Sunday, May 31, 2015

मराठी साहित्य


एक कथा मी वाचली आणि ती मला फार आवडली पहा तुम्हाला ती आवडते का ते एक माणूस एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी अन एका भूताचे राज्य होते. दोघेही आपापल्या राज्याच्या वेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते. वाट चुकलेल्या माणसाला बघून परी म्हणाली अरे मी ओळखते ह्याला! लहान पणी मी ह्याच्या स्वप्नात जायचे, हा खूप खूप आनंदून जायचा मला बघून! मग आम्ही खूप खूप खेळायचो, नाचायचो खूप खूप भटकायचो. हा तर अगदी हट्टच करायचा तू जाउ नकोस म्हणून. मला आठवतंय सगळं त्यालाही आठवेल! तो ओळखेल मला नक्कीच! मला वाटतं माझ्याच शोधात आलाय तो इथे. मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील. त्याला माझ्या राज्यात नेईल, त्याला छान सगळीकडे फिरवील. मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. आम्ही खूप खूप मज्जा करू. भूत म्हणले, मी ही ओळखतो ह्याला. मी ही जायचो ह्याच्या लहानपणी ह्याच्या स्वप्नात. तेव्हा हा खूप घाबरायचा मला, अगदी थरथर कापायचा, मला बघून ह्याला भर थंडीतही दरदरून घाम फुटायचा ह्याला कधी कधी तर दचकून झोपेतून उठायचा, मग पांघरुण ओढून गुडुप झोपायचा प्रयत्न करायचा. परी म्हणाली, तुझं असंच रे तूला सगळेच घाबरतात, तो काही केल्या तुझ्या जवळ यायचा नाही. भूत म्हणाले, नाही! तसं होणारच नाही. तो माझ्या राज्यातून पुढे जाऊच शकणार नाही . परी म्हणाली, नाही! नाही तो नक्कीच येईल तू बघच. त्याला खूप खूप आवडायची रे मी! भूत म्हणाले, ती फार जुनी गोष्टं तेव्हा तो फार लहान होता. आता तर त्याला तू आठवणार ही नाहीस. परी म्हणाली, आठवेल आठवेल त्याला सगळं! किती किती गोड होतं ते सगळं! ते रम्य बालपण! त्या गोष्टी विसरतो काय कुणी? भूत म्हणाले, तुला वाईट वाटेल पण तो तुला विसरलाय हे नक्की. आता तर तो तुझ्यावर विश्वास सुद्धा ठेवणार नाही. परी म्हणाली, मग तो तुझ्या राज्यात काय म्हणून येईल तो तुलाही विसरला असणार ना? तो काय म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवील? भूत म्हणले, तसं होत नाही कधीच तो मला नक्कीच ओळखेल तो मला विसरणार नाही कधीच. परी म्हणाली, तो मला ही विसरणार नाही, बघ तू आता कशी आठवण करून देते त्याला तू बघच. माझा निर्माता आहे विश्वास. विश्वास कधीच खोटा ठरायचा नाही! तू बघच तो मला नक्कीच ओळखेल, लावतोस पैज! भूत म्हणाले, पैज नको लाउस कारण मला चांगला अनुभव आहे तू नक्कीच हारशील. परी म्हणाली, नाही माझा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही, तूच घाबरतो आहेस पराभवाला! म्हणून टाळतो आहेस ना? भूत म्हणाले, ठीक आहे बघ प्रयत्न करून. परी म्हणाली, सांग मी जिंकली तर काय देशील? भूत हसले आणि म्हणले, जर तू जिंकलीस तर मी तुला माझे पूर्ण राज्य देऊन टाकील, अन मी कायमचा ह्या जगातून निघुन जाईल. बघ हं! परी म्हणाली, वेळेवर शब्द फिरवायचा नाही. नाही फिरवणार! भूत म्हणाले. मग परी ने विश्वासाची आराधना केली, अन तिने गोड आवाजात गाणे म्हणणे सुरु केले, पक्षी ही आपल्या गोड गळ्याने तिला सुरात साथ देऊ लागले. परी ने मग हळू हळू नाचायला सुरवात केली. वारा मंद मंद शीळ वाजवून तिला साथ देऊ लागला, पानांची सळसळ सुरु झाली. आनंदानी झाडे अन वेली ही डोलू लागली. फुलांनी आपल्या पाकळ्या पसरायला सुरवात केली.वातावरण प्रसन्न होऊ लागले माणूस ही आनंदी होऊ लागला. परी ने मग मनातल्या मनात दुप्पट जोमानी विश्वासाची आळवणी केली, आता सूर्याने वनावर आपली किरणे फेकली त्या किरणात माणसाला परी चे सोनेरी केस तिचे सुंदर डोळे दिसू लागले, हळूहळू त्याला तीची पूर्ण आकृती दिसू लागली. परी आनंदून गेली तिने त्याच्या स्वागता साठी हात पसरले. माणसाला स्वता:च्या डोळ्या वर विश्वासच बसेना. भ! भ! भूत!! त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. अचानक आकाशात ढग भरून येऊ लागले, विजांचा कडकडाट सुरु झाला, सूर्य ढगांच्या आड लपून गेला, अंधारून येऊ लागले, सोसाट्याचा वारा सुरु झाला, झाडे कडाकडा मोडून पडू लागली, माणूस भयानी घामाघूम झाला, त्याची दातखीळ बसली अन तो कोसळून गतप्राण झाला. सर्व काही शांत झाले. परी धावतच माणसा जवळ गेली अन रडू लागली. ती भूताला म्हणाली, तूच जिंकलास. नेहमी तूच का रे जिंकतोस. मला सगळे का विसरून जातात? भूत ही खिन्न झाले, त्यानी परीच्या खांद्या वर थोपटले. ते म्हणाले हे असंच होतं.नेहमीच! तुझा निर्माता आहे विश्वास, माझा निर्माता आहे भय. विश्वास काय अन भय काय हे ह्याच्याच डोक्यातून जन्म घेतात. हाच आपला मुळ निर्माता आहे, आपले वेगळे अस्तित्व नाही. पण! पण! पण काय? परी म्हणाली. हा मोठा झाला होता. अन जसा जसा माणूस मोठा होत जातो ना तसा तसा त्याचा विश्वास कमी होत जातो, पण! पण भय मात्र वाढत जातं. म्हणूनच मी जिंकतो. पण तू उदास नको होऊस, माझा शब्द अजून कायम आहे जेव्हा ही विश्वासाचा विजय होईल ना त्या दिवशी मी खरंच हे जग नेहमी साठी सोडून जाईल. भूत म्हणले. (समाप्त) धन्यवाद लेखक : - जयनित दिक्षित

तो एकदम विक्षिप्तपणे हसत होता.

नमस्कार, माझे नाव विकी चेंदवणकर आहे. मी वेंगुर्ला शहरातील उभादांडा या गावात राहतो. मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक सत्य घटना सांगू इच्छितो. ही घटना साधारणपणे ३ वर्षांपुर्वी मी आणि माझ्या मित्रांसोबत घडलेली आहे. अशी घटना ज्या घटनेने मला आणि माझ्या मित्रांना मुळापासून हादरवून सोडले. तर आता वेळ न दवडता मी कथेला सुरुवात करतो. मी नुकतीच १० वीची परिक्षा दिली होती. ते दिवस सुट्टीचे असल्यामुळे माझे २ मित्र सुट्टीत मज्जा करण्यासाठी गावी आले होते. अक्षय आणि सुमित. त्यांपैकी अक्षय हा माझ्यापेक्षा १ वर्षांनी मोठा होता, तर सुमित हा ५ वर्षांनी मोठा असून तो मजबूत बांध्याचा होता. ते गावी आल्याआल्या पहिले माझ्या घरी आले मला भेटायला. मी त्यांना त्या रात्री माझ्याच घरी रहायला सांगितले, कारण आम्ही पार्टी करायचा बेत आखला होता म्हणून. त्या दिवशी रविवार होता आणि माझे खास मित्र घरी आले होते म्हणून मी घरी चिकन करायला सांगितले. आम्ही सर्वांनी जेवन आटोपले. सर्वांचे जेवून होईपर्यंत साधारण रात्रीचे १०.३० वाजले. आमचे घर मोठे असल्यामुळे आम्ही वलईत झोपायची तयारी केली. अंथरुन वगैरे घालून झाल्यावर आम्ही गप्पागोष्टी करत बसलो होतो. गप्पागोष्टी करता- करता आमचा बीअर पिण्याचा मुड झाला. बीअरचे दुकान तसे जवळच होते. मी माझी बाइक काढली. आम्ही ३घे बसलो आणि थेट बीअरच्या दुकानात गेलो. आम्ही प्रत्येकी २-२ बीअर घेतल्या, सोबत उकडलेले चणे, वेफर्स वगैरे घेऊन आम्ही घराच्या दिशेने निघालो. आमच्या घराच्या जवळच एक शेतमळा होता. आम्ही ३ घांनी पण तिथेच बीअर पिण्याचे ठरवले. आम्ही सर्व सामान घेऊन मळ्यात गेलो आणि एक चांगली जागा शोधून तिथे प्यायला बसलो. एव्हाना रात्रीचे ११.३० वाजले होते. मळ्यात सगळीकडे चांदणे पडले होते. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. त्यात आवाज येत होता तो फक्त रातकिड्यांचा. आम्ही लगेच बीअर उघडून १-१ घोट मारला. वाह...... काय मज्जा येत होती बीअर प्यायला. आम्ही मस्तपैकी गप्पागोष्टीं मारत बीअर ढकलत होतो. मळ्यात मस्त वारा सुटला होता. त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असूनपण उकाडा जाणवत नव्हता. हळूहळू बाटलीमधली बीअर संपू लागली होती आणि अगदी तशीच आम्हाला हळूहळू नशा चढत होती. मला तशी बिअर प्यायची सवय असल्यामुळे मला तेवढी नशा झाली नव्हती पण अक्षय मात्र फुल टल्ली झाला होता. आमच्या गप्पागोष्टी चालू असताना मी मध्येच भूतांचा विषय काढला. तेही मला भूतांच्या गोष्टी सांगण्याचा आग्र करु लागले. आमचे गाव तसे पहायला गेल्यास भूता- खेतांनी भरलेलेच आहे. आमच्या गावी भरपूर वाईट जागा, म्हणजेच भूतांचे वास्तव्य असलेल्या जागा आहेत. तसे म्हणाला गेलात तर माझे गाव एक ’Haunted place' च आहे. मी त्यांना आता भूतांबद्दल सांगू लागलो आणि तेही मोठ्या उत्सुकतेपणे ऐकू लागले. तसे बघायला गेलात तर आमच्यामध्ये भित्रा असा कोणीच नव्हता. सुमितचा तर भूत-प्रेत यांसारख्या गोष्टींवर तर अजिबात विश्वासच नव्हता तरीपण उत्सुकतेपायी तो ऐकत होता आणि तेही एकदम मन लावून. मी त्यांना आमच्या घराजवळच असलेल्या एका जागेबद्दल सांगण्यास सुरुवात केली. तिथे एका बाईचा वास आहे. तसे बघायला गेलात तर ती जागा माझ्या घरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. तर मी त्यांना त्या जागी राहणा- या त्या बाईविषयी सांगू लागलो. तिचे ज्या जागी वास्तव्य आहे त्या जागी एक पिंपळाचे भलेमोठे झाड आहे आणि बाजूलाच बसण्यासाठी एक कट्टा आहे ज्याला आम्ही मुस म्हणतो. मी त्यांना सांगितले की ती जागा एकदम भयावह आहे. त्या जागी एका बाईच्या आत्माचा वावर आहे तोही खुप वर्षांपासून. पौर्णिमा असो की अमावस्या, ती बाई कधीपण दिसते. तिने अनेक लोकांना त्रास दिला आहे. त्या रस्त्यावरुन जाणा- या वाटसरुंना ती बाई हमखास दिसतेच दिसते किंवा झपाटते तरी. मी जे सांगत होतो ते अक्षय याला पटत होते, पण सुमित याला पटत नव्हते. त्याने सरळ-सरळ तू पकवत आहेस असे मला म्हणाला. मी मग त्याला त्या बाईचा एक किस्सा सांगितला. खुप वर्षांपुर्वी त्याच रस्त्यावरुन १ जोडपे जात होते. त्यावेळी साधारणतः रात्रीचे १ वाजले होते. ते जोडपे बाइकवरुन आपल्या घरी जात होते. तर झाले असे, जो बाइक चालवत होता त्याला त्या जागी पांढरी साडी नेसलेली बाई दिसली. ती बाई रस्त्याच्या कडेला, त्याच पिंपळाच्या झाडाखाली ती उभी होती आणि दाखवत होती. त्या बाइक चालवणा- याला कळून चुकले की हे नक्कीच भूत आहे आणि आता आपले काही खरे नाही. तो त्या बाईच्या साधारण १० मीटरच्या अंतरावर होता की अचानक त्या बाईने लिफ्ट्साठी जो हात पुढे केला होता, तो हळूहळू लांब होत होता. त्या माणसाची बायको त्याच्या पाठीमागे बसली होती. त्यामुळे त्या माणसाने मागे परत न फिरण्याचा निर्णय घेतला आणि बाइकचा स्पिड वाढवला. इथेतर त्या बाईचा हात लांबच होत चालला होता. आता तर त्याची बाइक त्या बाईच्या एकदम जवळ आली होती. अचानक त्या बाईचा हात एकदमच लांब झाला आणि तिने बाइअकच्या मागे बसलेल्या त्या माणसाच्या बायकोचे सरळ केसच पकडले. तीचे केस पकडून तिला पाठीमागे ओढले. ओढताच क्षणी त्याची बायको पाठच्यापाठी रस्त्याव खुप जोरात आदळली आणि तिचे डोके फुटून जागच्या जागी ती मेली. त्या माणसाचाही बाइकवरचा ताबा सुटून गंभीररित्या अपघात झाला. त्या माणसाच्यापण डोक्याला इजा होऊन तो तिथेच बेशुद्ध पडला. त्याला नंतर दवाखान्यात नेण्यात आले ( कोणी नेले, कधी नेले, कसे नेले याबद्दल काहीच माहिती नाही). त्याचे यशस्वीपणे ऑपरेशन झाले आणि त्याला नविन जीवनदान मिळाले. पण त्या घटनेमुळे तो आपल्या अर्धांगिणीला म्हणजेच आपल्या बायकोला कायमचा गमवून बसला होता. ही गोष्ट मी जेव्हा अक्षय आणि सुमितला सांगितली, तेव्हा अक्षय त्या जागी जाण्यासाठी फार उत्सुक झाला. "मला आत्ताच्या आत्ता त्या जागेवर घेऊन चल", असा तगादाच त्याने माझ्या मागे लावला. मी त्याला सांगितले की, आत्ता ह्यावेळी त्या जागी जाणे हे धोकादायक आहे आणि तुमची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मी तुम्हाला त्या जागी नाही घेऊन जाऊ शकत. हे ऐकताच सुमित जोरजोरात हसू लागला. त्यांना मी जे काही सांगितले, ती सुमितला एक कथाच वाटत होती. सुमित मला बोलला की, तु जे काही आता सांगितलेस ते जर खरे आहे, तर मला त्या जागी घेऊन चल आणि तेही आत्ताच्या आत्ताच. माझ्याकडे तो हट्टच धरु लागला. मी खुप आढेवेढे घेऊन शेवटी त्या जागी त्यांना नेण्यास तयार झालो. त्यावेळी रात्रीचे जवळपास १ वाजला होता. मी माझी बाइक घरीच ठेवून आलो होतो. बाइकने जायचे ठरविले असते तर बाइकच्या आवाजाने घरातील सर्व मंडळी जागी झाली असती. म्हणून आम्ही तिथे जाण्यासाठी चालतच निघालो. मी रस्त्यावरुन जाताजाता घरावर १ ओझरती नजर टाकली. घरातील सर्व लाइटस बंद करुन सर्वजण झोपले होते. आम्ही आमच्या घराजवळून गुपचुप निघालो. बीअर्ची नशा अजुन थोडीफार बाकी होती, म्हणून मला तशी भीती वाटत नव्हती. आम्ही आता चालत-चालत main रस्त्यावर पोहोचलो होतो. कुत्रे आमच्याकडे बघून जोरजोरात भुंकत होते. त्यांच्या भुंकण्याचा कर्कश आवाजामुळे माझे काळीज अजुन जोरजोरात धडधडू लागले. त्यातच त्या बाईच्या कथा आठवून अजुन भीती वाटत होती. भीती तर मनातून खुप वाटत होती, पण सुमित काही केल्या ऐकणारा नव्हता. तसा तो होताच धीट. अक्षयचा स्वभाव जवळजवळ माझ्या स्वभावाशी मिळता- जुळता होता. त्यालापण भीती वाटत होती, म्हणून तो माझा हात धरुन चालत होता. पण सुमित मात्र बिंधास चालत होता. आमच्यासोबत आता काय घडणार आहे, ह्याची त्यालाच काय, आम्हाला पण पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. आम्ही जाणून-बुजून मृत्यूच्या दाढेत पाय ठेवायला जात होतो. म्हणतात ना वेळ आली की मती बिघडते आणि बुद्धी भ्रष्ट होते. तशीच आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मला आता जाम भीती वाटत होती आणि स्वतःचा रागदेखील येत होता की, का म्हणून ह्यांना मी ती कथा सांगितली. काय गरज होती मला भूताचा विषय काढायचा? आता पुढे नक्की काय घडणार? काय होणार? असे असंख्य प्रश्न माझ्या मनाला भेडसावत होते. आम्ही रस्त्यावरुन चालतच होतो. त्या जागेवर पोहोचायला आम्हाला अजून ५ मिनिटे तरी लागणार होती. रस्त्यावर चिटपाखरु देखील नव्हते. आम्ही तसेच त्या भयाण अंधारात पुढे-पुढे चालत होतो. माझ्या मनात अजूनही विचारांचा कल्लोळ चालूच होता. एव्हाना ते पिंपळाचे झाड लांबूनच दिसू लागले होते. लांबूनच ते झाड एकदम विचित्र आकार-विकार असलेले आणि भयानक वाटत होते. माझी भीतीने तर मजबूतच फाटली होती. मी सुमितला सांगितले की तु ते झाड इथुनच बघ. मला खुप भीती वाटत आहे. आपण आता घरी जाऊया चला. पण तो माझे काहीही ऐकून घेतच नव्हता. त्याला बघायचेच होते की पिंपळाच्या झाडाखाली नक्की कोण आहे ते.... तो मला बोलू लागला की, तू १ नंबरचा भित्रा आहेस. आता गप्प चल त्या पिंपळाच्या झाडापर्यंत. मी असताना तु कशाला घाबरतोस. मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. हे ऐकून अक्षयने लगेचच पैज लावून टाकली की, तु जर कोणाला घाबरत नाहीस ना, तर तु एकटा त्या पिंपळाच्या झाडाजवळ जा आणि त्याच्या पारावर निदान २ मिनिटे तरी बसुन ये. जर तु असे केलेस तर लगेच मी तुला ५०० रुपये देईन. हे ऐकून सुमित जाम खुश झाला आणि लगेच त्याने ती पैज स्विकारुन पिंपळाच्या झाडाच्या दिशेने जाण्यासाठी एकटाच निघाला. मी आणि अक्षय मात्र तिथेच थांबलो. आम्ही जिथे थांबलो होतो तिथुन ते पिंपळाचे झाड ५० ते ७० मीटर अंतरावर तरी असणार. सुमित एकटाच त्या झाडाच्या दिशेने चालत जात होता आणि जसा तो पुढे-पुढे जात होता तसा-तसा तो रस्त्यावरील लाईटच्या उजेडात अंधुक दिसत जात होता. एव्हाना सुमित झाडाजवळ पोहोचलादेखील होता. तिथले एवढे काही स्पष्ट दिसत नव्हते. फक्त सुमितची अस्पष्ट अशी काळी सावली दिसत होती. तो नेमका तिथे ऊभा राहून काय करत होता, हे काही कळायला मार्ग नव्हता. इथे मी भीतीने खूप घामाघुम झालो होतो, कारण मी त्या भूताचे बरेच किस्से ऐकले होते. त्या बाईच्या भूताने आतापर्यंत ब-याच जणांना त्रास दिला होता. त्यामुळे मला १००% खात्री होती की सुमित बरोबर पण नक्कीच काहीतरी विपरित घडणार, पण तसे काही वाईट घडू नये म्हणून मी मनोमन देवाकडे प्रार्थना करत होतो. आम्ही सुमितच्या येण्याची वाट बघत होतो. सुमित त्या