नमस्कार मित्रानो मी कनिश्क हिवरेकर हा अनुभव माझ्या शेजारील मित्रासोबत आणि माझ्या डोळ्यासमोर घडलेला आहे तोच मी येथे सादर करू इच्छितो या घटनेला खूप काळ उलटून गेला आहे तर पुढीलप्रमाणे....
मी माझी आई, लहान भाऊ , आणि वडील, असे आमचे छोटे कुटुंब आहे ..
माझे वडील सारकारी नोकरी करतात , त्यांची बदलीचे काम असते , काही महिन्यांपूर्वी त्यांची बदली उस्मानाबादला झाल्यामुळे आम्ही सगळे उस्मानाबाला शिफ्ट झालो . हि घटना साधारण ३ महिन्यांपूर्वीची . पण मला या गोष्टींची भीती वाटतच नाही कारण २००८ मधे मला आजोबाच्या अनुवांशीकतेमुळे Major mood
Depressive disorder हा मानसीक आजार जडला आहे , यामुळे मला कुठल्या गोष्टी बाबत ना राग ना प्रेम ना जास्त भीती वाटते ..मी स्वतःच्या आजोबाच्या मृत्यू वरही रडलो नव्हतो हे खर आहे पण सध्या मी ठीक आहे.
आमच्या इथे फक्त दोनच शेजारी आहेत .. एक शेख आणि दुसरे चव्हाण . आमचे घर खूप भयाण मोकळ्या वातावरणात आहे . शेख यांचा परिवार लहान आहे ..
दुसरे चव्हाण त्याना एक मुलगा आहे राहुल,... तो २२ वर्षांचा म्हणजे माझ्याच वयाचा आहे .. आम्ही जेव्हा नवीन राहायला आलो तेव्हा घरात शिफ्ट व्हायला न पाणी , लाइट कनेक्षन घेऊन द्यायला त्याने मदत केली.. माझा चांगला मित्र झाला तो ... मी सतत त्याच्या घरी जायचो , त्याचे वडील ड्यूटी साठी बाहेर जायचे तेव्हा तो घरी
एकटा असायचा न किचन मधे एक काकू काम करत असायची...
मी जेव्हा पण त्याच्याकडे जायचो तेव्हा त्या काकू फक्त किचन मधेच दिसायची ... मी एकदा त्यांना मागून पाणी ही पिलो होतो... असे २-३ दिवस गेले आम्ही त्याच्या घरी दिश- tv असल्याने tv पाहायला जात होतो ...
एके दिवशी मी राहुल ला पाणी मागितले तो बोलला आत्ता आणतो.. मी त्याला थांबवल आन् म्हंटले " तू कशाला जातोयेस ? काकू ना सांग ना " .... तो बोलला कुठल्या काकू.. मे दचकून बोललो , अरे तुझी आई , आणि कोण ?? किचन मधे रोज पाहतो त्याना मी काम करताना... ..तो माझ्याकडे आश्चर्याने बघत होता ...तो बोलला
अरे माझी आई तर चार वर्षांपूर्वी हार्ट अटॅक ने वारली आहे.. मे तडकन उठलो आणि त्याला बोललो "अरे काय बोलतोस ?? वेड लागलाय का तुला??....मग ती बाई कोण आहे"?? त्याने मला फोटो दाखवला मला सगळ कळुन चुकले कि ती बाई दुसरी तिसरी कोण नसुन त्याच्या आईच भुत आहे.. मला माझ्या आजारामुळे काही
भिती वाटली नाही फक्त आश्चर्याने अंगावर काटा आला ...मला काही सुधारत नव्हते .. राहुल ला घरात एकटे सोडून तरी कस चालेल म्हणून मी त्याला घरात मेणबत्ती शोधायला सांगितली ,
त्याने मला एक मेणबत्ती दिली मी सगळे घर बंद केले... राहुल नको नको म्हणत होता .. मी त्याला देवघरात जायला सांगितले मी मेणबत्ती पेटवली न प्रत्येक रूम च्या कोपर्यात गेलो , शेवटी किचन मधे एका कोपर्यात मेणबत्ती झपकान विझली... न मला अंधुक अंधुक दिसायला लागले... मला त्या बंद खोलीत हवा जाणवत होती
एकदम थंडगार... मी राहुल ला हाक मारली... त्याला म्हणतल जर काही देवाचे लॉकेट वगेरे असेल तर गळ्यात घालून ठेव आणि मी ..घरी जायला निघालो ..राहुल रडवेला झाला .. त्याला दरदरून घाम फुटायला लागला .त्याने माझा हात घट्ट धरला ...म्हणायला लागला .. "मला पण घेऊन..चल..यार... मला आता खूप भीती वाटतेय
..., " मी त्याला समजावले कि अरे तुझी आई आहे तुला काही करणार नाही ... मला हलका हलका हसण्याचा आवाज ऐकू आला न् तीच थंडगार हवा... मला थोडे वेगळेच वाटले... मी राहुल ला बोललो चल माझ्या घरी जाऊयात ... इथे थांबलो तर काही खैर नाही आपली ... चल लवकर... त्याला बजावले कि अजिबात मागे बघू
नकोस घरातून बाहेर येताना...त्याने मला घट्ट पकडले... आम्हाला घरातून निघताना. एसी सारखी थंड हवा लागत होती... न आता गुरगुरण्याचा आवाज येत होता... आता मात्र मी त्याला जवळपास ओढतच बाहेर आणले....
