Saturday, May 31, 2014

आज मी जे आपल्या बरोबर शेअर करतोय तो मी घेतलेला पहिला अनुभव आहे.

By Amol Bhalerao आज मी जे आपल्या बरोबर शेअर करतोय तो मी घेतलेला पहिला अनुभव आहे. ज्यांच्या विश्वास नसेल त्यांनी केवळ मनोरंजन म्हणुन वाचावी आणि कथा वाचणे कुणाली बंधन कारक नाही. अतिशहानपणा करणाऱ्‍यांना माझ्या खास शैलीत उत्तर देण्यास मी सदैव बांधील राहिल असे वचन देतो. कथेला सुरवात करतो- शिर्डी मध्ये एक ITI College, कन्याविद्या मंदिर, English med. school हे ५००रुम भक्तनिवास शेजारी आहे. त्याच ITI College मधे घडलेला हा किस्सा. मी कॉलेज मी आयटी सेक्शनला हो आणि क्लासमधे केवळ दोनच मुली आणि १९ मुले होती. त्या दोघी माझ्या चांगल्या मैत्रिणी होत्या. एक दिवस साई संस्थानचे निमंत्रण पत्रिका फोल्ड करण्यासाठी आम्हाला सेक्शन सोडुन खाली बोलावले. आणि सेक्शन पुर्ण रिकामे. मी निमंत्रण पत्रिकेचे काम आटपुन वर सेक्शनला न जाता ५००रुम कॅन्टीनला गेलो. पण त्या दोन मुलीँना वाटले कि मी सेक्शनला गेलो. मी तिथे एकटा काय करतोय हे पाहण्यासाठी त्या जरा वेळाने सेक्शनकडे गेल्या. सेक्शनचं दार बाहेरुन बंद होतं पण आत कुणी असल्याच त्यांना जाणवलं, त्यांना मधे मी असल्याचा मी फोनवर बोलण्याचा आणि माझ्या बुटांचा स्पष्ट आवाज येत होता. पण दरवाजा बाहेरुन बंद असतांना हा आत गेलाच कसा असा त्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी दरवाजा उघडुन आत प्रवेश केला. पण आता मधे कुणीही त्याना कोणीच दिसलं नाही एकदम शांतता होती. आवाज कुणाचा होता ? कोण बोलत होतं ? अमोल कि आणखी कोणं ? त्यांना काहीच समजेना. त्या दोघी पुर्णतः घाबरल्या. आणि सेक्षन मधुन बाहेर पडल्या पटापट जिना उतरु लागल्या. त्यांच्या मनात एकच विचार, अमोल सेक्शनमधे गेलाच कसा ? आणि अचानक गायब कसा झाला ? त्या जिना उतरत होत्या आणि मी कॅन्टन मधुन परतो आणि जिना चढु लागलो. आम्ही जेव्हा समोरासमोर आलो त्यांनी भीतीने भेदरलेल्या प्रश्नार्थक पण विचित्र नजरेने माझ्याकडे पाहुलागल्या. त्यांच ते विचित्रा वागणं बघुन मी जरा गोधळलो आणि त्यांच्या कडे डोळेमोठे करुन पाहुलागलो. मी डोळे मोठे केल्यावर त्या दोघी आशा किँचाळल्या, फार मोठा कर्कश आणि विचित्र आवाजाने मी जरा घाबरलो आणि कानावर हात ठेउन डोळे मिटुन भिती पोटी मीही त्यांच्याबरोबर किँचाळलो. हा आरडाओरडा ऐकुन सर्व कॉलेज तिथे जमा झालं. जरा वेळाच्या गोँधळा नंतर सगळं शांत झालं. मॅटर प्रिन्सिपलपर्यँत गेला पण त्यांना काही न बोलता मॅटर क्लोज केला. सगळं नॉर्मली चालू झालं पण आमच्या मना प्रश्न एकच होता. 'मी कॅन्टीनमधे असतांना सेक्षनमधे माझ्या आवाजात कोण बोलत होतं आणि ते गायब कसं झालं .?'




महाविद्यालयीन युवकांनी नक्की वाचावी अशी काही!

महाविद्यालयीन युवकांनी नक्की वाचावी अशी काही! (घटना संवेदणीय आहे म्हणून काही त्यामुळे जास्त खोलीत जायची गरज नाही. खरी कि खोटी याची फेरतपासनी नको.) एक असा किस्सा ज्याने महाविद्यालयीन तरुण वर्गात खळबळ माजवली होती, घटना अशी काही खूप जुनी नाही पण नवीदेखील नाही. साधारण २००५ ची आहे. पश्चिम बंगाल मधील आपला एक मित्र(मराठी) हि कथा सांगत आहे, त्याने पण हि कोठून तरी ऐकली आहे. तो ज्या महाविद्यालयात शिकतो त्या महाविद्यालयातील हि घटना आहे. पश्चिम बंगाल मधील हि घटना आहे, एका नामांकित महाविद्यालयातील हि घटना त्या काळी खूप चर्चेचा विषय ठरली होती. त्या महाविद्यालयात सुभाष नावाचा एक विद्यार्थी होता, तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी अतिशय हुशार, चार चौघांहून वेगळा, कोणाच्यातहि जास्त न रमणारा, स्वतः आणि स्वतःचा अभ्यास भला अस त्याच तत्व होत. स्वभावाने आणि परीस्थीने देखील अतिशय गरीब होता, आई विधवा होती. तो एकुलता एक दिवा होता. त्यामुळे घरी आईचा लाडका, महाविद्यालयात शिक्षकांचा लाडका होता. अशा लाडक्या लोकांचे त्यांच्या स्वभावामुळे अर्थातच शत्रू तयार होतात. तसेच त्याचेही शत्रू त्याच्या विरोधात तयार होत होते. तो सगळ्यांचा लाडका असल्याने काही लोक त्याच्यावर जळत असत, त्यातीलच एक नाव देबोसीस, हा देबू म्हणजे मोठ्या बापाची बिगडी औलाद होता, आपण पैश्याच्या जोरावर काहीही करू शकतो असा त्याचा ठाम गोंडस गैरसमज होता. तो सतत सुभाष च्या विरोधात काही न काही काड्या करीत असे.तो सतत सुभाष वर नजर ठेऊन असत.तो सुभाष ला पडण्याची संधी शोधात असे. तो त्याच अभ्यासाच काम नियमित पणे बजावत असे. तो विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षाला होता, अभ्यासाचा त्याच्यावर प्रचंड ताण होता. अपेक्षांचे ओझे वाहत होता तो. कधी प्रयोगशाळेत उशीरपर्यंत थांबून त्याला अभ्यास आणि प्रयोग करावे लागत असे. असेच तो एके रात्री त्याचे विज्ञानाचे प्रयोग करीत महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत थांबला होता, तो एकटाच तिथे होता, त्याचे आजूबाजूला कुठेच लक्ष नव्हते, आणि तो त्याचे प्रयोग करण्यात गुंतला होता.अचानक प्रयोगशाळेचा दरवाजा उघडला गेला पण सुभाष च त्याच्याकडे लक्ष नव्हत, उघडलेल्या दरवाजातून देबोसीस आणि त्याचे काही साथीदार प्रयोग शाळेत घुसले.त्यांनी सुभाष ला पकडले व त्याला पिडायला सुरवात केली, त्याला डोक्यात फटके देणे, त्यच्या पाठीवर मारणे, त्याला त्याच्या व्यंगावरून चिडवणे चालू केले. थोडक्यात त्यांनी त्याच्यावर ragging चा प्रकार सुरु केला होता, जो सुभाष साठी खूप असह्य होत. तो खूप आरडा-ओरड करीत होता, पण त्याचा काही फायदा होणार नव्हता, कारण त्याला प्रयोगशाळा उघडी करून देऊन शिपाई पण त्यांच्या रूम्स मध्ये झोपण्यासाठी गेले होते, इकडे देबोसीस आणि त्याचे मित्र सुभास ला ना-ना तर्हेने त्रास देत होते, त्यांनी सुभाष ची कपडे फाडली, त्याला पूर्ण उघडा केला आणि चोप द्यायला सुरवात केली, सुभाष हतबल होता, तो काहीही करु शकत नव्हता.तो फक्त मदतीसाठी देवाचा धावा करीत होता, पण देवही त्याच्या मदतीला आला नाही. त्याच्या अंगावर आता जखमा होऊ लागल्या होत्या. त्या जखमांमधून रक्तस्त्राव होत होता. तो वेदनेने विव्हळत होता. आता देबोसीस चा एकच वार त्याच्यावर झाला आणि सुभाष हे जग सोडून यमसदनी गेला.. मोठ्या बापच्या पोरांची असली लफडी जिवंत कधी होत नाहीत, हे प्रकरण जागीच अकस्मात मृत्यू म्हणून दाबला गेल. या घटनेला काही दिवसच लोटले होते, कि आता सुरु झाला होता खेळ लपाछपीचा. ज्या प्रयोगशाळेत सुभाष ला मारण्यात आला होत. त्या प्रयोगशाळेत ना-ना तर्हेच्या घटना घडायला सुरवात झाली होती. देबोसीस चे काही मित्र प्रयोगशाळेत प्रयोग करीत असताना अचानक कोणीतरी त्यांचा हात धरला व त्याच्या स्वतःच्याच हत्त असणार्या acid च्या बाटल्या त्यांनी स्वतःच्या पायावर ओतून घेतल्या. ती घटना मात्र अतिशय दूरदैवी घटना मध्ये मोडण्यात आली, त्या दोन मुलांचे पाय पूर्ण पणे होरपळले गेले होते, आता त्यांच्या लक्षात आले होते कि हे त्यांच्याबरोबर काय घडत आहे. एके रात्री एक शिपाई प्रयोगशाळा बंद करण्यासाठी प्रयोगशाळेजवळ आला तेव्हा त्याला तिथे कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला.त्याने आतमध्ये डोकावून पहिले तेव्हा त्याला तिथे सुभाष खाली मान घालून रडताना दिसला, त्याला सुभाष रडताना दिसला, शिपायाने आत डोकावताच त्याचा रडण्याचा आवाज वाढला, तो खूप मोठ्याने रडत होता, शिपाई त्याला घाबरला आणि कसलीही हाल-चाल न करता जाण्यासाठी मान फिरवली, इतक्यात पाठीमागून त्याला कोणाचा तरी आवाज आला, शिपायाने मागे वळून पहिले असता, तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून सुभाष चा होता. सुभाष त्या शिपायाला थामाबयाला सांगत होता, त्याची मान अजून खाली होती, सुभाष उठून शिपायाकडे चालत येऊ लागला, त्याच पूर्ण अंग रक्ताने लालेलाल झाले होते, त्याने त्याची मान वर केली, आणि त्यापुढे शिपायाने जे काही पहिल ते पाहून तो खूप घाबरला. सुभाष च्या डोळ्यातून रक्त येत होते, तरी त्याचे डोळे लाल होते, हाताची बोटे मधेच तुटून लोंबत होती, ओठ फाटून त्यातून रक्त येत होते, आत मत्र शिपायची बोबडी वळली, तो तिहून पळणार इतक्यात सुभाष ने त्याचा गळा पकडला आणि तसाच मागे सरकवत नेले, शिपायाच्या तोंडातून आवाज निघत नव्हता, त्याचा तर जीवच गोळा झाला होता, सुभाष ला असा पाहून शिपाई तर अर्धमेलाच झाला होता. तो काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता, सुभाष च्या डोळ्यातून आता पाणी येत होत, सुभाष आता पुन्हा रडट होता,'काका मला न्याय पाहिजे, त्या रात्री मी एवढ ओरडलो पण तुम्ही कोणीच मला वाचवयाला आला नाहीत.' तो शिपाई काही बोलणार एवढ्यात सुभाष ने त्याचा गळा परत आवळला, आता शिपाई जणू मरणाच्या गर्तेत सापडला होता, म्हणजे जेमतेम गेलाच होता.. पण सुभाष ला काय वाटले देव जाने, त्याने शिपायाला सोडूले, आणि गुडघ्यांवर बसून ढसा ढसा रडायला लागला. 'मला न्याय हवा आहे, मला न्याय हवा आहे', एव्हढेच काय ते तो बोलत होता. दुसरा दिवस उजाडला, शिपायाने हि हकीकत स्वतःच्या बायकोला, कोणालाही न सांगण्याच्या अटीवर सांगितली, आणि पुन्हा महाविद्यालयात आपल्या ड्युटीवर गेले. आता प्रयोगशाळा एकदम मोकळी होती तिथे कोणीही नव्हते, हि वेळ साधून शिपायाने देबोसीस आणि त्याच्या मित्रांना सांगितला कि,'तुम्हाला तुमचा एक जुना मित्र प्रयोगशाळेत शोधत आहे'. हे ऐकल्यावर देबोसीस आणि मत्राणी कसलाही विचार न करता प्रयोगशाळेत धाव घेतली. देबू आणि त्याचे मित्र प्रयोगशाळेत पोहोचताच बाहेरून कोणीतरी कडी लाऊन घेतली, कोणी ते माहित नाही. दार लावताच देबू ला पण कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला, तेव्हा त्याने आवाजाकडे पहिले, आणि त्याचे शिवांबू गळीत झाले. त्याची जम टरकली होती, कारण त्याच्या पुढे सुभाष होता, सुभाष आता मधुनच हसायला लागला. त्याची मारताना जशी अवस्था होती तशीच अवस्था आता पाहून देबू आणि त्याचे मित्र थरथरायला लागले होते, त्यांना काय करावे ते सुचत नव्हते. त्यांनी इकडे तिकडे उगाच धावाधाव करायला सुरवात केली,. ते ओरडत पळत होते. आणि सुभाष हसत होता, सुभाष ने देबू चा गळा पकडून त्याला फरफटत नेउन दरवाजावर आपटले, पुन्हा उचलून त्याला त्याचे कपडे काढून त्याच्या नरडीचा घोट घेतला, आता सुभाष च्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. समोर घडत असलेले पाहून देबू चे मित्र पण बेशुद्ध पडत होते, एकाचा तर जागीच मृत्यू झाला, बाकीचे बेशुद्ध पडले. सुभाष ने बाकीच्या मित्रांना काही केला नाही, आणि त्याने जाण्यापूर्वी एका भिंतीवर लिहिले कि, "गरीबाला कमजोर समजू नका, तुमच्या पापाची फळे मिळाल्याशिवाय तुम्हाला मुक्ती अशक्य आहे." आणि तो तिथून निघून गेला. त्यानंतर तो परत कधीच कोणाला दिसला नाही. देबू च्या मित्रांनी शुद्धीवर आल्यावर, त्यांना नित बोलता येत नव्हते, हालचाली करता येत नव्हत्या, त्यांचे वागणे जरा विचीत्र्यासार्ख झाला होता. त्यांना आता पूर्ण पणे वेड लागले होते, झाला प्रकार त्यांनी कसाबसा तुटका फुटका सागितलं होता. या प्रकरणाची तपासणी झाली, पण हाती काही लागला नाही. त्या शिपाई काकांची निर्दोष मुक्तता झाली, ते आता घरी बसून असतात, त्यांचा वय आता ५० च्या आसपास आहे. त्यांनी हि कथा बर्याच लोकांना सांगितली आहे. हि कथा स्टोरी च्या रुपात अनेक वाहिन्यांवर प्रदर्शित देखील करण्यात आली होती. *मित्रानो मनोरंजन करून घ्या फेर्तापासनी नको*




