Saturday, May 31, 2014

आज ची कथा ही खूप भयानक तर आहेच पण त्या पेक्षाही खूप विचित्र आहे

आज ची कथा ही खूप भयानक तर आहेच पण त्या पेक्षाही खूप विचित्र आहे . तुम्हाला कदाचित ही कथा अजिबात पटणार नाही पण १०० टक्के खरी आहे म्हणून आम्ही post करायचं ठरवल . बघा पटल तर घ्या नायतर द्या सोडून . 

रोहित काळे
ही गोष्ट साधारण १० ते १५ वर्षापूर्वीची. आताच काही दिवसान पूर्वी आईने मला सांगितली .
ही घटना माझ्या आईच्या माहेरी घडली होती . पोन्धवाडी , इंदापुर तालुका , पुणे जिल्हा .
भिगवण जवळ पोन्धवाडी एक छोटस गाव आहे. त्या गावात एक जोडप रहात होत . 'सोनबाई आणि बाळासाहेब.'

सोनबाई , खुप गरीब ,कष्टाळू , माणुसकी पण खुप होती तिच्या जवळ . बाळासाहेब, तिचा नवरा, तो हि अगदी तिच्यासारखाच , अगदी तिच्या सारखाच …
लग्नाला नुकतच वर्ष पूर्ण झाल आणि घरात पाळणा हलणार असल्याची खबर मिळाली . घरात अगदी आनंदी आनंदच ……

आता तिचे महिने भरत आले होते . तिला नवर्याने माहेरी पाठवले .
तिला आई नव्हती ,तिच्या वडिलांनी आणि तिच्या विधवा आत्याने तिची काळजी घेतली होती .
बाळंतपाणात पण त्यांनीच काळजी घेतली .

अखेर तो दिवस उजाडला आणि तिच्या पोटी मुलगा जन्माला आला . पहिल्या बळाणपणातच मुलगा तो हि एवढ्या गरिबीत , म्हणून सगळे जामच खुश होते

तो मुलगा १५ दिवसांचा झाला आणि एक विचित्र घटना घडली .

त्या सोनबाई ची आत्या पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली . पाणी भरत असताना तिचा हंडा त्या विहरीत पडला .
तिला पोहायला येत नसल्यामुळे तो हंडा तिने काढायचा प्रयत्न केला नाही . ती अशीच घरी आली आणि हंडा विहरीत पडला हे सांगू लागली .
हे ऐकताच आताच बाळांतीन झालेल्या सोनबाईच्या मनात काय आले कुणास ठाऊक ?
भर दुपारच्या वेळी ही सोनबाई उठली आणि तडातडा चालत त्या विहिरी च्या दिशेने निघाली . शेतात गेली आणि त्या विहरीत उडी मारून तो हंडा घेऊन घरी आली . तिची आत्या हे बघून चाटच पडली .
एक तर हि बाळांतीन बाई आणि विहरीवर गेली , जर हिला काही झाल तर मोठी पंचाईतच. तिला थोडा संशय आला पण वाटल हा तिच्याच मनाचा खेळ आहे अस काही नाहीये ; म्हणून तिने या कडे दुर्लक्ष केल .

त्याच रात्री एक विचित्र घटना घडली . सगळे गाढ झोपेत होते . सोनबाई कोणाशी तरी बोलत बोलत उठली . आणि भर रात्री १२ वाजता त्या विहरीच्या दिशेने निघाली .
विहारीजवळ गेली आणि चक्क तिने विहरीत उडी टाकली . जरा पोहली आणि परत घरी आली . घरी येउन कपडे बदलले आणि झोपली . आत्याने हे सर्व गुपचूप बघितल पण काही न बोलत ती तशीच झोपी गेली .
हे सलग १० दिवस असच चाल्ल .
आता मात्र तिच्या आत्याला राहावल नाही . तिने त्या सोनबाई ला विचारल "एवढ्या रात्री विहरीत का पोहतेस , त्या लहान मुलाचा तरी काही विचार कर . "
अस म्हंटल्यावर सोनबाईने आपले डोळे मोठे केले , तिच्या डोक्यातून रक्त येत होते . सोनबाई ने तोंड उघडल तर तिच्या तोंडातूनही रक्त येत होत .
हे बघून आत्या खूप घाबरली आणि तिला म्हणाली " जा तुला काय करायचं ते कर ". एवढ म्हणताच सोनबाई शांत झाली . आपल्या मूळ स्वभावात येउन शांत होऊन झोपी गेली .