झाडाखाली काय करत आहे, हे काहीच दिसत नव्हते. एवढ्यात सुमितला यायला पाहिजे होते, पण तो येण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. १५ मिनिटांच्या वर वेळ होऊन गेली होती. इतक्यात त्याची काही हालचाल होताना दिसली. त्याची आकृती हळूहळू मोठी होत होती. तो आमच्या दिशेने येत होता. तो आमच्या जवळ आला, मोठमोठ्याने हसू लागला आणि म्हणू लागला की, मी पैज जिंकलो. चला आता मला माझे बक्षीस द्या. तो बोलत असताना मला त्याच्या वागण्यातील फरक स्पष्टपणे जाणवत होता. तो एकदम विक्षिप्तपणे हसत होता. त्याचे हसणे एकदम असुरी प्रकारचे वाटत होते. त्याच्या नजरेत एक प्रकारची कृर भावना दिसून येत होती. हा जो आता आलेला तो अगोदरचा सुमित नव्हता. नक्कीच त्याच्याबरोबर काहीतरी वाईट घडले होते, हे कळायला मला वेळ लागला नाही. त्याने ठरल्याप्रमाणे अक्षयकडे ५०० रुपये मागितले, पण अक्षयने त्याला पैसे देणार नाही असे मस्करीमध्ये बोलला. हे ऐकताच त्याला खुप राग आला आणि तो मोठ्मोठ्याने हसू लागला. त्याचे डोके आता लालभडक दिसत होते. तो बोलला, "चालेल, तुम्ही मला माझे पैसे देत नसाल तर मी आता तुम्हालाच घेऊन जाते", असे म्हणत त्याने जवळच्या कुंपणातला एक बांबू काढला आणि काही कळायच्या आतच त्याने त्या बांबूने अक्षयच्या मांडीवर जोरात प्रहार केला. प्रहार एवढ्या जोरदार होता की, अक्षय खालीच कोसळला. मी समझलो होतो की त्याला भूतानेच झपाटले आहे. मला त्या वेळी काहीच कळत नव्हते की काय करु आणि काय नको ते? माझे डोके अगदी सुन्न झाले होते. मी अक्षयला उचलण्याचा प्रयत्नच करत होतो. एवढ्यात सुमितने माझ्यावर पण प्रहार करण्याचा प्रयत्न केला. त्याने मला मारण्यासाठी बांबू उचलला, पण मी त्याचा तो वार चुकवला. तरीही त्याचा वार माझ्या हाताला लागलाच. मी लगेच रस्त्यावरची धूळ उचलली आणि सुमितच्या डोळ्यात फेकली. त्याला आता काही दिसत नव्हते तरीपण तो म्हणत होता की, " मी आज तुम्हा दोघांना मारुन टाकणार, सोडणार नाही तुम्हा दोघांना." त्याचा तो आवाज एकदम भयानक होता. त्याचा तो आवाज आता एखाद्या बाईप्रमाणे येत होता. आम्ही आता दोघेही सर्व शक्तीनींशी पळत होतो. आमच्या दोघांची आता मागे वळून पाहण्याची हिंम्मत पण होत नव्हती. आम्ही तसेच कसेबसे धावत घरी आलो आणि दरवाजा उघडून लगेच अंथरुनावर झोपलो. घरात आतल्या खोलीत सर्वजण झोपली होती. आम्ही दोघेही काही बोलण्याच्या मनःस्थिती नव्हतो. काही केल्या आमच्या काळजाचे ठोके काही कमी होत नव्हते. ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. अक्षयच्या पायातून रक्तपण येत होते. माझ्या हातातून पण थोडेफार रक्त वाहत होते. पण भीतीपोटी आमच्या वेदना कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. त्या क्षणी आम्हाला कुठल्याच वेदना जाणवत नव्हत्या. जाणवत होती ती फक्त भीती. डोळ्यासमोर तो सुमितचा भयानक चेहरा फक्त दिसत होता आणि कानात गुंजत होता तो फक्त मारुन टाकण्याचा त्याचा तो विचित्र बाईसमान भयानक आवाज. मनात विचारचक्र चालू होते. फक्त सुमितचाच विचार मनात येत होता. काय झाले असणार त्याचे? कुठे असणार तो? काय केले असेल त्या भूताने आता त्याचे? असल्या प्रश्नांनी मला तर अगदी भेडसावून सोडले होते. मी प्रथमच असा अनुभव घेतला होता. मला मनापासून सुमितची मदत करण्यासाठी तिथे पुन्हा जावे असे वाटत होते, पण भीतीमुळे माझे हातपायच गळून पडले होते. शरीरात त्राणच उरले नव्हते. घामाने पुर्ण शरीर ओलेचिंब झाले होते. मी चादर डोक्यावर ओढून झोपलो होतो. चादर डोक्यावरुन काढून बाहेर बघण्याची पण माझी हिंम्मत होत नव्हती. पण सुमित माझा मित्र होता. काही केल्या मला त्याला वाचवायचे होते. मला सुमितची मदत करायला जायला पाहिजेच होते. मी माझ्या मनात विचार पक्का केला की आज काहीही होऊ दे, मी माझ्या मित्राला सुमितला मृत्युच्या दरव सोडवून आणणारच. देवाकडे मी प्रार्थना केली की माझ्या सुमितला त्या भूतापासून वाचव आणि पुर्ण ताकदीनिशी मी माझ्या तोंडावरील चादर बाजूला केली आणि अक्षयला उठविले. तोही जागाच होता. त्याला मी हे सर्व सांगून सुमितला आणण्यासाठी अक्षयला घेऊन घराबाहेर पडलो. किती वाजले होते ते पण आम्हाला माहीत नव्हते. मी देवाचे नाव घेऊन माझी बाइक काढली आणि सुमितला आणण्यासाठी आम्ही पडलो. आम्ही पुन्हा यमराजाकडे स्वतःहून निघालो होतो याची मला पर्वा नव्हती. माझे डोळे फक्त सुमितलाच शोधत होते. आम्ही आता त्या झाडाजवळ पोहोचणारच की इतक्यात मला सुमित बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेला आढळून आला. मी तिथेच बाइक लावली. पण त्याच्याजवळ जाण्याची हिंम्मत होत नव्हती. शेवटी मी त्याच्या जवळ गेलो आणि नक्की तो बेशुद्धच आहे ना याची खात्री करुन घेतली. त्याचा श्वास चालू होता आणि नाडीचे ठोकेही चालू होते. आम्ही दोघांनी त्याला कसेबसे उचलून बाइकवर बसविले आणि त्याच अवस्थेत त्याला घरी आणले. त्याला घरी आणून कसेबसे अंथरुणावर झोपवले. मला आणि अक्षयला काही केल्या झोप येत नव्हती. कशीबशी आम्ही जागे राहून पुर्ण रात्र काढली. पहाटेच्या सुमारास थोडीशी डुलकी लागली आणि उठलो तो थेट सकाळी १० वाजताच. उठून बघितले तर बाजूला फक्त अक्षयच झोपला होता. मला अचानक काल घडलेल्या घटनेविषयी अचानक आठवले. मला पुन्हा काहीच सुचेनासे झाले. काल रात्री माझ्यासोबत हे सर्व घडले यावर अजुनही विश्वासच बसत नव्हता. मला ते एक वाईट पडलेले स्वप्न वाटत होते. पण जसे माझे लक्ष हाताला झालेल्या त्या जखमांकडे गेले तस मला कळले की ते स्वप्न नसून खरच काल माझ्यासोबत घडले होते. मी काहीसा विचार केला आणि अक्षयला पण उठविले. आळस देत तोही जागा झाला. आम्ही दोघे एकमेकांच्या चेह-याकडे बघत बसलो आणि नंतर आम्ही सुमितकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुमित आपल्या मामाकडे रहायला आला होता. त्याचे घर तसे जवळच होते. आम्ही लगेच तयारी केली आणि सुमितकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही सुमितच्या घरी पोहोचलो. तो तयारी करुन माझ्याच घरी यायला निघाला होता. आम्ही त्याला घेऊन गार्डनमध्ये गेलो. कारण काल त्याच्यासोबत काय-काय घडले होते ते सर्व मला जाणून घ्यायचे होते. आमही काही वेळेतच गार्डनमध्ये पोहोचलो. आम्ही सर्व बेंचवर बसलो आणि त्याला काल घडलेल्या घटनेविषयी विचारले, पण त्याला काल काय घडले हेच आठवत नव्हते. मी त्याला जरा नीट आठवायला सांगितले. त्याने थोडा त्याच्या मेंदूवर ताण दिला आणि त्याने आम्हाला सांगितले की जेव्हा तो त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचला आणि त्या झाडाच्या पारावर बसला तेव्हा त्याला इतर गोष्टींत जसे घडते, तसेच नेमके त्याच्यासोबत घडू लागले. त्याला त्यावेळी वातावरणात एकदम बदल जाणवू लागला. त्याच्या आसपास कोणीतरी आहे असा त्याला भास होऊ लागला. अचानक त्याला कोणा बाईचा हसण्याचा आवाज येऊ लागला, पण त्याला आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. तो हसण्याचा आवाज एकदम भयानक वाटू लागला. त्यानंतर तो हसण्याचा आवाज अचानक रडण्यामध्ये रुपांतरित झाला. तो आवाज एवढा भयंकर होता की त्या आवाजाने सुमितच्या काळजाला चिरुनच टाकले होते. एवढ्या धीटपणे वागणा- या सुमितचा धीटपणा कुठल्याकुठे पळून गेला होता. आता त्याचे हातपाय थरथरु लागले होते. थंड वारा सुटलेला असतानाही तो घामामुळे पुर्ण न्हाऊन गेला होता. त्याचे शरीर एकदम थंड पडले होते. तरीपण तो तशाच अवस्थेत कोण आहे? कोण आहे तिथे? असे विचारत होता, पण तो रडण्याचा आवाज काही थांबत नव्हता. त्याच्या आजुबाजुला पण कोणीच दिसत नव्हते. तो आवाज वाढतच चालला होता. त्याला फक्त आपल्या भोवती कोणीतरी आहे असा भास होत होता. सुमितला आता कळून चुकले होते, की तो आता एका