण तुम्ही काहितरी केल आहे.आता स्पष्टच सांगते मला या आयुष्यातील सुखं गमवायची नहित.मला वृद्ध,अपंग,जराजर्जर होऊन जगायच नाही.मग त्यासाठी निसर्गातील देवांचा त्याग करावा लागला तरी चालेल-ते मी केल आहे ! फ़ार पुर्वी केल आहे,खुप किंमत मोजली आहे आणि यश हाती आल असतान तुम्ही ते हिसकावुन घेतलतं.तुम्ही काय केलत?"
मि निर्विकारपणे तिच्याकडे पहात होतो.मी एका क्षणात तीचा गळा आवळुन ठार करु शकलो असतो पण ज्या वार्धक्याला ती एवढी भित होती तेच तिच्या माथी मरण हीच सर्वोत्तम शिक्षा होती.मी काहीही न बोलता खोलितुन निघुन गेलो.
"मला आता वाड्यात रहाणं अशक्य झाल आहे.दोन कारण आहेत.ताराचे उद्योग वाढतच चालले आहेत आणि मलही वैयक्तिक धोका संभवतो.मी कुपी व्यवस्थीत ठेवलेली आहे.कागदही कपाटात ठेवनार आहे.सर्व तयारी झाली की गुप्त रितिने वाड्यातुन निघुन जाणार आहे"
आणि मग एकदम शेवटचाच कागद आहे.
"शेवटी तिने मला फ़सवलचं. माझ्या विश्वासतल्या माणसांना फ़ितवुन त्यांच्याकरवी तिच्या मृत्युची बातमी माझ्यापर्यंत पोहचेल अशी व्यवस्था केली.मी त्यावर का विश्वास ठेवावा? वाड्यात पाऊल टाकताच माझ्यामागे दार बंद झालं.तेव्हा मला समजल की आपण फ़सलो आहोत.ताराने मला सांगितल आहे तिने वाड्यात खास वनस्पतींची लागवड केली आहे,त्यांच्यातले काही उन्मादक असतात,काही शरिराचे स्नायु पॅरॅलाइज करनारे असतात तर कही माणसांची ईच्छाशक्ती परतंत्र करणारे असतात."
"माझी खात्री आहे ते माझ्याकडुन सर्व वदवुन घेतील.ती कुपी त्यांच्या हातात पडणार आहे.एकच सुदैवाची गोष्ट आहे.मला त्याच्यातील काहि कळत नसल्यामुळे त्यावरील उपाय मी सांगु शकणार नाही.मी माझ्याकडुन शिकस्त केली आहे.शेवटी आपल्या हातात एवढच आहे.बाकी देवाच्या हाती."श्रींची ईच्छा.श्रींची ईच्छा.श्रींची ईच्छा."
तुम्ही शेवटचा कागद वाचुन खाली ठेवता.पुढे देशमुखांना काय अनुभव आले ते अज्ञात आहे.पण ते त्यानंतर फ़ार जगले नाहित हे सत्य आहे.आता तुम्हाला त्या ताराबाईंच्या समोर जायच आहे.आता तुम्हाला त्यांच नाव समजलेल आहे.नुसत नावच नाही,त्यांच्याविषयी सर्व काही समजलेल आहे.
क्रमश:..........

तुम्ही स्नान करता.नवे कपडे घालुन खाली येता.तुम्ही या वाड्यात आलेल्याला जेमतेम बारा तास झालेले अहेत पण तुमच्या आयुष्यात केवढा बदल झलेला आहे."एज ऑफ़ इनोसन्स"केव्हाच मागे राहिल आहे.
जिना उतरला की आसापास अंधार होतो.धैर्याला गळती लागायला कितिसा अवधी लागतो.या काळोखाला एक कहारी किनार आलेली आहे.अर्थात त्या ताराबाईंच तुमच्यापाशी काम आहे ते झाल्याखेरीज त्या इतर काही करणार नाहित.ताराबाईंची खोली उघडीच आहे.
"कोण ? उमाकांत का? ये आत." तो थकलेला आवाज येतो.
