Tuesday, May 26, 2015

षंढ : लघुकथा : लेखक-मनीष गुप्ते (पुणे)

षंढ : लघुकथा : लेखक-मनीष गुप्ते (पुणे)
दरवर्षी न चुकता माझा गावाला जायचा नियम असतो. रोजच्या धकाधकीतुन fresh होण्या साठी गाव हां एक उत्तम पर्याय असतो. तिकडच वातावरण वेगळच असत. आमच्या कोकणात निसर्गाने हातच काहीही राखून न ठेवता स्वत: ला उधळुन दिल आहे.
ती हिरवीगार गर्द झाडी , त्या झाडीतुन जाणारी तांबड्या मातीची पायवाट, नुसता कोसळणारा पाउस, बारमाही वाहण्यार्या नद्या, त्याच नद्या पुढे जाउन समुद्राला मिळतात . ती किनार्यावरची पांढरी शुभ्र सफेत वाळु, उंचच उंच लागलेली माडांची रांग. फणस, आंबा, नारळ , काजू, जांभळ तर आमच्या रस्त्यावर सडे सांडतात .
ह्या सर्वांचा आनंद घेतल्यावर भूक तर लागणारच. मग काय तांदुळ किंवा नाचणी ची भाकरी आणि मांसाहारीं साठी सागुती. शाकाहारी लोकांना आंबोळी. काळ्या वाटाण्याच्या उसळी बरोबर नुसत ओरपायच असत.
हे सर्व मनात घेउन बस पकडली. चांगली महिनाभराची सुट्टी नशिबाने मिळाली होती. त्याचा पुरेपुर आनंद घ्यायच ठरवल. शेतीची काही काम अचानक निघाली होती पण ते निमित्त होत.
काका जाउन 2 वर्ष झाली होती. काकूंना तेव्हा भेटलो होतो. निपुत्रिकच राहिली.
काकुंच माझ्यावर अतोनात प्रेम. अगदी मला मुलगाच मानते.
सगळा कारभार तीच बघत होती. अत्यंत कष्टाळु बाई. आंबा, फणसा वर सुद्धा मुलां प्रमाणे प्रेम, म्हणुनच सर्व काही तिने व्यवस्थित राखल होत.
सकाळी 8 वाजता बस गावात पोचली. आमच घर थोडस आत असल्याने पायपीट करावी लागते.
घरी पोचलो. मला बघून काकुला अतिशय आनंद झाला. ताबडतोब आंघोळ करून घेतली. सगळा थकवा एकदम निघून गेला. काकुने केलेल्या आंबोळ्यांवर मस्त ताव मारला.
" बाळ्या , थकला असशील . ज़रा पडून घे. मी ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये जाउन येते." एव्हढा मोठा झालो तरी गावात सगळे मला बाळ्याच म्हणतात.
सकाळचे 11 वाजत आले . झोपून झोपुन किती झोपणार म्हणून पाय मोकळे करण्यासाठी गावात फेरफटका मारायचे ठरवले.
चावडीवर बरीच मंडळी भेटली.जुन्या आठवणिंना उजाळा मिळला. बाकी चावडी म्हणजे गावगप्पा. गावातले राजकारण आणि प्रेम प्रकरण यांची इथे रेलचेल असते. मोठ्या सुरस गप्पा असतात.
थोड्या वेळाने त्याचा सुद्धा कंटाळा आला. म्हणून गावाबाहेर असलेल्या नदीवर जायचे ठरवले. पावल त्या दिशेने चालु लागली.
यथावकाश नदीवर पोचलो. किनार्या वरच्या तापलेल्या वाळुत पाय रुतवुन बसलो. फार बरे वाटले.
फार शांत वातावरण होत. नदीच्या पाण्यात म्हाशिंची मस्त आंघोळ चालली होती. बगळे पाण्यात त्यांच भक्ष शोधत होते. किनार्यावर गर्द हिरवी झाडी पसरली होती.
