परीस पवार
नमस्कार मित्रानो खूप दिवसानंतर मी माझी पोस्ट टाकत आहे. मागच्या वेळी मी मुंबईच्या झपाटलेल्या जागा बद्दल माहिती दिली होती. आता अजून अधिक माहिती मिळवली आहे त्यामुळेच पुढचा भाग टाकायला उशीर झाला. हि माहिती इंटरनेट आणि मित्र आप्तेष्टाकडून मिळवली आहे. तुमच्याच मनोरंजनाकरिता वाचा आणि मजा घ्या... काही चुकी असल्यास उपाय सुचवायचे असल्यास कॉम्मेंट करा...आणि चुकी झाल्यास माफ हि करा. १)ग्रेंड पराडी टॉवर- कॅम्पस कॉर्नर (ग्रेंट रोड) मुंबई येथील या इमारतिचा ८ वा मजला झपाटलेला असून येथे एका वृद्ध दाम्पत्य वासुदेव व तारा दलाल याने राहत्या घरी ८ व्या मजल्या वर त्यांच्या बालकनीतून उडी मारून आत्महत्या केली. म्हणतात कि त्यांच्या मुला आणि सुनाच्या छळास कंटाळून त्यांनी स्वतची जीवनयात्रा संपवली. आणि पुढे जाऊन दलाल यांची पूजा नावाची २० वर्षीय नात हिने सुद्धा त्याच घरी बाल्कनी तुनी उडी मारून आत्महत्या केली पण याचे कारण मात्र समजले नाही.इथेच त्यांच्या कामवाली नेही बाल्कनी तून उडी मारून आत्म्हत्या केली नंतर हि जागा त्याने दुसर्यांना विकल्या नंतर एकूण २० आत्महत्येच्या घटना एकसारख्याच बाल्कनीतून उडी मारल्याच्या झाल्या तशी हि इमारत १९७६ साली बांधण्यात आली पण इथली ८ व्या मजल्यावरचा रूम च झपाटलेला आहे इकडे अजून हि इतर लोक राहतात पण सध्या ८ व्या मजल्यावर च्या खोलीत कुणी हि राहत नाही. कुणा ला हि प्रोपटी घ्याची असेल तर घ्या... मुंबईत स्वस्तात घर मिळेल उसके साथ मौत भी..... २)ताज महाल हॉटेल - मुंबई मधील कुलाबा येथील जग प्रसिद्ध हे हॉटेल येथे जेव्हा हे हॉटेलच्या बांधकामाच काम पूर्ण झाल्यावर त्याचा आर्कीटेकचर ने येथे आत्महत्या केली कारण माहित नाही परंतु येथे त्यांची आत्मा आता हि भटकते असे म्हणतात खूप परदेशी पाहुणे व स्टाफ ने हि बघितले व आजमावले आहे आणि मागे झालेल्या आतंकवादी हमल्या नंतर येथे अजून हि रात्री लोकांचा किंचाळण्याचा व गोळ्यांचा आवाज येतो अस एका परदेशी व्यक्ती ला आलेला अनुभव त्याने इंटरनेट वर मांडला आहे. जे कुणाचे नातेवाईक ताज मध्ये काम करत असेल त्यांना नक्की माहित असेल हे कमेंट मध्ये कळवा... ३) मुकेश टेक्सटाइल मिल - कुलाबा मधील हि प्रसिद्ध मिल येथे १९८०-९० च्या काळात प्रचंड मोठी आग लागल्याने खूप मोठे नुकसान झाले तेव्हा पासून हि मिल बंदच आहे . सध्या मागे इकडे फिल्म व सीरिअल ची शूटिंग होत होती पण इथेही संध्याकाळचे काम करण्यास कलाकार व पडद्यामागचे सहकारी घाबरतात. मागे इथे एका हिंदी नटीला फिल्म चे संवाद चालू असताना अचानक ती माणसाच्या आवाजात बोलू लागली तेव्हा तेथील काम करणारे सहकारांची चांगलीच पाचारण झाली होती. व इकडे त्यांच्या साठी आणलेले खायचे पदार्थ पिण्याचे पाण्याची बोटल अचानक डोळ्यासमोरून गायब व्हायचे. १९९०-९८ च्या दशकात झालेले गेंगवार आणि त्यांची बोडी डीस्पोस च काम