Tuesday, March 29, 2016

अरे रिक्षा जरा हळू चालव. पाऊस किती पडतोय? पावसात जर रस्त्यावर
ऑइल सांडलेले असेल तर गाडी लगेच स्लीप होते रे बाबा. . . . . ”
मी रिक्षावाल्या प्रदीपला
म्हणालो. तातडीने पुण्याला जायचे होते म्हणून मी गावाहून रिक्षाने रत्नागिरीला निघालो होतो. तिथून मग रात्री पुण्याची बस पकडणार होतो. रिक्षा रत्नागिरी सीटीत प्रवेश करत
होती तेवढ्यात रस्त्याच्या कडेला समीरची मोटरसायकल उभी दिसली म्हणून मी रिक्षा
थांबवली आणि खाली उतरलो. समीर समोरच्या दुकानातच सिगारेट घेत होता, मी हाक
मारली तसा वळून माझ्याकडे बघून हसू लागला. “अरे भल्या माणसा आहेस कुठे? किती वर्षांनी
भेटलास? ” मी म्हणालो.
मग मी रिक्षातून बॅग काढून घेतली आणि प्रदीपला रिक्षाचे भाडे देवून समीर
बरोबर निघालो. बसला अजून 2/3 तास वेळ होता. इतक्या वर्षांनी भेट झाली तर चला
सेलिब्रेट करू म्हणून मग आम्ही बारमधये बसलो आणि बियरच्या संगतीने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम सुर झाले. . . .
समीरची आणि माझी पहिली भेट अठरा वर्षांपूर्वी झाली. मी कॉलेज पूर्ण करून
नुकताच रत्नागरीतील एका कंपनीत जॉइन झालो होतो. आमची तिघा जणांची टीम होती. मी,
समीर आणि अल्ताफ ! समीर आणि अल्ताफ मला सीनियर होते. . पण आमची दोस्ती मात्र एकदम पक्की झाली होती. मी नवखा असल्याने मला फारसे काही कळत नव्हते. मग अल्ताफ आणि समीरने मला सांभाळून घेत सर्वकाही शिकवले. आमची कंपनी भगवती बंदरला होती
आणि मी गावाहून रत्नागिरीला अप डाउन करत असे, मग एस टी स्टॅन्ड पासून भगवती बंदर
पर्यंत सकाळी आणि संध्याकाळी परत असे आम्ही तीघे एकाच बाईकवरून जायचो !
पुढच्याच महिन्यात आम्हाला तिघांना कंपनीतर्फे तीन महिन्यासाठी विजयदुर्ग बंदरावर कामाला पाठवण्यात आले. तिथे पावसाळ्यात दोन मोठी जहाजे रीपेयरसाठी आली
होती. मग काय? आमच्या तिघांचीही राहायची सोय विजयदुर्ग किल्ल्यावर एका धर्मशाळेत
करण्यात आली. जेवण तिथेच एका हॉटेलमध्ये ! या तीन महिन्यात आम्ही खूप धूम धमाल केली सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत बोटीवर काम चालायचे! मग घरी येवून आंघोळ वगैरे करून जेवायला निघणार इतक्यात तिघांपैकी एकाला हुक्की यायची. मग
बाइक काढून देवगडला 40 कीमी जायचे आणि खंबा आणायचा. आमच्याबरोबर चंदू गाडगीळ
म्हणून बोटीवरचा एक कर्मचारीदेखील असायचा ! मग जेजेवण पार्सल घेरून रानात रात्री 2/3
वाजेपर्यंत पार्टी चालायची. . . सकाळी पुन्हा कामावर हजर! खरोखर ते दिवस अविस्मरणीय होते यात शंका नाही
ते तीन महिने संपल्यावर आम्ही परत रत्नागिरीला आलो आणि आणखी सहा महिने आम्ही एकत्र होतो. नंतर मग मी आणि अल्ताफने तो जॉब सोडला. अल्ताफ दुबईला गेला तर
मी दाभोळकर पॉवर कंपनीत जॉइन झालो. पण समीर मात्र तिथेच होता. आणखी 3 वर्षे. तीन
वर्षांनी त्यानेदेखील जॉब बदलला आणि रत्नागिरीतच दुसर्‍या कंपनीत जॉइन झाला. या
दरम्यान समीरने कंपनीतीलच एका मुलीशी लग्न केले आणि त्यांना तीन गोंडस मुले देखील झाली.
मी मग नोकरीनिमित्त गल्फला गेलो. अल्ताफचा दुबईलाच दुर्दैवी मृत्यू झाला
आणि. . . . . . . . . . . . .
मी एकदम चपापलो. चार वर्षांपुर्वीच समीर मॅसिव हार्ट अ‍टॅकने गेला. असे
कसे? काहीतरी गडबड आहे. आपण आता समीर बरोबरच तर बसलो आहोत बियर पीत ! मग.
. . . मग. . . . . तो चार वर्षापूर्वीचा गेलेला? असे कसे काय? बियरची सगळी धुंदी उतरली आणि
मी निरखून समीरकडे पाहू लागलो. काहीतरी गडबड आहे. . . काळजीपूर्वक विचार केल्यावर मला समजले की समीरचे शरीर पारदर्शक दिसतेय. एक वेगळीच चमक त्याच्या डोळ्यात होती. . . . .
तरीही मी धीर करून समीरला बोललो. . .
मी- अरे समीर पण तू तर. ? चार वर्षांपुर्वी तू गेलास रे. हार्ट अटॅक ने. मग आता
इथे कसा काय?
समीर - तुला काय वेड लागलंय का? काहीतरी बडबड करतोय? बियर जास्त
झाली काय तुला? मी- नाही रे समीर, आईशप्पथ. तुझ्याबरोबर काम करणार्‍या पाटीलने मला
सांगितले यार. .
1 डिसेंबर 2011. . . त्या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता तू काम संपवून
कंपनीतून निघालास, गाडीवर बसून किक मारलीस तेव्हाच छातीत कळ आली आणि तू तिथेच
जागेवर कोसळलास. समीर हसत होता. माझं बोलून झाल्यावर समीरने आणखी २ बियर
मागवल्या. काय भंकस लावलीस तू पण , बियर पी. एक मला दिली आणि एक त्याने स्वतःच्या
ग्लास मध्ये ओतली.
त्या दिवशी बार मध्ये दारू पिता पिता कधी वेळ निघून गेली समजलच नाही. अचानक माझ्या लक्षात आलं आपल्या बसची वेळ निघून गेली. मी समीरला बोललो सम्या अरे
माझी गाडी निघून गेली. समीर बोलला जाऊ दे रे, कशाला काळजी करतोस. आज वस्तीलाच
थांब माझ्या घरी, खूप वर्षांनी आपली भेट झाली आहे. मी पण विचार केला ठीक आहे पहाटेची
बस पकडली तरी मी पुणयात वेळेत पोहोचेल. संध्याकाळी साधारण ९ वाजता आम्ही दोघेही बार मधून घरी निघालो. पण मला समीरचं शरीर स्पष्ट दिसत नव्हतं. आपण नशेत आहोत म्हणून अस होत असणार, मनाला समजावत मी
त्याच्या पाठोपाठ निघालो. समीरने झाडाखाली उभी असलेली आपली बाईक काढली, मला
बोलला बस मागे आणि गाडी बाहेर रस्त्यावर काढली.
गाडीवर बसल्यावर थोड्या वेळाने मी माझा हात त्याच्या खांद्यावर टाकला, पण
माझा हात थेट सीट वर पडला. बियर खूप झाल्यामुळे होतय डोळे झाकायला लागले होते म्हणून जो काही प्रकार घडत होता तो माझ्या लक्षात येत नव्हता मी पुन्हा त्याच्या खांद्यावर हात टाकला पुन्हा माझा हात खाली सीट वर पडला. मी त्याच्या डोक्यावरच्या केसांना हात लावला पण हाताला काहीच लागत नव्हतं. आता माझी नशा उतरली. मी त्याला बोललो समीर गाडी थांबव मला लघवीला झाली आहे. त्याने गाडी थांबवली नाही उलट हायवेवर भरधाव वेगाने गाडी पळवत होता. बोलला अरे आपल्याला घरी जायला उशीर होतोय पुढे थांबवतो. मी बोललो अरे थांबव इथेच पुढे नको. तो ऐकायला तयार नव्हता. मी खूप घाबरलो. चालत्या
गाडीवरून उडी मारायचा मनात बेत ठरवला. तेवढ्यात त्याच्या छातीत कळ आली, तो जोरात
ओरडला, मी बोललो काय झालं समीर. त्याचा एक हात त्याने छातीवर ठेवला मोटरसायकल
डगमग करायला लागली, गाडीचा तोल गेला आणि आम्ही दोघेही रसत्यावर पडलो, मागून भरधाव वेगाने एक डंपर येत होता. गाडी माझ्या पायावरून गेली आणि समीरच्या अंगावरून. डंपर वाला थांबला नाही तो निघून गेला. माझा पाय मोडला आहे हे माझ्या आधी लक्षातच आलं नाही. समोर समीरच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. ते बघून माझं शरीर थरथर कापायला लागलं. बाजूने गाडय़ा जात होत्या पण कोणीच थांबत नव्हतं. हळूहळू माझ्या पायातून वेदना यायला सुरवात झाली. मी कसा बसा घसपटत आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गेलो. आता रस्ता निवांत झाला होता एकही गाडी नव्हती चांदणे पडले होते. मी जमीनीवर उताना पडलो होतो. माझ्या लक्षात आलं कोणीतरी मला उचलतंय. मी डोळे उघडले आणि बघितलं समीर चं ते फाटलेलं शरीर रक्ताच्या धारा वाहणारं ते विद्रूप शरीर माझा हात पकडून मला उचलत होतं. समीर मोठ्या मोठ्याने हसत होता. बोलत होता चल चल माझ्या सोबत. आणि मी बेशुद्ध पडलो. नंतर काय झालं मला काहीच माहिती नव्हतं.
डोळे उघेले, खिडकीतून येणारा उजेड दिसला. आजूबाजूला बघितलं मी हाॅस्पीटल मध्ये होतो.
बायको आणि आई माझ्या बाजूला बसल्या होत्या. ३-४ नातेवाईक पण होते. गावातली २ माणसं होती. माझ्या पायाला प्लास्टर लावलं होतं.
आई रडत रडत बोलली, बाबू हाॅस्पीटल मध्ये आहेस. चांदोरकर हाॅस्पीटल - रत्नागिरी
माझ्या जीवात जीव आला. आपण मरणाच्या दारातून परत आलोय या विचारानेच निश्वासाचा श्वास सोडला आणि निश्चिंत झालो. दुपारी बायको एकटीच माझ्या बाजूला बसली होती. मी तिच्याकडे विषय काढला. झाली घटना तिला सांगितली. गावातल्या २-३ जणांना पण सांगितली नंतर गावातल्या माणसांकडून समजलं की माझा अपघात त्याच ठिकाणी झाला होता ज्या ठिकाणी समीर मोरे ५-६ वर्षापुर्वी मोटरसायकल वरून पडून मेला होता. हे ऐकून मी थक्क झालो.
१५ दिवसांनी हाॅस्पीटल मधून डिस्चार्ज मिळाला, आणि मी महिना भराने
एकदा त्याच मार्गाने चाललो होतो, ज्या ठिकाणी माझा अपघात झाला होता,
समीर
पहिलयांदा मला जो भेटला तो त्याच ठिकाणी जेव्हा मी रिक्षा पकडून रत्नागिरीला चाललो होतो.
समीर २०११ याच वर्षी मेला होता, मला भेटलेला समीर हा समीर
नसून त्याचं भूत होतं. झाला प्रकार आजही आठवला की अंगावर शहारे येतात.
नमस्कार मित्रानो मी विवेक भुसारी हि घटना अंदाजे २० २१ वर्षापूर्वीची आहे.. तेव्हा मी माझ्या मामाच्या गावी होतो.. पहिली दुसरीला होतो मी तेव्हा.. माझे मामा शेतकरी होते त्यामुळे आमच्या कड घरी गाई-म्हशी होत्या. त्यामुळ संध्याकाळी दुध घ्यायला लोक घरी यायचे... आमच्या घराशेजारीच एक बाई राहायच्या त्यांना एक मुलगा आणि सून होती.. त्या आमच्या इथ दुध न्यायला यायच्या...आणि माझ्या आजो समवेत त्या गप्पा मारायच्या... एके दिवशी त्या आजी कुठ तरी नाहीश्या झाल्या... त्यांच्या मुलाने आणि सुनेने खूप शोधळ पण काही सापडल्या नाही... पण दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी त्यांना मदत करावी या विचाराने त्यांच्या घरचा रस्ता धरला आणि ते त्याच्या घरी गेले आणि त्यांना समजल कि त्यांची आई तर रात्रीच भेटली पण मृत अवस्थेत.. झाल अस होत कि ... त्या आजीनं रात्री शौचास जायचं होत.. पण त्यांची तबियत ठीक नव्ह्ती... म्हणून त्यांच्या सुनेने त्यांना घराच्या मागेच जा अस बजावलं होत.. पण त्यांना ते ठीक वाटल नाही म्हणून त्या जरा दूर गेल्या.. आणि खूप शोधलं तेव्हा त्यांचा मृतदेह च फक्त सापडला... आणि तो हि विहिरीत...
अस होत कि त्या आजीना त्यांच्या घरामध्ये कित्येकदा तरी त्यांच्या मुलाचे वडील वावरताना दिसले होते..
त्या मूळ ज्या रात्री त्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांचा नवरा त्यांना दिसला आत्म्याच्या स्वरूपात..त्या चकव्याच्या जाळ्यात अडकल्या.. आणि त्यांनी आपला जीव आपल्या नवर्याच्या सांगण्यावरून दिला..
कथा २ ::
मित्रानो मी सुरेश गुंजाळ हा माझ्या बहिणीचा एक भयानक अनुभव इथे शेअर केला आहे..तुमचा भूतप्रेतावर कितपत विश्वास आहे मला माहित नाही पण हे खर ते माझ्या समोर घडल ते मी इथ सादर करतोय तर झाल अस होत कि माझी बहिण तेव्हा १२ वी मध्ये होती. तीच कॉलेज आणि माझ कॉलेज जवळ जवळच होत मी इनिजीनीरिंग ला होतो तेव्हा.. तर झाल अस होत. कि माझी बहिण तेव्हा घरून येताना टिफिन घेऊन यायची आणि तिच्या मैत्रिणी सोबत जेवायची.. तिच्या कॉलेजच्या मागे..एक जून मंदिर होत.. पण देव नव्हता त्यात.. विचित्रच मंदिर होते ते.. आतमध्ये.. काळा दगड होता तिथ. त्यावर फक्त राख लावलेली असायची नेहमी ना कुंकू ना कसला दिवा न कसली हळद.. तर माझ्या बहिणीने एक दिवस चुकून माझ्या मैत्रिणी सोबत तिथ जेवण्याच नियोजन केल.. आणि ती तिथ गेली देखील.. मी इकड माझ्या कॉलेजमध्ये होतो.. हे तिला आणि तिच्या काही फ्रेंड्सना माहित होत...तर झाल अस कि माझी बहिण तिच्या मैत्रिणी सोबत तिथ जेवायला गेली..
आणि थोड्याच वेळात.. मला आमच्या कॉलेजच्या गेटवरती गर्दी जमा झालेली दिसली.. आणि काही तरी चालल होत समोरच्या कॉलेजमध्ये..मी हि पाहिलं.. तर माझी बहिण होती... मला धक्काच बसला.. कारण ती पूर्ण कॉलेजच्या फेऱ्या मारत होती... ते हि न कशाला अडखळता आणि ती पूर्णपणे उलटी धावत होती.. तिच्या मैत्रिणी रडत ओरडत तिच्या मागे धावत होत्या.. माझ्या बहिणीचा अवतार विचित्र झाला होता.. केस मोकळे सुटलेले.. तोंडावर खरकट जेवण लागलेलं.. मी धावत गेलो तिथल्या आजूबाजूंच्या लोकांवर ओरडण्या ऐवोजी मला माझ्या बहिणीकडे जान महत्वाच वाटल आणि मी तिच्याकडे गेलो.. माझा मित्र अनुज पण माझ्या सोबत आला ..