मधुनच पक्षांचा कलकलाट शांतता भेदत होता. पण तो कलकलाट सुद्धा हवाहवासा वाटत होता.
अशा रम्य वातावरणाने मी सुखावलो आणि हात डोक्यापाशी घेउन मस्त पैकी वाळुत पसरलो.
कधी डोळा लागला तेच कळल नाही.
" ईलस " ह्या प्रश्नार्थक आवाजाने जागा झालो.
माझ्या बाजुला एक तरुण मुलगी बसली होती. नाकि डोळी नीटस, थोड़ी सावळी पण रेखीव होती.
हिला कुठेतरी पाहिल्यासारख वाटत होत पण कुठे ते आठवत नव्हत.
"माका नाय वळखला ना?" मी नकारात्मक मान हलवली. थोडा खजील देखिल झालो. " तुजा पण काय चुकणा नाय. चुलतो गेलेलो तेव्हा इलेलस"
आणि माझ्या डोक्यात खाडकन प्रकाश पडला.
काका गेले तेव्हा आम्हाला भेटायला गावातली जी मंडळी आली होती त्यात ही पण होती. आपल्या आई बरोबर आली होती.
तिची नजर मला सारखी अस्वस्थ करत होती. अगदी रोखून बघत होती माझ्या कड़े.
मुम्बैत आल्यावर काही दिवसांनी काकुने पाठवलेल एक पत्र आल होत. त्यात तिचा फोटो पण होता. स्थळ सांगुन आल होत मला तीच. घरातली वडीलधारी मंडळी जे करतील ते योग्य ह्या मताचा मी असल्याने त्यांनी नकार कधी दिला ते कळल पण नाही. सगळ आई बाबां वर सोडल होत.
अजूनही स्थळ बघण चालूच आहे पण कुठेही योग जुळुन आला नाही. असो.
"किती बारीक झालास रे तू " तिच्या प्रश्नाने भूतकाळातुन वर्तमानात आलो.
" नाही, आहे तसाच आहे. काहीही फरक पडला नाही"
" पण तू इथे काय करतेस? " मी विचारले.
" मी हयच रवतय" तिने झाडीत लपलेल्या एका घराकड़े बोट केले.
गळ्यात मंगलसूत्र दिसत नव्हत. कुंकू पण दिसत नव्हत. म्हणजे हीच पण लग्न झालेल दिसत नव्हत. तरी पण मी तिला विचारल.
" लग्न झाल नाही तूझ ? "
ती मोठ्याने हसली. माझ्या कड़े पाहत बोलली " झाल होत . पण तेव्हढ नाही टिकल." ती आता शुद्ध मराठीत बोलू लागली होती.
मला आश्चर्य वाटल. " का? काय झाल ?"
" षंढ निघाला. पहिल्या रात्रीच उघडा पडला. "तिने बेधड़क सांगुन टाकल.
"दुसर्या दिवशीच घरी आले निघून"
अरेरे!!! काय हे हिच्या नशिबात लिहून ठेवल होत.
तरणी ताठी बाई, पहिल्या रात्रीच तिला कळत की तिचा नवरा षंढ आहे. काय अवस्था झाली असेल तिची? मला आता तिची कीव वाटू लागली.
" तू फार आवडला होतास रे. तूझ्याशी लग्न लावून द्या म्हणून आई कड़े फार हट्ट धरला होता. पण तुम्ही नाकारलत. का तर म्हणे पत्रिका जुळत नव्हती. मी तर तुला कधीच वरला होता. तूझ्या काकिला पण मी पसंद होते. गावात जास्त बोभाटा होउ नये म्हणून आई बाबानी मग त्याच्याशी लग्न लावून दिले. आणि अस झाल. "
म्हणजे गेल्या 2 वर्षात एव्हढ रामायण घडल होत . केवळ आम्ही नकार दिला म्हणून? मी स्वत: लाच प्रश्न विचारला. मी तरी काय करणार ? माझा नाइलाज होता.
