नमस्कार मित्रानो मी संजय कांबळे अजून एकदा एक चित्तथरारक कथा घेऊन आलो आहे आशा आहे आपणास नक्की आवडेल तर ............जुलै महिण्यातील दाट ढगाळलेल आकाश आणि पावसाची बारीक रिप रिप सुरु होती... रस्त्याच्या दुतर्फा ऊंच आणि दाट झाडे. अशा निरव शांततेत आणि लख्ख काळोखात रस्त्याच्या बाजुला उभ्या एका झाडावर बसलेले घुबड आपल्या मोठ्याशा डोळ्यांनी दुर रस्त्यावरुन येणारा एका प्रकाशाच्या दिशेने एकटक पहात होते... तो एका दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश होता...
निर्जन रस्त्यावरुन एक दुचाकी सुसाट वेगात धावत होती... दुचाकीवर बसलेला मुलगा साधारण वीस, बावीस, वर्षाचा असेल.. गोरापान, ऊंची ५.७", पाणीदार स्वच्छ डोळे, टी शर्ट जिन्स असा आकर्षक पेहरावा असलेला तो तरुण खुपच वेगात आपली दुचाकी चालवत होता... त्याच्या चेह-यावर कसलीशी भीती दाटली होती... कोणीतीही दूसरी गाडी, वाहन त्याच्या मागे दिसत नव्हते तरही आपला पाठलाग होत असल्यासारखा तो आपला वेग कमी न करता वाढवतच होता ... पावसाच्या पाण्याचे थेंब बारीक असले तरी वेगामुळे ते तडतड करत त्याच्या चेह-यावर आपटत होते... बाजुच्या आरशातुन मागे पाहुन तो आणखी भयभीत होऊन गाडीचा वेग वाढवायचा... झप, झप, झप करत वेगात रस्त्याच्या बाजुची झाडे मागे पडत होती... भयान काळोख आणि घोंगावणारा वारा भेदत दुचाकीवर बसलेला युवक देवाचा धावा करत होता... जणु मृत्युची झडप कोणत्याही क्षणी त्याच्यावर बसणार... काही अंतर पुढ येताच रस्त्याच्या दुस-या बाजुने अतिशय वेगाने एक पांढरी आकृति त्याच्या बाईकच्या आडवी गेल्याचा भास झाला. आणि त्याच क्षणी खिशातील मोबाइल व्हायब्रेट झाला.... एकदम दचकुन त्याने ब्रेक्स दाबले तसा त्याचा बाईक वरील ताबा सुटला... ओलसर रस्त्यावरून बाईक स्लिप झाली आणि खडखड, कर्ररर्रर्रर्रर कर्ररर्रर्रर्र आवाज करत तशीच घसटत पंचवीस ते तीस फुटावर जाऊन रस्त्याच्या बाजुला आडवी पडली... शेजारच्या झाडावर बसलेले ते घुबड पंखांची फडफड करत थोडे दुर जात पुन्हा खाली त्या मुलाकडे पाहु लागले .. बाईकचा आवाज थांबला तशी पुन्हा सर्वत्र निरव शांतता पसरली, बाईकवरील तो तरुण तिथेच बाजुला जखमी अवस्थेत विव्हळत पडला होता... रस्त्यावरुन घसटत गेल्यान त्याच शरीर सालटल होत.. चमडे गेल्याने हाताचे आणि गुडघ्याची हाडे स्पष्ट दिसत होती.... चेहराही जखमानी भरलेला... इतकी वाईट अवस्था असुनही तो एका अनामिक शक्तिच्या जाणिवेण थरारून जायचा तर कधी भयभीत नजरेने आजुबाजूच्या भयान काळोख पहात दचकुन जात होता... तसाच तो हळु हळू उठुन उभा राहात चालु लागला . त्याला नीट चालताही येत नव्हत... ...त्याचे कपडे ठिकठीकाणी फाटलेले आणी रक्तान भीजले होते. मदत भेटेल म्हणून खिशातून मोबाइल काढला तर त्याचे तुकडे झाले होते..पडत धडपडत बाजुला पडलेल्या आपल्या बाईक जवळ जात बाईक उभी करण्याचा प्रयत्न करु लागला पन त्याच्या जखमी शरीरात इतकी शक्ति राहीली नव्हती... बाईक उभी करण्यासाठी शरीरातली सारी शक्ति एकवटली पन व्यर्थ .... हतबल होऊन तसाच जमीनीवर बसुन तो युवक आता अक्षरशा: रडु लागला तसाच आभाळकडे हात जोडून म्हणाला... " देवा...खुप मोठी चुक झाली माझ्याकडून.. पुन्हा अशी चुक नाही करणार... मला वाचव देवा... मला मरायच नाही..." आणि मान खाली घालुन पुन्हा रडू लागला... अचानक काहीतरी आठवल तशी त्याच्या चेह-यावरील भीती आणखी गडद होऊ झाली.. थरथरत तो उठून उभा रहीला सारी शक्ति एकवटून त्यान गाडी उभी केली आणि पुन्हा गाडी सुरू करु लागला पन गाडी सुरू होत नव्हती...त्यान गाडीकडे पाहल तर तीच खुप नुकसान झालेल.. तोच बाजुच्या झाडीत कसलीशी हलचाल होत असल्याच जाणवल... एकटक समोरची ती हलचाल पाहु लागला... तसे सर्वकाही शांत झाले... रस्त्याच्या दोन्ही बाजुला पाहिल पन एखादेही वाहन दिसत नव्हते... तोच त्याच्या चेह-यावरील भाव बदलले... मन घट्ट करत त्यान आपला टी शर्ट काढला बाईकच्या पेट्रोलची पाईप काढुन टीशर्ट पेट्रोलने भीजवला आणि स्वताच्या अंगावर पिळु लागला...काही वेळातच तो पेट्रोलने पुर्ण भिजला, आणि जोरात ओरडला... " तु देणार आहेस ते भयानक मरण मला नको... माझ मरण मी ठरवणार...." एवढ बोलुन आपल्या खिशातील लायटर काढुन खट्ट खट्ट आवाज करत लायटर तो पेटवू लागला पन तो चालूच होत नव्हता... भयभीत नजरेन आजुबाजुला पहात तो जोरजोरात लायटरचे बटन दाबत होता, आता त्याच्या डोळ्यातुन अश्रु येत होते.. पन काही केल्या तो लायटर चालू होत नव्हता... रागाने जोरात त्यान लायटर जमीनीवर आपटला आणि जोरात ओरडून मदतीची भीक मागु लागला तोच त्याला समोरच्या दाट झाडांमधे सळसळ होत आसल्यासारख वाटू लागल... श्वास रोखुन तो समोर पाहू लागला... त्या भयान काळोखात आणि दाट झाडीमधुन कोणीतरी रांगत,सरपटत येत असल्याच स्पष्ट जाणवत होत... तसा तो युवक तीथुन धावण्याचा प्रयत्न करु लागला पन शरीर साथ देत नव्हत... लंगडत धावताना तो खाली पडला तशी त्याची नजर समोर गेली... एका झाडामागुन किंचीतशी मान तीरकी करत एक पांढरट आकृति त्याच्याकडे रखरखत्या नजरेने पहात होती तसे त्याच्या काळजाचे ठोके वाढु लागले. त्या आकृतिकडे पहात तो मागे सरकु लागला तोच पाय घसरल्याने तसाच जमीनीवर पडला... तोच ती भयान आकृति क्षणात त्याच्या समोर आली... काळेभोर लांब केस, अंगभर ओरबडलेल्या, कापलेल्या जखमा, त्यातून वहाणार रक्त, लाल रक्ताळलेले डोळे जणु आग ओकत होते... हे भयान रुप पाहुन त्या युवकाची दातखिळीच बसली...शरीराला लकवा मारून जावा तसा तो समोर पहात होता... छाती फाडून बाहेर याव अस ह्रदय धडधडू लागल... इतक्यात त्या आकृतिने आपला भयान लाल रक्ताळलेला जबडा पसरून त्या युवकाच्या अंगावर रक्ताच्या उलट्या केल्या.. त्याच संपुर्ण शरीर घट्ट अशा रक्तान भिजुन गेल... त्या आकृतिन युवकाला फरफट जंगलात नेले तसा तो जिवाच्या आकांताने ओरडला.... एका भीषण किंकाळीने आसमंत थरारून गेला... आणी पुन्हा वातावरणात एक भयान शांतता पसरली...