इकडेच होत असे अशे लोक म्हणतात. मागेच आलेल्या बिपाशा बसू च्या इंटरव्यूमध्ये तिने हि या जागेचा उल्लेख झपाटलेली जागा असा केला आहे व तिला हि अनुभव आला आहे अनुभव हिंदीत आहे. तसा पुढील प्रमाणे.. बिपाशा बसु : मुकेश मिल में हुआ भूतों का एहसास मेरा भूतों पर विश्वास है, क्योंकि मैंने असल जिंदगी में उनका एहसास किया है। बात उन दिनों की है, जब मैं मुंबई स्थित मुकेश मिल में फिल्म 'गुनाह' की शूटिंग कर रही थी। उस दौरान मैं वहां एक कमरे में घूम-घूमकर डायलॉग्स याद कर रही थी, लेकिन मुझे वहां इतनी बेचैनी हो रही थी कि कोई भी डायलॉग याद नहीं हो रहा था। फिर मैं दूसरे कमरे में जाकर डायलॉग याद करती तो मुझे तुरंत ही याद हो जाते।" "मैंने डायरेक्टर को यह बात बताई तो उन्होंने भी कहा कि उन्हें भी वहां कुछ अजीब लग रहा था। इसके बाद वहां हुए कुछ हादसों के बारे में पता चला, जिसमें कुछ लोगों की मौत तक हो गई थी। खैर, बात आई गई हो गई। करीब 10 दिनों बाद वहां एक लड़की दूसरी किसी टीम के साथ शूटिंग के लिए आई तो उसे भूत ने पकड़ लिया।वह इतनी डरावनी लगने लगी कि यूनिट वालों के रोंगटे खड़े हो गए। वह लड़की हॉरर फिल्मों से कहीं ज्यादा डरावने तरीके से पेश आने लगी, जिसे देखकर पूरी टीम घबड़ा गई और इधर-उधर भागने लगी। कुछ देर बाद वह लड़की बेहोश हो गई और बाद में पता चला कि हॉस्पिटल में उसकी मौत हो गई। ये सुनने के बाद मैंने तो कसम खा ली कि फिर कभी भी मुकेश मिल में शूटिंग के लिए नहीं जाउंगी। -साभार: दैनिक भास्कर.कॉम ४) मढ व मार्वे ला जाणारा रस्ता - येथे असणारे बीचफ्रंट हॉटेल व इकडचे रहिवासी सांगतात कि नवीन नवरीच्या वस्त्रामध्ये एक स्त्री इकडे फिरत असते आणि मार्वे आणि मढ ला जाणार्या लोकांस हि पोर्णिमा आणि अमावस्या ला हमखास दिसते. रात्री लोक गाडीने प्रवास करत असल्यास ४ व्हीलर या ३ व्हीलर त्या गाडीच्या स्पीड ने पळताना बघितलं आहे. त्या रोड ला भयानक किंचाळण्याचा व रडण्याचा आवाज येतो व इथे खूप सारे अपघात होत असतात हे अपघात नेमके पोर्णिमा व अमावस्यालाच जास्त होतात. येथील जुन्या जाणत्या लोकांना माहित असल्याप्रमाणे म्हणतात कि किमान २५-३० वर्षापूर्वी एक नवविवाहित स्त्री ची लग्नाच्या दिवशीच हत्या करून तिला आजूबाजूला असणार्या मेंग्रोव्स च्या झाडात टाकले. तेव्हापासून तिची आत्मा तिकडेच भटकत आहे. मढ ला असणारे वाचक त्यांना नक्की माहित असेल .मला तर अस वाटत मढ व मार्वे ला खूप सारे होण्टड जागा आहे. तुम्हाला माहित असल्यास कमेंट मध्ये लिहा. ५)जुहू - S.N.D.T.