देव उपासना
भाग १६
पल्लवी आपल्या कंपन पावणाऱ्या हातांनी संगीताच्या खोलीची बाहेरची कडी खोलते आणि दरवाजा उघडण्यासाठी आतमध्ये धक्का देते पण........!!!! दरवाजा नाही खुलत...!!!
"माझा संशय खरा निघाला... आतमध्ये कोणी तरी आहे...!!" पल्लवी हळूच बोलते...
"संगीता...!! तू आतमध्ये आहेस काय...??" पल्लवी बाहेरून विचारते...
पण आतमधून काहीच प्रतिसाद नाही येत... मग पल्लवी काही वेळ थांबून पुन्हा आवाज देते.., "संगीता तू आतमध्ये आहेस काय... आणि हा तुझ्यासोबत कोण आहे...!!"
तरीही आतून काहीच प्रतिसाद नाही येत... तेव्हा पल्लवीला संगीताच्या खिडकीची आठवण येते... पल्लवी खिडकीकडे जावून तिला खोलण्याचा प्रयत्न करते, पण ती खुलत नाही...
"आईइ... प्लीज मला सोड... काय करतोयस... (मुलीचा रडण्याचा आवाज)"
पल्लवीला पुन्हा आतमधून आवाज ऐकायला येतो... पल्लवी आपल्या अंगातील पूर्ण शक्ती लावून जोराने धक्का देवून खिडकी खोलते... ती जे पाहते ते पाहून तिचे डोळे वटारले जातात... ती पाहते कि संगीता बेडवर पडली आहे आणि एक मुलगा तिच्यासोबत जबरदस्ती करत आहे...
"पल्लवी ताई... प्लीज मला वाचव..."
"संगीता हे सर्व काय आहे... आणि होतीस कुठे तू..." पल्लवी चिंताक्रांत शब्दांमध्ये विचारते...
"ताई आधी तू मला वाचव... नंतर तुला सांगते..."
तो मुलगा पल्लवीकडे पाहून बोलतो..., "तू जा निघ इथून... आज हिची अब्रू मी संपवूनच राहणार..."
"ये...!! कोण आहेस तू...?? सोड तिला नाही तर..." पल्लवी बाहेरून जोराने बोलते...
"आता मी आपलं काम केल्याविना हिला सोडू नाही शकत... तुला जे करायचे आहे ते करू शकतेस.. जा निघ..."
"नालायक, हरामखोर... कोण आहेस तू...??" पल्लवी रागाने खिडकीला पकडून बोलते...
"हे तर तुला नंतर कळेनच कि मी कोण आहे ते..." एवढं बोलून तो मुलगा पुन्हा आपल्या कामाला लागतो आणि संगीता दयनीय भावनेने फक्त पल्लवीला पाहत असते...
पल्लवी हे सर्व पाहून अचंबित राहते आणि तिच्या डोळ्यांमध्ये रागामुळे रक्ताचा संचार होतो त्यामुळे तिचे डोळे लाल लाल झालेले असतात...
"ताई प्लीज काही तर कर..."
"ती करून करून काय करणार... मी जे करतोय त्यात तुलाच मज्जा येणार आहे..."
ती लगेच खिडकी पासून बाजूला होवून जिन्यावरून खाली येवून... पळत पळत विश्राम जवळ जाते... पण विश्राम आपली पलटण घेवून कुठे तरी निघालेला असतो... तेवढ्यात तिला पाहून रागाने विचारतो... "काय आहे..!"
"मला तुम्हाला खूप आवश्यक गोष्ट सांगायची आहे..."
"हो बोल, काय बोलायचे आहे.."
"ते काय आहे... मला एकांतात तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे... गोष्ट थोडी गंभीर आहे..."
"तुझ्या सोबत अजून होवू पण काय शकतं... अनिष्ट कुठली..." विश्राम त्वेषात बोलला...
"अनिष्ट मी नाही हे घर आहे... हा कुटुंब आहे, माहिती नाही कुठल्या जन्माची शिक्षा भेटत आहे मला..."
"साली तोंड वर करून बोलतेस... असा वाटतंय पहिले तुझीच अक्कल ठीकाण्यावर आणली पाहिजे... चल तू आतमध्ये आज तुझी खैर नाही..." विश्राम पल्लवीचे केस खेचत बोलला आणि तिला खेचत आपल्या रूमपर्यंत घेवून गेला...