.आम्ही दोघे माझ्या घरी आलो घरी आणले..घरी आल्यावर आई त्याची अवस्था बघून म्हणाली कि अरे काय झाले ... मी तिला सगळा प्रकार सांगितला .... ती तर जाम भडकली न मला ओरडया लागली ... काही पण काय बरळतोय असले काही नसते .. मी तिला म्हंटले अग ह्याची हालत बघ जरा चेहऱ्यावरचा रंग उडालाय ... न पूर्ण
थरथर कापत आहे ... आई ने त्याच्या मस्तकाला हात लावला तर अक्षरशः त्याच अंग पोळत होते... त्याला आम्ही लगेच दवाखान्यात घेऊन गेलो ...
त्याच्या वडिलांना फोन केला .... ते आल्यावर आम्ही त्यांना त्या घटनेबद्दल काहीच सांगितले नाही फक्त सांगितले कि सकाळ पासून त्याला ताप आली आहे.. मग त्यानी राहुल ला घरी नेले ... मी हि राहुल च्या सोबत गेलो पण तो मला सोडायलाच तयार नव्हता ...त्याचे वडील विचारत होते कि अरे झालाय काय ते तर सांग.. मी फक्त
एवढच बोललो की काल आइसक्रीम खाल्याने घसा दुखत होता न कोल्ड झाला होता .त्यामुळे थोडी ताप आली ..त्याना ते खोट वाटल तरी ते गप्प राहीले ..त्यांना ड्यूटी ला वापस जायच होते ...ते गेले मग मी राहुल ला tv लावून दिला ....जरा movie लागल्याने आमचे एंटरटेनमेंट झाले...
घरात उजेड राहावा म्हणून मी प्रत्येक खिडकी ,दारे. उघडली...बाहेर कोणी तरी फाकीर बाबा आले होते भिक्षा मागत होते... राहुल धडपडत त्यांच्याकडे धावला ... न विनवणी करू लागला आमची मदत करा मदत करा.. तो फकीर आश्चर्याने त्याला बघत होता ( *मित्रहो हे असे फकीर किंवा पीर, मौलाना हे सर्व आपल्या बाबतीत सांगू शकतात काही खास तपस्या द्वारे त्यांनी आपल्या मध्ये असे सामर्थ्य निर्माण केलेले असते आणि काही जन तर खुद्द जीन भूत प्रेतांना आपले गुलाम बनवून ठेवतात मित्रहो अजून एक गोष्टी काही माफक खूप जुन्या झालेल्या दर्गाह च्या दारात जीन वावरत असतात तर मग पुढे* ) ..मी त्यांना पाणी दिले ... त्यानंतर त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून
माझ्या अंगावर काटा आला.. तो मला म्हंटला कि .कल देखा ना तूने उसे? तुझे पता चला है ना वो यहा है? इसको बुखार उसी कि वजह से आया है, है ना?" मी फक्त त्यांना अचंबित होऊन पाहत होतो आणि त्याच सुरात मी मान हलवली आणि हो म्हणालो तसेच तो हे हि बोलला कि तेरी ये बिमारी तेरे दादा कि वजह से है... है न ? न गुस्सा , ना दुख होणे कि
तेरे भगवान है ना उसने तुझे पत्थर का दिल दिया है.. ... आता मीही त्याला विनवणी केली कि आमची मदत करा
ते आत आले नी त्यांनी त्यांच्या मोर पंखाने फक्त.. धूर केला... मी त्यांना किचन मध्ये घेऊन गेलो ... तर आम्हा सगळ्याला थंडगार वारे लागले... त्यांनी तो धूप मोर पंखाने पसरवला.. आणि ते उर्दू भाषेत काही तरी मंत्रा म्हणत होते.... मला काही कळेचना.. थोड्या वेळाने.. सगळा धूर गेला पूर्ण किचन रिकामे झाले... न राहुल ने