तुम्ही खोलित पाऊल टाकता.डावीकडची भिंतिवर देवांच्या तसबिरी लावलेल्या होत्या पण आता पुर्ण रिकामी आहे.तुमच्यावर प्रभाव पाडण्यापुरताच त्या देखाव्याचा उपयोग होता का? तुम्ही त्यांच्यासमोर जाऊन उभे रहाता.
वाचलेस का कागद उमाकांत?
"हो वाचले,तेच देवनागरीत उतरावयाचे आहेत का?"
"आता हे नाटक कशासाठी?मला त्या कागदातलं अक्षर आणि अक्षर माहित अहे.त्यांच्या स्वतःच्याच तोंडुन मी ते वदवुन घेतलं आहे."
"मग ते कागद?"
ते तुझ्यासाठी होते उमाकांत."
ताराबांईचा हात पुढे आला.हातात कपाटाची किल्लि होती.
"बाकीचे गठ्ठे आण उमाकांत"त्या म्हणाल्या.या साऱ्यात तुमचं काय प्रयोजन ? तुम्हाला कशाचाच उलगडा होत नाही.तुम्ही कपाटातुन दोन गठ्ठे काढुन घेता.गठ्ठे ताराबाईंच्याकडे करता.एखादी पेटती मशाल किंवा साप जवळ आल्यासारखी त्यांची प्रतिक्रिया होते.
"नाही,नाही"त्या मागे सरकत म्हणतात."तुच सोड ते कागद"
तुम्ही गठ्ठे उलगडता.
"शेवटी पहा,शेवटी पहा,एक फ़ोटो आहे"त्या म्हणतात.
तुम्हाला एक फ़ोटो दिसतो.सेपिया रंगातला एका जोडप्याचा फ़ोटो.
"निट पहा ! दिव्यापाशी जाऊन पहा"ताराबाई
तुम्ही दिव्यापाशी जाऊन फ़ोटो पहायला लागता,तुमचा हात थरथर कापु लागतो.फ़ोटोतला चेहरा तुमच्या परिचयाचा अहे.त्या झुपकेदार मिशा,ते तलवारीसारखं नाक,ते भुरे डोळे,त्या जाड भिवया.....फ़ोटोत ते तरुण दिसत होते...पण चुक होण्याची शक्यताच नाही.हे तर तुमचे आजोबा ! वडिलांच्या खोलित यांचा केवढा मोठा फ़ोटो लावलेला आहे.वडील सांगत,त्यांच्या वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षीच आजोबा घरातुन निघुन गेले.ते परत आलेच नाहीत.तुमची आजी जन्मभर नुसत्या आठवणी काढीत,शोक करतच राहिली.पोलिस ठाण्यावर तक्रार नोंदवली असेल पण पाठपुरावा करणारं कोण होत? फ़ोटोतिल व्यक्तिला कधी घनता आलीच नाही.
आणि तुम्हाला समजतं आजोबांचा शेवट इथे या वास्तुत झाला आहे.औषधी वनस्पतींच्या प्रभावाखाली त्यांची वाचा खोलली गेली होती आणि सर्व हकिकत बाहेर आल्यावर कोणत्या तरी विषारी अर्काचा वापर करुन त्यांच जिवन समाप्त केल गेल होत.तो मृत्यु तरी साधा होता क? की त्यांचे हालहाल झाले?
म्हणजे या प्रकरणात तुमचा इतका निकटचा संबंध आहे तर....हे कागद कधी तुमच्या हातात आले तर वाचता यावेत यासाठी आजोबांनी पुढच्या पिढ्यातं मोडीच लेखनवाचन चालु राहिल याची व्यवस्था करुन ठेवली होती.
"समजल का तुला कशासाठी आणला आहे ते? ताराबाई
तुमच्या मनात घालमेल चालली आहे.एक गोष्ट स्पष्ट आहे या सगळ्या अनर्थाच्या मुळाशी ही स्त्री आहे.अनैसर्गिक वासनांच्या आहारी अनेकांची आयुष्ये उधळुन लावणारी अवदसा.
