Sanjay Kamble
ही पोस्ट वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!!! आज तारीख २८ फेब्रुवरी २०१५... रात्रि चे ११ वाजलेत... मी माझ्या या छोट्याशा रूम मधे बसलोय... काही दिवसापुर्वी शेजारची मुल क्रिकेट खेळताना लागलेल्या बॉल ने माझ्या रूमच्या खिडकीची काच फुटून एक तुकडा निघालाय आणि त्यातून बाहेरच्या गडद्द अंधाराची जाणाव होतेय.. माझ्या रूमचे लाईट्स बंदच आहेत... सायलेन्ट मोडवर चार्जींगला लावलेल्या मोबाइल वर टाईप करून माझा अनुभव तुमच्या साठी पाठवतोय... कुणाला खरा वाटेल, तर कोणी खोट समजुन माझी मस्करी करेल... असो.. आपल्या पैकी अनेक जन काम करत आपल शिक्षण पुर्ण करायचा प्रयत्न करतात.. दिवस भर college आणि सायंकाळी एखादा part time job...मग काम कसलही असले तरी न लाजता आपण करतो, शेवटी नोकरी करायची तीथे लाजून चालत नाही... मी ही असच एक part time काम करत होतो... दिवसभर college करून रात्रि शेजारच्या काकांची रिक्शा चालवायचो... थोडी फार कमाई व्हायची... जितके जास्त काम तितके पैसे, त्यामुळे कामातून वेळेच भान रहात नसे... अभ्यासाच साहीत्य जाताना रिक्शा मधेच ठेवायच, म्हणजे कस्टमर येईपर्यन्त थोडा अभ्यास..... आगस्ट २०१४ रविवार.. त्या दिवशी सकाळ पासुनच जोराचा पाऊस सुरू होता.. शेवटी पावसाळ्याचे दिवस...माझा नेहमी सारखा सायकल वरून college चा प्रवास सुरू झाला, धो धो पाऊस असा काही बरसत होता जणु पावसाळ्याचा सगळा स्टॉक आजच पुर्ण करणार आहे ... आणि भरीत भर म्हणून त्यात चार वेळा सायकल ची 'चेन' पडली पोहचायला चांगलाच वेळ झाला वर्गात यायची परवाणगी मागतली तसे सरांनी माझ्यासमोर हात जोडले आणि एक वेगळीच स्माईल देत म्हणाले... ' फक्त पाचच मिनीटच शील्लक आहेत ... माझा तास संपेपर्यन्त आपण बाहेरच उभ रहाव ही नम्र विनंती......' त्यांच बोलन ऐकुन खुप बेकार वाटल, पन नाईलाज. सरांनी शालुतून जोडा हाणला होता... तास संपला आणि आता गेलो तर पुन्हा girlfriend बरोबर थोडा वाद झाला. कारण रात्रि बारा वाजता birthday wish केले नाही ... कट्ट्यावर गेलो तर मित्रसोबत पन वाद... कारण होत कोल्हापुर शहरापासुन ६८ किमी अंतरावरचा बर्की धबधबा पहायला जायचा बेत मीच ठरवला आणि आज नेमका मीच उशीरा आलो होतो... कदाचित यामुळेच लहानपणापासुन मला सर्व विसरभोळा म्हणतात... माफी मागुन काहीच उपयोग झाला नाही... 'कुत्र्याच शेपुट, वाकडी ती वाकडीच....' 'जित्याची खोड मोल्याशिवाय जाणार नाही...' यांसारख्या म्हणींचा वर्षाव झाला तसा मी आणि रवि (माझा मित्र ) तीथुन बाहेर पडलो... पाऊस होताच... दोघेही सायकल वरुन जात होतो.. सायकल चालवत मी म्हणालो.. " काय यार आजचा दिवसच बेकार गेला बघ... सकाळी सकाळी कुणाच तोंड बघीतलेल काय माहिती..." माझ बोलण ऐकताच रवी म्हणाला.., " खरच रे...