गचकन मागून येउन त्या फाकीर बाबा गळा धरला ...ते बाबा त्याच्या डोळ्यात न डोक्यावर पंखाने मारत होते. मी दोघांना दूर केले.. त्या बाबांवर मी खूप चिडलो,
त्यानी राहुल कडे बोट केल तर राहुल च्या तोंडातून रक्त येत होते .. न डोळे रागाने लालबुंद झाले होते .. आणि तो रडत होता... गुरगुरत होता .. तो फाकीर मला म्हणाला .. देख आइस ..तेरे दोस्त को वो लेकर ही जायेगी.... मी ..राहुल ला हाका मारल्या...तो बेशूध पडला. होता . समोर च्या शेख यांचा मोठा मुलगा शौकत आला..
त्याने आत सगळे पहिले होते.. त्याने विचारल काय झालाय याला ?? अस का वागतोय हा ?? ... मग मी त्याला सगळे सांगितले .. तर त्याने हि यावर विश्वास ठेवला ..कारण तो बोलला कि , मी एकदा रात्री २ वाजता बाथरूम ला गेलो होतो खिडकीतून सहज लक्ष गेले तर कोणतरी कोण तरी बाई घरावर उभा राहून.. वेगळ्या भयानक
आवाजात रडत होती रे.....भास असेल म्हणून बाहेर येउन मी रूम च्या खिडकीतून बघितले रे कनिश्क.... ती बाई केस मोकळे सोडलेली... होती.. तिचे डोळे फुल्ल सफेद झाले होते.....न सगळे ओठ फाटून दात बाहेर आलेले होते .. न हसत होती ती... मला पहिले कळेचना ,,.माझा आवाजच निघेना .... कोण आहे रे ती बाई ???
..
मी त्याला बोललो चव्हाण काकू ; राहुलची आई .. तो पण घाबरला.. फाकीर बाबांनी मला.एक केस असलेले काताडे दिले... त्यानी त्याचे ३ तुकडे केले.. न आम्हा तिघांना दिले ... राहुल ला उठवून मी पाणी पाजले....आणि त्याच्या पॉकेट मधे तो तुकडा ठेवला.... ते बाबा गेले न मला जाता जाता बोलले कि ." सून बच्चे कभी कभी
प्यार वो चाहे किसी का भी हो उसे बुराई मी बदलते देर नहीं लगती इसकी माँ का प्यार ही उस रूह में बदल क्र इसे ले जाना चाहता है ... वो अब तेरे दोस्त के अंदर नही घूस पायेगी...आज तू इनके पास ही रेहना .. मे तेरे दोस्त के लिये दुवा करूंगा...संभालके रेहना बच्चे " आणि ते निघून गेले....
संध्याकाळ झाली मी घरी जेवायला गेलो. शौकत राहुल जवळ थांबलेला... मला कानात फक्त हसण्याचे आवाज ऐकू येत होते... मला जेवावेसेच वाटेना ..मी आईला बोललो अग आई तो राहुल आजारी आहे न एकटा. आईने मग माझ्यासाठी आणि राहुल साठी डब्बा दिला... त्यात पांढरा शुब्र भात न चपाती भाजी दिली होती ...मी
राहुल कडे गेलो.. शौकत पण घरी जाऊन मग जेवून आला ... थोडावेलातच मला सडलेला कुबट वास आला ... मला वाटले हा वास किचेन मधून येत असेल .. पण किचन मधे वास येत नव्हता ..मग मला शौकत म्हणाला बहुदा तुझ्या डब्ब्यामधून वास येतोय ...मी झट दिशिने डब्बा उघडला तर डब्यातला ताजा गरम भात सडून गेला
होता... त्याचाच वास येत होता .....(*मी या पेजवर वाचलेले भात हा लवकर भ्रष्ट होतो आणि त्याचा वापर काळ्या विद्येत केला जातो....*) त्या दोघांना भीती वाटायला लागली जशी जशी रात्र जवळ येत होती तशी त्यांच्या घश्याला कोरड पडत होती.. मी त्याला माझ्या घरी तरी कसे न्यावे .. कारण घरी मावशी न तिची फॅमिली आली
होती....