"तु कागद वाचले आहेस ...तुला काही सांगायला नको..त्यांना कोणीतरी जबरदस्त मांत्रीक भेटला होता खास.ते साठ वर्ष म्हणत होते.प्रत्यक्षात ते बंधन सदुसष्ट वर्ष होतं.ते आज रात्री सुटणार आहेत उमाकांत...ते माझ्या हातातुन सुटले,त्यांनी दुसरा संसार थाटला.पण त्यांचा लपुनछपुन वाढलेला हा वंश मी छाटुन टाकणार आहे.त्यांच्या ऐवजी तुझा बळी जाणार आहे.या वाड्यातुन आता तुझी सुटका नाही.त्यांनी मला शारिरीक व्याधींची शिक्षा दिली..आता माझा धनी मुक्त झाला की हे सर्व बदलनार आहे.मला त्याने चिरतारुण्याचं वचन दिल आहे पण या गेलेल्या वर्षांचा मोबदला मी तुझ्या छळातुन वसुल करणार आहे उमाकांत" ताराबाई
तुमचा अजुन विश्वास बसत नाही.अजुन तुमच्या लक्षात येत नाही की ती जाहिरात फ़क्त तुमच्याच डोळ्यांसाठी होती.जस आजोबांच्या मित्रांना फ़सवण्यात आल.ती निशा,तो गडी सारी नजरबंदी होती.ही सर्व वास्तुच झपाटलेली आहे.झपाटणारांचा प्रमुख जरी बांधला गेला असेल तरी खालचे हस्तक आहेतच की.
तुमच्या मनात साहसी विचार जन्म घेत आहे.
"जा ! जा ! जा ! शुंभासारखा उभा राहु नकोस,शेवटचे काही तास तुझ्याकडे आहेत हवे तसे घालव,आम्हाला आता "त्यांच्या" आगमनाची तयारी करायला हवी,हे बघ" अंधारातुन एक कृश हात पुढे येतो.त्या हातात एक लहानशी काचेची कुपी आहे.हीच ती बंधनाची कुपी.
"आज रात्री बाराला ही कुपी उघडेल" ताराबाई म्हणत होत्या "इतकी वर्ष युक्त्या प्रयुक्त्यांनी हे शरीर कसबसं टिकवुन धरल आहे.आज रात्री त्या साऱ्याच चिज होणार आहे,मग तुझ्याकडे पाहु,जा आता"
तुम्ही सावकाश त्या खोलीतुन बाहेर पडता.
सुदैवाने तुम्ही आज या घरात चहाच काय पाण्याचा घोटही घेतलेला नाही.आज दिवसभर तुम्हाला उपवास पाळावा लागणार आहे.आता अकरा वाजले आहेत,अजुन तेरा तासांचा प्रश्न आहे.मग सर्व प्रश्न सुटलेले असतील किंवा कशालाच अर्थ उरलेला असनार नाही.
साडेअकराला दारावर थाप येते "तोच गड्याचा बेफ़िकिर आवाज "बाराला जेवणं आहेत"
जेवण? मृत्युच्या सिमेवर उभा असलेल्या जेवणखाण सुचणार आहे का? कशासाठी हे नाटक?समजा तुम्ही खाली गेलात,खरोखरच का ताटपाट मांडले असतील? आणि ती निशा(निशा म्हणजे रात्र) तुमच्या पंक्तीला येऊन बसणार आहे?कशासाठी ही अघोरी थट्टा?
तुम्ही मोरीतिल पाण्यातुन टॉवेल ओला करुन आणता,तो गणपतीच्या चित्रावर ठेवता,चारी बाजुंनी बोटांनी चेपता.चित्र ओलं झाल्यावर धारदार पात्याने चित्र अलगद वेगळं करता.तुमचीच कल्पना खरी अहे.तुमच्यासमोर तो कागद प्रत्यक्षच आहे.तुमच्या आजोबांना खार्टुमच्या त्या अरबी मांत्रीकाने बनवुन दिलेला ’तो कागद".ती अगम्य रेषांची अक्षरं,आणि मध्ये ती लाल चौकट.त्या भारलेल्या रेषात आणि त्या वर्णोच्चारात अजुन ती शक्ती आहे?
तुम्ही तो कागद झाकता,मग पलंगावर आडवे होता.शक्य तर झोप घेण्यासाठी.सर्व काही ठरवल्यावर मनाची घालमेल थांबलेली आहे.यशापयश तुमच्या हाती नाही.