एक एक अशी अपशकुनी माणस असतात ना की सकाळी सकाळी दिसलीत की त्या दिवसाची पार वाट्टच लागतो..." त्याच बोलन ऐकताच झटकण लक्षात आल की आज मी नेमक उठल्या उठल्या आरश्यात स्वता:ला बघीतलेल.... विषय बदलण्यासाठी मी म्हणालो.. " हो बरोबर आहे तुझ पन जाऊदे रे... तुझे बाबा कसे आहेत ..." तसा रवि न माझ्याकडे एक वेगळाच कटाक्ष टाकला... आणि रागाने पहात म्हणाला... " तब्बेत बरी आहे ना तुझी.... यड्या... मागच्या वर्षी बाबा वारले आणि तुच सगळ करत होतास त्यांच... विसरलास...?....." रवीचे शब्द ऐकताच मनात म्हणालो 'अरे बाप रे... काय पन हा विसराळुपना.. ' पुन्हा रवि म्हणाला... "पन आज सकाळी सकाळी कुणाच तोंड बघुतलस ते आठव, अरे काहीतरी महत्त्वाच काम असल तर ही माणस नेमकी मांजरासारखी आडवी येतात...यांना जेल मधेच टाकायला पाहीजे....आपटायला पाहिजे...फोडायला पाहिजो.. तुडवायला पाहिजे..." अशा अपशकुनी माणसांच हे करायला पाहिजे...ते करायला पाहिजे... आणि मी मात्र त्याच बोलन ऐकत चेह-यावर उसण हासु आणत होतो... आजचा दिवस खुप बेकार गेला पन त्याहूनही वाईट पुढे नशिबान लिहुन ठेवलेल... घरी पोहोचलो पन आज कोणाशीही वाद घालायचा नाही हे निश्चित केलेल... रात्र झाली म्हणजे ड्यूटी ची वेळ झालेली त्यामुळे रुम मधे जाऊन मोबाइल charging ला लावला आणि आईने तयार केलेले जेवणाचे ताट संपवुन काकांची वाट पहात घरीच होतो... ११ वाजुन गेलेले त्या दिवशी त्यांना यायला थोडा वेळ झाला होता, मी पन फ्रेश झालो आणि रुमच्या लाइट्स बंद करून त्यांच्या घरी गेलो... रिक्शाची किल्ली माझ्या हाती देत ते म्हणाले.. " संजु... आज पाऊस जास्तच पडतोय... संभाळुन जा..." हो काका म्हणत रिक्शा घेऊन मी आमच्या नेहमीच्या स्टॉपवर गेलो... पाऊस म्हणजे भरलेली बादली वरुन एकसारखी ओतावी तसा बरसत होता... आज लोकांची वर्दळही कमी होती... साडे आकरा...ते पावणे बारा वाजले असतील.. खांबावरील दिव्यांच्या प्रकाशात आकाशातून कोसळणा-या पावसाच्या सरी आणखीणच रौद्र दिसत होत्या... आज अभ्यासाचा अजिबात मुड नव्हता म्हणून बारीक आवाजात किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकत बसलेलो... तोच रस्त्याच्या दुस-या बाजुला एका बंद दुकानाच्या पायरीवर आडोशाला उभा एक माणूस मला हात करून बोलवताना दिसला... मी रिक्शा सुरू करून त्याच्या जवळ गेलो... पन्नाशीतला तो इसम, छानसा पांढरा शर्ट तशीच पैंट, हातात छत्री.. मी जवळ जाताच डोळ्यावरील चश्मा निट करत झटकन रिक्शात बसत म्हणाला... "M.I.D.C. फाटा..." त्याला घेऊन मी त्याने सांगितलेल्या ठिकाणाकडे निघालो.. मी रिक्शाच्या आतल्या काचेवरील पाणी कापडाने स्वच्छ करत म्हणालो.. " दिवसभर पावसाने पार वाट लावली आहे...आजच्या पाऊसने पंचगंगा नदीला महापुर येणार अस वाटतय..." त्यान फक्त 'हां' एवढ मोजकच उत्तर दिल... काचेतून त्याच्याकडे पहात मनात म्हणालो.. 'च्यायला काय बोरिंग माणुस आहे...' आणि 'किशोर कुमार' साहेबांचा आवाज वाढवून शांतपणे रिक्शा चालवू लागलो... काही वेळाने माझ्या लक्ष्यात आल की तो माणुस आरशातून एकटक माझ्याकडे पहातोय ... मी पन समोरच्या आरशातून त्याच्याकडे पहात स्माईल दिली, पन चेह-यावर कसलेच भाव न आणता तो तसाच पाहू लागला...