कॉलेज - हा हे देखील आपल्या लिस्ट मध्ये आहे म्हणतात कि साधारण रात्री २-३ च्या सुमारास एक स्त्री लहान मुलांना इंग्रजी मुळाक्षरे व अंक शिकवण्याचा आवाज येतो व लहान मुले रडण्याचा व त्यांना गालावर चापट मारण्याचा आवाजही येतो अस बाजूला असणारे रहिवासी म्हणतात. म्हणून काही १०-१२ जनाच्या मुला-मुलीच्या ग्रुप ने रात्री कॉलेज मध्ये जायचं ठरवलं पण रात्रभर राहिल्यानंतर तिकडे त्यांना काहीच अस अनपेक्षित मिळाले नाही व कसला आवाज हि नाही आला. घोस्ट ऑफ टीचर. !!! ६)गोरेगाव (आरे मिल्क कॉलोनी) - जे वाचक इथे राहत असतील त्यांना सांगायची गरजच नाही आहे कि हि किती झपाटलेली जागा आहे. थोडक्यात मुंबईची फेमस जागा इथेच पुढे फिल्मचे सेट व शूटिंग हि होत असतात. हा रस्ता गोरेगाव ते पवई ला जोडणारा रस्ता आहे. इकडे बोरीवली नेशनल पार्क मधून येणारे बिबटेच घाबरवत नाही तर पोर्णिमा व अमावस्येच्या रात्री दोन्ही बाजूला झाडे-झुडपे व मध्ये रस्ता अश्या रस्त्याच्या आजूबाजूला झाडात एक म्हातारा माणूस धुकेत चालत अदृश्य होताना दिसतो व एक सफेद साडी मधील बाई लहान मुलासोबत रोड क्रॉस करताना दिसते व मधेच गायब होते खूप व इकडे एका बाईचा अपघात झाला होता तिचा चेहरा नंतर खूप विद्रूप झाला होता ती स्त्री रात्रीचा गाड्यांचा पाठलाग करताना खूप लोकने अनुभवले आहे व याच मुळे गाडीहुन अपघात् इकडे होत असतात. ७)बोरीवली नेशनल पार्क (कान्हेरी गुंफा) - इकडचा रस्ता देखील झपाटलेलाच आहे संध्याकाळची वेळ होऊन गेल्या नंतर गुंफा हुन गेट वर जात असताना आपल्या शरीरावर अचानक दगडांचा वर्षाव होऊ लागतो इथले जुने कर्मचारीच असे सांगतात. अजून एक आपण रात्रीच्या वेळी ४ व्हीलरने जात असल्यास एक माणूस लिफ्ट मांगतो व गाडीच्या आत बसल्यास तो गायबच होतो. ८ ) माहीम - येथे राहनारे लोकांना MMC Road वरील एक जुनी गोष्ट नक्की माहित असेल या रोड वर एक नाक कापलेली बाई फिरत असते. पूर्वी जे बिगारी व गरीब लोक ज्यांना घरे न्हवती ते कामगार रस्त्यावर झोपत असे तेव्हा हेच भूत त्यांना त्यांच्या अंथरूनाहून उचलून रस्त्यावर आपटायची या तिकडे जवळ असलेल्या शौचालय जवळ आपटायची. माहीम रेल्वे स्टेशन जवळ कुरेशी महाल नावाची एक इमारत आहे या इमारतीच्या टेरेस वर लोकाने खूप सारे बुटके माणसे बघितले आहे यांना बघता बघता सावलीत त्यांची उंची ४ मजल्या इमारती एवढी होते अश्या इथले रहिवासी सांगतात. येथे पुढे किणी हाउस नावाची इमारत आहे इथेही खूप सारे भूत फिरत असतात पण या इमारती मध्ये १० च्या नंतर कुणी हि जायची हिम्मत करत नाही. अजून पुढे गेल्यावर दादर शिवाजी पार्क मधील केटरिंग कॉलेज येथे २ मोठे झाड आहे किमान हजारो वर्षापूर्वीचे तरी असतील येथे या झाडयाचा वेळी लांबूनच वॉर्निंग साईन देतात कि इकडे येऊ नका. खूप सारे गाडी चालकाने रस्ता क्रोस करताना एका म्हातार्या बाई ला बघितलं आहे आणि आपण तील वाचवण्याचा प्रयत्न केलास अर्थात इमर्जन्सी ब्रेक मारला तर आपली गाडी त्या झाडावरच आदळते. तुम्हाला अगर खर्च हा रस्ता बघयचा असेल तर नक्कीच जाऊन या हा रस्ता अन्तोनिओ डीसिल्वा आणि केटरिंग कोलेजच्या दिशेने अर्थात शिवाजी पार्क येते जाताना लागतो. नक्कीच जाऊन या.
No comments:
Post a Comment