Saturday, May 31, 2014

Abhijeet Shinde लिहतोय...

Abhijeet Shinde लिहतोय...

" माझा मित्र ठाण्यामध्ये राहतो..

माझ्या मित्राचे वडील एकदा जव्हार इथे गेले होते. निघताना रात्री उशीर झाला.. खरंतर ते निघणार नव्हते, पण दररोजचा दिनक्रम असल्याने त्यांना निघावे लागले..

जाव्हारवरून ठाण्याला येताना वाटेत घनदाट जंगल लागते.. त्यातल्यात्यात तो रस्ता लूटमारीसारख्या दुर्घटनांसाठी कुप्रसिद्ध आहे. तरीही ते यायला निघाले..

वाटेत वाहनचालकाने गाडी थांबवली, आणि लघुशंकेसाठी तो थोडा दूरवर गेला..

झोप येऊ नये, म्हणून त्याने डोळ्यांवर पाणी मारले.. इतक्यात त्याचे लक्ष सामोर गेले.. त्याला एक पंढरी आकृती दिसली.. त्यांना वाटले डोळ्यावर पाणी मारल्याने काही चमकत असावे.. त्यांनी लक्ष नाही दिले... इतक्यात मित्राच्या वडिलांनाही तशीच काहीशी पांढुरकी आकृती दिसली.. [गैरसमज नका करून घेऊ.. रस्ता फार लांब, मोकळा आणि सरळ आहे..] त्यांना ती आकृती जवळ येत असल्यासारखे दिसले.. त्यांनी चालकाला ताबडतोब गाडी पळवायला सागितले..

चालकाने बेरोकठोक गाडी पळवायची सुरुवात केली.. इतक्यात एक भयानक गोष्ट झाली... चालकाच्या असे लक्षात आले, कि गाडीच्या मागे काहीतरी पळत आहे.. त्यांच्याकडे गाडी पळवण्या व्यतिरिक्त काहीही पर्याय शेष नव्हता.. त्यांनी तसेच केले..

काकांनी मागे पहिले, तर उंच धिप्पाड असा काहीतरी गाडीच्या मागे पळत होतं, पुढेही तसच काहीतरी दिसत होतं.. काकांनी गाडीचा वेग कमी करायला लावला.. कारण अस म्हणतात कि, खैसाची टक्कर झाली, तर धातूसुद्धा मोडून जातात.. मागेही एकजण पाठलाग करतोय.. पुढे एकजण वाटेत झोपलाय.. चालकाला जायला मार्ग दिसेना... इतक्यात त्याने एक युक्ती केली... त्याने गाडी चक्क फुटपाथवर चढवली...

आणि पुन्हा वेग वाढवून त्या खैसांना Overtake केल.. म्हणून आज त्यांचा प्राण वाचला..

आजही ते आम्हाला हीच गोष्ट सांगताना दरवेळी नवीन उलघडा करतात.."





No comments:

Post a Comment