नायक / नायिका :: प्रियांका , नम्रता ,पूजा ,सरोज आणि पुष्पा
नमस्कार मित्रहो मी मीरा या पेजची वाचिका, तुम्हा सर्वासाठी एक कथा घेऊन आले आहे... कथेचे नाव आहे "jack and jill " "हेय स्वीटी आय लव यु " अशी रिंगटोन वाजली, आणि हे ऐकून, पियू धावतच आतमध्ये आली , "अजून नाही का चेंज केलीस ती रिंगटोन " असे,पियूची आई तिच्यावर

ओरडली, पण हे नेहमीचच असल्याने पियुने त्याकडे दुर्लक्ष केले. तसेही ती नम्रीच्या मेसेजची वाट पाहत होती, तिने मेसेज ओपन केला "हेय, कम डाऊन " असा मेसेज नम्रताचा होता, नम्रता तिची बेस्टफ्रेंड पियूने मेसेज वाचला आणि ती बालकनीकडे धावली. आणि खाली नम्रता तिची वाट पाहत उभी होती. पियुने वरून हाक
दिली, "ए नम्री, वर ये ना " नम्रता तिलाच खाली बोलावत होती. "ठीक आहे" म्हणत पियुने आपल्या हातातील सेन्डविच संपवले आणि राहिलेली कॉफीदेखील संपवली, आणि घाई गडबडीत आपली बैग भरू लागली , इकडे हे सर्व पाहून तिची आई तिला ओरडू लागली, "इतकी का घाई , पियू ? नम्रता आली का ?" "हो हो, ती
खाली उभी आहे , आम्ही निघणार आता " असे म्हणत आपली बॅंग पाठीला लावून "आई , पप्पांना सांग, मी पुष्पाकडे गेले म्हणून " असे बोलून दरवाज्याजवळील हिल्स पायात चढवून पियू , टक टक करत पायऱ्या उतरू लागली, तोच आईने हाक दिली , "अग पियू , टिफिन ? " पियुने देखील " घेतला ग आई ,टिफिन " म्हणत
पायऱ्या उतरू लागली, आणि नम्रीजवळ पोहोचली आणि इकडून दोघी निघणारच कि बालकनीत आईने येऊन दोघींना बाय केले आणि "सांभाळून जा ग , पोहोचल्यावर कॉल करा " अश्या सूचना दिल्या , मग "ठीक आहे" असे म्हणत , बाय करीत दोघी चलू लागल्या , मग पियू म्हणाली, "अग नम्री बघ, त्या दोघी निघाल्या का ?
" नम्रताने मग पूजाला कॉल केला, तर नम्रता काही बोलायच्या आतच तिकडून "हेलो नम्री..., अग मी निघालेय सरोजकडे तिला घेऊन पोह्चतेच बघ " असे पूजा बोलू लागली ,"ठीक आहे मी आणि पियू पण पोहचतोच आता , बाय " म्हणत तिने कॉल कट केला , मग दोघीही बोलत बोलत चालू लागल्या, रस्त्यावर फारशी
गर्दी नव्हती , जवळपास सकाळचे १० वाजत आले असतील. दोघीना ही चन्नमा सर्कल या ठिकाणजवळ पोहोचायचे होते, तेथेच(पियू ) प्रियांका , नम्रता(नम्री ) ,पूजा (पूजी )आणि सरोज(सरी ) या चौघींचे भेटायचे ठरले होते. त्या चौघीहि त्यांची मैत्रीण पुष्पा(पुषी ) हिचे नवीन घर पाहण्यासाठी खानापूर येथे जाणार होते. असेच नम्रता
आणि पियू दोघी तेथे त्या ठिकाणी पोहोचल्या पण पूजा आणि सरोजचा काही पत्ताच नव्हता , त्यातच आज मंगळवार असल्याने त्या दोघींनी जवळच असलेल्या मंदिरात जाण्याचे ठरवले पियू आणि नम्रता मंदिरामध्ये गेल्या , देवांचे दर्शन घेऊन त्या थोडावेळ तेथेच बसून राहिल्या , आणि सरी व पूजाची वाट पाहू लागल्या तोच पियुला
काहीतरी आठवले व तिने आपल्या बैगेतुन एक पेपरचा मोठा तुकडा बाहेर काढला व त्यात थोडासा मंदिरातील अंगारा भरून घेतला व परत होता तेथेच बैगेत ठेऊन दिला., इकडे नम्रता पूजाला कॉल लाउ लागली आणि तिने पियूकडे फोन दिला , पियू बोलू लागली "हेलो पूजी कुठे आहेत बे तुम्ही ",, "यायलोय बे , वेट न "
असे म्हणताच पियू म्हणाली
"ओके आम्ही इथेच मंदिरामध्ये आहोत, वाट पाहतोय ,लवकर या ,,चल बाय " पियुने हि कॉल कट केला व त्या दोघींची वाट पाहू लागल्या तश्या पियू आणि नम्री फर्स्ट standard पासून एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स होत्या पियू तशी खूप हुशार, पहिलीपासून रैंक होल्डर, पहिली ते सातवी त्या एकाच स्कूलमध्ये होत्या,

त्यानंतर हायस्कूलमध्ये देखील एकाच वर्गात, मग कॉलेजदेखिल सारखे निवडून त्यांनी 'बी एससी' कम्प्लीट केली होती... पियुने पुढे "बी -एड" केले व ती एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची , सिस्टीमिटीकनेस हेच सूत्र तिला १००% लागू होणारे होते, प्रत्येक गोष्टीत सिस्टीमिटीकपणा तिला हवाच असायचा,
वाचनाची खूप आवड आणि खूप बोलकी,,, कोणामध्ये हि पटकन मिक्स न होणारी, आणि झालीच तर खूप बडबड करणारी, देवाला मनापासून मानणारी, एखाद्या सेनटेन्स मधील IMP शब्द देखील पट्टीने रेखांकित करणारी अशी होती आमची पियू (प्रियांका ) आता या उन्हाळी तिला एप्रिल-मेची सुट्टी भेटली होती आणि
कामाच्या दरम्यान तिला फ्रेंड्सना भेटण्यात आल नव्हत , मग त्याही भेटणार होत्या. नम्री म्हणजे नम्रतादेखील खूप हुशार " बी एस सी " करून एम.सी.ए करत होती . आज्ञाधारक आणि प्रामाणिक अशी नम्रता आताच थोड्या दिवसापूर्वी तिने final परीक्षा दिल्या होत्या आणि निकालाची वाट पाहत होती ...... नम्रीने पियुला
विचारले "अग तो अंगारा ?", तेवढ्यात पियू म्हणाली 'काही नाही, असाच घेतला ' तेव्हा पियूचा सेल वाजला आणि बंद झाला म्हणजे अर्थातच मिस्ड कॉल तो होता सरीचा.. त्यां दोघी मंदिराच्या बाहेर रस्त्यापलीकडे होत्या ते नम्रताने पाहिले आणि दोघीहि मंदिरा बाहेर पडल्या अन सरी व पूजा जवळ पोहोचल्या तोच उशिरा झाला
म्हणून सरी व पूजा सॉरी सॉरी करीत होत्या, "आता असुदेत" असे म्हणत चौघी हि ऑटो करून बसस्टॉपला पोहोचल्या आणि खानापूरच्या बसची वाट पाहू लागल्या, चौघीहि एकमेकींच्या ड्रेसवर कमेंट्स करीत होत्या. कधी नाही ते सरीने आज जीन्स आणि टॉप घातला होता.. आणि एक रेड स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळला होता.
