Sunday, May 31, 2015

देव उपासना भाग १५

देव उपासना
भाग १५
विश्राम भाऊ साहेबांच्या रूम मधून बाहेर येतो आणि घनश्यामला बोलतो, "सर्व माणसांना तैयार कर, आपल्यांना गावातील एक एक माणसांची चामडी सोलून काढायची आहे..."
"जी आज्ञा छोटे मालक..." घनश्याम बोलला...
"बेटा त्या राहुलला पकडून इथे आण, मी स्वतः आपल्या हातांनी त्याला ठार मारणार..." पुरषोत्तम त्वेषात बोलला...
"तुम्ही चिंता नका करू काका, राहुलच्या सोबत मी संतोषच्या दोन्ही बहिणींना पण इथेच घेवून येणार..." विश्राम बोलला...
हे ऐकून पुरुषोत्तमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच तेजस्वीपणा आला... त्यामध्ये वासना स्पष्ट दिसत होती...
विश्राम, गावात वादळ आणण्याची तैयारी करत आहे आणि पल्लवी स्वयंपाक घरात गुंतलेली होती... तिच्या सोबत एक नोकर पण होता...
"मालकीणबाई...! असू द्या, मी करेन सर्व..." नोकर तिला बोलला...
"काही होत नाही काका, इथे काम करूनच तर माझं मन मोकळं होतं..." पल्लवी बोलली...
"जशी तुमची इच्छा मालकीणबाई..."
तेव्हा त्यांना काहीतरी ऐकायला येतं... "आज मी तुला सोडणार नाही... (एका माणसाचा आवाज)"
"हा कसला आवाज आहे मालकीणबाई...??"
"माहिती नाही...??" पल्लवी चिंताक्रांत होत बोलते...
पल्लवी स्वयंपाक घरातून बाहेर येवून पाहते, पण तिला कोणीच दिसत नाही...
"तू कशाला इथे आला आहेस, पळ इथून... (एका मुलीचा आवाज)" हा आवाज पुन्हा येतो...
पल्लवी अचंबित होवून पुन्हा चहु बाजूला पाहते...
"बघ... तू जा इथून नाहीतर, कोणी तरी येईल... (पुन्हा एका मुलीचा आवाज)"
पल्लवी अचंबित, अस्वस्थ होवून पुन्हा चहु बाजूला पाहते... तिला काहीच कळत नव्हतं... कि आवाज कुठून येत आहे..!!
ती पुन्हा स्वयंपाक घरात येते आणि नोकराला विचारते, "काका, तुम्ही पुन्हा काहीतरी ऐकलं काय...?"
"हो मालकीणबाई, ऐकलं तर... पण आवाज खूप हळू येत होता..."
"मला वाटलं माझे कान वाजत आहेत..." पल्लवी बोलली...
त्या घरात ह्यावेळी पल्लवी शिवाय दुसरी कोणतीच बाई नव्हती... त्यामुळे पल्लवी अचंबित होती... ती मनातल्या मनात विचार करते कि, परत ह्या लोकांनी कुठे पुन्हा कोणत्या गरीब मुलीला उचलून तर नाही आणलं ना गावातून... ती लगेच आपल्या सासऱ्याच्या रूमच्या दिशेने पळत सुटते... रूमच्या बाहेर विश्राम घनश्याम आणि पुरुषोत्तम सोबत बोलत उभा होता... ती विश्रामला पाहून जागच्या जागीच थबकली...
विश्रामने तिला पाहताच विचारले, "काय आहे...??"
"काहीच नाही..." एवढं बोलून ती आल्या पावली पुन्हा मागे वळून निघून गेली...
"काल हिने खूप वाईट केलं आपल्या सोबत बेटा..." पुरुषोत्तम पल्लवीला पाहताच बोलला...
"सर्व काम संपवून हिला पण बघून घेईन काका, पहिले बाहेरच्यांना तरी बघून घेतो..." विश्राम बोलला...
पल्लवी पुन्हा स्वयंपाक घराच्या इथे येते... पण जेव्हा ती स्वयंपाक घराच्या जवळ येते तिला पुन्हा आवाज येतो...
"सोड मला काय करतोयस... (पुन्हा एका मुलीचा दयनीय आवाज)"
पल्लवी पूर्ण वाडा पाहण्याचा निर्णय घेते... एक एक करून ती सर्व खोली पाहते... एवढ्या मोठ्या वाड्यात जास्त करून खोल्या रिकाम्याच होत्या... पल्लवीला थोडी भीती पण वाटत होती पण तरीही ती एक-एक करून सर्व खोल्यांमध्ये डोकावून पाहत होती... पण तिला कोणत्याच रूममध्ये काहीच सापडत नाही...
"बस काका आणि बाबांची खोली राहिली आहे... पण तिथूनच तर मी काही वेळा पूर्वी जावून आली आहे.. काका आणि बाबांची खोली समोरा समोर आहे... तिथे तर असं काहीच नव्हतं... तरीपण आवाज तर स्वयंपाक घराच्या नजीकच कुठे तरी येत होता आणि त्या खोल्या तर स्वयंपाक घरापासून थोड्या लांबच आहेत..." पल्लवी मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटत होती...
हा सर्व विचार करता करता ती स्वयंपाक घराच्या जवळ येवून पोहोचते... कि तेच तिला अचानक आठवतं कि, "अरे संगीताची खोली तर पाहिलीच नाही..."
हा विचार करून तिचं हृदय धडधड करायला लागतं... ती विचार करते..., "मग हा आवाज काय संगीताच्या रूममधून येत आहे...!! पण संगीता तर इथे नाही आहे...??"
"संगीताची खोली स्वयंपाक घरापासून नजीकच आहे, तिथून आवाज स्वयंपाक घरात पोहोचू शकतो..." पल्लवी विचार करते...
काही वेळ थिजल्यासारखी तिथल्या तिथेच काहीतरी विचार करून, पल्लवी जिन्याजवळ जाते... त्या रूमकडे जातेवेळी तिचे पाय कोणत्या तरी अनभिज्ञ भयाने थर-थरत होते... जेव्हा पल्लवी खोलीच्या बाहेर पोहोचते तेव्हा थांबते...
"हुश्श... बरं झालं ह्या खोलीत पण कोणीच नाही आहे... पण हा आवाज येतोय तरी कुठून...!!" पल्लवी खोलीच्या बाहेर लागलेल्या कडीला पाहून मनातल्या मनात विचार करते...
पल्लवी खूप चिंतीत आहे... ती पुन्हा मागे वळून जिन्यावरून खाली उतरायला लागते...
"प्लीज सोड मला काय करतोयस... (पुन्हा एका मुलीचा दयनीय, रडका आवाज)"
पुन्हा कोणाचा तरी आवाज येतो... तो आवाज ऐकून पल्लवी जिन्याच्या अर्धवटच उभी राहते... ह्यावेळी तो आवाज तिला खूप जवळ ऐकायला येतो...
ती पुन्हा जिना चढून वर येते...
"तेच जे मला केले पाहिजे... (त्याच एका माणसाचा कठोर आवाज)"
"अरे देवा... हा आवाज तर संगीताच्याच रूममधून येत आहे, कोण आहे आतमध्ये...?" पल्लवी मनातल्या मनात बोलते...
पल्लवी आपल्या कंपन पावणाऱ्या हातांनी संगीताच्या खोलीची बाहेरची कडी खोलते आणि दरवाजा उघडण्यासाठी आतमध्ये धक्का देते पण........!!!!
क्रमशः

No comments:

Post a Comment