Wednesday, May 27, 2015

एक अतिशय भयानक गोष्ट सांगत आहे..

कोल्हापुरात घडली..
 वर्णन भयानक आहे..
सहन करणे कठीण असेल, तर वाचू नका..
ज्यांना भय रसाचा आणि कथेचा आनंद घ्यायचा असेल, त्यांनी जरूर घ्या..
पण कोणाला त्रास होऊ नये हि सदिच्छा आहे..

 कोणाला त्रास होईल, ह्याची मला काळजी वाटते...

मी पुन्हा पुन्हा विनंती करतेय..
कृपया याची दखल घ्या..
विचलित न होता मन लावून वाचा..


, "सर्वाना माझा नमस्कार..


आता मी जे काही सांगत आहे, ते कोल्हापुरात घडलं..
 ( सांगितलेला जागेच्या तसेच माणसांच्याविषयीचा सविस्तर तपशील सांगणे  टाळत आहे. ते वादाचे कारण होऊ शकते.)

तिथे एक गिरण होती.. अजूनही आहे..
त्या गिरणीच्या मागच्याबाजूला एक भिंत होती..
ती सतत पडायची..
 मालकाने खूप खोल खणून मजबूत पाया बांधून ती भिंत पुन्हा पुन्हा बांधली होती.. तरीही त्या भिंतीला तडे जात असत, आणि ती पडत असे.. गिरण व्यवस्थित चालू असे.. तिथल्या लोकांनाही कसला त्रास कधी झाला नव्हता.. पण कोण जाणे का; तेवढी भिंत काही केल्या उभी राहत नसे.. कुंपणाची एक भिंत नसल्याने त्याबाजूला एक जास्तीचा रखवालदार ठेवावा लागत होता..
          
                    त्याचा पगार जास्त द्यावा लागत असे.. ते मालकाला परवडेनासं झालं होतं.. भिंतीला सर्वांच्यासमोर तडा जायचा, जशी काय जादू व्हावी.. मोठा तडा जायचा, आणि धाडकन भिंत जमीनदोस्त व्हायची...
 शेवटी मालकाने कोन मांत्रिकाला बोलावलं, आणि ती जागा दाखवली.. त्याने एक दिवस निवडून त्या जागी काही अनुष्ठान करायचे असे ठरवले..
 तो दिवस आला.. रात्र अनुष्ठान चालू झाले.. मांत्रिकाने त्याजागी एक मोठे रिंगण केले.. अनुष्ठान पूर्ण झाल्याच्या नंतर त्याने मालकाला असे सांगितले, कि त्या जागेमध्ये काहीतरी दोष आहे..
तो दूर करण्यासाठी जे करण्यात आलं, ते अतिशय भयानक आहे.. (पुढे जे काही सांगण्यात येत आहे, ते जर समाजात खरंच घडत असेल, तर त्याचा तीव्र निषेध आहे..)

कुंटणखान्यातून एक स्त्री मागवली.. (कुंटणखाना म्हणजे वेश्यालय)..
तिला असे सांगण्यात आले होते, कि एका पूजेसाठी जोगतीणीची गरज आहे..
पूजेचं नाव ऐकून तयार झाली.. तिला पैसे आणि साडीचोळी द्यायचे कबुल केले..
ती बिचारी गरीब.. ती काय करणार??
ती पैशाच्या आमिषाने तयार झाली.. खरंतर, त्या स्त्रियांना समाजात जास्त किंमत नाही मिळत.. :(
 त्यामुळे, कोणी जर थोडेजरी प्रेमाने आणि आदराने बोलले, तरीही त्या स्त्रिया लगेच विवश होतात..
 कारण एरवी त्यांना आदर नाही मिळत..
ती सुंदर होती.. पूजेसाठी योग्य होती.. :(

पूजेच्या दिवशी गिरणीमालकाने तिला घ्यायला खास गाडी मागवली..
तिला आणण्यापूर्वी तिथेच तिला सजवलं..
नवी सादीचोळी, आणि काही अलंकार दिले..
तिला तिच्या आवडीचा सगळं खाऊ घातलं..
तिला काय हवे नको ते सर्व विचारून दिलं..
बिचारीने कधी स्वप्नातसुद्धा असा आदर अनुभवला नसावा.
काय वाटलं असेल तिच्या जीवालाच माहित!!.
खूप रात्र झाली होती..
मग गाडीमध्ये भरून तिला त्या जागी आणलं..
 नंतर पूजेच्या जागी तिला बसवलं..
तिथे एक होम चालू होता..
मांत्रिक काहीतरी पूजा करत होता..
त्या बाईला संशय आला, आणि ती तिथून जाण्याचा हट्ट करू लागली..
पण तिला आधीच इतकं पुरवलं होतं, कि तीही अडकलीच होती तिथे!!...