एका भयान आवाजाने मला अचानक जाग आली..मोबाइल मधे पाहील तर अडीज वाजुन गेलेले... 'कसला आवाज होता तो.... कोण किंचाळल असेल..' उठून थोड पाणी प्यायलो तोच बाजुच्या खिडकीतून थांड वा-याचा एक झोका अंगाला स्पर्श करून गेला... जणु कोणीतरी माझ्या सोबतच आहे ...जस की एकटा असुनही कोणीतरी प्रत्येक क्षणाला मला स्पर्श करुन आपल अस्तित्व दाखवून देतय... whatspp उघडून ते जुने मेसेज पुन्हा वाचु लागलो...डोळे पाणावले तसे.. "...हैलो कोल्हापुर....tomato clock मधे सकाळचे सहा वाजलेत..." नेहमीसारखीच आजही FM च्या आवाजाने जाग आली.. मोबाइल हाती घेतला तर what'sapp वर नेहमीप्रमाणे खूप सारे मेसेज आले होते, पन ज्या मेसेजची मी मनापासुन वाट पहायचो तोच आला नव्हता.........!!! सकाळी आवरून college वर गेलो...मुल मुली नेहमीप्रमाने ठिकठीकाणी आपापसात गप्पा मारत उभे होते... त्या सर्वामधे नेहमीप्रमाने मी एक चेहरा शोधत होतो... शेजारीच उभ्या मित्राने माझ्या कडे पहात नकारार्थी मान हलवली तसा मी आणखी निराश होऊन आपल्या लेक्चरला जाऊन बसलो... पन लक्ष लागत नव्हत मन थोड भुतकाळात गेल तसे डोळे पाणावले... बाजुला बसलेल्या मीत्राने खांद्यावर हात ठेवत मला धीर दिला... बाजुच्या खिडकीतुन बाहेल लक्ष्य गेल तर college च्या गेटजवळ बाइक वर ती दोन मुले दिसली, काही दिवसा पुर्वीच माझी मैत्रिण वर्षाची छेड काढल्याने मी दोघानाही फोडल होत...पन तरी निर्लज्जासारखे मुलींच्या मागे असायचेच... जवळच रहायचीत, घरी खायला अन्न नसायच पन आई वडिलाना कर्ज काढायला लाऊन पल्सर घेतलेली... काही दिवसापुर्वी चेन स्नैचिंग मधे त्यातल्या एकाला पोलीसानी पकडे होते....... काही वेळातच आमच्याच college मधला एक मुलगा धावतच त्यांच्या कडे गेला.. 'अनिकेत' त्याच नाव... तीघेही खुप अस्वस्थ दिसत होते...अनिकेत ने खिशातुन मोबाइल काढत कानाला लावला आणि त्यांच्याच बाइकवर बसुन तीघेही सुसाट वेगात निघुनही गेले. अचानक सर्वच college मधे कुजबुज चालू झाली...काही मुल आपापल्या बाइक घेऊन सुसाट निघालीत तसे मित्राने माझ्या बाइकची चावी मागितली... आम्ही दोघे लेक्चर अर्ध्यावर सोडून बाहेर पडू लागलो तसे माझ्या पासुन काही अंतरावरच बसलेल्या 'वर्षाने' प्रश्नार्थी मान हलवली आणि मी ही दोन्ही खांदे उडवत मित्राकडे बोट दाखवले... गाडी सुरु करुन आम्हीही त्या दिशेने निघालो.. " काय झालय रे.." मी प्रश्न विचारला पन तो काहीच न बोलता तसाच बाईक चालवत होता . पंधरा वीस मिनीटात आम्ही एका नेहमी निर्जन असणा-या रस्त्यावर आलो पन त्या दिवशी खुपशी वहान त्या दिशेला जात होती... इतक्यात एक Ambulance मागुन सायरन वाजवत येत असल्याच लक्षात आल... काय चाललय हे समजत नव्हत तोच समोर काही अंतरावर लोकांची गर्दी दिसली... त्या गर्दीत आमच्याच college ची मुल अधिक होती... गर्दीतुन वाट काढत पुढे गेलो तर एक 'अपाचे' बाइक पडली होती... वीस पंचवीस फुट ती घसटत आली होती... बाजुला एक टी शर्ट पडला होता. काही न बोलता मी बाइकचा नंबर पाहताच ओळखला आणि मित्राकडे पाहिल तस माझ डोक सुन्न झाल...... बाजुच्याच जंगलातुन काही लोक बाहेर येत होते तर काही आमच्या सारखेच आत निघाले होते... पाऊस पडुन गेल्याने खुपच चिखल झाला होता.. चिखलातुन आम्ही चालत आत गेलो तसे समोर उभ्या पोलीसाने लोकाना दुर होण्यास सांगितले. पोलिस कोणालाच जवळ जाऊ देत नव्हते... काही पोलीस बाजुच्या परीसरातून काही पुरावा हाति लागतो का त पहात होते तर एक धिप्पाड, ऊंच रंगाने सावळा, पंचेचाळीशीतल पोलिस काँन्सटेबल डोळ्यावरील चष्मा निट करत हाती घेतलेल्या पैड वर काहीतरी लिहीत होते .. गर्दी बाजुला होताच समोरच द्रुष्य पाहुन मी तर हादरुन गेलो... चिखलाने आणी रक्ताने बरबटलेल आमच्याच college च्या एका विद्यार्थ्याच छिन्नविछीन्न अवस्थेतिल प्रेत झाडाखाली पडल होत...त्याची अवस्था पाहून मला उलटीच आली... त्याच्या उजव्या हातात एक धारधार चाकु होता जो नेहमीच त्याच्या जवळ असायचा , अंगावर बनियान आणि जिन्स होती जे रक्ताने भिजले होते... . पाहण्याच धाडस होत नव्हत पन न रहावून तसाच पुढे गेलो आणि आणि काळजाचा थरकाप उडाला.. दोन्ही डोळ चाकुने फोडलेले, डावा हाताचा पंजा मनचटातुन छाटून वेगळा केलेला....चाकु पेटात घुसवल्याने खुपच रक्त गेल होत. इतक भयानक द्रुष्य पाहुन तीथ एक मिनीटही थांबायचे धाडस झाले नाही ...लगेच तीथुन बाहेर पडलो... उमेशचाही खुन झाल्याचे समजताच college मधे शांतता पसरली होती... मागील सात दिवसातील हा दुसरा खुन तो ही आमच्याच college च्या विद्यार्थ्यांचा आणि उमेशचाच जिवलग मित्र ... पन हे काय आणि कशामुळे घडतय हे पोलीसानाही कोडच होत... उमेश आमच्या college चा चॉकलेट हीरो होता... वडिल मोठे उद्योगपति त्यामुळे पैशची कमी नव्हती.. फक्त उमेश नाही तर मागील काही महीन्यापासुन college मधुन दोन तीन मुली गायब झाल्या होत्या तर सात ते आठ मुलीनी college कायमच सोडल होत... या घटनेला आठवडा उलटून गेला असेल.. अधुन मधून पोलीसांच्या फे-या college वर व्हायच्या. कदाचित खुनाचा धागा सापडतो का ते पाहण्यासाठी...