आपला एक मित्र यश ओक एक किस्सा सांगतोय.

आपला एक मित्र यश ओक एक किस्सा सांगतोय. या कथेत भूत नाहीये हे आधीच स्पष्ट करतो . या कथेत पाळीव प्राणी अदृश्य शक्तींबाबत किती जागृत असतात याच एक दर्शन घडते . हि घटना माझ्या मित्रांच्या काकांसोबत घडली आहे . त्या मित्राच्या काकांचे गाव जळगाव आहे . ते काका सुट्टीत गावाला आले होते .काकाचं निसर्ग , ग्रामीण जीवन यांवर खूप प्रेम .त्यांची शरीरयष्टी उत्तम . त्यामुळे ते जास्त कोणाला घाबरत नसत .गावी त्यांची शेती होती . शेतीच काम त्यांचे बाबा आणि त्यांचे काका बघत . एके रात्री शेतीला पाणी देण्यासाठी घरातून कोणाला तरी जाव लागणार होत , पण त्या रात्री आमावस्या होती . आणि अमावस्या असल्यामुळे कोणी जायला तयार नव्हत .कोणीच शेतावर जायला तयार होईना म्हणून अखेर काकांनी स्वतः शेतात जायचा निर्णय घेतला. पण घरचे म्हणाले "आज जाऊ नका ! आज अमावस्या आहे . एकरात्र नाही पाणी दिल तरी चालेल . काही बिघडत नाही त्याने . " पण काका काय ऐकायला तयार होईना. शहरात राहत असल्यामुळे त्यांना या सगळ्या भाकड कथा वाटत होत्या . त्यांनी आज रात्री पाणी देऊन यायचं पक्कच केल होत . ते एकटेच चालत निघाले . त्यांच्या काकांनी त्यांना थांबवल आणि म्हणाले " चालत नको जाऊ. बैलगाडी घेऊन जा !"काका बैलगाडी घेऊन जायला तयार झाले . त्यांनी बैलगाडी घेतली आणि शेताकडे निघाले . त्यांना रस्ता ठाऊक होता कि स्मशान आल्यावर विरुद्ध बाजूला वळायचे . अर्ध्याच्या वर रस्ता संपत आला होता . आता स्मशान लागल होत . त्यांनी विरुध्द बाजूला जायला बैलगाडी वळवली . पण बैल मात्र पुढे जायला तयार होत नव्हते . ते जागच्या जागीच थांबले .यांनी त्यांना खूप हाकले पण बैल काही जागचे हालेना . त्यांनी प्रतोड ने बैलांना मारून मारून त्यांच्या पाठीवर चे रक्त काढले . तरीही बैल पुढे जायला तयार होत नव्हते . काका विचारात पडले कि' बैल असे अचानक का थांबले असतील ?? आणि एवढ मारून , रक्त निघायला लागल तरी पुढे जायला का तयार होत नाही . जोडी तर जुनी आहे मग पुढे का जात नाही 'असा विचार करतच होते तेवढ्यात अचानक बैल उधळले . बैल उधळले म्हणून काकांनी त्यांना मारायचं थांबवल . मग बैल हि उधळायचे बंद झाले, पण त्या वाटेने बैल पुढे जाताच नव्हते, शेवटी वैतागून काकांनी घरी यायचा निर्णय घेतला . बैलांनी त्यांना आता मात्र बरोबर घरी आणल .घरी आले तर त्यांचे वडील आणि काका जागेच होते. त्या काकांनी हा प्रकार त्या दोघांना सांगितला .त्यावर त्यांचे काका त्यांना म्हणाले "उद्या सांगतो ."काका आधीच खूप दमले होते. म्हणून अजून जास्त विचार न करता ते हि झोपून गेले . सकाळी काकांनी रात्रीचा प्रकार परत सांगितला . तेव्हा त्यांचे काका म्हणाले " हि जोडी जुनी आहे . त्यांना रस्ता माहित आहे . तू जिथे चाल्लेलास तो रस्ता स्मशानाच्या विरुध्द दिशेचा नसून स्मशानाचा होता . तुझ्या सोबत काळ चकवा घडला होता . म्हणून मी रात्री तुला नाही सांगितल . त्या स्मशानाच्या ठिकाणी असेच भास अनेक लोकांना झाले आहेत . अनेक लोक आता पर्यंत मेले आहेत. जनावरे अश्या गोष्टीन पासून अत्यंत जागृत असतात . त्यांनी तुझा जीवच वाचवला काल रात्री ." हे ऐकल्यावर मात्र काकांना आपल्या चुकीची जाणीव झाली . त्या पाळीव मुक्या जनावरांना रक्त काढेपर्यंत मारल्याचा त्यांना आता पश्चाताप झाला होता . मनातूनच ते एखाद्या गुन्हेगारासारखे वाटू लागले, मनातूनच त्यांनी त्या मुक्या बैलांची आणि देवाची माफी मागितली, आणि आभारही मागितले. *समाप्त*




हि घटना हैद्रबाद मध्ये २००९ साली घडली आहे.

