Saturday, May 31, 2014

आपला एक मित्र यश ओक एक किस्सा सांगतोय.

आपला एक मित्र यश ओक एक किस्सा सांगतोय. या कथेत भूत नाहीये हे आधीच स्पष्ट करतो . या कथेत पाळीव प्राणी अदृश्य शक्तींबाबत किती जागृत असतात याच एक दर्शन घडते . हि घटना माझ्या मित्रांच्या काकांसोबत घडली आहे . त्या मित्राच्या काकांचे गाव जळगाव आहे . ते काका सुट्टीत गावाला आले होते .काकाचं निसर्ग , ग्रामीण जीवन यांवर खूप प्रेम .त्यांची शरीरयष्टी उत्तम . त्यामुळे ते जास्त कोणाला घाबरत नसत .गावी त्यांची शेती होती . शेतीच काम त्यांचे बाबा आणि त्यांचे काका बघत . एके रात्री शेतीला पाणी देण्यासाठी घरातून कोणाला तरी जाव लागणार होत , पण त्या रात्री आमावस्या होती . आणि अमावस्या असल्यामुळे कोणी जायला तयार नव्हत .कोणीच शेतावर जायला तयार होईना म्हणून अखेर काकांनी स्वतः शेतात जायचा निर्णय घेतला. पण घरचे म्हणाले "आज जाऊ नका ! आज अमावस्या आहे . एकरात्र नाही पाणी दिल तरी चालेल . काही बिघडत नाही त्याने . " पण काका काय ऐकायला तयार होईना. शहरात राहत असल्यामुळे त्यांना या सगळ्या भाकड कथा वाटत होत्या . त्यांनी आज रात्री पाणी देऊन यायचं पक्कच केल होत . ते एकटेच चालत निघाले . त्यांच्या काकांनी त्यांना थांबवल आणि म्हणाले " चालत नको जाऊ. बैलगाडी घेऊन जा !"काका बैलगाडी घेऊन जायला तयार झाले . त्यांनी बैलगाडी घेतली आणि शेताकडे निघाले . त्यांना रस्ता ठाऊक होता कि स्मशान आल्यावर विरुद्ध बाजूला वळायचे . अर्ध्याच्या वर रस्ता संपत आला होता . आता स्मशान लागल होत . त्यांनी विरुध्द बाजूला जायला बैलगाडी वळवली . पण बैल मात्र पुढे जायला तयार होत नव्हते . ते जागच्या जागीच थांबले .यांनी त्यांना खूप हाकले पण बैल काही जागचे हालेना . त्यांनी प्रतोड ने बैलांना मारून मारून त्यांच्या पाठीवर चे रक्त काढले . तरीही बैल पुढे जायला तयार होत नव्हते . काका विचारात पडले कि' बैल असे अचानक का थांबले असतील ?? आणि एवढ मारून , रक्त निघायला लागल तरी पुढे जायला का तयार होत नाही . जोडी तर जुनी आहे मग पुढे का जात नाही 'असा विचार करतच होते तेवढ्यात अचानक बैल उधळले . बैल उधळले म्हणून काकांनी त्यांना मारायचं थांबवल . मग बैल हि उधळायचे बंद झाले, पण त्या वाटेने बैल पुढे जाताच नव्हते, शेवटी वैतागून काकांनी घरी यायचा निर्णय घेतला . बैलांनी त्यांना आता मात्र बरोबर घरी आणल .घरी आले तर त्यांचे वडील आणि काका जागेच होते. त्या काकांनी हा प्रकार त्या दोघांना सांगितला .त्यावर त्यांचे काका त्यांना म्हणाले "उद्या सांगतो ."काका आधीच खूप दमले होते. म्हणून अजून जास्त विचार न करता ते हि झोपून गेले . सकाळी काकांनी रात्रीचा प्रकार परत सांगितला . तेव्हा त्यांचे काका म्हणाले " हि जोडी जुनी आहे . त्यांना रस्ता माहित आहे . तू जिथे चाल्लेलास तो रस्ता स्मशानाच्या विरुध्द दिशेचा नसून स्मशानाचा होता . तुझ्या सोबत काळ चकवा घडला होता . म्हणून मी रात्री तुला नाही सांगितल . त्या स्मशानाच्या ठिकाणी असेच भास अनेक लोकांना झाले आहेत . अनेक लोक आता पर्यंत मेले आहेत. जनावरे अश्या गोष्टीन पासून अत्यंत जागृत असतात . त्यांनी तुझा जीवच वाचवला काल रात्री ." हे ऐकल्यावर मात्र काकांना आपल्या चुकीची जाणीव झाली . त्या पाळीव मुक्या जनावरांना रक्त काढेपर्यंत मारल्याचा त्यांना आता पश्चाताप झाला होता . मनातूनच ते एखाद्या गुन्हेगारासारखे वाटू लागले, मनातूनच त्यांनी त्या मुक्या बैलांची आणि देवाची माफी मागितली, आणि आभारही मागितले. *समाप्त*




No comments:

Post a Comment