मी माझ्या बहिणीला थांबवायचा प्रयत्न करू लागलो.. पण ती खूप वेगाने उलट्या पावलाने धावत होती... पूर्ण कॉलेज पाहत होत. माझा जीव रडकुंडीला आला होता ... काय होत होत ? माझ्या बहिणीला मला समजत नव्हत.. तरीही मी तिला गाठलं आणि पकडल.. तर ती वेगळ्याच आवाजात मला शिव्या देऊ लागली... एकवेळ मुलाच्या आणि एकवेळ मुलीच्या आवाजात ती ओरडत होती... मी तिच्यावर जोरात ओरडलो “अश्विनी काय झाल तुला ?? ” त्यावर तिने माझ्या हाताला चावल.. पण मी सोडल नाही मग अनुजने हि तिला धरून ठेवल... व तिच्या काही madam आल्या... माझ्या बहिणीच ते तडफडन चालू होत कि मी घरी कॉल करून माझ्या वडिलांना बोलवून घेतल...तेव्हा आम्ही तिला त्याच अवस्थेत घरी आणल.. आम्हाला कळेना झाल होत कि तिला काय झाल आहे ?? आमची आई थोडीशि जुन्या वृतीची होती.. बाबाना वाटल कि तिला झटका किवा फिट्स आले आहेत... पण तस नव्हत आमच्या आईने... तिला एकवेळ झापड लगावली.. मला माझ्या बहिणीची अशी अवस्था पाहून खूप रडायला येत होत.. तेव्हा आमच्या आईच्या एका ओळखीच्या मावशीनी सांगितल कि तिला बुलढाण्याला न्या तिथ कोणीतरी बाबा आहेत त्यांना दाखवा .. आम्ही त्याचं ऐकल मी आई आणि माझ्या बहिणीला आम्ही तिकडे नेले..(माफी असावी ते स्थान गुपित ठेवण्यात आल आहे ) माझी बहिण जागीच होत नव्हती..ती शुद्धीवर यायला तयार नव्हती..
तेव्हा आम्ही एक दिवस त्या बाबांच्या आश्रमात राहिलो माझे वडील आईवर रागवले होते तिच्या या अडाणीपणा मूळ.. म्हणून ते आले नव्हते.. आम्ही तिघेच आलो होतो... आम्ही त्या बाबांच्या आश्रमात राहिलो पण तिथ तर रात्री वेगळच घडणार होत.. तिथ माझ्या बहिणीसारखे बरेच जन होते.. ज्यांना बाहेरच वार लागल होत भूतबाधा झाली होती... तर रात्री त्यांच एक अनुष्ठान होत.. आम्ही रात्री आमच्या बहिणीला त्यांनी सांगितलेल्या मैदानी नेल. ते आश्रमातच होत.. तर त्यांचे काही एक दोन गुरुमाणसे होती.. जे त्यांच्या हातात काही झाडफुकेच सामान घेऊन होते.. त्यांनी माझ्या बहिणीला.. आणि काही इतर लोकांना एका रिंगणात उभ केल... आणि त्यांच्या गोलाकार बाजूने आग लावली... आणि त्यांनी त्यांच अनुष्ठान चालू केल.. व त्या समवेत... त्या रिंगणातील प्रत्येक जन माझ्या बहिणी समवेत जोरजोराने तडफडत ओरडत होता.. प्रत्येकाच्या शरीरामधून धुराचे लोट बाहेर पडत होते.. अस वाटत होत कि ते लोक आतमधून जळत आहेत.. आणि काही वेळाने त्याचं अनुष्ठान थांबल.. तेव्हा.. त्या गुरुमाणसांनी आमची भेट घेऊन आम्हाला माझी बहिण परत केली.. आणि त्यांनी सांगितल..कि माझ्या बहिणीमध्ये एकवेळीच दोन आत्म्यांचा वास होता.. आणि त्यांनी तो कसा आणि कुठून आला हे देखील सांगितल.. कि ते तिच्यामध्ये त्या मंदिराजवळून आले ते विचित्र मन्दिर कॉलेजने पाडून टाकल परत तिथ कुणी गेल नाही...कुणालाच माहित नव्हत ते कोणत मंदिर आहे ते त्या गुरुमाणसांना शक्यतो ते माहित होत पण त्यांना ते सांगण म्हत्वाच वाटल नाही...मला माझी बहिण सुखरूप परत भेटली... एवढच मी सांगेन.. धन्यवाद !! /**/
नमस्कार मित्रानों माझ नाव परेश बागुल आहे ,  मि आज आपल्या सोबत मला आणि माझ्या प्रेयसी ( पुनम ) ला आलेला अनुभव शेयर करतोय...
मि आणि माझी प्रेयसी ३ वर्षां पासुन रिलेशन मध्ये आहोत पण दोघांचा busy schedule असल्याने आम्ही खूप कमी भेटतो।
एक दिवशी मि आणि पुनम ने अजिंठा ला भेटायचे ठरवले....
आम्ही दोघं पण खुप खुश होतो आणि दुसर्या दिवशी आप-आपल्या घरातुन सकाळी ६:०० वाज़ता अजिंठा ला जाण्यास निघालो, बस मधुन नैसर्गिक द्रुश्या चा आनंद घेत आम्ही अजिंठा पोहचलो।
त्या दिवशी आम्ही सगळ काही विसरून खुप एंजॅाय केला, प्राचीन कलाक्रुती असलेल्या लेण्या बघितल्या, सोबत पहिल्यांदा इतका वेळ घालवल्या मुळे तो आयुष्या चा बेस्ट डे वाटत होता पण आम्ही पुढे येणार्या संकटा पासुन अपरिचित होतो। त्या दिवशी आम्ही खुप थकलो होतो, चालुन चालुन पुर्ण शरीरा ची चांगलीच कसरत झालेली म्हणुन त्या दिवशी आम्हाला तिथेच मुक्काम करने योग्य वाटले। तिथे च स्टँड वर उभा असलेला रिक्शा चालक स्वताची रिक्शा पुसत आमच्या कडे आशे ने पाहत होता, जनु तो आम्हाला त्याच्या रिक्शात बसण्यास आमंत्रण देत होता। आम्ही त्या रिक्शा वाल्या ला जवळच कुठल्या तरी छान हॅाटेल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले!
त्यावर होकारार्थी मान हलवत तो आम्हाला एका छान हॅाटेल परंतर घेउन आला आणि बोलला कि तुम्ही रूम चेक करा, नाहि आवडल्यास पूढे अजुन एक हॅाटेल आाहे। पण थकान मुळे ते हॅाटेल पण स्वर्गा पेक्शा कमी वाटत नव्हत। मि पुनम ला रिक्शातुन उतरायला संागितले आणि मस्करित बोललो बघ आपले ड्रीम हाऊस, तिने नामंजुर नजरेने मला बघितले आणि हसत खाली उतरली ( पुनम चा सिक्स्थ सेंस खुप चांगला आहे , बहुतेक तिला काही तरी विचित्र जाणवल होत ) मला खुश पाहुन तिने कुठलाच विरोध नाही केला आणि आम्ही ४:०० वाज़ता हॅाटेल मध्ये चेक इन केले।
रूम मध्ये पोहचल्या वर रूम आम्हाला फारशी आवडली नाही कारण ठिक ठिकाणी भिंती चे पोपडे निघालेले आणि त्यात प्रकाशा साठी जेव्हा मि परदा सरकवला तेवा छप्प असा आवाज़ झाला आणि बघितल तर एक पाल आमच्या बेड वर पडली ( पाल पडने अशुभ मानले जाते ) पण या गोष्टी कडे दुर्लक्ष करत आम्ही दोघे पण फ्रेश झालो आणि थोडा आराम केला ।
संध्याकाळी जवळपास ६:०० वाज़ले असतील तेव्हा मला जाग आली आणि मि पुनम ला तसच झोपलेली सोडुन आंघोळ करण्या साठी बाथरूम मध्ये गेलो।
आंघोळ करून परतल्या वर मि बघितले पुनम बेड वर नव्हती आणि ती Balcony च्या दिशे ने जात होती। मि हळुस माघुन जेवा तिचा हाथ धरला तेव्हा ती खुप शॅाक्ड होती आणि माझ्याकडे असे बघत होती जनु तीने भूत च बंघितल असाव । मी ही तीला तीच्या चकित होण्याचे कारण विचारले, त्यावर पुनम चे उत्तर - अरे ! मि तर तुला आताच Balcony मध्ये जाताना बघितले, त्यावर मी बोललो "what !!! मी तर आताच बाथरूम मधुन आलो बघ, माझे डोक पण ओल आहे बघ" पण पुनम १०० % श्युर होती तीने कोणाला तरी बघीतले Balcony मध्ये जाताना ( तीने केलेल्या आक्रुती च वर्णन - ब्लॅक बनयान अँड ब्लू जिंस जसे मि घातले होते । )
पुनम ने जेव्हा ती आक्रुती बघीतली तेवा ती नुकतीच झोपेतुन उठलेली होती म्हणुन तीला भास झाला असावा असा निंष्कर्श काधत मी तो प्रसंग टाळला आणि तीला पण पटकन आंघोळ करून घेयाला सांगितले, तरी पुनम च्या खात्री साठी मी Balcony चेक केली आणि अपेक्क्षित तिथे कोणीच नव्हत, पुनम च्या व्यवहाराहुन ती अस्वस्थ जाणवत होती । हा आम्हाला मिळालेला त्या अमानविय शक्ती च्या अस्तित्वा चा पहिला संकेत होता ज्याकडे आम्ही दुर्लक्ष केले होते ।
पुनम तशी दिसायला खुप देखणी आणि नाज़ूक होती, आंघोळ करून तयार झाल्यावर ती अजुन मोहक वाटत होती म्हणुन आम्ही सोबत पिक्स क्लिक करायचे ठरवले । आम्ही जवळपास १०० सेल्फी क्लिक केल्या असतिल पण त्या मधला एक पण पिक चांगला नव्हता आलेला , पुनम तर सेल्फी एक्सपर्ट होती । ( असे म्हणतात पॅरानाॅरमल अॅटमोस्फियर मध्ये पिक्स क्लियर नाही येत ) शेवटी आम्ही सगळे पिक्स डिलीट केले । तेव्हा अजुन एक अनपेक्शित प्रसंग घडला, पुनम ला अचानक चक्कर आला आणि ती बेड वर कोसळली । मी तीच्या वर पाणी शिंपडुन तीला शुद्धी वर आणले । पुनम ला अशक्तपणा जाणवत होता । कमाल आहे, दुपारी भरगच्च जेवन करून सुद्धा अस कस होउ शकते ?? असा प्रश्न मला पडला होता!
जवळपास ८: ०० वाज़ले असतील, मी डिनर साठी खाली जायच ठरवले पण पुनम काही केल्या मानत नव्हती, मि तीच्या खूप विनवन्या केल्या आणि खाली येण्यास मनवले। आम्ही खाली पोहचल्यावर जेवणा ची आॅर्डर दिली आणि जेवनाची वाट पाहत गप्पा मारत बसलो, तशी पुनम पण आता प्रसन्न आणि प्रफूल्लित वाटत होती। आम्हचे जेवन उरकले आणि आम्ही तिथेच गार्डन मध्ये वाॅक घेयच ठरवल। थोड्याच वेळात मि परत रूम मध्ये जायचे ठरवले पण यावेळेस पुन्हा पुनम अडथळा घालत होती, आता पुनम ला कसे समज़वु तेच मला कळत नव्हते आणि त्यात तिथे असलेल्या लोकांच्या संशयास्पद नज़रा मला अजुन अनकंफरटेबल फिल करवुन देत होत्या ।
मि यावेळेस पन पुनम ला कसबस समज़वल आणि खुप आग्रह केल्यावर ती रूम वर येण्यास तयार झाली । वर आल्यावर तीला परत अस्वस्थ वाटायला लागले आणि ती चेंज न करताच बेड वर पडली, मी तीला विचारले काय होतय तुला तेव्हा तीने डोक दुखत असल्याच सांगितले । मी तीच डोक चेपत होतो , थोड्याच वेळात ती अचानक ठनकन उठुन बसली आणि माझ्या जवळ येउन मला मिठीत घेतल, मि ही तीच्या कोमल स्पर्षाने सुखावला गेलो । अचानक मला काही हालचाल जानवली, मि नीट लक्ष देउन बघितले तर पुनम माझ्या गळ्यातले हनुमाना चे लाॅकेट काढण्याचा प्रयत्न करत होती आणि बर्याच पैकी यशस्वी पण झालेली, पण मी तीचा हाथ आवरला अाणि पुन्हा लाॅकेट गळ्या परंतर नेले । मला विचित्र च वाटले कारण या आधि तीला त्या लाॅकेट ची कधी अडचन नाही झालेली, ती सारख एक च वाक्य बोलत होती कि लाॅकेट आपल्या मध्ये येत आहे । पण मी तीला बोललो असुदे ! आणि तसच तीला मिठीत घेउन झोपी गेलो ।
रात्री २:३० ला मला अचानक जाग आली, मला अस वाटल कोणी तरी आहे Balcony मध्ये । पण माझ्यात उठून चेक करन्याची हिम्मत नव्हती, ब्लँकेट कमरे खाली गेल्याने मला ठंडी वाज़त होती, मी ती पुन्हा आंगावर घेतली आणि पुनम कडे एक नज़र टाकली, ती शांत झोपली होती मग मी पुन्हा झोपणार इतक्यात मला एक विचित्र गोष्ट आठवली । ती म्हणजे , झोपण्या आधी सर्व्या लाइट्स आॅन होत्या पण आता सगळीकडे आंधार च आंधार । पण यावेळेस पण नेहमी प्रमाने दुर्लक्ष केले आणि झोपलो, मला झोपुन २ मिनीट झाले असतील तेव्हा मला परत काही जानवले, माझ्या आंगावरून ब्लँकेट हळु हळु खाली सरकत होती । मी पुढ काय होतय याची वाट बघितली पण ब्लँकेट कमरे परंतर येउन थंाबला । मी पुन्हा ब्लँकेट वर ओढली आणि चक्क यावेळेस पुन्हा ब्लँकेट खाली सरकली । मला त्या अमानविय शक्ती सोबत स्पर्धा करने योग्य नाही वाटले आणि मी ब्लँकेट खाली च राहु दिली । आता जे मी अनुभवल होत त्यामुळे मी पुरता घाबरलो होतो । मी ठरवल आता काहीही झाल तरी झोपायच नाही, भिती वाटत असल्यामुळे मी पुनम ला पण उठवले आणि घडलेला प्रकार संागितला । ती पण खुप घाबरली होती अािण मला जवळ घेउन ती रडत होती । तस तर ते हाॅटेल हाईवे ला लागुन च होते पण रात्री तिथल वातावरण खुप भयानक जाणवत होते जनु दुसर्या दुनियेत आल्या सारख । ३:३० वाज़ता आजुन एक विचीत्र प्रकार घडला, ज्याचा उल्लेख करताना आज पण आंगावर काटा येतो, पुनम ने मला समोर असलेल्या भिंती कडे बोट दाखवुन इशारा केला । मी जेव्हा भिंती कडे बघितले माझी तर बोबडी च वळली, एक अस्पष्ट काळी सावली सारखी आकृती , जिचे डोळे स्पष्टपणे दिसत होते आम्हाला च पाहत होती । आता कुठल्या ही क्षणी ती आमच्यावर हल्ला करणार या विचारा ने हाथ पाय थरथरत होते । आमच्या तोंडातुन आवाज़ पण निघत नव्हता, फक्त डोळ्यातुन खळा खळा अश्रु वाहत होते । तेव्हा अचानक कोणी तरी भिंती ला डोक आदळण्या सारखा आवाजं झाला आणि ती आकृती नाहिशी झाली । ४:०० वाजुन गेले होते तरी पण सर्वत्र आंधार होता, कस तरी जीव मुठीत घेउन आम्ही सकाळचे ५:०० वाज़े परंतर एक दुसर्या ला धीर देत होतो ! शेवटी आमच्या वर देवाची कृपा च झाली म्हनावी जे आम्हाला कुठली हानि नाही झाली । आता सूर्योदय झाला होता आणि सगळी कडे मंद प्रकाश झाला होता, मी प्रकाशा साठी पटकन Balcony चा डोर ओपन केला आणि दोघी विंडोज़ पण ओपन केले।
आम्ही पटकन फ्रेश होउन निघण्या चा निर्णय घेतला ।
फ्रेश होउन खाली गेल्यावर हाॅटेल चा मालक आणि तिथे असलेले स्टाफ आमच्याकडे आश्चर्यचकित होउन पाहत होते, कदाचित त्यंाना त्या रूम च रहस्य महित असावे । मी तर त्या मॅनेजर ची चांगलीच खरडपट्टी काढणार होतो पण पुनम ने मला आधिच निर्देश दिला होता की इथे वाद घालने योग्य नाही म्हणुन शंात होतो आणि तश्याच रागीट नजरेने तेच्याकडे पाहत होतो। पुनम ची तब्येत अाता ठीक झाली होती पण झोप न झाल्यामुळे चेहरा सुस्त दिसत होता, माझी पण तीच अवस्था होती । आम्ही त्यानंतर एक स्ट्राँग काॅफी घेतली आणि ब्रेकफास्ट केला । माझ्या मनात त्या रूम च रहस्य जाणुन घेयची डाट इच्छा होती म्हणुन तिथे च काम करणार्या मुला ला मी हळुस इशारा केला अाणि जवळ बोलवले, मी त्याला १००/- ची नोट दिली आणि रूम नं. ९ बद्दल तुला काय महित आहे विचारल । पण तो मानत नव्हता , शेवटी त्याला अजुन एक १००/- ची नेाट दिली तेव्हा त्याने कबूल केले कि तिथे ३ वर्षा पूर्वी एक व्यक्ती Balcony वरून पाय घसरून खाली पडल्याने मरण पावला होता । हे सगळ ऐकुन मला त्या मॅनेजर चा जास्तच राग येत होता ।
शेवटी आम्ही पॅकींग करून चेक आउट केला आणि बस पकडून आपापल्या घरी पोहचलो ।
माझा संागण्या चा तात्पर्य एवढाच की कधी पण अनोळखी जागी आपल्या काळजाची हाक ऐका आणि कुठल्या पण संकेता कडे दुर्लक्ष करू नका ।
प्रिय वाचक मंडळी, हि माझी या पेज ला दिलेली पहिली कथा आहे आणि म्हणुन काही चूक झाल्यास माफ करा । मि कथे मध्ये मला आलेल्या प्रत्येक बारिक अनुभवाचे वर्णन केले आहे आणि ते पूर्ण पने खरे आहे ।
कथा आवडल्यास किंवा न आवडल्यास अापले मत विचार खाली कमंेट करा !