... शहर मागे पडल आणि आम्ही कोल्हापुर शहराच्या पुर्वेकडील हायवे ला लागलो... हायवे वरही आज वहान फारशी नव्हतीत.. कदाचित पावसाचाच परिणाम असावा... कधीतरी एखादा मालवाहू ट्रक जवळून भरधाव वेगाने निघुन जाताच वेगात फिरणा-या टायर्स मधुन स्प्रे सारखा पाण्याचा फवारा तयार व्हायचा... कधी तशीच एखादी चार चाकी आलिशान मोटर बाजूचा नारंगी इंडिकेटर चमकवत निघून जायची... पाऊसाचा जोर कायम होता... आरशात पाहिल तर अजुनही तो माणुस तसाच एकटक माझ्याकडे पहात होता... पुलावरून पलाकडे गेलो तर रस्त्याच्या कडेला उताराला कोणितरी मला हात करताना दिसल... मोटरसाइकल ढकलत जाणा-या दोघापैकी एक हात करत होता.. आरशातून मागे पहात मी हल्की स्माईल देत त्या पैसेंजरला म्हणालो..."ढकलत चाललेल...पंक्चर झाली असणार... आसल्या पावसात एवढ्या रात्रि गाडी ढकलन म्हणजे लय बेकार अनुभव.." माझ्या बोलण्यावर त्यान काहीच प्रतिक्रिया दिली नाही... तो तसाच तिरक्या नजरेने माझ्याकडे पहात होता जसा कधी माणुस पाहीलाच नाही... मी पुढ जात हात करणा-या जवळ रिक्शा थांबवली...तर माझेच मित्र निघाले... "काय रे विन्या. ( विनोद )... काय झालं..." मी माझी मान रिक्शातून किंचीतशी बाहेर काढत विचारल... तस तो एकदम खुश झाला आणी म्हणाला... " खरच रे...देवासारखा आलास... फिल्मचा शेवटचा ९ ते १२ चा शो बघुन येत होतो रे.. पुलावर आलो आणि नेमक पेट्रोल संपल..." त्याच बोलण ऐकुन मी म्हणालो.. " तुमची तर कायमची बोंब... थांब गाडीतल थोड देतो..." तसा तो म्हणाला..." अरे तुझा मोबाइल कुठ आहे ...तुला विचारायला तुझ्या girlfriend चे पन्नास फोन येऊन गेलेत आम्हाला...तीचा birthday आहे ना..तीचा फोन का उचलला नाहीस...? " त्याच बोलन ऐकुन डोकच फिरल...उद्या college ला गेल्यावर काही खर नाही माझ....मोबाइल घरी विसरला होता आणि तो ही सायलेंटवर होता.. .. मी काही बोलायच्या आत तो पुन्हा विचारू लागला.. " एकटाच कुठ जात आहेस.... इकडे कुणाला आणायला निघालास काय..." त्याच बोलण ऐकताच मी मागे पाहात म्हणालो "एकटा कुठ पैसेंजर आहे ना मागे..." ...पन मागे कोणीच नव्हत...झटकन खाली उतरलो..आजुबाजूला पाहील पण तो माणुस कुठच दिसत नव्हता...मला आता भयंकर राग आलेला... " अरे एक माणुस होता..... त्याला घेऊन चाललेलो.... च्यायला.... इतक्यात पळून गेला... तुम्ही गाडी ढकलत आहे हे मी त्या पैसेंजर ला सांगत होतो..." माझ बोलण ऐकुन विनोद जरा वैतागतच म्हणाला... " मी तुझी रिक्शा खुप लांबुन बघत होतो... मला तर कोणीच उतरून गेलेल दिसल नाही .." माझ डोक चक्रावल... इतका वेळ त्या माणसा सोबत मी बोलत होतो... आणि इतक्यात गेला कुठ .... शक्यच नाही ..... पैसे द्यायला लागतील म्हणून पळुन गेला असेल..