Thursday, January 21, 2016

राज
नमस्कार मित्रांनो या आधी ज्या स्टोरी मी पेज ला दिल्या त्या सत्य आहेत कि नाही ते माहित नाही पण जेव्हा हि घटना घडली तेव्हा मला समजले कि खर आयुष्यात कधी काय घडेल काही सांगता येत नाही ...
सप्टेबर 2014 ला माझी फ्रेंड पूजा चा ऑफिस मधून मला कॉल आला . ती बोल्ली “मला घ्यायला ये लंच मधे.” तिचा आवाज घाबरलेला होता. मी विचारल “काय झाल?”. तर तिने काही न सांगता कॉल कट केला. मी विचारात पडलो कि झाल तरी काय असेल. कारण या आधी कधी तिने एवढ्या लवकर ऑफिस मधून कॉल पण केला नव्हता आणि आली पण नव्हती. मी थोड्या वेळा आधीच तिच्या ऑफिस जवळ पोहचलो. ती लंच टाइमला बाहेर आली. ती अतिशय घाबरलेली होती तिच्या चेहऱ्या वरून तर असे वाटत होते जणू ती आताच रडेल. मी काही न विचारता bike स्टार्ट केली आणि तिला घरी घेऊन आलो . तिची अवस्था पाहून तिच्या आईने विचारले “काय झाल तुला?”. तेव्हा ती रडायला लागली. आणि तिने जे सांगितले ते ऐकून तर आम्हाला पण विश्वास नाही झाला. पुजाची बेस्ट फ्रेंड निशा आज ऑफिस ला आली नव्हती. खूप कॉल केले तरी रिसीव्ह करत नव्हती. आणि जेव्हा ती आली तेव्हा तिचे केस विस्कटलेले होते. चेहेऱ्या वर वेगळेच भाव दिसत होते. ती आली आणि शेजारच्या चेयर वर मान खाली घालून बसली.
जेव्हा पूजा ने विचारले, “काय झाल काय हा अवतार?”. हे ऐकून तिने पूजा चा हात पकडला आणि काही समजायच्या आधी चेयर वरून तिला खाली फेकून दिले. आवाज ऐकून ऑफिस मधला स्टाफ तिथे आला. पूजा रडायला लागली. जेव्हा म्यानेजर ने विचारले “का केल असे?” तर निशा पुरुषाच्या आवाजात बोलू लागली. “ये मेरी हे इसे कोई कुछ कहेगा तो जान से जायेगा” आणि आणि जोर जोरात हसू लागली आणि घुमू लागली. हे बघून काही मुली रडायला लागल्या तर काही खूप घाबरून गेल्या. एक मुलगी हनुमान चालीसा बोलायला लागली तेव्हा निशा ने तिच्या अंगावर धावत जावून तिच्या हातात नख घुसवले. नख लागताच हातातून रक्ताची धार सुरु झाली. निशा ने लगेच तिच्या हातून येणाऱ्या रक्ताला जीभ लावली आणि ते प्यायला सुरवात केली. तेवढ्यात काही मुलांनी तिला पकडले आणि तिला एका कॅबीन मध्ये बंद केल. निशा चा वडिलांना कॉल केला आणि सर्वी घटना सांगितली. तेव्हा ते तिला ऑफिस मधून घरी घेऊन गेले. पूजा खूप रडत रडत हे सर्व सांगत होती. 10-12 दिवस पूजा ऑफिस ला नाही गेली. जेव्हा ती ऑफिस ला गेली तेव्हा तिची फ्रेंड निशा पण आलेली.. पण ती आता पूर्णपणे ठीक झालेली होती. रात्री मी पण निशा च्या घरी गेलो. पण जेवा तिच्या वडिलांनी 3 दिवसात काय काय घडले हे सांगितले तेव्हा तर आम्हाला तिथे बसायला पण भीती वाटत होती.
जेव्हा निशा ऑफिस मधून घरी गेली. तेव्हा तिला खूप ताप आला होता. ती बेडरूम मध्ये जाऊन झोपून गेली. पण तिच्या वडिलांना काळजी वाटत होती म्हणून ते डॉक्टर ला घरी घेऊन येण्या साठी गेले. आई पण घर कामात व्यस्त होती. पण जेव्हा तिचे वडील घरी आले तेव्हा निशा बेडरूम मधे नव्हती. आजुबाजू चे लोक पण शोधू लागले. टेरेस वर पहिले तेव्हा ती पाण्याच्या टाकी वर बसून हसत होती. हे बघून तर तिचा वडिलांचा थरकाप उडाला. जेव्हा ते तिला घेण्यसाठी वर जात होते तेव्हा ती मुलाच्या आवाजात जोरात ओरडली “ए बुद्ढे उपर आया तो लडकी को नीचे फेक दुंगा. इसे कोई छू नही सकता. अब इस पे मेरा राज हें. अगर कोई उपर आया तो लडकी को फेक दुंगा यहा से नीचे” हे ऐकून तिचे वडील तिथेच रडायला लागले. आणि बोल्ले “तुला जे पाहिजेल ते देईल पण तू तिला मारू नको.” खूप काही समजावल्या नंतर. त्या आत्माने 2 कोंबड्या मागितल्या. त्या आणून त्याला दिल्या तेव्हा निशा परत घरी आली. आणि घरी आल्या वर त्या जिवंत कोंबड्यांच्या मानेत दात घुसवत त्यांच्या रक्त पिवू लागली हे सर्व बघून तिच्या आई वडील रडून रडून बोलू लागले आता आमची मुलगी गेली. ती आता खूप भयानक दिसू लागलेली. रक्ताने माखलेला चेहरा आणि विस्कटलेले केस. त्यात जोर जोरात हसणे. जेव्हा तिचे वडील तिला समजवायला गेले तर तिने त्यांचा गळा पकडला. तिथे असलेले आजु बाजूच्या लोकांनी पकडून तिला बेडरूम मधेच बंद करून ठेवले.तिच्या वडिलांना काही सुचत नव्हते. पण घडलेली घटना संपूर्ण एरिया मधे पसरली सर्वे लोक घर बाहेर येवू लागले.वेगवेगळा सल्ला देऊ लागले. तेव्हा एका मांत्रिकाला बोलवलं गेल... त्या मांत्रिकाला यायला रात्र होऊन गेली. जेव्हा तो मांत्रिक बेडरूम चा दरवाजा खोलून आत गेला तेव्हा रूम मधे निशा एका कोपऱ्यात बसून मान गोल गोल फिरवत होती. मांत्रिकाने तिला विचारलं “कोण आहे तू.?”
तेव्हा ती पुरुषाच्या आवाजात बोल्ली, “ मे कोई भी हु पर ये लडकी मेरी हें और जो कोई हमारे बीच मी आयेगा उस का अंजाम वो खुद देखेगा.” तेव्हा अचानक निशा च्या हात वर चाकूच्या वारा सारखे निशाण येवू लागले आणि त्यातून रक्त यायला लागलं. मांत्रिक ने लगेच एक लिंबू मंतरून तिच्या अंगावर फेकला. तेव्हा निशा अजून जोरात हसायला लागली. आणि बोल्ली “बस इतना हि तुझे दिखता हु मी”. आणि बाजूच्या बेड ला आग लागली. मांत्रिक घाबरून मागे झाला आणि बोलला “छोड दे बच्ची को”. तर तो बोलला “अब थोडी देर ओर रुका तो तुझे भी जला दुंगा. मे अकेला नही हु मेरे साथ कई शक्तीया हें यह पे”. मांत्रिक ने डोळे बंद करून मंत्र बोलले तर त्याला रूम भरून आत्मा जाणवले. मांत्रिक बाहेर आला आणि निशा च्या वडिलांना बोलला “आत्मा खूप शक्तिशाली आहे आता काही पर्याय नाहि माझ्याकडे.माझ्या सारखे याच काही नाहि करू शकत... तुम्ही देवा कडे प्रार्थना करा हें बोलून तो निघून गेला”.
थोड्या वेळा नंतर आतल्या रूम मधून आवाज यायला लागाला. जोर जोरात ओरडायचा. जेव्हा खिडकीतून पहिले तर निशा हवे मधे तरंगत होती आणि हसत होती. मध्येच स्वता:चे केस ओढायची तर मधेच हातात दात घुसवून रक्त प्यायची. दुसर्या दिवशी शेजारच्या मदतीने गावावरून दुसरा भगताला घरी आणले जेव्हा निशा त्याचा समोर आली तेव्हा ती घाबरून एका बाजूला बसली. भगत ने विचारलं, “कोण आहे तू ?” तेव्हा ती बोलली “मी शेहजाद हु ये मेरी हें अब. मुझे इस से प्यार होगया हें. और इसे में किसी भी हालत मी नही छोडूंगा.” भगत ने हातातला चिमटा जेवा निशा च्या हाताला लावला तेव्हा ती जोर जोरात ओरडायला लागली आणि थोड्याच वेळात हसायला लागली. भगत ने हें बघताच तो मागे सरकवला निशा चे वडील तिथेच होते त्यांनी विचारलं “काय झाल?” तेव्हा तो बोलला. “हा एकटा नाहि आहे तिचा अंगात. त्याने खूप ताकत असलेले जीन बोलावून ठेवले आहेत त्याच्या मदतीला”. हे बोलण्या आधीच रूम मधली लाईट गेली आणि अचानक तिथे पूर्ण अंधार होऊन गेला. रूम मधे अचानक पाण्याचा आवाज यायला लागला निशा हसतच होती एका बाजूला बसून कसे तरी ते लोक रूमच्या बाहेर आले. आणि जेव्हा खाली पहिल तर रूम मधून रक्त बाहेर येऊ लागलं होत. भगत ने पण आता सांगून दिला कि हा जीन हिला घेऊन जाणार आहे .त्याने खूप मोठ्या शक्ती मागवून ठेवल्या आहेत त्याच्या मदतीला. मी त्याला काही केल तर बाकीचे मला सोडणार नही . असं सांगून तो पण निघून गेला समोरचं दृश्य एवढे वाईट होत कि तिचे वडील जागेवर कोसळले. आणि देवा कडे प्रार्थना करू लागले. “वाचवा गुरुदत्ता तुझ्या शिवाय कोणी नाही आमचा”
दुसऱ्या दिवशी पण पूर्ण रात्र जागून ते निशा चा रूम बाहेर बसले होते. तिची आई तर बेशुद्ध होण्या च्या मार्गा वर होती. अचानक 5-6 वाजता सकाळी सूर्य प्रकाश दारात येण्यातच होता तितक्यात एक भगवे कपडे घालून हातात कमंडलू घेऊन एक साधू उभा राहिला. त्याला बघून तिच्या वडिलांना वेगळच जाणवलं. डोळ्यात तेज आणि डोक्यावर जटा. जणू कोणी मोठा संन्याशी वाटत होता. दारातूनच त्याने विचारलं “कुठे आहे ती?”. तिचा वडिलांना काही समजला नहि. तर तो संन्यासी परत बोलला “कुठे ती मुलगी?”. तेवह तिचे वडील त्यांना बेडरूम मधे घेऊन गेले. त्यांना बघताच निशा तिचा वडिलांच्या अंगावर धावून आली आणि बोल्ली "कौन लाया इसे यन्हा ?” तेवढ्यात त्या साधू ने राख तिच्या अंगावर फेकली तेवा निशा जमिनी वर बसून ओरडायला लागली “छोड मुझे ये मेरी हें ओर मी इसे ले कर जाऊंगा हमारे बीच जो भी आयेगा वो जिंदा नहि बचेगा”. साधू ने शांत पणे विचारलं आणि बोलला “जाने दे ये बच्ची को ये तेरे दुनिया कि नहि हें” तर तो आत्मा बोलू लागला “अब ये मेरी हें इसे मुझ से कोई अलग नहि.कर सकता” आणि रूम मधे जोरात हवा सुरु झाली रूम मधला फ्यान आणि वस्तू हवेने हलू लागले. निशा आता स्वता:चाच गळा दाबायला लागली. आता ती गळा पकडून जमिनी पासून 2 फुटांवर उडत होती. साधूने लगेच अंगारा काढून निशाच्या अंगावर फेकला तशी निशा परत खाली पडली आता कमंडलू मधून पाणी निशाच्या अंगावर मंत्रून फेकला तशी ती तडफडू लागली आणि “जाने दे जाने दे” असं बोलू लागली. साधू ने परत कमंडलू मधले पाणी मन्तरल आणि रूम मधे सर्वी कडे फेकला तसं तसं ओरडण्या चे आवाज यायला लागले. आता साधू ने तिचा एक केस कापून त्याला मंत्र बोलत एका डब्यात टाकला आणि त्याला बंद केला तसा जोर्रात आवाज करत एक प्रकाश निशाच्या शरीरातून त्या डब्यात बंद झाला. निशा चे वडील धावत निशा कडे गेले ती बेशुद्ध अवस्थेत होती. साधू बोलला “आता मी जातो माझ काम झाले आहे”. त्या नंतर निशा वर ट्रीटमेंट केली आणि ती आता परत ऑफिस ला जायला लागली. देवाने केलेल्या मदती मुळे निशा चे वडील आता रोज मंदिरात जातात.
Story Writer – Raaj
Translated by - Sachin Wagalode
नमस्कार मित्रहो , मी मनिष सुर्वे आज आपणासमोर एक खरीखुरी कथा सदर करीत आहे
हि घटना आहे साल १९९९ मधली म्हणजेच आजपासून १६ वर्षांपूर्वी घडलेली आहे , मुख्य म्हणजे आजची घटना हि कोकणातल्या नामांकित अश्या घाटापेकी एक कशेडी घाट शी निगडीत आहे.कशेडी घाट तर अपना सर्वाना माहितच आहे जो नेशनल हायवे १७ वर आहे .
