Thursday, January 21, 2016

आदित्य जावळकर
बोकड "
बुधवारचा दिवस म्हणून आज त्याने दुकान उशिरापर्यंत चालू ठेवलं, दुकान तसं गावाच्या बाहेरच, आणि गाव मुंबई गोवा महामार्गावर ..."कशेणे ", इंदापूर आणि माणगावच्या मध्ये.जागा तशी निर्जन आणि ह्याचं दुकान खाली शेतात अंधारात होतं .
दुकान बंद केलं आणि प्रदीप एक एक करून बोकड त्याच्या रिक्षा टेंपोत चढवत होता . आत्ता रात्रीचे साधारण ११ वाजले होते, सगळे बोकड गाडीत टाकून झाले,आणि आत्ता तो दुकानाची ताडपत्री खाली खेचतच होता इतक्यात एक स्कॉर्पियो गाडी येऊन उभी समोरच्या रस्त्यावर उभी राहिली. गाडीतून २ माणसं उतरले आणि प्रदीप च्या दुकानाजवळ आले.
"प्रदीप म्हणाला "साहेब दुकान बंद केलं आत्ता मटण शिल्लक नाही, आत्ताच दुकान बंद केलंय "
त्यांच्यातला एक माणूस गंभीर आवाजात बोलला बोकड पायजे काय ?
प्रदीप एक मिनिट थांबला आणि त्यांच्याकडे बघून बोलला " कुठाय बोकड "
"हाय गाडीत, घेणार काय ?
प्रदीप बोलला बघू दाखवा .........आणि प्रदीप त्यांच्या गाडीजवळ गेला, त्यांच्यातल्या एकाने गाडीचा मागचा दरवाजा उघडून एक बोकड खाली काढला...प्रदीप ने बघितलं तर त्या बोकडाचा पुढचा एक पाय तुटलेला.
" हा एक पाय कुठं तुटला ह्याचा, आणि आत्ताच तुटलेला दिसतोय.....रक्त सांड्तय बघा साहेब "
त्यांच्यातला एकजण बोलला " मोजमाप करत बसू नको, पायजे असला तर घे नायतर सोडून दे"
प्रदीप ने किंमत विचारली ... हो नाय करता ते दोघं तो १५-२० किलोचा बोकड फक्त २००० रुपयात विकून तिथून गाडी काढून निघून गेले. थेट ३-४ हजाराचा फायदा झाला. ह्या खुशीत प्रदीप मनातल्या मनात हासत होता, नवीन विकत घेतलेल्या बोकडाच्या पायाला कापड बांधून त्याला पण टेंपोत टाकला, दुकान बंद केलं आणि रिक्षा टेंपो घेऊन आत्ता रस्त्याने आपल्या घरी जायला निघाला,
गाडी चालवताना त्याच्या डोक्यात सारखा एकच विचार येत होता कि नक्कीच हा बोकड चोरीचा असावा ...पण स्वस्तात मिळाला म्हणून त्याने तो घेऊन ठेवला.
दुकानापासून गाव तसं १ किलोमीटर अंतरावरच होतं, रिक्षा टेंपो हायवेने जात होता, इतक्यात त्याला मागे टेंपोत कोणीतरी उड्या मारत असल्याचे आवाज ऐकायला आले....धाड धूड धाड धूड..... आणि संपूर्ण रिक्षा टेंपोच हलायला लागला, मागच्या पत्र्यावर कोणीतरी धपाधप हात मारतोय असे आवाज यायला लागले, म्हणून त्याने ताबडतोब गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली.
त्याला असा भास झाला कि कोणीतरी माणूस मागून गाडी हालवतोय, पत्रा वाजवतोय...
"आज ह्या बोकडांना काय झालंय काय, कधी अश्या उड्या मारत नाहीत, काय झालं आज "
त्याने टेंपो चा मागचा दरवाजा उघडला आणि बघितलं तर सगळे बोकड शांत उभे होते. काय झालं त्याला समजेना, त्याने गाडी पुन्हा चालू केली आणि काशेण्या कडे निघाला, पुन्हा जोर जोराने आवाज यायला लागले....आत्ता तो न थांबता सरळ गावात आपल्या घरी आला. टेंपो अंगणात थांबवला आमी त्याने टेंपोतून बोकड खाली उतरवून अंगणात बांधले. आणि हातपाय धुवून झोपायच्या तयारीला लागला, इतक्यात फोन वाजला ...." सुधीर पांचाळ" एवढ्या रात्री ह्याने कशाला फोन केला हा विचार करत प्रदीप ने त्याचा फोन घेतला ....."ह्यालो , बोला पांचाळ साहेब काय झालं , एवढ्या रात्री फोन केलात "
समोरून पांचाळ बोलला " अरे बोकड आणलाय, कापून देशील काय, नुकताच मेलेला हाय "
प्रदीपच्या डोळ्यावर झोप येत होती ...तो म्हणाला आत्ता नाही जमणार उद्या सकाळी दुकानावर घेऊन या....आणि फोन ठेवून तो झोपला.