"आई... अरे नरधामा सोड मला..."
विश्राम हा आवाज ऐकून त्याच जागी लगेच स्तब्ध उभा राहतो...
"चिंता नको करूस आत्ता वादळ येणार आहे..." पुन्हा आवाज येतो...
"हा आवाज कुठून येत आहे...!!?" विश्राम पल्लवीला विचारतो...
"तेच तर सांगण्यासाठी मी येत होते, पण माझा कोणी ऐकतच नाही..." पल्लवी बोलली...
"आपली वटवट बंद कर आणि मला सांग हा आवाज कुठून येत आहे..." विश्राम रागाने दात खात बोलतो...
"संगीताच्या रूममधून येत आहे, संगीता आपल्या खोलिमध्येच आहे..."
"काय...!!!" विश्राम अचंबित होवून बोलला... विश्राम पल्लवीला सोडून पळत पळत जिन्याजवळ जातो... आणि जिना चढून तो संगीताच्या रूमच्या बाहेर पोहोचून तिचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो... पण दरवाजा पहिल्यासारखाच आतून बंद असतो...
विश्राम पण पल्लवी सारखाच संगीताच्या खिडकीजवळ जातो... खिडकीतून तो जे काही पाहतो त्यावर त्याला विश्वासच बसत नाही...
"दादा... प्लीज मला वाचव..."
"ह्या हरामखोराला पण पाहू दे... ह्याला माहिती तरी पडलं पाहिजे... षंढ कुठला...!!"
"हरामखोर...!! कोण आहेस तू...??" विश्राम जोराने ओरडून बोलतो...
"चुप्प बस छक्क्या... आवाज खाली... आणि निघ इथून... मला मजा करू दे..." तो एवढं बोलून पुढे होवून खिडकी बंद करतो... आतून संगीताच्या ओरडण्याचे आवाज येतच असतात...
विश्राम रागाने दरवाजा जवळ येतो आणि त्यावर जोर जोराने धक्के मारायला लागतो... पण दरवाजा काही खुलत नाही...
पल्लवी पण पळत पळत येते... तिच्यासोबत भाऊ साहेब आणि पुरुषोत्तम पण आवाज ऐकून स्वयंपाक घराच्या इथे येतात... ते लोकं पाहतात कि विश्राम संगीताच्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहे... ते लोकं पण लगेच जिना चढायला लागतात... तेवढ्यात दरवाजा तुटून जातो आणि विश्राम धडपडत आतमध्ये पडतो...
पल्लवी पण रूममध्ये येते... दोघेही अचंबित होवून रूममध्ये सर्वीकडे पाहत असतात...
"कुठे गेले ते दोघे..." पल्लवीने विचारले... विश्राम ने अचंबित झालेल्या डोळ्यांनी तिला पाहिले... तेवढ्यात भाऊ साहेब पण पुरुषोत्तम सोबत खोलीत येतात...
"काय झालं विश्राम...? हा दरवाजा का तोडलास तू...?" भाऊ साहेब अचंबित होवून विचारतात..
"ते... ते... बाबा संगीता आपल्या खोलीत होती..." पल्लवी कंपन पावणाऱ्या आवाजात बोलली...
विश्राम काही पण बोलण्याच्या हालातीत नव्हता... तो उभा होतो आणि खोलीच्या त्या दरवाजाजवळ जातो जिथे खोलीचा दरवाजा खोलीच्या सज्जामध्ये खुलतो... तो आतून बंद असतो... तो पल्लवीकडे पाहतो...
पल्लवी पण दरवाजाची कडी पाहून आश्चर्यचकित राहते... पल्लवी आणि विश्राम नजरेनेच एकमेकांना काहीतरी बोलतात... फक्त त्या दोघांनाच माहिती होतं कि ह्या बंद दरवाजाचा अर्थ काय असतो ते... पल्लवी थर-थरायला लागते आणि खोलीतून बाहेर येते...
"कोणी आम्हाला सांगेल का... इथे काय होत आहे...!!" भाऊ साहेब रागाने बोलले...
विश्राम काहीही न बोलता खोलीतून बाहेर आला.. कारण त्याला खूप मोठा धक्का बसला होता... खूप भयावह...
क्रमशः
No comments:
Post a Comment