Wednesday, May 27, 2015

ही घटना साल 2010 ची

ही घटना साल 2010 ची , त्यावेळेस मी एका " रॉयल " आईस्क्रिम नावाच्या फॅक्ट्रीत काम करायचो , तिथे एक अभी नावाचा मुलगा काम करायचा तसा तो साधा व सरळ होता . सर्व जण त्यला फार त्रास देत असत . पण तो एक असा मुलगा होता कि त्याला कितीही टॉर्चर केले तरी त्याला त्याच् काही वाटत नसायच , त्याच फॅक्ट्रीत एक ईशा नावाची मुलगी पण काम करायची , त्याची प्रत्येक गोष्ट ही ईशाला फार आवडायची , ईशा जवळ - जवळ त्याच्या प्रेमात पडत गेली . पण याची जराही खबर आभीला नव्हती , तो त्याच् काम प्रामाणिक पणे पाडत त्याचा पगार घेत असे . त्याच फॅक्ट्रीत एक जय नावाचा मुलगा सुध्दा काम करत होता ; पण त्याचे कामात लक्ष कमी ईशा कडेच जास्त रहायच् पण ईशा त्याला जराही भाव देत नसत त्यमुळे तो नाराज होत , त्याने एक दिवस ठरविले की या आभीला ठिकाण्याला लावायच् त्या प्रमाणे त्याने प्लॅन सुरु केला . त्याने सर्वप्रथम आभीला बोलावुन त्याच्या जवळ आईस-क्रिम चे बॉक्स देउन त्याला फ्रिजरुम मध्ये पाठवले व त्याचा पाठलाग केला व जसा आभी आत रुम मध्ये गेला तसाच जय ने ती रुम बाहेरुन लॉक केली व तेथुन पळ काढला . तो जसा बाहेर पडला तसा तो तिथे परत फिरकला सुध्दा नाही . आभीने आतुन बाहेर येण्याचा फार प्रयत्न केला पण तो येउ शकला नाही ; आणि त्या गारठ्याने आभीचा गोठुन मृत्यु झाला .
त्यारुमकडे परत कोणीच गेले नाही व फॅक्ट्री सायंकाळी बंद झाली व तेथील सर्व कर्मचारी घरी गेले ; व हा सर्व प्रकार शनिवारी घडला , दोन दिवसांनी सोमवारी ज्यावेळेस फॅक्ट्री उघडली त्या दिवशी सर्व कर्मचारी आले पण जय आलाच नाही . आणि आभी पण आला नाही , आसेच काही दिवस गेले व त्या फॅक्ट्रीचे मालक सरळ आभीच्या घरी गेले व आभीच्या आईला उध्गारले " आभी कुठे आहे ? कमाला आला नाही 3 दिवस झाले. "त्याप्रमाणे आभीची आई पण उध्गारली कि " तो जसा तुमच्या फॅक्ट्रिवर कामाला गेला तसा तो 3 दिवसा पासुन घरी नाही आला " हे कळताच आभीचे मालक घरतुन पुण्हा फॅक्ट्रिवर गेले व कामत गुंतले व स्वत:हा शीच बरळले की ' आता ह्या आभीला येउ देत, कामवरुन काढुन टाकतो साल्याला ' व काम करु लागले . थोड्या वेळाने ते सहज स्टॉक बघायला फ्रिजरुम मध्ये गेले तेव्हा त्यांना आभीचा मृतदेह आढळला व ते ओरडत बाहेर धावले व सर्व कर्मचार्याना बोलावुन कळावले कि " हे गैर कारस्थान कोणी केले " सर्व कर्मचारी म्हटले की " आम्ही त्याला त्रास नक्की द्यायचो , पण आसे गैर कृत्य करण्याची ईछा कधीच आमच्या ना मनी व ध्यानी आली . " सर्वाना नंतर कळाले कि हे कृत्य जय चे असनार त्यप्रमणे जय चा शोध घेउ लागले . या सर्वांत फक्त ईशाला फार मोठा धक्का बसला व ती सरळ बेशुध्द झाली ; कर्मचार्यांनी तिला दवाखाण्यात भरती केली व तेव्हड्यात डॉक्टर आले व त्यातील एका कर्मचार्याला म्हटले ' तिला एक कोणता तरी मोठा धक्का बसल्या कारणाने ती सध्या कोमात गेली .' कर्मचार्याना हे कळताच ते जरा घाबरले , पण त्यांना माहित होते तिच्या खर्या मृत्याचे कारण काय होते .
आसेच काही महिणे गेले व ठिक काही महिन्यानी जय पुण्हा एकदा फॅक्ट्रित आला आणि तो ही शनिवारी , आसेच काही कारणाने तो त्या फ्रिज रुम जवळ गेला , हे एका कर्मचार्याने पाहत त्याने सर्वांसोबत त्या जयचा पाठलाग केला व सर्वानी पाहिलेल्या व डोळ्यासमोर घडलेल्या घटनेला न पापणी मिटता तो भयानक क्षण पाहिला , मागुन आचानक जोराचा वारा आला तो वारा जसा आला त्या वार्याने आपोआप त्या जय ला आत ढकलले व अचानक तो फ्रिजरुम चा डुर लॉक झाला . व काहीच वेळात त्या जय ने सुध्दा प्राण सोडले हे पाहताच सर्व जण टरकले व कोणीच परत त्या रुमकड् गेले नाही . त्या फॅक्ट्रीतील मालकाणे एका तांत्रीकाला बोलावुन क्रिया कर्म करुन ती जागा बंदच करुन टाकली व त्या जागेवर मंत्र - तंत्र करुन त्या मांत्रिका ने सर्व कर्मचार्याना सांगितले कि " या रुमच्या जागेत कोणीच भटकायच नाही . जो भटकेल तो प्राण गमवेल , कारण या ठिकाणी एक नाही तर 2 अतृप्त आत्मांचा सामावेश आहे ." नंतर परत कोणीच त्या ठिकाने गेले नाही व कोणी जाण्याची हिम्मत पण केली नाही
तुम्हाला हि कथा जरा विलक्षण वाटली आसेल, खरय कारण हि एका आतृप्त आत्म्याची घटना आहे .

No comments:

Post a Comment