आजही दोन काँन्स्टेबल आले होते... पन मला दुनियादारीची काहीच पडली नव्हती..मी माझ्या विचारात गुरफटल होतो..." का अस वागत असेल..अचानक बोलण का बंद केल असेल.. पन मोबाइल का off दाखवतोय..काही विपरीत तर घडल नसेल.." तोच whatsap वर मेसेज आल्याच जाणवल... पाहील तर 'वर्षा' चा मेसेज होता... ती college च्या पार्किंग मधे होती... मी धावतच तीच्याकडे गेलो.. गडद्द जांभळ्या रंगाचा टी शर्ट, काळी जीन्स, ऊंच टाचेच्या सैंडल्स आणि पाठीवर मोकळे सोडलेले केस... मी लांबुनच हाक दिली..."वर्षा..." तशी कानाला लावलेला मोबाइल बाजुला करत गर्र कन मागे फिरली... मला पहाताच नेहमी प्रमाणे म्हणाली.." ये कशी दिसते सांग.. कालच खरेदी केले..." मला प्रश्न पडला होता की नेमक काय नवीन घातलय... सर्वच नवीन वाटत होत... " खुप छान दिसतेस....आधी भेटली असतीस तर तुझ्यावरच जिव जडला असता बघ..." " बास... पुरे झाली स्तुती... जास्त मस्का नको....तुझ काम केलय.." एवढ बोलुन तीन एक कागद मला दिला... तो पहाताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला.. तीला thanks म्हणुन... आणि मागे फिरलो पन मागे पुन्हा तीच्याकडे केविलवाण्या नजरेने पहिल तशी वर्षा म्हणाली... " चेहरा इकतका पन लहान मुलासारखा करु नकोस.... मला माहिती आहे .... मलाही तुझ्या सोबत याव लागणार...." पुन्हा आपल्या गाडीवर बसत मला म्हणाली... " पण लवकर परत याव लागेल... घरी आई ओरडेल जास्त उशीर झाला तर..." " ठीक आहे ... उद्या सकाळी लवकर बाहेर पडू....." बर म्हणत ती गाडी घेऊन निघुन गेली. मी ही तीला thanks म्हणून तीथून चालत आत येत होतो इतक्यात College च्या मागील भागात अनिकेत आणि त्याचे ते दोघे मित्र आपसात बोलताना दिसले.. माझ सहज लक्ष्य गेल तर हे आपसात काय बोलत होते समजत नव्हते... अनिकेत खुप उदास आणि भयभीत वाटत होता म्हणून मी थोड पुढ जाऊन पाहू लागलो.. आपल्या मित्राकडे पहात तो म्हणाला.. " ती नाही सोडणार आपल्याला... आधी विशाल मग उमेश आता आपल्या तिघा पैकी कोणीतरी मरणार ....अरे मला उमेश बोलवत असल्याचा भास होतो रे..आणि रात्रि अचानक जाग येते....." त्याच बोलन ऐकुन त्याच्या एका मित्राने तोंडातील मावा थुंकत त्याला वेड ठरवल आणि तीथुन निघुन गेले... पन हे कशाबद्दल बोलत होते काहीच समजत नव्हत..थोडा वेळ अनिकेत कड पहात होतो, त्याच्या मनावर एक दडपन असल्या सारख वाटत होत... तशी आमचु मैत्री नव्हतीच तरी पुढ जाऊन विचारावस वाटल पन तो लक्ष न देताच निघुन गेला. आणि फारसा विचार न करता मी ही घरी परतलो..कधी ही रात्र संपते अस झाल होत... आज झोप येतच नव्हती... अस्वस्थ आणि उतावीळ मन थोड भुतकाळात गेल... मला आमची ती भेट आठवली... नेहमी प्रमाणे मी आणी मित्र गप्पा मारत होतो. तो च्विंगम चघळत college च्या भिंतीला शेजारी उभा होता.. लांबुन आपली gf येताना दिसताच तोंडातील च्युईंगम भिंतीवर चिकटवुन तीच्यावर impression मारायला गाडी घेऊन तीच्या मागे गेला तशी आपली मैत्रिणी 'सुहानी' सोबत बोलत समोरून 'ती' येताना दिसली.. 'ती'.........देखणी, गोरीपान, कपाळावर बारीकशी टिकली, साजरी .. मोठे आणी स्वच्छ पाणीदार डोळे..काळेभोर मोकळे सोडलेले केस ... नाकावर चष्मा, छानसा पंजाबी ड्रेस. आणि वा-याच्या झोक्यासोबत चेह-यावर येणा-या केसाना एका हाताने बाजुला करणारी.... खुपच साधी रहात होती तरीही सहज एखाद्याच्या मना भरेल आशी 'ती'... मी दोन वर्षापासुन तीच्यावर एकतर्फी प्रेम करायचो .. तीला पाहील्याशिवाय दिवस पुर्णच होत नसे... ती समोर दिसताच काळजाची धडधड जास्तच वाढायची... पन आजवर तीच्याशी बोलण्याची हिम्मतच झाली नव्हती.. समोरून येत 'ती' तीथेच उभी राहीली... माझ्यापासून थोड्याच अंतरावर ... आणि त्या वेळी माझ्या लक्षात आल की माझ्या मित्राकडून खुप मोठी चुक झाली... ते च्विंगम तीच्या केसाच्या शेंड्याला चिकटल होत... मी तीला सांगण्याचा प्रयत्न करत माफी मागितली त्या वेळी तीचही लक्ष्य केसाकडे गेल.. तीला इतका राग आला की माझ काही ऐकायच्या आतच खाडकन माझ्या कानाखाली वाजवली.. आपल्या पासुन दुर रहा म्हणून दम भरला... तीच्या सोबत असलेल्या सुहानी ने ही भरपुर तोंडसुख घेत माझी तक्रार प्रिंसिपल कडे करून तीखट मीठ लाऊन खुप काही सांगितल .. दोन आठवड्यासाठी मला रस्टिकेट केल गेल... ज्या गैरेज मधे पार्ट टाईम काम करतोय तीथे पंधरा दिवस फुल्ल टाईम कराव लागणार होत... केबीन मधुन बाहेर येताच दोघी समोर दिसल्या... मी काही न बोलता... तसाच निघून गेलो... काही न करता माझ्या प्रेमाचा असा शेवट होईल अस स्वप्नातही वाटल नव्हत.. आधी निदान तीला चोरून का असेना पहाता येत होत पन आता तीन लांबच रहा म्हणून दम दिला होता.... त्या नंतर ती