धन्यवाद !!
नमस्कार मित्रांनो, आज जी सत्य घटना मी सांगणार आहे ती 1993 -94 साली घडलेली आहे. 1993 साली लातूर जिल्ह्यात खूप मोठा भूकंप झाला होता, किल्लारी या गावी.
भूकंप इतका अचानक आणि मोठा झाला त्यामुळे हजारो संसार जिवंत गाडले गेले.
या आपत्ती निवारणासाठी अनेक डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवक मदतीसाठी आले होते. अनेक रुग्णवाहिका आणि शववाहिका होत्या.त्यातल्याच एका शववाहिकेचा ड्रायवर सुधीर होता. दिवस रात्र शव किल्लारी हुन लातूर च्या शासकीय रुग्णालयात नेणं हे त्याच काम होत. शेकडो शव मातीच्या ढीगाऱ्यातून काढले जात होते.सुधीर सोबत एक सहायक असायचा. त्या दिवशी रात्री 8 च्या सुमारास ते दोघ एक प्रेत घेऊन शववाहिनी घेऊन निघाले होते.किल्लारी पासून थोडेच पुढं गेले असतील तोच सहायकाला वरिष्ठांचा फोन आला व त्याला तातडीने बोलवलं गेलं.त्यामुळे आता शववाहिनी घेऊन सुधीर एकटाच पुढे निघाला.रात्रीचा अंधार आणि त्यात बाहेर भयाण शांतता.. गाडीत पाठीमागे प्रेत आणि सुधीर चालवतोय... सुधीर तसा धीट होता कारण रोज रोज मृतदेह पाहून पाहून मन खंबीर झालं होत. 
तो किल्लारी पासून आता बऱ्यापैकी पुढे आला होता, पुढच्या फाट्यावर तो लातूर साठी वळणार होता, तेवढ्यात 'फट फट फट फट...फट ' असा आवाज येऊ लागला, सुधीर नी गाडी थांबवली आणि खाली वाकून पाहिलं, तर एक लोखंडी पट्टी निघाली होती आणि तिचा आवाज येत होता, सुधीर नि पट्टी काढून टाकली आणि गाडी चालू करून पुढे निघाला.अगदी 2 च मिनिट झाले असतील, परत आवाज आला, आणि यावेळी जरा मोठ्याने आला...'धप धप धप्पप..' कोणी तरी मागून त्या शववाहिनी च दार वाजवत आहे अस वाटत होत. सुधीर ला वाटलं परत काही तरी निघाल, म्हणून त्याने गाडी थांबवली, खाली तर काही नव्हत, म्हणून त्याने मागचं दार उघडलं आणि आत मध्ये ठीक आहे ना हे पाहण्यासाठी तो थोडा आत मध्ये वाकला, तेवढ्यात ते प्रेताने डोळे मोठे केले आणि हात वर करून सुधीर चा गाळा पकडला. आता मात्र सुधीर प्रचंड घाबरला, त्याला काहीच कळेना हे काय होतंय. त्याने पटकन दार बंद केले आणि पुढे ड्रायविंग सीट वर बसला, गाडी चालू करू लागला तर गाडी चालू होईना.मागून आता जोर जोरात धप धप आवाज येत होता आणि गुरगुरण्याचा आवाज येत होता.भीतीने पूर्ण थरथरू लागला. तेवढ्यात त्याला समोरून एक बैलगाडी वाला येताना दिसला. सुधीर पटकन गाडीतुन उतरला आणि बैलगाडीवाल्याकडे धावला, बैलगाडी वाला खाली उतरला त्याने सुधीर ची विचारपूस केली, तो माणूस चांगला धिप्पाड होता. तो सुधीर ला बोलला कि चल दाखव मला, कोणत प्रेत काय करत ते मी पाहतो..
सुधीर मागून चालू लागला, त्या माणसाने शव वाहिनी च दार उघडलं आणि त्या प्रेताकडे पाहून दात विचकावून मिस्कील हसला. तसे ते प्रेत मोठं मोठ्याने ओरडू लागले, सुधीर चा पूर्ण थरकाप उडाला. त्या माणसाने चक्क त्या प्रेताचा हात घट्ट पकडून तोंडाजवळ नेला आणि खचकन एक लचका तोडला, तस ते प्रेत मोठ्याने किरट्या आवाजात विव्हळू लागले.सुधीर च लक्ष त्या माणसाच्या पायाकडे गेलं तर त्या माणसाचे पाय उलटे होते, आणि तो माणूस खविस होता.
आता मात्र सुधीर पूर्ण गळून गेला, त्या प्रेताचा मोठा आवाज, समोर खविस... सुधीर च्या तोंडातून शब्द निघेना, हातपाय थंड पडलेले. पूर्ण शक्तीनिशी सुधीर तिथून मागे न पाहता पळत सुटला. पुढे रस्ता त्याला उमजत नव्हता,डोकं बधिर झालं होत, समोरून एक ट्रक येताना दिसला.पण आता त्याला सगळंच धोकादायक वाटू लागलं, त्यामुळे तो ट्रकवाल्याकडे न पाहता पुढे पळत राहीला, पण थोड्याच अंतरावर गेला तेव्हा अचानक काही कुत्रे भुंकत त्याच्याकडे येऊ लागले, त्याला भोवळ आली आणि तो पडला.जेव्हा सुधीर ने डोळे उघडले, सकाळ झालेली होती. समोर त्याचेच काही सहकारी, आणि काही लोक होते. त्या ट्रक ड्रायव्हर ने सुधीरला पडलेले पाहिले होते आणि त्याची मदत केली होती. कर्मचाऱ्यांना ते प्रेत शव वाहिनी जवळ छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडलं.
सुधीर जिथे पडला होता तिथंच समोर एक दत्ताच मंदिर होत.सुधीर चे दैव बलवत्तर म्हणून तो वाचला.... त्या कुत्र्यांमुळे ..!!!! Sunil Tarwal
नमस्कार मी वर्धान माने
रत्नागिरीतील राजापुर मधे घडलेली ही अंगावर काटा आणणारी ही घटना।
2007 सालची घटना असेल। त्यावेळी मी सातवीत शिकत होतो. शाळएत जाण्याचा मार्ग हा पर्या(पावसातील व्हाळ किंवा वाहणारे पाणी) वरून जातो..
दुसरा कोणताही रस्ता नसल्याने त्याच रस्त्यावरून आम्हास जावे लागे। संध्याकाळी पारावर गोष्टी करणारे म्हातारे म्हणत की त्या पर्यावर काहीतरी अमानवी शक्ति आहे। पण आमच वय खेळण्या बागड्न्याचे असल्याने आम्ही नेहमीच त्या गोष्टिकड़े दुर्लक्ष केला।
माझा एक जिवलग मित्र अमित आणि मी नेहमीच त्या वाटे वरून शालेत जात असू।
आम्हा दोघाना शिक्ण्यापेक्षा मस्ती करायलाच आवडे। म्हणून एक दिवस आमच्या घरी आजीचे श्राद्ध आहे अस खोट सांगुन आम्ही दोघेही घरी यायला निघालो।
म्हाळवसाचे ते दिवस।
दुपारच्या प्रहरात आम्ही दोघे चालत होतो। सभोवती दाट झाडी।
पोटात भुकेने डोम उसळलेला।
वाटेत काजूची बोंडे, करवंद खात मज्जा मस्ती करत चाललो होतो.
पर्याजवळ आलो। तेवढ्यात अमित म्हणाला की या पर्यामधे एक 'आटकं' नावाचं झाड आहे। त्याची आंबटगोड़ फळ मस्त लागतात.
माझ्याही तोंडाला पाणी सुटल।
पण पारावर ऐकलेल्या त्या अमानवी शक्तीचा विचार माझ्या मनात चमकून गेला।
पण 'आटकं' च्या आंबट गोड़ चविपुढ़े सर्व फ़िक वाटल।
('आटक' हे कोकणात मिळनारे एक फळ आहे। आंबटगोड चवीचं। तिखट मीठ लावून खायला मजा येते).
दोघेही त्या झाडावर चढलो। लाल रक्ताच्या रंगाची ती फळ बघून दोघेही सुखावलो।
दोघानिही फळ काढायला सुरुवात केली।
एक खिसा भरला तस मी खाली उतरलो.
पण अमित मात्र तसाच झाडावर बसून जास्त फळ काढण्याचे अपेक्षेने बसून राहिला। मी तिथल्याच एका दगडावर बसून फळ खावु लागलो।
तेवढ्यात झाडाच्या पाचोल्यातिल कुरबुर माझ्या कानावर पडली। मी दुर्लक्ष केला। पानाची सळसळ वाढली। तस मी मागे पाहिल आणि माजी बोबडी वळली।
हिरव्या रंगाची साडी केस विस्फार्लेली एक बाई नजर रोखून आमच्या दोघंकड़े पाहात होती। मला घाम फुटला। तोंडून शब्द फूटेना। माझा मित्र ते भयावह दृश्य पाहून झाडावरुन खाली कोसळला। दगडावर आपटला. 
त्याच्या डोक्यातून रक्ताचा पुर निघाला। ती भयावह बाई त्या रक्ताकड़े एक टक पाहू लागली। आणि क्षनार्धात ते रक्त चाटून पिउ लागली।।
माझ्या तर हातापायातील अवसानच संपले. रक्त पिवुन झाल्यावर तिने आपला मोर्चा माझ्या बेशुद्ध मित्राकडे वळवला।
हीच ती काहीतरी करण्याची वेळ होती। नाहीतर मी माझ्या मित्राला कायमचा गमवून बसलो असतो।
ती मित्राच्या जवळ पोचली। इतक्यात माझ्या गळ्यात असलेल्या जानव्याची( मुंज झाल्यावर सुतार ब्राम्हण आणि सोनार यांच्या गळ्यात एक धागा बांधतात त्याला यद्नोपवित असे सुद्धा म्हणतात) गाठ हाताशी धरली आणि आजोबानी शिकवल्या प्रमाणे गायत्री मंत्राचा जप सुरु केला। भीती ने उच्चार स्पष्ट होत नवते। तरीही दोनचार वेळा प्रयत्न केला। 
त्या बाइने मोर्चा माझ्याकडे वळवला तसा मी जोरजोरात मंत्रोच्चार चालु केला।
त्या बाईने आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यावर घेतले। कदाचित माझ्या मंत्राचा असर असावा। आणि जोरात ओरडू लागली थांबव थाम्बव।
पण मी मात्र मंत्र चालु ठेवला। आणि माझ्या डोळ्यादेखत ती बाई नाहीशी झाली.
मित्राच्या जवळ गेलो। त्याच्या तोंडावर पाणी मारल। शुद्धित आला। तसा रडू लागला।
डोक्याला भली मोठी जखम झालेली। कसाबसा धरून वगेरे घरी आणला।
झालेला सर्व प्रकार अख्हया गावाला कळला। मित्राच्या जखमेवर गावतल्या ड़ोक्टारने मलमपट्टी केली।
अख्ख्या गावाने कौतूक केल की फक्त तुज्यामुलेच अमित च जिव वाचला आहे।
घरी येउन आजोबाना सांगीतल तर ते बोलले की मुंज झालेल्या मुलाच्या जानव्यामदे खुप ताकत असते। भुत किंवा अतृप्त शक्ति सहसा जवळ येत नाहित।
त्या पर्याजवळ 10 वर्षांपूर्वी एक बाई बुडून मेली होती। 3 महिन्याची गरोदर असताना मेलेली ती बाई अतृप्त इच्छा असल्याने हडळ झाली( गरोदर स्त्री मृत झाली की तिची पुढे हडळ होते).