डोळे उघडता तेव्हा पाच वाजलेले दिसतात.तहान भुक लागलेली असली तरी मनाला तजेला आहे..आयुष्याचा एकेक दिवस मागे जाता,तेव्हा तुम्हाला दिसतं आयुष्याने तुम्हाला खुप काही दिलेल आहे.
दहालाच तुम्ही उठता.अजुन दोन तास आहेत.टॉवेल घेउन मोरीत जाता,सचैल स्नान करता.
खोलित येउन दार आतुन बंद करुन घेता.
पुर्वेकडे तोंड करुन बसता,तुमच्याकडे काचेची कुपी नाही पण दाढीच्या ब्रशची डबी आहे,सिलबंद करायला मेण नाही पण पारदर्शक टेप आहे.पुजा करायला हळद कुंकु फ़ुल नाहित ,काहिही नाही पण फ़क्त प्रांजल श्रद्धाच तुम्हाला आधार देऊ शकते.
समोर गणेशाच चित्र आहे,त्याच्याशेजारी आजोबांचा फ़ोटो आहे.
तुम्ही मन शांत करता.
अकरा,सव्वा अकरा,पाऊणेबारा.
बाराला पाच कमी असताना खालच्या वाड्यातुन घुमण्यासारखा एक प्रचंड ध्वनी तुमच्या कानापर्यंत येतो.
धन्याच्या स्वागतासाठी इतके जण जमलेले आहेत?
आता तुम्ही लक्ष समोरच्या कागदांवर एकाग्र केलेल आहे.
बरोबर बारा वाजता प्रचंड स्फ़ोटाचा आवाज कानावर येतो.
ती काचेची कुपी फ़ुटलेली आहे.
त्यात जखडुन ठेवलेले इतक्या वर्षांनंतर मुक्त झालेल आहे.
जल्लोषाचा आवाज चढतचढत तुमच्या कानांपर्यंत येतो.
आणि मग शांत मनाने तुम्ही कागदावरील त्या विलक्षण शब्दांना उच्चारायला सुरवात करता.कठोर परिक्षेची ही घटीका आहे.
पण क्षण उलटत जातात तसे बाह्य व्यत्यय कमी होत जातात.त्या उच्चारातच आनंद आहे.त्यांना स्वतःचीच एक दिशा आहे.त्या पुनरुच्चाराने तुमच्या सर्व चित्तवृत्तींना गती आलेली आहे.तुमचं मन कोरं स्वच्छ झालेल आहे.एक शोषणक्षेत्र तुमच्या भोवती तयार झालेल आहे..आणि काहीतरी शोषलं जात आहे,खेचलं जात आहे..तो प्रवाह त्या लहानशा डबित कोसळत आहे....
तुम्ही वर्णोच्चार थांबवत नाही,प्रचंड ओझं आल्याची जाणिव होते..पण लागलीच जाते..तुम्हाल जाणवतं की "ती"क्रिया पुर्ण झालेली आहे.पठण न थांबवता तुम्ही डबीला चिकटपट्टी आवळता,हाताच्या स्पर्शाला डबी गरम लागते आहे..वजनही जड लागते आहे..लागणारच ! आता ती रिकामी नाही.
तुम्ही डबी परत खालच्या लाल चौकोणात ठेवता.
आता यापुढे येथे थांबण्यात अर्थ नाही.लवकर हलायला हवं.आवरुन ठेवलेल्या बॅगेत डबी सुरक्षित ठेवता. सावकाश दरवाजा उघडता.खाली अजुन गोंधळचा आवाज नाही(आजोबांच्य खेपेसही त्यांना ते लगोलग समजलं न्हवतं)कदाचीत सर्वजण एखाद्या उत्तेजक अंमली पदार्थाच्या सेवनाने गुंग होऊन पडलेले असतील.
तुम्ही सावकाश जिन्याने खाली येता.मनाशी देवाच नाव घेत समोरच दार उघडता.
चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेली बाग समोर पसरलेली आहे.