अमित,नेहा आणि प्रकाश हे तीन भावंड मुंबईत त्यांच्या परिवार सोबत राहायला होते, तर असेच एकेदिवशी अचानक अमित ला गावावरून फोन आला कि त्याच्या चुलत भावाचे लग्न ठरले आहे आणि लवकरच अचानक साखरपुडा हि ठरला आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी ताबडतोब वेळ मिळेल तसे निघून या असे अमित चे चुलत भाऊ प्रदीप ह्याने सांगितले आहे.अमित ला हि बातमी समजली तेव्हा तो खुश झालाच होता पण अचानक सुट्टी मिळणार तरी कशी हा प्रश्न होता,मग कशी बशी त्याने बॉस कडून रजा मंजूर करून घेतली आणि घरात हि सर्वाना कळवले. अमित चे आई बाबा म्हणालेत कि तुम्ही तिघे जन जमल्यास जाऊन या मग लग्नाला तर आम्ही येतच आहोत ,मग अमित ठीक आहे म्हणाला आणि नेहा व प्रकाश ला घेऊन निघाला.अमित ने नुकतीच त्याची कोरीकाराकरीत स्कोर्पियो घेतली होती. सर्व तयारी करून हे तिघेजण रात्री जेवण आटोपून ९.३० वाजता गावी राजापूर ला जाण्यासाठी रवाना झाले .आणि त्या वेळी आताच्या इतके ट्राफिक हि नव्हते असल्यामुळे रस्ता पूर्णपणे मोकळा होता ....एव्हाना मुंबई सोडून अमित ला एक तास भर झाला होता आणि मेन हायवे ला गाडी लागली होती ....कर्नाळ्याच्या त्या खिंडीतून घनदाट जंगलातून त्यांच्या रहस्यमय प्रवास चालू झाला होता....शहराचा गोंगाट सोडून मस्त पेकी गाडी आता कोकणच्या निसर्ग्कुशीत शिरली होती...मधूनच खिडकी उघडली कि थंडगार हवेचा झोत झुळकायचा....शुद्ध हवा मनाला आणि तनाला रोमांचित करणारी होती आणि इथे मात्र अमित पुरता ताशी १००-११० च्या वेगाने बेफाम गाडी पळवत होता .
साधारण मध्यरात्री १.३० कि २.०० च्या दरम्यान अमित ने त्याची स्कोर्पियो पोलादपूर जवळ एका ढाब्यावर थांबवली आणि चहा घेतला...कारण थंड हवेच्या गार गार स्पर्शाने त्याला झोप अनावर होत होती ....अमित ने चहा आटोपून पुन्हा एका गाडीत पेट्रोल भरले आणि टायर नीट चेक केलेत ..कारण कुणास ठाऊक ह्या पुढचा प्रवास जितका वळणदार आहे तितकाच घातक हि असेल..मग अमित ने गाडी सुरु केली आणि पुन्हा आपल्या प्रवासाला लागला ,५-६ किमी अंतर पुढे गेल्यानंतर कशेडी घाट सुरु कृपया वाहने सावकाश चालवा.असा बोर्ड दिसू लागला आणि चालू झाला तो नागमोडी वळणांचा वळणदार प्रवास .....प्रकाश आणि नेहा हि एव्हाना गाडी इकडे तिकडे डोलू लागल्यामुळे जागे झाले होते...नेहा ने गाडी ची काच खाली सरकवली होती....खिडकीतून बाहेर पहिले तर नुसता काळाकुट्ट अंधार दिसत होता....घनदाट झाडी गर्द अशी दिसत होती ...झाडांच्या फांद्या जणू काही अश्या पसरल्या होत्या कि खरोखरच एखादी हडकुळी म्हातारीच त्या प्रत्येक झाडावर बसली असावी...त्या पूर्ण घाटातून क्वचितच एखादा ट्रक किवा एसटी बस पास व्हायचीध्येच पाखरे आणि रातकिड्यांचा किलबिलाट कानावर पडायचा .....काही अंतर पुढे गेल्यावर अमित ची गाडी अचानक बंद पडली ,त्याने पुन्हा स्टार्ट केली तरी सुरु होईना ..अमित पुटपुटला नि म्हणाला कि हिला पण आताच इथे ह्या घाटात बंद पडायची होती ....नेहा आणि प्रकाश हि गाडीतून बाहेर पडले आणि अमित ला विचारू लागले कि काय प्रोब्लेम झालाय रे दादा.तर अमित म्हणाला कि काही नाही इंजिन गरम झाले असावे बहुतेक...प्रकाश म्हणाला कि आताच तर मगाशी ढाब्यावर आपण सर्व विश्रांती घेतली,इंजिन मध्ये पाणी टाकले ,पेट्रोल भरले मग अजून काय प्रोब्लेम असेल...तितक्यात समोरून एक म्हातारी हातात कंदील घेऊन येताना दिसली आणि जशी ती समोर आली तशी गाडीची हेडलाईट अचानक गेली ..तेवड्या इथे हे तिघे हि घाबरलेत...आता फक्त ती म्हातारी त्या कंदील च्या उजेडात दिसत होती ...तिचे केस पूर्णपणे मोकळे सोडलेले होते आणि कपाळावर भलामोठा कुंकवाचा टिळा लावला होता..तीला पाहून सर्वच घाबरले होते पण बोलणार कोण...शेवटी अमित ने हिम्मत करून विचारले कि आपण कोण आणि इतक्या रात्री इथे काय करत आहात? त्यावर म्हातारी म्हणाली कि मी इथे जोगतीण म्हणून सोडलेली आहे आणि मी इथे खालतीच जंगलात राहते ....पण तुम्ही मुल इतक्या रात्री इथे थांबून काय करत आहात ..तेव्हा अमित म्हणाला कि आमची गाडी बंद पडलीय ....मग म्हातारी म्हणाली कि तुम्ही इथे क्षणाचा हि विलंब न करता इथून निघा आणि थांबू नका ...ती आता येणार आहे तिची आता वेळ झालीय ...हा घाट नाही हा घात आहे ...ह्या घाटाने बर्याच जणांचे घात केलेत आहेत ....तेव्हा तुम्ही इथून निघा..आणि म्हातारी पलीकडच्या रस्त्याने जाऊ लागली ,तितक्यात प्रकाशचे लक्ष सहजच तिच्या त्या उलट्या वाकड्या तिकड्या पायांकडे गेले आणि प्रकाश च्या अंगातून विजेची तार जशी चमकावी तसे झाले आणि त्याने अमित ला खुणावले तसा अमित हि पाहतच राहिला आणि पुढे अंधारात ती म्हातारी नाहीशी झाली कि कोण देव जाणे....आणि दुसरी कमालीची गोष्ट अशी कि म्हातारी गेल्याबरोबर लगेचच अमित ची गाडी स्टार्ट झाली आणि ते पुन्हा प्रवासाला लागलेत ..खूप वेळ झाला प्रकाश आणि अमित गप्प नि अधून मधून एकमेक्नाकडे पाहायचेत ..मग न राहवून नेहा ने त्यांना प्रश्न विचारला कि काय झालेत तुम्ही दोघे गप्प का आहात?
तेव्हा प्रकाश म्हणाला कि नेहा ती मगाशी भेटलेली म्हातारी मनुष्य नसून भुताटकी होती....तीला वाटले हा मस्करी करतोय मग अमित ने हि सांगितले कि प्रकाश म्हणतोय ते खरेय....त्यावर प्रकाश म्हणाला कि जमेल तितक्या लवकर हा घाट उतार म्हणजे झाले...आणि पुढे रस्त्याला लागून एक स्मशान लागले ...तिथे एक चिथा जळत होती आणि चिथा जिथे जळत होती तिथे त्या लोखंडी रॉड वर एक पांढरीफट लांब केस वाली पिवळ्या साडी मध्ये एक हडळ त्यात पाय सोडून बसली होती आणि मोठमोठ्याने हसत होती ....आणि तिचा आवाज अर्धा पुरुषाचा आणि अर्धा बाईचा असा येत होता....हे पाहून अमित चा हात स्टेरिंग वरून थरथरू लागला होता ...आता ह्या तिघांना काहीच सुचत नव्हते .....क्षणभर प्रकाश ने स्वताला चिमटे काढून पहिले आणि आपण स्वप्न नाही पाहत आहोत हे जाणवले आणि त्याचा आयुष्यात सर्वप्रथम विश्वास बसला कि जगात खरोखर भूत आहेच...आणि वेळ काळ कशी खराब असते बघा ना...अचानक तीच बाई(हडळ) गाडीच्या समोर येउन ठाकली आणि अमित कार्काछ्कन ब्रेक मारलेत ...आणि हेडलाईट च्या प्रकाशात ती बाई समोर तिचे अक्राळविक्राळ रूप धारण करून उभी होती ....तिचा चेहरा पूर्णपणे केसांनी झाकलेला होता आणि तिचे डोळे पूर्णपणे पांढरे फट होते...ती हळू हळू गाडीजवळ येत होती आणि अमित हि हळूहळू गाडी रिवस मध्ये मागे नेत होता ...पण ती बाई सुद्धा हळू हळू पुढे येतच होती ....पण गाडीत जोवर पपई चा कोवळा बांधलाय लाल फड्क्यामध्ये तोवर काही होणार नाही ह्याची खात्री अमित ला होती ...पण ती बाई मात्र अक्राळविक्राळ हास्य करत होती. पुरुष आणि बाई ह्याच्या मिश्र आवाजात मोठमोठ्याने किंकाळी फोडायची...मी नाही जाऊ देणार ,मी नाही जाऊ देणार तुम्हाला...इथे नेहा गाडी मध्येच हे सर्व पाहून बेशुद्ध झाली होती ...प्रकाश ची छाती मात्र जोर जोरात धक धक धक धक करत होती आणि ते त्याला स्पष्ट जाणवत होते ....अंगातून पूर्णपणे जीव निघून गेलाय असे त्याला जाणवत होते ,इथे अमितची हि अवस्था काही वेगळी नव्हती ...प्रकाश इतका बिथरला होता कि त्याने गाडीच लघुशंका केली ....मग अमित ने गाडीच्या सर्व काचा लावून घेतल्या ...केबिन मध्ये देवासमोर अगरबत्ती लावली,गाऱ्हाणे घातले आणि गाडी स्टार्ट केली तशी ती हडळ अजूनच चेकाळली आणि अमित ने कशीबशी गाडी वाकडी तिकडी नेत तीला आरपार केली आणि तरी सुद्धा ती हडळ गाडीच्या काचेवर मोठमोठ्याने हात मारत होती ....अमितचे हाथ नुसते थरथरत होते ,,त्याला धड स्टेरिंग पण धरता येत नव्हते...गाडी पळवायला सुरवात केली आणि कसा बस एकदाचा कशेडी घाट संपला आणि दिवानखावटी गावाच्या पायथ्याशी आलेत ...आणि मग अमित ने जी गाडी बेफाम पळवायला सुरवात केली ती थेट भरणा नका,खेड इथे थांबला आणि रील्याक्स झाला आणि प्रकाश ला धीर दिला आणि शांत केली...इथे नेहा मात्र अजून हि बेशुद्ध होती मग अमित ने तिच्या तोंडावर पाण्याच्या हबका मारला आणि ती शुद्धीव आली .... भरणा नका पेट्रोल पंपावर काही लोकांना घडला प्रकार सांगितला तेव्हा लोकांनी हि त्यांना धीर दिला आणि सर्व हकीकत ऐकून त्यांना मग सांगितले कि हा कशेडी घाटामध्ये वरचेवर अपघात होताच असतात आणि त्यात हि ५-६ महिन्यांपूर्वी एक म्हातारी बाई आणि तिची सून घाटाच्या पायथ्यापाशी मुंबई ला जायला निघाले होतेत आणि त्या एसटीची वाट पाहत होत्या....वाट पाहता पाहता कधी अंधार पडला हि समजले हि नाही ...त्यात तिची सून हि नुकतीच ३ महिन्यंची गरोदर बाई होती ....तितक्यात अचानक २-३ ट्रक वाले काही मदराशी आलेत आणि म्हणालेत कि अम्मा जी कहा पे जाना है...मुंबई जाणा है तो मे छोड देत हु हम भी उधार हि जा रहे है ....म्हातारी ला ते योग्य नाही वाटले म्हणून ती नाही म्हणाली ...मग त्या मद्राशी लोकांना त्यांच्या अविश्वास पाहून अजूनच राग आला आणि तिच्या सुनेला ते जबरदस्ती ट्रक च्या केबिन मध्ये बसवू लागले आणि म्हातारी त्यांना प्रतिकार करू लागली पण त्यांच्या पुढे म्हातारीचा निभाव लागला नाही आणि तिच्या सुनेला त्यांनी गाडीत बसवले आणि निघून गेली...पण बिचारी म्हातारी मात्र त्या ट्रक च्या मागे धावू लागली आणि तिचा तोल जाऊन ती पलीकडे जाऊन पडली आणि समोरून येनाराच्या एका ट्रक च्या चाकाखाली तिचा मृत्यू झाला...ते ट्रक वाले पुढे काही अंतर जाउन थांबले आणि त्या गरोदर बाईवर अमानवी पार्श्वी बलात्कार केला आणि तीला मारून तिथेच सोडून दिले ..आणि त्याच दिवसही पासून त्या मेलेल्या गरोदर बाईचा आत्मा हडळ बनून त्या घाटामध्ये फिरत असतो...नेहमी नाही पण क्वचितच अमवस्या आणि पौर्णिमेला हि घटना घडते ....म्हणून साहेब तुम्हाला एक सांगतो कि जर तुम्ही कधी कोणता घाटामधून प्रवास करत असाल तेव्हा घाट सुरु होण्याआधी प्रत्येक घाटाच्या आधी पायथ्यापाशी एक मंदिर लागते...हो प्रत्येक घाटा मध्ये एक छोटेसे मंदिर असतेच...ज्या त्या जागेवाल्याचा मान असतो ....आणि मंदिरात पाया पडून दर्शन घेऊन आमचा प्रवास सुखाचा होवो अशी प्राथर्ना करावी ....विचाराने मती गुंग झाली होती पण तरीही अमित ने थोडा धीर सावरला आणि कसाबसा सकाळी ८ वाजता गावी राजापूर ला पोहोचला .
निष्कर्ष: तर मित्रानो हि होती आजची कथा आणि हो हि खरी खुरी घडलेली कथा आहे...कोकणातील मुंबई गोवा हायवेवरील कशेडी घाट हा आजही डेंजर मानला जातो कारण दिवसागणिक तिथे अपघात होत असतात आणि मेलेले तृप्त आत्मे वास करून असतात...असे म्हणतात कि अजून हि केव्हा तरी कशेडी घाटा मध्ये एक पूर्ण पांढरे वस्त्र घातलेला माणूस गाडीच्या समोर येउन गाडी अडवतो...माहिती करून घायायची असल्यास पोलादपूर किवा खेड कशेडी इथले गावचे कोण तुमचे ओळखीचे असेल त्यांना विचारून घ्यावे ....आपण म्हणतो तसे नसते पण घाटामध्ये हि असे अनेक भयानक अनुभव प्रत्येकाला येत असतात...पण वेळकाळ चांगली असेल तर तो देव हि आपल्या पाठीशी असतोच...
समाप्त.
नमस्कार माझ नाव नेहा कदम आहे....
हा किस्सा माझ्या वहिनीने मला सांगितला होता, तो मी तुम्हाला सांगत आहे...