तिच्या प्रेतावर अंतिम संस्कार न झाल्याने तिने हडळ बनुन सर्वना त्रास देण्यास सुरुवात केली।
पुढे गावकरयानी शालेत जाण्यासाठी एक नवा रस्ता केला। आजही सर्व मूल नविन रस्त्यावरून च शालेत जातात।
जुन्या रस्त्या वर कुंपण घातले आहे।
या प्रकारा बदल ची सत्यता पड़तालुन पाहण्याचा पुढे कुणी प्रयत्न केला नाही पण
आजही तो प्रसंग आठवून अंगाचा थरकाप उडतो।।
·" चकवा "सचिनचं आत्ता लग्न होऊन ५ वर्ष झाली, छोटी पिंकी ...त्याची मुलगी त्याला म्हणाली, " ए बाबा आमच्या वर्गातला आशुतोष आणि त्याची Family त्याच्या आजीला घेऊन त्या अभयारण्यात सहलीला गेलेत, आपण पण जाऊया ना रवीवारी " अभयारण्य आणि सहल हे ऐकताच सचिनचं मन सुन्न झालं, एका क्षणासाठी तो निशब्द झाला आणि त्याला आठवली ती घटना जी कॉलेज मध्ये असताना घडली होती , साधारण १० वर्षांपूवीची ती घटना आत्ता २०१६ साली त्याच्या छातीत धडकी भरून गेली, त्याने स्वाती कडे बघितलं , तिच्या चेह्र्यावरचे भाव हि तसेच काहीसे भयभीत होते , कारण सचिन आणि स्वाती हे वर्गमित्र पुढे प्रेमात पडले आणि लग्नाच्या बेडीत अडकले.इथे मुद्दाम त्या अभयारण्याचं नाव मी टाकत नाही, पण ह्या घटनेनंतर पनवेलच्या त्या मुलांनी उभ्याआयष्यात अभयारण्यात सहलीला जाण्याचा विचारच मनातून काढून टाकला.सचिन ,समीर,स्वाती आणि गुरुवांजली हे चार मित्र पनेवलच्या पिल्लई कोलेजचे विद्यार्थी. चौघांना ट्रेकिंग आणि जंगलात जाऊन रात्री वस्ती करणं, वनात जाऊन जेवण करणं , खेड्यापाड्यात फिरणं ,डोंगर माथा बघणं ह्यात जास्त रस. समविचारी म्हणून ह्यांची मैत्री अधिकच घट्ट झाली.हिवाळ्याचेदिवस, फेब्रवारी महिना साल १९९८, कसल्यातरी सरकारी सुट्ट्या आल्या, सुट्ट्या पण अश्या आल्या कि सलग शुक्रवारपासून ते थेट सोमवारपर्यंत. ह्यावेळी सहलीला त्यांनी पनवेल नजीकचं अभयारण्य निवडलं, पण हि सहल आपण आपल्या कुटुंबियांसोबत करण्याची कल्पना स्वातीने सुचवली, प्रत्येकाच्या घरातील काही सदस्य तयार हि झाले, नजीकच अभयारण्य आहे म्हणून सगळे तयार हि झाले, शुक्रवारी सकाळी १० वाजता समीरच्या बिल्डींग खाली गाडी आली, "टाटा विंगर", समीर आणि त्याचे कुटुंबीय खाली येऊन गाडीत बसले, असं करता करता आत्ता त्या चौघांचेही कुटुंबीय गाडीत बसले, सगळे मिळून साधारण १२-१३ जण होते, गाडी पनवेलहून बाहेर पळस्पा फाटा पार करून मुंबई गोवा हायवेवर असलेल्या नजीकच्या अभयारण्यात पोहोचली. गाडीतून सगळ्यांनी आपापलं सामान बाहेर काढलं, तिकीट घरातून तिकिटं घेतली आणि गाडी वाल्याला सांगितलं"तू उद्या ये दुपारी २ वाजेपर्यंत, आम्ही इथेच असू "आत्ता सगळेजण चालत चालत गप्पा मारत जंगलाकडे निघाले, आजचा बेत म्हणजे जंगलात वस्तीचाच होता. तिकीट घरापासून साधारण २ किलोमीटर आतमध्ये जंगलात पोहोचल्यावर ते सगळे थांबले.थोडा वेळ विश्राम करून पुन्हा निघाले, वातावरण एकदम खेळीमेळीचं,सगळेजण एकमेकांचे मजा मस्करी करत होते , अभयारण्य म्हणजे एकदम दाट जंगल, पाखरांचे आवाज कानावर पडत होते , झाडाझुडपातून माकडं उड्या मारत होते, असानिसर्ग आणि तो पण पनवेल शहराच्या एवढ्या नजीक आहे, आणि आपण इथे कधी आलोच नाही ......सगळ्यांच्यातोंडातून हे एकच वाक्य निघत होतं.बघता बघता साधारण ३ तास चालल्या नंतर आत्ता त्यांना एक मनमोहक जागा सापडली. एका बाजूला डोंगर, घनदाट झाडांची गर्दी, थोड्या अंतरावर संथ वाहणारी नदी आणि शांत आरण्य.बघता बघता संध्याकाळचे ४ वाजले, त्या सगळ्यांनी आपआपले तंबू उभारायला सुरवात केली, आणि बघता बघतातासाभरात तंबू उभे हि झाले.सचिन ,समीर,स्वाती आणि गुरुवांजली पुढे आले आणि ह्या चौघांनी आत्ता पुढचा बेत सर्वांसमोर मांडला.सगळेजण सतरंज्या टाकून गोलाकार बसले, गप्पा रंगल्या. सूर्य डोंगरा आड गेला आणि संध्याकाळी ६ वाजताच अरण्यात काळोख व्हायला सुरवात झाली, काही उमेदवारांनी इकडून तिकडून लाकडं जमवायला सुरवातकेली, आणि मधोमध त्यांनी जाळ पेटवला, ३-४ जण जेवणाच्या तयारीला लागले, सोबत आणलेल्या कोंबड्या कापल्या, एकीकडे ह्या चौघांचे नातेवाईक सतरंजीवर बसून मस्त गप्पा मारत होते, तर दुसरीकडे एक टीम जेवणाच्या गडबडीत, काहीजण चूल पेटवायला लाकडं गोळा करण्यात मग्न होते, आत्ता अंधार पार दाटलेला, पक्षांचे आवाज बंद होऊन रातकिड्यांचे आवाज कानावर पडत होते, आजूबाजूच्या झुडपातून मधूनच सरपटणारे निशाचर पालापाचोळयाचे आवाज करत होते. दिवसा रोमांच निर्माण करणारं ते निसर्गरम्य अभयारण्य रात्रीच्या अंधारात मात्र आत्ता भयावह आणि आपलं आक्राळ विक्राळ रूप दाखवायला लागलं.मोठमोठ्या वृक्षांच्या त्या महाकाय सावल्या वातावरणात अजून भय निर्माण करत होत्या . त्या १२-१३ जणांपैकी काहीजण ह्या वातावरणाचा विलासित आनंद लुटत होते, तर काहीजण मनातून घाबरून जायला लागले होते.दगडं लावून चुले पेटवायला सुरवात झाली, त्यांनी एकूण ३ चुले पेटवले, एकावर मोठं टोप ठेवून त्यावरभात ठेवला, दुसरीकडे टोपात चिकनचा मसाला भाजायला घेतला आणि तिसरा चुला आत्ता पेटायला सुरवात झालीच होती.तिथून साधारण १० फुटांवर बाकी मंडळींची मैफिल रंगली होती. इतक्यात एक आवाज आला....." मी येऊ का"एका बाईचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडला. सगळेच जण एका सेकंदात गप्प झाले , आजूबाजूला बघितलं कोणीच नव्हतं. तिकडे १० फुटांवर जे लोकं जेवणाच्या गडबडीत होते त्यांना पण हा आवाज त्यांच्याजवळऐकायला आला, ते पण थांबले. पण तिकडे कोणीच नव्हतं. आवाज तर एखाद्या वयोवृद्ध बाईचा होता, पण ह्यांच्या गटात तसं वयोवृद्ध कोणीच आलं नव्हतं. काहींनी एकमेकांना प्रश्न केला ..." कोण ओ , कोणी आवाज दिला "" काही समजलं नाही बुवा, आम्हाला पण इकडे आवाज आला"पुढे साधारण ५-१० मिनिटं हा आवाज पुन्हा आला नाही, दुर्लक्ष करून प्रत्येकजण पुन्हा आपल्या मूड मध्ये रमले.आत्ता भात तयार झाला, टोप खाली उतरवलं गेलं, सोबतीला चिकन हि तयार झालं, थर्मोकोलची ताटं सगळ्यांसमोर वाढली, जेवणं वाढायची सुरवात झाली आणि अचानक कसला तरी आवाज झाला, सगळ्यांनी चुल्याकडे बघितलं, चुल्याची राख आणि जळत्या निखाऱ्यांचा ठिणग्या हवेत उडत होत्या, पेटती फाटी इकडे तिकडे उडाली." हे अचानक काय झालं, म्हणून त्यांच्यातले दोघेजण पुढे गेले, त्यांना वाटलं झाडाची एखादी फांदी विस्तवावर पडली असावी, त्यांनी पुढे जाऊन बघितलं पण तिथे तसं काही दिसलं नाही.चुल्याची दगडं इकडे तिकडे गेलेली, पेटती फाटी ३-४ फुटांवर अश्या प्रकारे उडाली होती, कि जसं काय कोणीतरी लाथ मारून चुला उडवला असावा.नक्की काय झालं कोणालाच समजेना, सगळेच जण मनातून दचकलेले, काहींनी थोड्याच वेळात विषयाची मुद्दामटाळाटाळ करत सगळ्यांचं लक्ष जेवणाकडे वळवलं.आत्ता पुन्हा सगळे हसत मस्करी करत जेवायला लागले, गुरुवांजली ने विचारलं " कोणाला काही लागलं तरसांगा हो, लाजू नका "" हो हो नक्की सांगू , तू अजिबात काळजी करू नको " जोशी वहिनी बोलल्या, जोशी वहिनी म्हणजे स्वातीच्या भावाची बायको.जोशी वहिनिंचं बोलणं पूर्ण होताच वरून झाडावरून आवाज आला" मी येऊ का "आत्ता आलेला आवाज म्हणजे एक विचित्रच आवाज होता, एवढ्या मोठ्याने आलेला हा आवज ऐकून सगळेजण झटकनताटावरून उठले आणि झाडाखालून बाजूला पळाले. त्यांच्यातल्या महिला तर मोठ्याने ओरडायला लागल्या, मुलं घाबरून रडायला लागली, तरुण मंडळी आणि मोठी माणसं पण मनातून कचरले. सगळेजण एका घोळक्यात एकाबाजूला एकमेकांना धरून उभे होते.एक जण मोठ्याने ओरडला ..." ए कोण आहे, कोण आहेस कोण तू "झाडावरून एक मिश्कील हसण्याचा विचित्र आवाज आला, सिनेमा मालिकात दाखवतात एकदम तसाच ... आणि एक आवाज आला " राखणदार हाय इथली "अचानक गिरीजा गुरव - सचिनची बहिण, घशातून घोगरा आवाज काढायला लागली, हात पाय ताठ केले डोळे फिरवले आणि केसं मोकळे सोडून गरागरा मान फिरवायला लागली , घोगऱ्या आवाजात बोलायला लागली" वेशीवर रक्त सांडवलव, आत्ता मला मान द्या, मान द्या माझा मान "गिरिजाला झपाटलं हे बघून आत्ता सगळेजण अधिकच घाबरले. सगळेजण तिच्यापासून लांब पळाले. ति तशीच त्याच जागेवर हातपाय ताठ करून मान आकाशाकडे करून उभी होती, तिच्यावर मारलेल्या टोर्चच्या प्रकाशात ती स्पष्ट दिसत होती.काय करावं कोणालाच कळेना, त्यांच्यातल्या बायकांनी तर आपल्या लहानमुलांना पदरात कवटाळून डोळे बंद करून घेतले,पुरुष मंडळी एकमेकांकडे बघून काय करावं ह्याचा विचारकरत होते. दाट अंधार, पायाखालचा रस्ता धड दिसेना, आणि बायका मुलांना घेऊन कसं काय इथून निघायचं ह्याच चिंतेत ते सगळे होते.पण समोर उभं असलेलं संकट बघून त्यांच्यातल्या ३ जणांनी तिथून पळ काढलाच, ते त्या आरण्यातून भूत भूत किंचाळत ओरडत पळत सुटले आणि आलेल्या वाटेच्या दिशेने निघून गेले.आत्ता त्यांच्या शिल्लक राहिले हे ९ जण, त्यात ३ महिला आणि लहान मुलं. गिरीजा त्यांच्या समोर हात पाय ताठ करून डोकं आकाशाच्या दिशेने मान वर करून तशीच उभी होती. आत्ता सगळेच जण भीतीने गप्प बसलेले, किर्र शांतता आणि आकाशातून उडणाऱ्या टिटवीचा आवाज. त्या भयाण शांततेने कानावर दडे बसल्या सारखं सुन्न वाटायलालागलं होतं.इतक्यात पाठीमागून नदीत कसला तरी आवाज ऐकायला आला, हळू हळू आवाज नजीक येतोय जाणवायला लागलं, मासेमारी साठी नदीत कोणाचीतरी मोटर बोट फिरत असावी, ह्यांच्यातल्या सचिन आणि समीर ने क्षणाचा हिविलंब न करता मोठ मोठ्याने आवाज द्यायला सुरवात केली ..." वाचवा वाचवा , कोणीतरी वाचवा , ओ ओ वाचवा " पण ह्यांचां आवाज ऐकताच त्या मोटरबोटीने वेग वाढवला आणि ५-१० मिनिटात तो आवाज लांब निघून गेला.आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी ह्या अरण्यात असे ओरडण्याचे आवाज ह्या आधी कधीच ऐकले नव्हते, ह्या अरण्यात आजपर्यंत रात्री वसतीला कोणीच राहिलं नसावं. आणि आराण्यातल्या भूत कथा काही गावातल्या लोकांना नवीन नव्हत्या.ह्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बहुदा ती बोट ह्यामुळेच निघून गेली असावी.थोड्याच वेळात पुन्हा गिरीजा घशातून घरघर करत आवाज करायला लागली, आवाज दिला" मान द्या " आणि तिचं शरीर थरथर हलायला लागलं ते तसच हलत राहिलं.त्यांच्यातल्या मोहिते काकांनी जवळच असलेलं जेवणाचं ताट तिच्या दिशेने फेकलं. तिने मान खाली वाकवली, पायाजवळ पडलेलं ताट तिने बघितलं, मोहिते काकांनी आणखी एक ताट तिच्या दिशेने भिरकावलं. आत्ता सगळ्यांचं लक्ष गीरीजाकडे लागलं, पुढे काय .....?गिरीजा जमिनीवर बसली, दोन पायाच्या मध्ये ताटं ओढली आणि बकाबका चिकन खायला लागली. दोन्ही ताटातलं चिकन खाऊन झाल्यावर ती उठली आणि मागच्या दिशेने अरण्यात धावत सुटली ....तिच्या मागे मोहिते काका आणि सचिन धावले , " गिरीजा गिरीजा थांब गिरीजा "पण ती भरधाव वेगाने त्या झुडपातून पळत कुठे नाहीशी झाली काही दिसलंच नाही. त्या घनदाट जंगलात आणखी पुढे धावत जायला ते दोघेही घाबरले. इकडे बायका मोठ मोठ्याने पुन्हा रडायला लागल्या. लहान मुलांनी पण कल्ला करून रडायला सुरवात केली, इतक्यात मोहिते काका मोठ्याने ओरडले .." गप बसा , गप्प बसा सगळ्यांनी "आणि एका क्षणात सगळे एकदम गप्प झाले. काय करावं सुचेना, ह्या सगळ्या गोंधळात साधारण एक दीड तास निघून गेला, रात्रीचे ११ वाजले. काय करावं सुचेना.ते लोकं एकमेकांशी संवाद साधून काय करावं हे हळू आवाजत बोलत होते, इतक्यात त्यांना डबक्यातून कोणीतरी पाणी काढतोय असा आवाज कानावर आला, कळशी पाण्यात बुडवल्यावर जसा ..बुड बुड आवाज येतो तसा.त्यांचतले दोघे तिघेजण टोर्च मारत आवाजच्या दिशेने पुढे गेले, थोडं अंतर पुढे गेल्यावर त्यांनी आवाजाच्या दिशेने टोर्च मारली, पाठमोरी बसलेली एक म्हातारी दिसली, कातळाच्या डवऱ्यातून पाणी काढून समोर झुडपात फेकत बसलेली. म्हातारी एखादी आदिवासी असावी, काया एकदम सुकलेली पांढरे फटक आणि अंगावर फाटकं लुगडं.मोहिते बोलले " कोण आहेस "म्हातारीने आवाज दिला " राखणदार "हे ऐकताच त्यांची बोबडी वळली, राखणदार म्हणजे हिच भुताटकी ....त्यांच्यातल्या समीर आणि सचिन ने मोहिते काकांचे दोन्ही हात घट्ट पकडले.पण काका थोडे धीट होते, त्यांनी पुन्हा आवाज दिला..." तुझा मान तुला दिला गिरीजा कुठं आहे "" म्हातारी मोठ्याने हसली आणि तिथून उठून इतक्या वेगाने निघून गेली कि हे लोकं तिच्यावर टोर्च मारतच होते कि ती नाहीशी झाली. डवऱ्याच्या बाजूला झुडपात गिरीजा कातळावर आडवी पडलेली आणि हि म्हातारी तिच्या अंगावर पाणी ओतत बसलेली.म्हातारी तिथून नाहीशी होताच हे तिघे गिरीजा जवळ गेले, तिच्या तोंडाला चिकनचा रस्सा लागलेला आणिअंग पाण्याने भिजलेलं. ह्यांनी तिला उचलली आणि पटापट मागे वळून चालायला लागले....समोर दूरवर त्यांना गाडीच्या प्रकाशासारखं काहीतरी दिसलं, म्हणून पावलं पटापट टाकत ते तिथे पोहोचले, गिरिजाला जमिनीवर ठेवलं. समोर पोलिसांची गाडी उभी होती. ह्यांच्यातले जे तिघेजण तिथून पळून गेलेले , त्यांनी हायवेवरून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना तिथे आणलं होतं.पोलिसांना समोर बघताच त्यांच्या जीवात जीव आला. थोड्याच वेळात पोलिसांनी सगळ्यांना तिथून बाहेर काढलं आणि जबाबासाठी पोलीस ठाण्यात नेलं, गिरिजाला सरकारी हॉस्पिटल मध्ये एडमिट केलं.घडला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला.ठाण्यात उभा असलेला हवालदार त्यांना बोलला, " आहो नको ते उद्योग करायला जाता कशाला जंगलात , तुम्हाला माहिती आहे काय, ह्या अभयारण्यात जनावरांनी कित्येक आदिवासींना खाल्लं आहे,ह्या अभयारण्यात असे भुताटकीचे खूप प्रकार घडतात, नशीब चांगलं होतं ती पोर वाचली"दुसऱ्या दिवशी पहाटे ते सगळे पुन्हा आपापल्या घरी परतले, आणि अश्या पद्धतीच्या सहली उभ्या आयुष्यात पुन्हा कधीच काढायचा नाही हा निर्धार केला.