पिशाच्चाच्या तावडीत सापडला होता. ज्यातून त्याची सुटका होणे शक्य नव्हते. तो तिथून पळायचा प्रयत्न करत होता, पण त्याला कोणीतरी अडवत होते. अशी कोणतीतरी शक्ती होती जी त्याला ति हलायला पण देत नव्हती. तो तेथून पळ काढण्याचा खुप प्रयत्न करत होता, पण तो काही केल्या तेथून हलत नव्हता. त्याची सर्व शक्ती व्यर्थ जात होती. ४-४ जणांना भारी पडेल असा मुलगा, आज साधा जागेवरुन त्याला त्याचा पायदेखील उचलता येत नव्हता. तो कर्णकर्कश आवाज वाढतच चालला होता. आता त्याचे कान फुटायची पाळी आली होती. आणि त्यानंतर जे काही घडले ते त्याच्यासाठी तर खुपच भयंकर होते. त्याला आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे असे वाटले, म्हणून त्याने मागे वळून पाहिले तर त्याच्या पाठीमागे पांढ-या साडीत १ बाई ऊभी होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते. तिच्या चेह-यावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. चेहरा पुर्ण पांढरा फटिक पडला होता. ठिकठिकाणी साडी फाटलेली होती. डोक्यातून रक्त वाहत होते. तिचे डोके एकदम लाल- लाल होते. एकूनच तिचे रुप हादरवून टाकणारे होते. ती हळूहळू सुमितच्या दिशेने येत होती. त्यानंतर पुढे कय घडले ते सुमितला काहीच आठवत नव्हते. त्याच वेळी नेमके भूताने त्याच्यावर झडप घातली होती. तो बेशुद्ध पडला होता. त्याला त्या भूताने आपल्या वशमध्ये केले होते. बस एवढेच सुमितला माहित होते. त्यानंतर जे काही घडले ते मी त्याला सविस्तरपणे सांगितले. ते सर्व ऐकून तर त्याची हवाच टाईट झाली. त्याने माझे ऐकले असते तर आज ही वेळच आली नसती. त्याने नंतर त्याबद्दल माझी माफीपण मागितली. नंतर मी त्याला घेऊन जवळच्याच गावातल्या एका साधूबाबांकडे घेऊन गेलो. त्यांनी सर्व काय प्रकार आहे ते ओळखले. उतारा करुन त्यांनी एक धागा गळ्यात बांधायला दिला. तेव्हापासून त्याला भूतांपासून कसलाच त्रास झाला नाही. आता त्याचे लग्नपण झाले आहे. कधी कधी तो गावी येतो आणि त्या जुन्या ही घडलेली घटना फक्त आम्हा तिघांनाच माहित आहे. पण जेव्हा- जेव्हा ही घटना मला आठवते तेव्हा- तेव्हा अंगावर शहारे येतात. ही स्टोरी लिहिताना पण अंगावर आता शहारा येत आहे. आता त्या जागी ते झाड नाही आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कारणाने ते भलेमोठे झाड आता तोडण्यात आले आहे. झाड तोडल्यानंतर तिथे कधीच कोणाला ती बाई परत दिसलीच नाही. आता तिथे ते पिंपळाचे झाड पण नाही आहे आणि नाही त्या बाईचे भूत. कधीतरी तेथून जाताना ते झाड आठवते आणि घडलेला तो प्रसंग डोळ्यासमोर येतो. आणि सर्व आठवणी ताज्या होतात. आयुष्यात अशा काही घटना घडून जातात की त्यामुळे आपण त्या गोष्टी आयुष्यभर कधीच विसरु शकत नाही. ही घटना माझ्या हृदयात कायमची कोरली गेली आहे आणि ती मी कधीच विसरु शकणार नाही
माझ नाव रुपाली - मी मुंबईत राहते - आणि इथे जास्त भुतांच्या गोष्टी ऐकायला सुधा मिळत नाहीत किवा आपण हि कधीतरीच असे विषय काढतो . शहरी भागात भूत आता फक्त पुस्तक आणि आणि आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टीन मधेच उरली आहेत . पण याहून हि एक वेगळे जग आहे . भूत आहेत आणि माझा त्यांच्या वर विश्वास आहे . कारण जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती . माझ्या साबोत घडली आहे जेव्हा मी ८ वीला शिकत होति. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या कि मजा करण्यासाठी माझ्या आईच्या गावी म्ह माझ्या आजोळी मालवण ला जायचो . आज्जीचे घर तसे जुन्या काळातलेच होते. खूप मोठे , समोर छोटीशी बाग , आणि बाजूला गुरांचा वाडा . आणि त्यात भरपूर गाई आणि बैल होते. आम्ही मुंबईचे म्हटल्यावर मुलांची मजा दिवस भर बागेत खेळायचो , मामाने गाईचे दुध काढायला शिकवले . आणि खूप दंगा मस्ती सुधा करायचो . त्यावर्षी हि आम्ही उन्हाळ्यात तिथे गेलो होतो . पण यावेळी आम्हाला घरच्या मोठ्या माणसांनी गु जाऊ नको असा कडक आदेशच दिला होता . तिथे लहान मुलांना जाण्यास बंदी केली होती . म्हणून मी आजीला त्या बद्दल विचारले तर तिने सांगितले कि गेल्या ६ महिन्यापासून जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो . २ दिवसात मरतो . आणि त्यामुळे गाई सारख्या हंबरत असतात आणि माणूस तिथे गेला कि त्याला शिंगणे मारायला येतात . म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका . तेव्हाही वाड्यात २० गाई होत्या . आणि त्या दिवशी अजून एक बछडा जन्माला आला . आम्ही मुल आनंदी झालो पण तो आनंद फार काळ टिकला नाही . कारण सकाळी तो बछडा मृत अवस्थेत वाड्यात पडला होता. आता सहन शक्ती संपली होती मामाने आजीला सांगितलं कि हे काही साध सुध नाही आहे . नक्कीच काहीतारी भयानक आणि अमानवीय घडतंय आपण मांत्रिकाला बोलावून पूजा करून घेवूयात . मांत्रिक आला आणि जसा त्याने त्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश केला तसा त्याला विचित्र अनुभव आला . तो लगेच बाहेर पडला आणि म्हणाला उद्या बुधवार आहे उद्या सकाळी सकाळी मी इथे येती आणि काय करायचं ते बघतो . दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता तो मांत्रिक आला . मी हि जागीच होते कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे हे मला सुधा जाणून घ्यायचे होते . तो आधी गुरांच्या गोठ्यात , मग बागेत आणि नंतर विहरी जवळ गेला त्याच्या हातात एक काठी होती . विहरी जवळून तो पुन्हा गोठ्यात आला . थोडा वेळ तो त्या गोठ्यात तसाच डोळे बंद करून उभा राहिला . आणि नंतर घरी आला आणि आजीला सांगितले . हे प्रकार साधेसुधे नाहीत बछडे मारत आहेत कारण तुमच्या गुरांच्या गोठया शेजारी जे झाड आहे त्यावर एक भयानक पिशाच्च आहे आणि त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत . तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारले मग गाई का मरत नाहीत फक्त बछडे का मरतायत . त्वः तो म्हणाला प्रत्येक पिशाच्च नवीन जीवनाला तरसलेल असत . त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्यानचे तो प्राण घेतोय . तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक पूजा घातली कि सगळ ठीक होईल . त्यामुळे ते पिशाच्च तिथून निघून जाईल . त्याने सांगितलं कि पूजा आता चालू कृत पूजा संपायला २ दिवस लागतील . त्याने पूजेच्या सामानाची लिस्ट मामाकडे दिली . थोड्याच वेळात मामा ते समान घेऊन परत आला . मांत्रिकाने ९ वाजता पूजा सुरु केली तो कसले तरी विचित्र मंत्र म्हणत होता . ते सुधा जोरात जेव्हा त्याने मंत्र बोलण्यास सुरवात केली तेव्हा ज्या घटना झाल्या त्या कधी प सुधा केला नव्हता . अचानक आमच्या घरावर लहान लहान दगड येवून पडू लागले आणि लगेच थांबले सुधा . आम्हाला वाटल कि कोणी तरी मस्ती करत असेल. पण ५ मिनिटांनी परत पुन्हा तेच झाल लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव होऊ लागला . मामा धावत जाऊन घरावर चढला पण तिथे कोणीच नव्हत . पण तरु सुधा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान लहान खडे पडताच होते ते कुठून येत होते ते कळतच नव्हत . हे तर काहीच नव्हत कारण जसा मांत्रिक मंत्र पुटपुटत होता तसा आता दगडांचा वर्षाव थांबला सगळे घरात येवून पूजेला बसले . पण अचानक घरावर थाप थाप असा आवाज झाला आणि घाण वास सुधा येवू लागला मामाने बाहेर जावून पहिले आणि तो चक्रावला कारण आता घरावर चक्क मानवी मल ( संडास ) येवून पडत होता आणि खूप दुर्गंधी पसरत होती . हे सगळ दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने १२ वाजता थांबवली . मांत्रिकाने सांगितलं जे काही घडतंय ते तो पिशाच्च करतोय पूजेत विघ्न आणण्यासाठी. कोणीही बाहेर पडू नका . मी उद्या येईन परत . त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण खडे आणि वाळू यांचा मधून मधून वर्षाव होतच होता. पण मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव रात्री नाही झाला . दुसरा दिवशी त्याने पूजा सुरु केली आणि पुन्हा तेच होऊ लागले . आम्ही मांत्रिकाला सांगितले कि यावर काही उपाय करा . तेव्हा तो बोलला हे थांबवू शकत नाही ते चालूच राहणार . आणि सांगितले कि त्याच्या खूप दुखतंय जस कोणीतरी काठीने त्याला मारतय असा वाटत होत . पण त्याने पूजा चालूच ठेवली आता दगड मातीचा वर्षाव थांबला होता . पण मांत्रिकाच्या डोळ्यातून पाणी येत होत जस कोणी तरी त्याला खूपच मारतय . ३ वाजता त्याने पूजा आटोपली आणि ३ मंतरलेले खिळे घेतले आणि उठून गोठ्याजवळ गेला आणि एक गोठ्याला आणि दुसरा झाडाला ठोकला . आणि उरलेला १ खिळा त्याने घरच्या उंबरठ्याला ठोकला . आणि तिथेच पडला लोकांनी त्याला उचलले आणि पाणी दिले तो म्हणाला आता ते पिशाच्च तुम्हाला त्रास देणार नाही . त्याने घातलेली बनियन काढली आणि आम्ही पाहून थक्क झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क काठीने खूप मारल्याचे वळ उठले होते . त्याला मामाने उचलून त्याच्या घरी नेले आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते घेतले नाहीत . तो म्हणाला पैशांचा मोह नसलेला बरा . त्या दिवशी पासून त्या घटना बंद झाल्या आणि काही दिवसातच गाई ने परत बछड्या ला जन्म दिला आणि आम्ही सुखावलो . आणि त्याला काही झाल सुधा नाही आवडली असेल तर नक्की प्रतिक्रिया द्य

नमस्कार मित्रानो, कालच माझे काका आजोबा गाव वरून आले . मी स्टोरी लिहत बसलो होतो . ते माझ्या रूम मध्ये आले आणि विचारलं कि काय करतोयस रे मी सांगितलं कि मी भूत प्रेतांच्या कथा लिहतो . लोकांनी सांगितलेले अनुभव लिहतो. ते हसले म्हणाले तू गोष्टी लिहतोस तेव्हा तुला भीती वाटते कारे , मी म्हणालो वाटते कधी कधी पण मजा येते वाचायला . तेव्हा ते गंभीर झाले आणि म्हणाले तू जी मजा वाचून घेतोस न ती एखादा व्यक्ती जेव्हा अनुभवतो तेव्हा त् हालत होते ते तुला माहित नाही. त्यांच्या या बोलण्यावर मी सुधा गंभीर झालो पण कुतुहला पोटी मी त्यांना विचारले काय हो आजोबा तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का . ते पुन्हा हसले आणि म्हणाले मी मनुष्य गणाचा आहे आणि असे अनुभव येणे स्वाभाविक आहे. मग मला राहवले नाही मी त्यांना बोललो आजोबा तुमच्या सो घडलेली एखादी भयानक घटना असेल तर सांगा ना . तेव्हा त्यांनी मला त्यांच्या सोबत घडलेला भयानक आणि अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितला . आणि तो मी माझ्या शब्दात खालील प्रमाणे लिहिला . ते म्हणतात तेव्हा मी २५ वर्षांचा होतो . अंगाने पण असा भरलेला गडी आणि त्या वेळी मला भ नाद होता . अगदी रात्री अपरात्री जरी कुठे भजन असेल मी उठून जायचो . माझ्या कडे तेव्हा एक सायकल होती . तिच्यानेच मी बाजूच्या वाडीत तर कधी दुसर्या गावात भजनाला जात असे . असेच एके दिवशी बाजूच्या गावाला भजनाची बारी होती. मी निघालो माझ्या सोबत जो येणार होता त्याला अचानक ताप आला म्हणून त्याने येणे टाळले . मी आपला एकटाच माझ्या सायकल वरून निघालो १० वाजले होते तिथे पोहचायला मला १ तास लागला भजन सुरु झाले . बारी एकदम भन्नाट रंगली सुमारे ३ तासाने भजनाचा कार्यक्रम आटोपला. सगळे निघाले माझ्या वाडीतून मी एकटाच होतो रात्रीचे २ वाजले होते . मला तशी भीती नाही वाटायची कारण या आधी सुधा मी अनेक वेळा असा एकटा आलो होतो . मी निघालो गावच्या दिशेने १५ मिनिट झाले असतील . अचानक हवेत एक गारवा आला . आणि सायकल च्या वेगा मुळे तो अजूनच जाणवत होता . मी आपला भजन पुटपुटत जात होतो . अचानक मला मागून कोणी तरी हाक मारली . मी दचकलो पण दुर्लक्ष केल मला वाटल भास झाला असेल . आणि परत आपल्या मार्गाला निघालो परत मागून मला हाक आली . या वेळी फार जवळून ऐकायला आली . मला माहित होत कि रात्रीच हाकेला साद द्यायची नसते मी जर जोरात सायकल चालवू लागलो . तशी पुन्हा साद अल्ली ये हरी अरे थांब कि मागे तर बघ मी तसाच वेगाने निघालो . मागे पहिले नाही समोर गावाची सीमा होती आणि बाजूलाच वादाचे झाड होते , मी सीमा ओलांडली आणि मागे वळून पहिले आणि भीतीने कापायला लागलो . समोरच्या वादाच्या झाडावर एक माणसाने स्वताला फास लावून घेतला होता . . मी विचार केला कोण मेल आहे हा अचानक त्या लटक्त्या शरीराचे डोळे उघडले आणि मला कापरी भरली . तो फासावर लटकलेला माणूस मला पाहून हसत होता . आणि अचानक बोलला वाचलास आणि अदृश्य झाला . मी घरी आलो मला ताप भरला होता . तेव्हा पासून मी परत एकता कधीच गेलो नाही आणि तुला पण सांगतो कधीच रात्रीच्या हाकेला ओ देऊ नकोस . मित्रानो स्टोरी आवडली तर लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्य

मी रोहित रामचंद्र भामरे आज मी तुम्हाला खविस बद्दल सांगणार आहे स म्हणतात की हा खविस जर कधी आपल्याला दिसला तर तो आपल्याला त्याच्यासोबत मुष्ठीयुद्ध खेळायला लावतो. जर आपण जिंकलो तर तो नेहमी आपला गुलाम होऊन राहतो किंवा आपली कोणतीही इच्छा पूर्ण करतो . पण जर आपण त्यात हरलो तर आपल्याला तो मारून टाकतो . गावच्या ठिकाणी खाविसाचा वावर जास्त दिसून येतो . पण कधी कधी जरी आपण जिंकलो तरीही तो माणसाला मारून टाकतो . अशीच एक घटना नाशिक मध्ये फार वर्षापूर्वी घडली होती . कोंडाजी पहिलवान हे नाशिकमधले नावाजलेले पहिलवान समजले जात . त्यांनी मोठ मोठ्या पहिलवानांना कुस्तीत धुळ चारली होती . त्यामुळे त्यांचा एक दबदबा कायम झाला होता . ते लवकर कधीच कोणाची मदत घेत नसत , गर्वाने नाही तर हिम्मत आणि जिद्दीच्या जोरावर आणि याच जोरावर त्यांनी लहानपणापासुन कसरत करुन स्वत:च्या कतृत्वाच नाव या शहरात अजरामर केल. त्यांना एक लहान मुलगी होती आणि तिच्यावर ते जीवापाड प्रेम करत असत . तर झाल अस कि 1 एके दिवशी ते रात्री कोणा नातेवाईकांकडे गेले होते . आता पुर्वी काही गाडी वगैरे नव्हती आणि पुर्वी ज्या माणसाकडे सायकल असायची तो माणुस श्रीमंत मानला जाई . पण आता एकढे मोठे कोंडाजी पहिलवान सायकलला त्यांचा भार पेलला गेला नसता म्हणुन ते नातेवाईकांकडे पाई पाई चालत गेले . जेवण वगैरे झाल , ते म्हणाले चला आता निघतो मी जेम तेम 8 वाजले असतील आता निघालो तर 10-10.30 पर्यंत घरी पोहचेन या हिशोबाने त्यांनी निघायची तयारी केली . नातेवाईक म्हणाले दादा थांबा उद्या जावा रात्र झालीय आणि रस्ता खराब आहे , पण त्यांना कोणी अडऊ शकल नाही . पहिलवान निघाले गावाच्या वेशीपासुन थोड लांब एक जंगल आहे जंगलाच्या जवळ आले जरा लघुशंका केली चालु लागले तेवढ्यात त्यांना मागुन आवाज आला काय वस्ताद कुठे निघाले त्यांनी मागे वळुन बघितल तर एक भला मोठा माणुस त्याँच्या जवळ येताना दिसला . हा नक्की काहितरी विचित्र प्रकार दिसतोय . ते म्हटले कोण तुम्ही ? समोरुन आवाज आला कुस्ती खेळणार काय ? जर जिंकलास तर आयुष्यभर चाकरी करेन तुझी . कोंडाजी पहिलवानांना आव्हान दिल ते भडकले आणि लगेच तयार झाले . दोघांमध्ये चांगली कुस्ती रंगली . पहिलवानाला माहित नव्हते कि आपण ज्या गोष्टीचा सामना करतोय ती मानवीय नाही आहे . तरी पण ते लढत राहिले आणि आणि शेवटी त्यांनी त्या खाविसाला ह त्यावर खाविसाने पहिलवानांना शाबाशकी दिली आणि म्हणाला पठ्या. इथे वाचलास पण अजून हि लढाई संपली नाही आहे . एका खाविसाला हरवणे सोप्पे नसते तेव्हा पाहिल्वानाच्या अंगातून एक शिरशिरी उठली आणि त्यांना कळून चुकले हा माणूस नसून खाविस आहे . खाविस त्यांना बघून हसला आणि त्याने पेहलवानाला एक अट घातली की जर घरी जाताना किंवा घरात पोहोचायच्या आत कोणत्याही परिस्थितीत मागे वळुन पाहिल तर तुला प्राण गमवावे लागेल .