जास्त विचार न करता मी त्यांना रिक्शातील थोड पेट्रोल पाईप ने काढून दिले आणि तिथून मागे फिरलो... खुप राग आला होता... इतक लांब येऊन फुकट पेट्रोल जाळल... त्या विचारातच रिक्शा चालवत होतो... पावसाचा जोर किंचितसा कमी झालेला... वहानांची किरकोळ ये जा होती... काही वेळातच एक आराम बस मला ओव्हरटेक करत हायवेखालील पुलातुन शहराच्या दिशेने गेली... मी ही त्या पुलाखालून शहरात जायला टर्न घेतला, तशी माझी नजर पुलापासुन थोड्या दुर बस स्टॉप मधे उभ्या एक दांम्पत्यवर गेली.. कुठ जायच विचारायला गाडी त्यांच्या जवळ नेली पन मी काही बोलणार तोच त्यांनी मला हात करून थांबवल.. ते आत बसले तस मीटर सुरू करुन निघालो... त्यांना थोड दुर जायच होत..त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीकडे आमचा प्रवास सुरू झाला... रात्रि चा एक वाजला असेल.. त्यांना घेऊन माझी रिक्शा पुढे निघाली... काचेवर पडणारे पाणी बाजुला करत व्हायपर एकसारखा फिरत होता... आभाळ लख्ख काळोखाने भरल होत ... पावसाचा जोर ओसरला असला तरी रिप रिप सुरूच होती... रस्त्यात काही ठिकाणी खड्डे, आणि त्यात साठलेल पाणी त्यामुळे मी जरा जपुनच चालवत होतो... दोन्हा बाजुला वडाची मोठमोठी झाडं...मी आरशातुन थोड मागे पाहिल तर दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते... पण मी यासाठी पाहिल की ते पळुन गेले की अजून आहेत.. थोड्या वेळात मला समोर एक माणुस दिसला जो माझ्या रिक्शाला हात करत होता... मी रिक्शा त्याच्या जवळ नेली आणि डोकच फिरल... मी त्याला ओळखल होत... त्याच्याकडे पहात म्हणालो... " ओ काका... पैसे न देताच मघाशी रिक्शातून पळून गेलात... चला पैसे काढा.." रिक्शात बसलेल दाम्पत्य थोड घाबरल... पण मी घडलेली हकीकत सांगितली तसे दोघेही त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागले.. " ओ काका...माणुस बघितला नाय का कधी .... खुप झालं ...चला पैसे काढा..." माझ बोलण ऐकुन त्यांच्या चेह-यावर काहीच भाव दिसत नव्हते... ते शांतपणे म्हणाले... "पैसे हवेत का....देतो... " तसा त्यांनी आपला चश्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाले... " बाळ थोड्याच अंतरावर माझ घर आहे मला तीथ सोड तुला पैसे देतो.." त्याचा केविलवाना चेहरा पाहून मी ही तयार झालो... त्याला रिक्शात बसवून निघालो... मधेच वरच्या आरशातुन मागे पाहूत ते सर्व असल्याची खात्री करु लागलो... तो पन काका तसाच एकटक मला पहात होता... काही अंतर पुढे एका अरूंद पुलावर आलो.. पावसाच पाणी पुला खालून वेगाने वहात होत.. त्यातच पावसाळी बेडकांचा कर्कश्य आवाज... खुपच भयान वातावरण होत... इतक्यात त्या काकानी मला गाडी थांबवायला सांगितली... मी रिक्शातुन मान डोकावत आश्चर्यान आजुबाजूला पाहिल तर कुठही घर, वस्ती काहीच नव्हत...दाट काळख आणी भयान शांतता पसरली होती.. मी त्याला म्हणालो... " काका...पुरेसे पैसे नसतील तर द्यायचे राहूदेत... तुमच्या गावात सोडतो..." तोच मागे बसलेल्या बाई म्हणाल्या... "काका तुमचे पैसे आम्ही देतो पन अशा ठिकाणी इतक्या रात्रि उतरू नका.." पन त्यांनी काहीच ऐकल नाही... शेवटी ते उतरले...चश्मा घालत त्यांनी खिशातून पाकिट काढल पण पैसे काढताना त्यांच्या हातातून दहा रुपयांची एक नोट खाली पडली...