अर्ध्या तासाने त्याला पुन्हा एकाचा फोन आला ....."अरे प्रदीप बोकड कापून देशील काय, अर्जांत आहे "
"प्रदीप ने त्याला पण तेच उत्तर दिलं..."नाही हो साहेब , आत्ता नाही जमणार, उद्या दुकानावर घेऊन या देतो कापून"
आणि प्रदीपने आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला...आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटत शिव्या देत बोलला ..."आज काय सगळ्यांना बोकड कापायचे आहेत, आणि एवढ्या रात्री , उद्या माझा धंदा बंद पाडतील बहुतेक " आणि डोक्यावर चादर ओढून तो झोपुन गेला .....
नेहमीप्रमाणे तो सकाळी ४ वाजता उठला आणि सगळे बोकड टेंपोत टाकून पुन्हा आपल्या दुकानावर गेला. एक एक करून बोकड खाली काढून त्याने मागे शेतात बांधले,
पहाटे ४:१५ च्या सुमारास इब्राहीम पण आला, इब्राहीम म्हणजे बोकड कापायला येणारा गावातलाच एक माणूस, गावात कोणाकडे हि लग्न असलं , नवस फेडायचा असला आणि बोकड कापायचा असला तर ते काम इब्राहीम कडेच असायचं.
इब्राहीम आल्यानंतर प्रदीप ने दुकानातून सुरा आणला, पाण्याने धुवून घेतला आणि सगळ्यात आधी त्याने पाय मोडलेला बोकड कापायला घेतला. प्रदीपने बोकड दोन पायात पकडून ठेवला, इब्राहीम ने खिशातून रुमाल काढला, डोक्याला बांधला आणि सुरा बोक्दाह्य मानेवर फिरवणार इतक्यात त्या बोकडाने एवढ्या जोरात झटका दिला कि प्रदीप किमान ८-१० फुट लांब शेतात जाऊन पडला. इब्राहीमला पण धक्का मारून त्याने पुढे उडवलं,
आजपर्यंत असं कधी झालं नव्हत.
, आणि ह्या बोकडाच्या अंगात एवढी ताकद आली कुठून, हा प्रकार त्या दोघान्नापण विचित्र वाटला,
पुन्हा प्रदीप ने तो बोकड आपल्या २ पायात पकडला , इब्राहीम ने हातातला सुरा पुढे केला सुरा त्या बोकडाच्या मानेवर फिरवला आणि तो बोकड खूप मोठ्याने माणसाच्या आवाजात ओरडला ......हे ऐकून प्रदीप शेतात पळाला , इब्राहीम हातातला सुरा टाकून मागे पळाला आणि म्हणाला......
"कयामत कयामत " प्रदीप भाई कयामत....."येह कैसा जानवर आप ले आये, मैने पेहले कभी नै देखा ऐसावाला जानवर"
येह शैतान है प्रदीप भाई ...येह शैतान है.....असं ओरडत इब्राहीम हातातला सुरा टाकून ......जीव घेऊन त्या शेतातून बाहेर रस्त्यावर पळाला, गाव १ किलोमीटरवर च होतं ....न थांबता इब्राहीम तिथून रस्त्याने गावात पळून गेला...
प्रदीप शेतात मागच्या दशेने पळाला होता, आत्ता पहाटेचे ५ वाजायला आले होते, आकाशात सूर्यप्रकासहाचा तांबडा रंग दिसायला लागलेला आणि त्या अंधुक उजेडात प्रदीप ने बघितलं तर काय......तो बोकड माणसा सारखा दोन पायावर उभा होता, तोंडातून लाळ गळत होती. शरीर बोकडाच पण तो माणसा सारखा उभा होता.....गुरगरत होता , मानेवरून रक्ताची धार लागलेली आणि आत्ता तो वेगाने चालत प्रदीप च्या दिशेने येत होता , हे बघतच प्रदीप ने जीव घेऊन शेताच्या बांधांवरून ...." भूत भूत भूत वाचवा वाचवा " ओरडत किंचाळत तो पळत होता आणि मागून मोठ मोठ्याने हासत होता, आणि प्रदीप च्या अंगावर दगडं फेकत होता, २-३ दगड प्रदीप च्या पाठीत बसले आणि बाजूने पण दगडं फेकली जात होती....
