Thursday, January 21, 2016



या रात्रीला अन्त नाही 
तीच्या वेदना पन मला सहन होईनाशा झाल्या.
उजव्या खांद्याने दरवाजा वर धक्के मारत होतो पण व्यर्थ.. थोडा मागे सरकलो आणि दोन्ही हाताच्या मुठी करकचुन आवळत डाव्या पायाने front kick मारली तसा धाड कण दरवाजा निखळुन खाली पडला तसा मी आत शिरलो...
मेणबत्ती च्या अंधुक प्रकाशात मी त्या मुली चा शोध घेऊ लागलो... खुपच कुबट वास पसरला होता..ती अडगळीची खोली असावी. एक पुर्णपणे तुटलेल लाकडी कपाट, बाजुला एक स्टुल त्यावर पिण्याच्या पाण्याचा माठ, खोली न्यहाळत माझी नजर डावीकडे गेली तसा सुन्नच झालो.. काळजाचा ठोकाच चुकला.. मनात इतकी भीती दाटली की काही क्षणापुर्वी थंडीन गारठलेल्या शरिराला भितीन अक्षरशा: घाम फुटला..........
माझ्या पासुन काही अंतरावर ती मुलगी होती.. तीचे पाय जमीनीपासून अडीज तीन फुट वर अंतराळी लोंबकळत होते... लांब पांढरा ड्रेस जो खुपच मळलेला दिसत होता... माझी नजर तशीच तीच्या चेह-यावर गेली... डोळे मिटलेले, खुपच निष्पाप अशा तिच्या चेह-यावरून ओघळणारे तीचे अश्रु अजुनही ओले होते... गळ्याला बांधलेली लांब रस्सी वर एका हुका ला अडकवलेली... तसाच जवळ जात तीच्या हाताला मी स्पर्श केला.. तो पुर्णपणे थंड पडला होता... तीने केव्हाच प्राण सोडलेला.... अचानक एक विचार मनात चमकुन गेला .. मग मदत कोण मागत होत...तसा पुन्हा एक मुलगी वेदनेन कण्हत असलेला तो आवाज घुमला... मी भीतीन समोर त्या मुलीच्या चेह-याकड पाहील तस डोक सुन्न झालं...
तीन किंचीत आपल तोंड उघडल आणी कण्हु लागली... माझ्या समोर छताला फास लाऊन लटकण-या एका मुलीच प्रेत कण्हत होत.. भितीन काळीज फुटते की काय अस वाटत होत तोच त्या लटकणा-या मुलीन झटकन आपले डोळे उघडले... तीचे रक्ताळलेले ते डोळे पाहताच मी मागे कोसळलो पण मागे असलेल्या भिंतीन मला सावरसल... त्या भिंतीचा आधार घेत समोरच भयान दृष्य पहात होते... अचानक त्या मुलीच शरीर सडू लागल... काही सेकंदात त्या मुली च पुर्ण शरीर सडुन त्याचे तुकडे खाली पडु लागले... तोच लक्षात आल की माझ्या पायांवर काहीतरी जाणवतय ... कसलीशी वळवळ खुपच किळसवाण वाटत होत... पाय झटकुन पुन्हा मी समोर पाहु लागलो तर छताला अडकलेली ती दोरी तेवढीच लटकत होती... आणि तीथच खाली हाडांचे अवशेष तेवढेच होते... पुन्हा पायावर काही तरी जाणवु लागले तशी माझी नजर खाली गेली आणी त्या मेणबत्ती च्या प्रकाशात एक खुपच किळसवाण दृष्य दिसल... खाली जमिनीवर मांस खाणा-या आळ्या पसरल्या होत्या आणी त्या माझ्या पायांवर चढण्याचा प्रयत्न करत होत्या...
पोटात ढवळुन आल तीथून बाहेर पडणार तोच
माझ लक्ष समोरच्या पाय-यांवर गेल..