ते खाली वाकणार तोच मी म्हणालो "थांबा काका मी उचलतो. " मी खाली वाकुन नोट घेणार तोच काळजात चर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र्र कन झालं.. भितीन अक्षरशा: घाम फुटला... जीव आता जातोय की मग जातोय अशी अवस्था झाली... कसलाच विचार न करता रिक्शा चालु केली आणि सुसाट निघालो... मागे बसलेल दाम्पत्य मला आश्चर्याने म्हणाले...अहो अचानक काय झाल तुम्हाला....मघापासुन पैसे द्या म्हणून त्यांच्याशी भांडत होतात ना. आणि आता तसेच चाललाय....निदान पैसे तरी घ्यायचे त्यांचे..." आरशातून त्यांच्या कडे पहात म्हणालो "कोणीच मागे त्या माणसाकडे बघू नका... इथुन बाहेर पडूया मग सांगतो..." माझ बोलन ऐकताच दोघेही म्हणाले.. " काय झाल... इतके का घाबरलाय तुम्ही.. " "काही नाही..." चेह-यावरील भिती लपवत मी म्हणालो... त्या दोघाना माझ वागण विचीत्र वाटत होत... एकमेकाकडे पहाते ते शांत बसुन राहीले... मी आरशातून त्यांच्याकडे पहात म्हणालो..." भाऊ... या रस्त्यावर काही accident वगैरे झालेला आहे का..." माझ बोलण मधेच थांबवत त्या बाई म्हणाल्या...
.. "अहो... कोणीतरी रिक्शाला हात करतय..." मी रिक्शाच्या लाईटच्या प्रकाशात समोर पाहिल...काही समजायच्या आतच त्या बाई पुन्हा म्हणाल्या... " अहो... हे काका मागेच उतरले होते ना, मग ते इतक्यात पुढे कसे आले... आणि परत रिक्शाला हात करत आहेत..." व्हायपर ने काचेवरील पाणी बाजुला करत पाहील आणि काळजाचा ठोकाच चुकला.. अंगावर सर्रर्रर्रर्रर्रर्रर्र कन काटा उभा राहीला... अंग थरथरत होत पण तसच धाडस करत मी आरशात पहात मागे बसलेल्या नवरा बायकोला म्हणालो... "... बाईसाहेब तुम्ही अजिबात घाबरू नका.. भाऊ तुम्ही बाईसाहेबांचे डोळे बंद करून दाबून धरा आणि भाऊ तुम्ही पन तुमचेे डोळे गच्च बंद करा... कोणीही त्याच्याकडे चुकून पन बघू नका...देवाच नाव घ्या... आता तोच तारेल..." म्हणत मी गाडीचा वेग वाढवला.... मी त्या दोघाना धीर देत होतो पण खरतर मी आतुन हादरून गेलो होतो.. रस्त्यावर तोच माणुस उभा राहून हात करत होता... त्याला पहाण्याच धाडस होत नव्हत पण मन ऐकत नव्हत. धोड धाडस करून तिरक्या नजरेन बघितल... अचानक तो आपला रक्ताने बरबटलेला चेहरा आक्राळ विक्राळ करत कण्हू लागला... खालचा जबडा तुटून लोंबत होता, त्याच अंग चिरडल्यासारख जखमांनी भरलेल.. पांढरा शर्ट रक्ताने आणी चिखलाने ..पुर्ण भिजलेल... चश्म्याच्या काचा फुटून दोन्हा डोळ्यांमधे घुसल्या होत्या... त्याची ही अवस्था पाहुन वाटल की एक, दोन नव्हे तर कित्येक अवजड वहानांखाली सापडून त्याच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असाव्यात... जोरजोरात कण्हत लंगडत लंगडत चालत आपल्या रक्ताळलेल्या चेह-याने माझ्या कडे पहात म्हणाला... " थांब रे.... तुझे पैसे घे..