माझ्या वहिनीचं नाव अर्चना, ती माझी सगळ्यात आवडती व खुपच चांगली मैत्रीण सुद्धा आहे, त्यामुळे ती तिच्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करते. तिला मी एकदा MHE Page वाचायला दिला होता आणि तिला तो आवडला सुद्धा. एकदा मी तिच्याकडे गेले असताना तिने हा किस्सा मला सांगितला...
अर्चू वहिनी लहान असताना एकदा तिच्या फ्रेंड्ससोबत खेळत होती. तेव्हा ती तिच्या माहेरच्या गावी म्हणजेच वडूज येथे राहायची. त्यावेळी लपाछपी खेळताना अर्चू वहिनी एका पडिक घरात लपली होती. ते घर बाकी घरांपासून थोडे लांब होते व पडझडीला आले होते. कोणीच तिथे राहत नव्हते. अर्चू वहिनी त्या घरात लपली होती, आत एका भिंतीला टेकून बसली होती. अचानक तिला तिच्या समोरील भिंतीला एक आंधळा माणूस टेकून बसलेला दिसला. तो रडत होता, ओरडत होता. वहिनीला भीती वाटली म्हणून ती उठू लागली तर तिला उठताच येईना. जणू ती जागेवर पुतळ्यासारखी स्तब्ध झाली होती. ती खूप घाबरली, रडू लागली, ओरडू लागली तसा तो आंधळा माणूस अजूनच जोरजोरात रडू लागला. तो सारखा काहीतरी बडबडत होता, की तुम्ही मला फसवलं, मी तुम्हाला सोडणार नाही...इथे संध्याकाळ झाली तरी अर्चू वहिनीचा काहीच पत्ता नव्हता. तिच्या आई-वडिलांनी तिला सगळीकडे शोधले पण व्यर्थ. नंतर त्यांना कळाले की ती त्या पडीक घरात शिरली होती. तिचे बाबा सरळ त्या दिशेने गेले. काही लोक त्या घराबाहेर उभे होते. तिचे बाबा आत शिरताच त्यांना अर्चू वहिनी दिसली. ती एका भिंतीजवळ जमिनीवर पडली होती. चेहरा जमिनीवरील मातीने खराब झाला होता, आणि ती सारखं "आई-बाबा, आई-बाबा" असे ओरडत होती. तिचे बाबा तिला घरी घेऊन आले, पण त्या प्रसंगानंतर तिला खूप ताप भरला. बरे झाल्यानंतर तिने घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. सगळेच घाबरले. आणि तेव्हापासून कोणी लहान मूल त्या घराकडे फिरकत ही नाही.
अर्चू वहिनीने सांगितलं की तो जो आंधळा बाबा होता त्याचे ते घर होते. त्याची इच्छा होती की तो मेल्यानंतर त्याच्या घरासमोरच पुरावे, पण तो मेल्यानंतर माञ लोकांनी त्याला स्मशानात नेऊन त्याचा अंत्यविधी केला. म्हणून तो असा ञास द्यायचा, लोकांना दिसायचा. त्याच प्रेत उचलून नेताना ते इतकं जड झालेलं की लोकांना ते आवरणं पण कठीण जात होतं असं म्हणतात. जाऊदे, त्याचं जे झालं ते झालं पण माझ्या अर्चू वहिनीला काही नाही झालं ही देवाचीच श्रद्धा...
आभार...
नमस्कार मी विशाखा कदम बर्याच दिवसानंतर तुमच्यासमोर आज एक भयकथा सादर करतेय 
-----------------------
ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार
हॉवं आई वंडर व्हाट यू आर 
अप अबव द वर्ल्ड सो हाई 
लाईक अ डाईमंड इन द स्काय
..
ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार
हॉवं आई वंडर... एका लहान मुलीचा आवाज तिच्या कानात घुमत होता ....
त्या लहानश्या मुलीच्या मोठ्या आवाजाने तीच डोक भिंभिनत होत ... 
डोळे घट्ट मिटलेले होते .. चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट जाणवत होता ... 
तो एकसारखा घुमणारा आवाज तिला इतका छळत होता कि आपले दोन्ही हात आपल्या कानावर करकचून आवळून घेत ती ओरडली "बास्सस्स्स "... तिच्या आवाजाने शेजारीच झोपलेल्या सुप्रियाला जाग आली .. 
सुप्रियाने पटकन खोलीतले दिवे लावले आणि तिने अमृताकडे पाहिलं तेव्हा अमृताची स्थिर पण घाबरलेली नजर तिला दिसली तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले होते ...श्वासांचा वेग वाढला होता आणि दरदरून घाम हि फुटला होता ...
"अमृता, काय झालं?" सुप्रियाने तिच्या जवळ सरकत आणी तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला विचारल ... तिच्या चेहऱ्यावर जमलेल घामाचं पाणी सुप्रियाने पुसलं .....अमृताने क्षणभर सुप्रियाकडे पाहिलं आणि ती सुप्रियाला बिलगून रडू लागली 
" ताई .. नाही सहन होत ग हे मला " रडत रडतच ती म्हणाली ..
"आज पुन्हा ते स्वप्न पाहिलंस ना?" सुप्रिया तिच्या डोक्यावर हळुवार हात फिरवत म्हणाली.
"हो . ती पुन्हा आली होती आज...मला खूप भीती वाटते ग तिची ..ती मारुन टाकेल मला .. ताई" अमृताच्या बोलण्यातला वेग वाढला होता ...सुप्रिया तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती ...पण अमृता इतकी बिथरली होती कि तिला सावरण कठीणच जात होत ..
आपल्या लहान बहिणीची हि अशी अवस्था खरतर तिला पाहवत नव्हती .... अमृताला नेहमीच असा त्रास होत होता ... तिच्या स्वप्नात एक साधारण ३ -४ वर्षाची मुलगी तिला दिसते ... तिच्या भोवती फिरते ... तिच्या नजरेतली ती भयाणता ..तिच्या आवाजातली वेदना तीच मधेच हसण. मधेच रडण...सगळ सगळ अमृताने तिला सांगितलं होत ...तिच्या सुरुवातीला ह्या भयानक स्वप्नाकडे सुप्रियाने दुर्लक्ष केल होत ... पण आता मात्र हेच स्वप्न अमृतच आणि सुप्रीयाचही डोकेदुखी ठरत होत ...सुप्रियाने हि गोष्ट तिच्या आणखीन एका मैत्रिणीला सांगितली होती पण त्या मैत्रिणीने ते हसण्यावारी घेतलं होत आणि म्हणून अमृताचा हा त्रास इतर कोणाला कळू नये अस सुप्रियाला वाटत होत ..पण दिवसेंदिवस हा त्रास वाढतच चालला होता ... अमृताच्या मनातल्या त्या मुलीच्या दहशतीने अमृता खूप बावरून असायची .. झोपण्याची हि भीती वाटायची कारण झोपेत पुन्हा त्या मुलीचं चित्र तिला छळायला समोर यायचं ... अस नेहमीच व्हायचं अर्ध्या रात्रीच अमृता झोपेतून ओरडत उठायची आणि तिथून पुढची रात्र बावरून थरथरत ती सुप्रिया जवळ बसून राहायची ...अमृतासाठी काहीतरी करणं गरजेच होत .. पण काय? 
सुप्रियाला कळत नव्हत ...... अस का होत होत अमृताला?... रोज एकच स्वपन पडण्यामागे नक्की काय असेल? त्या स्वप्नाचा नेमका अर्थ काय? कोण असेल ती लहान मुलगी? तिचा अमृताशी काय संबंध? प्रश्न बरेच होते उत्तर मात्र एकाच हि सापडत नव्हत ....हा गुंता तिला सोडवायचा होता पण त्या गुंत्यात आपण इतके गुंतत जातोय कि इतर लोक आपली थट्टा करू लागलेत.. आपल्यात हसू लागेलत हे हि तिच्या ध्यानात येत होत ... पण अमृतचा त्रास तिला कळत होता ...
इतरांना त्याची जाणीव काय असणार ... अस तिला वाटायचं .... जगातला स्वार्थीपणा तिला लोकांच्या हसण्यात दिसायचा ....म्हणून ती सुद्द्धा जगाची फिकीर करायची नाही ...तरीही काही लोकांनी अमृताला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता ....आणि तो सुप्रियाला पटला हि ...त्यानुसार अमृताला बर करण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले होते ... पण अमृता तिच्या प्रयत्नांना साथ देतच नव्हती ....डॉक्टरकडे जाण्यास, स्वतःवर treatment करून घेण्यास अमृताचा नकार असायचा इतकच काय तर ती घरातून हि बाहेर नाही पडायची तसेच बाहेरच हि कोणी घरी येऊ नये असा तिचा आग्रह असायचा ...... अस का ते सुप्रीयालाही कळत नव्हत ....पण काहीतरी कराव हि गरज होती .... आपल्या आयुष्यात अस कोणीतरी असताच कि ज्यांना आपण आपल्या आयुष्यातल्या बर्याच गोष्टी सांगत असतो .... सुप्रियाच्या आयुष्यात हि अशी एक व्यक्ती होती ... अनिश ज्याच्याशी तिची ओळख facebook वर झाली होती ... ओळख आणि मैत्री 
ह्या नात्यातून प्रेम ह्या एका नव्या नात्याचं निर्माण हि होत होत....अनिश तिच्या आयुष्यातला अमृता नंतरचा दुसरा महत्वाचा व्यक्ती ... अर्थात तिने हा अमृताचा विषय हि अनिशला सांगितला होता .. पण जगातल्या इतर लोकांप्रमाणे अनिशने हि नंतर ह्या विषयाला टाळाटाळच केली होती ... का कोणास ठावूक लोकांना अमृता हा विषय खटकायचा ....
" ताई तू पण ह्या जगासारख माझ्याकडे पाठ नाही फिरवणार न ?'अस एकदा अमृतानेच विचारलं होत आणि चटकन सुप्रियाच्या डोळ्यात पाणी आल ... ती अमृताला बिलगली 
"नाही ग बाळा , मी तुझ्यासोबतच असेन ...." स्वताच्या डोळ्यातले आसू पुसत तिने रडणाऱ्या अमृताला शांत केले ....
अमृताचे अश्रू सुप्रियाच मन हेलावून टाकायचे ... तिला ह्या इतर गोष्टीचा त्रास होऊ नाही द्यायचा अस तिने ठरवलं होत ... आणि म्हणून सुप्रिया आपला सगळा वेळ अमृताला द्यायची ...तिला हसवण्याचा प्रयत्न हि करायची ... 
तिचा हट्ट आणि तिची आवड ह्या गोष्टींची सुप्रिया पूर्तता करायची .... तिच्या वाढदिवशी नवा ड्रेस तिने अमृतासाठी आणला होता ... त्या दिवशी दोघींनी खूप enjoy केला ... अमृता सोबत तिने फोटो हि काढले .. ... "छान आलेत ना फोटो" तिने अमृताला विचारलं आणि अमृताही हसली ...
तिच्या हसूच समाधान सुप्रियाच्या चेहऱ्यावर झळकल ....अमृताचा छान मूड पाहून तिने अमृताला विचारलं
" अमृता तुझ्या स्वप्नात येणारी ती लहान मुलगी दिसते कशी ग ?" सुप्रियाने विचारलं .. आणि अमृताच्या चेहर्यावर भीतीचे भाव उमटले 
.. "ताई नको ग तिची आठवण काढूस .." अमृता चेहरा पाडत म्हणाली .....
" बर बाळा जाऊदे ... तू हस बघू " सुप्रियाने चेहऱ्यावर हसू आणल .. पण अमृता हसलीच नाही ... 
" अए बाळा काय झाल?' सुप्रियाने विचारलं ... 
" ताई ... तुला माहितीये का ग काल माझ्या स्वप्नात ती मुलगी रडत होती .... मला थांब बोलत होती ... माझ्याशी बोलायचं अस हि म्हणाली ...पण मला खूप भीती वाटते ग तिची " अमृता शांतपणे म्हणाली ..
" अग बाळा लहान असेल ना ती तुझ्यासारखीच मग त्यात घाबरायचं काय?... तू एक काम कर बोल तिच्याशी हा .....तिच्याशी friendship केलीस ना कि नाही भीती वाटणार तिची तुला " तिच्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवत सुप्रिया म्हणाली ...
अमृता ताई ने सांगितलेल्या विचारात गर्क होती कि अचानक तिच्या कानावर आवाज पडला ....
ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार
हॉवं आई वंडर व्हाट यू आर 
अप अबव द वर्ल्ड सो हाई 
लाईक अ डाईमंड इन द स्काय
" ताई....ए ताई .... ती आलीय बघ .. अग इथे आलीय ती ... " अमृता घाबरत थरथरत सुप्रियाला म्हणाली ...
"अमृता काय झाल ... कोणी नाहीये इथे .. " सुप्रिया इकडे तिकडे पाहत होती ...
" ताई ती इथेच आहे ... बघ ती बघतेय माझ्याकडे एकटक ....मला भीती वाटतेय ग ..ताई " अमृता सुप्रियाच्या पाठी लपत म्हणाली ... भीतीने तीच अंग गारठल्या सारख सुप्रियाला जाणवलं .... 
" कुठेय कोण ?... कुठे दिसतेय तुला?" सुप्रियाने विचारलं ....
" ते बघ तिकडे ... अमृताने एका ठिकाणी बोट दाखवत म्हणाली ".... सुप्रियाने त्या दिशेला पाहिलं .. आणि खटकन दरवाज्याचा आवाज आला ... दरवाजा बाहेरून बंद झाला ..... जोराचा वारा सुटला ... घरातल्या खिडक्या आणि दरवाजांची उघडझाप होऊ लागली .... अमृताच्या स्वप्नातलं अमृताने सत्यात पाहिलं होत आणि ते कितपत सत्य आहे हे थोडस सुप्रियाने हि अनुभवलं होत ...