पाय-यावरून किंचितसा उजेड खाली येत होता... माझ्या लक्षात आल की मघाशी दरवाजा तोडल्याचा आवाजान तो म्हातारा उठलाय.. अंधारात चाचपडत मागे गेलो आणि भिंतीच्या आडोशाला ऊभ रहात किंचीतशी मान बाहेर काढून त्या प्रकाशाच्या दिशेने पाहु लागलो... हातात कंदिल घेऊन ती वयस्कर म्हातारी पाय-यावरून खाली येत होती...
मी कसलाच आवाज न करता बाहेर कंदिल घेऊन येणा-या त्या म्हातारीकडे पहात होतो पन त्यावेळी माझ्या पायांवर वाढत असलेली वळवळ ती किळसवाणी जाणिव अंगावर काटा आणत होती..
एखादा यंत्रमानव चालत यावा तशी ती चालात येत होते, कंदिलाच्या मीणमीणत्या प्रकाशात ,तीचा पांढरा पन खुपच सुरकुतलेला चेहरा, आणि चेह-या भोवती विस्कटलेले लांब पांढरे केस, लांब नाक आणी खोलगट डोळे यामुळे खुपच भितीदायक वाटत होत...तशीच चालत चालत ती ६० बाय ३० एवढ्या मोठ्या तळघरात फिरु लागली... मी तसाच श्वास रोखुन तीच्याकडे पहात होतो... तशीच चालत ती आमच्या रूम जवळ आली.. आणि तशीच थांबुन एकटक पाहु लागली...
माझ्या मनात विचार आला की जर हीने मला पाहीले तर...?
पन तशी वेळ आली नाही ... ती म्हातारी तशीच चालत वर निघून गेली ...पाय झाडत मी त्या खोलीतुन बाहेर पडलो... तसाच माझ्या रुम मधे शिरत दरवाजा बंद केला तस ते भिषण दृष्य डोळ्यांसमोर नाचू लागल आणि पोटात ढवळुन आल... आता एक सेकंद ही या ठिकानी थांबायची इच्छा नव्हती... बाजुला ठेवलेली बैग उचलली आणि बेड वर पसरलेल माझ साहित्य एकत्र करू लागलो... तोच कोणीतरी माझ्या मागे उभ असल्याच जाणवू लागल... मागे पहायची हिम्मत होत नव्हती.... काही वेळ तसाच उभा रहीलो पण मागे कोण उभ असेल या जाणीवेण अंगावर काटा येऊ लागला... मी दरवाजा तर निट बंद केला होता पन मी नव्हतो तेव्हा कोणीतरी आत येऊन लपुन बसले असावे.. पन कोण असेल... या भयान शांततेत मला त्याच्या श्वासांचा आवाज त्यातली घरघर स्पष्ट ऐकु येऊ लगला... बेडवर पडलेला टीवी चा रिमोट हातात घेत करकचुन आवळुन धरत हल्ल्याच्या तयारीत झटकन मागे वळुन पाहील पन कोणीच नव्हत... आजुबाजूला पहात धीम्या पावलांनी चालत दरवाजा कडे चालु लागलो... दरवाजा नीट बंद असल्याची खात्री केली तोच फट्ट असा आवाज आला आणि सर्वत्र अंधार पसरला...
"शीट यार.. हीला पन आत्ताच जायच होत..."
तसा जेरात भिंती वर हात मारत मागे फिरलो आणि काळजाचा ठोकाच चुकला... भितीन दातखिळीच बसली... पाय जमिनीत रुतल्यासारख वाटत होत..