ही ही ही ही ही ही .." त्याची भयानक अवस्था आणि त्याहुन विद्रुप हास्य ऐकुन मेंदुत झीणझीण्या आल्या... मागे बसलेल्या त्या बाई डोळ बंद असुनही थरथरत अक्षरशा: घाबरून रडू लागल्या.. पन काही विचार न करता रिक्शाचा वेग तसाच ठेवला... डाव्या बाजुच्या आरशातून मागे पाहल तर तो अजुनही आमच्या मागे येत होता... मागे बसलेले दोघेही पति पत्नी अक्षरशा: हादरून गेले होते... आपल्या नव-याला बिलगुन त्या बाई रडत होत्या आणि थरथर कापतही होत्या... मी दोघानाही सांगितल केली की तुमच गाव येई पर्यन्त डोळ उघडून बाहेर पाहू नका.. . माझ्याही काळजाचा थरकाप उडवला होता... काळजाचे ठोके मला स्पष्ट जाणवत होते... अजुनही धोका टळला नव्हता... त्याची हद्द संपे पर्यन्त ते आम्हाला तस सोडणार नव्हत... श्वास रोखुन मी रिक्शा चालवत होत... वरील काचेतून मागे पाहिल तर दोघेही पती पत्नी भितीने अजुनही डोळे बंद करुन थरथरत होते... मी ही आज मनापासुन घाबरलो होतो... समोर पहात रिक्शा चालवु लागलो... तोच एक पांढरी आकृति एका क्षणापुरती दिसली आणि गायब झाली तसा अंगावर काटा उभा राहीला... आरशातून मागे त्या पती पत्नीला पाहिल आणि काळजाचा ठोका चुकला... ते दोघे तसेच भीतीने थरथरत खाली मान घालून बसलेले आणि त्यांच्या शेजारी ती पांढरट आकृति दिसु लागली आणि पुन्हा नाहीशी झाली ... काही अंतरापर्यन्त हा लपंडाव चालूच होत... पन त्याच्या नजरेत न बघता मी रिक्शा तशीच वेगात नेत होतो...गावचे स्मशान ओलांडून पुढे आलो आणि अचानक मागुन आलेल्या एक भयानक आवाजाने कानठाळ्या बसल्या. " चुकलास.....चुकलास........चुकलास....." आवाज इतका भीषण होता का दीघेही हादरून गेलो... मी बाजुच्या आरशात पाहिल तर ती पांढरट आकृति तशीच उभी मागे मागे सरकत नाहीशी झाली... समोरच्या आरशात पाहात त्या नवराबायकोना धीर दीला..." बाईसाहेब..आता घाबरायची गरज नाही... त्याची हद्द संपली..." पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की अजुनही डोळे उघडायला तयार नव्हत्या.. डोळे गच्च मिटून ढसाढसा रडू लागल्या... त्यांचा नवरा म्हणाला... "अग गेला तो.. पाच मिनीटात आपल्या गावात पोहचतोय..." गावातील खांबावरील लाईट दिसल्या तसा आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला... त्यांनी मला सांगितल..." अहो त्या ठिकाणी नेहमी अपघात घडतात... परवाच एका अपघातात दोघे जागेवरच संपलीत...पण तुम्हाला कस समजल ते भुत आहे ..?....." आरशातून त्यांच्याकडे पहात मी म्हणालो... " मला पैसे देताना त्यांचे पैसे खाली पडले, ते द्यायला खाली वाकलो तस लक्ष्य त्यांच्या पायावर गेल... त्याचे दोन्हा पाय रक्तान भिजलेले आणि उलटे होते. आणि म्हणून तीथुन वेगात बाहेर पडलो..." त्यांच्याशी बोलता बोलता माझ लक्ष्य काही अंतरावरील एका डिजीटल बोर्ड वर गेल... खांबावरील लाईटच्या प्रकाशात तो स्वच्छ दिसत होता ... आता मात्र डोकच सुन्न झाल... भितीन डोळे पांढरे झाले, अंगाचा थरकाप उडाला... पायाच्या नखा पासुन डोक्याच्या केसा पर्यन्त हादरून गेलो... ढोल वाजावा तस काळीज दान दान दान धडकत होत.. अंगातली सारी शक्ति एकवटुन जोराने ओरडाव, किंचाळाव अस वाटल... तोच मागुन हळुच त्या बाईने आपले रक्ताने आणि चिखलाने माखलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खस्स्स्स्स कन आपली नखे रुतवलीत.. वेदनेन माझा जिव कळवळला... तशी मागुन माझ्या काना जवळ येत त्या पुटपुटल्या... " त्याचे उलटे पाय तुला दिसले आणि आमचे पाय कसे आहेत हे कुठ बघीलस...." एवढ बोलुन ती भरड्या आवाजात एक भीषण हास्य करुन जोरात किंचाळली...