हि घटना हैद्रबाद मध्ये २००९ साली घडली आहे. खरी समजा किंवा खोटी समजा. पण हि घडली आहे एवढ! एक soft. engg. मरणोत्तर आयुष्य काय असते हे पाहण्यासाठी कायम उत्सुक असायचा. त्याला नेहमी माणूस मेल्यानंतर त्याचे काय होते?, याची उत्सुकता असायची. या उत्सुकतेपोटी तो कित्येकदा तरी अनोळखी चिता जळताना पाहत असे व ते जाळून गेल्या तरी तिहते स्मशानात बसून राही, कि काही तरी दिसेल या आशेने. पण त्याची नेहमी निराशाच होत असे. तो ह्या उत्सुकतेच्या इतका आहारी गेला होता कि, एक दिवस त्याने त्याचे जीवन संपवले. घरात स्वतः ला बंद करून गळफास घेतला, आणि शेजारीच मरणोत्तर आयुष्य जगण्यासाठी आत्म्हत्या करीत आहे म्हणून चिट्ठी लिहून ठेवली. हि घटना घडली आणि त्याच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. हाता -तोंडाशी आलेला मुलगा असल्या फालतू वेडापायी मरणाच्या स्वाधीन झाला हे त्याच्या कुटुंबियांना न पचण्यासारखे होत. पण त्यांच्याकडे आलेला दुख: पेलावाण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. ते दुख: कसा तरी पेलवत होते. हळू हळू दुख:च वातावरण निवळत असताना, माशी शिंकावी अश काही घटना घडत गेल्या, ज्या वेळोवेळी रितेश जिवंत असल्याच दाखवून देत होत्या.. पण यावर कोणी फारस लक्ष दिल नाही. पण हे अस घडल होत. ज्याने आत्महत्या केली त्याच नाव रितेश अस होत. तो पण फेसबुक प्रेमी होता. हयात असताना तो ज्या वेळेत फेसबुक वर लॉग इन असायचा त्याच वेळेत त्याचा स्टेटस मरणोत्तर काळात देखील ऑनलाईन दिसू लागला. काहीच दिवसात त्याच्या मोबाईल फोनच बिल पण घरी येऊन पडले. हे कमी कि काय म्हुणुन रितेश च्या बहिणीला झोपेत तिच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवत आहे असे आभास होऊ लागले काही दिवसांनी सकाळी झोपेतून उठल्यावर रितेश बहिणीला घर आवरत असताना तिच्या उशीखाली एक चिठ्ठी सापडली जी कि रितेश च्या हस्त्क्षारात लिहिली होती. आणि त्य्मध्ये लिहिले होते कि, 'मी कुठेही गेलेलो नाही, मी सदा इथेच आहे, तुमच्या सोबत. तुम्ही मला घाबरू नका.आणि मी तुला खूप मिस करतो (त्याच्या बहिणीला उद्देशून).' हे वाचून त्याची बहिण खूप घाबरली तिने तिच्या आईला सगळी हकीकत सांगितली. रितेश च्या कुटुंबीयांनी ह्या घटनेची प्लोईसात माहिती देण्याचा निर्णय घेतला. ठरल्या प्रमाणे पोलिसात खबर देण्यात आली. पोलिसच शेवटी ते. हसणारच होते, पण त्यांना ह्याची विचारपूस करण त्यांना भाग होता. त्यांनी मोबाईल कंपनी कडून माहिती मागवली तेव्हा त्यांना रितेश च्या मोबाईल वरून एकाच number वर सतत फोन जात असल्याचे निदर्शनास आले, तेव्हा त्यांनी तो number ज्या व्यक्तीचा होता त्या व्यक्तीला संपर्क साधला असता माहिती मिळाली कि, टी व्यक्ती म्हणजे, रितेश ची प्रेयसी आहे, जी कि बँगलोर ला असते. रितेश बर तिचा दररोज बोलना होता, हे ऐकून पोलिसच चाट पडले. त्याने काही कळेना झाले. म्हुणुन त्यांनी तिला हैद्राबाद ला बोलावले. त्याच रात्री तिला रितेश च्या number वरून फोन गेला कि, 'उद्या ताबडतोब मला भेटायला ये.'. तिला काहीतरी गडबड आहे असे वाटले. म्हणून टी पण लगेच हैद्राबाद ला रवाना झाली. इकडे पोलीस त्यांच्या तपासाचा एक भाग म्हणून रितेश च्या घरची चौकशी करायला त्याच्या घरी गेले. आणि त्याची खोली तपासंयासाठी विनंती केली. तो गेल्यापासून त्याची खोली त्याच्या घरच्यांनी आवरून साफ करून बंद ठेवली होती. पोलिसांनी ती तपासण्यासाठी उघडली आणि त्यांचे डोळे फिरले. त्याच्या खोली मध्ये घुसताच पोलिसांना त्याच्या खोली मधील ते सगळे सामान विस्कळीत पडल्याचे सापडले. त्याच्या खोली मध्ये त्यांना कॉफी चा मग मिळाला, त्यावरून वाटत होत जणू कॉफी आताच प्यायली आहे, पोलीसाना त्याचा laptop चालू अवस्थेत सापडला, तिथेच मोबाईल फोन देखील सापडला आणि ह्या सगळ्या वस्तू रितेशच अजूनही त्या खोली मध्ये असणार अस्तित्व दर्शवत होत्या. ते पाहून पोलिस पण विचारात पडले, पण ते पेशाने शेवटी पोलिसच , त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमागे एखादी व्यक्तीच आहे जी त्याला चांगले ओळखते.(भन्नाट बुद्धी पोलिसांची, बंद खोलीत कोण असणार, त्याच्या घरातल्यांशिवाय?). पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतल्यावर अजून काही चीठ्या सापडल्या त्या तर अजून संभ्रम निर्माण करणाऱ्या होत्या. त्या चीठ्या जणू त्याने स्वतःच लिहिल्या होत्या. पोलीस त्यांची चौकशी (अर्धवट?) आटोपून गेल्यावर अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे, रितेश ची बँगलोर ला असणारी त्याची प्रेयसी अचानक येऊन त्याच्या घरी पोचली, तिला अजून काहीच माहित नव्हते. ती जेव्हा घरी पोचली तेव्हा रितेश च्या घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केल्यावर कळले कि, कालच फोन वरून रितेश ने तिला भेटायला बोलावले होते. हे ऐकून रितेश च्या घरच्यांना तर धक्काच बसला. तिचा फोन पहिला असता. तिला रितेश च्याच number वरून फोन गेल्याचे समजले. तिला रितेश च्या घरच्यांनी काही सांगायच्या आतच तिला परत रितेश च्या फोन वरून फोन आला, तिने तो उचलून कानाला लावला तोच, त्याच्या घरच्यांनी फोन speaker वर ठेवण्यास सांगितले, आणि समोरून रितेश चा आवाज ऐकून त्याच्या घरच्याना रडू आवरले नाही, व ते रडू लागले, तिला काहीच कळत नव्हते काय चाललय ते. ती रितेश ला काहीतरी बोलणार इतक्यात रितेश तिला बोला, "कि तू मला भेटण्यास चुकीच्या ठिकाणी आली आहेस, तुला मी तिथे नाही भेटणार." आणि तिला दुसरा पत्ता देऊन तिथे बोलावलं. तो पत्ता तर त्या स्मश्नाचा होता, जिथे रितेश ला जाळण्यात आले होते.. रितेश च्या घरच्यांनी तिला काही सांगायच्या आतच टी तिथून निघाली. ती त्याला भेटण्यासाठी खूप उत्सुक होती, त्यामुळे ती थेट स्मशानाजवळ येऊन पोहचली. तो रस्ता स्मशानभूमी आणि जरा मुख्य परीसरापासून दूर असल्यामुळे तिथे वर्दळ खूप कमी होती. ती थोडी बिचकत होती, पण तिला त्याला भेटण्याची ओढ होती. म्हणून ती तिथे गेली होती. सुमारे एक दीड तास झाला तरी रितेश आला नाही म्हणून तिने त्याला फोन केला आणि एवढ्यात रितेश तिला समोरून येताना दिसला, तिच्या चेहऱ्यावर हास्य खुलले. ती खुश झाली होती. रितेश आज तिला खूप खुश दिसत होता. तो तिच्याजवळ आला आणि तिला म्हटला आज मी इथे तुला घेऊन जायला आलो आहे., तू येशील का माझ्याबरोबर??? हे ऐकताच ती खुश होऊन त्याला होकार देत पुढे सरली पण आश्चर्य घडले कि टी त्याच्या आरपार गेली... आता तिला कळेना काय घडत आहे.. टी घाबरली. आणि रितेश कडे पहिले तर रितेश रुपडे पूर्ण वेगळे झाले होते, तो पहिल्यापेक्षा खूप विद्रूप दिसत होता, त्याचा घसा सुजला होता, गळयाजवळून मधेच थोडेसे रक्त टपकत होते. त्याच्या डोळे तर पूर्ण पांढरेच झाले झाले होते, आणि तो या सगळ्यात विक्षिप्त हसत होता... तिला आता कळून चुकले होते कि आपल्यामागे इथे रितेश ला काय झाले आहे... एकंदर सगळा पट तिच्या डोळ्यासमोरून गेला आणि ती तिथून जीवाच्या आकांताने धावू लागली, कुठे पळावे काही सुचत नव्हते, एकतर अनोळखी शहर होते, अनोळख्या वाटा होत्या, धावावे तर कुठे??? दिसेल त्या वाटेने ती धावत होती. रितेश देखील तिच्या मागे पळत होता आणि ओरडत होता, तू माझीच आहेस, माझीच राहणार. आणि आज मी तुला माझ्याबर घेऊन जाणार, पण टी जणू वार्याची झुंझत धावत होती... तिला कशाचेच भान नव्हते. ती धावत धावत मुख्य शहरात आली तेव्हा तिच्या जीवात जीव आला. तिला आता रसता दिसत होता. तिने सरळ रिक्षा पकडली आणि रितेश घरीई न जाता पोलीस स्टेशन ला गेली. आणि घडलेली सांगितली. पोलिसांनी तिला वेड्यात काढून तिला समजावले आणि रितेश घरी आणून सोडले, तिने लगेच घडली हकीकत त्याच्या घरच्याना सांगितली तेव्हा तिच्या घरच्यांना हि सगळा खरा वाटला आणि त्यांनी त्याच पिंडदान कार्याचा ठरवला. तेव्हा त्याच्या पिन्दादानास्ठी सगळे नदीवर गेले असता, त्याच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता, तेव्हा रितेश ची प्रेयसी बोलली कि पुढच्या जन्मी तुझी जोडीदारीण म्हणून मीच असेल. तिने असे बोलताच कावळ्याच्या थव्याने घास उचलला... पुन्हा सगळे जसे होते तसेच झाले.. तो अस्तित्वात असल्याचा आभास पुन्हा कोणालाच झाला नाही.. त्याची प्रेयसी आता पुण्यात मोठ्या हुद्द्यावर एका नामांकित कंपनी मध्ये कामास आहे... *समाप्त*




तुषार कोवाळे चा गोन्दियातला अनुभव...

तुषार कोवाळे चा गोन्दियातला अनुभव...

उन्हळ्याचे दिवस होते. मी रात्री माझ्या मित्राच्या flat वर रात्री अभ्यास करायला जात असे . एकदा रात्री मी bed वर व मित्र खाली झोपला होता . थोडया वेळाने माझा मित्र मनिष room वर आला
आणि म्हणाला "तुषार sir मे यहा सो जाऊ क्या ? "
मी म्हणालो " हा सो जॉओ ."
तो म्हणाला " क्यो डर रहे हो क्या ? "
मी म्हणालो " आपसे क्या डरना !"

थोड्या वेळाने तो झोपला आणि माझा पाय ओढु लागला . मी एकदम ओरडून जागा झालो . पाहतो तर तो मित्र तिथे नव्हता ............

खाली झोपलेला मित्र म्हणाला " काय झाल ?"
तेव्हा मी त्याला घडलेला प्रकार सांगितला .तो म्हणाला झोप तूला उद्या सांगतो सगळ . मी म्हणालो नाही आताच सांग .

तेव्हा तो म्हणाला " इथे नेहमीच असे प्रकार घडतात . एका मुलीने 10 वर्षा आधी इथे आत्महत्या केली होती. कधी ती मुलगी fan ला लटकलेली दिसते तर कधी ती छातीवर येउन बसते . गुप्ता च्या छातीवर ती मुलगी येउन बसली होती आणि सर्फारोझ ला fan ला लटकताना दिसली, त्यानंतर सर्फारोझ घरातून पाळला त्याने पूर्ण रात्र platform वर घालवली . गुप्ताला त्यानंतर पाणी प्यायच्या माठावर एक मंगळसूत्र मिळाले ते त्याने हनुमान मंदिरात चढवले. इथे या आधी एक family राहायची पण अश्या घटनांमुळे ते सोडून गेले . "





मी राधेय देशमुख


माझा एक मित्र आहे मोहित नावाचा . त्याचाच हा किस्सा .
एक दिवस त्याच्या घराच्या चारी कोपऱ्यात चार बाहुल्या ठेवलेल्या आढळल्या . त्या रात्री १२ नंतर त्याची आई जोरजोरात होती .
त्याच्या आईला २-३ च्या दरम्यान काहीतरी ह्वायचं . मी मोहित ला आमच्या येथील एका हाफिज साहिब बाबा कडे नेले .
त्यांनी सांगितल "जेव्हा सकाळी तू उठशील तेव्हा घरातील कचरा झाडल्यावर एका पुडीत बांधून आण ,,, मगच पुढच सांगता येईल . "
सकाळी ती कचर्याची पुडी घेऊन आलो तेव्हा त्यांनी हे पाहूनच सांगितल " करणी प्रकार आहे . घराच्या ४ कोपर्यात ४ बाहुल्या आहेत . ४ खिळे देतो . ते अमावास्येला रात्री अंघोळ करून ते ४ कोपऱ्यात लावायचे . ठरल्याप्रमाणे मी आणि मोहित ने तेच केले . "

थोड्या वेळाने बघितल तर मोहितची आई स्वताचेच केस कापत होती आणि म्हणत होती " तुला असच पाहीजे रांडे , चिनाल . "

मोहितने लगेचदेवघरातून देवाचा photo आणला आणि हनुमान चालीसा म्हणू लागला .

आम्ही कस तरी जाऊन त्या महाराजाला बोलावल . त्यांनी येउन मोहितच्या आईच्या अंगातल्या प्रेतआत्म्याला विचारल कोण आहेस तू ,काय पाहीजे , कशाला आलीस ……

जे उत्तर त्या प्रेतात्म्याने दिल ते येथे सांगू शकत नाही . नंतर त्या प्रेतात्म्याला जे हव होत ते दिल . नंतर तो प्रेतात्मा निघून मोहितच्या आईच्या शरिरातून गेला…….





मी प्रतिक पालकर ....