हळू हळू सगळ पूर्ववत झाल ... आणि सुप्रियाने दरवाजा ओढला ... दरवाजा उघडला गेला आणि एक धुराचा भपकारा तिच्या नाकातोंडात गेला ..... तिने पाहील एक मंत्र पुटपुटत एक मांत्रिक आतमध्ये शिरला ....त्याला समोर पाहून सुप्रिया हि बिथरली त्याच्या पडणार्या पाऊला सोबत ती मागे मागे सरकू लागली ...... त्या मांत्रिकाची तीक्ष्ण नजर सुप्रियाच्या डोळ्यात शिरली होती ... आणि त्या भेदक नजरेने तिला अस्वस्थ केल होत ....मांत्रिकाच मंत्र म्हणन सुरूच होत...आणि सुप्रिया दात ओठ खात त्याच्याकडे पाहत होती ....गुरगुरत होती ...हातात भेटेल ती वस्तू त्यच्या दिशेने फेकून मारत होती ... ताईची हि अवस्था पाहून अमृता हि त्या मांत्रिकाला घाबरारली .. आणि रडू हि लागली .... तिला रडताना पाहून सुप्रियाला राग अनावर आला ती धावतच त्या मांत्रिकाच्या अंगावर गेली पण पुन्हा त्याच वेगात मागे फेकली जाऊन भिंतीवर आदळली ....शरीरातलं त्राण गेल ...केस विस्कटून पूर्ण चेहरा झाकला गेला ....पण तरीही तिचं गुरगुरण सुरूच होत........मांत्रिकाने तिच्या भोवती एक वर्तुळ आखलं.... यादरम्यान तिथे आणखीन एक व्यक्ती आली .... मांत्रिकाने पाहिलं अनिश होता तो .... आणि त्याच्याच सांगण्यावरून तो मांत्रिक इथे आला होता .. तो आत शिरला ... सुप्रियाची अवस्था पाहून त्याचे हि डोळे पाणावले ... पण तिच्यासाठीच करत होता तो सगळ ......
" अनिश ह्या मुलीला बाजूला घे " मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे त्याने अमृताला बाजूला केले ... अमृताच रडण वाढल होत ... त्या वर्तुळात सुप्रिया खूपच हैदोस घालत होती... स्वतःला बडवून घेत होती ... त्या वर्तुळातून तिला बाहेर यायचं होत पण येताही येत नव्हत ...
" बोल .. कोण आहेस तू ?"बोल ... या मुलीशी तुझा काय संबंध .?".. तो मांत्रिक आवाज चढवत म्हणाला ...
सुप्रिया गुरगरत होती ... मानेने नकार देत होती ...." मांत्रिकाने हातात
कसलीतरी राख घेऊन तिच्या दिशेने फुंकली तशी तिच्या वर्तुळाभोवती आगीचा भडका उडाला .... आग पाहून सुप्रिया आणखीनच बिथरली .....अनिश हे सगळ श्वास रोखून पाहत होता . ....
त्याच्या डोळ्यातल पाणी आटलं होत ...अमृता हि मधेच रडायची ....
" बोल ... कोण आहेस तू ?..." पुन्हा मांत्रिकाने विचारलं .... यावेळेस " अनिता ssss " असा एक वेगळाच जाड ओरडण्याचा आवाज सुप्रियाच्या तोंडातून आला .....अनिश अवाक होऊन तिच्याकडे पाहत होता ..
" कोण अनिता ?.... का आलियस इथे ? .. आणि हि मुलगी कोण आहे तुझी?".... मांत्रिकाने पुढचे प्रश्न भराभर विचारले 
" सांगते .... सगळ सांगते ....." इतकच बोलून सुप्रिया शांत झाली तिने मान खाली झुकवली आणि ती तिथेच निपचित पडून राहिली ...तिच्या शरीरातलं अनिताच अस्तित्व बाहेर आल होत ... एक साधारण सुप्रीयाच्याच वयाच्या असणार्या मुलीची म्हणजेच अनिताची तिची पंढरी शुभ्र आकृती होती ....सुप्रियाच्या शरीरात अनिताच अस्तित्व होत हे आता स्पष्ट झाल होत....अनिताची आकृती सुप्रियाच्या शरीरारातून बाहेर आली ...त्या आकृतीच्या डोळ्यात आता कसलीच क्रूरता नव्हती .... उलट काळजी दिसत होती ..... तिने एकटक अमृताकडे पाहिलं ......
" मी अनिता अमृताची मोठी बहिण ...मी सगळ सांगते तुम्हाला ... पण मला काही करू
नकोस ... मी वाईट नाहीये ... मला तुझ्याशी लढण्याची हि ताकद नाहीये ..... मला फक्त माझ्या बहिणीची काळजी वाटतेय ...तिच्या आयुष्यात तिची काळजी घेणारं माझ्याशिवाय कोण नाहीये .... अमृता एक मानसिक रोगी आहे .... माझा खूप जीव आहे तिच्यावर ....आमच दोन बहिणीच कुटुंब आहे .आई बाबा गेल्यावर मीच संभाळल तिला ... पण माझ आयुष्य अचानक एका अपघाताच निम्मित साधून हिरावलं गेल ....शरीर त्या अपघातात संपल होत .. पण अमृताच्या काळजीने जीव अजून हि घुटमळत होता ....... इतक बोलून ती थांबली ....
सगळेच थोडा वेळ शांत झाले 
" पण सुप्रियाच्या शरीराचा ताबा घेण्याच कारण?" मांत्रिकाने विचारलं 
" अमृताच्या काळजीने माझा आत्मा चिंतेत होता ...सुप्रिया माझी कोलेज फ्रेंड... तिच्याशी माझ कसलच वैर नाही ...पण ती एकटी राहते हे माहित होत मला .... आणि म्हणून अमृतासाठी मी तिच्या शरीराचा आसरा घेतला.....यातून मला सुप्रियाच वाईट नव्हत करायचं .... पण माझ्या बहिणीच्या काळजीपोटी मी .....".....ती पुन्हा बोलता बोलता थांबली ....
" तू एका आयुष्यासाठी दुसर्या आयुष्याचा ताबा घेतलास ...स्वार्थी आहेस ग तू ..." अनिश म्हणाला ...." मला माफ कर अनिश ... " अनिताच्या ओठातून शब्द बाहेर पडले ...
" तुला माफ करण्याच काही कारण नाही ....तू सुप्रियाच आयुष्याचा खेळ करून एक गुन्हा केलास ... आणि तरीही तुला त्या गुन्याची शिक्षा मिळावी अस नाही वाटत ....पण मला अस वाटत तू इथून दूर निघून जाव ....अमृताच आयुष्य चांगल होईल याची मी हमी देतो ....बहिणीसारख संभाळेण " अनिश हात जोडत म्हणाला ... अनिताच्या डोळ्यातलं पाणी टपटपल ... मांत्रिकाने तिला त्या वर्तुळातून बाहेर काढलं....आणि ती अमृताजवळ गेली .... अमृता तेव्हा शेवटची अनिताला बिलगली .... तिच्या डोक्यावर शेवटचा हात फिरवत ती हवेत विरून गेली.... जाताना एक समाधानाच हलकस हसू तिच्या ओठावर होत ........
....थोड्या वेळात हळू हळू सुप्रिया शुद्धीवर आली .... तिच्यासमोर कोणीतरी होत ... कोण होता तो??
अनिश .... ??
" HI सुप्रिया .... कशी आहेस ?..." सुप्रिया पटकन उठलीच .तिचं डोक जड झाल होत ...
" काय झालंय...मला ?" सुप्रियाने विचारलं ....
" काही नाही बाळा... थोडी घेरी आली होती तुला .. तू आराम कर " अनिश तिच्या कपाळावर ओठ टेकत म्हणाला .......
" हि मुलगी ....?" तिने प्रश्नार्थक नजरेने अमृताकडे पाहत विचारलं ....
" oh sorry .... she is my sister ..अमृता " अनिश हसत म्हणाला ....
अमृता तिच्याकडे पाहत होती एकटक कारण रोज दिसणारा ताईचा चेहराच बदलला होता ..............
त्यादिवसानंतर अनिशने अमृताला सख्या बहिणी सारख संभाळल ......
तिची treatment केली .... आणि काही महिन्यात ती बरी हि झाली ......बहिणीच्या येण्याने त्याच आयुष्य खुललं होत ... आणि त्यात तिचं आजारपण गेल्याने तो जास्तच समाधानी होता ... आज तो ऑफिसला आला होता आणि त्याचा फोन खणाणला .... त्याने पाहिलं घरून फोन होता ...
" हा अमृता बोल g. .." तो फोन उचलत म्हणाला .....
" दादा ... दादा ती आलीय इथे ...." काहीश्या घाबऱ्या आवाजात अमृता बोलत होती ..
" अमृता .... काय झाल ?... बाळा कोण आहे तिकडे..." अनिश ने काळजीत आणि घाईत विचारलं ....पुढचा आवाज कानावर पडला 
"ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार
हॉवं आई वंडर व्हाट यू आर 
अप अबव द वर्ल्ड सो हाई 
लाईक अ डाईमंड इन द स्काय"
क्षणभर शांतता .......आणि अचानक समोरून हसण्याचा आवाज आला ....
" ए येडू सुप्रिया बोलतेय रे ...घाबरलास न "
" तुझ्या तर ..... सुप्रे "..इतकच बोलून तो खळखळून हसला ....
इकडे सुप्रिया आणि अमृताही हसत होत्या .... आणि त्यांना दुरून पाहताना अनिताच्या ओठांवर हि समाधानाच हसू आल होत .. .....
पोलिस चौकी...
नमस्कार मित्रांनो... आज मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती साधारणता 30 वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी आम्ही सीबीडि बेलापुर येथे पुलिस कॉर्टेर्स मधे राहात होतो. ही स्टोरी मला माझ्या काकांनी सांगितली होती. माझे काका पोलिस दलात असल्याने त्याना केव्हाहि वेळ प्रसंगी ड्यूटी वर जावे लागत असे. एक दिवशी रात्रि त्याना वायरलेस वर संदेश आला की एका ठिकानि मर्डर झाला आहे तर टाबोडतोब पंचनाम्या साठी जावे आणि सकाळ पर्यन्त बॉडी संभाळणे. ते सोबत एक पोलिस शिपाई ला घेऊन घटनास्तळी पोहोचले तर एक माणुस जंगलात मरुन पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर असंख्य ओरबडलेल्या खुणा होत्या. ते काम कोणा माणसाचे वाटत नवते. त्यावेळी लगेच गाड्या माणसे उपलब्ध होत नसत आणि मोबाईल पण नवते. रात्र खुप झाल्याने आणि जंगल असल्याने बॉडी च्या रक्षणाकरीता त्याना तिकडेच थांबणे भाग होते. त्या जंगला बद्दल त्यानी खुप दंतकथा ऐकल्या होत्या पण त्यांचा नाइलाज होता. रात्रि अचानक त्यांना वायरलेस वर सन्देश आला की त्यांच्या बरोबर असलेल्या पोलिसांच्या वडिलांची तब्बेत बिघडल्या मुळे त्याला घरी बोलावल होते. तत्पूर्वी त्यानी ठरवले की जंगलतील जवळील चेक पोस्ट मधे ती बॉडी ठेऊन ते तिथे बसणार होते. चेक पोस्ट वर रात्रि 8 नंतर कोणी थांबत नसे पण जंगलात थांबण्या ऐवजी तिथे थांबणे सुरक्षित असल्याने त्यांनी पंचनामा करून बॉडी तिथे नेली. तो दूसरा पोलिस काकांची स्कूटर घेऊन लवकरच येतो असे म्हणून निघुन गेला. आता माझे काका आणि ती बॉडी असे दोघेच त्या भयानक जागेत उरले होते. माझ्या काकांचा रात्रि अचानक डोळा लागला होता तोच कसल्यातरि आवाजाने त्याना जाग आली. त्यांनी आजुबाजुल पाहिले तर त्याना अंधारात दोन लाल अंगारे सारखे चमकताना दिसले. त्यानी घबरून ब्याटरी पाडून पहिली आणि पाहतात तर काय तो मेलेला माणूस उठून बसला होता आणि काकांकडे भेदक अशा नजरेने पहात होता. ते पाहून काका खुप घाबरले तेव्हा तो दांत विचकाउंन म्हणाला की बरा सापडलास. तो आवाज त्याना जरा ओळखीचा वाटत होता. तेव्हा त्याना आठवले की काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या ऐनकाउंटर मधील एका आरोपिचा आवाज तसाच होता. त्यांनी बन्दुक चाचपडली पण ती मिळाली नाही. काका खुप घाबरले होते पण हे अस कस हेच त्याना कळत नवते. पण प्रसंगावधान दाखउन काही काळायच्या आत ते उठले आणि चौकिच्या बाहेर पडून त्यानी बाहेरून दाराला कड़ी घातली. तर दरवाज्यावर आतून धप धप असे आवाज येत राहिले. जिव मुठित धरून काका बाहेरच पहारा देत देवाचा धावा करीत राहिले. सकाळी उजाड़ता उजड़ता तो पोलिस परत आला आणि तेव्हा त्याला काका बाहेर बेशुद्ध अवस्तेत दिसले. तोंडावर पाणी मारताच त्याना शुद्ध आली. तो पोलीस म्हणाला की त्याच्या वडिलांना काहीच झाले नवते कोणीतरी मस्ती केलि होती. नंतर त्यांनी दरवाजा उघडून पहिला तर तिथे ती बॉडी नवती. त्या दोघांना आचर्य वाटले. त्यानी कंट्रोल रूम ला तसे कळवले तर त्यांना अजुनच आचार्याचा धक्का बसला की तिथून असा सन्देश आला की अशा कुठल्याही प्रकारचा मर्डर चा सन्देश त्यांनी कुठेही प्रसारीत केला नवता....
.... धन्यवाद
... अंकुश नवघरे...
आमच सेल्समन च काम असल्याने मार्केटिंग साठी बाहेर गावीही जाव लागत असे. त्यातच दिवाळीचा सीजन म्हणजे कामातुन वेळेच भानच रहात नसे.. आज तर खुप लोकांच्या भेटी झालेल्या आणि शेवटच्या इसमाची भेट रात्रि आठ वाजता घेऊन मी घरी परतायला लागलो पन एकही जागा ट्रैव्हल्स मधे शिल्लक नव्हती आणि दिपावलीच्या सुट्ट्या पडल्याने एस.टी पन फुल्ल होत्या...आज नाईलाजान इथच एखाद्या हॉटेल मधे रहाव लागणार होत... आजुबाजुला एखादा लॉज भेटतो का पाहील पन व्यर्थ ...रस्त्याकडेला उभ रहात एका रिक्शा ला हात केला तस माझ्या पासुन थोड पुढ जात तो थांबला... त्या रिक्शाच्या मागे एक वाक्य लिहील होत...
" डोळ्यांनी दिसत ते सत्य असेलच अस नाही.."
दुर्लक्ष करत मी त्या रिक्शावाल्या व्यक्तिला रहायला जवळ एखाद हॉटेल आहे का विचारल तस मला घेऊन तो एका लॉज च्या दिशेने निघालो.. रस्ता थोडा सुनसानच होता.. थंडी पडु लागली होती आणि रस्त्यावरची वर्दळही खुप कमी झालेली... अचानक काहीतरी बिघडले तशी रिक्शा रस्त्याकडेला ऊभी करत उतरुन मला म्हणाला...