पूजी तर नॉर्मल पंजाबी ड्रेसमध्येच अवतरली होती पियुच तर नेहमीच आपले हटके काही तरी असायचं तिने लॉंग स्कर्ट आणि टॉप घातला होता आणि त्यावरच मैचिंग स्टोल गळ्यात टाकला होता , नम्रता आमची खूपच फँनसी पोरगी ब्लैक जीन्स आणि व्हाईट टॉप आणि डोळ्यावर तो गोगल्स चढवून उभी होती.. खूप दिवसांनी
भेटलेल्या मैत्रिणींच्या गप्पा चालूच होत्या कि, आमची खानापुरची बस आली त्या सगळ्या बसमध्ये पटापट चढल्या अन त्यांना सीट्स हि मिळाल्या त्यांना पोहोचायला जवळपास तीन वाजले नम्रीने तिकिट्स काढले. नम्रता व पियू एका सीट्स वर तर त्यांच्या मागे पूजा आणि सरी दोघी बसल्या होत्या नम्रता खिडकीजवळ बसली होती
आणि मागे पूजा व सरी बोलण्यात गुंग होऊन गेल्या होत्या म्हणजे बडबडीत
त्या दोघी बोलण्यात गुंग होत्याच कि तोच नम्रता त्यांना ओरडू लागली आणि शांत बसण्यास सांगू लागली "किती ती बडबड ?" कारण तिला झोप येत होती, म्हणून सरी आणि पूजी दोघी चुपचाप बसल्या, सरी तशी साधी आणि सिम्पल मुलगी होती, पण खूप हुशार १० वी ला पहिली आली होती आणि बी.एस.सी

नंतर एका कॉलेज मध्ये लैब असिस्टंट म्हणून काम करायची, पण खूप झोपाळू होती ,तशी आमची पूजा , उसका तो क्या कहना? , घरी खूप श्रीमंती त्यामुळे खानापिना और सोना बस एवढच काय ते पूजीचे काम होते, आता राहिली ती पुष्पा जिच्याकडे आम्ही सर्व सुट्टीला आणि तिचे नवीन घर पहायला जात होतो तिला आपण
खानापूरला पोहोचल्यावरच भेटूयात .... गाडी चलत होती दोन्ही बाजूला घनदाट जंगल , गार वाऱ्याची झुळके असा तो खानापूरच रस्ता होता या चौघी झोपी गेल्या आणि अचानक धक्का लागल्याने यांची झोपमोड झाली तोच नम्री पाहू लागली काय झाले ते ? रस्त्याच्या मधोमध एक झाड पडले असल्याने, बस, मध्येच रस्त्यात थांबली
होती आता काही लोक उतरून ते झाड बाजूला करण्यात आले .... यातच एक तास गेला... आणि बस परत धावू लागली.... यांना खानापूरच्या अलीकडे पेट्रोलपंपाजवळ उतरायचे होते आणि त्यांनी तसे कंडक्टरला सांगितले होते, सरी तेव्हा ,कोठे पेट्रोल पंप दिसतो का? ते पाहत होती. आणि हो तेवढ्यात तिला एक पेट्रोल पंप
दिसला देखील आणि बस थांबली कंडक्टरने सांगितले" आला तुमचा स्टॉप "आणि त्या चौघी त्यातून उतरल्या व जाऊ लागल्या, भूक लागली होती, मग त्यांनी तिकडे एका झाडाखाली बसून पियुच्या टिफिन मधून अर्धे अर्धे पराठे खाल्ले... इकडे पियू पुष्पीला कॉल लावून पाहत होती खरी पण तिला काही कॉलच लागेना झाला
होता. डायरेक्ट कॉल एंड असे म्हणायचे .. मग पियुने आपल्या बैगेतील पेपर काढला त्यात पुष्पीने मुख्य रस्त्या पासून आपल्या घर पर्यंतचे रफ स्केच काढून तिला दिले होते. त्यानुसारच त्यांनी जाण्याचे ठरवले. जवळपास ५ वाजत आले असतील , तिथेच बाजूला असलेल्या जंगलातील पायवाटेने त्यांना जायचे होते हातात तो पेपर
घेऊन नम्री आणि पूजी पुढे तर पियू आणि सरी त्यांच्या मागे... सायंकाळीचे ५ :३० झाले होते.. तरीही त्या जंगलात खूप अंधार अंधार असा वाटत होता, खूप घनदाट जंगल , उंच उंच झाडे, तर मध्येच होणारी पानाची सळसळ आणि सूर्यप्रकाश त्याच झाडाच्या पानातून येत होता त्यात देवा रे या पोरींच्या पायात हिल्स , म्हणजे
त्या जंगलातून चालणे इतके कठीण होते तरी त्या चलत होत्या वर त्यात आमची सरी थोडी भित्रीच होती मग ती इकडे तिकडे पाहत सावधगिरीने चलत होती, मध्येच सर्वत्र उमटलेली भयान शांतता आणि त्यात यांच्या चपलांचा आवाज एवढेच काय ते ऐकू यायचे , काही केल्या पुष्पाला कॉल लागेनासा झाला . १ तास त्या चौघी
चलत होत्या तेव्हा कुठे जंगलातून चालल्यावर एक वर्तुळाकार पटांगण येणार होते आणि त्याच्याच मधोमध एक भले मोठे विशाल असे चिंचेचे झाड होते .. ते दिसले जरा धीर आला रस्ता बरोबर आहे ते ,,,... मग त्या चलत होत्या इतक्यात पियुला काहीतरी भासले , असे कि जणू कोणीतरी मागून तिचा स्टोल ओढला ती पडणार
तेवढ्यात सरीने तिला सावरले,, पियुने मागे वळून पाहिले तोच स्टोल एका झुडूपात अडकले होते ती ते काढण्याचा प्रयत्न करू लागली... तितक्यात तेथेच बाजूला उभा असलेल्या सरोजला झाडाखाली एक धड दिसले हलकेसे हलताना तिने तिकडे जाऊन पाहिले तर ती आकृती मानवी वाटू लागली जशी कि लहान मुले आहेत
तिथे सरी थोडीशी घाबरत तेथे गेली तर तिने पाहिले तेथे दोन बाहुले होते सरीची नजर त्या बाहुल्यांच्या डोळ्यात पडली जणू ते बाहुले कुठल्याहि क्षणी जिवंत होतील असेच वाटत होते ... सरोज त्यांच्या डोळ्यातच पाहू लागली..... आणि काय झाले ? अचानक ती जणू संमोहितच झाली आणि सरीने ते दोन्ही बाहुले उचलले व
यांच्याकडे घेऊन आली . पियुने सरीच्या हातात ते पाहिले.... तेवढ्यात सरीने सांगितले कि "अस अस ते झाडाजवळ मला मिळाले" ते पाहून पियू खूप रागवली आणि तिने ते फेकून देण्यास सांगितले पण सरी थोडी खेळकर होती तिने निदान बाहुली तरी असावी म्हणून तिने पियूच्या नकळत पटकन बाहुली आपल्या बैगेत ठेवली
आणि तो बाहुला तेथेच टाकून दिला पण काही केल्या इकडे पियुचा स्टोल निघेचना झाला मग तिने सरीला हेल्प करण्यास सांगितले सरीने काहीच विचार न करता जोरात ते ओढलं आणि ....."टर्र्र्रर्र्रर्र्र र्र्र्र "असा आवाज करीत तो स्टोल फाटून पियूच्या हातात आला त्याचा एक तुकडा त्या झाडातच अडकला पियू ते पाहताच तिला
ओरडली आता असुदेत असे म्हणत चल म्हणून दोघी हि निघाल्या तोच नम्री आणि पूजी एका झाडा खाली त्यांची वाट पाहत बसल्या होत्या पियुने सरोजला विचारले "त्या बाहुल्या ?? ", "दिल्या फेकून" असे म्हणत सरी चालू लागली परत त्या दोघी मिळून चालायला लागल्या .. कि अचानक सरोजला आपल्या बैगमध्ये काहीतरी
हालचाल जाणवू लागली .. सरोज ते पाहणार तितक्यातच तेथे सोसाट्याचा वारा वाहू लागला, झाडे हलु लागली ... जणू ते जंगल जोजोरात .. भयंकर रीतीने त्यांच्यावर हसत आहे ...असे वाटू लागले होते .. त्यातच तो रफ स्केच पेपर नम्रताच्या हातून सुटला व उडला ... इकडे तो कागद एका काटेरी झुडूपात अडकून फाटलाच होता
....मग आता .... झाले कल्याण ..आता मात्र सर्वजनी घाबरल्या पूजी मात्र आपली चिप्स खाण्यात गुंग , वरून सरी रडूच लागली होती खरतर हे सरीने आणलेल्या बाहुल्यामुले घडतय या पासून तर ते अनभिद्न्यच होते .. पुढे तर संकटाच्या असंख्य पायऱ्या त्यांना चढायच्या होत्या आणि नियती मात्र त्यांच्यावर हसतच होती तिच्या
मनात वेगळच काहीतरी होत..