" तूझी काय चुक नाही रे " माझ्या मनात काय चालल होत ते तिने बरोबर ओळखल असाव.
" प्रेम माझ होत तूझ्यावर आणि आजही आहे." मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती अजून तीच पहिल प्रेम विसरली नव्हती.
मला उगाच अपराधी वाटायला लागल. मनात चलबिचल सुरु झाली .
ज्या मुलीला एकदाच पाहिल होत. ती मुलगी जवळ जवळ 2 वर्षानी भेटते आणि प्रेमाची कबुली देते. थोड अवघडल्या सारख झाल.
काय बोलावे काहीच सुचत नव्हते.
" तूझ पण लग्न नाही झाल ना ?" हिला कस कळल?
" अ... नाही. अजुन योग नाही आला."
ती हसली. तिच्या हसण्यात एक वेगळीच छटा दिसत होती.
" मला माहीत आहे. माझ सगळ लक्ष तूझ्याचकडे होत. दुरवरुन सुद्धा तू मला दिसत होतास."
मला आता तिच्या भाबड्या प्रेमाची प्रचंड कीव वाटायला लागली.
मी घड्याळात बघितल. 4 वाजत आले होते.
"चल मी निघतो. काकू वाट पाहत असेल माझी" मी उठलो. ती पण उठली.
" ठीक आहे. जा तू. पण मी येते नंतर भेटायला तुला" मला ज़रा आश्चर्य वाटल. विचार केला, ठीक आहे. बिचारीच मन आहे. कशाला मोड़ा. भेटायच असेल तर येउ देत.
" ठीक आहे. पण कधी येणार आहेस?" मी विचारले.
" माझी काळजि नको करू. मी येते बरोबर." आणि ती निघाली.
मघाशी दाखवलेल्या झाडीतल्या घरापर्यंत माझे डोळे तिला पाहत होते.
" अरे! बाळ्या कुठे लक्ष आहे तूझ ? कधी पासून आवाज देतोय तुला" हिरामण माझा लहानपणीचा सोबती.
" अरे काय म्हणतो? माझ लक्ष नव्हत रे. माफ़ कर. चल घरीच निघालो आहे" आणि हिरामण बरोबर बोलत बोलत घरी निघालो.
काकुनी बनवलेल जेवण जेवून शतपावली घालत फिरत होतो. मनात राहून राहून त्या मुलिचेच विचार येत होते. थोडा अस्वस्थ पण होतो.
माझी ही अवस्था काकुने बरोबर टिपली.
" काय रे बाळ्या? अशा फेर्या का मारतोयस ?"
मी काकुला घडलेला सर्व प्रसंग सांगितला.
" ह्म्म्......बिचारी मंजिरी. काय तिच्या नाधिबात वाढून ठेवल होत बघ. एव्हढी चांगली पोर पण देवाने कशी थट्टा मांडली तिच्या आयुष्याची बघ"
" काकू, पण तिला आई- बाबानी नकार का दिला? तुला काही माहीत आहे का?"
"तिची कुंडली जुळत नव्हती. 32 गुण जुळले . पूर्ण नाही. म्हणून नाही म्हणाले. अस तूझ्या आईने कळवल. आता सर्व काही कुठे जुळत का? आपल्या मनासारख कुठे होत का?"
" मंजिरिला तू फार आवडला होतास. तिच्या आईने माझ्या कड़े येउन मन मोकळ केल होत. पण नकार आल्यावर फार दुःखी झाली पोर. तिच्या आई बापाला पण धक्का बसला.. त्यातच गावात जास्त कोणाला कळु नये म्हणून त्या पोराशी लग्न लावून दिल. आता तो असा निघेल हे कोणाला ठाउक होत. आली दुसर्याच दिवशी त्याला सोडून".
