हि गोष्ट १९८३, ८४ मध्ये
माझ्या आजोबांसोबत घडली होती . काल
वडिलांबरोबर
गप्पा मारता मारता त्यांनीच हि गोष्ट
मला सांगितली .
माझे आजोबा म्हणजे निडर व्यक्तिमत्व
आणि गावाला राहत असल्यामुळे
भीती हि त्यांना कधी वाटलीच नाही.
दररोज रात्री जेवल्यानंतर शतपावली करणे
हा त्यांचा नित्य नियम .
त्याकाळी गावी अशी जास्त घर नव्हती .
आणि आमच गाव एकदम सुमुद्र
किनार्याला लागुनच होत . त्यामुळे
रात्री वाहणाऱ्या थंड वार्याची मज
घेण्यासाठी आणि शरीराला थोडासा व्यायाम
देण्यासाठी आजोबा दररोज निघत .
ते एकटेच शतपावली साठी जात कारण
समुद्राला लागुनच स्मशान होते त्यामुळे
रात्री तिथे जायला खूप जण घाबरत पण
आजोबांना त्यावर विश्वास नव्हता .
तर झाले असे त्या दिवशी जेवण करून
आजोबा निघाले . आणि नेमकी त्याच
दिवशी अमावस्या सुधा होती पण
याचा त्यांच्यावर काहीही परिणाम
नव्हता . आणि सकाळीच गावातील
त्यांचा जुना मित्र वारला होता .
त्याचाच विचार करत करत ते चालत होते .
चालता चालता त्यांच्या लक्षात आले
कि आज पण खूप पुढे आलो आहोत .
त्यांनी घड्याळात बघितले रात्रीचे १२ वाजून
गेले होते . एवढा उशीर ते केव्हाच चालले नव्हते
म्हणून त्यांनी परतीचा रस्ता पकडला .
अंधार खूप होता ते जशे स्मशाना जवळ
पोहचले . तस त्यांना काही तरी हालचाल
जाणवली . त्यांनी जरा जवळ जावून पाहावे
असा विचार केला . म्हणून
एका झाडाच्या मागे लपत ते पाहू लागले .
त्यांनी पहिले कि ३ स्त्रिया कसले तरी मंत्र
पठण करत आहेत . आणि ते मंत्र सुधा फार
भयानक होते. इतकी वर्ष कशाला हि न
भिणारे आजोबा आता मात्र घाबरले .
आणि इतक्यात त्यांना शिंक आली .
त्या आवाजाने त्या स्त्रियांचे लक्ष
त्यांच्यावर गेले . त्यांनी एकदम भयानक
आवाजात विचारले कोण आहे रे तिकडे बाहेर ये
नाही तर तुझ काही खर नाही .
आजोबाना संमोहित झाल्यासारखे
झाडाच्या मागून बाहेर आले .
आणि त्या बायका जिथे
बसल्या होत्या तिथे जावून उभे राहिले .
आणि आता त्या बायकांचा चेहरा त्यांना स्पष्ट
दिसत होता . ते त्यांना ओळखत होते कारण
त्या गावात राहणार्याच
बायका होत्या .
ज्या अघोरी विद्या शिकत होत्या.
आजोबाना पाहून त्या म्हणाल्या कि तू
आता आम्हाला पाहिलं आहेस .
आता तुला जाऊ देणार नाही मंत्राने
तुला इथेच मृत्यू देणार आम्ही . हे ऐकून
आजोबा अजून घाबरले . व म्हणाले
मला जाऊद्या इथून मी तुमच्या बद्दल
कोणालाच सांगणार नाही . हे ऐकून
त्या बायका मोठमोठ्याने हसू लागल्या .
त्या म्हणाल्या आम्हाला वाचन दे कि तू
आमच्या बद्दल कोणालाच सांगणार नाहीस
म्हणून . आजोबांनी त्यांना वाचन दिले
त्या म्हणाल्या हे बघ जर तू तुझे वाचन मोडलेस
तर तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आम्ही पिशाच्च
आणि प्रेत आत्मे पाठवू आणि तुझे संपूर्ण कुटुंब
संपवू . हे ऐकून आजोबा अजून घाबरले
आणि त्यांनी त्यांना वाचन दिले .
पण तेवढ्यात त्यातील एक
स्त्री म्हणाली कि तू आमची साधना भंग
केलीस . आता आमची साधना पूर्ण होई पर्यंत
तुला इथेच बसावे लागेल आणि आम्ही जे
सांगतो ते करावे लागेल . आजोबांनी मान
डोलावली . मग त्या स्त्रिया त्यांना घेवून
समुद्र किनारयावर गेल्या .
आणि त्यांनी शरीरावरचे सगळे कपडे काढले
आणि नग्न अवस्थेत त्या आत
शिरल्या काही वेळाने . त्या तशाच नग्न
अवस्थेत बाहेर आल्या पण त्यांच्या हातात
एक प्रेत होत . ते प्रेत घेऊन
त्या सगळ्या आणि आजोबा जिथे
साधना चालली हुती त्या स्मशान जवळ गेले .
आजोबांनी प्रेताकडे पहिले
आणि त्यांची बोबडीच वळली कारण
सकाळी त्यांचा जो मित्र
वारला होता त्याचेच प्रेत होते ते .
बायकांनी प्रेताचे तुकडे केले
आणि एखाद्या जनावरासारखे त्या ते प्रेत
खाऊ लागल्या . साधना संपन्न झाली .
त्यांनी पुन्हा आजोबाना वाचनाची आठवण
करून दिली आणि जाण्यास सांगितले .
आजोबांनी तिथून धूम ठोकली ते थेट घरीच .
आजी त्यांची वाट पाहत बसली होती .
तिने विचारपूस केली कि उशीर
का झाला इतका तेव्हा ते काहीच बोलले
नाहीत . पण
रात्री त्यांनी झालेली सगळी हकीकत
आजीला सांगितली . पण त्या ३
स्त्रिया कोण आहेत त्यांची नाव
सांगितली नाहीत .
काही महिन्यांनी गावातील
एका स्त्रीचा जी आजीची मैत्रीण
होती तिचा गूढ रित्या मृत्यू झाला .
तेव्हा आजोबा आजीला म्हणाले
कि एका चांडाळणीचा अंत
झाला आता फक्त २ बाकी आहेत
तेव्हा आजी समजली कि आजोबा कोणा बद्दल
बोलत आहेत . काही वर्षांनी अघोर विद्येत
चूक झाल्यामुळे
बाकीच्या दोघींचा सुधा मृत्यू झाला . आज
आजोबांच्या कृपेमुळे आम्ही सगळे सुखरूप आहोत
पण आज आमचे आजोबा या जगात नाहीत...
Aniket
No comments:
Post a Comment