त्या परिस्थितीतून कसा बसा जीव वाचवून तो घरी पोहोचला .... प्रदीप गावात येताच घरात येऊन दरवाजा बंद करून कडी लावून खाटेवर आडवा पडला.
थोड्या वेळाने घराची कडी वाजली ......प्रदीप दचकला ..हळूच उठून दाराच्या फटीतून बघितलं .....दरवाजात घाबरलेला धापा टाकत इब्राहीम उभा होता , प्रदीप ने दरवाजा उघडला ......
आत्ता सकाळचे ६ वाजले होते ....बाहेर सगळीकडे उजेड पसरला होता, इब्राहीम घरात येऊन खाटेवर बसला ....." आज अपुन लोग बच गये प्रदीप भाय, आज कयामत आई थी, वोह बकरा नै था ...शैतान था शैतान "
" मगर आप वो बकरा किदर से ले आये "
आपल्याला तो बोकड कसा मिळाला हे त्याने इब्राहीम ला सांगितलं .." काल रात्री स्कॉर्पियो घेऊन २ माणसं आली आणि मला हा बोकड विकून गेले, स्वस्तात मिळाला म्हणून मी घेतला .....
एवढ्यात दरवाजात पांचाळ येऊन उभा राहिला , "अरे बाबा तुझ्या दुकानावर जाऊन आलो, कुठं आहेस तू ...चल लवकर बोकड कापून दे , बोकड घेऊन भाऊ उभा आहे तुझ्या दुकानावर, काल रात्रीच आणून ठेवलंय , मेलेला हाय म्हणून घाई करतोय ....चल लवकर चल.....
पांचाळचं बोलणं संपतंय इतक्यात गावातले अजून दोघेजण आले .....तीच तक्रार आरे बाबा चाल लवकर दुकानावर ते बोकड कापून दे आम्हाला ......रात्री घेऊन आलोय .....मेलेला बोकड सकाळ पर्यंत टिकलाय....थंडीचे दिवस आहेत म्हणून टिकला ....पाणी मारून गोंत्यात ठेवलाय ..चल बाबा लवकर चल "
प्रदीप ने त्या सगळ्यांना विचारलं ......"| माझ्या दुकानावर गेला होतात, तिकडं शेतात बोकड दिसला काय ? "
ते लोकं बोलले ..." कुठला बोकड , शेतात बोकड बिकड न्हवता ...तुझा रिक्षा टेंपो उभा दिसला शेतात"
हे ऐकून प्रदीपला थोडा धीर आला .... त्याने सगळ्यांना विचारलं ..." तुम्हाला हे मेलेले बोकड कुठं भेटले ?"
एवढ्यात पांचाळ बोलला ..." अरे काल सेकंड शिफ्ट करून कामावरून येत होतो ....तर रस्त्यात ८-१० बोकड रस्त्यावर पडलेले दिसले ....बाजूला एक धनगर पण पडलेला...गाडी वाल्याने उडवला असेल .....जागीच ठार मेला होता धनगर .. तिथूनच बाईकवर टाकून आणला उचलून बोकड , कशाला सोडायचा"
प्रदीप ने विचारलं ...." आणि मग तो धनगर ?"
पांचाळ बोलला ..." त्याचं काय, तो मेला जागीच ठार...पोलीस स्टेशनात जाऊन सांगितलं ...नेला असेल सरकारी दवाखान्यात माणगावला"
आत्ता मात्र प्रदीप आणि इब्राहीम ने एकमेकांकडे बघून मान हलवली ......
म्हणजे तो बोकड तिथेच जागीच थर झालेला आणि त्याच्यात त्या धनगराचं भूत शिरलेलं .....
त्यादिवसापासून प्रदीप ने कानाला खडा लावला, पुन्हा कोणाकडून असा बोकड घेणार नाही . एकदा जीव वाचला पुन्हा संकट अंगावर ओढून घेणं नाही...
नंतर काही दिवसांनी व्यवस्थित जागा बघून प्रदीप ने आपलं दुकान त्या ठिकाणाहून उचलून काशेण्याच्या जवळ आणून बसवलं ......

No comments:

Post a Comment