काकुने आता आवरायला घेतल.
" चल झोप आता. 11 वाजत आले. उद्या सकाळी लवकरच उठायचे आहे. पंचायतीत काहीच काम झाले नाही आज. तुला पण यावे लागेल"
मी खोलीत आलो. दरवाजा लावून घेतला. लाईट घालवून अंथरुणावर पडलो.
झोप काही यायला तयार नव्हती. मनात राहून राहून मंजिरिचेच विचार येत होते. केवळ आम्ही नकार दिला म्हणून मंजिरीच्या आयुष्याची अशी राख रांगोळी झाली असच सारख डोक्यात येत होत.
पण मी तरी काय करू? माझा पण नाइलाज होता. मी आई बाबांच्या शब्दा बाहेर जाणारा नाही आणि जाणार पण नाही. वडीलधारी मंडळी आपल काही चुकीच करणार नाहित या मताचा मी असल्याने आई बाबांना पूर्णपणे सोपावुन दिल होत.
गाढ झोपेत असताना अंगावरची चादर खसकन ओढली गेली. झोपेत असल्या मुळे परत ओढून घेतली. पण चादर परत ओढली गेली. आता जरा डोळे उघडले. वाटल की भास् झाला असेल म्हणून मी चादर परत ओढून घेतली. क्षणातच परत ओढली गेली. ह्या वेळी मला स्पष्टपणे जाणवल होत की कोणी तरी चादर ओढली होती.
मी उठून बसलो. माझ्या पायाशी एक आकृति उभी दिसली. डोळे चोळुन बघितल. हो, नक्कीच कोणीतरी होत पायाशी. अंगात वीज चमकून गेली. हवेत प्रचंड गारवा झाला होता. मी डोळे फाडून फाडून बघायचा प्रयत्न करत होतो. पण आकृति अस्पष्ट दिसत होती.
" कोण .. कोण आहे? " माझी जीभ अडखळत होती.
ती आकृति जवळ आली. आता थोड स्पष्ट दिसायला लागल होत. ती आकृति एका पुरषाची होती.
" तू मला नाही ओळखणार. मी प्रमोद, मंजिरिचा नवरा"
"तू तू आत कसा आलास? आणि इथे काय करतोयस ? " मला आता भीती वाटु लागली होती. थंडीने कापर भरायला सुरवात झाली होती.
" मी कुठेही जाऊ शकतो" ती आकृति बोलली .
" म्हणजे ? " मी आश्चर्यचकित झालो.
" माझी या लोकातली यात्रा संपली आहे. अजुन मुक्ति नाही मिळाली . तीच घ्यायला आलो आहे."
" म्हणजे .... हे हे तूझ अस कस झाल? " माझे दात एकमेकांवर आपटायला लागले.
" तूझ्यामुळे " तो ऒरडला. त्याच्या डोळ्यांच्या खोबणित आग दिसत होती.
" माझ्यामुळे ... कस ? " मला पूर्णपणे घाम फुटला.
" मंजिरिला तूच हवा होतास. त्या रात्रि तिने मला हात पण लावून दिले नाही. मला स्पष्ट पणे बोलली की तूझ्याशीच लग्न करायच होत. तिच्या मनात तूच बसला होतास. "
तो बोलायला लागला.
" मी पण संतापलो . माझ्याशी लग्न का केलस तर म्हणते कशी आई बाबां साठी केल. खुप समजवायाचा प्रयत्न केला पण नाही ऐकल. सकाळी कोणालाही न सांगता निघून गेली."
त्याने घडलेल सर्व उलगडायला सुरवात केली.
" पण मंजिरी काल मला बोलली की तू ...."
" खोट बोलते ती. बदनामी केली माझी तिने घरी जाउन. मी षंढ कधीच नव्हतो. मला पुरुषार्थ दाखवायची संधीच तिने दिली नाही" तो ओरडला.