दाराबहेर पाऊल टाकण्याच्या क्षणी तुम्ही थबकता.एक बारीकशी हालचाल दिसते..ती पहा तिकडे..आता तिकडे..आता त्या पलिकडच्या झाडामागे..छे छे ! हे तुमची वाट मुळीच नाही.
सुटका इतकी साधीसोप्पी कशी असेल?
तुम्ही ताराबाईंच्या खोलिच्या दिशेने निघता.सर्वत्र दिवे लावलेले आहेत,कसल्यातरी उग्र वासाच्या अगरबत्त्या लावलेल्या आहेत.तुम्ही ज्या खोलित काल रात्री भोजन केलत तिच्या दाराशी थांबुन आत वळुन पहाता.आत ताट पाट भांडी काही नाही.काहितरी अडगळ रचुन ठेवलेली आहे.क्षणोक्षणी तुमची फ़सगत होत आलेली आहे.याच धुळित बसुन तुम्ही अन्न म्हणुन कशाचे तरी बकाणे भरत होतात.शेजारी निशाच बसलेली आहे हे समजुन तिच्याशी गप्पा मारत होतात.दारापाशी जमुन इथले लोक तुमच्यावर खदाखदा हसत असतील.या साऱ्यात तुमचा काय दोष आहे? दोन पिढ्यांमागचा सुड घेण्यासाठी तुमची ही फ़रफ़ट? खोलवर एक सात्विक संताप जन्माला येत आहे.तुम्ही एक साधारण असामी आहात-पण मतीशुन्य,बावळट,अर्धवट खासच नाहित.
ताराबाईंच्या खोलित येता.त्या काचेचा चक्काचुर झालेल्या वेदीजवळ निश्चल अवस्थेत आहेत.खोलित त्या एकट्याच आहेत,निदान तुम्हाला तरी दुसरं कोणी दिसत नाही.ताराबाई एक प्रकारच्या गुंगीत आहेत.स्वार्थापुढे या स्त्रीला इतर कोणाची पर्वा नाही.त्यांच्या बेभान अवस्थेचा फ़ायदा उठवुन तुम्ही वाड्यातुन निघुन जायला हवं.पण हे काय?
तुमची पावलं तर दारातुन आत जात आहेत.तुमच शरीरच तुमची आज्ञा पळत नाही.पावलापावलाने तुम्ही वेदीजवळ जात आहात आणि तुमच्या प्रत्येक पावलाबरोबर जमिनिला एवढा हादरा कसा बसतो आहे?
तुम्ही ताराबाईंच्या शरीराजवळ पोहचता,तुमच्या मागे असलेल्या दिव्याने तुमची सावली त्यांच्यावर पडते...पण....पण हे काय? ही अक्राळविक्राळ,विचित्र,थरथरती सावली तुमची असणे शक्य नाही.तुमच्यामागे कोणी उभे आहे का हे पहाण्यासाठी मान वळवायचा प्रयत्न करता पण सर्व स्नायु नियंत्रणापलिकडे गेलेले आहेत.
"तारा....!" तुम्ही बोलता,पण हा घनगंभिर,अक्षरागणिक साऱ्या वास्तुत कंपन उठवणारा सागरगर्जनेसारखा आवाज तुमचा नाही.
"तारा...उठ,भानावर ये"ती आज्ञा परत होते.
ताराबाईंच वृद्ध शरीर थरथर कापायला लागलं आहे.त्या तुमच्याकडे पहातात आणि मग "नाही ! नाही ! किंचाळत सरपटत कोपऱ्यात जाऊन बसतात.तुम्ही पायाने वेदी उलथुन टाकता..पुढे जाउन ताराबाई समोर उभे रहाता.
"तारा ! तु पुन्हा तो आवाहनाचा प्रमाद केलास" त्या आवाजाच्या आघाताखाली वाड्याच्या भिंती हादरतात " एक प्रमाद क्षम्य आहे ; दुसरा नाही ! तुला माहित होत- दुसरा क्षम्य नाही !"
त्या दिनवाणेपणे हात पसरुन बोलण्याची खटपट करतात पण शब्दच फ़ुटत नाहित.
"चुप ! "पुन्हा ती गर्जना येते.ताराबाई चुरमुडुन पडतात.
