By Amol Bhalerao
आज मी जे आपल्या बरोबर शेअर करतोय तो मी घेतलेला पहिला अनुभव आहे. ज्यांच्या विश्वास नसेल त्यांनी केवळ मनोरंजन म्हणुन वाचावी आणि कथा वाचणे कुणाली बंधन कारक नाही. अतिशहानपणा करणाऱ्यांना माझ्या खास शैलीत उत्तर देण्यास मी सदैव बांधील राहिल असे वचन देतो.
कथेला सुरवात करतो-
शिर्डी मध्ये एक ITI College, कन्याविद्या मंदिर, English med. school हे ५००रुम भक्तनिवास शेजारी आहे. त्याच ITI College मधे घडलेला हा किस्सा. मी कॉलेज मी आयटी सेक्शनला हो आणि क्लासमधे केवळ दोनच मुली आणि १९ मुले होती. त्या दोघी माझ्या चांगल्या मैत्रिणी होत्या.
एक दिवस साई संस्थानचे निमंत्रण पत्रिका फोल्ड करण्यासाठी आम्हाला सेक्शन सोडुन खाली बोलावले. आणि सेक्शन पुर्ण रिकामे. मी निमंत्रण पत्रिकेचे काम आटपुन वर सेक्शनला न जाता ५००रुम कॅन्टीनला गेलो. पण त्या दोन मुलीँना वाटले कि मी सेक्शनला गेलो. मी तिथे एकटा काय करतोय हे पाहण्यासाठी त्या जरा वेळाने सेक्शनकडे गेल्या. सेक्शनचं दार बाहेरुन बंद होतं पण आत कुणी असल्याच त्यांना जाणवलं, त्यांना मधे मी असल्याचा मी फोनवर बोलण्याचा आणि माझ्या बुटांचा स्पष्ट आवाज येत होता. पण दरवाजा बाहेरुन बंद असतांना हा आत गेलाच कसा असा त्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी दरवाजा उघडुन आत प्रवेश केला. पण आता मधे कुणीही त्याना कोणीच दिसलं नाही एकदम शांतता होती. आवाज कुणाचा होता ? कोण बोलत होतं ? अमोल कि आणखी कोणं ? त्यांना काहीच समजेना. त्या दोघी पुर्णतः घाबरल्या. आणि सेक्षन मधुन बाहेर पडल्या पटापट जिना उतरु लागल्या. त्यांच्या मनात एकच विचार, अमोल सेक्शनमधे गेलाच कसा ? आणि अचानक गायब कसा झाला ?
त्या जिना उतरत होत्या आणि मी कॅन्टन मधुन परतो आणि जिना चढु लागलो. आम्ही जेव्हा समोरासमोर आलो त्यांनी भीतीने भेदरलेल्या प्रश्नार्थक पण विचित्र नजरेने माझ्याकडे पाहुलागल्या. त्यांच ते विचित्रा वागणं बघुन मी जरा गोधळलो आणि त्यांच्या कडे डोळेमोठे करुन पाहुलागलो. मी डोळे मोठे केल्यावर त्या दोघी आशा किँचाळल्या, फार मोठा कर्कश आणि विचित्र आवाजाने मी जरा घाबरलो आणि कानावर हात ठेउन डोळे मिटुन भिती पोटी मीही त्यांच्याबरोबर किँचाळलो. हा आरडाओरडा ऐकुन सर्व कॉलेज तिथे जमा झालं. जरा वेळाच्या गोँधळा नंतर सगळं शांत झालं. मॅटर प्रिन्सिपलपर्यँत गेला पण त्यांना काही न बोलता मॅटर क्लोज केला.
सगळं नॉर्मली चालू झालं पण आमच्या मना प्रश्न एकच होता.
'मी कॅन्टीनमधे असतांना सेक्षनमधे माझ्या आवाजात कोण बोलत होतं आणि ते गायब कसं झालं .?'
No comments:
Post a Comment