"गावभर छि थु झाली माझी. घराच्या बाहेर पडायची सुद्धा सोय राहिली नाही. मग एक दिवस घेतला गळफास लावून."
त्याच हे बोलण ऐकून आश्चर्य तर वाटलच पण मंजिरिने अस खोट सांगाव याची चिड पण आली.
" पण हे सर्व तूझ्यामुळे घडल.मंजिरिने मला बरबाद केल, तूझ्यामुळे. केवळ तूझ्या मुळेच या जगा समोर षंढ ठरवला गेलो. तूझ्यामुळेच मला आयुष्य संपवाव लागल."
तो प्रचंड संतापलेला दिसत होता.
" तुला वाटत असेल की तू इथे विश्रान्ति घ्यायला आलास. नाही. मी आणल तुला इथे"
"मला मुक्ति हवी आणि ती तू देणार आहेस"
माझी बोबडीच वळली . घामाने प्रचंड थपथपलो.
"मंजिरिने तूझ्यासाठी मला झिडकारल. तुझ्यासाठी जगासमोर षंढ म्हणून हीणवल. तूझ्यासाठी.... तुझ्यासाठी...."
तो ओरडतच होता.
" माझा बदला मी घेणार. मी मुक्ती घेणार. तूझा पुरुषार्थ मी काढून घेणार. तुला षंढ बनवणार. हीच सजा मंजिरिला."
अस बोलून ती आकृति माझ्यावर झेपावली .मी खाली पडलो. तो माझ्या छातीवर बसला. माझ्या तोंडात हात घातला त्याने. मला प्रचंड वेदना होउ लागल्या. काही कळायच्या आतच मी बेशुद्ध पडलो.
कधी जाग आली कळलच नाही. डोळे उघडले तर समोर काकू चेहर्यावर चिंता घेउन उभी असलेली दिसली.
" काय रे बाळ्या ? स्वप्न वैगेरे बघितल की काय? किती घाम आलाय आणि तापला पण आहेस. माझच चुकल. दृष्ट उतरवायला हवी होती नदिवरून आल्या आल्या." काकू
" ती बघ मंजिरी सकाळ पासून बसली आहे तूझ्या उशाला. धावत धावत आली. चेहरा बघ कसा रडवेला झाला आहे."
" मी आले तूझ्या साठी गरम चहा घेउन" काकू आत वळली.
मी मंजिरिला समोर बोलावले. काही विचारणार एव्हढ्यात तिनेच मला विचारले" तो आला होता का? " मी गप्प बसलो.
"माझ्या कड़े पण आला होता. मला सगळ काही सांगुन गेला. तू काहीच बोलू नकोस. सगळ काही माझ्यामुळेच घडले आहे. पण मी तरी काय करू? मला तूच हवा होतास. त्याच्याशी जे काही झाल त्यामुळे त्याचा बळि गेला. पण माझा नाइलाज होता. मी केवळ आई बाबां साठी त्याच्याशी लग्न केल. पण मन तुझ्याकडेच होत. हे लग्न टिकलच नसत. गावात काय उत्तर देणार म्हणून मग त्याला षंढ बनवला."
मंजिरिचा स्वर कापरा झाला होता.
मला ग्लानि येत होती म्हणून मी तिला जायला सांगीतल. आणि डोळे मिटून घेतले.
महिनाभाराची सुट्टी 15 दिवसातच आटोपून मी मुम्बैला परत आलो. सोबत खुप सारे प्रश्न होते. त्यांची उत्तर शोधायच काही कारणच वाटत नव्हत.
घडलेला प्रकार घरी सांगायचा नाही अस अगोदरच ठरवल होत.
आई माझ्या साठी मुली शोधतच होती. पण मला दूसरी मंजिरी तैयार करायची नव्हती.
कारण प्रमोदने त्याचा बदला घेतला होता मला षंढ बनवून.

मनीष गुप्ते
पुणे

No comments:

Post a Comment