दिसताच मी रस्ता बदलु लागलो... आणि मला पहाताच नाक मुरडत तीही निघुन जायची.. ती काही मैत्रीणीसोबत रहायची... एक रात्रि खुप पाऊस पडत होता... तीला खुप ताप भरलेला आणि तीची मैत्रीण सुहानी आपला boyfriend उमेश birthday celebrate करायला बाहेर गेलेली.. रात्र खुप झाल्याने कोणि डॉ. तीच्या मैत्रीणिचा call घेत नव्हता... आणि जे घेईल ते त्यानाच hospital ला यायला सांगत.. तीची तब्बेत बिघडतच चालली तशा सर्वजणी खुप घाबरल्या .. त्यांच्यातील एका मुलगी मला तीचा आशिक म्हणून ओळखत होती.. तीने मला call करुन तीची तब्बेत बरी नसल्याच आणि डॉक्टर भेटत नसल्याच सांगितल... क्षणाचाही विलंब न करता मी तीथल्याच एका डॉक्टरला उचलला.. आणि त्यांच्या रुमवर आलो पन आत न जाता त्यांच्या रुम बाहेरूनच तीला पाहील.. डोळ बंद करून ती पडून होती, तापाने अंग थरथरत होत... थांबलो.. डॉक्टरने लिहुन दिलेली औषध आणायला बाहेर पडलो मुसळधार पाऊस त्यातच खुप रात्र झालेली... तासभर फिरून शेवटी एक मेडिकल सापडल.. औषध घेऊन त्यांना दिलीत आणी त्या डॉक्टरला घेऊन घरी परतलो... ती बरी व्हावी एवढी अपेक्षा होती... त्या नंतर माझी मैत्रिण वर्षा ने तीचे सगळ दुर केले तसे sorry बोलायला मला शोधु लागली..पन मला काहीच कल्पना नव्हती.. तीला पहाताच मी नेहमीप्रमाने आपला रस्त बदलतच होतो... त्या दिवशी ती हॉस्टेल वरून ती सुट्ट्यांसाठी घरी निघाली होती... रात्रि ९ ची गाडी असल्याने ती ८ वाजता बाहेर पडली... ती बसमधुन उतरली तीथेच मी गैरेज मधे पार्टटाईम काम करायचो... तीला पहाताच देवाचे आभार मानले...तीच लक्ष माझ्याकडे नव्हत.. एक् शॉर्टकट ने ती चालत स्टेशन कडे निघाली... तसा मी घाबरलो.. कारण रस्ता खुपच धोकादायक आणी सुनसान असल्याने वाटमा-या व्हयच्या.. आपल्या दोन्हा बैग सावरत तीच चालण सूरु होत... पन अचानक तीच्या लक्षात आल की कोणीतरी आपला पाठलाग करतय... मागे पहाण्याची हिम्मत होत नव्हती... तीन आपला चालण्याचा वेग तसाच ठेवला.. पन मागुन कोणीतरी झपाट्यान पावल टाकत आपल्या दिशेन येत असल्यासारख वाटु लागल.. थोड धाडस करत थांबुन तीन मागे पाहील तर काही अंतरावर अंधुक प्रकाशात चार ते पाच मुल चोरट्या नजरेने तीच्याकडे पहात आपापसात काहीतरी कुजबूजत होते... तशी तीच्या काळजाची धडधड वाढली... आपल्या बैग उचलुन तीन चालण्याचा वेग वाढवला तसे मागुन येणा-या मुलांच्या चालण्याचा वेग हि वाढु लागला.. तीला आता चांगलाच घाम फुटला होता.. जोरात ओरडाव म्हण्टल तरी आजुबाजूला अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग तेवढ्याच होत्या, दहा मिनीटाचा हा शॉर्टकट खुप महागात पडतोय अस वाटत होत... भीतीने तीच्या डोळ्यामधे पाणी आल, घशाला कोरड पडली... थरथरत्या हातानी बैगेतून मोबाइल काढायचा प्रयत्न केला आणि नेमका मोबाइल खाली पडला... ती मोबाइल उचलायला खाली वाकली तसा त्या मुलानी तीच्या दिशेेने चालण्याचा वेग वाढवला... तीच्या जवळ पहोचाले तोच " hello madam.." म्हणून मी तीला जोरात हाक मारली तशी तीन झटकन उभा राहात माझ्याकडे पाहील.. तसा मी म्हणालो.. " बर madam... तुम्ही म्हणताय तर दहा रूपये हमाली द्या... पन बैगा खुप जड आहेत हो... आजकाल महागाईच्या जमान्यात एवढ कमी पैसे घेऊन परवडत नाहीत..." तीच्या चेह-यावर भीती स्पष्ट दिसत होती.. पन मला पहाताच तीची भीती नाहीशी झाल्यासारखी वाटली... मला समोर पहाताच ती टवाळखोर मुल बेत फसल्यासारखी वैतागुन मागे परतली... तीच्या नजरेत न पहाता मी म्हणालो .. " sorry गायत्री ... मी खोट बोललो.. पन नाइलाज होता... हा रस्ता चांगला नाही... मी तुम्हाला तीथपर्यन्त स्टेशन सोबत देतो..." तशी माझ्याकडे पहात म्हणाली... " आजुन रागावला आहेस....sorry रे.. आणी thanks.. त्या रात्रि आणि पुन्हा आज मदत केल्याबद्दल... गैरसमज झाला होता रे माझा.." ती चक्क माझ्याशी बोलत होती... माझा आनंद गगनात मावेनासा झाला... तीच्या सोबत चालता चालता माझी बडबड सुरु झाली... तर ती काही जास्त न बोलता गालात फक्त हसत होती... तीला ट्रैवल मधे बसवून मी खाली उभा खिडकी शेजारी येत म्हणलो... " madam... दहा रूपये राहीले तुमच्याकडे.." ती खुपच खळखळू हसु लागली.. मी खुप आनंदने तीच्याकडे पहात होतो...ती निघुन गेली तसा थोड्या वेळातच whatsapp वर तीचा मेसेज आला... त्या दिवसापासुन फोनवर गप्पा मारण नेहमीच झाल...या काही दिवसात आम्ही खुप जवळ आलो होतो. एकमेकाशी बोलल्याशिवय दिवस पुर्ण होत नसे.. college च्या पहील्या दिवशी तीला प्रपोज करणार होतो... ती ही भेटायला तीतकीच आतुर होती.. पन college सुरु व्हायला दोनच दिवस शिल्लक होते.. आणि अचानक तीचा मेसेज येण बंद झाल...फोन पन स्विच अॉफ दाखवत होता... आज महीना होत आला तीच्यासोबत काहीच contact झाला नव्हता....सगळीगडे तीचा शोध घेतला पन कुठेच तीचा पत्ता लागत नव्हता उद्या तीला भेटायला घरी जायच होत म्हणून खुप खुश होतो.....