मी कर्जतला राहतो . मी माझ्या आयुष्यातील माझा सर्वात मोठा अनुभव share करत आहे .

मी आणि माझे मित्र अमोल , नितेश आणि वैभव असे आम्ही ४ घे जण रोज संध्याकाळी नेरळ ला gym ला जायचो . gym वरून येताना रोज वडापाव घेऊन यायचो . आमच एक ठरलेल ठिकाण होत . तिथे आम्ही बसून गप्पगोष्टी करत ते वडापाव खायचो आणि मग घरी यायचो .

अशाच एक संध्याकाळी आम्हाला gym मधुन निघायला थोडा उशीर झाला . आम्ही नेहमीच्या ठिकाणाहून वडापाव घेतले आणि bike start केल्या . आज उशीर झाल्यामुळे बाहेर अंधार खुप झाला होता .
आम्ही रोड वरून येत होतो तेव्हा मी एका truck ला overtake केल . मला आणि अमोल ला त्या truck वर एक सफेद साडी घातलेली बाई दिसली . आम्हाला वाटल की ती painting आहे म्हणून आम्ही दुर्लक्ष केल .
आम्ही थोड्याच वेळात आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर पोहोचलो आणि वडापाव खायला सुरुवात केली . तेवढ्यात तो overtake केलेला तो truck तिथुन pass झाला . तेव्हा मी जरा नीट लक्ष देऊन पाहिलं तर खरोखरच एक पांढऱ्या साडीतील बाई त्यावर बसली होती . मी जरा घाबरलो आणि माझ्या बाकी मित्रांना सांगितल. त्यांनीही त्या बाईला पाहिलं .
truck च्यावर पांढऱ्या साडीतील ती बाई बघून काही तरी वेगळच वाटत होत . त्याकडे आम्ही दुर्लक्ष करुन वडापाव खात बसलो . आम्ही bike च्या headlight बंद केल्या होत्या . माझा एक मित्र नितेश त्या रोड च्या बाजूच्या बाकावर बसुन वडापाव खात होता .
आम्ही वडापाव खाली ठेवले होते . त्याचा एक खाऊन झाला तो दुसरा वडापाव उचलण्यासाठी हाथ खाली नेला .
तेवढ्यात bench खालून एक हाथ आला आणि त्याच्या हाताला पकडलं . तो घाबरला आणि उठण्याचा प्रयत्न करताना खाली पडला . तो खुप घाबरला होता आणि जोरात ओरडू लागला . आम्ही त्याला पटकन उचलल. मी माझी bike start केली होती . नितेश पण त्याची bike start करत होता घाईघाईत त्याची bikeची चावी खाली पडली.
मी माझ्या bike ची headlight फिरवली . कशी तरी एकदाची चावी सापडली. आणि त्याने bike start केली . आम्ही खुप speed ने गावात पोहोचलो . आणि मित्राच्या घरी थांबलो .
आम्ही हे सगळ तिथे बसलेल्या लोकांना सांगितलं .
तेव्हा तिथे बसलेली लोक म्हणाली "तिथे एक चेटकीण राहायची . नेहमी पांढरी साडी घालायची . तिथे असे बर्याच वेळा झाल आहे . अनेकांना असे अनुभव आले आहेत . "
आम्ही खुप घाबरलो होतो . ३ दिवस आजारी होतो . त्यानंतर आम्ही रोज सकाळीच gym ला जायला लागलो .





Abhijeet Shinde लिहतोय...

Abhijeet Shinde लिहतोय...

" माझा मित्र ठाण्यामध्ये राहतो..

माझ्या मित्राचे वडील एकदा जव्हार इथे गेले होते. निघताना रात्री उशीर झाला.. खरंतर ते निघणार नव्हते, पण दररोजचा दिनक्रम असल्याने त्यांना निघावे लागले..

जाव्हारवरून ठाण्याला येताना वाटेत घनदाट जंगल लागते.. त्यातल्यात्यात तो रस्ता लूटमारीसारख्या दुर्घटनांसाठी कुप्रसिद्ध आहे. तरीही ते यायला निघाले..

वाटेत वाहनचालकाने गाडी थांबवली, आणि लघुशंकेसाठी तो थोडा दूरवर गेला..

झोप येऊ नये, म्हणून त्याने डोळ्यांवर पाणी मारले.. इतक्यात त्याचे लक्ष सामोर गेले.. त्याला एक पंढरी आकृती दिसली.. त्यांना वाटले डोळ्यावर पाणी मारल्याने काही चमकत असावे.. त्यांनी लक्ष नाही दिले... इतक्यात मित्राच्या वडिलांनाही तशीच काहीशी पांढुरकी आकृती दिसली.. [गैरसमज नका करून घेऊ.. रस्ता फार लांब, मोकळा आणि सरळ आहे..] त्यांना ती आकृती जवळ येत असल्यासारखे दिसले.. त्यांनी चालकाला ताबडतोब गाडी पळवायला सागितले..

चालकाने बेरोकठोक गाडी पळवायची सुरुवात केली.. इतक्यात एक भयानक गोष्ट झाली... चालकाच्या असे लक्षात आले, कि गाडीच्या मागे काहीतरी पळत आहे.. त्यांच्याकडे गाडी पळवण्या व्यतिरिक्त काहीही पर्याय शेष नव्हता.. त्यांनी तसेच केले..

काकांनी मागे पहिले, तर उंच धिप्पाड असा काहीतरी गाडीच्या मागे पळत होतं, पुढेही तसच काहीतरी दिसत होतं.. काकांनी गाडीचा वेग कमी करायला लावला.. कारण अस म्हणतात कि, खैसाची टक्कर झाली, तर धातूसुद्धा मोडून जातात.. मागेही एकजण पाठलाग करतोय.. पुढे एकजण वाटेत झोपलाय.. चालकाला जायला मार्ग दिसेना... इतक्यात त्याने एक युक्ती केली... त्याने गाडी चक्क फुटपाथवर चढवली...

आणि पुन्हा वेग वाढवून त्या खैसांना Overtake केल.. म्हणून आज त्यांचा प्राण वाचला..

आजही ते आम्हाला हीच गोष्ट सांगताना दरवेळी नवीन उलघडा करतात.."





ही घटना बीड येथे घडली आहे .

ही घटना बीड येथे घडली आहे .
बीड पासून ५ km च्या अंतरावर एक oil mill आहे . हि oil mill गेल्या १० वर्षा पासून बंद आहे .

त्या mill मध्ये १० वर्षा पुर्वी एक घटना घडली .
त्या mill मध्ये एका खोलीत एक Watchman आणि त्याची बायको राहत असे . तो watchman तिथेच काम करायचा आणि तिथेच राहायचा .

एकदा रात्री त्या mill मधून एक truck चोरीला गेला . पोलिसांना चोर सापडला पण नंतर त्यांना कळाल कि हा चोर त्या watchman कडे नेहमी यायचा . खरतर त्या watchman ची काही चूक नव्हती , चोरानेही काबुल केल होत कि त्याला त्या watchman ने मदत केली नाही . पण तरीही mill मालकाने त्या watchman ला नोकरी वरून काढून टाकल .

त्या वेळेला त्या watchman ला पैश्यांची अतिशय गरज होती . त्याची बायको खुप आजारी होती . तिला हॉस्पिटल मध्ये admit कराव लागणार होत. watchman पण खूप आजारी होता . तो mill मालका कडे पैशे मागायला गेला . मालकाने त्याला पैशे द्यायला नकार दिला . पैशा अभावी त्या watchman चा आजारामुळे मृत्यू झाला . थोड्या दिवसांनी त्याच्या बायकोने पण आजारपणातच विष पिउन आत्महत्या केली .

या घटनेला आता ६ महिने झाले होते .

आता त्या ठिकाणी नवीन watchman कामाला आला होता .
एका रात्री तो असाच गस्त घालत होता .
त्याला mill च्या एका कोपऱ्यात एक लाल साडी घातलेली बाई रडताना दिसली. तो त्या बाई जवळ गेला तर ती बाई त्याच्याकडे बघून जोरजोरात विचित्र हसायला लागली . आणि अचानक गायब झाली . तो हे बघून तिथेच घाबरून पळून गेला आणि नोकरी सोडली त्याने .
नंतर आलेल्या watchman ला पण असाच अनुभव आला . तो पण नोकरी सोडून निघून गेला .

काय कराव ? एक पण watchman mill मध्ये टिकत नव्हता ? वरतुन watchman च्या गोष्टी ऐकून कामगार पण घाबरले होते .

शेवटी मिल च्या मालकाने पूजा घातली . पण पूजेला जो ब्राम्हण बोलावला होता त्याचाच १० दिवसांच्या आत अकस्मात मृत्यू झाला . थोड्याच दिवसांनी त्या mill मालकाच्या मुलाचा पण अकस्मात मृत्यू झाला . त्या मालकाबरोबर रोज काही न काही तरी वाईट घटना घडु लागल्या .

लोक बोलायला लागली की त्या गरीब बाईचा तळतळात त्या mill मालकाच्या मागे लागला . तो मालक या त्रासाला कंटाळून बीड सोडून निघून गेला . आता तो पुण्यात असतो .
पण ती मील अजूनही बंद आहे .





आज ची कथा ही खूप भयानक तर आहेच पण त्या पेक्षाही खूप विचित्र आहे

आज ची कथा ही खूप भयानक तर आहेच पण त्या पेक्षाही खूप विचित्र आहे . तुम्हाला कदाचित ही कथा अजिबात पटणार नाही पण १०० टक्के खरी आहे म्हणून आम्ही post करायचं ठरवल . बघा पटल तर घ्या नायतर द्या सोडून . 

रोहित काळे
ही गोष्ट साधारण १० ते १५ वर्षापूर्वीची. आताच काही दिवसान पूर्वी आईने मला सांगितली .
ही घटना माझ्या आईच्या माहेरी घडली होती . पोन्धवाडी , इंदापुर तालुका , पुणे जिल्हा .
भिगवण जवळ पोन्धवाडी एक छोटस गाव आहे. त्या गावात एक जोडप रहात होत . 'सोनबाई आणि बाळासाहेब.'

सोनबाई , खुप गरीब ,कष्टाळू , माणुसकी पण खुप होती तिच्या जवळ . बाळासाहेब, तिचा नवरा, तो हि अगदी तिच्यासारखाच , अगदी तिच्या सारखाच …
लग्नाला नुकतच वर्ष पूर्ण झाल आणि घरात पाळणा हलणार असल्याची खबर मिळाली . घरात अगदी आनंदी आनंदच ……

आता तिचे महिने भरत आले होते . तिला नवर्याने माहेरी पाठवले .
तिला आई नव्हती ,तिच्या वडिलांनी आणि तिच्या विधवा आत्याने तिची काळजी घेतली होती .
बाळंतपाणात पण त्यांनीच काळजी घेतली .

अखेर तो दिवस उजाडला आणि तिच्या पोटी मुलगा जन्माला आला . पहिल्या बळाणपणातच मुलगा तो हि एवढ्या गरिबीत , म्हणून सगळे जामच खुश होते

तो मुलगा १५ दिवसांचा झाला आणि एक विचित्र घटना घडली .

त्या सोनबाई ची आत्या पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली . पाणी भरत असताना तिचा हंडा त्या विहरीत पडला .
तिला पोहायला येत नसल्यामुळे तो हंडा तिने काढायचा प्रयत्न केला नाही . ती अशीच घरी आली आणि हंडा विहरीत पडला हे सांगू लागली .
हे ऐकताच आताच बाळांतीन झालेल्या सोनबाईच्या मनात काय आले कुणास ठाऊक ?
भर दुपारच्या वेळी ही सोनबाई उठली आणि तडातडा चालत त्या विहिरी च्या दिशेने निघाली . शेतात गेली आणि त्या विहरीत उडी मारून तो हंडा घेऊन घरी आली . तिची आत्या हे बघून चाटच पडली .
एक तर हि बाळांतीन बाई आणि विहरीवर गेली , जर हिला काही झाल तर मोठी पंचाईतच. तिला थोडा संशय आला पण वाटल हा तिच्याच मनाचा खेळ आहे अस काही नाहीये ; म्हणून तिने या कडे दुर्लक्ष केल .