समोरच्या खिडकीतुन किंचीतसा प्रकाश आत येत होता... त्या खिडकीच्या पलिकडे कोणीतरी उभे किलकील्या डोळ्यानी मला पहात होत... चेहरा केसांनी पुर्ण झाकला होता... ती आकृती कसलीही हलचाल न करता तशीच ऊभी होती... माझ्या डोळ्याचे पाते लवते न लवते तोच क्षणात ती आकृती नाहीशी झाली... मोबाईल काढुन टॉर्च सुरू करत कशीबशी बैग भरली आणि मागे फिरणार तोच बेडखालुन केणीतरी माझे पाय गच्च पकडले तसा हदरुन गेलो.. त्या हातांती पकड आणि ओलसर स्पर्श खुपच भीतीदायक पन किळसवाणा वाटत होता... एका झटक्याने माझे पाय ओढले गेले तसा जोरात जमिनीवर आदळलो.. कोणीतरी मला खेचत होत आणि मी जिवाच्या आकांताने माझे पाय त्या पकडीतुन सोडवण्याची धडपड करु लागलो...तसा एका मुलीचा भरडा आवाज त्या रुम मधे घुमला.....
" तुला आता इथुन कोणीच सोडवु शकत नाही... "
त्या आवाजाने डोक्यात लाल मुंग्यांचे वारुळ उठले...मी सुटण्याची धडपड करू लागलो पन ते मला आत ओढण्याचा प्रयत्न करू लागले... मी जोरजोरात ओरडु लागलो किंचाळलो , कसाबसा स्वताला सोडवुन दरवाजा च्या दिशेन धाव घेतली... दरवाजा उघडुन तसाच धावत सुटलो... पण ते वयस्कर दांम्पत्य कुठेच दिसत नव्हते जोरजोरात त्यांना आवाज देत शोधु लागलो पण त्या ठिकानी कोणीच दिसत नव्हत... मोबाइल च्या प्रकाशात दरवाजा शोधायला सुरवात केली त्या भल्या मोठ्या बंगल्यामधे मी एका रूम मधुन दुस-या रुम मधे जात होतो पन बाहेर जाणारा दरवाजा कुठेच दिसत नव्हता.,.. कानात वार भरल्या सारखा सैरावैरा धावत बाहेर पडण्याचा मार्ग खुप शोधला पन कुठच सापडत नव्हता... धापा टाकत भिंतीला डोक टेकुन भितीन थरथर कापत उभा होतो... मोबाइल पाहिला तर ३ वाजुन गेले होते... रात्र संपेल की ही रात्र कधी संपणारच नाही... मोबाइल वरून मित्रांचे नंबर डायल केले पन कोणाचाच नंबर लागत नव्हता... तोच कोणीतरी हुंदके देत रडत असल्याच ऐकु येऊ लागल... मी दबक्या पावलांनी त्या दिशेने चालु लागलो... तसा तो आवाज येईनासा झाला.... मी श्वास रोखुन काही हलचाल एखादी चाहुल जाणवते क पाहु लागलो... भिंतीला एका हाताने स्पर्श करत दबक्या पावलांनी चालत होतो...एक जिवघेणी शांतता आणि ती भंग करणारा माझा वाढलेला श्वास आणि काळजाची धडधड तेवढी स्पष्ट ऐकु येत होती... तोच मोबाइल च्या प्रकाशात काही अंतरावर थोडी हलचाल होत असल्यासारख वाटु लागल... जागेवर थांबुन ती हलचाल बारकाईने पाहु लागलो... तोच कानाचे पडदे फाडुन टाकणा-या किंकाळीने परीसर हदरुन गेला... भितीन डोळे मोठे करत समोर पाहु लागलो तशी एक मुलगी धावत माझ्या कडे येऊ लागली... पांढरा निश्तेज चेहरा, काळे डोळे, जबडा पुर्णपणे पसरुन भिषण किंकाळ्या तीच्या तोंडातुन येत होत्या.. लांब पायांपर्यंन्त पांढरा ड्रेस ... आता मृत्यु निश्चित आहे... हतबल होऊन जागेवरच थांबलो... डोळे गच्च मिटुन घेतले.. श्वास वाढु लागला... त्या मुलीचा आवाज वेगाने माझ्या कडे येत होता... भितीन डोळ्यातुन पाणी येऊ लागल... तो आवाज अगदी माझ्या जवळ आला तस काळीज धड धड धड करू लागले... इतक्या भिषण मानसिक दबावाने अखेर मी जागेवरच बेशुद्ध झालो....