रात्रीचे ८ वाजता आम्ही तो भात बाहेर फेकून दिला व राहुल ने जेवण करुन घेतले...मग आम्ही tv पाहत बसलो होतो .. सर्व काही ठीक होते ...मी विचार केला कि जरा किचन मधे जर जाऊन यावे .. खर तर तिथे मी मुद्दामच गेलो .. एका ठिकाणी स्तब्ध उभा राहिलो...न जरा डोळे झाकले ... मला कानात कुजबुजल्याचा आवाज
आला... मी डोळे उघडले...आणि मी जे पहिले ते पाहून.. एखादा धडधाकट माणूस मेला असता... माझ्या समोर काकू. भयानक रित्या हसत उभ्या होत्या त्यांचे हात रक्ताने माखलेले होते ..फाटलेले ओठ ..त्यातून खालच्या दातांची रांग बाहेर आली होती .भयानक डोळे .. मी फक्त पाहत राहिलो... त्या माझ्या इतक्या जवळ आल्या
की जणू आता नरडीचा घोट घेणार आहेत... पण मी त्यांना तसे पाहत होतो हे बघून...त्यांचे हसनेच बंद झाले.,..त्या मला भेसूर न भयानक आवाजात म्हणाल्या , " अरे पोरा तू कहीही कर ..मात्र मी माझ्या पोराला घेऊन जाणारच ... मी तिला हळू आवाजात म्हणालो ...काय होणार आहे अश्याने ...तू स्वार्थी बनू नकोस ..चालती हो
इथन ....
त्या इतक्या गुर्गुर करत होत्या ....आमची शाब्दिक चकमक उडत होती .त्या आवाज चढवून मला..ओरडत होत्या..मग मी हि पूर्ण ताकद लावून .. जोरात ओरडलो...पण त्या मला हात लावत नव्हत्या ... त्या सारखे खिशाकडे बघून दात खात होत्या..कारण फकीर बाबांनी आम्हाला ते कातडे दिले होते ... ती बोलली आत्ता तरी तुम्ही
याच्या मूळ वाचताय ...पण माझा टाइम आहे थोड्या वेळाने.. बघा मग तुमच काय करते ते .. त्या कधी गेल्या ते समजलेच नाही नाही..
मी गटा गटा दोन बाटल्या पाणी पिलो ... घसा गरम झाला होता न कोरडा फट पडलेला.,..मी मागे बघितले... तर शौकत घामा घूम होऊन थर थर कापत होता... न मला पाहत होता ..मला तो दबक्या आवाजात म्हणाला ..क्या है तू? है कौन तू यार? अब पता चला राहुल क्यू तुझे जाने नई दे रहा ... तुजे डर केसे नही लगता भाई..
त्याला मी माझ्या आजरा बद्दल.सांगितले.. यार बचा लेना हमको .असी बोलू लागला ... ..मी त्याला पाणी दिले.. न किचन मधल्या सगळ्या धारदार गोष्टी पेटीत बंद केल्या... न शौकत च्या घरावर टाकल्या,. न बजावले . घरातली एक ही लाइट आता बंद करायची नाही...मग आम्ही राहुल जवळ जाऊन tv पाहू लागलो .. थोडा
वेळातच आम्हाला झोपा लागल्या तेव्हा रात्रीचे १.३० वाजत आले होते..