त्याच रात्री एक विचित्र घटना घडली . सगळे गाढ झोपेत होते . सोनबाई कोणाशी तरी बोलत बोलत उठली . आणि भर रात्री १२ वाजता त्या विहरीच्या दिशेने निघाली .
विहारीजवळ गेली आणि चक्क तिने विहरीत उडी टाकली . जरा पोहली आणि परत घरी आली . घरी येउन कपडे बदलले आणि झोपली . आत्याने हे सर्व गुपचूप बघितल पण काही न बोलत ती तशीच झोपी गेली .
हे सलग १० दिवस असच चाल्ल .
आता मात्र तिच्या आत्याला राहावल नाही . तिने त्या सोनबाई ला विचारल "एवढ्या रात्री विहरीत का पोहतेस , त्या लहान मुलाचा तरी काही विचार कर . "
अस म्हंटल्यावर सोनबाईने आपले डोळे मोठे केले , तिच्या डोक्यातून रक्त येत होते . सोनबाई ने तोंड उघडल तर तिच्या तोंडातूनही रक्त येत होत .
हे बघून आत्या खूप घाबरली आणि तिला म्हणाली " जा तुला काय करायचं ते कर ". एवढ म्हणताच सोनबाई शांत झाली . आपल्या मूळ स्वभावात येउन शांत होऊन झोपी गेली .

हा दिवस आमवस्येचा होता . खर तर ती सोनबाई झोपली नव्हती . ती तर योग्य वेळ येण्याची वाट पाहत होती . ती काहीतरी विपरीत करणार याची चाहूल तिच्या आत्याला लागली होती . पण तिची आत्या पण त्या गोष्टी समोर हतबल होती .

आता चांगलीच मध्यरात्र झाली होती. सगळीकडे स्मशान शांतता होती . हवेत अचानक गारवा निर्माण झाला . सोनबाई झोपेतून ताडकन उठली .
आत्या सगळ लपून पाहत होती हे त्या सोनबाईच्या लक्षात आले नाही . आत्या बारीक नजर ठेऊन तिच्या हालचाली टिपत होती .
' त्या चिमुकल्या कडे ती सोनबाई विचित्र नजरेने बघायला लागली . तो चिमुकला गाढ झोपला होता . सोनबाई ने त्याला उचलले . त्याला आपल्या अंथरुणात गुंधाळले आणि त्यावर बसून जोरजोरात हसू लागली . '
हा प्रकार आत्याने गपचूप पहिला . ती हे बघून किंचाळणारच होती कि तिने लगेच आपला हाथ तोंडावर ठेवला . सोनबाई मोठ्याने हसतच होती . थोड्या वेळाने सोनबाई शुद्धीवर आली आणि परत झोपी गेली .

आत्याने तेव्हाच ठरवल कि उद्याच हीचा सोक्ष मोक्ष लावायचा . आत्याने सकाळीच एका तांत्रीकाला बोलावल .

तो तांत्रिक घरी यायच्या आधी त्या सोनबाई कशीतरी ही खबर मिळाली . ती तशीच घर सोडून तिच्या सासुरवाडीला गेली . पण तीला मध्येच काय झाल काय माहित ? ती सासुरवाडीला घरी न जाता सासुरवाडीला लागून एक जंगल होत . त्या जंगलात एक वडाच झाड होत. ती त्या झाडावर ४-५ दिवस लपून बसली. ती वडाच्या झाडाच्या अगदी टोकाला होती . तिला एका गुरख्याने ओळखल , तिला कस तरी खाली उतरवल . आणि तिला तिच्या सासरी सोडण्यात आल .

पौर्णिमेची रात्र होती त्या रात्री . सोनबाईच्या अंगात जे काही पिशाश्च घुसल होत त्याला आता रक्ताची तहान लागली होती . ती आता घरातल्या माणसांकडे रक्त मागत होती . पण कोण तिला रक्त द्यायला तयार होइना . घरतल्यांना कळून चुकल होत कि हीला नक्कीच पिशाश्च बाधा झाली आहे . त्यामुळे ते हिला जबरदस्ती मांत्रिका कडे घेऊन जायला निघाले .
ती आता मजबूत हट्टाला पेटली . कोणी रक्त देत नाही म्हंटल्यावर तिने घरातील लाकडे तोडायची कुऱ्हाड घेतली आणि स्वताचच शीर धडापासून वेगळ केल .हा प्रकार बघून घरातल्या सगळ्यांची पाचावर धारणाच बसली .
पण हा प्रकार खूपच वेगळा निघाला . तिने स्वतच शीर उडवलं खर पण रक्ताचा एक थेंब पण उडाला नाही . सगळ रक्त शरीराच्या आतल्या आतच थांबल होत .
पोलिसांनी तिची dead body ताब्यात घेतली . तिच्या Post-mortem report तर या पेक्षा हि भयानक निघाला . Post-mortem report ने सांगितल कि हि तर १५ दिवसा अगोदरच मरण पावली होती .

हे ऐकल्यावर माझाही विश्वास बसला नाही . पण त्या सोनबाई चा नवराच हे स्वतः सांगतो म्हणून विश्वास बसतो





Alok Yenpure सांगतायत...

कधी कधी मनुष्याला त्याच्या सोबत घडलेली घटना हि खरी आहे कि तो संमोहन नावाच्या प्रकाराला बळी पडलाय ह्याच कोड काही केल्या सुटत नाही. हि कथा आहे माझ्या अगदी जवळच्या दोन मित्रांना आलेल्या अनुभवाची. अजय आणि विवेक ह्यांची. दोघांनी नुकतीच १२ वी ची परीक्षा दिली होती. सुट्ट्या लागलेल्या होत्या. दोघांनी ठरवल कि आपण रोज सकाळी पर्वती(पुण्यामधली एक छोटीशी टेकडी ज्या टेकडीवर विष्णूच, महादेवाचं, विठ्ठलाच आणि कार्तिकेयाच पेशवेकालीन मंदिरे आहेत) चढायची. विवेक राहायला होता सुखसागर नगर ला आणि अजय बिबवेवाडी मध्ये महेश सोसायटीत. त्यामुळे दोघांनी अस ठरवल कि विवेक ने अजय च्या घरी येयच नि त्याला पीक-अप करून पुढे पर्वतीच्या रस्त्याला लागायचं. (कारण सुखसागर नगर हे बिबवेवाडी च्या पुढे असल्यामुळे त्यांनी अस करायच ठरवल).

विवेक पहाटे साडेतीन वाजताच पाणी भरायला उठायचा. तो रात्री झोपायच्या आधी नळ सोडून ठेवायचा. पाणी आल कि पाण्याच्या आवाजानेच विवेक ला जाग येयची. पाणी भरून झाले कि तो अजयच्या घरी जायचा त्याला पीक-अप करायला, त्याला पिक-अप करून हे पर्वती पायथ्याला साधारण साडे चार-पावणे पाच च्या सुमारास पोहोचाय्चे. पर्वती दोन ते तीन वेळा चढायची नि नंतर पर्वती च्या मागच्या बाजूस जाउन थोडा वेळ काहीतरी उचापत्या करायच्या आणि मग घरी परतल्यावर पुन्हा एक झोप काढायची असा त्यांचा दिनक्रम चालू झाला.

पर्वती च्या मागील बाजूस एक व्यायामशाळा आहे. तिथून पुढे खडकाळ मातीचा रस्ता तळजाई आणि वाघजाई डोंगराकडे जातो. (पर्वती ते तळजाई असा अर्ध्या तासाचा ट्रेक पण बरेच लोक करतात). त्या व्यायामशाळेच्या जरा पुढे एक मोठ झाड आहे.अजय आणि विवेक, त्यांचे राउंड मारून झाले कि इथे येउन या झाडाच्या फांदीला काही वेळ लटकत बसायचे. पूर्ण पर्वती वर जरी अंधार असला तरी इथे मात्र व्यायामशाळेच्या बाहेरची ट्यूब लाईट रात्रभर चालू असायची. त्या ट्यूब लाईट चा प्रकाश कमी कमी होत अगदी त्या झाडाच्या थोड अलीकडेच संपायचा. ह्या दोघांना अगदी लख्ख प्रकाशाची गरज नव्हती पण झाडाची फांदी दिसण्या इतपत तरी उजेड होता.

अजय आणि विवेक अशा वेळी पर्वती चढायला सुरुवात करायचे कि त्यावेळी तिथे कोणीही नसायच. जे लोक रोज नियमितपणे पर्वती चढायला येत असायचे ते पण सव्वा पाच-साडे पाच नंतर चढायला सुरुवात करायचे. हे दोघ एकटेच पर्वती चढायचे आणि एकदा चढून झाली कि व्यायाम्शालेपाशी जाउन त्या झाडाच्या फांदीला लटकत बसाय्चे. एकटेच. आजूबाजूला त्यांच्या शिवाय कोणीही नसायच. असायचा तो फक्त आजुबाजुचा काळाकुट्ट अंधार.

साधारण १५ ते २० दिवस झाले असतील, ह्याचं दिनक्रम व्यवस्थित चालू होता. पर्वती २ वेळा चढायची आणि व्यायाम्शालेपाशी जाउन झाडाला लटकत बसायचं. त्यांच्यात रोज स्पर्धा लागायची कोण सगळ्यात जास्त वेळ फांदीला लटकतय ह्याची.