" तीच्यामारी......पंक्चर झाली राव..."
आजचा दिवसच बेक्कार होता माझ्यासाठी तसा मी काही बोलणार तोच तो पुढे म्हणाला... " साहेब खुप वेळ लागेल .. इथुन थोड्या अंतरावरच काही लॉज आहेत... "
त्याच्या भावना समजुन घेत पैसे दिले आणि ११ नंबरची बस पकडून निश्चित ठिकानाकडे निघालो..
काही अंतरावरच एक जुना गंज चढलेला बोर्ड दिसला... Welc#‪#‎e‬ लॉज... मधली दोन तीन अक्षर नाहीशी झालेली.. त्यावर एक छोटा अंधुक बल्ब आपल्या परीन त्यावरील लिखान ये जा करणा-या लोकांपर्यन्त पोहोचवण्याच काम करत होता... जेवणाची, रहाण्याची उत्तम सोय....देवाला हात जोडले..
समोरच एक छोटसा बंगला टाईप घर टाईप चाळ टाईप म्हणजे हे बांधणा-या आर्किटेक्ट च्या डोक्यात नेमक काय होत हा संशोधनाचाच भाग होता... आजुबाजूला थोडी लहान मोठी नरळीची, आंबा आणि अशोका ची झाडे, म्हणजे लांबुन बंगला वाटत असला तरी कौलारु घर असल्यासारखे बांधकाम आणि समोरून पाहिल तर मधे तो बंगला आणि दोन्ही बाजुला छोट्या छोट्या कौलारु खोल्या, खोल्यांच्या बरोबर समोर लांब अशी चार फुट ऊंचीची भिंत यामधुन दोनच माणस चालू शकतील एवढसच अंतर...
गेट मधुन आत गेलो तसा उघड्या दरवाजातुन मधुन आतल्या ट्युबचा किंचीतसा प्रकाश बाहेर येत होता... समोर एका वयस्कर इसम काउंटर शेजारी दिसले.. एक मळलेल स्वेटर, डोक्याला मफलर, पांढरी विजार आणि डोळ्यावर बाबा आझमच्या जमान्यातला चष्मा... मला पहाताच मान थोडी वर केली तसे मी येण्याच कारण सांगितल.. पैसे हाती दिले तसे शेजारच्याच जुन्या अशा टेबलच्या ड्राव्हर मधुन एक किल्ली काढुन मागे येण्यास खुनावले... आपली बैग सावरत त्याच्या मागुन चालु लागलो... तोच समोर नजर जाताच काळजाचा ठोकाच चुकला... एक साठ पासष्ठीची वयस्कर म्हातारी बाई आमच्याकडे पहाताना दिसली. तीला अस अचानक समोर पहुन मी जवळ जवळ दचकलोच ... पुर्ण निष्तेज पांढरा पडलेला चेहरा, पांढरे मोकळे केस, कपाळावर गडद्द मोठ लाल कुंकू, हिरवी गार साडी आणि किलकील्या खोलगट डोळ्यांखाली गडद्द काळी वर्तुळे...कदाचित हे दोघे पतीपत्नी असावेत...
" काही खायला करायच का...??" तीन भरड्या आवाजात विचारल... तस मी म्हणालो
" नाही...... नको...... मी खाऊनच आलोय...."
माझे शब्द ऐकताच त्या वयस्कर व्यक्तिन किंचितशी मान मागे माझ्याकडे वळवली आणि म्हणाला...
"ती मला विचरतेय..." आणि पुन्हा आपल्या बायको कडे पहात " हां .." एवढ मोजक बोलुन चालू लागला तसा मी ही त्याच्या मागुन निघालो
जिन्याच्या पाय-या चढत आम्ही पुन्हा लांब अशा चाळी सारख्या वाटणा-या खोल्यांपाशी आलो... मी चालता चालता पाहु लागलो तस लक्षात आल की प्रत्येक खोलीला कुलूप लावलेल होत... तस थोड विचित्र वाटल, मघापासुन ईतकी hotels पाहिली की एकही रूम शिल्लक नव्हती आणि इथ एकही रुम कोणी घेतलेली नाही .... पन शहरा पासुन थोड दुर असल्याने कोणी इकड येत नसाव असा मनाला दिलासा देऊ लागलो...
तो एक रुमशेजारी थांबला आणि कुलूप काढून किल्ली माझ्या हाती देत त्याच्या नुसार महत्वच्या सुचना देऊ लागला.. मी मान डुलवत मनात म्हणालो...' मला आजची रात्रच रहायच आहे .... खरेदी पत्रक नाही करायच...'
सुचना संपऊन तो माघारी फिरला..
दिवसभर खुपच त्रास झालेला त्यामुळे मी बैग बाजुला ठेऊन सरळ बेडवर आडवा झालो.... पन लगेच आराम करुन चालणार नव्हत... खुपसारी बिल तयार करायची होतीत... तसाच उठून बाथरूम मधुन फ्रेश होऊन आलो आणि लैपटॉप ऊघडून काम चालू केल... अचानक कोणीतरी रुमच्या बाहेर उभ असल्याच जाणवल... खुप वेळ मला ती चाहुल जाणवतच होती... घड्याळात पाहील तर रात्रिचे बारा वाजुन गेलेले... कसलाच आवाज न करता मी लैपटॉप बेडवर ठेवला आणि हळुच खाली उतरत दरवाजाच्या दिशेने चालू लागलो... एक जिवघेणी शांतता रूममधे पसरली होती... भिंतीवरील त्या घड्याळाचे काटे स्पष्ट ऐकु येत होते... दरवाजा पलीकडून येणारी चाहुल अजुनही जाणवत होती... दरवाजाच्या एकदम जवळ जात हळुच हात दरवाजावर टेकवत मी डावा कान दरवाजाला चीकटवुन पलकडे होणारी हलचाल ऐकु लागलो...कोणीतरी बाहेर उभ होत... त्याच्या श्वासाचा आवाज आणि एखद्या हिंस्त्र श्वापदासारखी घरघर मला स्पष्ट ऐकु येत होता... बहेरून येत असलेली ती भयंकर, विचित्र चाहुल या मुळे माझ्या काळजाची धडधड मात्र प्रत्येक क्षणाला वाढत होती.. पन थोडा धीर एकवटून मी key hole मधुन काही हलचाल दिसते का ते पाहु लागलो... पन काहीच दिसत नव्हत... तो घरघरणारा आवाज माझ्या रूमपासुन थोडा पुढ जात असल्यासारख वाटू लागल... तसा कोणाताही आवाज न करता एकदम शिस्तीने दरवाजा उघडला आणि मान किंचितशी बाहेर काढून आवाजाच्या दिशेने पाहू लागलो, पन कोणीच नव्हत... फक्त एक कमालीची दुर्गधी आणि जीवघेणी थंडी इतकच स्पष्टपने जाणवत होत... बाहेरील व्हरांड्यात एक अंधुकसा बल्ब तेवढाच होता... बाहेर कोणीच नव्हत हे पाहुन थोड विचित्र वाटलच आणी भितीही वाटू लागली, आजुबाजूला पहात मागे परतलो..
आत येऊन रुमचा दरवाजा निट बंद करून घेतला. तोच माझी खास मैत्रीण प्रियाचा call आला.. लैपटॉप वरुन video calling नेहमीच आणि रोजचच असायच.. त्यात तीच्या college ला ही सुट्ट्या असल्याने बोलताना वेळेच भानच रहायच नाही.... चेह-यावरची भिती लपवत तीच्याशी बोलु लागलो..नेहमीच्या गप्पा चालु झाल्या... आमच्या गप्पा रंगात आल्याच होत्या की बोलता बोलता अचानक ती थांबली आणि कुतुहलाने स्क्रीनवर पाहु लागली... काय झाल म्हणून विचारल पन ती आणखीच सूक्ष्म नजरेने काहीतरी पहात होती... तशी मला थोडी भिती वाटू लागली... मी ही माझ्या आजुबाजूला पहात तीला काही विचारणार तोच आपला हात दाखवत मला गप्प रहायला खुणावल आणी अचानक मला म्हणाली...
" आणखी कोण आहे तुझ्या रूम मधे.."
तस मी म्हणालो..
" नाही ग कोणी.. मी एकटाच आहे..."
" हे बघ ..तु मला stupid बनऊ नको...सांग कोण आहे आणखी..तुझ्या मागुन कोणीतरी चालत गेल्याच आता मी पाहिल... "
मी तीला पुर्ण रुम मधे लैपटॉप फिरवू दाखवला पन ती जास्तच भडकली...
" तु कोणासोबत आहेस सांग स्पष्ट.. एक पांढरा ड्रेस घातलेली मुलगी तुझ्या मागुन चालत गेली.. मला उगाच मला......???
ती बोलता बोलता थांबली...आणि call cut केला... मला तर तीचा खुपच राग आला आणि त्याहून जास्त भिती वाटू लागली...
मी पुन्हा प्रियाला call करू लागलो पन ती call घेतच नव्हती... दिवस भर खुपच त्रास झालेला त्यामुळे लैपटॉप बाजुला ठेवला आणि आडवा झालो.. थोड्या वेळातच मला छान झोप लागली... तोच एका विचित्र आवाजाने किंचीतशी जाग आली.. काय होत ते समजत नव्हत पन खुपच किळसवाण वाटत होत... कोणितरी धारधार सु-यान मांस कापत होत, त्या असह्य वेदनेन कण्हत असल्याचा आवाज येत होता.. आता मात्र खुपच भिती वाटू लागली... तस अंगावरची चादर हळूच सरकऊन पहायचा प्रयत्न केला पन त्या झीरो बल्ब च्या अंधूकशा प्रकाशात काहीच स्पष्ट दिसत नव्हत... तो आवाज माझ्या रुमच्या बाहेरन येत होता .हळु हळू आवाज कमी होत येईनासा झाला तशी पुन्हा एकदा एक निरव शांतता पसरली... मी मात्र त्या आवाजाचा वेध घेत त्याचाच विचार करु लागलो... पन दिवसभराच्या दगदगीन डोळ्यावरची झापड तशीच होती... एका कुशीवरुन दुस-या कुशीवर झालो आणि समोरच्या खिडकीत नजर गेली तस काळजात धस्स झाल... सर्रर्रर्रर्रर्र्रर्रर्रर कन काट आला आणि खाड कन उठुन बसलो... एक काळीकुट्ट आकृति खिडकीच्या पलीकडे उभी राहून माझ्याकडे आपल्या मोठ्या पांढ-या डोळ्यानी पहात होती... मी उठुन बसताच ती आकृति एकदम नाहीशी झाली... आता मात्र झोपच उडाली होती... थोडा वेळ तसाच बसुन आजुबाजूला पाहू लागलो... एक कमालीची दुर्घन्दी आणि गारवा अचाकन वाढला होता... या घटना आणि असा अनुभव पुर्वी कधीच आला नव्हता... त्यामुळे थोडी भीती वाटतच होती... खिडकी उघडून पहावस वाटत होत पन धाडस होईना... शेवटी तसाच पांघरून डोक्यावरुन घेतल आणि फक्त डोळे रहातील असे ओढून पडून राहीलो. आता एकदम लहानात लहान आवाज कान देऊन ऐकु लागलो.. इतकी भयान शांतता होती की घड्याळील तो सेकंद काटा स्पष्ट ऐकु येत होता... काही वेळ ही भीषण शांतता तशीच राहीली आणि इतक्यात माझ्या रूमच्या बाहेर काहीतरी फरपटत न्याव असा आवाज येऊ लागला... बाहेर जाऊन पाहण्याच धाडस होत नव्हत... पन मन ऐकत नव्हत..शेवटी पांघरुन बाजुला सारत उठलो आणि पावलांचा आवाज न करता दरवाजाच्या दिशेने चालु लागलो... फरफटत नेत असलेला आवाज अजुनही येत होता.. हळुच दरवाजा उघडून मान किंचीतशी बाहेर काढली, पन बाहेरच्या अंधुक प्रकाशातून नीट स काही दिसत नव्हत... सहा रूम नंतर इंग्रजी L आकाराचा रस्ता होता, तो आवाज तीथुन तसाच पुढे सरकत असल्याच जाणवल तसा मी ही दबक्या पावलानी चालू लागलो.. आता पाय-या सुरू झाल्या तसा एक घाणेरडा दर्प नाकात शीरला... तोंडावर हात ठेवत तसाच खाली निघलो..तोच कोणीतरी कण्हत असल्याचा आवाज येऊ लागला.. हळु हळू तो आवाज स्पष्ट होऊ लागला.. तो एका मुलीचा आवाज होता... ती असह्य वेदनेन कण्हत होती... आSSSSSS.....आSSSSSS.....आSSSSSS प्रत्येक आवाजात कीमान १० सेकंद निरव शांतता आणि पुन्हा तीचा तो असह्य यातनानी भरलेला आवाजा...
दबक्या पावलानी मी पुढ चालु लागलो तसा खाली तळघरात पोहोचलो...पन खाली खुपच अंधार आणि मांस सडल्या सारखी भयंकर दुर्घन्दी येत होती... अंधारातही डोळे बंद करावेत इतका काळोख पसरला होता... पन काही अंतरावर एका छोट्या रूमच्या दरवाजाच्या फटीतून येणारा किंचीतसा प्रकाश दिसला जो कदाचीत एखाद्या मेणबत्तीचा असावा... हलक्याशा हवेन ही तीचा प्रकाश कमी जास्त व्हायचा... मी त्याच्या दिशेने चालू लागलो... तीथली जमीन खुपच ओलसर आणि चिकट वाटत होती...पन काळोख असल्याने निट काहीच दिसत नव्हत... पायाखालची जमीन चिकट असल्याने मी भिंतीचा आधार घेत चालू लागलो जेमतेम वीस पंचवीस फुट अंतर असेल ... चिकट जमीन आणी मांस कुजल्यासारखी दुर्घन्धी यामुळे माझ्या पोटात ढवळुन ऊलटी येत होती..एक वेळ वाटल की तीथुन बाहेर पडाव पन त्या मुलीचा असह्य यातनानी कण्हत असल्याचा आवाज मला त्या काळोखात घेऊन जात होता...