झटकन डोळे उघडले तर पुर्णपणे अंधार होता... पन सगळ काही शांत वाटत हेत...बाजुला पडलेला मोबाइल उचलुन त्यातला प्रिया चा फोटो पाहीला खुप बर वाटल...फोन लागणार नाही माहीत होत तरी तीचा नंबर डायल केला...आणि रिंग झाली...
माझा आनंद गगनात मावेनासा झाला... रात्रीपासुन कुणाचाच फोन लागत नव्हता.. पन आता लागला... रात्री घडलेली सर्व हकिकत तीला सांगितली...
" मी शहराच्या उत्तरेला कच्च्या रस्त्यापासुन काही अंतरावर welcome लॉज मधे अडकलोय ..."
तीन सर्व माहिती लिहून घेत स्थानिक पोलीसांशी संपर्क केला... पोलीसांनी माझ्या मोबाइल ची लोकेशन ट्रैक करून शोधुन काढण्याच आश्वासन दिल.. मी त्याची वाट पहात पुर्ण बंगल्यात फिरू लागलो... Help ....help म्हणुन जोरजोरात ओरडत राहीलो.. पन मी जिथुन आत आलो तीथ पाहील पन चोहीकडे भिंतीच होत्या बाहेर जायचा एक ही मार्ग दिसत नव्हता....
माहिती देऊन आठ तास झाले पन कोणतही पोलीस पथक आल नाही आणि मोबाइल ची बैटरी पण संपत आलेली...
मी पुन्हा प्रियाला फोन केला...
" हैलो... प्लिज मदत कर...अजुन का पोलीस आलेले नाहीत..."
तस तीच उत्तर एकुन सुन्न झालो... पायाखालची जमिनच सरकली... काय चालु आहे समजायच्या पलिकडे होत.... भयभीत सुन्न मनाने सगळ ऐकत हेतो... तोच इथ येण्याआधी त्या रिक्शा च्या मागे लिहीलेल वाक्य आठवल...
" डोळ्यांनी दिसत ते सत्य असेलच अस नाही.."
हताश मनाने आता मृत्यु ची वाट पहाण्याशिवाय कोणताच पर्याय नाही... या घरातली ही अतृप्त आत्मे मला इथुन बाहेर पडु देणार नाहीत...
भिंतीचा आधार घेत हळुहळू खाली बसत डाव्या कुशीवर पडत सगळ काही आठवू लागलो..काही क्षणापुर्वीच प्रिया च बोलण आठवल...
प्रिया म्हणाली होती...
"अरे कुठ आहेस तु.. पोलिस त्या लॉज वर गेले होते. तुझ्या मोबाइल ची लोकेशन वरुन तो लॉज सापडला पन तु कुठ होतास...प्रत्येक रुम शोधली... आणि आम्ही कॉल केला तर तुझा कॉल लागत नाही...थांब इन्स्पेक्टर साहेबांशी बोल..."
ती पोलीस स्टेशन मधेच होती...
"यस मिस्टर संजय.. कुठ आहात आपण... तो लॉज काही महिण्या पुर्वी बंद झालाय... त्याच्या मालकाने त्यांच्या वृध्द बायकोने तीथ आत्महत्या केली होती.... आणि वेडाच्या भरात त्याच्या नाती ने ही फास लाऊन घेतला होता.. पंधरा दिवसानी त्यांचे सडलेले मृतदेह पोलिसाना मिळाले... बय द वे... आम्ही सर्वत्र शोधल..एक एक रुम शोधली..पण. तुम्ही कुठच दिसला नाहीत... .."
ते पुढे बोलणार तोच बैटरी संपली.... डोळे बंद करून मी मात्र सुन्न होऊन तसाच बसुन राहीलो तसा कानात एक आवाज घुमु लागला...
" तुला इथुन कोणीच सोडवु शकत नाही..."
समाप्त

- by sanjay Kamble

No comments:

Post a Comment