पहिलवान निघाले कितीही मोठे पहिलवान असले तरी मनात एक छोटी भिती होतीच गावात पोहोचले थोडी भिती कमी झाली , घरापर्यंत गेले अजुन भिती कमी झाली दरवाजा उघडला जीवात जीव आला. त्याने घराचा दरवाजा उघडला आणि पाय टाकणार तेवढ्यात त्याला मागून त्याच्या मुलीचा जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायचा . तिचा जोरात रडण्याचा आणि हाक मारण्याचा आवाज आला . आणि क्षणाचा हि विलंब न करता त्यांनी मागे वळून पहिले . आणि जसा तो पेहलवान मागे वळला जागीच मुंडकी धडापासुन वेगळी होउन जमीनीवर कोसळली. कारण मुलीच्या आवाजात खाविसानेच आवाज दिला होता आणि अट पूर्ण नाही केली म्हणून पेह्ल्वानाला मृत्यू आला . अस म्हणतात खविस जेव्हा एखाद्याला झपाटतो त्या आधी तो त् लक्ष ठेवून असतो . तो त्यांच्या कुटुंबातील माणसांचे आवाज आत्मसात करतो . आणि हाक देताना सुद्धा कुटुंबातील सदस्याचा आवाज तो काढतो जेणेकरून . आपण मागे वळून पाहावे . जर असा कधी अनुभव आला तर एक सावध गिरी बाळगा कि एक तर रात्रीच्या वेळी आवाजाला साद देवू नका मागे वळून पाहू नका . तो तुमच्या पुढे कधीच येणार नाही जो पर्यंत तुम्ही मागे वळत नाही . आणि जरी अश्या शक्तीशी सामना झाला ता सुर्योदय पर्यंत स्वताला सावरून ठेवा आणि लढत राहा . कारण सूर्योदयाच्या वेळी तो निघून जातो आणि माणसाला आशीर्वाद सुधा देतो धन्यवाद
iddharth Bangar गणूदा गावातील एकदम साध व्यक्तिमत्व.... लग्नानंतर खूप वर्षानी त्यांचा घरी एका लहान मुलाने जन्म घेतला.... खूप आवडीने त्याच नाव त्याचा आजीने मुकेश ठेवलं....हळूहळू तो मोठा होवू लागला..... पण तो कधीच रडत नव्हता... त्याचा तोंडून कसलाच आवाज निघत नव्हता.... गणूदा वर जणू आभाळ कोसळल.... आधीच घरात अठराविश्व दरिद्र..... त्यात देवाने त्यांची क्रूर चेष्टा करत हे मुक पोर त्यांचा पदरात टाकलं होत..... पण गणूदा ने दैवाला कोणताच दोष न देता त्या मुलाचा स्वीकार केला..... मुकेश आता 10 वर्षाचा झाला होता.... घरातील लोक त्याला प्रेमाने आणि गावातील लोक कदाचित चेष्टेने मुका बोलायचे....... सर्व गावाचा तो लाडका बनला होता.... पण एके दिवशी विपरीत घडलं..... मुका कुठेच सापडत नव्हता... गणूदा त्याला सगळीकडे शोधू लागला..... घरात गणूदा ची बायको-आई यांनी रडून रडून बाजार मांडला होता... त्यांचा घरात खूप लोक जमा झाले होते..... तेवढ्यात एक लहान मुलगा बोलला...,”मी मुकाला जंगलात जाताना पाहिलाय....”. . . . त्याचा या एका वाक्याने उपस्थित लोकांचा छातीत धडकी भरली... सर्वत्र शांतता पसरली.... इतक्यात मुका चा आई आणि आजीने एकदम काळीज चिरून टाकणार हंबरडा फोडला........ आणि छातीवर जोरजोरात मारून घेऊन बोलू लागल्या...... ”ती हडळ माझा मुकाला नाही सोडणार..... देवा वाचव रे देवा......” हडळ........... हो हडळ....... गावाला लागून असलेल्या जंगलात एक खूप मोठा वाडा होता.... आणि त्या वाड्यात राहायची एक हडळ........ तशी खूप साधी बाई होती ती आधी..... पण नवरा खूप छळ करायचा तिचा..... माणसाचा रूपातील सैतानच होता तो.... खूप दारू प्यायचा.... आणि खूप मारहान करायचा हिला..... मग नाही सहन झाल त्या बिचारीला..... आणि मग .... राहत्या वाड्यातच एक दिवस तिने गळफास लावून आत्महत्या केली...... पण .... मरणांनंतर ही तिची सुटका नाही झाली.... कारण ती हडळ बनली होती...... एक दुष्ट हडळ....... तिने पुढचा काही दिवसातच तिचा नवर्याचा हाल हाल करून जीव घेतला होता..... त्याची अवस्था पाहूनच गावातील खूप पुरुषांनी बायकोला मारहाण करण सोडून दिल होत...... यानंतर त्या हडळीने त्या वाड्यावर कब्जा केला... आणि त्या वाड्यावर येणार्या प्रतेक माणसाचा तिने जीव घेतला.... ते पण ... खूप छळ करून...... अशा भयानक हडळीचा तावडीत मुका सापडला होता..... गणूदा उठला.... आणि गावकर्यांना बोलला आपण आता वाड्यावर जाऊ आणि मुकाला सोडवून आणू..... पण ... कोणाचाच अंगात एवढं धाडस नव्हतं की गणूदा सोबत जावून मुकाला सोडवून आणव...... कोण स्वताहुन मरणाचा दारात जाईल.... हळूहळू सर्वांनी तिथून काढता पाय घेतला..... गणूदा रडून रडून सर्वांना हात जोडत होता... माझा सोबत चला म्हणून.... पण कोणीच त्यांचा सोबत यायला तयार झाल नाही.... शेवटी गणूदा ने डोळे पुसले..... आणि वेगळ्याच निश्चयाने जंगलाकडे जाऊ लागले..... त्याला जाताना पाहून त्यांची बायको आणि आई त्याला थांबवू लागल्या.... ”नका हो जाऊ..... आधीच मी पोटाचा गोळा गमवलाय.... आता कुंकू नाही गमवायच....” पण गणूदाला काही ऐकायचं नव्हतं त्याला फक्त मुकाला परत आणायच होत.... आणि तो जंगलात शिरला..... सगळीकडे कुट्ट अंधार पसरला होता.... गणूदा तसा खूप घाबरला होता... पण त्याचातील बाप त्याला धीर देत होता.... आजूबाजूचाझुडपातून मधेच सळसळ आवाज व्हायचा..... जणूकाही एखादा साप तिथून निघून गेला असावा.... ते अंधारातून चाचपडत कसेबसे वाड्याचा बाहेर आले..... अगदी विजीर्ण झाला होता तो वाडा.... गणूदाला त्या वातावरणात वेगळीच उदासी जाणवली..... एकदम भकास वातावरण होत.... त्यांनी वाड्याच लोखंडी गेट ढकलल...... गंजलेल्या बिजागिर्याचा कर्ण कर्कश आवाज सगळीकडे घुमला..... त्या आवाजाने आजूबाजूचे वटवाघूळचा थवा एकदम भयंकर चीत्कार करत गणूदाचा डोक्यावरुन गेला..... गणूदा मटकण खाली बसला.... हळूहळू आत जाऊ लागला.... आणि कुठे मुका दिसतो का ते पाहू लागला...... गणूदा वाड्यात आत आला..... हॉल मध्ये आला..... झुंबराच्या खाली..... आणि त्या झुंबर सोबत उलट लटकत होती. . . . . . . . ती हडळ..... . . . . . . त्या हडळीने अचानक गणूदा चा समोर उडी मारली..... . . . . . . . अचानक समोर आलेल्या त्या हडळीला पाहून गणूदा चार पावले मागे सरकला...... . . . . . .. . . . अतिशय भयंकर दिसत होती ती हडळ.... . . . . .पांढरे डोळे,... . . . . .अंगावर पांढरी साडी.... . . . . . . निस्तेज त्वचा.... . . . . . . आणि मोकळे सोडलेले केस..... . . . . . . . आपले फावडे दात विचकत ती हसू लागली..... . . . . . . तीच ते विकट हास्य खूपच भयंकर होत...... . . . . . . . आणि तशीच हसत ती तिचा घोगर्या आवाजात बोलली...., . . . . . ”काय हवय तुला...?? " . . . . . गणूदा खूप घाबरला होता... तरीपण धाडस करून बोलला... , ”मला मुका हवाय..” . . . . . हडळ तीच बोलणं ऐकून हसू लागली आणि बोलली.... . . . . . . ”जीव घेईन मी तुझा..” . . . . . . . गणूदाने तिचा उलट्या पायावर लोटांगण घातल....... आणि बोलला.... . . . . . . . . ”तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे.... पण मला मुका दे...” . . . . . . अचानक . . . . . . . हडळ तिथून पळून जाऊ लागली... . . . . . . . गणूदा पण तिचा मागे पळू लागला... . . . . . . . . आणि रडत रडत विनवण्या करू लागला...... . . . ”हडळ...मुका दे...” . . . . . . . . हडळ वाड्याचा बाहेर पडली... . . . . . . . . . . मागोमाग गणूदा पण आला पण एका दगडाला ठेस लागून एका खडयात पडला.... तिथे अंधारात कोणीतरी होत ... . . . . . . गणूदा ने निरखून पहिलं तर तो मुका होता.... त्याचा काळजाचा तुकडा.... त्याने मुकाला कवटाळून धरलं... आणि घरी घेऊन आला... सर्वजन खूप खुश झाले... कारण गणूदा च्या धाडसामुळे मुका परत आला होता.... आणि तो वाडापण हडळमुक्त झाला होता....... गणूदा ची वाजत गाजत सगळीकडे मिरवणूक काढण्यात आली..... पण एक प्रश्न गणूदा ला पडला होता...... हडळ पळून का गेली.....??? इकडे त्या जंगलापासून खूप दूर.... .. एका मोठ्या पिंपाळचा झाडाचा एकदम वरचा फांदीवर ती हडळ लपून बसली होती आणि स्वतशीच बोलत होती..... ”जळल मेल लक्षण..... काय निर्लज्ज माणूस होता.... सरळ सरळ मला मुका मागत होता.... मी माझा नवरा सोडून कधीच कोणाला मुका दिला नाही... आणि हा मागत होता... आले ग बया पळून एकदाची....