मी त्या खोली जवळ गेलो आणि अंधारातच दरवाजाची कडी चापचायला सुरवात केली पन त्याला मोठ कुलूप असल्याच लक्षात आल... आतुन ती मुलगी असह्य वेदनानी कण्हत होतीच... दरवाजाच्या फटीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला पन काहीच दिसत नव्हती,
आतील मुलीला ऐकु जाईल इतक्याच आवाजात मी बोलू लागलो...
" हैलो.... तुम्ही ठीक आहात...... तुम्हाला मदत हवी आहे का...."
काही वेळ एक भयान शांतता पसरली... मी श्वास रोखुन पलिकडून काही प्रतीसाद येतो का ते पाहु लागलो... मी पुन्हा दरवाजावर हल्की शी थाप देत पुन्हा हाक दिली... पन काहीच उत्तर आल नाही...काही वेळ तशीच भयान शांतता पसरली.. तोच आतुन किंचितसा आवाज येऊ लागला... लोखंडी साखळीने कोणालातरी जखडुन ठेवल असाव असा आवाज ..
" कुणी आहे का आत.." मी पुन्हा हाक दीली तसा पुन्हा तोच कण्हत असलेला केविलवाणा आवाज आला...
मला इथुन सोडवा हो..." त्या मुलीचा आवाज ऐकुन वाटल की एका भयान मृत्यु च्या जबड्यात सापडून जीवंत रहाण्यासाठी शेवटची केविलवाणी धडपड करत आहे ...
मी दरवाजावर धक्के मारत होतो तशी आतून ती मुलगी मदतीसाठी विनवनी करू लागली.. दरवाजा जरा मजबुतच वाटत होता. जास्त जोरात धडक मारावी तर आवाज वर पर्यंत जाणार हे माहीती होत.. मी दरवाजाच्या फटीतून आत पाहीले तशी मेणबत्ती च्या मंद प्रकाशात एक खुपच अशक्त मुलगी आत दिसत होती. माझ्या ठीक समोर दरवाजा पासून पाच सहा फुट अंतरावर असेल ती . रूक्ष विस्कटलेले केस, पांढरा निश्तेज चेहरा. बारीक ओठ, लांब पन तीच्या चेह-याला शोभणारे नाक. खोलगट गेलेले डोळे आणी अशक्तपनामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे. गालावरून ओघळणा-या अश्रुंमुळे गालावर उमटलेला काळपटपना . मळलेला पांढरा ड्रेस . आपल्या दोन्ही गुडघ्यांवर बसुन हात जोडून केवीलवाण्या नजरेने माझ्या आवाजाच्या दिशेने पहात होती.
तीच्या वेदना पन मला सहन होईनाशा झाल्या.
उजव्या खांद्याने दरवाजा वर धक्के मारत होतो पण व्यर्थ.. थोडा मागे सरकलो आणि दोन्ही हाताच्या मुठी करकचुन आवळत डाव्या पायाने front kick मारली तसा धाड कण दरवाजा निखळुन खाली पडला तसा मी आत शिरलो...

- by sanjay Kamble


या रात्रीला अन्त नाही 
तीच्या वेदना पन मला सहन होईनाशा झाल्या.
उजव्या खांद्याने दरवाजा वर धक्के मारत होतो पण व्यर्थ.. थोडा मागे सरकलो आणि दोन्ही हाताच्या मुठी करकचुन आवळत डाव्या पायाने front kick मारली तसा धाड कण दरवाजा निखळुन खाली पडला तसा मी आत शिरलो...
मेणबत्ती च्या अंधुक प्रकाशात मी त्या मुली चा शोध घेऊ लागलो... खुपच कुबट वास पसरला होता..ती अडगळीची खोली असावी. एक पुर्णपणे तुटलेल लाकडी कपाट, बाजुला एक स्टुल त्यावर पिण्याच्या पाण्याचा माठ, खोली न्यहाळत माझी नजर डावीकडे गेली तसा सुन्नच झालो.. काळजाचा ठोकाच चुकला.. मनात इतकी भीती दाटली की काही क्षणापुर्वी थंडीन गारठलेल्या शरिराला भितीन अक्षरशा: घाम फुटला..........
माझ्या पासुन काही अंतरावर ती मुलगी होती.. तीचे पाय जमीनीपासून अडीज तीन फुट वर अंतराळी लोंबकळत होते... लांब पांढरा ड्रेस जो खुपच मळलेला दिसत होता... माझी नजर तशीच तीच्या चेह-यावर गेली... डोळे मिटलेले, खुपच निष्पाप अशा तिच्या चेह-यावरून ओघळणारे तीचे अश्रु अजुनही ओले होते... गळ्याला बांधलेली लांब रस्सी वर एका हुका ला अडकवलेली... तसाच जवळ जात तीच्या हाताला मी स्पर्श केला.. तो पुर्णपणे थंड पडला होता... तीने केव्हाच प्राण सोडलेला.... अचानक एक विचार मनात चमकुन गेला .. मग मदत कोण मागत होत...तसा पुन्हा एक मुलगी वेदनेन कण्हत असलेला तो आवाज घुमला... मी भीतीन समोर त्या मुलीच्या चेह-याकड पाहील तस डोक सुन्न झालं...
तीन किंचीत आपल तोंड उघडल आणी कण्हु लागली... माझ्या समोर छताला फास लाऊन लटकण-या एका मुलीच प्रेत कण्हत होत.. भितीन काळीज फुटते की काय अस वाटत होत तोच त्या लटकणा-या मुलीन झटकन आपले डोळे उघडले... तीचे रक्ताळलेले ते डोळे पाहताच मी मागे कोसळलो पण मागे असलेल्या भिंतीन मला सावरसल... त्या भिंतीचा आधार घेत समोरच भयान दृष्य पहात होते... अचानक त्या मुलीच शरीर सडू लागल... काही सेकंदात त्या मुली च पुर्ण शरीर सडुन त्याचे तुकडे खाली पडु लागले... तोच लक्षात आल की माझ्या पायांवर काहीतरी जाणवतय ... कसलीशी वळवळ खुपच किळसवाण वाटत होत... पाय झटकुन पुन्हा मी समोर पाहु लागलो तर छताला अडकलेली ती दोरी तेवढीच लटकत होती... आणि तीथच खाली हाडांचे अवशेष तेवढेच होते... पुन्हा पायावर काही तरी जाणवु लागले तशी माझी नजर खाली गेली आणी त्या मेणबत्ती च्या प्रकाशात एक खुपच किळसवाण दृष्य दिसल... खाली जमिनीवर मांस खाणा-या आळ्या पसरल्या होत्या आणी त्या माझ्या पायांवर चढण्याचा प्रयत्न करत होत्या...
पोटात ढवळुन आल तीथून बाहेर पडणार तोच
माझ लक्ष समोरच्या पाय-यांवर गेल..
पाय-यावरून किंचितसा उजेड खाली येत होता... माझ्या लक्षात आल की मघाशी दरवाजा तोडल्याचा आवाजान तो म्हातारा उठलाय.. अंधारात चाचपडत मागे गेलो आणि भिंतीच्या आडोशाला ऊभ रहात किंचीतशी मान बाहेर काढून त्या प्रकाशाच्या दिशेने पाहु लागलो... हातात कंदिल घेऊन ती वयस्कर म्हातारी पाय-यावरून खाली येत होती...
मी कसलाच आवाज न करता बाहेर कंदिल घेऊन येणा-या त्या म्हातारीकडे पहात होतो पन त्यावेळी माझ्या पायांवर वाढत असलेली वळवळ ती किळसवाणी जाणिव अंगावर काटा आणत होती..
एखादा यंत्रमानव चालत यावा तशी ती चालात येत होते, कंदिलाच्या मीणमीणत्या प्रकाशात ,तीचा पांढरा पन खुपच सुरकुतलेला चेहरा, आणि चेह-या भोवती विस्कटलेले लांब पांढरे केस, लांब नाक आणी खोलगट डोळे यामुळे खुपच भितीदायक वाटत होत...तशीच चालत चालत ती ६० बाय ३० एवढ्या मोठ्या तळघरात फिरु लागली... मी तसाच श्वास रोखुन तीच्याकडे पहात होतो... तशीच चालत ती आमच्या रूम जवळ आली.. आणि तशीच थांबुन एकटक पाहु लागली...
माझ्या मनात विचार आला की जर हीने मला पाहीले तर...?
पन तशी वेळ आली नाही ... ती म्हातारी तशीच चालत वर निघून गेली ...पाय झाडत मी त्या खोलीतुन बाहेर पडलो... तसाच माझ्या रुम मधे शिरत दरवाजा बंद केला तस ते भिषण दृष्य डोळ्यांसमोर नाचू लागल आणि पोटात ढवळुन आल... आता एक सेकंद ही या ठिकानी थांबायची इच्छा नव्हती... बाजुला ठेवलेली बैग उचलली आणि बेड वर पसरलेल माझ साहित्य एकत्र करू लागलो... तोच कोणीतरी माझ्या मागे उभ असल्याच जाणवू लागल... मागे पहायची हिम्मत होत नव्हती.... काही वेळ तसाच उभा रहीलो पण मागे कोण उभ असेल या जाणीवेण अंगावर काटा येऊ लागला... मी दरवाजा तर निट बंद केला होता पन मी नव्हतो तेव्हा कोणीतरी आत येऊन लपुन बसले असावे.. पन कोण असेल... या भयान शांततेत मला त्याच्या श्वासांचा आवाज त्यातली घरघर स्पष्ट ऐकु येऊ लगला... बेडवर पडलेला टीवी चा रिमोट हातात घेत करकचुन आवळुन धरत हल्ल्याच्या तयारीत झटकन मागे वळुन पाहील पन कोणीच नव्हत... आजुबाजूला पहात धीम्या पावलांनी चालत दरवाजा कडे चालु लागलो... दरवाजा नीट बंद असल्याची खात्री केली तोच फट्ट असा आवाज आला आणि सर्वत्र अंधार पसरला...
"शीट यार.. हीला पन आत्ताच जायच होत..."
तसा जेरात भिंती वर हात मारत मागे फिरलो आणि काळजाचा ठोकाच चुकला... भितीन दातखिळीच बसली... पाय जमिनीत रुतल्यासारख वाटत होत..
समोरच्या खिडकीतुन किंचीतसा प्रकाश आत येत होता... त्या खिडकीच्या पलिकडे कोणीतरी उभे किलकील्या डोळ्यानी मला पहात होत... चेहरा केसांनी पुर्ण झाकला होता... ती आकृती कसलीही हलचाल न करता तशीच ऊभी होती... माझ्या डोळ्याचे पाते लवते न लवते तोच क्षणात ती आकृती नाहीशी झाली... मोबाईल काढुन टॉर्च सुरू करत कशीबशी बैग भरली आणि मागे फिरणार तोच बेडखालुन केणीतरी माझे पाय गच्च पकडले तसा हदरुन गेलो.. त्या हातांती पकड आणि ओलसर स्पर्श खुपच भीतीदायक पन किळसवाणा वाटत होता... एका झटक्याने माझे पाय ओढले गेले तसा जोरात जमिनीवर आदळलो.. कोणीतरी मला खेचत होत आणि मी जिवाच्या आकांताने माझे पाय त्या पकडीतुन सोडवण्याची धडपड करु लागलो...तसा एका मुलीचा भरडा आवाज त्या रुम मधे घुमला.....
" तुला आता इथुन कोणीच सोडवु शकत नाही... "
त्या आवाजाने डोक्यात लाल मुंग्यांचे वारुळ उठले...मी सुटण्याची धडपड करू लागलो पन ते मला आत ओढण्याचा प्रयत्न करू लागले... मी जोरजोरात ओरडु लागलो किंचाळलो , कसाबसा स्वताला सोडवुन दरवाजा च्या दिशेन धाव घेतली... दरवाजा उघडुन तसाच धावत सुटलो... पण ते वयस्कर दांम्पत्य कुठेच दिसत नव्हते जोरजोरात त्यांना आवाज देत शोधु लागलो पण त्या ठिकानी कोणीच दिसत नव्हत... मोबाइल च्या प्रकाशात दरवाजा शोधायला सुरवात केली त्या भल्या मोठ्या बंगल्यामधे मी एका रूम मधुन दुस-या रुम मधे जात होतो पन बाहेर जाणारा दरवाजा कुठेच दिसत नव्हता.,.. कानात वार भरल्या सारखा सैरावैरा धावत बाहेर पडण्याचा मार्ग खुप शोधला पन कुठच सापडत नव्हता... धापा टाकत भिंतीला डोक टेकुन भितीन थरथर कापत उभा होतो... मोबाइल पाहिला तर ३ वाजुन गेले होते... रात्र संपेल की ही रात्र कधी संपणारच नाही... मोबाइल वरून मित्रांचे नंबर डायल केले पन कोणाचाच नंबर लागत नव्हता... तोच कोणीतरी हुंदके देत रडत असल्याच ऐकु येऊ लागल... मी दबक्या पावलांनी त्या दिशेने चालु लागलो... तसा तो आवाज येईनासा झाला.... मी श्वास रोखुन काही हलचाल एखादी चाहुल जाणवते क पाहु लागलो... भिंतीला एका हाताने स्पर्श करत दबक्या पावलांनी चालत होतो...एक जिवघेणी शांतता आणि ती भंग करणारा माझा वाढलेला श्वास आणि काळजाची धडधड तेवढी स्पष्ट ऐकु येत होती... तोच मोबाइल च्या प्रकाशात काही अंतरावर थोडी हलचाल होत असल्यासारख वाटु लागल... जागेवर थांबुन ती हलचाल बारकाईने पाहु लागलो... तोच कानाचे पडदे फाडुन टाकणा-या किंकाळीने परीसर हदरुन गेला... भितीन डोळे मोठे करत समोर पाहु लागलो तशी एक मुलगी धावत माझ्या कडे येऊ लागली... पांढरा निश्तेज चेहरा, काळे डोळे, जबडा पुर्णपणे पसरुन भिषण किंकाळ्या तीच्या तोंडातुन येत होत्या.. लांब पायांपर्यंन्त पांढरा ड्रेस ... आता मृत्यु निश्चित आहे... हतबल होऊन जागेवरच थांबलो... डोळे गच्च मिटुन घेतले.. श्वास वाढु लागला... त्या मुलीचा आवाज वेगाने माझ्या कडे येत होता... भितीन डोळ्यातुन पाणी येऊ लागल... तो आवाज अगदी माझ्या जवळ आला तस काळीज धड धड धड करू लागले... इतक्या भिषण मानसिक दबावाने अखेर मी जागेवरच बेशुद्ध झालो....