Ganesh R Retwade
सत्य घटने वर आधारित कथा
!!!बाळंतीन ....!!
स्वातीला अगदी कॉलेज पासून भुतांच्या कथा वाचण्यात रस होता, कॉलेजात
शिकत असताना तर ती फेसबुकवर भूतांवर ब्लॉग पण लिहायची, गावाला गेली की एखाद्या वयोवृद्ध
व्यक्तीने काही अनुभवलेली गोष्ट सांगितली की स्वाती त्या कथेत थोडा मसाला टाकून
लगेच ती उतरवून काढायची. पुढे स्वातीचं लग्न झालं, पण तिने हा छंद काही सोडला नाही.
साल २००४ ला तिचं अविनाश सोबत लग्न झालं आणि ती संसारात रमली.
नवरा तहसील कचेरीत क्लार्क म्हणून कामाला होता, तो कामावर गेला की स्वाती आपला
संगणक चालू करून भूतांवर कथा लिहायला बसायची.
आता लग्न होऊन ३ वर्ष झाली आणि २००७ साली ती गरोदर राहिली. म्हणून
अविनाशने तिला ७ व्या महिन्यातच माहेरी पाठवून दिली. घरात वातावरण आनंदाचं, त्यात ७
व्या महिन्यात माहेरी आलेल्या स्वातीची खूप देखरेख चालली होती. तिची आई तर तिला
दिवसभर गोडधोड खायला घालत होती, वडील बाजारात तालुक्याच्या ठिकाणी गेले की
आवर्जून तिच्यासाठी केळी सफरचंद आणायचे. स्वातीचा नवरा तालुक्याच्या ठिकाणी
खरवलीला कामाला होता. स्वातीचं माहेर, उसर हे खरवली पासून साधारण १०-ते १२
किलोमीटर अंतरावर, गाव तसं खूप लहान, वस्ती असेल साधारण ५०-६० घरांची.
माहेरी येताना स्वातीने सोबत laptop पण आणला होता, भरपूर वेळ मोकळा
मिळायचा, या फावल्या वेळात ती सतत काही ना काही हाॅरर सस्पेन्स कथा लिहून काढायची.
एकदा तिच्या आईने तिला सहज विचारलं. . .
" काय ग स्वाते हे दिवस रात्र बसून काय लिहून काढत असतेस?"
स्वातीने तेच जुनं उतर दिलं. . . . " अगं आई, काही नाही सहज भुतांच्या कथा
लिहित असते "
हे उत्तर ऐकून तिच्या आईच्या संतापाचा पारा चढला आणि ती म्हणाली "ती औदसा अजून
तुझ्या डोक्यातून गेली नाय काय, लग्नाच्या आधी कॉलेजात असताना ठीक होतं सगळं, आता
गरोदर आहेस आणि हे काय दळभद्री लिहित असतेस, पोटात बाळ आहे तुझ्या देवा धर्माची
पुस्तकं वाचायची सोडून हे काय भलतंच "
स्वातीने आईचं बोल टाळून तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा उशिरा रात्रीपर्यंत कथा लिहायला बसली.
स्वातीच्या वडिलांच्या घराच्या मागच्या मैदानातच होळीचं मैदान होतं, त्या पलीकडे नदी आणि नदीच्या पलीकडे ५ गावांचं स्मशान. स्वाती खिडकी उघडी ठेवून थंडे वारा घेत लेख लिहित होती, अधून मधून पुढचं सुचावं म्हणून ती खिडकीतून बाहेर बघून विचार
करायची, पुन्हा लिहायची. त्या रात्री साधारण १२ - १२:३० झाले असतील. खेडे गावात लोकं
लवकर जेवणं आटोपून झोपून जातात, म्हणून गावात कसलाही आवाज ऐकू येत नव्हता, बाहेर
रातकीड्यांचा आवाज, आणि होळीच्या मैदानात भटकी कुत्री दिसत होती. स्वातीला सस्पेन्स असं काहीतरी दिसलं वाटलं की तिला रोमांच यायचा. लेख लिहिता लिहिता साधारण १- १:३० च्या सुमारास त्या होळीच्या मैदानात कुत्री रडायला लागली. सगळेच्या सगळे कुत्रे एकदाच रडायला लागले. त्यांच्या आवाजाने तिच्या आईची झोपमोड झाली. पलीकडच्या खोलीतून ती काहीतरी बडबड करायला लागली आणि पुन्हा झोपली. कुत्र्यांचा आवाज त्या मैदानात खुपवेळ येत होता म्हणून स्वातीने घराचा मागचा दरवाजा उघडला आणि ती दरवाजात उभी राहून निरखून बघत होती, जवळच थोड्या अंतरावर तिला कुत्र्यांचा कळप वर तोंड करून रडताना दिसला. मैदानात चंद्राचा प्रकाश पडलेला. तिने एक खडा उचलला आणि त्या कुत्र्यांना फेकून मारला. दगड फेकून मारताच त्या कुत्र्याचं रडणं थांबलं. स्वाती पुन्हा घरात आली, दरवाजा बंद करणार इतक्यात तिला दरवाजातून आत कोणीतरी चालत आल्याचा भास झाला. ती मनातून थोडी घाबरली, तीने पुन्हा बाहेर डोकावून बघितलं, वळून मागे घरात बघितलं पण
काहीच दिसलं नाही. दरवाजा बंद करून ती पुन्हा खाटेवर येऊन बसली, laptop मांडीवर
ठेवला आणि पुन्हा आपला लेख लिहायला बसली. लेख लिहिताना तिची नजर laptop कडे
होती पण बाजूला उघड्या खडकीत कोणीतरी उभं असल्याचा तिला भास झाला, नजरेने
बाजूला काहीतरी हालचाली होत आहेत असं वाटायला लागलं, पण खिडकीकडे बघण्याची तिची हिंमत होईना. आता तो कुत्यांचा कळप तिच्या खिडकीपाशी येऊन रडायला लागला. एकदाच रडायला सुरवात केलेल्या त्या कुत्र्यांच्या आवाजाने तिच्या आईची झोपमोड झाली आणि ती उठून स्वातीच्या खोलीत आली, आई खोलीत येताच त्या खिडकीची झाप खाड करून जोराने आपटली गेली. . . . एवढा जोरात आपटलेल्या त्या झापेच्या आवाजाने स्वाती दचकली आणि हातातला laptop गादीवर टाकून ती झटकन उभी राहिली.
तिच्या आईला खिडकीत कोणीतरी दिसलं होतं. . . ती स्वातीला म्हणाली. . "स्वाती खिडकीत कोण होतं गं? "
स्वाती म्हणाली " कोणीच नाही "
तिची आई पुन्हा म्हणाली. . . " नाही नाही स्वाती कोणीतरी होतं खिडकीत,
आणि ती कुत्री पण रडत होती, पोरी वाईट लक्षण आहे, तू चल इथून चल आमच्या सोबत आपण बाजूच्या खोलीत जाऊन झोपू "
स्वातीपण मनातून थोडी घाबरली होती, तिने laptop बंद केला आणि ती तिच्या आई सोबत बाजूच्या खोलीत झोपायला गेली.
तारीख होती १८ जुलै २००७,
स्वातीचं बाळंत होण्याची चिन्ह दिसू लागली, हळू हळू तिच्या पोटात कुरकुर
व्हायला लागली, लगेच तिच्या वडिलांनी गावातीलच रिक्षा बोलावली आणि ते तिला गावातल्याच सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर शिंदेंनी तिला तपासली आणि वेळ दिली संध्याकाळी साधारण ७-८ च्या दरम्यान डिलीवरी होईल. तिच्या वडिलांनी अविनाशला फोन करून कळवलं, अविनाश कामावर होता, म्हणाला संध्याकाळी कामावरून थेट गावात येतो.
आता संध्याकाळ झाली ८ वाजले आणि स्वातीच्या पोटात दुखणं चालू झालं, डॉक्टर आले, आणि
नर्सने तिला OT मध्ये नेलं. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला नदी होती, स्वातीला आत OT मध्ये
घेऊन गेले, तिच्या ओरडण्याचा आवाज यायला लागला आणि बाहेर खिडकीच्या मागे कुत्र्यांचा कळप जमून मोठ्याने रडायला लागला. कुत्र्यांचा रडण्याचा आवाज बाहेर बसलेल्या लोकांना स्पष्ट ऐकू येत होता, तिची आई तोंडातल्या तोंडात त्या कुत्र्यांना शिव्या द्यायला लागली. . . . . .
"ही मेली कुत्री काल पासून रडत आहेत, जा हो बघा जरा, दगड घाला आणि हाकला त्यांना "
स्वातीचे वडील उठून बाहेर गेले आणि कुत्र्यांना दगड मारणार, इतक्यात ते
थांबले, त्यांनी बघितलं की OT च्या खिडकी बाहेरून कोणीतरी बाई आत त्या खोलीत चोरून डोकावत होती. अंधुक चंद्राच्या उजेडात त्यांना ती स्पष्ट दिसत नव्हती पण लांब केस आणि अंगावरची साडी त्यांना स्पष्ट दिसत होती. ते मोठ्याने ओरडले. . . " ए. . कोण आहे. . . ए "
त्यांनी आवाज दिला आणि ती आकृती तिथून क्षणात नाहीशी झाली, दगड न मारताच तो कुत्र्यांचा कळप भुंकत भुंकत नदीच्या कडेने पळत सुटला. . . . .
स्वातीच्या वडिलांना हा प्रकार काहीसा विचित्र वाटला. . . . पण त्यांच्या डोक्यात टेन्शन होतं स्वातीच्या बाळंतपणाचं. ते आत आले आणि बाकडावर बसले.
बाहेर आपल्याला काय दिसलं हे स्वातीच्या आईला सांगणार इतक्यात नर्स बाहेर आली आणि म्हणाली " मुलगा झाला आहे " थोड्यावेळाने तुम्ही आत जाऊ शकता.
स्वातीच्या आई वडीलांचा चेहरा आनंदाने फुलला, कारण मुलीची पहिलीच डिलीवरी होती, इतक्यात जावई बापू आले, येताना सोबत मिठाई घेऊनच आले होते. आनंदाने उत्साहित झालेल्या अविनाशने संपूर्ण हाॅस्पीटल मध्ये असलेल्या स्टाफला मिठाई वाटली. . . . थोड्या वेळाने त्यांना आत जाण्याची परवानगी मिळाली आणि त्यांनी बाळाला पाहिलं,
बाळ
गोंडस होतं, सुदृढ होतं.
बघता बघता रात्रीचे ११ वाजले, स्वातीची आई म्हणाली
"मी थांबते हिच्या जवळ तुम्ही दोघे जा घरी, सकाळी या तुम्ही"
आणि ते दोघे तिथून निघून गेले. स्वाती आणि बाळ खाटेवर होते, बाजूचा बेेड
रिकामा होता, स्वातीच्या आईने तिथेच चादर टाकली आणि ती आडवी पडली. रात्र वाढत
गेली. . . . . . आणि ती रात्र काळरात्र बनायला लागली. आपलं भयाणक रूप धारण करायला लागली.
रात्री हाॅस्पीटल मध्ये फक्त २ नर्स होत्या, आज नेमकं तिथे अजून कोणी रुग्ण ही नव्हते. आता
त्या हाॅस्पीटल मध्ये फक्त स्वाती तिची आई आणि त्या २ नर्स.
बघता बघता २ वाजले, स्वातीच्या आईला कसला तरी आवाज आला म्हणून
तिने डोळे उघडले, तिला त्या हाॅस्पीटलच्या खोलीत कोणीतरी फिरत असल्याचा भास झाला,
तिने तसंच खाटेवर पडून आपली नजर त्या खोलीत फिरवली, बल्बच्या उजेडात तिला सावली
फिरताना दिसत होती पण आकृती दिसत नव्हती. तिला भीतीने घाम सुटला, तिने हळूच
स्वातीला हात लावला. . . पण स्वाती गाढ झोपेत होती, आता मात्र पायाचा घसपटण्याचा
आवाज स्पष्ट ऐकू यायला लागला. खाटेवर बाळ आहे या विचाराने मनातली भीती झटकून तिची आई ताड करून उठून खाटेवर बसली. एक माणसाच्या आकृतीची सावली खोलीतून बाहेर जाताना दिसली पण आकृती काही दिसली नाही . . . . तीने स्वातीला हाक मारली. . . . आणि २ हाताने हलवून तिला उठवलं. .