एकदा हे थोडे लवकरच पायथ्याला पोहोचले. रोजच्या प्रमाणे आजही ते दोनदा चढले आणि मग व्यायाम्शालेपाशी आले. आजही त्यांच्यात जास्त वेळ लटकायची चढाओढ लागलीच होति. तीनदा चारदा लटकन झाल होत नि एकदा शेवटच लटकून घराकडे निघायच अस त्यांनी ठरवल. दोघांनी उडी मारून फांदी पकडली नि काउंटडाऊन चालू झालं. पहिला अजय उतरला. घरी निघायच म्हणून तो पाण्याची बाटली, नाप्कीन सामान वगैरे आवरू लागला. आवारत असताना मधून मधून तो विवेक ला हाक मारत होता. "हं, चल, उतर आता, आज तूच जिंकलास" अस म्हणून अजय निघायच्या तयारीत थाम्ब्ला. विवेक काय अजून उतरत नाही म्हणून अजय स्वताहाचे कपडे हाताने झटकून साफ करत बस्ला. कपडे झटकून झाल्यावर त्याने विवेक कडे एकदा पाहिलं तर विवेक अजून फांदिलाच लटकत बसला होता. "ए, चल रे, उशीर होतोय, आवर पटकन" विवेकच हु नाही कि चू नाही. "अरे बास, बच्चन पेक्षा उंच होशील चुकून" अजय ने थोडी गम्मत केलि. पण विवेक कडून काही केल्या प्रतीसादच मिळत नव्ह्ता. अजय ने विचार केला कि हा काहीच का हालचाल करत नाहीये. अजय ला थोडी धाकधूक व्यायला लागलि. त्याने आता विवेक ला घाबरवायच ठरवलं जेणेकरून हा फांदी सोडेल नि निघायला तयार होइल. अजय हळूच व्यायाम शाळेपाशी गेला, एका दगडावर चढून त्याने ट्यूब लाईट थोडीशी फिरवली. ट्यूब लाईट बंद झाली, काळाकुट अंधार पसरला. अजय हळूच व्यायाम शाळेच्या मागे जाउन लपला. आता विवेक नक्कीच उतरला असणार म्हणून ह्याने हळूच डोकावून पाहिल आणि ……… जे त्याला दिसल त्याने त्याचे डोळेच पांढरे झाले. त्या काळ्याकुट अंधारात लटकलेला विवेक त्याला जणू झाडाला लटकवलेल्या एखाद्या प्रेतासारखा भासला. आता मात्र अजय चीच फाटली. तो पटकन ट्यूब लाईट पाशी गेला नि त्यांनी घाई घाईत ट्यूब फिरवून चालू केली. ट्यूब चालू झालेली पाहून त्याने विवेक कडे एक कटाक्ष टाकला आणि अजय चे होते नव्हते ते सगळे केस उभे राहिले. फांदीवर एवढा वेळ लटकत असलेला विवेक गेला कुठे…. त्याने आजूबाजूला पाहिल तर कोणीच दिसत नव्हत. अजय आता थर थर कापायला लागला. हाताच्या धक्याने ट्यूब लाईट पक्षाने पंख फडफडावे तशी क्षणभर फडफडली. अजय ला अजूनच भीती वाटायला लागली. जे काय घडतंय ते पाहून त्याला अस वाटत होत कि आपण कोणत्यातरी वेगळ्याच जगात आहोत. तो चटकन ट्यूब पासून दूर झाला. झाडावरून सुकलेल पान पडल्यासारखा आवाज झाला तस अजय ने झाडाकडे पाहिल आणि त्याला विवेक दिसला. तो अजूनही फांदिलाच लटकलेला होता. अजय खूप घाबरला. त्याने विचार केला कि विवेक ला घेऊन इथून लगेच निघाल पाहिजे. त्याने विवेक ला बेबीच्या देठापासून ओरडून हाक मारायला सुरुवात केली. विवेक चा तरी पण काहीहि प्रतिसाद नव्हता. विवेक ची मान कललेली होति. हळुवार पणे, एका लयीत तो झुलत होता. अजय ला डाउत आला, विवेक ला काही झाला तर नसेल ना. त्याचा मनात आता भयानक विचार येयला लाग्ले. तो विवेक कडे गेला आणि त्याच्या डोळ्यात पाहिल. विवेक चे डोळे उघडेच होते पण त्यात जीव च नव्हता. शेवटचा उपाय म्हणून अजय ने विवेकच्या पाठीवर जोरात थाप मारली तसा विवेक खाली उतरला. विवेक खाली उतरला तेव्हा त्याची मान कललेल्यच अवस्थेत होति. विवेक ने मान वर करून अजय कडे पाहिलं तर अजय विवेक कडे च एकटक बघत होता. अजय ने विवेक चे डोळे पाहिले तर त्याला कळून चुकल कि विवेक खूप घाबरला होता. दोघेही क्षणाचा विलंब न करता विजेच्या चप्लाइनॆ धावत सुटले. व्यायाम शाळेपासून दोन ढंगाच्या अंतरावर दोघे उजव्या बाजूला जिन्याकडे जायला वळले. जसा अजय उजव्या बाजूला वळाला तसा अचानक त्याच्या समोर एक टोर्च धरलेला बाबा आला. अजय घाबरून जोरात ओरद्ला तसा तो बाबा पण दचकला. त्यांना कळेनाच कि हि मुल एवढ्या जोरात का धावत चालली आहेत ते. अजय आणि विवेक ला काहीच सुचत नव्हत. त्यांना फक्त लवकरात लवकर पर्वती उतरायची होति. एकदाचे ते पर्वती उतरून त्यांच्या साय्कलीन्पाशी आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सायकलींच कुलूप उघडलं नि मार्गस्त झाले.

वाटेमध्ये अजय ने विवेक ला विचारल "का रे तू एवढा घाबरला होतास उतरल्यानंतर?" विवेक म्हणाला "अरे मला अस वाटल कि मी एक प्रेत आहे. मी उतरायचा प्रयत्न करत होतो पण अस वाटत होत कि मला हातच नाहीयेत, माझ शरीर हवेत अधांतरी लटकट्य. मी लाख प्रयत्न करत होतो उतरायचा पण मला कुठलाच अवयव हलवता येत नव्हता. शेवटी एक जोरदार फटका बसल्यानंतर माझे हात सुटले नि मी खाली उतरलो. " हे ऐकून अजय चमकला. आपल्याला पण असाच भास झाला होता असा अजय ने विचार केला. एवढा योगायोग कस काय होऊ शकतो. अजय भानावर येउन विवेक ला म्हणाला कि "अरे, तो फटका मीच तुला मारला होता." विवेक म्हणाला "काय???" पण का रे फटका मारलास ?" अजय म्हणाला कि " अरे मी तुआ केवढ्या हाका मारल्या, किती वेळ मी तुला चल चल म्हणत होतो, तुझा काही रेसपोंस च नव्हता, शेवटी मी तुझी गम्मत करायची म्हणून लाईट पण बंद केली, लाईट बंद केल्यावर मला पण तू एका प्रेतासार्खाच भास्लास म्हणून मी घाबरून पुन्हा लाईट चालू केली नि तुला फटका मारून खाली उतरवलं." हे ऐकून विवेक सुन्न झाला. त्याच्यानंतर त्याची ताटातूट होईपर्यंत विवेक काहीच बोलला नहि.

पाच सहा दिवसांनी मला अजय चा फोन आला, " अरे विवेक ने तीन दिवसांपासून अंथरून पकडलय, येतोस का माझ्यासोबत त्याला भेटायला ………."





आमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी..

आमचा मुलूंड्ला वाडा होता,
पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी..
एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला..
जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरले,
तेव्हा बाबांनी नविनच बनलेल्या गगनचुंबी 'शितलदर्शन' नावाच्या इमारतीत ७ व्या मजल्यावर घर घेतले..

शितलदर्शन जिथे बांधली आहे त्या भागाला पुर्वी'७ माड'असे बोलत व तिथे कैद्यांना फाशी दिली जात असे...
सात-माडला भुत असतात अशी गावकऱ्यांची श्रध्दा असल्याने दिवसा ढवळ्या पण तिथे कोणी फिरकत नसे व चुकून मुले खेळता खेळता गेलीच तर ते बाधा घेऊन येत असत..!
अ्शा ह्या ७-माड मघ्ये बांधलेल्या इमारतीच्या ७व्या मजल्या वरचे ७वे घर बाबांनी विकत घेतले.....

माझे बाबा मुळातच बेडर स्वभावाचे,
व त्यामूळे त्यांना ह्या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता...
पण माझी आई तितकीच भित्र्या स्वभावाची,
म्हणूनच कि काय बाबांनी आईला त्या जागेचा इतीहास काहिच सांगितला नव्हता....
लग्ना नंतर सुरवातीला आई-बाबा तिथे न रहता वाड्यावरच रहात होते...
वर्षा दिड वर्षात माझ्या जन्मानंतर आम्ही तिघे शितलदर्शन मध्ये राहिला गेलो आणि ते थरारक नाट्य सुरू झाले....

आई ला घरात काम करताना सारखे अजुन कोणी बरोबर असल्याचा भास होत असे;
नविन घर आहे त्यामुळे होत असेल असे वाटून काही दिवस चुप्प बसली.... पण नंतर मी जेव्हा घरात घाबरू लागलो ओरडू लागलो , तेव्हा आईचा विश्वास बसला की काहितरी गोंधळ आहे....
त्यातच मी डायरीयाने आजरी पडलो व हॉस्पिट्ल मध्ये होतो,
तेव्हड्या काळात ह्या विषयावर पडदा पडला.
एकमहिन्या नंतर जेव्हा मला घरी आणले त्याच रात्री आईने बाबांना ही गोष्ट सांगितली....
व बाबांनी ती हसण्यावारी नेली....
थोड्या वेळाने बाबा धुतलेले कपडे वाळत घालत होते तेव्हा आई मागुन आली व पुन्हा तोच विषय काढून बोलू लागली,
व बाबा आईची समजूत घालत होते आणि तितक्यात आतून आईचा आवाज आला
"अहो,
कोणाशी बोलता आहत..?"
बाबांना नखशिकांत शिरशीरी गेली व बाबांनीमागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते आजुबाजूला....

आता बाबांचा पण विश्वास बसला होता की कहितरी गोंधळ आहे..!
ते पण शहारले..
त्यानी आईला वचन दिले की आपण लवकरच दुसरे घर घेऊ...
आता बाबा कामवर गेल्यावर आई मला कुशीत आणि स्वतःचा जिव मुठीत घेऊन बसत असे,
कधी संध्याकाळ होते आणि बाबा घरी येतात त्याची ती वाट पहात असे...
घरा मध्ये भांडी पडणे, खिडक्यांच्या काचा फूट्णे,
आवाज येणे,
सारखी प्रेतयात्रा दिसणे हे प्रकार चालूच होते...

एकदा माझी मावस बहीण आमच्या कडे राहीला आली होती....
दुपारी माझ्याशी खेळता खेळता ती जोरात किंचाळली तेव्हा आईने धावत येऊन विचारले की काय झाले?,
त्या वर ती ने सांगितलेली गोष्ट ऎकून आई थंडच पडली...
तीला एक म्हातारी बाई दिसत होती व ती जवळ बोलवत होती...
आईने लगेच आम्हाला घेतले व तडक वाड्यावर नेले...!

बाबांनी काही दिवसात कळव्या मध्ये दुसरा फ्लॅट घेतला,
आमचे सगळे सामान तिथे शिफ्ट केले फक्त आईच्या आग्रहाने बाबांनी आमच्या कुलस्वामीनीची कालिकामातेची तस्बिर दारावर ठेवली....
ती रात्र आमची शितलदर्शन मधली शेवटची रात्र होती दुसऱ्या दिवशी आम्ही नविन जागेत राहिला जाणार होतो...
त्या रात्री आम्ही झोपलेलो असताना बाबांना कोणीतरी डिवचत आसल्या सारखे वाट्ले,
म्हणून उठून पाहिले तर एक म्हातारी बाबांना डिवचत होती व रागा रागाने बघत होती, बाबा घाबरले पण स्वतःला सावरत त्यांनी आम्हा सगळ्यांवर हात ठेवला व त्या म्हातारी वर ओरडले व तीला चालते होण्यास सांगितले...
त्या म्हातारी ने आम्हाला मारण्याचा पण केला होता पण बाबा पण हट्टाला पेटले होते....
ते तिच्या शी तावातावाने भांडत होते...
तिच्यावर ऒरडत होते..
तिला शिव्या देत होते...
ह्या सगळ्या आवाजात आईला जाग आली व ऊठून तिने जे दृष्य पाहिले त्याने तिची गाळण झाली...
त्या म्हातारीने आई कडे मोर्चा वळवला...
ती आईला सारखी दरवाज्यावरची देवीची तस्बीर काढायला सांगत होती, व बाबा तीला आडवत होते...
म्हातारीला भिती दाखवत होते...
ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा पहिला कोंबडा अरवला तेव्हा ती म्हातारी गायब झाली व आई-बाबा आम्हाला घेऊन कळव्याला आले...
त्या नंतर आई-बाबांनी परत कधीच त्या इमारती कडे वळून पाहिले नाही....

आजही जेव्हा मी वाड्यावर जातो तेव्हा लांबून ती इमारत बघतो...
ती तशीच भकास अजूनही उभी आहे !!!!

आपला,

(भुताड्या) विशुभाऊ





मी दिपाली तुमचासाठी एक कथा लिहिलेय. कथेच नाव आहे पुन्हा एकदा...