झटकन डोळे उघडले तर पुर्णपणे अंधार होता... पन सगळ काही शांत वाटत हेत...बाजुला पडलेला मोबाइल उचलुन त्यातला प्रिया चा फोटो पाहीला खुप बर वाटल...फोन लागणार नाही माहीत होत तरी तीचा नंबर डायल केला...आणि रिंग झाली...
माझा आनंद गगनात मावेनासा झाला... रात्रीपासुन कुणाचाच फोन लागत नव्हता.. पन आता लागला... रात्री घडलेली सर्व हकिकत तीला सांगितली...
" मी शहराच्या उत्तरेला कच्च्या रस्त्यापासुन काही अंतरावर welcome लॉज मधे अडकलोय ..."
तीन सर्व माहिती लिहून घेत स्थानिक पोलीसांशी संपर्क केला... पोलीसांनी माझ्या मोबाइल ची लोकेशन ट्रैक करून शोधुन काढण्याच आश्वासन दिल.. मी त्याची वाट पहात पुर्ण बंगल्यात फिरू लागलो... Help ....help म्हणुन जोरजोरात ओरडत राहीलो.. पन मी जिथुन आत आलो तीथ पाहील पन चोहीकडे भिंतीच होत्या बाहेर जायचा एक ही मार्ग दिसत नव्हता....
माहिती देऊन आठ तास झाले पन कोणतही पोलीस पथक आल नाही आणि मोबाइल ची बैटरी पण संपत आलेली...
मी पुन्हा प्रियाला फोन केला...
" हैलो... प्लिज मदत कर...अजुन का पोलीस आलेले नाहीत..."
तस तीच उत्तर एकुन सुन्न झालो... पायाखालची जमिनच सरकली... काय चालु आहे समजायच्या पलिकडे होत.... भयभीत सुन्न मनाने सगळ ऐकत हेतो... तोच इथ येण्याआधी त्या रिक्शा च्या मागे लिहीलेल वाक्य आठवल...
" डोळ्यांनी दिसत ते सत्य असेलच अस नाही.."
हताश मनाने आता मृत्यु ची वाट पहाण्याशिवाय कोणताच पर्याय नाही... या घरातली ही अतृप्त आत्मे मला इथुन बाहेर पडु देणार नाहीत...
भिंतीचा आधार घेत हळुहळू खाली बसत डाव्या कुशीवर पडत सगळ काही आठवू लागलो..काही क्षणापुर्वीच प्रिया च बोलण आठवल...
प्रिया म्हणाली होती...
"अरे कुठ आहेस तु.. पोलिस त्या लॉज वर गेले होते. तुझ्या मोबाइल ची लोकेशन वरुन तो लॉज सापडला पन तु कुठ होतास...प्रत्येक रुम शोधली... आणि आम्ही कॉल केला तर तुझा कॉल लागत नाही...थांब इन्स्पेक्टर साहेबांशी बोल..."
ती पोलीस स्टेशन मधेच होती...
"यस मिस्टर संजय.. कुठ आहात आपण... तो लॉज काही महिण्या पुर्वी बंद झालाय... त्याच्या मालकाने त्यांच्या वृध्द बायकोने तीथ आत्महत्या केली होती.... आणि वेडाच्या भरात त्याच्या नाती ने ही फास लाऊन घेतला होता.. पंधरा दिवसानी त्यांचे सडलेले मृतदेह पोलिसाना मिळाले... बय द वे... आम्ही सर्वत्र शोधल..एक एक रुम शोधली..पण. तुम्ही कुठच दिसला नाहीत... .."
ते पुढे बोलणार तोच बैटरी संपली.... डोळे बंद करून मी मात्र सुन्न होऊन तसाच बसुन राहीलो तसा कानात एक आवाज घुमु लागला...
" तुला इथुन कोणीच सोडवु शकत नाही..."
समाप्त

- by sanjay Kamble

भुताचा तलाव...

नमस्कार मित्रांनो... आज मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती माझ्या बाबतितच घडली आहे. त्यावेळी मी साधारण 10 वर्षांचा असेंन. आमचे गांव समुद्रकिनरी असल्याने सुट्टीत गावी गेल्यावर संध्याकाळी समुद्रावर मौज मजा करणे, वाळुचे किल्ले बनवणे, गळ टाकून मासे पकडणे हा आमचा दिनक्रम असे. माझ्या सर्व मित्रांचा उदरनिर्वाह मसेमारी वरच चालत असे. मला गळ टाकून मासे पकडायला आवडत असे. आमचा बरासचा वेळ हा बाहेर उनाडक्या करण्यातच जात असे. आमच्या गावाबाहेर एक तलाव होता. त्या तलावात खुप मासे होते पण कोणी तिकडे जात नसे. गांवातले लोक त्याला भूताचा तलाव म्हणायचे. त्या मांगे कारणही तसेच होते. त्या तलावाने आता पर्यन्त खुप बळी घेतले होते. वर्षभरात 2 ते 3 बळी ठरलेलेच असायचे. गुडघ्याभर पाण्यात पण माणसे मेलेली आढळली होती. जानवरे तर किती मरायची ह्याची तर गणतीच नवती. तरीही काही माणसे मुद्दामुन तिकडे जात असत कारण त्यांच्या मते तिकडे गुप्तधन होते. ते मिळवण्याच्या नादात कित्येक लोकांनी आपला जीव गामावला होता. में महिन्यात तलाव सुकलेला असताना अचानक पाण्याची पातळी वाढून गळ्यापर्यंत आल्याचे प्रत्यक्षदर्शिनी पाहिले होते. त्या दिवशी आम्हाला समुद्रात एक ही मासा मिळाला नवता म्हणून माझे सर्व मित्र आपापल्या घरी जायला निघाले पण माझे मन काही मानत नवते. मी सर्वांना असे सुचवले की आपण आज तलावावर जाउय. ते ऐकून सर्वांनी एकच गलका केला. मी शहरात राहायला असल्याने माझा भुताखेतावर अजिबात विश्वास नवता. कोणी ऐकायलाच तयार नवते. परंतु शेवटी ते तयार झाले. आम्ही दुपारी 4 च्या दरम्यान जाण्याचे ठरवले कारण दुपारी लोक झोपत असत अणि त्या भागात जास्त कोणी फिरकत नसे. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व सामान घेऊन तलावाच्या पालिकडच्या बाजूला पोहोचलो. त्या भागात जास्त झाड़ी असल्याने आम्ही तो भाग निवडला होता. आम्ही गळ टाकून बसलो होतो आणि आम्हाला सहज मासे मिळू लागले होते. आम्हाला आचर्य वाटत होते की जसे काही मासे आमचिच वाट पाहत होते. आता आमचे घरचे आमच्यावर खुश होणार ह्या आनंदात आम्ही असताना पुढे काय वाढून ठेवले आहे हे कोणालांच माहित नवते. आता संध्याकाळी 6 वाजले होते पण आमचा मोह काही आवरत नवता. तो तलाव ही जाणुकाहि रात्र होण्याचीच वाट पहात होता. अचानक अंधार खुपच जास्त वाटू लागला होता तसे आम्ही भानावर आलो. आम्ही चटकन सर्व आवरल आणि जाऊ लागणार तोच अचानक आमच्या गवतल्या एका मित्राच्या बाबांचि हाक ऐकू आली. तसे आम्ही घाबरलो आम्ही ओ दिली तर ते तिकडे आले आणि बोले क़ी तुम्ही इकडे काय करत आहात चला घरला. आम्हाला वाटले की आता आम्हाला शिक्षा होणार म्हणून आम्ही निमुटपणे त्यांच्या मागोमाग चालु लागलो. पण त्यांच चालण बोलण आणि हसण चमत्कारिक वाटत होते. आम्हाला अस दिसले की आम्ही बराच वेळ चाललो होतो पण घरचा पत्ताच नवता. चालून चालून आम्ही त्याच ठिकाणी परत परत येत होतो. मला आणि सर्वानाच खुप भीति वाटू लागली होती. अस वाटत होत की काहीतरी वेगळच घडतय पण काकांसमोर कोण बोलणार. अचानक मला लहान पणीची एक गोष्ट अठवली की पाण्याच्या ठिकाणी गिरया नावाचे भुत असते ते आपल्याला फिर फिर फिरवते आणि आपल्याला मारुन टाकते. ते आठउन माझ्या अंगवरुन भितिचा काटा सरसरत गेला आणि माझ लक्ष अचानक काकांच्या पायाकड़े गेले तर काय काकांचे पाय माझ्याबाजूने म्हणजे उलटे फिरले होते. ते पाहून मी खुप घबरलो आणि जोरात ओरडलो. सर्व माझ्याकडे पहात होते आणि मी त्याना काकांच्या पायाकडे बोट दाखवत होतो. आता सर्वच घाबरले होते. सर्व थांबले तसे काकाही थांबले आणि त्यानी मान वळवुन आमच्याकडे पाहिले त्यामुळे आम्ही अजुनच घाबरलो कारण त्यांची मानच फ़क्त उलट फिरलि होती. काका आता जोरात जोरात हसु लागले होते आणि त्यांचा आकार मोठा मोठा होउ लागल होता. मला कळून चुकले होते की ते काका नसून गिरया नावाचे भुत आहे आणि आता आपली काही धड़गत नाही. तेवढ्यात मल एक कल्पना सुचलि ति मी माझ्या मित्राच्या कानात सांगितली अणि क्षणाचाहि विलम्ब न करता मी आणि माझ्या मित्रांनी जोरजोरत बोम्बा मारायला सुरवात केली. एकाने आग पेटवली दुसर्याने जवळचे खेकडे काकांवर टाकले सगळा एकच गलका झाला. रात्र खुप झाली होती आणि मूल अजुन कशी घरी आली नाही म्हणून गांव वाले आम्हाला शोधत फिरत होते. त्यात आमचा गलका ऐकून आणि तलावाकड़े लागलेली आग पाहून गांववाले शोधत शोधत आमच्यापर्यन्त पोहोचले तेव्हा आमच्या जीवात जिव आला. पहातो तर काय काका गायब झाले होते. घरी गेल्यावर आम्हाला कोणी काही बोलले नाही पण त्या प्रसंगानंतर मी कधीच त्या तलावाकड़े फिरकलो नाही. आज ही तो प्रसंग आठवला तरी मला घाम फुटतो पण त्या वेळी केलेल्या शौर्याबद्दल अभिमान ही वाटतो
...धन्यवाद... 
अंकुश नवघरे.....

होटेल मून लाइट....


नमस्कार मित्रांनो! आज मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती सत्यकथा असून माझ्या एका मित्राच्या बाबतीत घडलेली आहे. माझा मित्र एक मोठ्या कंपनीत सीनियर सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून कामाला आहे. तो परदेशात असतो. लग्न करण्यासाठी तो भारतात आला होता आणि लग्नानंतर लगेच त्याला कामावर रुजू व्हायचे होते. म्हणून हनीमून ला त्याने जवळच लोणावल्याला जायचे ठरवले होते. लोणावल्याला त्याच कंपनीचे स्वताचे हॉलिडे होम्स रिसोर्ट आहे. त्या कंपनीच्या हॉलिडे होम रिसोर्ट च्या मागच्या बाजूला एक मोठा तलाव म्हणजेच लेक आहे. त्या लेक वर जाण्यास मनाई आहे कारण की तिथे काही लोकांनि आत्महत्या केल्या होत्या आणि ती जागा चांगली नाही असे म्हणतात. माझा मित्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त आहे. त्याला त्या जागेबद्दल काहीच माहित नवते पण कम्पनीचेच रिसोर्ट आणि नाममात्र शुल्क म्हणून त्याने तिथेच 4 दिवसंसाठी रूम बुक केलि होती. त्याला जी रूम मिळाली होती त्या रूम च्या मागच्या बाजूलाच तो लेक होता. जरी मागची बाजु बंद असली तरी खिड़कितुन लेक दिसत होता. रूम मधे शिरल्या शिरल्या त्याला काहीतरी वेगळ थंडीसारख जाणवल होत पण त्याला वाटले की मागे लेक असल्याने तसे झाले असेल असे म्हणून त्याने दुर्लक्ष केले होते. रात्रि 8 वाजता त्यांनी जेवणासाठी जायचे ठरवले अणि निघतांना प्लग मधून की काढली त्यावेळी खरतर सिस्टम प्रमाणे सर्व लाइट्स बंद व्हायला हवे होते पण तसे न होता उलट फ्यान जोरात फिरू लागल होता. त्यावेळी त्याच्या अंगवारुं शहांरा गेल्यासारख त्याला वाटले होते. पण परत त्याने दुर्लक्ष केले होते कारण खुप रात्र पण झाली होती आणि त्या अनोळखी शहरात तिकडून दुसरीकडे शिफ्ट होणे पण कठिन होते म्हणून त्याने तीकडेच राहायचे ठरवले. बैडरूम मधे एका बेड वर डबल बेड अशी सिस्टम होती. डिनर नंतर ते रूम वर परत आले. दिवसभरच्या थकव्यामुळे इकडच्या तीकडच्या गोष्टी करता करता त्याना कधी झोप लागली ते कळलच नाही. रात्रीचे 12.30 झाले असतील तर त्याच्या बायकोला कसल्यातरी आवाजाने अचानक जाग आली तेव्हा बघते तर काय की ती एकटिच झोपलि होती आणि माझ्या मित्राचा कुठे पत्ताच् नवता. ती घाबरुन जोराची कींचाळली. काळोख असल्याने तो तिला दिसू शकत नवता पण तिची किंचाळि ऐकून त्याने लाइट्स लावली आणि त्यालाही आचर्याचा धक्का बसला की ति बेड वर नवती तर त्याचा बेड वर क्वाट वर होता आणि तीचा बेड खाली होता. घाबरून ती त्याला बिलगलि पण त्याना कळतच नवते की हे कस झाल. मग त्यांनी परत दोन्ही बेड वर ठेवले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले. मधेच त्यांना झोप लागली असेल तर भांडी पडण्यासारख्या आवाजाने जाग आली आणि उठून पाहतात तर काय परत मघासचाच प्रकार पण ह्यवेळी त्याचा बेड खाली होता. आता ते दोघेही खुप घाबरले होते. पण नाइलाज होता. शेवटी त्यानी न झोपण्याचा निर्णय घेऊन रात्र जागून काढली पण रात्रभर त्याना लाइट्स चालू बंद होणे अचानक हसन्याचा आवाज होणे पाठीत कोणीतरी मारणे असल्या प्रकारांना तोंड द्यावेच लागले. ते रात्रभर श्री स्वामी समर्थ महाराजांचा धावा करीत होते पण सुदैवाने काही वाइट प्रसंग त्यांच्यावर ओढवला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 नंतर सर्व प्रकार थांबला होता पण त्यांची भीति मात्र जात नवती. म्हणून त्यानी दुसऱ्या दिवशी 7 वजताच रूम सोडली. नंतर चौकशी केल्यानंतर असे कळले की होटल च्या सर्व रूम्स फुल असल्याने त्याना ती रूम देण्यात आली होती पण ह्या आधी त्या रूम मधे असेच अनुभव काही जणांना आल्याने ती रूम नेहमी बंदच असायची आणि कित्येक वर्ष ती कोणालाच देऊ केली नवति पण योगायोगाने जणुकाही ती ह्यांच्याच येण्याची वाट पहात होती......