हा दिवस आमवस्येचा होता . खर तर ती सोनबाई झोपली नव्हती . ती तर योग्य वेळ येण्याची वाट पाहत होती . ती काहीतरी विपरीत करणार याची चाहूल तिच्या आत्याला लागली होती . पण तिची आत्या पण त्या गोष्टी समोर हतबल होती .

आता चांगलीच मध्यरात्र झाली होती. सगळीकडे स्मशान शांतता होती . हवेत अचानक गारवा निर्माण झाला . सोनबाई झोपेतून ताडकन उठली .
आत्या सगळ लपून पाहत होती हे त्या सोनबाईच्या लक्षात आले नाही . आत्या बारीक नजर ठेऊन तिच्या हालचाली टिपत होती .
' त्या चिमुकल्या कडे ती सोनबाई विचित्र नजरेने बघायला लागली . तो चिमुकला गाढ झोपला होता . सोनबाई ने त्याला उचलले . त्याला आपल्या अंथरुणात गुंधाळले आणि त्यावर बसून जोरजोरात हसू लागली . '
हा प्रकार आत्याने गपचूप पहिला . ती हे बघून किंचाळणारच होती कि तिने लगेच आपला हाथ तोंडावर ठेवला . सोनबाई मोठ्याने हसतच होती . थोड्या वेळाने सोनबाई शुद्धीवर आली आणि परत झोपी गेली .

आत्याने तेव्हाच ठरवल कि उद्याच हीचा सोक्ष मोक्ष लावायचा . आत्याने सकाळीच एका तांत्रीकाला बोलावल .

तो तांत्रिक घरी यायच्या आधी त्या सोनबाई कशीतरी ही खबर मिळाली . ती तशीच घर सोडून तिच्या सासुरवाडीला गेली . पण तीला मध्येच काय झाल काय माहित ? ती सासुरवाडीला घरी न जाता सासुरवाडीला लागून एक जंगल होत . त्या जंगलात एक वडाच झाड होत. ती त्या झाडावर ४-५ दिवस लपून बसली. ती वडाच्या झाडाच्या अगदी टोकाला होती . तिला एका गुरख्याने ओळखल , तिला कस तरी खाली उतरवल . आणि तिला तिच्या सासरी सोडण्यात आल .

पौर्णिमेची रात्र होती त्या रात्री . सोनबाईच्या अंगात जे काही पिशाश्च घुसल होत त्याला आता रक्ताची तहान लागली होती . ती आता घरातल्या माणसांकडे रक्त मागत होती . पण कोण तिला रक्त द्यायला तयार होइना . घरतल्यांना कळून चुकल होत कि हीला नक्कीच पिशाश्च बाधा झाली आहे . त्यामुळे ते हिला जबरदस्ती मांत्रिका कडे घेऊन जायला निघाले .
ती आता मजबूत हट्टाला पेटली . कोणी रक्त देत नाही म्हंटल्यावर तिने घरातील लाकडे तोडायची कुऱ्हाड घेतली आणि स्वताचच शीर धडापासून वेगळ केल .हा प्रकार बघून घरातल्या सगळ्यांची पाचावर धारणाच बसली .
पण हा प्रकार खूपच वेगळा निघाला . तिने स्वतच शीर उडवलं खर पण रक्ताचा एक थेंब पण उडाला नाही . सगळ रक्त शरीराच्या आतल्या आतच थांबल होत .
पोलिसांनी तिची dead body ताब्यात घेतली . तिच्या Post-mortem report तर या पेक्षा हि भयानक निघाला . Post-mortem report ने सांगितल कि हि तर १५ दिवसा अगोदरच मरण पावली होती .

हे ऐकल्यावर माझाही विश्वास बसला नाही . पण त्या सोनबाई चा नवराच हे स्वतः सांगतो म्हणून विश्वास बसतो





No comments:

Post a Comment