आरशातु मी मागे पाहिल तसा काळजी छाती फाडून बाहेर याव असा हादरलो... तीच डोक फुटून केसातून वहाणार रक्त तिच्या चेह-यावर पसरल होत तिच्या नव-याची पन तिच अवस्था होती... आपले दोन्ही डोळे मोठे करुन दोघानी आपला रक्ताळलेला जबडा पसरला आणि भयान हास्य केल.. आता माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते.... अस वाटल हा माझ्या आयुष्याचा शेवटच आहे .... एका क्षणात आई, वडील, मित्र, मैत्रिणी आणि माझी girlfriend सर्वाचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले... डोळ्यावर अंधारी आली तशी माझी रिक्शा जोरात त्या लोखंडी खांबावर धडकली...आणि बेशुद्ध झालो... त्या डिजीटल बोर्ड वर त्याच पती पत्नी चे फोटो लावलेले जे रिक्शात होते आणि खाली लिहीलेल.... " आमचे परममित्र आणि त्यांच्या पत्नीचे अपघातात दुर्दैवी निधन झाले...त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि..." शुध्दीवर आलो तेव्हा hospital मधे होतो... डॉक्टर माझ्या शेजारीच कोणाच तरी आपरेशन करत होते... आपरेशन, चिरफाड असल्या गोष्ट पहायच धाडस होत नाही, त्यामुळे लगेच बाहेर आलो तर समोर माझा मित्र परिवार दिसला... काही बोलणार तोच समोरून दोन वॉर्डबॉय जखमांनी भरलेल्या एक निपचीप पडलेल्या मुलीला आत घेऊन गेले...कदाचित ती संपली होती...तीला बघुन थोड वाईट वाटल... इतक्यात समोरून जखमांनी भरलेली अगदी तशीच मुलगी रागाने माझ्याकडे एकटक पहात चालत येत होती... मी ओळखल... आत्ता हिच्यासारखीच एक जख्मी मुलगी आते नेली... रखरखत्या नेजरेने ती मुलगी माझ्याकडे पहात आत त्या रुम मधे गेली आणि माझी नजर रुमच्या बाहेर वर लिहीलेल्या बोर्डवर गेली... आणि त्यावर लिहीलेले शब्द वाचुन मेंदुत लाल मुंग्यांच वारुळ उठल्यासारख झाल... आता मात्र मेंदूच बधीर झाला होता... तसाच धावत आत गेलो... आणि समोरच दृश्य पाहून विचार करायची शक्तिच संपली... सर्व काही कल्पनाशक्ती पलिकडच होत... आत आपरेशन नाही, पोस्ट मार्टम सुरू होत.... ते ही माझ्या शरिराच..... ती पोस्ट मार्टम रूम होती.... या घटने नंतर लगेचच माझे आई वडील हे घर सोडुन गावी गेले.....कायमचे.... पन मी आजही माझ्या या छोट्याशा रूम मधेच असतो ... या घटनेला सात महिने उलटून गेले आहेत .... काही दिवसापुर्वी शेजारची मुल क्रिकेट खेळताना बॉल ने माझ्या रूमच्या खिडकीची काच फुटून एक तुकडा निघालाय... तो बॉल माझ्या रुममधे पडलाय... बॉल कोणीच न्यायला आल नाही.... माझ्या रूमचे सर्व लाईट्स बंदच आहेत आणि नेहमी बंदच असतात... 'त्या' रात्रि charging ला लावलेला मोबाइल तीथच आणि तसाच आहे..... नेहमी चार्ज होत रहातो... Ok friends रात्रिचे 12 वाजायला आलेत....माझी भटकायची वेळ झाली..... खुप गरम होतय म्हणून तुम्ही बाजुची खिडकी उघडी ठेवली असेल तर जरा निरखुन पहा... कदाचित कोणाची तरी अस्पष्ट सावली दिसतेय.... GOOD NIGHT ........!!!

No comments:
Post a Comment