धन्यवाद
अंकुश नवघरे.
मी तेव्हा 13 वर्षाचा होतो . आणिगावा वरुन आत्ये भावच्या लग्नाची पत्रिका नुकतीच आली होती.मे महिना होता. आणि शाळेला भरपूर सुट्ट्या सुधा होत्या . त्यात गावाला जाण म्हणजे आनंदाची पर्वणीच माझ्यासाठी. एकदाचे आम्ही गावाला येऊन पोहचलो . लग्न असल्यामुळे सगळी भावंड अगोदरच गावाला आली होती. आणि तेव्हा मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझे लाड होत असत......आत्याच गाव चिपळूण पासून सुमारे12 की. मी अंतरावर आहे गावाच नाव केळने. गाव डोंगराच्या मधे असल्याने निसर्गाने जणू सगळी सुंदरता त्यात भरली होती. आत्ता मैं स्टोरी ला सुरवात करतो.......तो लग्नाच्या आधीचा म्हणजे हळदिचा दिवस होता घरात लग्न असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या कामात व्यस्त होते. सगळ्या भावंडानी काम वाटून घेतली होती. मी आणि माझी ताई रेखा आमच्या दोघांवर पाणी भरण्याचे काम सोपवण्यात आले. पाणी भरण्या साठी विहरीवर जाव लागत असे. ती विहीर घरा पासून 5 मिनटांच्या अंतरावर होती. आणि ती विहीर जमिनीला लागून होती म्हणजे तिच्या बाजूला सुरक्षा कड नव्हती . त्या मुळे लहान मूलाना सहसा तिथे जाऊ दिले जात नव्हते. विहीर तशी खोल नव्हती 4 ते 5 फुट पाणी असेल त्यात.आणि विहरीच्या बाजूला एक मोठे चिंचेचे झाड होते..तर झाल अस की रेखा ताई आणि मी दोघनिघालो पाणी भरण्यासाठी दुपारचे 12. ते 12.30 वाजले असतील काही वेळात पोहचलो विहरी जवळ तेवा तिथे कोणीच नव्हते. आमच्या गप्पा चालू होत्या ताई विहरीतून पाणी काढून हंडा भरत होती आणि मी त्या विहरीत वाकून बघत होतो. विहरीत समोरच्या चिंचेची पान पडत होती. सगळ वातावरण एकदम शांत होत . तेवढ्यात ताई म्हणाली तुला माहीत आहे का कल्पेश या झाडावर जखिण राहते अस म्हणतात. ते ऐकून मी ताई ला चिडवत म्हणालो राहते ना मग बोलव मी नाही घाबरत कोणाला. तर मस्करी म्हणून ताई जोरात बोलली ए जखिणी ये आणि धर आमच्या कल्पेश ला. ती हे बोलताच आम्ही दोघे पण हसायला लागलो आणि ताई नेभरलेला एक हंडा माझ्या डोक्यावरदिला आणि म्हणाली हो पुढे आणि तीतिचा हंडा उचलू लागली तसा मी घरच्या दिशेने वळलो. मी 4 ते 5 पावल टाकली असतील अचानक धाड असा मोठा आवाज झाला.. अचानक अंगातून एक शीरशिरी उठली . मी मागे वळून पहिले तर ताई कुठेच दिसत नव्हती.मी घाबरलो पाय थरथारू लागले पण ताई चा विचार करून हिंमत केली आणि विहारी जवळ गेलो आणि खाली डोकवून पहिले. आणि जे पहिले ते कधीच विसरू शकत नाहीताई विहरित उभी होती पूर्ण ओले केस डोळे लाल लाल झलेले होते आणिएक विचित्र हास्य तिच्या तोंडावर होते आणि सारखी मान वाकडी तीकडी करत होती तेव्हाआणि अचानक तिने मला आवाज दिला कीये खाली ये मी तुला घ्यायला आली आहे . हे ऐकून माझी टरकलि . अंगात जेवढी शक्ति होती तेवढी एकवाटूनमी घरच्या दिशेने पाळायला लागलो. धापा टाकत अंगणात येऊन पडलो माझी ती गत बघून सगळे माझ्या दिशेने धावत आले मला उचलले आणि पाणी पाजले मी बोललो ताई बावडीत पडली आहे हे ऐकून मामा , आणि दोन चार मोठी मंडळी विहरीच्या दिशेने धावले. अर्ध्या तासाने ते सगळे लोक ताई ला पकडून घेऊन आले . ती जोर जोरातकिंचाळत होती. ओरडत होती. की मला तो पाहिजे ते ऐकून मी अजुन घाबरलो मोठ्या मंडळीनी लगेच गावातील एका मंत्रीक बाबाना बोलावले . आणि ताई ला त्यांच्या समोर बसवले काही मंत्र उच्चारण केले आणि ताई ला विचारले कोण आहेस तू आणि का या मुलीच्या मागेलागली आहेस. तेव्हा ती जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली मी चिंचेची शेंद्री जखिण आहे . हिनेमला बोलवल आहे. त्या मुलाला घेऊनजाण्यासाठी आता मी या दोघाना पण सोबत घेऊन जाणार. तेव्हा सगळेच घाबरले मग मंत्रिकने काही अजुन मंत्र म्हटले आणि तिला विचारल या मुलांकडून चुक झाली त्याना क्षमा कर आणि त्या बदल्यात तुला हव ते देतो . तेव्हा ती म्हणाली नाही मला अजुन काहीच नको मला हे दोघ हवे आहेत माझी मस्करी करतात याना मी घेऊन जाणार तेव्हा मंत्रिकाने काही मंत्र म्हटला आणि त्याच्या पिशवीतून एक रखेचीपुडी बाहेर काढली आणि ती तिच्या कपाळाला लावली तशी ती रडू लागली तिला त्रास होऊ लागला मंत्रीक पुन्हा म्हणाला जातेस की नाही तेव्हा ती म्हणाली मला हिरवी साडी आणि मांसाहाराच जेवण पाहिजे तरच मी याना सोडेन . मंत्रिकने ते कबूल केल द्यायच आणि मामाना एक साडी आणि मटनाच ताट घेऊन बावडी जवळ ठेवायला संगितल ते सर्व होई पर्यंत मंत्रिकच मंत्र बोलन आणि ताई च माझया कडे रागाने बघन चालूच राहील . मामा सगळ्या विधी करून घरी आला तसा मंत्रिकने ताई कडे बघितल आणि ओरडला जेया आता तुझी मागणी पूर्ण झाली आहे. आणि परत तो अंगारा काही मंत्र बोलून तिच्या आणि माझ्या कपाळाला लावला तसा ताई शांत झाली आणि पडली.......मंत्रिकने एक दोरा आमच्या हाताला बांधला आणि निघून गेला. सगळ शांत झाले थोड्या वेळाने रेखा ताई उठली आणि म्हणाली अरे आपण इथे कसे आपण तर पाणी आणायला गेलो होतो ना ......... तेव्हा मामा बोलले हो पण तुला चक्कर आली म्हणून तुला घरी आणून झोपवले पाणी भरून झाल आता .... तिकडे जायाच नाही दुसर्या दिवशी लग्न आटोपल तसेच आम्ही मुंबई ची गाडी पकडली कारण अजुन काही विपरीत होऊ नये म्हणून आणि त्या दिवसाला आज १३ वर्ष झाली मी परत कधीच अत्याच्या गावाला गेलो नाही ...
."समाप्त

Chetan Pokharikar

ते आंब्याचे झाड....


नमस्कार मित्रांनो... आज मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती सत्यकथा असून माझ्या एका मित्राच्या बाबतीत घडली होती. त्याचे गाव रत्नागिरी मधे कुठेतरी खुप आत जंगलाच्या सन्निध वसलेल आहे. त्या संध्याकाळी अचानक गावाकडे कोणीतरी आजारी आहे असा सन्देश आल्याने त्यांनी लगेच रात्रिच गावाकडे निघायचे ठरवले. तो, त्याची बहिण तिची लहान मुलगी, बहिणीची सासु आणि तिची अजुन एक बहिण असे 5 जण गावाकडे जायला निघाले. गावाच्या बाबतीत खुप दंतकथा आहेत पण गावातल्या लोकांना त्याचा कधीच त्रास असा नवता. साधारणत 4 तासांच्या प्रवासा नंतर मध्यरात्रि 2 च्या दरम्यान ते गावच्या वेशि जवळ पोहोचले. तो में महिन्याच्या काळ असल्याने आंब्याचा सीजन होता. गावच्या वेशिला लागुनच एक आंब्याचे झाड़ आहे. त्या आंब्याच्या झाडाखाली तीन आंबे व्यवस्तित मांडून ठेवल्यासारखे पडले होते. त्या आंब्यांकडे पाहून कोणाला ही त्याना घेण्याचा मोह अवरला नसता. त्याच्या बहिणीचे लक्ष्य त्या आंब्यांकड़े गेले आणि तीने गाडी थांबवायल सांगितली. तीने सांगितले की ते आंबे मला हवेत. तिच्या सासुने तिला खुप समजावाले की इतक्या रात्रि अशा निर्जन ठिकाणी थांबणे चांगले नाही पण तिने ते ऐकले नाही. शेवटी नाइलाजाने त्यांनी गाड़ी थाम्बवली. त्याची बहिण वेड लागल्यासारखी धावली अणि तिने ते आंबे घेतले आणि गाड़ीच्या मागे बोर्ड वर ठेवले. ते आंबे खुपच चमकदार वाटत होते. सर्वजण त्या आंब्याचे कौतुक करत होते आणि असे आंबे मिळाल्याबद्ल खुष होत होते. मित्राची बहिण सारखी त्या आंब्याबद्दलच बोलत होती आणि सर्वाना परत परत म्हणत होती के हे आंबे फ़क्त मी आणि माझी मुलागिच खाणार. त्या नंतर ते गावात पोहोचले आणि सर्व सोपस्कर आटोपुन दुपारी 3 च्या दरम्यान परतीच्या प्रवासाला निघाले. तो पर्यन्त सर्वनाच् त्या आंब्याचा वीसर पडला होता की कोणासमोर त्यानी त्यांचा विषय पण काढला नाही. संध्याकाळी निघतांना त्यांनी गावाहुंन एक पाटी आंबे घेतले, पाटी डिकित ठेवली आणि प्रवासाला सुरवात केलि. जशी गाडी वेशिबाहेर पडली तशीच त्याच्या बहिणीला अचानक आंब्याची आठवण झाली. काय आचर्य की ते आंबे अगदी तसेच्या तसेच टवटीवित होते जसे त्याना मध्यरात्रि मिळाले होते. तिने परत आंब्याचाच पाढ़ा लावला होता. काही गावे ओलंडल्या नंतर त्यांची गाड़ी अचानक दुपारी 4 वाजे च्या दरम्यान बंद पडली. सुदैवाने जवळच त्यांना ग्यारेज मिळाले परंतु गाड़ी जुनि असल्याने गाडीचा एक पार्ट कुठेच् मिळत नवता. ग्यारेज वाला पण कंटाळला होता. 2 तास झाले तरी गाडी ठीक होत नवती म्हणून त्यानी जवळच एका होटल मधे जायचे ठरवले. माझ्या मित्राला कुठेतरी सतत असेच वाटू लागले की नक्की त्या आंब्यामुळेच काहीतरी घडत आहे. पण त्याच्या बहिनीच आम्बा पुराण काही संपतच नवत. ती आंब्याना अंतर द्यायला तयारच नवती. त्याला एक कल्पना सुचलि आणि तो म्हणाला की ताई तू हे आंबे पण बरोबर घे, आपण हॉटेलात बसून नाश्ता करू आणि हवेतर तू होटल मधे बसून आंबे पण खा. ती तयार झाली आणि ते आंबे एकदाचे गडीतून बाहेर पडले. हॉटेलात जाऊन आर्डर येते न येते तोच ग्यारेज वाल्याचा फ़ोन आला की गाड़ी रेडी आहे. त्या घटणे मुळे माझ्या मित्राचा आंब्यावरील संशय अजुनच वाढीस लागला होता. म्हणून त्याने त्या गडबडित कोणाच् लक्ष नसताना गुपचुप टेबलवर ठेवलेले ते आंबे उचलले आणि होटेल बाहेरील एका दगडी पारावार नेउन ठेवले. नंतर आंब्यानबद्दल सर्वच विसरले होते. गाड़ी स्टार्ट झाली आणि त्या होटल वरुनच गेली तेव्हा त्याने सहज पारावार पाहिले तर ते आंबे तिकडे नवते. ते गायब झाले होते. आजुबाजुल कोणी जानवर इत्यादि पण नवते. त्याला खुप आचर्य वाटले. पण त्याने कोणाकडे तो विषय काढला नाही. सर्वजण आंब्याबद्दल वीसरले होते. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी पोहोचले. परंतु माझ्या मित्राच्या मनातून तो विषय काही जातच नवता म्हणून त्याने त्या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरविले होते. त्यासाठी काही दिवसांनी तो परत काही निमित्त काढून गावी गेला. तिथे त्याने सहज त्या झाड़ाविषयी गावातील लोकांना विचारले असता ते म्हणाले की ते वठलेले आंब्याचे झाड आहे आणि गेले कित्येक वर्ष त्या झाडाला आम्बेच आलेले नाहीत. त्याहून ही भयानक गोष्ठ त्याला कळाली ती अशी की ते झाड़ अगदीच वेशिला लागून असल्याने गावात कोणाचे मयत झाले की तिरडी स्मशानात घेऊन जाताना क्षणभर झाड़ाखाली ठेऊन त्या झाड़ाखालुनच जीवखड़ा उचलुन प्रेत पुढे नेले जाते. जरी वाटायला इतका भयानक प्रसंग नसला तरी माझ्या मनात सरखा हाच विचार येत राहतो की जर त्याच्या बहिणीने आणि तिच्या मुलीने ते आंबे खाल्ले असते तर काय झाले असते...???
... धन्यवाद..
.... अंकुश नवघरे...