" स्वाती. . ए स्वाती. . . . आगं उठं, बाय, इथे कोणीतरी आलं होतं खोलीत"
स्वाती झोपेतच होती, डोळे न उघडता ती म्हणाली. . . " अगं नर्स असेल, आली
असेल राउंड मारायला, झोप तू "
तिच्या आईला पण वाटलं आली असेल एखादी नर्स. . . म्हणून ती पुन्हा खाटेवर आडवी पडली. किमान १५-२० मिनिटं ती तशीच डोळे उघडे ठेवून पडून राहिली आणि कधी तिचा डोळा लागला समजलं नाही. थोड्या वेळाने पुन्हा तिला जाग आली. पुन्हा तोच पायाचा घसपटण्याचा आवाज आणि खोलीत फिरणारी सावली दिसायला लागली. आता मात्र तिची
आई उठून उभी राहिली. . . तिने बघितलं ती सावली आता स्वातीच्या बाळाजवळ होती, बाळ
स्वातीच्या पुढ्यात होतं आणि स्वातीने त्याला आपल्या पदरात घेतलं होतं. सावली स्वातीच्या खाटेजवळ तशीच उभी होती.
स्वातीची आई घाबरली आणि मोठ्याने किंचाळली, स्वाती झटकन उठली आणि म्हणाली
" काय झालं आई "
इतक्यात ती सावली समोरच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि
अचानक गायब झाली. बाहेरून २ नर्स धावत आल्या. . . .
" ओ काय झालं, इतक्या मोठ्याने
कोण ओरडलं? काय झालं "
स्वातीच्या आईला घाम सुटलेला पाय थरथर कापत होते, " इथे सावली उभी
होती, बाळाच्या जवळ उभी होती. . . . . . . . . . "
बाळाच्या जवळ सावली उभी होती हे ऐकताच स्वातीने बाजूला खाटेवर
बघितलं, खाटेवर बाळ नव्हतं.
ती मोठ्याने ओरडली. . . " आई, बाळ कुठे आहे? "
बाळ खाटेवर नाही हे बघताच त्या नर्सने खाटेखाली बघितलं, पण बाळ तिथे सुद्धा नव्हतं.
आता मात्र आरडाओरड सुरू झाली, स्वातीची आई मोठ्याने ओरडली. . . . "
भुताटकी झाली, हो भुताटकी झाली इथं, मी बघितली डोळ्याने, सावली फिरत होती या खोलीत "
तिची आई आणि त्या २ नर्स धावत हॉस्पीटल मधून बाहेर निघाल्या आणि जवळच असलेल्या घराचा दरवाजा वाजवून त्यांना उठवलं, झाला प्रकार सांगितला, आणि
बघता बघता गावात बोंबाबोंब झाली. अख्खा उसर हाॅस्पीटलच्या बाहेर जमा झाला, अविनाश आणि स्वातीचे वडील पण धावत आले. बाळ गायब झालं हे ऐकताच गावातले १०-१२ लोकं हातात टाॅर्च घेऊन हाॅस्पीटलच्या मागच्या बाजूला धावत गेले, धावाधाव चालू झाली. इकडे
Ankita Shede Jawalkar
Ankita
अविनाश आणि स्वातीचे वडील स्वातीच्या खोलीत गेले, स्वाती केस मोकळे सोडून मान खाली घालून खाटेवर बसलेली.
अविनाश तिच्या जवळ गेला तिचं सांत्वन करत म्हणाला " काही होणार नाही, मिळेल आपलं बाळ. . . . . "
हे ऐकताच खाटेवर बसलेल्या स्वातीने मान वर केली, आणि दात विचकत हसायला लागली. . . . . .
घोगर्या आवाजात बोलायला लागली. . . . " मिळालं मला माझं बाळ "
पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलत होती. . . . . . . " मिळालं मला माझं बाळ "
आणि एका विलक्षण आवाजात हसायला लागली. . . . स्वातीचं हे रूप बघून गावातल्या म्हातार्या बायका एका क्षणात समजून गेल्या की हिला झपाटलंय. हाॅस्पीटलच्या मागच्या बाजूला गेलेल्या लोकांना नदीच्या बाजूला झुडपाजवळ कुत्र्यांचा कळप दिसला, त्यांनी त्या कुत्र्यांना दगड मारून हाकललं आणि टॉर्च मारत त्या जागेवर पोहोचले. तिथे झुडपात त्यांना ते बाळ दिसलं, ताबडतोब एकाने अंगावरचा टाॅवेल काढला आणि बाळाला त्यात
उचललं, बाळाचा काहीच आवाज येत नव्हता. . . लगेच त्यांनी हाॅस्पीटलच्या दिशेने धाव घेतली. . . . . . .
माणसं धावत आत आली, बाळाला खाटेवर झोपवलं आणि नर्स ना बोलवलं. . . .
. नर्स धावत पळत आल्या त्यांनी बाळाला तपासलं, पण उशीर झाला होता. स्वातीच्या बाळाचे प्राण गेले होते. इकडे स्वाती खाटेवर गुडघ्यात मान घालून दात विचकत खिदळत होती. . . . . . ..
लोकं त्या खोलीच्या बाहेर उभे राहून बघत होते पण आत जायची कोणाचीच हिंमत होईना.
हळूहळू सरकत सरकत काही लोकं आत शिरले. . . . . . स्वाती खाटेवर उभी राहिली. . . . तिने हात पाय एकदम ताठ सरळ केले. . . . केसं झटकून मागे टाकली आणि डोळे पांढरे करून घोगर्या आवाजात पुन्हा बोलायला लागली. . . . . .
" माझं बाळ मिळालं मला. . . . .हा हा हा हा हा हा हा हा"
काय करावं कोणालाच सुचेना, गावात कोणी मांत्रिकही नव्हता जो त्यांची मदत करू शकेल. आता साधारण ५ वाजायला आले होते. . . .
लोकं वाट बघत होते सुर्यप्रकाश होण्याची. हळू हळू आकाशात प्रकाश व्हायला लागला आणि गावातल्या ६-७ लोकांनी पकडून स्वातीला रस्सीने बांधली. . . . आणि आता तिला गावातल्या जागृत गावदेवीच्या मंदिरात घेऊन निघाले, सगळा गाव मागून चालत होता, आणि त्यांच्या बाजूने थोड्या अंतरावरून २-३ कुत्री भुंकत होती.
निरोप मिळताच तालुक्याच्या ठिकाणाहून ७ वाजता शिंदे डाॅक्टर पण आले,
त्यांनी बाळाला तपासलं आणि सांगितलं “नाही, बाळ गेलं.”
इकडे स्वातीला लोकं मंदिराच्या दिशेने घेऊन चालले होते आणि ती घोगर्या आवाजात जोर काढून लोकांना धक्के मारत होती. . . . . खिदळत होती, चालता चालता वाटेत ३-४ फुट उंच उंच उड्या मारत होती. . . चवताळलेल्या स्वातीला आवरता आवरता गावातल्या लोकांच्या नाकी ९ आले. बघता बघता मंदिर जवळ आलं आणि मंदिर जवळ येताच अचानक स्वाती बेशुद्ध होऊन खाली पडली. . . . . बाजूने भुंकणारी कुत्री भुंकत भुंकत नदीच्या दिशेने पळून गेली. . . . . . . .
गावातल्या म्हातार्या बायकांनी आवाज दिला. . . " गावदेवी पावली, पावली ग
माझी माय पावली, पोरीची सुटका झाली "
बया गेली पळून. . . . . . . पोरगी मोकळी झाली. . . . . . .
लोकांनी स्वातीला उचलून मंदिरात नेली, देवीचा अंगारा तिच्या माथ्यावर लावला आणि तिला थेट हाॅस्पीटल मध्ये घेऊन आले.
डॉक्टरांनी तिला तपासून एक इंजेक्शन दिलं. थोड्याच वेळात स्वाती शुद्धीवर आली आणि आपल्या बाळाची आठवण काढायला लागली.
आपलं बाळ गेलं या दुःखाने अविनाश आणि स्वाती मनातून पार खचून गेले, तर
इकडे स्वातीची आई, तिच्या वडिलांना सांगत होती, ते जे काही होतं ते काल पासून पोरीच्या मागावर होतं. काल रात्री मी खिडकीत पण बघितलं होतं काहीतरी होतं तिथे.
जे काही आजूबाजूला आमानवीय फिरत होतं त्याची चाहूल स्वातीला पण ओळखता आली नाही आणि शेवटी तिच्या बाळाचा जीव गेला.
हाॅस्पीटलच्या नर्सच्या माहिती नुसार १ वर्षापूर्वी इथे एक दिवस बाईकवर एक बाई आणि एक माणूस आला होता, बाई गरोदर होती, तिला प्रसूती कळा यायला सुरवात
झाली म्हणून ते लोकं इथे आले, पण बाईकच्या गचक्यांनी तिचं Complication वाढलं आणि
इथे बाई आणि तिचं मुल दोघेही expire झाले. शिंदे डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्या
लोकांनी इथे यायलाच उशीर केला होता. तो माणूस मुंबईचा होता, इथे कोकणात फिरायला
आलेला, नंतर त्यांचे नातेवाईक आले आणि ते लोकं त्यांना इथून घेऊन गेले. . . . . .
बहुतेक तीच बाई इथे भूत झाली असणार. . . . . . .
ही घटना गावातल्या लोकांना
पण माहिती होती, पण त्यानंतर वर्षभरात तिथे हाॅस्पीटल मध्ये कोणाचीच प्रसूती झाली
नव्हती. म्हणुन इथे भुताटकी आहे याची कोणालाच काहीच माहिती नव्हती.
अधून मधून होळीच्या मैदानात कुत्री रडायची पण त्याकडे लोकांनी कधी एवढं
लक्ष, दिलं नव्हतं.
त्या दिवसापासुन त्या हाॅस्पीटल मध्ये एकाही गरोदर बाईला कोणी घेऊन जात
नाही, एवढंच काय गावातली गरोदर बाई रात्रीच नाही दिवसा पण होळीच्या मैदानाकडे जात
नाही.
Ankita Shede Jawalkar
***समाप्त*** ###
मी सुजित जमादार मित्रहो मी तुम्हाला आज एक वेगळाच किस्सा सांगू इच्छितो जो माझ्या मावशीच्या मुला सोबत झाला होता..
मित्रहो ज्या प्रमाणे आपल्या हिंदू समाजात भूत प्रेत मानल जात त्याच प्रमाणे आपल्या मुस्लीम समाजाच्या बांधवामध्ये देखील " जिन्न " हा प्रकार आढळून येतो..अस म्हणल जात कि काही प्रसिद्ध ठिकाणच्या मस्जिद च्या दरवाज्यामध्ये किवा उंबऱ्यात किवा त्या मस्जिदच्या आवारात 
रात्रीच्या वेळी अल्लाहचे गुलाम असणारे ते जिन्न नामक भूत कैद असतात... जिन्न मध्ये देखील बरेच प्रकार आढळून येतात. काही चांगले तर काही वाईट असतात.. जर वाईट जिन्न कधी एखाद्याच्या मागे लागले तर त्याच आयुष्य उध्वस्त करून टाकतात.. 
तर आजची हि घटना त्यावरच आधारित आहे माझी मावशी आणि तिचा मुलगा म्हणजे माझा मावस भाऊ साहिल (नाव बदललेले ) हे नळदुर्ग(ठिकाण बदललेले ) येथे राहत होते... माझा मावस भाऊ चांगला नौकरीला लागलेला होता..जॉब पण लागला होता त्याला..
शनिवार-रविवार मित्रांसोबत तो बाहेर फिरायला करायला जायचा...साहिल नाव होत त्याच...
तर असाच एक दिवशी सोमवारी संध्याकाळी जॉबवरून तो घरी आला.. हि घटना त्याच्या आईने मला सांगितली होती. जॉब वरून घरी आल्यावर तो दोन एक दिवस त्याच्या खोलीतून बाहेर यायला तयार होत नव्हता... आईने त्याच्या दरवाजा ठोठावला तरी तो बाहेर येत नसायचा.. रात्री अपरात्री त्याच्या खोलीतून चाबकाचे आवाज यायचे..
त्याच्या आई-बाबांनी म्हणजे माझ्या मावशीने व काकांनी त्याच दार कसतरी उघडल आन ते आत गेले.. आणि त्यांनी पाहिलं.. साहिल फक्त बेडवर पडलेला असायचा... आणि त्याच शरीर जस कि कोणीतरी चाबकाने मारतय अस उडायचं... माझ्या मावशीने साहिलला जाऊन धरल पण तो चाबकाचा आवाज तसाच यायचा फक्त 
आणि साहिल तडफडायचा.. अस एकूण ५ दिवस चालल.. साहिलच ऑफिसला जान बंद झाल...होत. माझ्या मावशीने म्हणजे साहिलच्या आईने त्याला सगळ्या दवाखान्यात नेले .. देव-देव केले... सगळ करून झाल.. सहाव्या दिवशी.. तो आपल्या बेडवरून उठला.. आणि घरात फिरायला लागला.. माझी मावशी जागीच होती..
तिला वाटल होत साहिल उठला आहे....जशी साहिलची आई बाहेर आली तिला दिसून आल.. कि पण आज तो स्वतःच किंकाळत सुटला होता.... वेगळच बरळत होता तो उर्दूमध्ये तर कधी वेगळ्याच भाषेत ओरडत होता.. दात खात होता स्वतःच्या अंगाचा चावा घेत होता..साहिलच्या आईने त्याला पकडल आरडा ओरडा केला...त्याचे वडील आणि आजूबाजूचे पण काही लोक आले त्यांनी त्याला पकडून बेडवर थेट बांधलच होत. त्यांच्या शेजारी लोकांपैकी एक जन मुस्लीम बांधव होता.. 
त्यान समजून गेला कि हा काय प्रकार आहे.. त्याने आमच्या मावशीस सांगितले.. कि जवळच एक दर्गा आहे तिथ अल्लाहचे काही अनुयायी राहतात त्यांना " मौलाना " म्हणतो आम्ही. तेव्हा आमच्या मावशीने सर्व उपाय करून पहिले होते तर हा देखील एक करून पहावं... साहिलला घरात बांधून ठेवण्यात आल होत...
आणि त्या माणसाच्या सांगण्यावरून मावशी दर्ग्यामध्ये गेल्या..तिथ त्या माणसाने त्याच्या ओळखीच्या एका मौलाना ला भेटवल...ते मौलाना दर्ग्यामध्ये एका कोपऱ्यात हातात माळ घेऊन जाप करत बसले होते...आमच्या मावशीला पाहताच त्यांनी सांगितल कि मला माहितेय तुम्ही इथ का आलाय ते आमच्या मावशीसोबत आलेल्या त्या माणसाने सांगितल कि ते मौलाना इथले प्रसिद्ध मौलाना आहेत "ये हमारे..! कुरेशी मौलाना है ! " 
त्याचं नाव कुरेशी होत.. त्यांनी आमच्या मावशीला पाहताच त्यांना सांगितल कि आपके घर मे एक बुरा साया है! ज्यो कि एक जिन्न है !" आमची मावशी अवाक राहिली होती...मित्रहो काही सिध्द मौलाना असतात ज्यांनी आपल्या कडे अशी सिधी मिळवली असते कि समोरच्या व्यक्तीच अंतरमन ते जाणू शकतात 
.पण आमच्या मावशीला ते समजल नाही कि जिन्न काय प्रकार आहे हा असला...ती माझ्या मुलाला वाचवा म्हणून त्यांच्या समोर रडली होती.. ते मौलाना त्यांच्या घरी यायला तयार झाले..आणि ते दुसऱ्या दिवशी आपल्या सोबत दर्ग्यातून काहीतरी साधन घेऊन आले.. त्यांनी दर्ग्यामधून मंत्रबद्ध पाणी आणलेले होते... आणि मोरपिसांचा गुच्छा..
घराच्या दारात पाय ठेवताच त्यांनी आपले डोळे मिटले.. आणि त्यांच्या देवाच्या नामाचा सतत जाप करू लागले... साहिलच्या वडिलांना म्हणजे माझ्या काकाना ते पसंद नाही पडल म्हणून ते घरातून मावशीचा राग राग करत निघून गेले..मावशीने त्या मौलाना साहेबाना साहिलची खोली दाखवली...