काळाकुट अंधार पडला होता, सर्वत्र गार गार वारा आणि मध्येच त्या घनदाट जंगलात कुत्र्यांचा आवाज येऊ लागला होता. आता मात्र चौघी घाबरल्या होत्या , आता तर पुष्पीच्या घरी जाणारया मार्गाचा पेपर देखील नव्हता, नम्रीने व पियूने पुढाकार घेतला व त्या दोघी चालू लागल्या , त्यांच्या मागून सरी व पूजी होत्या, तितक्यातच सरीच्या बाजूने चलणाऱ्या पुजीला..."खी,,खी..खीssss " असा आवाज ऐकू आला कि, पूजा थरकलीच तिने इकडे तिकडे मागे पाहिले..आणि पुन्हा तसाच आवाज..आणि यावेळी हा आवाज सरीच्या बैगेतून आला होता.... पूजाने एवढे लक्ष न देता तसीच पुढे चालू लागली , तोच त्या चौघींना एक मोठ गोलाकार पटांगण दिसले .... त्याच्या बाजूने गोलाकार पटांगणात घरे होती. घरे ? कि दुकाने ? जणू एखाद्या जत्रेतील बंद पडलेली दुकाने होती ती, आणि त्यांच्या मधोमध एक चिंचेचे झाड होते एकदम त्या स्केच प्रमाणेच पुन्हा एकदा ते झाड आले होते ....असे कस काय ? पण यावेळी दुकाने ? त्या भांबावून गेल्या होत्या.... इथ पर्यंत आलोय खर आपण , पण इथून पुढील रस्ता त्यांना माहित नव्हता, त्या पटांगणाच्या शेवटच्या टोकास त्यांना एक मंदिर दिसले, अगदीच जुने पडके होते, त्याच्या शेजारी एक छोटीशी जुनी झोपडी होती....आणि तेथून एक दिव्याचा प्रकाश हलकासा पडत होता. ते पाहून त्यांना जरा बरा वाटले..... त्यानंतर पटांगणातून त्या झोपडीकडे गेल्या.... नम्रीने आत पहिले.... तेथे एक आजीबाई देवाऱ्यासमोर हात जोडून बसल्या होत्या, त्यांच्या देवाऱ्यात गणेशाची एक मूर्ती व एक शिवलिंग होते, जणू ते मातीचे होते. हाताने बनवलेली, शिवलिंगावर एक पांढरे मोगऱ्याचे फुल, तर गणपतीच्या माथी एक लालभडक असे जास्वंदीचे फुल ते सर्व नम्री व पूजी पाहतच होत्या..... तोच पियुने आत डोकावले... ती हि हे सर्व पाहून थक्क झाली....आणि पियू तिकडे आकर्षित झाली... असे कि थेट त्या आजीच्या शेजारी जाऊन हात जोडून बसली.... तिकडे तेथे अगदी प्रसन्न वातावरण होते. देवाच्या आवडीनिवडी जपल्या जात होत्या तेथे पूजी पियुला हाक मारणारच कि तेवढ्यात त्या आजी बोलल्या "या पोरीनो, आत या " अशी हाक दिली... त्या सर्वजनी दचकल्या "घाबरू नका, आत या " असे म्हणत त्यांनी डोळे उघडले .. मग पियुने हि डोळे उघडून त्याना सांगितले.... कि आम्ही मैत्रिणीच्या घरी आलो आहोत... आणि रस्ता चुकलो आहोत यावर त्या आजी म्हणाल्या "खूप धाडसी आहात तुम्ही " मग नम्रीने त्यांना विचारले "पीटर्स बंगलो कुठे आहे आजी ?" आम्हाला तिथे जायचे आहे " त्या आजी उतरल्या "या बाजूला मंदिराच्या मागे एक चर्च आहे , आणि त्याच्याच पलीकडे आहे तो बंगला " पण तुम्ही तिघी सावकाश जा ... " काय तिघी त्या आजी अस का म्हणाल्या ? हे ऐकून पूजी म्हणाली "तिघी नाही चौघी आम्ही चार जनी आहोत " असे म्हणत तिने बाहेरून सरीला आत बोलावले.. सरोज आत आली सरोजला पाहताच क्षणी आजीच्या चेहऱ्यावरील रंग उडाला तिचे डोळे लाल झाले आजीने ताडकन उठून सरीला विचारले " तू काय आणलंयस तुझ्या सोबत ? दुष्ट शक्तीला सोबत घेऊन फिरतेयस तू पोरे , मूर्ख मुलगी आहेस " असे आजी म्हणत होती तिचा तो अवतार पाहून सर्व जनी घाबरल्या , पण ती आजी त्यांना तिकडून जाऊ देत नव्हती, तिने पियुचा एक हात पकडला होता , आणि ती तिला ओढू लागली होती.. पण पियूचा दुसरा हात पूजी आणि नम्री ओढू लागल्या त्यांना आता वाटू लागले ती आजीबाई वेडी आहे या झटापटीत पियूच्या या हातातील बांगड्या फुटल्या व त्या आजीला लागल्या आजीने पियुचा हात तात्काळ सोडून दिला .. आजी ओरडू लागली "थांबा पोरीनो तिकडे धोका आहे खूप मोठा धोका आहे तुमच्या सोबत " पण या पोरी पळत सुटल्या ते थेट त्या मंदिराजवळ जाऊन थांबल्या सरी ती तर रडूच लागली, पुजीने तिला धीर दिला , पियुला हाताला थोडे लागले होते. पण ती आजीच्या बोलण्याचा विचार करीत होती "धोका आहे आमच्या सोबत अखेर त्या आजीबाई काय म्हणत होत्या नेमक्या ??" तोच त्यांनी मंदिराच्या बाजूने चर्चच्या दिशेने जाणारी वाट शोधली व त्या बाजूने जाऊ लागल्या पुढे त्यांना सुंदरसे चर्च दिसले नम्री आणि पियुला आत जायचे होते पण सरीची अवस्था लक्षात घेऊन आधी पीटर्स बंगलो शोधणे गरजेचे होते. तोच त्याचे सार्थक झाले व मागेच त्यांना एक बंगला दिसला आणि तोच होता " पीटर्स बंगलो " पण यांना खात्री नव्हती सो पियुने पुष्पाला कॉल लावला आणि तेव्हा "थेंक गॉड कॉल लागला " आणि तिकडे पुष्पीने कॉल उचलला "हेलो अग पियू कुठे आहे तुम्ही ?" तेव्हड्यात पियू "आग पुष्पे तुझ्या बंगल्याबाहेर तू बाहेर ये पाहू " आणि हो हो म्हणत पुष्पी बाहेर पडली आणि यांना दरवाज्यात येऊन कोणीतरी उभे असलेले दिसले पुष्पीने बाहेर येताच तेथे लाईट उजळवली पुष्पीला दारात पाहून पियू ओरडतच "पुष्पीSSSSS असे ओरडत तिच्या दिशेने धावली ", आणि तिला जाऊन मिठी मारली , आणि इकडे या सर्वजनी बंगला पाहू लागल्या खूपच आलिशान सर्व बाजूने सुंदरता कम्पाउंड आलिशान असा होता तो आणि मधोमध छोटेशे गेट प्रवेशद्वार सर्व काही जणू गोष्टींप्रमाणे होते गेट समोरच एक पूल जात होता आणि त्या खाली एक नदीशी वाहत होती. "वॉव हे तर खूप सुंदर आहे " असे म्हणत त्या गेटजवळ आल्या अन बंगल्यात जाऊ लागल्या आम्हाला तेथे पुष्पीचे डैड देखिल भेटले ते काही कामानिमित्त बाहेर गावी जानार होते. मग ते यांना भेटन निघालेही होते....आता मैत्रिणी आल्यामुळे पुष्पा खूप खुश झाली होती. पियूच्या खांद्यावर हात टाकून ती तिला आत नेऊ लागली.. या देखील मागून आत आल्या सार्वजनीनि आपापले समान काढून बाजूला ठेवले सर्व जनी खूप थकल्या होत्या आणि त्या फ्रेश होण्यासाठी गेल्या पियू आणि पुष्पा मात्र बाहेर गप्पा मारत बसल्या होत्या तोच सरीच्या बैगेतून कसला तरी आवाज येऊ लागला होता असे पियुला वाटले पण तिने फार लक्ष न देता त्यांच्या गप्पा रंगवल्या तोवर या तिघी हि फ्रेश होऊन आल्या पुष्पा त्यांच्या साठी काही खायला आणायला गेली होती.. ८ : ३० वाजले होते पियुला देखील फ्रेश व्हायचे होते पण तिला वाशरूम माहित नव्हते म्हणून ती नम्रीला घेऊन फ्रेश व्हायला गेली पियूपण फ्रेश होऊन आली आणि पुष्पा देखील खायला घेऊन आली . ती म्हणाली "चला जेऊन घेऊयात तुम्ही दमला असाल मग आराम करूयात " पूजी खायला नको म्हणाली तस हि चिप्स व पराठ्याने तिचे पोट भरले होते सर्वांनी थोड थोड जेऊन घेतले आणि सर्व कामे उरकली आतल्या हॉलमध्ये झोपायचे ठरवून सर्व अंथरून आणि पांघरून तेथे आणायचे ठरवले बाहेर हॉलमध्ये पूजी नम्री आणि सरी टि वी पाहत होत्या पुष्पा आणि पियू तेथेच आपला चष्मा चढवत वाचत बसली होती ..... पुस्तक "एक होता कार्व्हर" ... पण काही केल्या तिचे लक्ष लागत नव्हते , काही न काही धाकधूक तिच्या मनात चालली होतीच इथे पुष्पी अभ्यासात गुंग होती..ती एम.एस.सी इन maths करीत होती तिचे एक्झाम असल्याने तिला अभ्यास करणे हे तर अनिवार्य होते... म्हणून तिला त्रास देणे योग्य नसल्याने पियू पुन्हा आपले डोके कार्व्हर मध्ये खुपसून बसली इकडे नम्री आणि सरी टीव्ही पाहत होत्या आणि पूजी तर टीव्ही पाहता पाहता झोपी गेली आणि सरोज ती तर एकदम गप्पच एक हि शब्द तिच्या तोंडून बाहेर येत नव्हता इतका वेळ झाला होता तरी म्हणून नम्रीला बोर होऊ लागले म्हणून ती सरीला म्हणाली "आग सरी जा न पियू आणि पुष्पा काय करीत आहेत ते पहा निदान पियूला तरी बोलाव हि बघ पूजी ढाराढूर झोपलीय जा ना " मग सरोज ओके म्हणत आत जाऊ लागली तेव्हा तिचे लक्ष आपल्या बैगकडे गेले. आणि तिला त्या बाहुलीची आठवण झाली म्हणून ती बैग जवळ गेली आणि ती बैगची झिप ऑपन करणार तितक्यातच इकडून तिला नम्रीचा आवाज आला " ए सरी कुठे आहेस ग ?"
तेव्हढ्यात सरीने ती झिप अर्धवट उघडून तशीच ती पियुला बोलवायला गेली इकडे काही केल्या यायला तयार होईना .. इकडे "अग नम्री पियू येईना झालीय " असे म्हणून तिने पुन्हा टीव्ही पाहण्यास सुरवात केली. तिला देखील झोप येत होती पण नम्रीने तिला टीव्ही पाहण्याचा आग्रह केला इकडे पियुला अस्वस्थ वाटू लागले म्हणून तिने कॉफी बनवायचे ठरवले तशी मग ती उठून पुष्पा जवळ गेली आणि तिने तिला देखील कॉफी हवी आहे का ते विचारले तिने "हो चालेल" असे उत्तर दिले मग ती बाहेर आली व तिने घड्याळ पाहिले तर पावणे बारा वाजत आले होते तिने नम्री आणि सरीला देखील कॉफी बद्दल विचारले सरी नको म्हणाली आणि नाम्री हवी म्हणाली तेव्हा पियू किचन मध्ये गेली दुध व कॉफी पाउडर तिला मिळाली पण साखरच सापडत नव्हती तिने दुध गरम करायला ठेवले... आणि पुष्पी ला हाक आरु लागली "ए पुष्पी , साखर कुठे ठेवली आहे ग ? " आणि त्याच वेळी किचनची खिडकी उघडी असल्याने त्यातून थंड हवेची एक सनसनित झुळूक आतमध्ये आली त्याला पियू थोडी घाबरली तिला तेथेच साखरेचा डब्बा दिसला आणि तिने तेथे जाऊन तो उचलला व पटकन खिडकी लावून , कॉफी बनवून ती बाहेर आली ,, आता कुणाला काय सांगावे कि नको तेच तिला समजेना तरी तिने तीन कप कॉफी आणि एक रिकामा मग आणला होता मग तिने थ्री बाय ४ कप कॉफी केली व चौघीत हि दिली सरीने देखील ती घेतली तशी पियू पुष्पीला म्हणाली "अग हि घे कॉफी आणि थोडा ब्रेक घे " अस म्हणत पियू परत आपल्या जागेवर येऊन बसली आणि कॉफी पीत पीत बुक वाचू लागली बुक तर ती वाचत होती पण मनात विचार भलतेच चालू होते "तो साखरेचा डब्बा कसा अचानक आला आणि हे ते खूप काही तिच्या मनात घुसमटत होत .... तेवढ्यात खाडकन कसला तरी आवाज आला आणि तिथेच तिची विचार मालिका तुटली पुष्पी देखील तेवढ्या वेळात अभ्यास करीत झोपी गेली होती ... आणि तो आलेला आवाज तो कशाचा होता ... पियुने थोडीशी संदेहता घेतली तर तो आवाज किचन मधूनच आला होता , ..आणि सरी पण तेवढ्यात घाबरली होती पियू सरीजवळ आली तेव्हा "सरी तू तो आवाज ऐकला का ग ?" पियू म्हणाली "हो ऐकलाय मी किचनमधून आला आहे बहुतेक " चल पाहायचं का ?" दोघी हि एकमेकीना हातात हात धरून आत गेल्या तर ती खिडकी ती उघडली होती ते पाहून पियू आणि सरीच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला पियू तशीच खिडकीकडे न पाहता तेथे गेली आणि तिने खिडकी लावून घेतली आत मध्ये मध्यम प्रकाश होता त्या दोघी बाहेर येणार इतक्यातच सरीला तिच्या एकांगी दृष्टीने किचनच्या कोपऱ्यात काही तरी हालचाल दिसली पण तिने पूर्ण पणे पाहण्याच्या आधीच पियू तिला बाहेर घेऊन आली आणि नम्री व पूजाला उठवून आत झोपायला बोलावले पण त्या काही केल्या उठण्यास तयार होईना झाल्या म्हणून "त्या इथेच झोपू देत ,आपण आत जाऊन झोपुयात "असे सरी म्हणाली व त्या आत पुष्पा कडे गेल्या आत मध्ये पुष्पीला पांघरून घालून तिच्याच बाजूस झोपी गेल्या मध्ये सरी झोपली होती पण कॉफी पिल्यामुळे तिची झोप उडाली होती थोड्या वेळात पियुला झोप लागली आणि सरी मात्र जागीच तिचा घसा अचानक कोरडा पडला, पाणी प्यावे म्हणून तिने पुष्पीजवळ ची पाण्याची बोटल घेतली तर त्यात पाणीच नव्हते म्हणून पाणी आणण्यासाठी सरी किचनच्या दिशेने निघाली .. तिने पाणी घेतले व मघाशी झालेल्या हालचालीच्या कोपऱ्यावर देखील नजर टाकली पण तस काही तिला आढळले नाही ती तशीच बाहेर आली आणि बाहेर पडताच तिची नजर आपली बैगेवर पडली ती अर्धवट उघडी होती .. तिचे लक्ष बैगेवर होतेच कि तेवढ्यात अचानक एका झटक्यातच त्यातून एक हात बाहेर आला .. तो ..... तो हात त्या बाहुलीचा होता.. त्याच हाताने ती बैगेची झिप ओपन करण्यास सुरुवात केली आणि तस करीत करीत त्या हाताने पूर्ण बैग उघडली सरीच्या सबंध अंगावर काटा उभा राहिले तिचे डोळे मोठे ते मोठेच राहिले हाता पायाचे पाणी होऊ लागले.. कोणी कानसुलात मारल्या सारखे तिचे कान सुन्न पडू लागले होते...तिच्या हातातील पाण्याची बॉटल खाली पडली ती दबकत दबकत मागे जाऊ लागली .. आणि मागे जाऊन अचानकच ती भिंतीला धडकली , ती भिंतीस खीळलीच जणू तिकडे सर्वत्र अंधार होता .. त्या उघडलेल्या झिप मधून बाहुलीचे तोंड वर येऊ लागले.. आणि बाहेर येताच तिने सरीकडे वळून पाहिले ..सरी आपले तोंड दाबून आवाज होऊ नये म्हणून भिंतीस लागून उभी होती... ती बाहुली सरीकडे पाहून हसत होती.. तिचे ते लाल लाल डोळे ..... उघड झाप करीत तिने आपला एक पाय बैगेच्या बाहेर काढला ,..... आणि तसेच दुसरा पाय काढीत ती आता पूर्णपणे बाहेर आली होती आणि ती एका जागी थांबूनच आपली मान गरगर फिरवून इकडे तिकडे पाहू लागली होती... तिने ते आपले डोळे वर केले होते तशीच ती मान फिरवत वरती पाहत होती.सरी जणू मूर्ती सारखे तेथे दाबून बसली होती ती भिंतीपासून हलण्याचे नाव घेत नव्हती ... कि अचानक त्या बाहुलीचे मान फिरवणे थांबले आणि हे सर्व सरी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत होती.. तिच्या अंगातून घामाच्या धारा सुटल्या होत्या तोंडावर घट्ट दाबून ठेवलेल्या हाताने तिला ओरडता देखील येत नव्हते
तेवढ्यात ती बाहुली काहीतरी बडबडू लागली तिचा आवाज ऐकायला सुंदर होता पण तितकाच भीतीदायक "jack , अरे jack कुठे आहेस तू ?, अरे हे आपलेच घर आहे न jack " सरोज ला हे सर्व स्पष्ट पणे ऐकू आले .. तेवढ्यात हा धक्का सावरतो कि नाही तिला अजून एक धक्का बसला यावेळी अजून एक आवाज तिला ऐकू आला तो मात्र किचनमधून ..... "jill ...., jill अग मी इथेच आहे " हे ऐकताच आता मात्र सरीला वाटू लागले आपला अंतिम क्षण जवळ आला आहे तिला लगेच लक्षात आले कि जंगलात या बाहुलीसोबत अजून एक बाहुला होता आणि तोच तेथे किचनमध्ये त्या कोपरयात होता.. आता मात्र सरीला कळून चुकले कि ते दोघ जंगलातील बाहुला आणि बाहुले jack आणि jill आहेत.

आणि तेवढ्यात सरीच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला सरीने वळून पाहिले तर पियू होती .. तिने सरोज ला भानावर आणले , सरी घामाने पूर्ण भिजली होती.. तिच्या तोंडून एक हि शब्द बाहेर पडत नव्हता तिची बोलतीच जणू बंद पडली होती, तिने समोर बोट केले पियू त्या दिशेने पाहू लागली तर , तर तिथे कोणीच नव्हते , मग पियुने सरीला समजावले आणि नेमके काय झाले ते विचारू लागली .. पण सरोजच्या तोंडून काहीच निघेना फक्त एकच शब्द तिच्या तोंडून आला... "पाणी" पियू तिला पाणी आणण्यासाठी किचन मध्ये जाऊ लागली तर सरी तिला किचनमध्ये जाउच देईना तरीदेखील पियुने न भिता किचनमध्ये जाऊन तिच्या साठी पाणी आणले ... तेव्हा कुठे ती थोडी सावरली आणि काही न बोलता गुपचूप जाऊन आत झोपली पियूला काहीच समजेना नेमके तिला काय झाले होते ? तरी ती हि जाऊन झोपली ती झोपते न झोपते तेवढ्यात इकडे पुजिला जाग आली,,, तिला किचनमधून काहीतरी आवाज ऐकू येत होता, तिने नम्रीला उठवले आणि आपल्या सोबत गुपचूप येण्यास सांगितले तीच शक्यतो अस म्हणन होत कि आत चोर घुसले आहेत , ती नम्रीला घेऊन किचनमध्ये जाऊ लागली .. तेव्हा त्यांना अचानक काहीतरी गाणेसारखे ऐकु येऊ लागले... आणि त्याचे बोल होते "jack nd jill went up the hill" आणि आवाज मात्र भयानक होता हि तर कविता होती .. त्यांनी आत पाहिले तर तेथे दोन बाहुला बाहुली हि पोएम म्हणत हातात हात घेऊन नाचत होते .. आता हे पाहून नम्री आणि पूजी चांगलीच घाबरल्या jack ची पाठ त्यांच्या कडे होती तर jill ला त्या स्पष्ट पाने पाहू शकत होत्या तेवढ्यात त्या बाहुल्याने एका क्षणात आपली मान फिरवून त्या दोघींकडे वळून पाहिले आणि म्हणाला ."कोण आहे तिकडे हा? हिहिहि ... " ते पाहताच क्षणी दोघेही बाहुला बाहुली जोरजोरात त्यांना पाहून हसू लागले जस कोणी लहान मुलगाच बोलतोय त्याच्या तोंडून पण तो भयानक आवाज होता हे पाहताच पूजी जोरात ओरडत पळाली , आणि पाठोपाठ नम्रीदेखील त्या दोघी थेट हॉलमध्ये आल्या आणि नम्रीने हॉलची कडी लाऊन घेतली.. या सर्वां गोंधळात सगळ्या जनी जाग्या झाल्या.... मश्ग घडलेला प्रकार नम्रीने व पुजीने सर्वाना सांगितला हे ऐकताच सरीनेदेखील सर्व काही सांगितले कि ती बाहुली तिनेच इथे आणली होती , आता पियू सरीवर खूपच रागावली , आता तिच्या लक्षात आले कि ती आजी सरीला असे का म्हणून बोलत होती.. एवढ्यात पहाट होत आली होती पुष्पा ला तर काहीच समजत नव्हते , आता सर्व घटनांची जुळवा जुळव करता सर्वाना समजले कि हे घर त्या बाहुला बाहुलींचे आहे jack आणि jill चे पण त्यांना हे मात्र समजेना jack तो बाहुला इथे कसा आला jill तर सरीच्या बैगेतून आली होती तेवढ्यात हॉलच्या दरवाज्यावर थाप पडली... "धाप्प धाप्प धप्प धाप्प " असा चार वेळा आवाज आला त्या आवाजाने मात्र या पाच जणींच्या ह्रदयात धडकीच भरली सर्वजणी खूप घाबरल्या होत्या तेवढ्यात बाहेरून बोलण्याचा आवाज आला ,, बाहेर ते दोघे बाहुला बाहुली jack आणि jill बोलत होते.... jill त्याला म्हणाली " jack आपण एक काम करू , या पाच जणींना आपण मारून टाकू ,,मग घरात फक्त आपलेच राज्य मग मज्जाच किंनय " परत jill म्हणाली "नको नको चार च जणींना मारू ती सरोज आहे ना तिला सोडू हा मी तिच्या शरीरात जाईल मग नंतर " त्यावर jack उत्तरला "हो jill तू जस म्हणशील तसच होईल " परत ती jil म्हणाली "अखेरीस तिनेच तर मला इथे आणले आहे न ..दादा .. ही ही हि हि हि हिहि " त्यावर jill म्हणाली तू कसा आलास इथे पर्यंत त्यावर jack म्हणाला आत मध्ये हि सर्व जन ऐकू लागले "अग ती अति शहाणी नाही का पियू तिचा तो कपडा होता ना झुडूपात अडकलेला मी त्याच्याच वासाने इथवर आलोय तुझ्यापर्यंत ह ह ह " "हम्म हम्म तूच तर शोभतोस माझा भाऊ " इकडे आत सर्व जनी पियुकडे आणि एकमेकीकडे पाहू लागल्या पियू आपल्या डोक्यास हात लावूनच बसली..आणि दोघे परत " jack nd jill went up the hill" हीच पोएम गाऊ लागले त्या प्रत्येक ओळीत एक एक जबरदस्त भीती आणि थरार पणा होता आणि तो त्यांच्या क्रूर भयंकर आवाजाने भरला जात होता.. थोडा वेळ झाला आणि सर्व शांत झाले त्यांचा आवाज बंद झाला होता... आणि आतमध्ये तर पुष्पीतर थंड पडलेली होती...सर्वाना कळून चुकले हे पीटर्स बंगलो त्या बाहुला बाहुलीचे आहे jack पीटर आणि jill पीटर यांचे आहे आणि ते बहिण भाऊ आहेत आता मात्र सरी खूप रडू लागली त्यामुळे तिचे कोंटेक्ट लेन्स देखील निघाले तरी सर्वांनी तिला शांत केले आणि पियू बोलू लागली "पाहिलेस न ,आता तू, ते आमच्या जीवावर उठले आहेत ते अश्या अनोळखी ठिकाणी कधी अनोळखी वस्तूला हात लावू नये आणि तू सरी तरी मी सांगत होते कि नको घेऊ ते बाहुला बाहुली आणि तू ती बाहुली पाठीवर घेऊन फिरत होतीस .. " पियूचे बोलणे ऐकून सरीला अपराधी वाटू लागले तेव्हा पुष्पा सांगू लागली "या बंगल्याचे आधीचे मालक आता फोरेनला राहतात आता काय करायचे आपण " नम्री मध्येच बोलली "अग पियू ती आजीबाई" पियूदेखील तिचे वाक्य वाढवत म्हणाली "हो तीच आजीबाई, आपल्याला काही ती मदत करेल काही करून तिला बोलावले पाहिजे " त्यावर पूजी म्हणाली "अग हो पण तिथपर्यंत जायचे कसे आपण ? आणि हे काम करणार तरी कोण ?" त्यावर सरी म्हणाली "तुम्ही सर्व माझ्यामुळे या संकटात अडकला आहात मीच जाईल तेथे " त्यावर नम्री म्हणाली नाही नको मी आणि पियू जाऊन येते तेथे तुम्ही इथेच थांबा " पियूच्या देखील मनात हेच होते....तेवढ्यात पियुला आठवला तो गणपती मंदिरातील अंगारा ... तिच्या बैगेत होता आणि ती सुदैवाने आतच होती आणि तिने पटकन बैगमधून ती पुडी बाहेर काढली आणि तो अंगारा सर्वांना लावला आणि आपण देखील लाऊन घेतला आणि त्या अंगार्याच्या छोट्या पुड्या सर्वजणीच्या हातात दिल्या पुष्पा सार काही समजून गेली आता पूजी आणि सरीचे रक्षण तिला करायचे होते आणि पियुने "चल बे नम्री " अस म्हणत दार उघडला .. पुढे पियू मागे नम्री तिने आतून परत दरवाजा लाऊन घ्यायला तत्यांना सांगितला .. पुष्पा दार लावायला तयारच होईना पियू तिला जोरात ओरडू लागली "पुष्पा प्लीज दार लाऊन घे बे " तेव्हा नम्रीने दार बाहेरून लाऊन घेतले... आता या दोघी हॉलबाहेर आल्या होत्या आणि सावकाश पावलांनी जात होत्या
कि तेव्हढ्यात त्याना आवाज आला "jack nd jill went up the hill to fetch a pail of w..a..t..e..r " हे ऐकून त्या घाबरल्या आणि मुख्य दाराच्या दिशेने धाऊ लागल्या तेवढ्यात नम्रीचा पाय मागून कोणी तरी ओढत होत त्यांनी मागे पाहिले पण कोणीच नव्हते पण तिकडेच ती jill होती काही केल्या नम्रीला ती पुढे जाऊ देत नव्हती इकडे पियुचा हात डोरच्या latch पर्यत पोहोचला होता...पण दार उघडतच नव्हते jack तिथेच शेजारी उभा होता तेवढ्यात नम्रीच्या हातून ती अंगारा असलेली पुडी खाली पडली आणि इतका जोरात वाऱ्याचा झुळूक आला कि तिच्या कपाळावरील अंगारा देखील नाहीसा झाला.. पण पियू नम्रीचा हात घट्ट पकडून होती व ती आपली सर्व ताकत लाऊन दार उघडण्याचा प्रयत्न करीत होती... तोच दरवाजा उघडला , पण इथे नम्रीचा पाय,,, jill ने धरला होता.. पियू दाराबाहेर आली आणि तिने आपली पुडी ती नम्रीच्या हाती दिली आणि तोच jill ने तिचा पाय सोडला पण नम्री लंगडत येऊ लागली तरीही पियुने आधार देत तिला कसेबसे झोपडीत आणले.. आजीबाई जवळ पोहोचल्या होत्या त्या दोघी आत गेल्या आणि त्यांनी आजीनं घडलेली सर्व हकीकत सांगितली आजीच्या चेहऱ्यावरील भाव दर्शवत होते कि आjillा या बद्दल थोडा फार अंदाज होताच आजीने देवाला नमस्कार केला आणि नम्रीच्या जखमी पायास मलम पट्टी केली आणि बोलू लागली "माझ्या बाळांनु , लेकरानु भिऊ नकाशी त्यो हाय तुमच्या पाठीशी पण मी यात तुमची साथ नाही देऊ शकत या सगळ्यांना तुम्हालाच सामोरे जाव लागल " हे ऐकताच त्यांना वाटले आपली हि शेवटची आशा देखील संपली आणि त्या दोघी धाय मोकलून रडू लागल्या पियू म्हणाली "आजी काही केल्या आम्हाला वाचवा प्लीज आजी काहीतरी उपाय असेल न या सर्वावर " त्यावर आजी म्हणाली हो आहे जेव्हा एक रस्ता बंद पडलेला असतो तेव्हा तेथेच देव दुसरा रस्ता पण उघडा करून ठेवतो.. आहे एक आशा आहे ." त्यावर नम्री बोलली काय आहे आजी लवकर सांगा ?? तेव्हा आजी सांगू लागल्या teva ajji sangu laglya, त्या बंगल्यात पोहोचल्यामुळे त्या बाहुला बाहुलीची ताकत वाढली आहे...ते बंगल्या बाहेर काहीच नाही करू शकणार त्या बंगल्याच्या शेजारी ते चर्च आहे न तिकडे आत जाऊन तेथील भिंतीवर एक मंत्र आहे तो मंत्र तुम्ही पाच जणींनी पाच वेळा म्हणा आणि तो हि बंगल्यात जाउनच " आणि आजीनी त्यांना एक पात्र दिले एक सुंदर फुलाच्या आकाराचे ते देत आजी पुढे म्हणाली "हे पात्र तुम्हा पाच जनीच्या मधोमध ठेवून तुम्ही बाजूने एकमेकीचे हात धरून बसा आणि पूर्ण श्रद्धेने ते मंत्र म्हणा " आणि त्याच वेळी त्या पात्रात "आब -ए जमजम म्हणजे पवित्रजल जमा होत जाईल तेही थेंबानुसार च जमा होईल आणि ते पवीत्र जल तुम्ही त्या नाराधमांवर शिंपडाल तेव्हा नरकात जातील ते नरकात.... अंत होईल त्या बाहुल्यांचा आजी पूर्ण आवेशात बोलत होती त्या दोघी तेथून निघाल्या व घराजवळ आल्या पियू ने ते पात्र नम्रीच्या हाती दिले आणि तिला तेथेच थांबवून तिने एकटीने घरात जाण्याचे ठरवले कारण घरातून पुष्पा सरी आणि पूजी ला बाहेर आणायचे होते... आणि चर्चमध्ये त्यांना जायचे होते,, पण नम्री तिला एकटीला आत सोडेना तरी त्यांच्याजवळ एकच अंगाराची पुडी होती,,, म्हणून नाईलाजाने नम्रीला बाहेर थामाबवेच लागले पियू निघाली आत , तोपर्यंत नम्री इकडे चर्च मध्ये गेली आणि तो मंत्र शोधू लागली इकडे आत घरात खूप विचित्र प्रकार चालू होता .. घराच्या आत पियुने पाउल टाकताच क्षणी विजांचा कडकडाट सुरु झाला आणि ढग गरजू लागले आणि सुसाट्याचा वारा सुटला आणि जोराचा पाउस सुरु झाला आणि अख्या घरात सर्वत्र पाणीच पाणी पियू आत येऊन हॉलमध्ये असलेल्या सरी आणि पूजिला हाक मारू लागली त्या तिघी आतमध्ये गपचूप बसून होत्या पाण्यामुळे त्यांच्या तिघींच्या कपाळावरील अंगारा पुसला गेला होता आणि त्या पुड्या देखील, सरीने धैर्याने दार उघडले समोर पियुला पाहून तिला खूप ख़ुशी झाली पण ती नम्री बद्दल विचारू लागली , पियू म्हणाली "नम्री ठीक आहे " आणि पियुने त्या तिघी जणांना बाहेर येण्यास सांगितले त्या तिघी हि एकमेकींच हात धरून बाहेर आल्या.. आणि इतक्यात jack आणि jill त्यांच्या मुख्य भयंकर एक क्रूर रुपात आले होते.... ती दोन छोटी मुले लहान एक मुलगा ८ वर्षाचा आणि एक मुलगी ती ६ वर्षाची पण इतक्या भयंकर रुपात कि त्यांच्या कडे पाहवले जात नव्हते त्या मुलाच्या डोक्यातून आलेले रक्त ते त्याच्या चेहऱ्यावर चिकटले होते डोळे कि जणू त्यात काळ्या बुभळचे नाव देखील नव्हते रक्ताळलेले डोळे लालबुंद केस पूर्ण चेहऱ्यावर जमा झाले होते आणि रक्तामुळे चिकटले गेले होते... फाटलेले ओठ आणि त्यातच ते वेडे वाकडे हसण्याचा प्रयत्न करीत होते.... तिच्या शेजारी jack एका फाटलेल्या युनिफॉर्ममध्ये दोन छोटी मुले पण भयानक रुपात विचित्र हसत """jack and jill went up the hill to fetch a pail of water" म्हणत रडत हस्त ओरडत होते .. तेवढ्यात परत विजांचा कडकडात मात्र यावेळी अतोनात अंगारा असलेल्या पुड्या देखील नष्ट झाल्या होत्या आणि काही क्षणात ते दोघे फैनवर बसून हसत काय होते ? jack सरोज ला नको मारायचं आपण आधी न दीड शहाणी पियू आहे न तिलाच मार तेव्हा पियुने अत्यंत चपळाईने पूजी आणि सरी ला बाहेर ढकलले आणि पुष्पास घेऊन बाहेर आली आणि शेवटची उरलेली पुडी पियुने जोरात jill च्या अंगावर फेकून दिली आणि jill ला जोराचा धक्का बसला व ती जाऊन भिंतीस आदळली सर्वजणी घराबाहेर पडल्या आणि चर्च मध्ये गेल्या तेथेच नम्री होती ती आणि बाकी सर्वाना समजल्यास त्या देखील भिंतीवरील मंत्र शोधू लागल्या ..