नमस्कार मित्र मैत्रिणिनो , मी दिपाली तुमचासाठी एक कथा लिहिलेय.
कथेच नाव आहे पुन्हा एकदा
आजची सकाळ राहुल साठी खूप उत्साही होती कारण तो आज
त्याचा मनातली गोष्ट माधवी ला सांगणार
होता त्याला तसा अंदाजा होता कि त्याला निराश नाही होयला लागणार
आणि मग खूप नटून थाटून स्वारी चालली office ला नेहमीचा stop लागला पण
माधवी कुठेच दिसेना त्याला वाटल असेल कदाचित college ला सुट्टी म्हणून
आली नसेल त्याने तिला sms केला आणि नेहमीच्या बस मध्ये जावून
बसला आणि त्याला आठवायला लागली माधवी ची आणि त्याची पहिली भेट ,
नेहमी सारखीच बस मध्ये खचून गर्दी तरीपण राहुल ला फिकीर नाही कारण
त्याला मस्त खिडकीची जागा मिळाली होती तो मजेत headphone लावून
गाणी ऐकत होता गाडी गच्च भरलेली आणि अचानक त्याचा लक्ष गेल
एका मुलीकडे एकदम निरागस चेहरा वय फारतर १७ ते १८ असेल
बिचारी जेवडा जमेल तेवढा प्रयत्न करत होती इतरांचा स्पर्श वाचवण्याचा पण
असफल होत होती राहुल बारकाईने तिचाकडे बघत होता तेव्हा त्याचा लक्षात
आल कि ती जास्त पाठच्या माणसापासून वाचण्याचा प्रयंत्न करतेय
जो गर्दीचा फायदा घेऊन तीचाशी जास्त जवळीक साधत होता ते बगून राहुल च
स्त्री दाक्षिण्य जाग झाल आणि त्याने स्वत उठून
तिला जागा दिली जागा मिळताच माधवीला तात्पुरत जग जिंकल्या सारख वाटल
आणि राहुल ला त्याच जग मिळाल्या सारख वाटल. एकाच बस मधून प्रवास,
नेहमीच दिसन , हळू हळू एकमेकांसाठी जागा राखून ठेवण , मग कधीतरी चहा , मग
लंच आणि मग… हळू हळू फुलत जाणार प्रेम , पण कधीच व्यक्त न केलेलं म्हणून
आज राहुल एकदम ठरवूनच आला होता कि आज
माधवीला प्रेमाची कबुली द्यायची आणि नवीन सुंदर आयुष्याला सुरुवात
करायची , पन हे काय आज तर माधवी आलीच नाही … असेल काहीतरी, sms
तर केलाय बघूया कधी येतो reply
आता मात्र हद्द झाली , कधीही college ला सुट्टी न घेणारी मुलगी अचानक ७
दिवस येत नाही म्हणजे काय फोन नाही sms नाही समजायचं तरी काय… जाव
का तिचा घरी तस एकदा लांबून तीन घर दाखवलं होत मग काय कराव जाव
कि नको … अजून २ दिवस वाट पहावी का … नको जाऊयाच आज…
हो ना हो ना करता शेवटी राहुल आला त्या वाडीत जिथ माधवीचा छोटस घर
होत. तिथे पाउल टाकताना त्याला खूप विचित्र वाटत होत पण शेवटी प्रेम
आणि माधवीचा निरागस चेहरा त्याला घेऊन गेला तिथे आणि पाहतो तर काय
घराला भल मोठ्ठा कुलूप …. आणि आजू बाजूला भरून राहिलेली ती विचित्र
शांतता … राहुल मनाचे तर्क करत बसला गावी गेली असेल का , बाहेर
गेली असेल का …. पण जर गावी गेली असेल तर न सांगता नाही जाणार
आणि असाच विचार करता करता त्याला एक म्हातारी जाताना दिसली त्याने
तिला विचारले कि या घरातली माणसे कुठे गेली आहेत
ती म्हातारी आधी त्याचाकडे टक लावून बघत बसली आणि क्षणभर राहुल
ला ती नजर ओळखीची वाटली पण त्याने तो विचार झटकून
टाकला आणि तिला परत त्या घरातल्या माणसांबद्दल विचारले
आणि त्या म्हातारी ने सांगितलेली हकीकत ऐकून त्याला पायाखालची जमीन
सरकल्याचा भास झाला आणि त्याला कळून चुकले कि त्याचे जग
फुलण्या आधीच उध्वस्त झाले … अस काय सांगितलं त्या म्हातारीने ……
म्हातारी ने सांगितले आर बावा ती लोक खोली सोडून गेली कायमची पोर जळून
मेली न त्यांची मग कशी राहतील या घरात … सकाळची वेळ हुती र पोर
बापासाठी डबा बनवत होती स्टोव न पेट घेतला आणि पोरी ला पन पेटवली लय
धावाधाव केली, पण पोरिन २ दिवसात हस्पितलात जीव सोडला मी हुते न तिथ,
मरताना कोन्चतरी नाव घेत होती … राहुल राहुल म्हणून ….
ती लोका गेली पोरा आता हित कोण न्हाय तू जा आपला तुझा वाटन …… राहुल
खरच सुन्न झाला होता मारताना सुद्धा माधवीचा ओठी आपल नाव होत म्हणजे
आपण काय गमावलं याच त्याला गणितच मांडता येत नवत त्याच बधिर अवस्थेत
तो कधी घरी आला आणि कधी बेडवर झोपला त्यालाच नाही कळल
आणि त्याला जाग आली ती एका मंजुळ हाकेन हो हो नक्कीच हा आवाज
आपल्या माधविचाच तीच हाक मारतेय … माधवी माझी माधवी कुठे आहेस ग तू ये
न माझाकडे नाहीतर मी वेडा होईन ग, अक्षरशहा राहुल वेड्या सारखाच ओरडत
होता flat असल्यामुळे आजू बाजूच्या लोकांना काही कळल नाही … ओरडून
ओरडून दमला आणि परत झोपला आणि त्याला स्वप्न पडल हो त्याच्याच
माधवीच ती त्याला कळवळून सांगत होती कि राहुल माझा घरी ये
मला तुला काहीतरी सांगायचं आणि अचानक तिने पेट घेतला आणि तिची राख
झाली राहुल ताडकन उठून बसला पण त्याचा कानात तेच तिचे स्वर बोलत होते
कि "राहुल माझा घरी ये मला तुला काहीतरी सांगायचं"
राहुल सकाळी उठला थोडा फ्रेश झाला आणि तो विचार करत
बसला कि माधवी ने तर मला घरी यायला सांगितलाय पण मी कस जाऊ
तिचा घराला तर कुलूप आहे आणि दिवस उजेडी कुलूप फोडलं तर लोक
मला पकडतील मग शेवटी त्याने निर्णय घेतला कि रात्री जायच आणि गुपचूप
कुलूप फोडून आत जायचं आणि मग पुढे काय याच उत्तर त्यालाही माहित नवत
त्याला फक्त त्याच्या माधवीची ती स्वप्नातली इच्छा पूर्ण
करायची होती घरी जाण्याची....
रात्री ११. ३० ला राहुल परत त्या घरापाशी आला सोबत आणलेल्या अवजाराने
कुलूप तोडलं आणि आश्चर्य म्हणजे एवड भक्कम कुलूप तोडायला त्याला २
मिनिट पण लागले नाहीत आणि तो आत गेला आणि अचानक चित्रपट
पाहावा तशी दृश्य त्याचा डोळ्यासमोरून सरकायला लागली
माधवीची लगबग चालली होती डबा बनवायची बाबांची आवडती ची भाजी बनवत
होती ती पोळ्या तर कधीच झाल्या होत्या तिचे बाबा प्रातर्विधी साठी गेले होते
घरात सावत्र आई होती आणि तिचा उडान टप्पू भाऊ होता जो लौकिका अर्थाने
माधवीचा मामा होता तिची आई आणि मामा गप्पा मारत बसले
होती आणि माधवी बिचारी सकाळ पासून काम करून मेटाकुटीला आली होती पण
तरीही ती काम करत होती तिचा लाडक्या बाबा साठी आणि हो मनातल्या मनात
एक हुरूप होताच तिच्या राहुल ला भेटायचा प्रत्यक्षात कधीच बोलन झाल
नाही पण तिलाही राहुल च प्रेम समजल होत आणि त्याच आशेवर ती आनंदाने
जगायला लागली होती भाजी करून झाल्यावर तिने स्टोव बंद
केला आणि ती अंघोळीला गेली, तिची अंघोळ झाल्यावर ती बाहेर आल्यावर
तिची आई अंघोळीला गेली नुकतीच
न्हायलेली माधवी गुलाबाचा फुलासारखी टवटवीत दिसत होती आणि तोच
टवटवीत पणा तिला घातक ठरला तिचा त्या घाणेरड्या सावत्र मामाची नजर
तीचावर पडली अनासाये घरात कोणीच नवत बहिण अंघोळीला गेलेली तो त्याने
डाव साधायचा ठरवला गुपचूप दाराला कडी घातली आणि मागून येउन
माधवी ला पकडली अचानक झालेल्या या प्रकाराने माधवी गडबडली आणि तिने
सुटण्याचा प्रयत्न केला, इकडे राहुल ची घालमेल चालली होती पण तो तर
जखडायला सारखा हलुच शकत नवता,
तो असहायतेने पाहत बसला जे जे घडतंय ते
माधवी खूप घाबरून गेली होती आणि मामा ला विनवत
होती कि मामा मी तुला मुली सारखी आहे आणि तो नराधम फिदी फिदी हसत
म्हणाला मधु मी फक्त नर आणि मादी हेच नात मानतो मुकाट्याने तयार
हो नाहीतर मला जबरदस्ती करावी लागेल माधवी ने खूप धडपड केली पण
ती त्या दणकट नाराधमासमोर हतबल ठरली आनि अचानक तिला कुठूनस बळ
आल …… तिला आठवला तिचा राहुल, नाही मी माझा राहुल ची आहे
त्याचाशिवाय मला कोणी हात नाही लाऊ शकत या विचाराने तिने एकदम
मामाचा पोटात कोपर मारलं आणि तो कोलमडून पडला ती धावत धावत बाहेर
पडायला लागली पण त्याने तिला परत पकडलं आणि या वेळी त्याचा हातात चाकू
होता आणि धडपडी मध्ये निरागस स्वप्न पाहणाऱ्या माधविचा पोटाला तो चाकू
चिरत गेला आणि तिचा श्वास मंद झाला तेव्हा तिचा सावत्र मामा भानावर
आला आणि त्याला त्याची चूक कळून आली पण तेव्हा उशीर
झाला होता माधवीच श्वास मंद झाला होता आणि समोर आ वासून
उभी होती तिची सावत्र आई …….
दोघा बहिण-भाऊ ना कळत नवत काय कराव माधवी चे
बाबा कधीही येण्याची शक्यता होती पटकन तिच्या सावत्र आई
ला कल्पना सुचली तिचे स्टोव माधवी वर रिकामा केला शांतपणे
तिला माचीसची काडी लावली आणि जेव्हा आग जास्त
भडकायला लागली आणि धूर बाहेर जायला लागला तशी तिने आरडा ओरडा चालू
केला कि माझा लेकीला वाचवा हो …पण वेळ तर निघून गेली होती लोक
जमा झाली पटापट तिचा अंगावर पाणी मारायला सुरुवात केली गोंधळ ऐकून
रस्त्यावर गप्पा मारत बसलेले माधवीचे बाबा धावत आले आणि समोरच दृश्य
पाहुन बेशुद्ध झाले,माधवीला लगेच हॉस्पिटल ला हलवण्यात आल.
भाऊ बहिणीने रचलेल नाटक चांगल वटल होत लोकांचा असाच समज
झाला होता कि जेवण करताना माधवी जळून मेली. ज्या घरात
लाडक्या लेकीचा आठवणी पदोपदी होत्या त्या घरात बापाला राहवत नवत मग
ती मंडळी घर सोडून निघून गेली … रात्रीचा १ वाजला होता आणि राहुल भानावर
आला तेव्हा त्याला दिसल्या फक्त रिकाम्या खोल्या पण त्याला सगळ समझल