थोड्या वेळाने मांत्रिकाने त्या बायीला हळद कुंकू सर्व लावून तिथे एक खड्डा केला होता, त्यामध्ये डोकावून पाहायला लावलं.. रात्रीची वेळ होती.. अंधार होता..
त्या बिचारीने त्यांच्या प्रेमाच्या वागण्यावर भुलून त्या माणसांवर अंधविश्वास ठेवला..
 ती उठून तत्या खड्डया जवळ गेली..
 बराच खोल खड्डा होता..
आत काही दिसत नव्हते..
ती वाकून वाकून पाहू लागली..
इतक्यात मागून तिच्या डोक्यात कोणीतरी लोखंडाच्या पहारीने जबर दणका हाणला..
 तो इतका काय तिच्या जिव्हारी बसला, कि ती पार बेशुद्धच झाली...
इतक्यात मांत्रिक म्हणाला, 'घाई करा.. हि मारायच्या आधी हिला पुरायच आहे..
 जिवंत नाही पुरली, तर काही फायदा नाही होणार..' सगळे तिच्यावर भरभर माती ओतू लागले..
बघत बघत सर्वांनी खड्डा बुजवून टाकला..
त्या बुजलेल्या खड्ड्यावर काही अजून विधी झाल्या..

 मग तिथे भिंत बांधली, ती कधी पडली नाही..
गिरण चालू झाली... पण एक दिवस मात्र आक्रीत घडलं..
रात्रीचा राखणदार तिथे फिरतीवर होता..
त्याला अचानक कोणीतरी रडताय असा भास झाला.. आणि अचानक वातावरणात गारवा वाढू लागला..
 त्याने शाल ओढली, आणि त्या आवाजाचा मागोवा घेतला.. त्याला एक स्त्री रडताना दिसली..
 तो तिच्या जवळ गेला.. आणि तिची विचारपूस केली..

ती काही बोलेचना!!.. गुडघ्यात डोकं खुपसून रडत होती..
तो जवळ गेला.. राखणदारसुद्धा थोडासा बिचकला होता..
कारण त्याने कधी कधी त्या स्त्रीला पहिले नव्हते..
 आत्ताही येताना त्याने पहिले नव्हते.. अचानक कुठून आली ती??
 शिवाय ती गिरण मनुष्यवस्तीपासून दूर होती..
 तो जवळ गेला..
त्याच्या हातातला कंदील तिच्यादिशेने केला..
 तसा तिचा चेहेरा दिसला..
तिच्या डोक्यावर एक जबरदस्त मोठी जखम होती..
आणि तिने डोके वर केले, तर दिसले, कि चेहेरा सडल्यासारखा झाला होता..
डोळे खोल दिसले.. गाल फाटले होते..
तसा तो राखणदार ओरडत बोंबलत मालकाच्या वाड्यावर गेला..
त्याची बोबडी वळली होती..
मालकाने त्याला शांत केलं..
तसा त्याने घडलेला प्रकार सांगितला..
मालकाला संशय आला, कि हि तीच पुन्हा परतली की काय!!..
राखणदाराने त्या बाईच वर्णन तसंच केलं, जशी ती वेश्या आणली होती..
 तीच साडी, आणि तेच दागिने..
मालक हादरला..
त्याने सकाळीच त्याच्या त्या साथीदारांना बोलावलं, जे त्या बाइल गाडताना तिथे त्याच्या सोबत होते.. त्यांना सगळा झालेला प्रकार सांगितला..
तेही घाबरले..
मग सर्वजण मिळून त्या मांत्रिकाकडे गेले..
 तो गावाबाहेर एका पडक्या मंदिरात राहायचा.. तोच त्यांना आता वाचवू शकत होता..

ते घाई घाई ने गावाबाहेर त्या मांत्रिकाच्या जागेवर गेले..
तिथे त्यांनी एक भयानक प्रकार पहिला..
 तिथे मंदिराच्या बाहेर मांत्रिकाच प्रेत पडलं होतं..
 त्याच्या आजूबाजूला लहान लहान पायाचे ठसे होते..
 ते नक्कीच कोन बायीच्या पायाचेच होते..
 पुरुषाचे पाय मोठे असतात..
त्यामुळे गिरण बंद पडली, ती अजूनही बंद आहे..
ती भिंत अजूनही आहे तिथे.. तिथे ती बाई रात्री त्या भिंतीला खेटून बसलेली दिसते..
 ती रडत असते..
पुढे ती बर्याच लोकांना दिसली.. आणि काय प्रकार झाला आहे हेसुद्धा जगासमोर उघड झालं..
नाहीतरी अशा बातम्या लगेच पसरतात...
गिरण मालकाचे काय झाले ते महित नाही..
गिरण ओसाड आहे..
तिथे कोणी फिरकत नाही आता..." :(


(अशा नरबळीच्या बातम्या TV वर पाहायला मिळतात..
अजूनही बर्याच गावांकडे असले प्रकार चालतात..
ह्या असल्या निर्घृण प्रकार करणार्यांचा तीव्र निषेध आहे..
ह्या असल्या प्रकारांचा आहे..)

No comments:

Post a Comment