भूत म्हणजे सडलेले, रक्तबंबाळ, असे काही असतेच असे नाही

Ajeya Suku Visnhu By Avinash Pataskar हि अगदी १००% सत्यकथा आहे आणि मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. भूत म्हणजे सडलेले, रक्तबंबाळ, असे काही असतेच असे नाही असे मला वाटू लागले. मी स्वतः स्ट्रक्चरल इंजिनिअर आहे आणि गेली १२ वर्षे परदेशात मध्य पूर्वेत कुवेत दुबई मध्ये राहत आलो आहे. इथे वास्तुदोष भरपूर असतात कारण परदेशी नागरिकांसाठी घरे बांधताना मालक कसलाही विचार करत नाही. मला इकडे बरेच अनुभव आले त्यातलाच हा दुबईतील एक अनुभव. मला नवीन नोकरी पगारवाढ मिळून दुबईत लागली. मला त्यामुळे अजमान वरून दुबईला राहायला जाणे भाग होते. दुबईत जागा मिळणे फार अवघड झाले आहे. जाहिराती बघून फोन करत होतो जागा पाहत होतो. जवळ आणि सोयीस्कर अशी जागा मिळत नव्हती. असली तर भाडे जास्त किवा जागा गेलेली असे. शेवटी मला व मुलांना जवळ अशी जागा आहे हे कळले आणि पाहायला गेलो तर ती कोणी घेतली नव्हती फक्त एक प्रोब्लेम होता कि प्लॉट चे तोंड दक्षिणेला होते. अशा वास्तूत दुष्ट आत्मे सहज राहतात. नशीब चांगले कि फ्लाटचे तोंड पश्चिमेला होते, घेण्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण १-२ दिवस राहिले होते जुनी जागा सोडायला. म्हणून ती घेतली. ते झाले आणि मी, बायको, आणि मुलगा, मुलगी असे चौघे तिथे राहायला गेलो. नवीन प्रमोशन ची नोकरी होती. पण खाजगी नोकरीत कटकटी फार. तेच सुरु झाले. त्यातच आजारपणाची भर पडली. असे ८-९ महिने चालू होते. मी स्वत कुंडली वगैरे बघत visit my site as avinashpataskar.in असल्याने एकदा प्रश्नकुंडली मांडली तर त्या वस्तुत ३ अतृप्त आत्म्याचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले. माझाही फार विश्वास नसल्याने मी फार विचार केला नाही. पण त्या बिल्डींग ला सगळेच लोक नावे ठेवत असत. कारण नंतर कळले. पुढच्याच वर्षी मुलीची १० वी असल्याने बायको व मुले पुण्याला निघाली. आता मी एकटाच राहत होतो. मधून अधून खाणे पिणे बार वगैरे चालायचे. ३ महिन्यापूर्वी इराकला असताना मी आजारी पडलो व दुबईत आल्यावर पित्ताशायाची शस्त्रक्रिया झाली. त्याचे सगळे परिणाम हळू हळू ओसरू लागले होते. बरेच त्रास होत होते. मी एकटाच असल्याने हॉटेलात राहण्याच्या विचारात होतो. अजून घर सोडायचे पक्के झाले नव्हते कारण पुढे मिळणे अवघड असल्याने अजून सोडले नव्हते. आता सुट्टीच्या दिवशी घर खायला उठे. दुबईमध्ये ३०-४०% वेश्या राहतात. माझ्या समोरच्या घरात सुमारे १० जनी राहत होत्या. सगळ्या सिरीया इराण, युक्रेन, रशिया आणि युरोपिअन. मला याविषयाची थोडीफार माहिती होती. त्या दिवसभर आराम व रात्री काम करत. सुट्टीच्या दिवशी रात्री झोपयला उशीर झाला कि त्यांचे काय चालते याची उत्सुकता वाटे. बाहेरून आवाजही येत. थोडेफार कळत असे. म्हणून घराच्या पीपहोल मधून बाहेर पहायचा मोह आवरत नसे. त्यावेळी अमावास्येला २-३ दिवस होते आणि मी असाच बाहेर पाहत होतो. बाहेर पसेज मध्ये मला २-३ साडी घातलेल्या बायका काहीतरी धुणे धूत असलेया किवा काहीतरी काम करत असलेल्या दिसल्या. त्यानंतर २ मुले पळताना दिसली. त्या बायका एकच हालचाल एकसारख्या करत होत्या. मुलेही पळत होती. असे ३-४ वेळा झाले, म्हणून मी दरवाजा उघडला तर समोर काहीच नाही. अगदी शांत! परत झोपलो. थोड्या वेळाने काही आवाज झाला म्हणून परत बाहेर पहिले तर तेच दृश्य! आता डोके आउट झाले. असे त्या रात्री ४-५ वेळा मला दिसले. ती रात्र कशीतरी गेली. दुसर्या दिवशी सुट्टी होती म्हणून जागरणाचे काही वाटले नाही. झोपताना मी घरात देवीच्या फोटोखाली झोपत असे. दुसर्या दिवशी रात्री तोच प्रकार दिसत होता. त्यात पासेजच्या कडेला १-२ पुरुष व स्त्रिया बसलेल्या दिसत होत्या. नंतर एक उंचापुरा माणूस दरवाज्याच्या बाहेर घरात येण्याच्या तयारीत उभे असलेला दिसत होता. मी काही ऑर्डर दिलेली नव्हती. बेलसुद्धा वाजली नव्हती मग हा माणूस आला कुठून? म्हणून मी एकदम दार उघडले. तर तिथे काहीच नाही. त्या दिवशी रात्री २-३ पेग लावून मी झोपलो होतो कदाचित त्यामुळे डोक्यातील विचार जातील असे वाटत होते. पण मध्येच जाग आली. तसा मी जमिनीवर चटई टाकून झोपतो. बाजूला रिकामी खाट पडली होती. तिच्याखाली मला हालचाल जाणवली. म्हणून पहिले तर मांजरासारखे पिल्लाच्या आकाराचे डोळे चमकत होते. ते माझ्या जवळ यायचा प्रयत्न करत होते. म्हणून त्याला हुसकावण्यासाठी हातात काहीतरी आले ते फेकले. तेव्हा ते मांजर खाटेवर चढून बसले. मी उठून लाईट लावून बघतो तर काहीच नाही. खिडक्या चेक केल्या तर सगळ्या बंद. त्याही मोठमोठाल्या अलुमिनिअम च्या स्लाईड खिडक्या त्यातून ते येन शक्यच नव्हते. घरात सगळे असताना असे कधीच झाले नव्हते. माझा मनुष्य गण असल्याने आणखीनच भीती वाटत होती. परत आलो आणि झोपलो. थोड्यावेळाने माझ्या खांद्याला कोणीतरी जोरात ओढते आहे असा भास झाला. उठून अंधारात पहिले तर माझ्या जवळ एक पुरुष पूर्ण उघडा माझ्याकडे पाठ करून बसलेला होता. लाईट लावल्या तर काहीच नव्हते. परत झोपलो. पण झोप येत नव्हती. छताकडे बघत बसलो. तर सिलिंगवर एक मुस्लिम पुरुष व काही बायका बोलत असल्याचे चित्रपटासारखे दिसत होते. असे ३-४ वेळा झाले. मी देवीच्या फोटोसमोर झोपत असे त्यामुळे मला काही होणार नाही याची खात्री होती. थोडा वेळ गेला आणि एक चमकणारा पांढरा उंदीर भिंतीवर पळत होता. मी दुबईमध्ये उंदीर कधिच पहिला नव्हता. शेवटी वैतागून बेडरूम मधून हॉल मध्ये येउन बसलो. हॉलला पूर्ण काचेचा दरवाजा होता व त्याला गोगल ग्लास होती. त्यात आतले प्रतिबिंब स्पष्ट दिसत असे. त्या काचेत बघितले तर एक तरुण व एक वयस्कर बाई उभ्या राहून बोलताना दिसत होत्या. ते प्रतिबिंब माझ्याच घरातले होते. पण घरात तर माझ्याशिवाय या बायका आल्या कुठून? परत पीप होल मधून पहिले तर तेच लोक, स्त्रिया, मुले बाहेर खेळत होती. आता परत काचेत बघितले तरी तेच चित्र दिसत होते. मग पलीकडे बघायचा प्रयत्न केला तर एक पांढरे कपडे घातलेला माणूस खुर्च्चीवर बसावा असा बसला होता. खरे तर बाहेर मोकळे मैदान आहे तिथे कुठे आला माणूस? सगळेच अघटीत घडत होते. शेवटी येवून झोपलो. काय होईल तो होवो असा विचार केला. आणि कधी डोळा लागला ते कळलाच नाही. दुसर्या दिवशी मित्राला फोन केला आणि माझ्याकडे राहायला ये तब्येत बरी नाही अशी विनंती केली. त्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर तो आला. त्याला मी काहीच सांगितले नाही. पण जशी जशी रात्र होऊ लागली तसे ते चक्र पुन्हा सुरु झाले. मला जे दिसत होते त्यातले त्याला काहीही दिसत नव्हते. सगळे तेच भास होत होते. त्याने मला वेहम आहे म्हणून सोडून दे असे सांगितले. पण मला ते सगळे सहन होत नव्हते शेवटी १ आठवड्याची रजा घेऊन मी पुण्याला निघालो. जेवढे समान भरून घेता येईल ते घेतले. बाकीचे पाठवून दिले आणि मोठी कपाटे तशीच सोडून दिली. मित्र बरोबर होता म्हणून सगळे करू शकलो. पुण्यात पोचलो आणि घरमालकाला घर सोडणार असल्याचे कळवले. तसेही माझे अग्रिमेण्ट संपलेच होते. अजून १५ दिवस राहिले होते. पुण्यात जर रीलाक्स झालो आणि परत जायचे ठरले. अजून मोठे समान विकायचे होते त्यासाठी परत त्याच घरात राहायचा निर्णय घेतला आणि तिथे पोचलो. यावेळी देवीचा अंगारा घेऊन गेलो होतो. पण दरवाजातच बिल्डींग मनेजरने अडवले. आता तुम्ही इथे राहू शकत नाही असे सांगितले. मला हॉटेलमध्ये जाने भाग होते. कदाचित नशीब चांगले असावे. मी रात्री १२ वाजता हॉटेलला गेलो. नंतर येजा करून समान विकले. नोकरी करत होतो. पण आता तसला अनुभव काही येत नव्हता. पण आत्ताही त्या घराची आठवण झाली कि अंगावर शहारा येतो. इकडे अरबी लोक त्यांच्या नोकरांना कसेही वागवतात, इतकेच काय जनावरासारखे जीवही घेतात. त्यामुळे कदाचित असे आत्मे भटकत असावेत.
ADD AS A FRIEND
-    Story by Viraj Kanekar 
गोष्ट पहिली..
मी श्रीधर गावडे ... !!
आता मी सावरलोय... सावरलोय म्हणजे काय... तर adapt झालोय .. आलेल्या परिस्थितीला बदलेल्या स्थितीला... दुसर काय असतं आपल्या हातात...फक्त बदललेल्या परिस्थितीला बघायचं .. कधी थोडं .. कधीफार... पण त्या क्षणी बसलेला धक्का जबरदस्त होता... थंड धक्का.. थंडगार सुई पटकन टोचावी.. मेंदूत.... थंडगार सुई.. आधी डोक्यात टोचणारी मग थंड धक्का देणारी...