त्याच रात्रि अनिकेत एकटाच घरीच होता... अनिकेत... उमेश चा जिवलग मित्र... देखणा, जीम मधे जाऊन छान तब्बेत कमावलेली.. जिवलग मित्र गेल्याच्या धक्याने खुप निराश झालेला... एकटाच आपल्या रूम मधे बसुन मोबाइल वर टाईमपास करत होता... तो एक निनावी फोन आला... त्यान कॉल रिसीव्ह केला... " हैलो...." पन पलीकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता... दोन तीन वेळ हैलो म्हणाला पन काहीच नाही .... शेवटी वैतागून call बंद केला आणि पुन्हा मोबाइल वर गेम चालु केली.... तोच पुन्हा मोबाइल ची रिंग झाली... call घेत हैलो म्हणाला पण काहीच प्रतीसाद येत नव्हता...तो तसा मोबाइल कानाला लाउन अनिकेत शांतपने ऐकु लागला... समोरील व्यक्तिच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकु येत होता... अनिकेत ला प्रचंड राग आला समोरच्या व्यक्ति ला चार शिव्या हासडत त्यान call cut केला आणि मोबाइल बाजुला ठेऊन त्याच्या कडे पहातच बेडवर आडवा झाला... थोडा वेळ एक निरव शांतता पसरली पन पुन्हा मोबाइल ची रिंग झाली... अनिकेत रागातच उठला आणि फोन उचलुन शिव्या हासडणार तोच समोरची व्यक्ति बोलु लागली... " है......है ....हैलो..... म......म.......मला वाचव अनिकेत......" आवाजात कमालीची भीती जाणवत होती, वेगाने धावत असल्या सारख त्या व्यक्तिच्या श्वासाची गती आणि धडधडणार काळीज.. जणु एक भयन मृत्यु त्याचा पाठलाग करतोय आणि पुर्ण पणे असहाय्य पने तो जीव वाचवण्यासाठी मदतीची भिक मागतोय...... अनिकेत खुपच घाबरला.... आवाज त्यान ओळखला होता, पन हे कस शक्य आहे.... भय आणि आश्चर्य दोन्ही अनिकेत च्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होत... घरातुन बाहेर येत बोलु लागला.... " कोण.....बोलतय.....काय झालय तुम्हाला..... " तशी पलीकडील व्यक्ति बोलु लागली... " अ......अनिकेत....मला नाही ओळखलस...अरे मी...तुझा मित्र........ उमेश......" अनिकेत च्या अंगावर सर्रर्रर्रर्रर्र कन काटा उभा राहीला... त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनासे झाले... तोच समोरील व्यक्ति जिवाच्या आकांताने ओरडली आणि कोणीतरी झुडपातून ओढत, फरपटत नेत असल्याचा आवाज होऊन फोन बंद झाला.... अनिकेत ने मोबाइल समोर धरून call history मधे नंबर पाहीला पन तो नंबरच नव्हता... काही वेळापुर्वी आलेला फोन चा नंबर मोबाइल मधेच नव्हता... अनिकेतला काहीच सुचेनासे झाले... तो धावत घरात गेला...त्यान किशोर आणि दिपक या आपल्या दोघा मीत्राना झालेली घटना सांगितली पन कोणिच विश्वास ठेवला नाही..... या घटनेन अनिकेत मात्र खुप घाबरून गेला होता... आज तो घरी एकटाच होता... घरचे सर्व लग्नाला गेले होते.... त्यान दरवाजा निट बंद केला आणि आपल्या रूममधे आला... मित्राना फोन करून घरी येण्यास सांगु लागला... पन आज त्याचे सर्व मित्र आपापल्या कामात व्यस्त होते... पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवस असल्याने आकाश ढगानी व्यापल होत... आणि पावसाची रिपरिप सुरुच होती...मोबाइल बाजुला ठेऊन तो बेडवर आडवा झाला....एव्हाना रात्रिचे साडे बारा वाजुन गेले होते... अजुनही तो फोन मधील व्यक्तिच्या विचारातच गुरफटला होता... काही वेळातच त्याचा डोळा लागला.. तोच एक चाहूल त्याला जाणवली आणि खाडकन डोळे उघडले... बाहेरील हॉल मधे कोणीतरी चालत असल्याच जाणवल, थोडी कुजबूज ऐकु येत होती... कार्यक्रमाला गेलेली घरातील मंडळी आली असतील म्हणून तो ऊठला आणि बाहेर हॉल मधे आला पन कोणीच नव्हत... एक भयान शांतता त्याच्या सभोवताली पसरली होती... अनिकेतच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले... आजुबाजूला पहात तो आपल्या रुमकडे वळला.. थोड पाणी पिऊन पुन्हा बेडवर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागला... पन आज त्याची झोप उडाली होती... त्याचे कान आजुबाजूच्या हल्का आवाजही टीपत होते... या भयान वातावरणात तो आपल्या मोठ्या आलिशान घरात एकटाच होता... सर्वत्र इतकी शांतता होती की भिंतीवरील घड्याळ काटे स्पष्ट ऐकु येत होते... इतक्यात आपल्या रूमच्या बाहेर फर्शीवरुन कोणालातरी फरपटत नेत असल्याचा आवाज येऊ लागला... तशी अनिकेतची नजर दरवाजाच्या खालच्या फटीतून आत येणा-या प्रकाशाच्या हलचालीवर स्थिरावली... पलीकडे कोणीतरी होत ज्याची चाहुल अनिकेत ला लागली होती... भितीने त्याला अक्षरशा: घाम फुटला होता... जास्त हलचाल न करता त्यान आपल्या पायाने हळुच चादर वर ओढत अंगावरुन डोक्यावर घेतली आणि किलकील्या नजरेने तो दरवाजाच्या पलीकडील हलचाल मुक पणे पाहु लागला... बाहेरून एक विचीत्र आवाज येत होता...धरधर चाकुने शरीराचा एखादा अवयव हळु हळू कापत असल्याचा आवाज... अनिकेतला काय करावे सुचत नव्हते... इतक्यात कोणालातरी फरटत ओढत नेत असल्याची चाहुल त्याच्या रुमच्या दरवाजाच्या पलीकडून येऊ लागली... तो आवाज पुढे पुढे सरकत होता... आवाज थोडा दुर जाताच त्याची नजर बाजुच्या टेबलवर ठेवलेल्या मोबाइल वर गेली... जास्त हलचाल न करत त्यान तो मोबाइल उचलला... तोच मोबाइल व्हायब्रेट झाला आणि भितीने त्याच्या अंगावर काटा उभा राहीला... स्क्रिनवर पाहीला पण अनोळखी नंबर होता... नंबर कोणाचा का असेना आपल्याला मदत मिळेल..त्या फोन रिसीव्ह केला पण काही बोलायच्या आतच समोरची व्यक्ति बोलु लागली.... "अनिकेत ......मी उमेश ..... प्लिज...प्लिज मला वाचव रे.... 'ती' मला जीवंत नाही सोडणार.... " त्याच्या आवाजातली भीती आणि जीवंत रहाण्यासाठी चाललेली धडपड स्पष्ट जाणवत होती.... पन अनिकेतच्या मेंदुत मात्र लाल मुंग्यांच वारुळ उठल होत... उमेश दोन आठवड्या पुर्वीच मेला होता... अनिकेत ची वाचा बसल्यासारखा तो सुन्न होऊन ऐकत होता... तोच पुन्हा असह्या वेदनेण कण्हत असलेल्या आवाजात समोरील व्यक्ति बोलु लागली... " अनिकेत..... मी तुझ्या रुमच्या बाहेरच आहे रे... वाचव रे मला..." एवढ बोलुन फोन कट झाला तोच कोणीतरी धावत त्याच्या रुमच्या बाहेर आल आणि जोरजोरात दरवाजा बडवू लागल... " अनिकेत...बाहेर ये.....'