मी प्रथमेश
आपल्याला एका घटनेबद्दल सांगणार आहो ज्यात ९ पर्वतारोहींना गूढरीत्या आपले प्राण गमवावे लागले होते. खुप तपासानंतरही त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळले नाही...

जानेवारी २८, १९५९ मध्ये रशिया येथील Ural Polytechnical Institute च्या १० विद्यार्थ्यांच्या एका गटाने उत्तरीय उरल पर्वतरांगात (Northern Ural Mountains) पर्वतारोहन करण्यास सुरूवात केली, ग्रुपचा लीडर २३ वर्षीय ईगोर द्यातलोवने ही अॅडव्हँचर ट्रीप आखली होती. एखादी चांगली जागा शोधून तेथे Mountain skiing करणे हा या ट्रीपचा प्रमुख उद्देश होता. त्या दृष्टीने हे लोकं उत्तरेकडील Otorten पर्वताच्या भागात जाणार होते. ट्रीपच्या दुसऱ्या दिवशी ग्रुपमधील मेंबर युरि युडीनला अचानक ताप आल्याने त्याला ही ट्रीप अर्धवट सोडून पुन्हा वापस जावे लागले; राहिलेल्या ९ मेंबरनी आपली ट्रीप सुरू ठेवली...
फेब्रुवारी २ च्या रात्री द्यातलोवचा गट Otorten पर्वताच्या पुढील भागात असलेल्या पर्वतापर्यंत येऊन पोहोचला. तापमान जवळपास -३०℃ असल्याने त्यांनी तिथेच उतारावर कँप प्रस्थापित करुन राहीलेला प्रवास सकाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या भागात "मानसी" नावाची आदीवासी जमात राहायची आणि त्या पर्वताला ते मानसी भाषेत "खोलात स्याखल (kholat syakhl)" म्हणजेच मृतांचा पर्वत (Mountain of the Deads) असे म्हणत असत. ईगोर द्यातलोवने निघायच्या आधी आपल्या मित्रांना आपण फेब्रुवारी १२ च्या तेवढ्यात टेलीग्रामने काँटॅक्ट करू असे सांगितले होते, पण त्यात थोडा वेळही लागू शकेल असे सांगितले होते...
आठवड्याभऱ्यानंतरही ग्रुपचा काही संदेश न मिळाल्याने फेब्रुवारीच्या २० तारखेला एक रेस्क्यू टीम त्या भागात रवाना झाली आणि फेब्रुवारी २६ ला त्या पर्वताच्या भागात द्यातलोवचा टेंट अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेला दिसला; तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार टेंट हा आतमधून फाडल्या गेला होता, आणि सापडलेल्या footprints वरुन सर्व ८-९ मेंबर्स आपला टेंट सोडून खाली उताराच्या दिशेने गेल्याचे लक्षात येत होते. खालच्या दिशेला मैलभर अंतरावर जंगली भाग होता. टेंटमधे फक्त काही shoes आणि साहित्य सापडले; footprints वरून लक्षात येत होते की काही जनं नागड्या पायाने किंवा फक्त सॉक्स घालून घाईगडबडीत आणि एवढ्या ठंड बर्फात टेंट सोडून उताराच्या दिशेने गेले. आणि त्यातंच रात्री अंधारात घाबरलेल्या अवस्थेत एकमेकांपासून बिलगले.
पहिल्या दोन बॉडीज जंगल भागाच्या काठाशी एका मोठ्या पाईन वृक्षाखाली सापडल्या. वृक्षाच्या वरच्या फांद्या तुटलेल्या होत्या, बहुतेक दोघांपैकी एका जनाने झाडावर चढून आपल्या उरलेल्या मेंबर्सचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असावा. बाजूलाच आग पेटवल्याचे अवशेष दिसत होते, बहुतेक ठंडीच्या बचावापासून त्यांनी आग पेटवल्याचे पुरावे सांगतात. विशेष म्हणजे दोनीही बॉडी फक्त अंडरवीअरवर होत्या.
आणखी ३ बॉडीज काही अंतरावर सापडल्या ज्यात द्यातलोवचा पण समावेश होता. त्या तीन बॉडीज पैकी एका जनाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर असल्याची आढळून आली; पण डॉक्टर आणि मेडिकल अधिकाऱ्यांनी ते फ्रॅक्चर एवढं गंभीर किंवा प्राण जाईल असं नसल्याचे स्पष्ट केले. डॉक्टरांनी ५ जणांचा मृत्यू हायपोथर्मीया किंवा ठंडीने झाल्याचे डिक्लेयर केले आणि तपास अधीकाऱ्यांनी ही केस बंद करून टाकली...
२ महीन्यानंतर बाकीच्या उरलेल्या ४ बॉडीज डझनभर फूट बर्फाच्या थराखाली खाली सापडल्या. सर्वच बॉडी जंगल भागात थोडं आतमधे सापडल्या. पहिल्या पाच जनांपैकी ह्या ४ जनांचा खुप वेदनादायक पद्धतीने मृत्यू झाल्याचे तपास अधीकाऱ्यांच्या वर्णनावरून लक्षात येते; तपास अधिकाऱ्यांनुसार आणखी एका जनाच्या डोक्यात फ्रॅक्चर होते, बाकीच्या उरलेल्या २ जनांच्या छातीच्या बरगड्या तुटल्या होत्या, त्यात समावेश असलेल्या एका तरुणीची जीभ आणि डोळ्याचा काही भाग गायब होता...
या सगळ्या घटनेवर अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले, पहीले तर ह्या सर्वांवर मानसी जमातीच्या लोकांनी हल्ला केल्याचा कयास बांधण्यात आला पण डॉक्टर आणि मेडीकल अधीकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या शेवटी सापडलेल्या ४ मेंबर्सच्या शरीरावर काहीच घाव नव्हते फक्त त्यांच्या शरीराच्या आतमधून injuries होत्या आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एवढा जोरदार प्रहार करणे मानवाला शक्य नाही, त्यामुळे ही मानसी लोकांनी हल्ला केल्याची शक्यता वगळण्यात आली. पुढे यावर अनेक कयास बांधण्यात आले अनेक जनं त्या भागात यती असल्याचे मानत होते, कदाचित हा हल्ला यतीनेच केल्याचे मानण्यात येते, ज्याकारणाने या ९ जणांना आपला टेंट सोडून पळण्यास भाग पाडले. फारसे काही पुरावे सापडले नाहीत; फक्त डायरी आणि काही फोटोज सापडले ज्यात त्यांच्या प्रवासाचा आराखडा वगैरे होता. ९ जनांच्या मृत्यूचे नेमके कारण न सापडल्याने अधीकाऱ्यांनी मृत्यूचे कारण "unknown compelling force" (अज्ञात अमानवीय शक्ती) असे लिहित केस क्लोज केली.
ह्या सर्व घटनेला पुढे ईगोर द्यातलोव या ग्रुप लीडरच्या नावाने Dyatlov Pass incident असे नाव देण्यात आले, आणि ही घटना जगातल्या प्रसिद्ध अशा आत्तापर्यंत न सोडवल्या गेलेल्या केसेस पैकी एक आहे.

धन्यवाद...
No comments:
Post a Comment