"त्याच्या संगासाठी तु उत्सुक झालेली होतीस ना?,मग होऊन जाउदे तुझी ईच्छा पुर्ण"तोच खडा आवाज
तुम्ही बॅग वर करता पण आता ती कापसासारखी हलकी लागते आहे.बॅग उघडुन डबी बाहेर काढता,झाकण उघडुन डबी पुढे करता.
"ज त्याच्याकडे ! तो आत आहे"
ताराबाई पायाशी लोळण घेतात.नाक घासतात.
"नको ! नको,नका हो"
ताराबाईंची किंचाळी अर्धवट असतानाच मध्येच तोडली जाते.
तुम्ही डबी बंद करता,बॅग बंद करता,बॅग अजुनही कापसासारखी हलकी आहे.
खोलिबाहेरील जिन्याने खाली येता.प्रत्येक पावागणिक जिना करकरत आहे,गचके खात आहे.
बाहेर येता,दोन्ही अंगाना वनस्पती आहेत.तुमची नजर त्यावरुन फ़िरताच त्यांची पानं सुकतात,कोळपतात,आगित होरपळल्यासारखी वठुन जातात.झाडांच्या मागे खेटुन अनेक आकार उभे असतात.ते तुमच्यावर झेपावत येतात पण आंचेवर धरलेल्या कागदासारखे ते होरपळतात,जळतात,कोळसा होऊन खाली पडतात.तुम्ही सरळ मोठ्या दाराकडे जाता.अनेक अडसर लावुन साखळदंडांनी दरवाजा बंद केलेला आहे पण दरवाज्यावर तुमची लाथ पडताच त्या प्रचंड दरवाजाच्या चिरफ़ळ्या उडतात.फ़ुट फ़ुट जाडीचे अडसर काडीसारखे मोडतात,साखळ्या तटातटा तुटतात.तुम्ही वाड्यातुन बाहेर पंचविस तिस पाऊले येता,मागे वळुन पहाता.
तुमची नजर वाड्यावर एकाग्र होते.
लोहाराने भाता मारला की भट्टी फ़ुलायला लागते तसा सर्व वाडा पायापासुन वरपर्यंत लालभडक रंगात प्रकाशायला लागतो,त्या पवित्र अग्नीज्वालाने लपेटलेला वाडा धडधडत कोसळायला लागतो.
तुमच्या हातातील बॅग एकदम मणभर वजनाची झालेली आहे.
तुमच्या समोर कोणीतरी उभं आहे.
"तु आता जा" एक हलकी पण प्रभावी आज्ञा येते.आवाज दशदिशांतुन आल्यासारखा वाटतो.तुम्ही गांगरुन पहात असतानाच काहीतरी तुमच्यासमोरुन सपाट्याने नाहिसं होतं.
आता तुम्हाला वाड्याची धग जाणवायला लागते.
तुम्ही कशीतरी बॅग सावरत पळायला सुरवात करता.
वास्तविक चोविस तासात तुमच्या शरीरात अन्नपाण्याचा कणही नाही पण त्या शक्तीचा काहिनाकाही अंश तुमच्या शरीरात मागे आहे.तुम्हाला तहान भुक तर नाहिच पण थकवाही नाही.
पहाता पहाता तुम्ही तिवाठ्यावरच्या एस.टी. स्टॅन्डवर पोहचता.तुम्ही येताच रातराणीचे दिवे दुरवर दिसायला लागतात.घर्र्र्र्र्र आवाज करत गाडी थांबते.कोठुन आली,कोठे चालली याची चौकशीही न करता तुम्ही आत चढता.मिळेल त्या सिटवर बसता.तिकिट व मोड खिशात घालता,आणि मान मागे टेकवुन झोपी जाता.
हलत्या गाडीत अनेक स्वप्नं पडतात.त्यांच्यात भुत-वर्तमान-भविष्य यांची विलक्षण भेसळ झालेली आहे.पण तुमची मनोमन एक खात्री आहे.,या क्षणभराच्या परिसस्पर्शाने तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे.भावी सुखी आयुष्याकडे तुम्ही उमेदिने चालला आहात,तुम्हाला एवढं पुरेसं आहे.
समाप्त ................ (नारायण धारप)

No comments:
Post a Comment