ती' तुझ्या रुम मधेच आहे....." A.C रुम असुन अनिकेतच सर्व अंग घामान भिजल होत.. लकवा मारुन गेल्या सारखा कोणतीच हलचान न करता तो पडुन होता... त्यातच बाहेरुन आलेल्या त्या आवाजा शरीरातील उरलेल आवसानही संपल होत... आपल मरण त्याला जणवत होत... तोच त्याच्या बेडखालुन कोणीतरी सरपटत बाहेर येत असल्याच जाणवल... रुम मधे पसरलेल्या मंद प्रकाशात एक मुलगा सरपटत भिंतीकडे जात तीचा आधार घेऊन बसला... त्याच तोंड अनिकेत कडे होत... त्याचे डोळ फोडले असल्यान चेहरा रक्तान माखला होता... अनिकेत अंगावर घेतलेल्या चादरीतुन भयभीत नजरेने फक्त पहात होता... तो उमेशच होता... रुम मधील मंद प्रकाशात त्याचा रक्ताळलेला चेहरा आणखी भयान वाटत होता... त्याचा चेहरा स्थिर होता जणु तो एकटक अनिकेत कडे पहात तुझ मरण आलय हेच सांगत होता... आचानक उमेश न थरथरत्या आवाजात बोलायला सुरवात केली... " अनिकेत....... ती तुझ्या मागे उभी आहे .... आणि तुझ्याकडेच पहाते आहे...रे " पुर्ण ताकतीने ओरडावे किंचाळवे अस अनिकेतला वाटल पण भितीन त्याचा आवाजच गेला होता.... आणि इतक्यात आणखी एक भयानक गोष्ट घडली... त्या आपल्या मागे कोणाचीतरी चाहुल जाणवली आणी दुस-याच क्षणाला सर्व लाईट्स चर्रर्रर्रर्रर चर्रर्रर्रर्रर आवाज करत बंद झाल्या...आणि मघापासुन अंधुक प्रकाशात चाललेला जिवघेणा खेळ आणखी भीषण झाला... कोणीतरी तोंड दाबुन धराव तसा अनिकेतचा ऊं...ऊं...ऊं...असा आवाज येत होता आणि एखाद्या धारधार हत्यारान मांस कापावे असा भीषण आवाज हळु हळु त्या खोलीत घुमू लागला...... --------------------***------------------ खाडकन वा-याने खिडकी उघडली तसा थंड वा-याची झुळूक आत आली.. कोणीतरी स्पर्श करुन जाव तसा अंगावर सर्रर्रर्रर्रर्रर्ररर्र कान काटा आला तसे झट कन डोळे उघडले... रात्रिचे तीन वाजायला आले होते... पुन्हा तीचे जुने मेसेज वाचत झोपी गेलो... दुस-या दिवशी ठरल्या प्रमाणे वर्षा आणी मी तीच्या घरी बाईवरून निघालो.. मेन रोड वरुन आम्ही नेहमीच्याच वेगात जात होतो.. पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होत... गप्पा मारता मारता रस्ता आम्ही कधी पोहचलो समजलाच नाही.. पत्ता शोधायला खुप वेळ लागला नाही .... खुपच छान बंगला होता... लोखंडी गेट सरकवुन आम्ही आत गेलो... माझ ह्रदय मात्र धडधडत होत... दरवाजा 'ती ' उघडेल की आणखी कोणी... माझ्या चेह-यावरील आनंद आणि किंचितशी भिती पहुन 'वर्षान' आपली मान हालवत स्वताच डोअरबेल वाजवली... काही वेळातच दरवाजा उघडण्याची चाहुल लागली तशी माझ्या ह्रदयाची धडधड आणखीच वाढली...एका मुलीने दरवाजा उघडला.. मी काही बोलायच्या आत वर्षा म्हणाली... " hiii... गायत्री इथेच रहाते ना...." हो म्हणत ती मुलगी संशयान पाहु लागली तोच पुन्हा वर्षाने परिस्थिति हाताळली.. " मी तीची college मधली मैत्रिण... " तीन आत यायला सांगितल तस आम्ही आत जात सोफ्यावर बसलो... " थांबा आईला बोलवते..." म्हणत तीने तीच्या आईला हाक देत आमच्याकडे एकटक पाहु लागली.. खुपच छान बंगला होता आतुन... समोर मोठा LCD, बाजुला पुस्तकानी भरलेल कपाट, डाव्या बाजुला दुस-या मजल्यावर जाण्यासाठी जिना त्या खाली तयार केलेल आणखी एक लाकडी कपाट... ज्यात फ्लावर पॉट आणि काचेच्या शोभेच्या वस्तु... तशीच नजर बाजुच्या भिंतीवर गेली... एका व्यक्तिचा हार घातलेला फोटो होता... तोच जिना उतरत एक चाळीशीतील स्त्री आमच्याकडे पहातच खाली उतरु लागली... गायत्री ची आई आहे की मोठी बहीण आहे हेच समजत नव्हत... वर्षाने नमस्कार करत आमची ओळख करुन देत म्हणाली... " college सुरु होऊन खुप दिवस झाले तरी गायत्री आली नाही, फोन पन बंद आहे... काळजी वाटली म्हणून भेटायला आले..." तशी ती बाई एकदम दचकुनच म्हणाली... " काय ......? गायत्री आदल्याच दिवशी इथुन college साठी निघुन गेली..." त्यांच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव ऊमटले... " मी तीची सावित्र आई आहे म्हणून ती जास्त माझ्याशी बोलत नाही ... पन मला चैन पडत नाही.. सावत्र असले म्हणून काय झाल आई आहे मी तिची... " डोळ पदराने स्वच्छ करत म्हणाली.. " खुप मुलांबरोबर तीच अफेयर होती.. मला वाटते कुणासोबत पळुन गेली असेल..." तिच बोलण ऐकून आम्ही दोघेही हदरुन गेलो.. पुढे काय बोलावे सुचेनासे झाले... तीची बडबड चालुच होती पन माझ लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हत... त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो पन आता मनात नको नको ते विचार येऊ लागले. त्यांची मुलगी काही अंतरावर ऊभी होती कदाचित आमची बाहेर पडण्याची वाटच पहात होती... तीच्याकडे पहात गाडी थांबवली.. मला पहाताच ती म्हणाली.. " मी तुम्हाला ओळखल होत..दीदीने whatspp वर तुमचा फोटो दाखवला होता..." क्षणभर थांबून ती पुन्हा बोलु लागली... " गायत्री दीदी माझी सावत्र बहीण .. आई तीला खुप त्रास द्यायची.. कधी वेळेवर जेवण द्यायची नाही... बाहेर एखाद्या मुलाने तीची छेड काढली तर त्या मुलाला रागवण्या पेक्षा ती दीदीचा रस्त्यातच अपमान करायची आणि घरी येताच पुन्हा माराहान करायची..." तीच्या आवाजातील वेदाना स्पष्ट जाणवत होती... " दीदी बेपत्ता झाली याचा जास्त आनंद आईलाच झालाय...प्लिज तीला शोधायला मदत करा...मी तुमच्या समोर हात जोडते.." तीन पाणावलेल्या डोळ्यानी आमच्यासमोर हात जोडले..... खुप आपेक्षेने तीच्या घरी आलो होतो पन आता खूपच अस्वस्थ झालो होतो.. त्याहुन आधिक भिती वाटत होती...आम्ही परतीचा रस्ता धरला... ठरलेल्या वेळेत वर्षाच्या घरी पोहोचलो आणि तीच्याच घरी चहा घेऊन माझ्या घरी आलो... ती रात्र जागुनच काढली... कुठे असेल ती... कशी असेल ती... विचार करता करता डोळे पाणावले... दुस-या दिवशी college ला आलो पन लेक्चरला बसण्याचा मुड नव्हता म्हणून लायब्ररीत निघलो तोच दोन मुल पाठमोरी पायरीवर बसलेली दिसली... मी त्यांच्या मागे जाऊन पाहील तस पायाखालची जमीनच सरकली..त्यातल्या एकाचा कॉलर पकडला तसे त्यांनी जे सांगितल ते ऐकुन तर तळपायाची आग मस्तकात शिरली... त्यांना काही न बोलता बाहेर आलो...