आईचे आत्येभाऊ वाडा तालुक्यातील कुडूस जवळील खानिवली गावात राहतात.. पालघर जवळ ते गाव आहे..
त्या गावात फार अशी वर्दळ नसायची.. पण आता तो भाग बराच develop होत आहे..
साधारण १५ ते २० वर्षापूर्वीची गोष्ट आहे..
तिथे गावात कातोडी, ठाकरं अशा काही आदिवासी जाती जमाती होत्या, अजून ही आहेत.. त्याच पैकी एक गिरीजा म्हणून एक म्हातारी बाई होती..
गिरिजेच घरदार सगळं व्यवस्थित होतं.. बाईसुद्धा तशी बरी होती.. आपल्या कामाशी काम ठेवायची.. पण तरीही सगळे तिला फार बिचकून असायचे.. सगळे म्हणत कि ती करणी करते..
एकदा मी मामाकडे खानिवलीमध्ये असताना रात्री आमच्या नेहमी प्रमाणे भुताच्या गप्पा रंगल्या. सगळे मामेभाऊ, मामेबहिणी.. माझा भाऊ शुभम. आणि सगळी मोठी माणसे.. आणि गप्पा मारता मारता मामी मला सहज म्हणाल्या कि सगळ्यात danger तर ती गिरीजा आहे..
मी म्हटल, “का? तिने काय केलय?”
मामी म्हणाल्या, “मी पाहिल नाही.. तिने काहीतरी खूप भयानक केला आहे.. जाऊदे नको विचारूस..”
पण मी हट्टाला पेटलो.. तेवा मामींनी सांगितला, “तिच्या घरात तिचा तान्हा नातू वारला..”
मी म्हणालो, “ठीक आहे.. पण त्यात काय भयानक?”
मामी म्हणाल्या, “तिनेच मारला..”
मला वाटले कि गप्पा रंगाव्या म्हणून मामी फेकत आहेत.. मी पुन्हा विचारला, “काय झाल सगळ सांगा न,,”
मामी म्हणाल्या, “आता ऐकायचंच असेल तर ऐक… नंतर घाबरू नाकोस म्हणजे झालं..
तिचा नातू ज्या दिवशी मेला, त्याच दिवशी रात्री ती घराबाहेर पडली… घरात खूप नातेवाईक आले होते.. तिच्याच दीरांपैकी कोणीतरी पाहिले, हि रात्री सगळ्यांची नझर चुकवून कुठे बरं चालली?? त्याने काहीही न बोलता तिचा पाठलाग केला..
ती गेली सरळ स्मशानात.. जिथे लहान बाळांची प्रेतं गाडतात तिथे… तिने तिच्या नातवाला उकरून काढल… एक मोठा विळा काढला… बाळाचे शरीर फाडून तिने हृदय काढलं.. आणि खाऊ लागली… हे सगळं पहिल नेमकं तिच्या दिराने.. आणि त्याने बोंबाबोंब केली… तीच लक्ष गेलं.. मग तिने काय केल माहित नाही.. पण गावकरी येई पर्यंत ती तर पशार झाली.. तिथे गावकर्यांनी पहिला कि बाळाचं प्रेत उकरून बाहेर पडले आहे.. प्रेत फाटले आहे.. हृदय गायब आहे..आणि बाजूला बेशुद्ध अवस्थेत तो गिरिजेचा दीर पडला होता..
दुसर्या दिवशी त्याचा भान हरपल होत. तो वेडा झाला.. गीरीजेबद्दल आम्हाला माहित आहे, कि हे सगळ कोण करू शकते आणि कोणी केल.. पण आम्ही घाबरून शांत राहिलो. ज्यांना काही माहितच नाही ते हि शांतच होते.. बाळाचे प्रेत पुन्हा होते त्या अवस्थेत गाडून टाकले.. तो वेडा अजून हि आहे गावात..”
मी तरीपण विश्वास ठेवायला तयार होईना.. मला अजूनसुद्धा असच वाटत होते कि मामी वाढवून सांगत आहेत…
मग मामा आले आणि म्हणाले, “काय गं काहीही सांगत बसतेस लेकरांना? चला झोप आता.. पुरे झाल्या गप्पा..” त्यांनी विषय बंद केला..
दुसर्या दिवशी आम्ही ते सगळ विसरूनसुद्धा गेलो..
तिसर्या चौथ्या दिवशी मामी मला म्हणाल्या, “सुबोध.. मागच्या वावरामध्ये जाऊन बघ जरा कोण आहे आणि काय बोलतोय.” (वावर म्हणजे घरामागील मोकळी जागा.. तिथे घरासाठी पालेभाज्या पेरतात.)
माझ्या ध्यानीमनीसुद्धा नवते.. मागे एक वेडा होता आणि बडबडत होता..
“गिरिजे.. मला माहित आहे.. तू काय केलास.. मी समद्या गावान बोंबलून सांगल.. तू काय खाललस.. तू बाई नाय.. तू हडळ हाय.. जखिण हाय तू..”
माझी धांदल उडाली.. मामी फक्त माझ्याकडे पाहून हसत होत्या..
तिचा नातू ज्या दिवशी मेला, त्याच दिवशी रात्री ती घराबाहेर पडली… घरात खूप नातेवाईक आले होते.. तिच्याच दीरांपैकी कोणीतरी पाहिले, हि रात्री सगळ्यांची नझर चुकवून कुठे बरं चालली?? त्याने काहीही न बोलता तिचा पाठलाग केला..
No comments:
Post a Comment