आणि त्यांना त्याच्या खोलीत नेल... साहिलचा अवतार न बघण्यासारखा झाला होता...त्याच्या अंगावरील कपडे फाटलेले होते.. जागो जग चाबकाचे व्रण उमटले होते... साहिलची आई ते पाहून ढसढस रडतच होती.. मग ते मौलाना पुढ आले... व त्यांनी आपल्या जवळ दर्ग्यातून आणलेले पाणी...ते त्यांनी एकवेळच त्यांच्या देवाचे नाव घेतल आणि ते पाणी त्यांनी साहिलच्या अंगावर टाकल.. माझ्या मावशीने सांगिलत साहिलच्या अंगातून धूर निघत होता... आणि तो ओरडायचा. 
"आका.... बक्ष ...." त्या मौलानाने दुसऱ्यांदा तसाच पाणी शिंपडल त्याच्या अंगावर... तेव्हा तो इतका ओरडला कि खिडक्याची तावदान हललेली जाणवली "एय आका...! " साहीलच्या अंगातून विविध आवाज निघू लागले होते.. त्याच्या शरीरात घुसलेले ते भयंकर माफीची मागणी करत होते...तेव्हा ते मौलाना म्हणाले "कौन है तू ? कीस बात के लिये तुने इस बच्चे को जकड रखा है बता...! वरना अल्लाह कसम तुझे यही जला दुन्गा..! "
तो जिन्न साहिलच्या आतमधून ओरडून ओरडून फक्त आका आका अस म्हणत होता... त्यान तसच आपल नाव ओरडून सांगितल " सुलेमान.." त्या मौलानानि आपल्या जवळच्या मोर पंखाने साहिलच्या अंगावर झप झप मारायला सुरुवात केली तो पवित्र मोरपंख होता...
तो साहिलला लागत नव्हता मात्र त्याचा आतमध्ये असणाऱ्या त्या जिन्नला सुलेमानला आतोनात लागत होता.... त्याने अखेरीस साहिलच्या शरीरातून बाहेरचा माग धरला... आणि एकवेळ एक छोटासा प्रकाश झाला.. आणि तो त्या खोलीच्या खिडकीतून आवाज करीत बाहेर पडला त्या सकट ती खिडकी देखील फुटली...
एकदोन दिवसानंतर साहिलचे अंगावरील घाव भरत आले... त्याच्या मित्राकडून समजल कि मागच्या शनिवारी त्यांनी बाहेर जायचं ठरवल होत ... आणि तिथली एक मश्जीद प्रसिद्ध होती...तिथ अस म्हणन होत कि रात्रीच्या वेळी भूत दिसतात आणि तिथले दिवे आपोआप उजळतात... हे अवाक पाहण्यासाठी साहिल व त्याचे काही फ्रेंड्स गेले होते... त्याचे फ्रेंड्स बाकी सर्व बाहेरून बघत होते.. पण साहिल त्या मश्जीदच्या उंबरठ्यास शिवून आला... मित्रहो अस मानल जात कि प्रत्येक मश्जीदच्या दारात एक गुलाम जिन्न असतो जो अल्लाह चा सेवक असतो.
आणि मित्रानो आमचे आजी आजोबा जस सांगतात तस म्हणल जात कि नळदुर्ग येथील एक मश्जीद जिन्नने एका रात्रीमध्ये बांधली आहे.. हे कितपत खर आहे माहित नाही माझा हा हेतू नाहीये कि त्या जागे बाबत अंधश्रद्धा पसरवावी..पण हे मी अस ऐकून आहे.. तर साहिल त्या ठिकाणी जाताच त्याला शक्यतो जिन्नची बाधा झाली..
जिन्न हे गुलाम असतात त्या एकप्रकारच्या आत्मा असतात साहिलला चाबूक पडायचे हे तुम्ही वरती वाचल आहे.. पण ते चाबूक हि देवाकडून असलेली त्या गुलाम जिन्न ला शिक्षा होती.. अस हि म्हणतात कि जिन्न स्वतःच्या मुक्ती साठी मानव शरीराचा सहारा घेऊ शकतात.. आणि चाबूक पडणे हि त्यांची एकप्रकारे गुलामगिरीची निशाणी असते.. जी त्यांच्या आका कडून (अल्लाहद्वारे )त्यांना भेटते...मित्रहो मी हा अनुभव खूप घाईघाईत सांगितला आहे. आणि जेवढ झाल आहे ते साफ साफ शब्दात सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे... धन्यवाद !!
नमस्कार मी परेश बागुल, माझ्या आधी च्या कथे ला मिळालेल्या प्रतिसादा ला प्रेरित होउन पुन्हा एक चित्त थरारक कथा सादर करत आहे. कथा पुर्णपने काल्पनिक असुन याचा वास्तविकते सोबत कुठला ही संबंध नाही.
आपली आज ची कथा आहे समीर बद्दल. समीर हा अत्यंत प्रमाणिक व मेहनती प्रवृत्ति चा असल्यामुळे त्याला पुण्या (देहुरोड) मध्ये आयुध निर्माणी फॅक्टरीत (Ordnance Factory) स्टोर किपर चा जॅाब मिळाला होता. समीर च मूळ गाव बंाबरूड होत. बंाबरूड या गावात अज़ुन सुद्धा फारश्या सोय सुविधा नव्हत्या. अश्या वातावरणात वाढला असुन समीर ने आज एका नामांकित कंपनी मध्ये जाॅब मिळवला होता. यावरून च त्याच्या बुद्धी व कुशलते चा अंदाज लाऊ शकता.
समीर दर ६ महिन्यात त्याच्या आई-वडिलांना भेटायला येत असे. समीर चा आई वडिलां मध्ये खुप जीव होता, समीर चे शिक्षण पूर्ण करण्या साठी आई वडिलांनी खुप कष्ट केले होते आणि समीर ला पण या सगळ्या ची ज़ाणिव होती. समीर चे वडील गावात राहुन सुद्धा त्यांचे विचार महान होते, त्यंाच्या आग्रहा मुळे च समीर ने काळज़ा वर दगड़ ठेउन शहरात जाॅब करण्या चा निर्णय घेतला होता. आई वडिलंाची सतत आठवन येत असुन पण समीर मन मारून जाॅब करत होता. अश्या परस्थितीत समीर ला धीर मिळत होता तो साक्षी कडून. समीर जिथे रूम घेऊन राहत होता तिथेच त्याच्या शेजारी साक्षी आपल्या आई वडिलां सोबत राहत होती. साक्षी व समीर एक दुसर्या ला २ वर्षां पासुन ओळखत होते. साक्षी खुप साधी भोळी पण गोड मुलगी होती. मनातल्या मनात ती समीर वर प्रेम करायला लागली होती पण समीर ला अजुन याची कल्पना नव्हती. समीर एकठा असल्याने साक्षी त्याची खुप काळजी घेयची , कुठला पण नविन पदार्थ बनवल्या वर समीर ला न चूकता स्वताच्या हाताने खाऊ घातल्या शिवाय तीला चैन पडत नसे. एवढच नाही तर तीने तीच्या घरच्यांना पण समीर बद्दल सुचवले होते, साक्षी ला समीर आवडत असल्याची कल्पना साक्षी च्या आई वडिलांना होती. त्यांना पण समीर ला आपला ज़ावई करून घेन्यात काही आपत्ती नव्हती. समीर तसा होताच सूसंस्कारी. व दिसायला पण छान होता आणि तो नियमित पणे न चूकता महादेवा च्या देउळात जात असे. त्याच्या अश्या वागन्या मुळे समीर ने साक्षी च्या आई वडिलांच मन जिंकल होत.
आता वळूयात मूळ कथे कडे, समीर ने यावेळेस पण नेहमी प्रमाणे गावाला जायचे ठरवले, हि बातमी मिळताच साक्षी थोडी उदास झाली व मनाला धीर देत समीर ला भेटायला आली व स्वताची काळजी घे व इतर गोष्टींचे निर्देश देउ लागली. समीर ने सगळी तयारी करून साक्षी व तीच्या आई वडिलांचा निरोप घेतला, साक्षी पण स्वताचे अश्रु लपवत हाथ हालवून समीर ला बाय करू लागली व पोहचल्या वर काॅल कर असा निर्देश दिला. समीर ला ट्रेन ने १ दिवसाचा प्रवास करावा लागत असे आणि त्यात नेमक यावेळेस समीर ची ट्रेन चक्क ३ तास उशीरा पोहचली होती. १ दिवसा चा प्रवास करून समीर पाचोरा पोहचला. पाचोर्या वरून समीर च मूळ गाव २० कि.मी च्या अंतरावर होते. रात्री चे १ वाजले होते अश्या परस्थितीत गावा कडे जाणारी कुठली च बस व रिक्षा मिळणे शक्य नव्हते म्हणुन समीर ने चालत जाण्या चा निर्णय घेतला. समीर ला खात्री होती वाटेत कोणी बाइक सवार मिळेल च लिफ्ट घेण्यासाठी.थोडा अंतर चालल्या वर समीर ला एका बाइक चा आवाज़ आला व त्याने हाथ करून बाइक वाल्याला थांबवले व पुढे परंतर सोडण्या ची विनंती केली. समीर ला लिफ्ट मिळाल्या मुळे तो खुश होता पण समीर च दुर्दैव च म्हणावे कारण तो बाइक चालक अंतुर्ली गावाचा राहणारा होता जिथुन समीर चे गाव १० कि.मी होते. बाइक चालक ने समीर ला अर्ध्या रस्त्यात सोडले व पुढे सांभाळुन जाण्यास सांगितले. बाइक चालक पिलेला असल्याने समीर ने त्याची चेतावनी ला मनावर नाही घेतले आणि गावाकडे ज़ाण्यास निघाला. रस्त्यात एक पण रोड लाइट नसल्याने सगळीकडे गडद आंधार होता, समीर कस बस मोबाइल च्या टाॅर्च च्या उजेडात हेडफोन ने साँग्स ऐकत चालत होता. सगळी कडे भयान शांतता असल्याने फक्त समीर च्या पाउलांचा झप झप आवाज़ स्पष्ट पणे ऐकु येत होता. आजू़ बाज़ू घनदाट झाडान मधुन चित्र विचित्र आवाज़ येत होते पण समीर वर याचा काही परिणाम होत नव्हता, तो बस एका लय मध्ये चालत होता. त्यावेळेस गावामध्ये हडळ, पिशाच, चकवा, हाकामारी सारखे भूता खेतांचे प्रकार खुप प्रचलित होते ज्यांची समीर ला बिल्कुल कल्पना नव्हती. गावा मधल्या लोकांनी हे प्रकार अनुभवले होते म्हणुन रात्री त्या रस्त्या वरून येण्या ची हिम्मत कोणी करत नसे. समीर च्या नकळत पाउला पाउला वर त्याच्या माघे चित्र विचित्र आकृत्या, पिशाच व हडळी त्याचा घात करण्या साठी पाठलाग करत होत्या पण त्यांना यश मिळत नव्हते, त्याच्या माघे पण एक कारण होते. असे म्हणतात जोपरंतर एखाद्या व्यक्ति च्या मनात भय भावना येत नाही तोपरंतर कुठला च भूत किवा प्रेत त्या व्यक्ति चा घात करू शकत नाही. आपल्या मनातले भय या अमानविय नराधमांना शक्ती प्रदान करत असत.
पण समीर च्या चेहर्या वर भय चा कुठलाच भाव नव्हता, शहरात राहत असल्याने त्याला या गोष्टींचा काही अनुभव व कल्पना पण नव्हती. तसा समीर पण शारीरीक व मानसिक पणे दृढ होता. कानात हेडफोन असल्याने आपल्या अवती भोवती काय घडतय याचा त्याला बिल्कुल पण भान नव्हता. समीर ने आता निम्मी रस्ता पार केला होता कि तेवढ्यात मोबाइल ची बॅटरी ने पण साथ सोडला व मोबाइल आॅफ झाला.
त्याच्या वर घात करण्या साठी दृष्ट शक्ती आतुरते ने वाट पाहत होत्या. आता त्याला वातावरणातला गारवा ज़ाणवत होता व गडद आंधारा मुळे त्याचा अात्मविश्वास पण खचत चाल्हा होता, त्याला कळुन चूकले होते कि त्याचा पाठलाग केला जातोय. पण चालत राहण्या शिवाय काही पर्याय उरला नव्हता.
तेव्हा त्याच्या कडुन एक चूक घडली, त्याने माघे वळून बघितले. तेव्हा त्याला दिसल्या त्या विद्रूप आकृत्या....! आता तो खुप घाबरला होता व आपली ट्रॅवेल बॅग जागीच सोडुन धावत सुटला, धावतांना त्याला कळून चूकले कि आपण त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा येत आहे. त्या विचित्र गुरगुरण्या च्या आवाज़ा ने त्याचा थरकाप उडवला होता, तो थकुन एका झाडा खाली बसुन आपल्या मृत्यु ची वाट पाहु लागला, भिती ने त्यावर पूर्णपने ताबा मिळवला होता आणि आता त्याच्या वर घात करणे सोपे होते. तेव्हाच एका विचित्र आकृती ने त्याच्या वर घात केला आणि त्याच्या शरीरात प्रवेष केला. समीर आता शारीरीक व मानसिक रित्या त्या शक्ती च्या ताब्यात होता व त्या अमानविय शक्ति ने समीर द्वारे आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला. समीर आता बदलला होता, तो उठुन माघे गेला व आपली बॅग घेउन घरी जाण्यास निघाला, थोड्याच वेळात तो घरी पोहचला व त्याने दार ठोठावले. इतक्या रात्री कोण आले असेल असा विचार करत समीर च्या आई ऊठल्या व त्यांनी विचारले कोण आहे? पण समोरून काहीच उत्तर नाही आले. असे २-३ वेळा झाले. समीर च्या आईंना हा हाकामारी चा प्रकार वाटत होता.
त्यांनी दारा च्या फटीतून बघितले तर त्यंाना समीर दिसला, त्याचा आवतार विचित्र दिसत होता. विस्कटलेले केस, मळके कपडे व लाल शार डोळे आणि तो तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत सारखा मानेला हिसका देत होता. हे दृष्य पाहुन समीर च्या आई जोरात किंचाळल्या, त्यंाची किंचाळी ऐकुन समीर चे वडिल धावत च आले. समीर च्या आई भिती ने थरथरत होत्या, त्यांना शब्द उच्चारणे पण कठीन जात होते, त्यावर समीर च्या वडिलांनी विचारले काय झाले तेव्हा दारा कडे बोट दाखवत त्या थरथरत्या आवाज़ात स..स...समीर ऐवढच बोलु शकल्या. हे ऐकताच समीर च्या वडिलांनी धाडकन दार उघडले व बघितले की समीर वरांड्यात कोसळलाय. त्यंानी पटकन त्याला उचलुन घरात खाटे वर झोपवले व त्याला शुद्धी वर आणन्या चा प्रयत्न करू लागले पण काही केल्या तो शुद्धीवर येत नव्हता, तो झोपेत सुद्धा थरथरत होता म्हणुन समीर च्या वडिलांनी त्याला पांघरवल व सकाळ होयची वाट बघु लागले. सकाळ होता च समीर च्या घरी चंागलीच गर्दी जमली होती, समीर अजुन पण बेशुद्ध होता. तेवढ्यात समीर चे वडिल आपल्या सोबत वैद्य घेऊन आले. वैद्य ने समीर ला तपासले तर ते पण आश्चर्यचकित झाले कारण त्याची ह्रदय स्पंदने व श्वास घेणे नैसर्गीक रित्या कार्य करत होते व तो पुर्णपने ठीक होता. वैद्य समीर च्या वडिलांना आश्वासन देत म्हणाले कि तो फक्त बेशुद्ध झालाय आणि लवकरच शुद्धी वर येईल.