तोच समोरच 'ती' दोन मुल दिसली जी... college च्या गेटबाहेर मुलीना पाहुन शिट्या मारत छेडछाड करत होती... त्यांच्याकडे पाहुन मस्तकाची शीरच उठली... समोरच्या मैदानात काही मुल क्रिकेट खेळत होती..तसाच चालत त्यांच्या मधून जात एक स्टंप उपसली आणि चालत जात त्यातल्या एकच्या डोक्यातच फोडली... त्याला पडलेल पहून दुसरा घाबरुन सुसाट वेगात निघुन गेला...college मधल्या मुलामुलीनी बेदम मारुन त्याला पोलीसांच्या स्वाधीन केले पन जख्मी असल्याने पोलीसानी त्याला hospital मधे दाखल केले.. तोच एक call आला " हैलो" म्हणून मी फोन रिसीव केला... समोरच्या व्यक्तिच बोलण ऐकुन हदरुनच गेलो... मी, वर्षा आणि college चे काही मित्र लगेचच hospital मधे पोहोचलो... तीची बहीण आईच्या कुशीत डोक खुपसुन रडत होती तर आई सुन्न झाल्यासारखी शुन्यात पहात होती पन अश्रु मात्र एकसारखे वहात होते... तीचे वडील डॉक्टरांना विनवण्या करुन आपल्या मुलीचा जीव वाचवा म्हणत धाय मोकलुन रडत होते... आम्ही मित्र पुढे गेली तसे त्यांना जास्तच गहीवरुन आल... त्यांना धीर देत ICU च्या काचेतून आत पाहील तर ती बेशुद्ध अवस्थेत होती... आणि तरीही तीचे अश्रु तीच्या गालांवरुन ओघळत होते... तीला पाहुन वर्षाला तर हूंदकाच आला... माझेही डोळे पाणावले... खुप प्रश्न माझ्या मनात होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त तीच देऊ शकत होती... आम्ही सगळेच तीचा जीव वाचावा यासाठी देवाचा धावा करत होतो.. डॉक्टरनी सांगितल की " विष पुर्ण शरीरात पसरलय.. येत्या ४८ तासात काही होऊ शकत... तीच्या मनावर एक भयंकर दडपन आहे.म्हणूनच तीन विष खाल्ल असनार.. तीच मन हलक व्हायला हव.." -------*-------- दोन दिवस घरातू बाहेर पडलोच नाही.. college मधील त्या मुलाकडून समजलेले सत्य राहून राहुन मन विचलित करत होते... एक वेळ वाटल की हे आयुष्यच संपवून टाकाव ..तोच hospital मधुन तीच्या आईने call केला आणि तीची मैत्रीण वर्षाला घेऊन यायला सांगितले...क्षणाचाही विलंब न करता college मधुन वर्षाला घेऊन तसाच hospital मधे गेलो. ती शुद्धीवर आली होती पन कोणाशीच बोलत नव्हती... भीतीपोटी ती आई वडीलाशी काहीच बोलली नव्हती.. .. तीच्या वडीलानी आम्हाला आत जाण्यास खुणावल... आत जाताच वर्षाने तीचा हात आपल्या हाती घेतला आणि म्हणाली... " सुहानी....." हळुवार पणे तीन डोळे उघडले... आम्हाला पहाताच तीच्या डोळ्यातून घळ घळ पाणी येऊ लागल...मला पहात आपले हात जोडत म्हणाली... " संपल सगळ... प्लिज...मला माफ करशील का रे.खुप त्रास दिला मी तुला....खरी मैत्री आणि खर प्रेम नाही ओळखता आल मला... " माझेही डोळे पाणावले.. पुढे जात तीचा हात आपल्या हाती घेत तीला थोड धीर दिली.... तशी ती पुढे म्हणाली.... " खुप प्रेम करतोस ना रे गायत्री वर.."
पाणावलेल्या डोळ्यानी मी मान हालवत म्हणालो... " अजुनही आहे ग... जे घडल यात तुमची चुक नाही...त्याना आम्ही नाही सोडणार... मी गायत्रीला जशी असेल तशी स्वीकारीन.... पन प्लीज सांग कुठ आहे ती... मी तीच्यासोबत खुप म्हणजे खुप दुर निघुन जाईन... या वाईट जगापासून खुप दूर...आणि जर मी तीला आवडत नसलो तरी पन फक्त एकदा तीला भेटायच आहे ग..." माझे शब्दही अडखळत होते.. बोलता बोलता मला गहिवरुन आल.. वर्षाने माझ्या खांद्यावर हात ठेवला..... तशी सुहानी पुढे म्हणाली... " तीचाही खुप जिव होता तुझ्यावर... पन सगळ माझ्यामुळे संपले रे..." मला तीच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता... .." गेली रे ती आपल्याला सोडून.." सुहानीचे शब्द ऐकताच मी कोसळलोच... कुणीतरी शरीरातील प्राण काढुन घ्याव अस वाटल... " संजु college सुरू व्हायच्या च्या आतल्या दिवशी माझा birthday होता रे..माझी बेस्ट friend गायत्रीसोबत करायचा होता म्हणून तीला मी आधीच माझ्या घरी यायला सांगितल होत..." माझा boyfriend उमेशन मला भेटायला बोलवले आणि सोबत तीलाही घेऊन यायला सांगितल. सोबत गायत्री आहे हे त्यांना माहितीच होत...मी नकार दिला तसा माझा बनवलेला MMS मला whatspp वर पाठवला.. त्या वेळीच संपले रे मी... तो MMS पाहताच आयुष्यच संपलय अस वाटल... " तीला भरून आल होत...तीच्या शेजारीच बसुन तीचा हात हातात घट्ट धरला होता.. वर्षा सुन्न मनेन सगळ ऐकत होती तशी सुहानी पुढे म्हणाली.. " संजु... एक मुलगी जेव्हा मनापासुन प्रेम करते तेव्हा ती त्या मुलावर आपल्या जन्म दात्या आईबाबांपेक्षा आणि देवापेक्षाही जास्त विश्वास ठेवते .. पन त्यानेच माझा 'घात' केला... मला जगासमोर उघड टाकल रे.. त्याच्या birthday दिवशी खाण्यातून मधून गुंगीच औषध देऊन माझा अश्लील MMS बनवला . आम्ही मुली कितीही मॉडर्न तरी मनाने हळव्याच रहातो..... " तीचे शब्द ऐकुन मन सुन्न झाल होत.. आणि भरुनही आल होत... पन तसाच तीच बोलण ऐकू लागलो... " माझा नाईलाज झाला.. आम्ही माझ्या गाडीवरुन तीथे गेलो... उमेश एकटाच उभा होता...रात्र होत आलेली... जीथे उमेशचा खुन झाला होता तीथेच त्यान आम्हाला बोलवल होत... गायत्री रस्त्यावरच गाडीशेजारी उभी राहीली, मी त्याच्या जवळ गेले .. तो थोड आत जंगलात जाऊ लागला तशी मी ही त्याच्या मागे चालत तो MMS काढून टाक म्हणून त्याला विणवण्या करु लागले.. खुप रडले रे..त्याच्या समोर हात जोडले.. पायावर डोक ठेवल रे...पन त्याला नाही दया आली माझी .... इतक्यात तीथेच लपुन बसलेले त्याचे ते मित्र बाहेर आले..." बोलता बोलता तीला हूंदका आवरेणासा झाला. आम्ही दोघे शांतपने तीच बोलण ऐकत होतो तशी ती पुढे म्हणाली... "तीथला प्रत्येकजनच, आपापल्या मोबाइल वर कधी तो video पहायचे तर कधी एका वासनेन भरलेल्या नजरेन मला पहायचे... आपल अंग चोरुन मी खाली मान घातल हूँदके देत रडत होते... त्यांच्या नजरा पाहून अंगावर कपडे असुनही नसल्या सारखे वाटत होते .. माझ तर सर्वस्वच हरवुन गेल होत रे..." बोलता बोलता सुहानी हूंदके देत ढसा ढसआ रडू लागली.... "त्या video ची भिती दाखवून तीथल्या प्रत्येकान माझ्यावर बलात्कार केला... यातनेन मी रडत होते तस माझा आवाज ऐकुन गायत्री आत आली.. " काळजावर दगड ठेऊन सगळ ऐकत होतो...