त्या नंतर ती रात्र वैर्याची होणार होती यापासून आम्ही अनभिज्ञच होतो ...मित्रहो हा अनुभव एका सत्य घटनेच्या आधारवर कथित केला आहे त्या घटनेतील प्रसंग येथे नाटकीय रुपात दर्शवले आहेत ...` अस म्हणतातच कि संकट कधी सांगून येत नाहीत आणि आमच्या सोबत त्या रात्री तसच काहीतरी होणार होत याची भनक तर आम्हाला लागलेली होतीच झोप हि तर उडाल्या मध्ये जमा होती आम्ही झोपलो कसेबसे पण उघड्या डोळ्यांनीच सारखी इवलुश्या हालचाली कडे कोठे एखाद्या कोपरयात पाल वळवळत होती तर खिडकीतून येणारा सुईईईइ....सुईईई करत असेलेला आवाज सर्व मनात धाक निर्माण करीत होत सारखे सारखे मनात तोच विचार होता कि आता पुढे काय होणार या झपाटलेल्या घरात त्या दुष्ट आत्म्या बरोबर आम्हीं असे हे तिघे आणि तिघांच्या जीवाला धोका आता आम्ही तिघांनी एकमेकांना सांभाळावे कि स्वतःला रात्र झाली खरी आम्ही झोपी हि गेलो खिडकी उघडीच होती विचार होता आजूबाजूने कोणी एखादा ओळखी पाळखीचा गुजरत असेल तर हाक मारून बोलवाव त्याला मदतीस. शौकत अल्लाह जवळ मनोमन प्रार्थना करीत होता मी खोलीतील लाईट लावण्यासाठी उठलो व बटनाच्या बोर्डाजवळ गेलो आणि बटन दाबताच एक हि बल्ब लागला नाही लाईट गेली होती तेव्हा मला वाटले पुन्हा त्या आत्म्यान काही कहर तर नाही केला. नाही तस नाही झाले खरच लाईट गेली होती. मी माझ्या अंथरुणात येऊन पडलो खिडकीतून चंद्राच थोडस कवडस आत येत होत... तितक्यातच त्या भयान शांततेत टाचणी पडल्याचा हि आवाज ऐकु येईल अश्या शांततेत एक भयान अशी गोष्ट घडली. आमच्या कानाचे परदे फाडत मेंदू पर्यंत झनझन करत मुंग्या आणणारी कान सुन्न करणारी , काळजाचा ठोका चुकवणारी एक जीवघेणी किंकाळी आमच्या तिघांच्या कानी पडली आम्ही तिघांनी झपझप कानावर हात ठेवले राहुल तर रडण्याच्या तयारीत होता. त्याने आपले कान झाकून पूर्ण डोक गुडघ्यात दाबून घेतले शौकत मोठमोठ्यान त्याच्या देवाचा धावा करू लागला. पण राहुल आणि शौकत इतके घाबरून गेले होते कि उठून ते सैरावैरा इकडे तिकडे धावू लागले त्यांनी माझ्या कडे लक्ष न देताच दाराकडे धावले आणि पटापट दार उघडून स्वतःचा जीव वाचवण्याच्या उद्देशाने घराच्या बाहेर पळू लागले पण बाहेर जाणारा दरवाजा उघडण्याचे नाव घेईना झाला होता. मला माहित होते कि काही केल तरी ती आम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. तरीही मी त्यांची मदत म्हणून दरवाज्यावर धाड धाड लाथा मारू लागलो आम्ही तिघांनी स्वतः जीवतोड प्रयत्न केला दरवाजा उघडण्याचा पण असंभव होत ते राहुल वेड्यासारख ओरडत होता ..ए दार उघड रे .. कोण आहे का बाहेर दार उघड शौकत आणि राहुल इतके वेडे झाले होते आणि इतके घाबरले होते राहुल वेड्यासारख बडबडत होता जणू तो जीवनासाठी भिकच मागतोय इतका तो रडत आणि ओरडत दारावर थापा मारत होता.. कि जणू तो आता मरेलच.. मला त्याला शांत करायचं होत पण तो काहीच ऐकत नव्हता... मी माझ्या खिशातून ती फकीरबाबाची कातडी काढली आणि राहुलला दिलासा देण्याचा प्रयत्न करू लागलो मी त्याला म्हणालो फक्त सकाळ पर्यंतच वाट पाहू सकाळ झाल्यास आपण बाहेर पडू तू काही काळजी करू नको .. पण तो आता जास्तच करू लागला होता.. मला दुसरा पर्याय नव्हता मला त्याला मारावस वाटत होत जेणे करून तो शांत झाला असता पण देवाच्या कृपेने तो शांत झाला . आणि जसा तो शांत झाला तसाच एक हसण्याचा आवाज हळू हळू समोरच्या अंधारातून आमच्या दिशेने येताना मला जाणवू लागला.. मी राहुल आणि शौकत ला माझ्या मागे केले. आता जे होईल ते होईल एक तर ती आत्मा राहील नाही तर मी राहुल माझा हात झटकून दुरीकडे पळत सुटला घर तस मोठ होत..मी आणि शौकत राहुलच्या दिशेने धावलो जर त्या आत्म्याच्या तावडीत तो सापडला तर काही खर नाही म्हणून आम्ही त्याच्या मागे गेलो तर राहुल एका कोपऱ्यात दाबून बसला होता शौकत तसा ताकतवर होता त्याने राहुलला जबरदस्तीने उचलले आणि आम्ही तिघे तिथेच जवळच्या खोलीकडे जाऊ लागलो आम्ही जस जस पुढ जाऊ लागलो तास तास आम्हाला मागून कोणी तरी आमच्या सोबत चालत येतय हे आम्हाला कळत होते शौकत ने मला इशारा केला मी त्याला हाताने खुणवून सांगितले कि काहीही झाले तरी मागे पाहायचं नाही आम्ही त्या खोलीजवळ आलो आणि तातडीने आत शीरलो आणि दार लावून घेतल मला बाहेर कोणीतरी फिरतय हेच समजत होते
तेव्हा मी विचार केला दरवाजा उघडणे हि मोठी चूक असू शकते पण दरवाज्याची पूर्ण कडी लावणे हि तर चूक नव्हती न मी दरवाजाची कडी लावली .. दरवाजा बंद करताच मी मागे वळलो त्याचक्षणी तो आवाज बंद झाला मी थोडा सुटकेचा निश्वास घेतला पण मला मी दरवाज्याच्या जवळ असल्याने मला काहीतरी खुसपूस असा आवाज आला कि तिकडून शौकत मला म्हणला "कनिश्क ..भाई इधर आ " मी त्याला माझे बोट ओठावर ठेवत त्याला "शूसुस्स्सSSSSS " शौकत त्याच क्षणी शांत झाला राहुल आणि शौकत मला पाहत होते खिडकीतून आलेला थोडासा चंद्राचा प्रकाशच आमच्या खोलीतील उजेडाचा पर्याय होता.. राहुल आणि शौकत माझ्याकडे पाहत होते मी तेव्हा दरवाज्याच्या जवळ जाऊन कान लावले कि पलीकडे कोण आहे आणि कोणाचा आवाज आहे. मला पलीकडे खुसपूस करण्याचा आवाज येत होता .. मी अजून थोड शांततेत नीट ऐकण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा "ए दार उघड .... दार उघड दार दार उघड माझ पोरग दे मला " त्या आवाजाचा खुसपूसपना आता वाढत चालला होता आता तो आवाज अत्यंत जवळ आला होता कि दारावर तो आवाज आलाय हे मला स्पष्टपणे कळत होते. मी थोड अजून कान दारवर लावून ऐकू लागलो पण आवाज येईना झाला होता.. थोडी शांतता झाली आणि त्याच एका क्षणातच ती माझ्या कानातच ओरडली .....तिचा तो मोठा जीवघेणा आवाज "ए माझ पोरग दे माझ पोरग ..." असे किंकाळ करीत पलीकडे असलेली ती आत्मा दारावर मोठमोठ्याने थापा मारू लागली. मी धक्क्याने मागे झालो तिच्या रडण्याचा आता आवाज येऊ लागला होता.. आणि असह्य असा आवाज त्या आत्म्याच्या किंकाळण्यातून येत होता ती रडत होती आणि जोरजोराने दरवाज्यावर स्वत:ला आदळून घेत होती आणि तो दरवाजा देखील कोणत्याही क्षणी ती तोडेल अस वाटत होत आम्ही रात्रभर दरवाजाच्या पलीकडे ती आत्मा आमच्या मरणावर टपलेली होती.. रात्र गेली आम्ही कसे झोपी गेलो होतो आम्हाला कळलेच नाही पण त्या रात्री नंतर सगळ काही बदलल होत.. सकाळी राहुलचे वडील आले होते आता मात्र आम्हा सर्वात एक जोश आला आणि आम्ही शौकत ने राहुलने आर्व झालेली घटना काकांना सांगून टाकली. काकाना आमच्यावर विश्वास बसत नव्हता यानंतर त्यांनी रागाच्या भरात शौकतला घरातून काढून टाकले . त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या आई बाबानजवळ माझी तक्रार केली मला आईने जोरदार कानाखाली लावली होती आणि पूर्ण बजावले कि मी त्यांच्या घराकडे फिरकू पण नाही .. हे आता खूपच वाईट झाल होत...(आम्हाला घरी पाठवल्या नंतर तीन दिवसांनी ) राहुल घरात एकटाच होता त्याचे वडील एकूण तीन दिवस कामासाठी गेले नव्हते का काय झाले होते ? कोणास काही ठाऊक नव्हते मला त्या तीन दिवसामध्ये राहुल कधीच बाहेर आलेला दिसला नाही त्याच्या कडे जाण्यासाठी देखील ताकीत होती. तरी आमचे वडील आणि राहुलचे वडील भेटले तेव्हा त्यांनी सांगितले कि राहुल ला तीन दिवस झाले ताप आलाय आणि ते तीन दिवस काय काय झाले ते त्यांनी आमच्या वडिलांना सांगतीले (त्या तीन मधील पहिल्या दिवसात राहुल किचनमध्ये त्याच्या वडिलांना काही आणण्यासाठी गेला त्याच क्षणी त्याला फिट्स आले होते त्याचे अंग पूर्ण तडफडत होते त्याच्या वडिलांनी तेव्हा कामास न जायचे ठरवले. त्याच वेळी त्यांनी चव्हाण काकांनी राहुलला दवाखान्यात नेले तेथे कळाले कि राहुलला झटका बसला आहे भीतीचा असे डॉक्टरांनी सांगितले . दुसऱ्या दिवशी तो पूर्णपणे तापेने बेशुद्ध होता .. आणि तिसऱ्या दिवशीच्या रात्री तो शांतपणे आपल्या घरी आणण्यात आला तेव्हा चव्हाण काकाना वाटले राहुल ठीक झाला आहे त्या रात्री जेव्हा काका आणि राहुल झोपले तेव्हा रात्री काकाना जाग आली आणि त्यांनी पाहिले कि राहुल उठून बसला होता व सारखे आपल्या आईच्या फोटोकडे पाहत होता आणि तो रात्र भर त्याच्या वडिलांच्या उशीस बसून बडबड करायचा बाबा मला आई घेऊन जाणार बाबा मला आई घेऊन जाणार आहे ..मला वाचवा मला वाचवा असे काहीही तो बडबड करायचा त्यानंतर ) हे झाले तीन दिवसातील घडलेले त्यानंतर चौथ्या दिवशी राहुलचे बाबा अत्यंत चिंताग्रस्त होते... संध्याकाळी सहा वाजले होते राहुलच्या घरातून आरडा ओरडीचा आवाज आला कि काही सेकंदातच राहुल घरातून बाहेर पडला आणि घराच्या मुख्य दरवाज्यासमोर उभा राहिला आम्ही सगळे घराबाहेर आलो आणि राहुलने जे त्यावेळी केले ते पाहून सगळ्यांचे डोळे उघडे ते उघडेच राहुलने पूर्ण घराभोवती धावत फेऱ्या मारायला सुरुवात केली. आणि ते हि उलट्या पावलांनी तो शक्य तितक्या ताकतीने जोरात धावत होता त्याच्या चेहर्यावर जणू त्याच्या मनातील भाव उमटत होते जस कि हे सर्व कोणीतरी त्याच्याकडून करवून घेतय त्याचे पाय काट्यात दगडावर आपटले जात होते ते रक्तबंबाळ होत होते राहुलचे वडील त्याच्या मागे धावत होते पण तो काही थांबण्यास तयार नव्हता.. मी हि धावलो राहुल ज्या दिशेने धावत होता त्याच दिशेने त्याचे वडील त्याकडे जात होते पण मी विरुद्ध दिशेने जाऊन राहुलला पकडल तेवढ्यात तिकडून शौकत देखील धावत आला.. आम्ही दोघांनी राहुल ला गच्च आवळले राहुल इतका झटपट करीत होता पण आम्ही दोघांनी पुन्हा राहुलच्या वडिलांनी देखील त्यास पकडले ..तेथेच तेव्हा माझी मावशी देखील उपस्थित होती. तिला भूतप्रेताच सर्व कळायचं तिला राहुलला पाहताच समजून गेल कि त्याला बाधा झालीय मावशीने त्याच दिवशी राहुलच्या वडिलांची भेट घेतली त्यांच्यात काय बोलन झाल हे मला माहित झालच त्यानंतर राहुलला त्याच्या घरात कोंडण्यात आला मला त्याची कीव येत होती पण हे सगळ त्याच्या भल्यासाठीच तर होत रात्रीच सर्व उरकायच होत ती बुद्धपोर्णिमा होती... मावशीने सर्व झाडफुके आणली होती त्या पूर्वी मावशीने मला त्यांच्या काकुच्या फोटोस जाळायला सांगितले मी काकूंच्या सर्व वस्तू जाळण्यास घेतल्या मावशीहि म्हणाली बर केलस. रात्री मावशी मी आमच्या घरचे राहुलचे वडील शौकत आणि मी असे राहुलच्या खोलीत गेलो आत राहुलने सर्व अस्थाव्यस्थ करून ठेवल होत आणि थोडेशे रक्तांचे शिंतोडे देखील उडाले होते.. राहुलने स्वतःच्याच हाताचे लचके तोडले होते आणि रडत रडतच बेशुद्ध पडला होता. राहुलच्या वडिलांनी त्याची जखम बांधली ती बांधताच राहूल उठला आणि त्याने काकाचां गळा दाबण्यास सुरुवात केली आम्ही सर्वांनी घाईघाईने राहुल ला हॉलमध्ये आणले व मावशीने सर्व सुरु केले मावशीने आजूबाजूने काही बाहुल्या आणि काही कपड्यांची वेणी बनवली होती त्यात ज्वारी आणि गहू सारखे दाणे भरले गेले होते आणि हळद कुंकुवाचा नारळ आणी पाच लिंब त्याच्यासमोर एका चांदण्याच्या आकृती वर ठेवले होते हळूहळू मावशीच्या अंगात देव येऊ लागलेत असे वाटत होत मी हे सर्व प्रथमच पाहत होतो मावशी बड्बड करीतच राहुल च्या अंगावर हळद आणि कुंकू फेकू लागली मावशीच्या तोंडून एक न एक शिवी त्या आतम्यासाठी येत होती .. समोर राहुलच्या अंगात त्याची आई भयंकर रीतीने आरडाओरडा करीत होती राहुल कोणालाच आवरला जात नव्हता.. तरी हि मावशीचे प्रयत्न चालूच० होते.. बराच वेळ झाला पण काही फरक पडेना शेवटी मावशीने जोरजोरात आई जगदंबेचा धावा करण्यास सुरुवात केली राहुल खूप तडफडू लागला ते वातावरण अत्यंत भयानक झाले होते... सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला होता पण अखेरीस ती दुष्ट शक्ती हरलीच आणि राहुलची आई त्याच्या शरीरातून मुक्त झाली व राहुल या दुष्टचक्रातून कायमचा मुक्त झाला... राहुलचे वडील मला बोलू लागले त्यांनी माझ ऐकले नव्हते म्हणून पण आता सर्व काही ठीक झाले. जेव्हा हि सर्व क्रिया संपली तेव्हा त्या पाचपैकी एक लिंबू करपले होते आणि काळे पडले होते शक्यतो असे होते कि त्या आतम्याने बाहेर पडण्यासाठी याचाच आधार घेतला ते फक्त एकच लिंबू असे होते ज्यावर हळद कुंकू लावले गेले नव्हते ते पूजेतील सर्व सामान मावशीने स्मशानभूमीत नेऊन पुरले . त्यांतर चव्हाण काकानी घराची वास्तुशांती करवून घेतली राहुलचे सध्या लग्न झाले आहे व तो सुखात आहे त्यानंतर कधीच चव्हाण काकू दिसल्या गेल्या नाही.
No comments:
Post a Comment