होत कि त्याचा माधवीचा बळी घेतला गेला होता तो तिथच धाय मोकलून रडू
लागला आणि अचानक त्याला भास झाला माधवीचा हो ती तीच होती त्याचा कडे
असहायतेने पाहत उभी होती पूर्ण भाजलेली त्याचा अंगाचा थरकाप उडाला तिने
त्याला हाक मारली राहुल …. मी तुझी माधवी आहे …
माझा या रूपाचा तिरस्कार नाही करणार न रे … क्षणभर राहुल
विसरला कि माधवी मेली तो आनंदाने ओरडला आणि म्हणाला माधवी माझ खूप
प्रेम आहे तुझावर चल माझाबरोबर मला तू कशीही दिसलीस असलीस तरी चालेल
पण आता मला सोडून नको जाऊ
माधवी ला हे ऐकून खूप वाईट वाटले कि किती प्रेम करतो हा माझावर पण
मी आता याची नाही होऊ शकत, कधीच नाही, तिने एक
उसासा टाकला आणि ती म्हणाली राहुल मी तुझाबरोबर येन आता शक्य
नाही पण मला मुक्ती मिळवून देन तुला शक्य आहे हे ऐकून राहुल भानावर
आला आणि तिला म्हणाला माधवी मी तुझासाठी जीव द्यायला पण तयार
आहे….
माधवी - तुझा जीव घेऊन मला मुक्ती नाही मिळणार राहुल उलट मेल्यावर
सुद्धा मी नरकयातना भोगेन
राहुल - मग सांग ना मधु मी काय करू?
माधवी - एका अटीवर सांगेन ,
राहुल - कोणती अट ,
माधवी - मला मुक्ती मिळाल्यावर तू तुझ आयुष्य आनंदाने पुन्हा एकदा सुरु
करायचं जर हे वचन देत असशील तरच मी तुला माझा मुक्तीचा मार्ग सांगेन
राहुल - नाही मधु हे शक्य नाही तुझाशिवाय जगन हि कल्पनाच मी सहन
नाही करू शकत , माधवी - मग ठीक आहे जा इथून निघून मी इथेच तडफडत
राहीन कायमची नको करू मला मदत मुक्तीसाठी जा निघून जा ,
राहुल - नाही नाही मधु मी तुझ एकेन मी मी करेन आयुष्याला नवीन सुरुवात पण
तू मला सांग मला तुला तडफडत राहिलेली नाही बघायची मी तुला वचन देतो …
हे ऐकल्यावर माधवीचा चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं आणि तिने सांगितलं
त्या नराधम भाऊ बहिणीला माझा समोर इथे घेऊन ये त्यांना मारल्याशिवाय
माझा आत्म्याला शांती नाही मिळायची. माझी सावत्र आई खूप धोरणी आहे
ती लोक आता गावाला राहत आहेत मी तुला पत्ता देते मी त्यांना तिथेही जावून
मारू शकले असते पण आधीच तिने त्या घरात मंतरून घेतलाय त्यामुळे मला तिथे
जाने शक्य नाही त्यामुळे तू त्यांना इथे घेऊन ये, राहुल ने मान
डोलावली आणि क्षणात माधवी दिसेनाशी झाली राहुल बाहेर
आला आणि कडीला ते कुलूप अडकवून ठेवले जेणेकरून कुलूप लावलेले आहे
असा लोकांना भास व्हावा आणि राहुल घरी येउन झोपी गेला
सकाळी राहुल जागा झाल्यावर त्याला त्याचा उशाशेजारी एक कागद
भेटला त्यावर माधवीचा गावाचा पत्ता होता राहुल फ्रेश झाला आणि तडक बस
पकडून माधवीच्या गावाला पोचला थोडीशी विचारपूस केल्यावर
त्याला एका मुलाने तिचा घराजवळ आणून सोडले घराच्या बाहेर खाटेवर माधवीचे
बाबा बसले होते खूप खंगला होता तो माणूस आणि लेकीचा अकाली जाण्याने
थोडासा वेडसर पण झाला होता राहुल चा आवाज इकडून माधवीची आई
आणि तिचा तो मामा बाहेर आले राहुल सर्व काही आधीच ठरवून आला होता
मामा - कोण वो पावन तुम्ही ?
राहुल - मी राहुल , माधवीचा मित्र मी एक insurance agent आहे माधवीने
माझाकडे insurance काढल होत ५ लाखाचं आणि त्याला नॉमिनी म्हणून
तिचा बाबांना ठेवलं होत मला कळाल कि माधवीचा जळून मृत्यू झाला मग
तिचा बाबा ना ५ लाख मिळू शकतात फक्त तिचा बाबांना माझा सोबत याव लागेल
पण त्याची परिस्थिती पाहता तुम्ही पण त्यांच्या सोबत आलात तर चालेल
हे एकूण भावाबहिणीचे डोळे चमकले … ५ लाख …. अबबबब एवडी मोठी रक्कम
…पैशासाठी हपापलेली त्यांची मने हा हि विचार नाही करू शकली कि college
मध्ये शिकणाऱ्या माधवी कडे ५ लाखाचा insurance काढण्यासाठी पैसे कुठून
आले, पैसा माणसाचे डोके फिरवतो हेच खरे … ती दोघ आनंदाने
माधवीचा बाबांबरोबर यायला तयार झाली त्याच दिवशी दुपारी सगळे निघाले
बस मध्ये राहुल ने सांगितले कि insurance ची एक
कॉपी मी माधवीला दिली होती ती बरोबर घेतलीत का तर माधवीचा मामा मधेच
म्हणाला अवो पावन मधु ने insurance काढलेला सुदिक आम्हाला माहित
नवता मग कापी कसली घेणार वो …हे ऐकल्यावर राहुल म्हणाला माधवीने
मला सांगितलं होत कि तिने मी तिला दिलेली कॉपी घरात कुटेतरी ठेवलेय
तुम्ही म्हणता तुम्हाला माहित नाही म्हणजे ती कॉपी घरातच असली पाहिजे
आपण एक काम करू आधी घराकडे जाऊ तुमच्या ती कॉपी घेऊन मग पुढचे
सोपस्कार पार पाडू … घराकडे जायच म्हटल्यावर माधवीचा आई
ला धडकी भरली पण ५ लाखाचा प्रश्न होता त्यामुळे
ती काही बोलली नाही बरोबर रात्री ११ वाजता मंडळी घराशेजारी पोचली पण
घराला कुलूप आणि चावी तर आणलेली नाही पण तो प्रश्न राहुल ने
सोडवला तो बोलला सगळी झोपलेत कुणाला कळणार आहे आपण कुलूप फोडलं तर
आणि तस पण तुम्ही घराचे मालक आहात त्यामुळे जरी कोणी बघितलं
तरी हटकनार नाही……. पण तिथे भरून राहिलेल्या विचित्र शांततेमुळे
माधवीचा आई ची पाचावर धारण बसली होती ती म्हणाली आता नको आपण
उद्या दिवसा येऊ नी हे सगळ करू …… राहुल - अहो पण
काकी मला उद्याचा सकाळी फॉर्म देयचा आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे
उद्या जर सकाळी सकाळी नाही दिला तर ५ लाख विसरा तुम्ही,
हे ऐकून भावाने बहिणीला समजावले आणि राहुल ने 1 घावातच कुलूप फोडले
( कुलूप आधीच फोडले होते त्यामुळे 1 घावातच काम आटोपले ) दार सताड
उघडल आणि राहुल भावा बहिणीला बोलला तुम्ही दोघ आता जाऊन कागद शोधून
आणा मी इथेच थांबतो बाबांजवळ ……… आणि आश्चर्य म्हणजे दोघंही कुरकुर
न करता आत जायला तयार झाली
आत आल्यावर दोघांनी कागद शोधायला सुरुवात केली ते दोघ शोधाशोधी मध्ये
इतके मग्न झाले होते कि दार हळू हळू बंद झालाय याकडेही त्याचं लक्ष नवत
मधेच मामा ला न्हाणीघरात आवाज ऐकायला आला त्याने ताई ला विचारलं कि तू
आवाज ऐकलास का तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता मामाने ती बघत
असलेल्या दिशेने बघितलं तर ती दाराकडे बघत होती जे बंद होत आणि पूर्ण
अळ्याने भरून गेल होत घाणेरड्या वळवळनाऱ्या अळ्या ज्यामधून खूप
घाणेरडा वास येत होता आणि तेवढ्यात न्हानिघरातला आवाज
मोठा झाला आणि पाण्याबरोबर हुम्म्म हुम्म्म असा विचित्र आवाज पण येऊ
लागला …… मामा पण खूप घाबरला होता पण तरी सुद्धा तो धीर करून
न्हानिघराचा दिशेने गेला जाता जाता त्याचा पायाशी काहीतरी वळवळल त्याने
खाली बघताच त्याला दिसले केस, जे लांब होते आणि आपोआपच वळवळत होते
तो गेल्यापावली परत आला आणि बघतो तर काय त्याची बहिण
भिंतीला एका जागी जखडल्या सारखी उभी होती आणि चारी बाजूनी तिचा अंगावर
अळ्या, पाली, झुरळे चढत होती तिचा तोंडातून शब्द फुटत नवता ती असहायतेने
भावाकडे बघत होती आणि अचानक तिचे डोळे मोट्ठे झाले इतके कि वाटल
आता फुटतील कारण तिने बघितलं भावाचा मागून कुणीतरी रांगत येत होत पूर्ण
जळालेल कुणीतरी, आणि अचानक रांगण संपवून ते जे कोणी होत ते उभ राहील
मामा पण बहिणीचा बाजूला ढकलला गेला दोघंही आता line मध्ये
उभी होती आणि त्यांचा समोर होती माधवी ……. पूर्ण जळलेली ……
दोघांच्या जाणिवाच बधिर झालेल्या …… अंगावरून किडे फिरतायत याची पण
त्यांना शुद्ध नाही उरली
दोघानाही वाटत होते कि जे चाललाय ते एक स्वप्न आहे पण या त्यांचा भ्रमातून
माधवीने त्यांना बाहेर आणलं आणि जेव्हा सत्य
परिस्थिती कळली तेव्हा त्यांना वाचा फुटली दोघही दयेची भिक मागायला लागले
आणि एकमेकावर आरोप ढकलायला लागले पण माधवी कुणालाच
क्षमा नवती करणार कारण तिचा स्वप्नांचा चक्काचूर
केला होता त्या दोघांनी आणि तिचा बाबांना आणि राहुल ला एकट केल होत…….
माधवीचा जळालेला चेहरा खूपच भयानक दिसत होता तो चेहरा बघूनच दोघ
अर्धमेली झाली अचानक दोघांच्या शरीरावर अपोआप ओरखडे उमटायला लागले
जस काही कोणीतरी त्यांचावर चाकू चालवताय त्या दोघानाही वेदना सहन होत
नवत्या आणि माधवी एकदम विकट हास्य करत होती आणि म्हणत होती अशाच
वेदना झाल्या होत्या मला, मी भोगल आता तुम्ही दोघ भोगा आणि अचानक
त्या दोघांना त्यांचं शरीर ओलं झाल्यासारख वाटलं रॉकेल चा वास येऊ
लागला आणि बघता बघता दोघांच्याही शरीराने पेट घेतला आणि काही वेळाने
तिथे उरली फक्त राख आणि माधवीच समाधानच हसू ……
आणि आता वळूया आपला कथानायक राहुल कडे
ज्या क्षणी ती दोघ घरात शिरली त्याच क्षणी राहुल माधवीचा बाबा ना घेऊन
आपल्या flat वर गेला……. त्याने माधवीला वचन दिल्याप्रमाणे
तिला मुक्ती मिळवून दिली आणि नवीन आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात पण
केली, ते सुद्धा माधवीचा बाबांची जबाबदारी घेवून …….
कशी वाटली कथा नक्की सांगा … all comments are appreciated
positive and negative also..