सुहानीच्या डोळ्यातुन एकसारख पाणी येत होत... तीचे शब्दही थरथरत होते.. " माझी अवस्था बघुन गायत्रीच्या सर्व अंगावर सर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर कन काटा आला... मी ओरडले गायत्री पळुन जा इथुन... पन गायत्री सुन्न झाली होती... तीन तीथलीच एक काठी उचलली आणि त्यांना मरुन मला सोडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली.. पन नराधमानी तीच्यावर झडप घातली... मी त्यांच्या पुढे हात जोडले रे तुझ्या गायत्रीला सोडण्यासाठी पन नही दया आली कोणालाच......त्यांनी तीला लाथा बुक्यांनी मारल रे.. " तीचा प्रत्येक शब्द अंगावर शहारा आणत होता... तर भीतीने अचानक ती ही शहारुन जायची.. पन तीच यातनानी भरलेले शब्द पुन्हा बाहेर पडू लागले... " एकाने video recording चालु केल आणि बाकीचे तीचा देह चुरघळुन टाकत होते.. वेदनेन कळवळ ती पडून होती प्रत्येक जन आपली वासना शमऊन बाजुला व्हयचा... सगळ्यांची वासना शांत झाली तसे तीच्या उघड्या देहाचे पुन्हा recording करु लागले... पन कपडे सावरत ती म्हणाली...' काही करा...पन मी तुमच्यापैकी कुणालाच सोडणार नाही .... पोलिसाना सर्व सांगनार..." तसा उमेश रागाने वेडा झाला... आपल्या खिशातील चाकू काढत तीच्या जवळ जात तीचे केस मागुन घट्ट पकडले आणि खस्स्स्स कन चाकू तीच्या पोटात खुपसला... हे पाहून माझे हातपायच गळून पडले... गायत्री जीवाच्या आकांतान वेदनेन तळमळत होती उमेश मात्र एकापाठोपाठ एक असे वार करतच राहीला... " सगळ शांतपणे ऐकत होतो पन मनात लाव्हा उसळत होता... तशी ती पुढे म्हणाली.. " गायत्री ला मारुन त्यांनी तीथेच एका झाडाखाली खड्डा कढुन पुरून टाकले आणि मलाही असेच मारण्याची धमकी देऊन सोडून दिले...त्या रात्रि घरी परतले आणि college ला आलेच नाही.. पन ते एवढ्यावरच थांबले नाहीत..चैनीला पैसे कमी पडले की त्या MMS ची धमकी देऊन माझ शरीर विकायला सुरवात केली... गायत्रीची सुटका झाली रे पन मी रोज मरण यातना भोगत राहिले.... त्यांच्यातले तीघे मेले, बर वाटल पन त्या दोघानी काल माझ्या छोट्या बहिनीला सोबत आणायला तसा माझा नाईलाज झाला.. हे आयुष्याच संपवून या नरकातुन मुक्त व्हायच ठरवल... पन त्या नराधमानी फक्त माझाच नाही आपल्या college मधील आणखी मुलींचे MMS बनवले होते. .." तीच बोलण ऐकुन तर माझ सर्वस्वच हरवुन गेल्यासारख वाटल. डोळ्यातून घळा घळा पाणी येत होत...मनाला असह्य यातना होत होत्या.. एक क्षण वाटल की छाती फाडून काळीज काढाव आणि दुर कुठेतरी फेकून द्याव... तोच बाहेर कसलातरी गोंधळ उडाल्यासारख जाणवल.. कोणीतरी आत येण्यासाठी विनवणी करत होत.. तसा तो मुलगा आत आला.. त्याला पाहून सुहानी भीतीन शहारली आणि माझा हात घट्ट पकडला.. त्या मुलाच अंग घामान भिजल होत... कपडे चिखलाने बरबटलेले आणी ठिकठीकानी फाटले होते..अंगावर खरचटल्याच्या जखमा आणि एका अनामीक भीतीने डोळ्यातून वहाणार पाणी... मी त्याला पहाताच ओळखल तसा तो दोन्ही हात जोडत सुहानी समोर गुडघ्यावर बसत रडतच म्हणाला... "सुहानी... माफ कर मला.... आमच्यामुळे तुझी ही अवस्था झाली .... पन ती आम्हाला जीवंत सोडणार नाही... " मला थोड आश्चर्य वाटल तसा तो पुढ बोलु लागला... " तीन आधी विशाल ला, मग उमेश, अनिकेत आणि तुम्ही पोलीसांच्या स्वाधीन केलेला माझा मित्र रमेशला..... काल hospital मधे admit रमेश न सर्जीकल ब्लेड ने स्वतावर अनेक वार करून घेतले आणि मग hospital च्या बिल्डिंग वरून ऊडी मारून आत्महत्या केली..पन मला माहिती आहे, हे तीन करायला भाग पाडल...." त्याच बोलन ऐकुन आम्ही तीघही सुन्न झालो... " क......कोणी केल हे..." तोच एक थंड वा-याची झुळूक बाजुच्या खिडकीतून आत आली... माझ बोलण ऐकुन त्यान माझ्या कडे पाहिल तस तो शहारला..डोळ्यात एक भीती दाटली... तसाच हात जोडत तो रडू लागला... " गायत्री.... माफ कर मला..... पुन्हा कुठल्याच मुलीच्या इज्जतीशी खेळणार नाही...." मला काही समजत नव्हत...तो माझ्याकडे बोलून का बोलतोय... तसा तो पुन्हा बोलु लागला... " संजु....ती तुझ्या जवळच आहे......गायत्री..." क्षणात त्याच्या चेह-यावरील भाव बदलले... अचानक त्याचा चेहरा रागिट झाला, डोळ्यातून जणु लाल रक्तच...त्याच हे भयान रुप पाहील तशी माझ्या मागे उभी वर्षा किंचाळली...तीचा आवाज ऐकुन बाहेर उभे डॉक्टर, नर्स धावतच आत आले... काही समजायच्या आत त्यान टेबलवरची कात्री उचलली आणि खसाखस स्वताच्या पोटात घुसवली, तसे आम्ही सर्वच थक्क झालो.. तो रडत,ओरडत स्वताला वाचवण्यासाठी विणवनी करत होता आणि दुस-याच क्षणी ती कात्री एकसारखी पोटात घुसवून घेऊ लागला... ते द्रूष्य पाहुन त्या पकडायला कंपौंडर आणि वॉर्डबॉय धावले तसा तो मागे धावत सुटला आणि खिडकीची काच फोडून तीस-या मजल्यावरून खाली उडी मारली...पडताना त्याच्या शरीरातुन एक पांढरट आकृति बाहेर पडली आणि थंड वा-याची झुळूक बाजुच्या खिडकीतून आत आली... तसा अंगावर काटा आला...पन हा स्पर्श माझ्यासाठी नवा नव्हता... वैज्ञानिक दृष्टीकोनातुन डॉक्टर त्याच्या आत्महत्येच विश्लेषण करत होते.. Hallucinations Schizophrenia and Multiple Personality Disorder असे काही जड शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते... वर्षाने सुहानीचा हात तसाच घट्ट पकडून धरत म्हणाली ... " तिचा बदला पुर्ण केला. आणि तु स्वताला एकट समजु नको... आम्ही आहोत ना...." तीचा निरोप घेऊन अश्रु लपवतच बाहेर पडलो....तसा वर्षाला विचारल.... " खर प्रेम करणारा शेवटी एकटाच का रहातो ....का अस होत ग...पन जरी ती या जगातुन गेली असली तरी मनातुन कधीच जाणार नाही.....!!! ." तीच्याकडे काहीच उत्तर नव्हत... तीन फक्त माझा हात घट्ट पकडत थोडा धीर दिला आणी दुस-या क्षणी म्हणाली... " जगासाठी या जगी नसले, तरी तुझ्यासाठी तुझ्यापाशी असेन मी...." मी गर्र कन मान वळवून वर्षाकडे पाहील तशी वर्षा म्हणाली... "काही बोलत होतास का.." .. मी मात्र आश्चर्याने तीच्याकडे पहात होतो...... समाप्त...... धन्यवाद !!
No comments:
Post a Comment