फेसबुक पण बोअर होत चाल्ल होतं .. काय ते दररोजच करणार...तेच तेच.. शेअर , लाईक , कमेंट... माणसांच्या आयुष्यात काहीतरी नवीन पाहिजे... दररोज ... विचित्र... सणसणीत....लोक पण विचित्र असतात....मुलींच्या पोस्ट असल्या कि त्याला लाईक , कमेंट चा पाउस... गुरासारखा HMM HMMM करत  असतात ...  खोटे फोटो ठेवतात... खोटी माहिती... अगदी फेक account पण करतात... निर्बुद्ध लेकाचे ... सगळफसवं... दिखाऊ...

हा हा हा... बघा ... तुम्ही पण फसलात...तुम्हाला वाटला असेल .. कि ह्या हुशार mature मुलाला हे ढोंग आवडत नाहीइथेच फसलात.. दिसत तसं नसत...समोर दिसला ते सत्य मानता ...अहो मी पण असाचआहे.. असाच म्हणजे वर च्या सारखा... कदाचित  पावले पुढेच... मला ह्याच फसव्या दिखाऊ थोडक्यात 'virtual ' जगात जगायला आवडत.. आता फेसबुक  जग फसवं आहे...आणि आपण खर रहाव म्हणजेघोर फसवणूक आहे... आणि समजा.. जर मी दाखवलं असत.. माझ खर रूपम्हणजे खर शिक्षणखरा फोटो.. खरी माहिती... तर कुणी विचारल असत का? ( कुणी म्हणजे विशेषतः मुलीनीआता खरा  फेमसआहे ... जग खोत असाल म्हणून काय झालं...?
 मग मी मस्त छान फोटो शोधलाखोट्या माहितीने account सजवलं.. मग मी एका " अप्परक्लास मध्ये जाऊन पोहचलो .. या दरिद्री मध्यमवर्गातकाळ्या रंगातसाध्या कॉलेज अश्या lifestyle     
मध्ये मला जे मिळायची सुतराम अपेक्षा  नव्हती  ते मला या खोट्या जगात - १९ इंचाच्या box मध्ये आणि १०८ बटणाच्या जगात सापडले... अनेक चांगले मित्र ( त्याहूनछान मैत्रिणीमाझ्या लिस्ट मध्ये जमू लागले .. मजा यायची...  वास्तव जगातला अपमानदुर्लक्षबापाचा मारदुसर्यांचा पैसा.. पाहून वाटणारा... हेवा.. मग येणारfrustration ... छे छे.. इथे काहीच नसत...
हे जग किती मस्त... मी एकटाच राजा... इथे मी राज्य करतो.. अनेकांशी गप्पा मारतो.. त्या दिवशी मज्जा आली ... आमच्या कोलेजची ... ती "वंतासमुलगी.. हो तीच... 'मी म्हणजे किळस  अशी वाटणारी ... माझ्या फेसबुक च्या जगात ' जवळचीमैत्रीण बनलीय... " Lets Meet " म्हणते...  आता तुम्हीच सांगा.. मी भेटलो हिला तर फेफरयेऊन पडेल... मूर्ख कुठली... मजाच आहे... ना.. हल्ली मी वास्तव जग कोणते हेच विसरलो आहे...  त्या बाहेच्या कुरूप जगात नकोच... २४ तास इथेच राहायचं .. खोट.. पणमनात हव तसं खर.. आपल्याला हव तसं खर .. आपल्याला हव ते नाव .. हव ते जग... हवा तो सोबती... हव ते शिक्षण ... कुणाच्या बापाची ( अगदी माझ्यापण ) हिम्मतनाही हात लावायची... मी इथेच राहायला लागलोय आता मरूदे च्यायला.. हेच बर्र.. रात्री झोप नाही यायची.. आता कारण मिळालंय.. अगदीच डोक दुखलं.. झोपच येत नसेलतर डॉक्टरने गोळ्या दिल्यात .. झोप पण ' कृत्रिमझालीय आता.... 
पण हेच बघा .. म्हटलं ना... काहीतरी नवीन हव असतं...सणसणीत.. नवीन .. तेच तेच करून कंटाळा येतो... तेच झाला... या खोट्या जगाच्या तेच तेच पानाचा कंटाळा येऊलागला मला... नवीन हव असता ...काय वेगळ करणार...

असाच विचार  करत hoto त्याच वेळी.. एक पोस्ट पाहिली मी...  वाईट होती बातमी...
वाशीच्या राजे शिंदे महाविद्यालायचे चार तरुण - तरुणी पोहायला गेले होते.. बुडून मेले म्हणे... 
नावे पण आली होती...  आणि RIP .. लिहिलं होतं...  डोक्यात विचार आला ...
अरेच्या .. ह्यांची पण फेसबुक account असणार... ती अनाथ होणार... कशी काय?
म्हणजे बघा... आज तुम्ही password टाकून तुमच account  उघडला... काम केलं बंद केलं...आता तुम्ही विचार करणार कि उद्या पुन्हा उघडायच..पण उद्या सकाळी तुम्हीमेलात... मग तुमचा फेसबुक कोण उघडणार...असंच राहता ते... झोंबी सारख... झोंबी.. धड मेला पण नाही... धड जिवंत नाही... मला आधीझोंबी ' शब्दाची मजा वाटली मगकीव...  छे छे ... 'तुम्ही मेलातही काय तुमच्या फेसबुक ची काय चूक आहे... बिचार... त्याने किती आनंद दिला तुम्हाला.. नवीन जग दिला... आणि त्याला तुम्ही असंअर्ध्यावर सोडून दिलात... जरापण विचार नाही केलाततुम्ही मेल्यावर त्या निष्पाप account  च काय होणार ? कोण ते उघडून बघणार.. कृतघ्न  आहात तुम्ही...
तेवढात एक वीज चमकली डोक्यात... वाह.. काय कड्डक आणि सणसणीत आहे... मी काय केलं... त्या मेलेल्या मुलांच्या बातमीतल नाव पाहिलं..
सुबोध पाटील ' ... टाकला सर्च वर ... - सुबोध पाटील  आले... आता मेलेला सुबोध कसं ओळखायचा.. ?  नशीब सुबोध ने ' studying engineering from Raje-Shinde technical institute' टाकल  होतं ... केलं 'add as a friend '... कोणतरी ऐकेल तर  वेडा  म्हणेल... सणकी , विक्षिप्त...  पण मजा वाटली.. कुणी केलाय का असा...?आपल्याला वेगळं करायची हौसच आहे भारी... मग ते उरलेले तीन जणांना पण पाठवलं... किती विचित्र... अशी Friend  Request .. जी कधीच नाही Accept होणार ... विचित्र वाटला.. पण आवडला.. काहीतरी जगावेगळ केल्याचा आनंद.. अद्भुत... 
आता नवीन नादच लागला...मी मेलेली लोक शोधू लागलो... पेपर वाच.. TV बघ..कोण मेलाय ते बघ... मग शोध त्याला... तरुण असला तर अजून छान... मला मेलेली लोकहवी होती...कोण नाही सापडला असातर मला चूक चुकल्यासारख वाटायचं...  स्मशानातला मांत्रिक जसा मुडदा येण्याची वाट पाहतो.. तसं झाल होत... मी फेसबुक चा मांत्रिकहोतो .... मेलेल्या लोकांशी मैत्री करणारा... 

आता गम्मत सांगतो... धक्काच तो..
हल्ली काय झालाय काय माहित... तरुण मुलं मरत नाहीत... मेलेली फेसबुक वर भेटत नाहीत.. छे... कंटाळा आलं होतं... ...डॉक्टर पण वेडाच आहे... एक गोळी घे म्हणे...अरे मी अद्भुत जगाचा शोध घेणारा मांत्रिक आहे... आणि म्हणे एक गोळी...  हल्ली गोळ्या घेऊन पण झोप नाही येत..त्या दिवशी नुसताच बटन चाळे करत  होतो... तेवढ्यातएक notification  आली... धक्काच बसला... 
आधी वाटला गम्मत करताय कुणीतरी.. 
' subodh patil added you as friend " ... सुबोध पाटील...? अरे हा तोच का?. बुडून मेलेला.. नाही नाही.. कोणतरी वेगळं असेल.. पाटील नाही म्हटला तरी १० मध्ये एकसापडेल... पण... हे काय... कोलेज पण तेच..? साला कुणीतरी घेतोय कापण नाही... हे माझा गुपित नाही कुणाला ठाऊक...
विचार करत होतो... तेवढ्यात आणखी.. - -  -१२ - २० - ३६-५५ notification ... फटाफट वाढल्या... साला... भे***  अरे ही तीच पोर ना... मेलेली...
सर्व मेलेली माणसं माझी request accept कशी करत आहेत... भूत ... ? 
एक थंड शिरशिरी गेली मेंदूतून... 
अंग थंड पडत चालला होतं.. म्हटलं ... थंड सुई टोचली असं वाटला...
मला भीती वाटत होती... पण बाकी भावना गोठल्या होत्या... माझ्या लिस्ट मध्ये ६० मेलेली लोक आली होती...
माझे हात गोठले...
आणि त्या नंतर जे झालं... जे तुमच्याबरोबर झाल असत तर...
मेलाच असतं तुम्ही... मी म्हणून ठीक होतं... 
एक वेगळीच notification आली....
" you have been added to dead facebook" 
विचित्रच ना... डेड फेसबुक... ? कशाला बर... अरे मला जाउद्या..
हे काय... माझे बाकीचे जिवंत ६०० मित्र गायब झाले ...
फक्त ६३ जण.. होते... सर्व मेलेले... तेच ते... 
मी काय करतोय इथे... आहे काय हे...?

सुरवातीला हे जड गेला... पण तुम्हाला मी सुरवातीलाच म्हटला ?
आता मी सावरलोय... सावरलोय म्हणजे काय... तर adapt झालोय .. आलेल्या परिस्थितीला बदलेल्या स्थितीला... दुसर काय असतं आपल्या हातात....

गोष्ट दुसरी..
मी रफिक शेख..
मला वेगळी सवय लागलीय... मी मेलेल्या लोकांना add करतो...मजा येते..
काल ही बातमी पहिली... आणि मग सुचल .... मेल्या नंतर काय होत असेल फेसबुक account च ?
हा बघा हीच बातमी... 
झोपेच्या  गोळ्या जास्त घेऊन श्रीधर गावडे नावाच्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू "