Thursday, January 21, 2016

नमस्कार माझ नाव नेहा कदम आहे....
हा किस्सा माझ्या वहिनीने मला सांगितला होता, तो मी तुम्हाला सांगत आहे...
माझ्या वहिनीचं नाव अर्चना, ती माझी सगळ्यात आवडती व खुपच चांगली मैत्रीण सुद्धा आहे, त्यामुळे ती तिच्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करते. तिला मी एकदा MHE Page वाचायला दिला होता आणि तिला तो आवडला सुद्धा. एकदा मी तिच्याकडे गेले असताना तिने हा किस्सा मला सांगितला...
अर्चू वहिनी लहान असताना एकदा तिच्या फ्रेंड्ससोबत खेळत होती. तेव्हा ती तिच्या माहेरच्या गावी म्हणजेच वडूज येथे राहायची. त्यावेळी लपाछपी खेळताना अर्चू वहिनी एका पडिक घरात लपली होती. ते घर बाकी घरांपासून थोडे लांब होते व पडझडीला आले होते. कोणीच तिथे राहत नव्हते. अर्चू वहिनी त्या घरात लपली होती, आत एका भिंतीला टेकून बसली होती. अचानक तिला तिच्या समोरील भिंतीला एक आंधळा माणूस टेकून बसलेला दिसला. तो रडत होता, ओरडत होता. वहिनीला भीती वाटली म्हणून ती उठू लागली तर तिला उठताच येईना. जणू ती जागेवर पुतळ्यासारखी स्तब्ध झाली होती. ती खूप घाबरली, रडू लागली, ओरडू लागली तसा तो आंधळा माणूस अजूनच जोरजोरात रडू लागला. तो सारखा काहीतरी बडबडत होता, की तुम्ही मला फसवलं, मी तुम्हाला सोडणार नाही...इथे संध्याकाळ झाली तरी अर्चू वहिनीचा काहीच पत्ता नव्हता. तिच्या आई-वडिलांनी तिला सगळीकडे शोधले पण व्यर्थ. नंतर त्यांना कळाले की ती त्या पडीक घरात शिरली होती. तिचे बाबा सरळ त्या दिशेने गेले. काही लोक त्या घराबाहेर उभे होते. तिचे बाबा आत शिरताच त्यांना अर्चू वहिनी दिसली. ती एका भिंतीजवळ जमिनीवर पडली होती. चेहरा जमिनीवरील मातीने खराब झाला होता, आणि ती सारखं "आई-बाबा, आई-बाबा" असे ओरडत होती. तिचे बाबा तिला घरी घेऊन आले, पण त्या प्रसंगानंतर तिला खूप ताप भरला. बरे झाल्यानंतर तिने घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. सगळेच घाबरले. आणि तेव्हापासून कोणी लहान मूल त्या घराकडे फिरकत ही नाही.
अर्चू वहिनीने सांगितलं की तो जो आंधळा बाबा होता त्याचे ते घर होते. त्याची इच्छा होती की तो मेल्यानंतर त्याच्या घरासमोरच पुरावे, पण तो मेल्यानंतर माञ लोकांनी त्याला स्मशानात नेऊन त्याचा अंत्यविधी केला. म्हणून तो असा ञास द्यायचा, लोकांना दिसायचा. त्याच प्रेत उचलून नेताना ते इतकं जड झालेलं की लोकांना ते आवरणं पण कठीण जात होतं असं म्हणतात. जाऊदे, त्याचं जे झालं ते झालं पण माझ्या अर्चू वहिनीला काही नाही झालं ही देवाचीच श्रद्धा...
आभार...

No comments:

Post a Comment