त्या मात्र शोधत होत्या पण, तेथे एकही भिंतीवर एकही मंत्र नव्हता, आता मात्र त्या पूर्ण खचल्या, पियुने त्या देवासमोर हात जोडले, आणि आपल्या स्कूलमधील प्रार्थना तिने म्हणली "पवित्र आत्मा ,ओह पवित्र आत्मा , मुझे लेजा तू येशू के चरणो मे, पवित्र आत्मा " असे उद्गार तिच्या तोंडून निघताच तेथे एक व्यक्ती आत आली , सर्वांनी मागे पाहिले तर, त्या दिव्य व्यक्तीने एक मंत्र पुटपुटला , आणि समोरच्या भिंतीवर आपोआप तो एक मंत्र उमटला गेला , तो कोणत्या भाषेत होता माहित नाही, पण तो त्या पाच जणींना वाचता येत होता आणि तो मंत्र पूर्ण स्पष्ट तेथे उमटताच, सर्वांनी आजीने सांगितल्याप्रमाणे रिंगण केले, मध्ये ते पात्र ठेवले आणि सर्वांनी डोळे मिटले , तो मंत्र पाच ओळींचा होता , आधी पियू, मग सरी ,मग नम्रता , मग पुष्पी नंतर शेवटी पूजी असे करून पाच वेळा मंत्र म्हणायचा होता , आधी पियुने सुरुवात केली सर्वाना क्रमाने ऐकवला सर्वांनी मंत्र म्हणून पुरा केला, तेवढ्यात त्या पात्रात एक थेंब जमा झाला असे क्रमा क्रमाने सर्वांनी मंत्र म्हणल्यानंतर त्यात ४ थेंब जमा झाले पण पुष्पीच्या मंत्र म्हणायच्या वेळी मात्र तो मंत्र परत भिंतीवरून गायब होत जाऊ लागला. तरीही पुष्पीने मंत्र पटापट म्हणून पूर्ण केला पण पाचव्यांदा जेव्हा मंत्र म्हणायला तिने सुरुवात केली तेव्हा जोराचा वर सुटला होता आणि भिंतीवर मंत्र नव्हता तरी हि पूजीने आपले डोळे मिटले व पटापट मंत्र म्हणून मोकळी झाली. आता त्या पात्रात पवित्र जल निर्माण झाले होते. पियुने ते पवित्र जलपात्र उचलून नम्रीच्या हातात दिले आता सर्वांनी त्या व्यक्ती कडे पाहिले ते त्या चर्चमधील पास्टर होते. पुष्पा त्यांना ओळखत होती. ती काही बोलणार इतक्यात तेच बोलू लागले "मला माहित आहे सर्व , तुम्ही या संकटांना सामोर जाणार हे मला माहित होत ", आणि त्यानि jack व jill बद्दल सांगण्यात सुरुवात केली "हे दोघे पीटर्स कुटुंबातील गोंडस मुले होती त्यांच्या नावामुळे ते दोघे नेहमी jack and jill हि कविता नेहमी म्हणायचे अगदी सुखी राहायचे त्या बंगलो मध्ये पण एक दिवस अचानक " ते शाळेतून घरी परतलेच नाहीत त्याच दिवशी त्या पटांगणात जत्रा भरली होती खूप खाऊ आणि खेळण्यांची दुकाने होती ते दोघे ते पाहून जत्रेत गेले , असेच फिरता फिरता jack व jill जत्रेत खूपच आत गेले खूप लोक आणि अत्यंत गर्दी होती आणि तश्यातच ते दोघे फिरत होते आणि श्रीमंत वाटत होते अश्याच या गोंडस मुलांवर एका दुष्ट माणसाची नजर पडली त्याने jack व jill ला पकडले व डांबून ठेवले, तो बाहुल्यांचा खेळ करणारा जत्रेतील माणूस होता. दोन्ही मुल पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली तर त्याने jillला जोरात ढकलले ती पडली तेव्हा तिच्या नाकावर जोरदार मार लागला तिच्या नाका तोंडातून रक्त वाहू लागले, jackला हे पाहवले नाही त्याने त्या दुष्ट माणसाला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मोठा दगड उचलून त्या गोंडस मुलाच्या डोक्यात घातला तेव्हा jack तेथेच संपला आणि jack व jill तेथेच मरण पावले पुढे त्या मानसला पकडून त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली आपल्या मुलांच्या जाण्याच्या दुखात पीटर्स कुटुंब हे घर सोडून फोरेनला निघून गेले .. पण jack व jill त्यांचे आत्मे मात्र त्या माणसाजवळ असलेल्या बाहुल्यातच अडकून राहिले पण कालांतराने त्या बाहुल्या जंगलात टाकून देण्यात आल्या " हे ऐकून सर्व जन थक्क झाले त्यांना वाईट वाटू लागले "पण आता ती मुले , खूप क्रूर आणि राक्षसी झाले आहेत , त्यांचा खात्मा करणे अत्यंत गरजेचे आहे " असे म्हणून ते थांबले , परत बोलू लागले "चला ते पवित्र जल घ्या आणि मुक्ती मिळवून द्या त्या मुलांना " असे बोलून त तेथून निघून गेले , या पाचहि जनी आता त्या बंगल्याच्या दिशेने निघाल्या, सर्वांनी एकमेकींचे हात धरले , आता त्यांना हे पवित्र पाणी jack आणि jill च्या अंगावर शिंपडायाचे होते कि बस मग झाले काम, पण तेच खूप कठीण काम होते , त्या घाबरत घाबरत आत गेल्या , घरात सर्व काही नॉर्मल होत ,सर्व वस्तू जागच्या जागी होत्या , पाणी नाही कि काही नाही , आता त्या दोघांना jack आणि jill ला शोधायचे होते . पियू आणि सरीखाली थांबल्या , नम्रता आणि पुष्पा वारी जाऊन शोधू लागल्या नम्रीने पवित्र जल पूजाकडे दिले, पूजा खालीच थांबली .. आणि सरीने jill ला हाक मारली " ए jill कुठे आहेस तू मी आलेय, मी, सरोज " हे ऐकताच आम्हाला jack पायऱ्यांच्या सर्वात वरच्या टोकास उभा दिसला आणि jill त्याच्या मागे उभी होती आणि ते दोघे हि आपल्या मूळ रुपात होते आणि दोन गोंडस ती मुले रडत होती ,त्यांना पाहून मात्र सरीच्या डोळ्यात पाणी आले पण वरून नम्री आपली धीट ती सरीला ओरडली सरे त्यांच्या रुपांवर जाऊ नकोस ते क्रूर आहेत चल मार त्यांना " हे ऐकताच ते दोन्ही बाहुले jack आणि jill मूळ रुपात त्या दुष्ट रुपात आले आणि जोरात किंचाळत ओरडत गाऊ लागले . "jack nd jill went up the hill, to fetch a pail of water" तेवढ्यात पियुने पाहिले कि पायऱ्यावरील कार्पेट वर jack उभा होता मग काय पियुने चपळाईने ते कार्पेट ओढले व jack खाली येऊन आपटला त्यावर पुजीने त्याची अर्धवट लाईन पूर्ण केली "jack fell down nd broke his crown"पुजीने ते पवित्र जल त्यावर शिंपडले कि तो अचानक धूर होऊन जळू लागला jack ओरडतच jill वरतून त्याला आवाज देऊ लागली आणि ओरडू लागली इतक्यात jack नाहीसा झाला . हे jill ला सहन नाही झाले आणि ती वेड्यासारखे "jack jack ओरडू लागली ...." आणि नम्रीने पाठी मागून येऊन तिला खाली ढकलले
नम्रीने jillला ढकलताच , jill पायऱ्यावरून घरंगळत खाली आली अन सरीच्या पायात पडली, आणि ती सरीचा पाय चाऊ लागली. तेवढ्यात पियुने सरीकडून पवित्रजल पत्र घेतले अन उरलेले तीन थेंब पवित्र जल तिच्यावर शिंपडले, ती देखील चिरकत ओरडू लागली... तेवढ्यात नम्रता आणि पुष्पा खाली येऊ लागल्या पायऱ्या उतरत उतरत, पुष्पाने पोएम कम्प्लीट केली, "and jill came tumbling after" हे ऐकताच सर्वांच्या तोंडावर हास्य उमटले, आणि इकडेही jill चा धूर होऊन तो धूर हवेत गायब झाला... सर्वांनी मग सुटकेचा श्वास घेतला, आणि एकमेकीना घट्ट मिठी मारल्या ... वातावरण प्रसन्न वाटू लागले, सर्व काही पूर्ववत झाले, आणि संध्याकाळी पुष्पीचे वडील आले. त्यांना सर्व प्रकार सांगितल्या नंतर , त्यांनी सर्वाना घेऊन शहरात जाण्याचे ठरवले. सर्व पैकिंग करून ते निघाले जाता जाता चर्चला पाया पडून पुढे गेले त्या आjillा भेटून त्यांना सर्व काही सांगायचे होते. पण या झोपडीत गेल्यावर तेथे कोणीच नव्हते . फक्त गणपतीची मूर्ती ,शिवलिंग व तो तेवणारा दिवा देवारयात होता. गणपतीच्या मूर्तीवर लाल जास्वंदीचे आणि शिवलिंगावर पांढरा मोगरा मात्र होते. देवाला नमस्कार करून त्या झोपडीबाहेर पडल्या नि गाडीमध्ये बसल्या आणि जंगलच्या दिशेने गाडी न घेता बाजूच्या मुख्य रस्त्याने त्यांच्या परतीच्या प्रवासास सुरवात झाली समाप्त...

No comments:
Post a Comment