इकडे साक्षी त्याच्या काॅल चा वेट करत होती व तीला त्याची काळजी वाटत होती, तीने त्याला काॅल पण करून बघितले पण त्याचा मोबाइल आॅफ येत होता. तीने सकाळ पासुन काही खाल्ले पिले नव्हते. संध्याकाळ झाली तरी समीर शुद्धी वर आला नव्हता. समीर च्या आई रडुन रडुन बेहाल झाल्या होत्या. बघता बघता रात्र झाली, समीर चे आई वडिल त्याच्या शेजारी झोपले होते. समीर ने अचानक डोळे उघडले व आपल्या आवती भोवती बघु लागला. भाग - ३ (शेवटचा)
पण समीर आता पिशाच च्या वश मध्ये होता व त्याला लागली होती रक्ता ची तहान. त्याची चालण्या ची चाल बदलली होती, तो एका अशक्त वाघा सारखा घरात रेंगाळत चालला होता. रेंगाळत रेंगाळत तो घराच्या मागच्या गोठ्यात पोहचला होता. तेवढ्यात गोठ्यातल्या गायी म्हशींच्या किलबिलाट ने समीर चे वडिल जागे झाले, त्यांनी बघितले की समीर बिस्तार्यात नाहीये. ते ताबडतोब आवाज़ा च्या दिशे ने धावले. गोठ्यात पोहचताच त्यांची बोबडी वळली, समीर ने एका वासरू चा घात केला होता. समीर ने वासरू ची चीर फाड करून लचके तोडत होता, खुप भयानक दृश्य होत ते. समीर पूर्ण पने रक्ताने माखला होता. त्याने वळून वडिलांन कडे बघितले व विचित्र पणे हासत लचके तोडु लागला. समीर च्या वडिलांनी तिथुन पळ काढला व आपल्या पत्नि ला उठवले आणि बाहेर जाउन मदती साठी आरडा ओरड करू लागले. सगळ्या गल्लीतली लोक त्यांच्या घरा भोवती एकत्र झाली, सगळे विचारू लागले काय झाल ? काय झाल ? पण समीर चे वडिल बोलण्या च्या परस्थितीत नव्हते. ते सोबत ३-४ लोकांना गोळा करून गोठ्या परंतर घेउन गेले, तिथले दृश्य पाहुन सगळेच स्तब्ध झाले. त्यांनी समीर ला आवरायचा प्रयत्न केला पण तो कोणाला ज़वळ येउ देइना, वाघा सारखे पंजे मारून त्या लोकांना जवळ येउ देण्यास अडवत होता जणु एखादा वाघ चूकुन मानसांच्या वस्तीत शिरलाय. शेवटी असंख्य प्रयात्ना नंतर त्याला लोकांनी धरले व तिथेच गोठ्यात एका खांँब ला बांधुन ठेवले. आपल्या मुला ची अशी दुर्गती पाहुन समीर ची आई ढसा ढसा रडत होती. समीर च्या वडिलांना कळुन चूकल होत हा सगळा काय प्रकार आहे. सकाळ होताच समीर पुन्हा बेशुद्ध झाला. समीर च्या वडीलांनी गावाच्या वेशी जवळ एका खंडर मध्ये वास करणार्या भगत ला सोबत घेउन आले व समीर बरा झाल्यास त्याला १वर्षा परंतर दर आठवडा बोकड्या च मटण कबूल केले. भगत आपल्या विद्या मध्ये सिद्ध होते. भगत ने वेळ वाया न घालवता समीर च्या घरी यज्ञ मांडला व यज्ञा समोर समीर ला बसवुन मंत्रांचा जाप करू लागले. तसाच थोड्यावेळात समीर शुद्धी वर आला आणि विचित्र आवाजात किंचाळु लागला. भगत ने त्या पिशाच ला समीर चे शरीर सोडायचा आदेश दिला, पण समीर फक्त स्वताचे ओठ चावत दातमिठ्या खात हसत व किंचाळत होता. शेवटी भगत ने आपल्या झोल्या मधुन कसली तरी भभूती काढली व समीर च्या आंगावर टाकली तसा समीर तडफडला व घोगर्या आवाज़ात भगत ला चेतावनी दिली- "दिवसा माझी शक्ती कमी अाहे म्हणुन आता माझ्यावर जोर आज़मवतोयेस, रात्र होताच पहिले तुझ काळीज़ काढुन ज्या खंडर मध्ये तू तप करतोस तिथेच तुझी समाधी बनवुन टाकेल, अज़ुन पण वेळ आहे स्वताचा जीव वाचव अाणि निघुन जा इथुन. " एवढ बोलुन समीर पुन्हा बेशुद्ध झाला. हे ऐकताच भगत धावत सुटला व जाता जाता बोलला कि हे शक्तिशाली पिशाच आहे याला मी नाही बंधीस्त करू शकत मला माफ करा.
इथे दुसरीकडे साक्षी अजुन समीर चा काॅल नाही आला म्हणुन बावरी झाली होती, तीला कल्पना आली होती कि समीर नक्कीच कुठल्या तरी संकटात आहे म्हणुन तीने स्वता जाउन तपास लावायचे ठरवले. घरी ट्रीप चा बहाणा सांगुन साक्षी समीर च्या गावी रवाना झाली. इकडे समीर ची हालत दिवसें दिवस खराब होत चाल्ली होती, त्याला सतत रक्ता च्या उलट्या होत होत्या. १ दिवसाचा प्रवास करून साक्षी समीर च्या गावी पोहचते. गावकर्यां कडुन समीर बद्दल कळता बरोबर साक्षी बेभान धावतच समीर च्या घरी पोहचते. गर्दी मधुन वाट काधत ती पुढे येते व समीर ची झालेली अवस्था पाहुन जागीच स्तब्ध होते अणि बेशुद्ध होउन ज़मीनीवर कोसळते. तीला बघताच समीर चे आई वडील तीला ओळखुन घेतात.(समीर ने बर्याच वेळा आई वडिलान कडे तीचा उल्लेख केला होता) शुद्धी वर येताच ती पण ढसा ढसा रडु लागते, समीर ची अशी अवस्था तीच्याकडुन बघितले जात नव्हती, त्याला एका पिसाळलेल्या कुत्र्या सारखे बांधुन ठेवले होते. साक्षी त्याच्या जवळ जाणार इतक्यात समीर च्या आईं ने तीला आवरल व शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या. ती समीर कडे जायचा हट्ट करू लागली पण तीला महीत नव्हत कि तीचा समीर त्या दृष्ट शक्ती च्या ताब्यात आहे. शेवटी गावातल्या एका वृद्ध व्यकती ने समीर ला गावातल्या प्राचीन महादेवा च्या मंदिरात नेण्याचा परामर्श दिला. तीथे एक साधु बाबा राहतात जे कित्तेक वर्षांपासुन मंदीर चा रख रखाव करत होते. त्यावेळी सगळ्यांना तेच योग्य वाटले, समीर च्या वडिलांनी एक टोळी बनवली व समीर ला तीथे घेउन जाण्यास निघाले. साक्षी च्या हट्टा पाही त्यांनी तीला पण सोबत घेतले. रात्र खुप झाली होती, कंदीलच्या प्रकाशात सगळे मंदिरा च्या मार्गा वर चालत होते. वाटेत समीर स्वताला त्यांच्या तावडीतुन सोडवुन जंगलाच्या दिशे ने धावु लागला व थोड्याच वेळात नाहीसा झाला, सगळे जंगलाच्या दिशेने धावु लागले. साक्षी पण धावता धावता त्यांच्या पासुन वेगळी झाली, ती पण समीर ला हाका मारत त्या घनदाट जंगलात समीर ला शोधु लागली. तेवढ्यात अचानक समीर ने साक्षी वर हल्ला केला व तीला खाली पाडले तसा तो पण दुर वर जाउन पडला, कारण साक्षी च्या हातात होती रूद्राक्ष ची माळ जी समीर ने तीला दिली होती. समीर उठला व परत झाडांवर एखाडी माकडा सारखा सर सर चढुन एका झाडा पासुन दुसर्या झाडावर झडप घेउ लागला, समीर आता आक्रामक झाला होता. साक्षी पण त्याच्या माघे धावत होती. धावतांना ती बोलत होती समीर मला महितीये तू मला ऐकु शकतोस, त्या दृष्ट शक्ती ला तुझ्यावर ताबा नको मिळवु देउ. साक्षी चे हे शब्द समीर च्या कानी पडताच त्याचा वेग कमी झाला व तो झाडावरून खाली पडला व स्वताच्या आवाज़ात कन्हत बोलला- मी स्वताला या पिशाच च्या स्वाधीन केलय, माझ्यासाठी स्वताचा जीव धोक्यात नको घालवु, तू प्लीज़ जा माघारी, मी नाही वाचनार आता. तेवढ्यात साक्षी बोलली कि तू अशी हार नको मानु, तू त्या दृष्ट पिशाच सोबत लढ, ते तुझ शरीर आहे आणि त्यावर फक्त तुच ताबा मिळवु शकतो. साक्षी चे शब्द समीर ला बळ देत होते व तो आतल्या आत स्वताच्या शरीरा वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. समीर वेदने ने तळमळत होता, या संधी चा फायदा घेत साक्षी ने आपल्या हातातली माळ समीर च्या गळ्यात घातली. तसा समीर पण विज़ेचा झटका लागल्या प्रमाणे तडफडु लागला. साक्षी मदतीसाठी हाक मारू लागली व तेवढ्यात समीर चे वडिल आणि बाकीची टोळी तीथे पोहचल्या. क्षणा चा पण विलंब न करता समीर ला तसच बेशुद्ध अवस्थेत महादेवा च्या मंदिरात नेण्यात आले. समीर ची अवस्था बधताच मंदिरा च्या साधुंने यज्ञ ला सुरूवात केली आणि आपल्या जवळ असलेल्या एका जुनाट पुस्तकातुन देवाच्या मंत्रा चा जाप करु लागले व तसा समीर पण वेदने ने तडफडत होता. मंत्र उच्चारणा ला वयतागुन समीर शेवटी जोरात किंचाळला व पूर्ण बळाने त्याने ती माळ तोडुन टाकली. त्याला धरुन ठेवलेल्या लोकांना त्याने वरबडुन ज़खमी केले व त्या साधूंचे शीर धडापासुन वेगळे केले. आता शेवट ची आशे ची ज्योत पण व्हिज़ली. तेवढ्यात साक्षी ला एक युक्ती सुचली, तीने समीर च्या वडिलांना त्रिशुल घेउन मंदिरा च्या द्वार ची राखण करण्यास सांगितले आणि समीर ला कस पण करूण रोखुन ठेवायला सांगितले. समीर मंदीर च्या छता ला जाउन टेकला होता. साक्षी ने ते पुस्तक हाती घेउन योग्य त्या मंत्रांचा जाप सुरु केला, मंत्र समीर च्या कानी पडताच तो पुन्हा तडफडु लागला व त्याने साक्षीवर हल्ला केला. यावेळेस त्या निर्दयी ने साक्षी चे पोट फाडुन तीचा कोथळा बाहेर काढला. साक्षी रक्ताने माखली व जंमीनीवर कोसळली. हे पाहताच समीर च्या वडिलांनी काळज़ावर दगड ठेउन समीर च्या मांडीवर त्रिशुल ने वार केला व त्याला तीथे च रोखुन ठेवले. साक्षीने कसबस स्वताला सावरले व पुन्हा मंत्रजाप सुरू केला. यावेळेस ती यशस्वी ठरली अाणि तो दृष्ट पिशाच समीर च्या शरीरातुन बाहेर पडला व महादेवा च्या मूर्ती समोर येता क्षणी भस्म झाला. समीर लगेच भाणावर आला व त्याने बघितले साक्षी मरणाच्या दारात उभी आहे, त्याने तसच तीला मिठीत घेतले व ढसा ढसा रडु लागला. त्याला रडताना पाहुन साक्षी बोलली- समीर रडु नको आता तर तू खुश असायला हव. त्या पिशाचा च्या तावडीतुन तुझी सुटका झालीये. माझी नेहमी एकच इच्छा होती ती म्हणजे तुझ्यासोबत लग्न करण्याची, जी पुर्ण नाही होउ शकली याचीच खंत वाटते, मला माफ कर जे मी माझ प्रेम व भावना तुझ्यासमोर उशीरा जाहीर केल्या. तेवढ्यात समीर ने जवळ असलेला शेंदुर तीच्या कपाळात भरला. साक्षीच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहु लागले व स्मितहास्य करीत तीने प्राण त्यागले. समीर तीला मिठीत घेउन वेड्या सारखा रडु लागला. तो ताडकन उठला व समोर पडलेल्या त्रिशुल स्वताच्या पोटात घालनार एवढ्यात त्याच्या वडिलांनी त्याला आवरले, समीर एक च हट्ट करत होता कि मला माझ्या साक्षी जवळ जायचय.
समीर च्या वडीलंानी त्याला शांत केले व त्याला समज़वु लागले- त्या पोरी ने तुझ्यासाठी स्वताच्या जीवाचा बलिदान केलाय, तीची इच्छा होती तू ज़गाव, तीचा बलिदान व्यर्थ नको जाउ देउ पोरा. एवढ ऐकताच समीर शांत झाला व तीला मिठीत घेउन रडु लागला. साक्षी ने समीर साठी स्वताचा प्राण गमवला होता, शेवटी याला च तर प्रेम म्हणतात.
समाप्त !
नमस्कार मिञानो मी सुशिल. माझ्यासोबत घडलेली एक घटना सांगतो, ७ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. मी ७ वीत होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या, त्या निम्मीत्ताने मी गावी गेलो होतो. जळगाव मध्ये अंबारे हे माझ गाव आहे.दीवसभर गावात पोरानसोबत हींडायचो आणी घरी आल्यावर खुप जेवायचो. ऊन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही सर्व मुल राञी बाहेरच झोपायचो, पण त्या राञी आम्ही झोपताना भुताच्या गोष्टी सांगत झोपलो होतो. राञीचे साधारण दोन वाजता मला कुञ्यांचा मोठमोठ्याने भुंकायचा आवाज येऊ लागला. :आवाज कमी व्हावा म्हणुन मी गोधडी तोंडावर घेऊन झोपलो ,थोड्या वेळाने मला कुञ्यांचा रडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज एवढा प्रचंड होता की, मला गोधढी पांघरुन सुध्दा तो आवाज कानात घुमत होता. कुञ्यांना हकलण्यासाठी मी जशी गोधडी बाजुला सारली तशी " समोरच दूश्य पाहुन माझी बोबळीच वळाली " समोर च्या घराबाहेर एका खाटेवर एक बाई बसली होती. आणी तिच्या आजुबाजुला दोन भले मोठे कुञे रडत बसले होते.त्या बाईने सफेद साडी घातली होती. आणि केसही सफेद होते तीचा चेहरा गोरा होता मोठे मोठे डोळे आणी काळे काळे दात पाहुन मी र-तभ्द पणे तिच्याकडे पाहत होतो. पाहता पाहता तिने मला हाताने बोलवायचा इशारा केला, आणि बघता बघता ती बाई माझ्या नजरेसमोरून अचानकपणे गायब झाली आणी मी त्याच जागी बेशुध्द झालो जेव्हा जाग आली तेव्हा मी आजींच्या कुशीत होतो. झालेला सर्व प्रकार जेव्हा मी आजींला सांगीतला तेव्हा, आजींनी सांगीतल की ती "डाखीन "होती. बर झाल तु तिच्या जवळ नाही गेलास नाहीतर तुला मारून खाल्ल असत तुला, ती गोष्ट जेव्हा मला आठवते तेव्हा माझा थरकापच ऊडतो त्या नंतर मी गावी गेलो माञ बाहेर मुळीच झोपलो नाही.-सुशिल-