Sunday, May 31, 2015

देव उपासना भाग २३

देव उपासना
भाग २३
“तू एवढं सर्वकाही आमच्यासाठी का करत आहेस…” संगीताने विचारले…
“तुमच्या दोघांच्या प्रेमापायी..” आदित्य बोलला...
तेवढ्या वेळात संतोष पण कसा तरी आदित्यच्या घरी पोहोचतो… संतोष येताच संगीता त्याला बिलगली...
“काल तर माझ्या पासून लांब पळत होतीस मग आज काय झालं..?”
“मला तुझी काळजी वाटत होती…” संगीता बोलली...
“मी काहीतरी खाण्या पिण्याचं बंदोबस्त करतो… तुम्ही दोघे आराम करा…” आदित्य बोलला… आदित्यचा आवाज ऐकताच संगीता लगेच संतोष पासून विलग झाली...
संतोष आदित्य जवळ गेला आणि बोलला… “तू आमची खूप मदत करत आहेस… कशी परतफेड करणार मी ह्याची..”
“हि काही मदत नाही आहे… हे माझं दोन प्रेम करणाऱ्यांच्या प्रती कर्तव्य आहे… आणि तरी पण तू पण तर आमची मदत केली होतीस त्या इंग्रजां पासून... तुम्ही आराम करा मी काहीतरी खाण्यासाठी आणतो..." आदित्य बोलला...
-----------
दुसरीकडे शेतात भाऊ साहेबांच्या माणसांनी पूर्ण शेत पालथ घातलं पण विश्राम कुठेच सापडला नाही... संध्याकाळ होत आली होती आणि सर्वजण हताश आणि निराश होते…
“आता तर गोष्ट साफ आहे… तो विश्रामला जंगलातच घेवून गेला आहे..” देव बोलला…
“आता पर्यंत तर त्याने विश्रामची चटणी पण बनवली असेल… स्वामीजी राहू द्या… त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आपल्यांना काय घेणं देणं आहे…”
“तू समजत नाही आहे माझं उद्देश त्याला गावाच्या लोकांसमोर शिक्षा देण्याचा होता… त्यामुळे गावातील लोकांच्या मनातून पाटीलची भीती कमी झाली असती… तो असा चुपचाप मरणार तर काय फायदा… आणि त्याच्या मरण्याने काहीच मिळणार नाही… गोष्ट तर तेव्हा झाली असती जेव्हा पूर्ण गावासमोर त्याच्या तोंडावर काळं फासून त्याची धिंड काढली असती आणि त्याने क्षमा मांगितली असती तीच शिक्षा त्याच्यासाठी जास्त होती…” देव बोलला…
“पण भूतांच आपला एक वेगळा कायदा आहे… तो त्याला जंगलात मारेल तर आपण काय करू शकतो…” विजय बोलला…
“स्वामीजी आता काय होणार… काहीतरी बोला…?” पल्लवी रडकुंडीला येत बोलली…
“हे बघा स्वामीजी जेवढं करू शकतात तेवढं त्यांनी केलं… आता तो विश्रामला जंगलात घेवून गेला तर आपण काय करू शकतो… एवढ्या मोठ्या जंगलात आपण त्याला कुठे शोधणार…” विजय बोलला…
“विजय तू गप्प बस… ह्यांची चिंता पण समजून घे ना…” देव त्याच्या वर डाफरत बोलला…
“हे पहा आता विश्रामच्या वाचण्याची संभावना खूप कमी आहे… आता पर्यंत तर कदाचित…” देव बोलला…
दोन अश्रू पल्लवीच्या डोळ्यातून ओघळले… “मला माहिती होतं कि एक न एक दिवस परमेश्वर त्यांच्या सोबत न्याय जरूर करणार पण ह्या प्रकारे करतील विचार पण केला नव्हता…” पल्लवी बोलली आणि आपले अश्रू पुसत पुन्हा वाड्याकडे निघाली…
“चला स्वामीजी निघुयात... ह्यांना आपल्या कर्माची शिक्षा मिळाली…” विजय बोलला…
भाऊ साहेबांनी आणि पुरुषोत्तमने त्याच्या गोष्टीची काहीची प्रतिक्रिया दिली नाही… देव आणि विजय पण तिथून निघाले, उपासनाच्या घराकडे…
-----------
संगीता आणि संतोष जेवण जेवून आदित्यच्या घराच्या खिडकीपाशी उभे आहेत… आणि प्रेमाच्या गोष्टी करत आहेत…
तेव्हा अचानक दरवाजावर थाप पडते…
“हुंह आता कोण आलं…” संतोष बोलला…
“खूप चांगल्या वेळी आला आहे… हे हे…” संगीता हासत बोलली…
संतोषने दरवाजा उघडला…
“संतोष गावातलं वातावरण खूप खराब आहे… मी बाहेरून टाळा मारतो… तुम्ही दोघे आतमध्ये शांत राहा…”
“आम्ही तर शांतच आहोत… अच्छा मला हे सांग माझ्या घरातली काही माहिती काढली कि नाही…”
आदित्य एक दीर्घ श्वास घेत बोलला, “अजून पर्यंत तुझ्या घरी नाही गेलो आहे.. काळजी नको करूस सर्व काही व्यवस्थित होईल…”
आदित्यला संतोषच्या ताई उर्मिला आणि आई बद्दल सर्व काही माहिती पडलं होतं पण त्याने जाणूनबुजून संतोषला काहीच सांगितलं नाही... कदाचित तो प्रेमाने भरलेल्या दोन प्रेमींना चिंतीत करायला पाहत नव्हता…
“भाऊ साहेबांना माहिती पडलं का कि संगीता माझ्या सोबत आहे ते…!” संतोषने विचारले…
“भाऊ साहेबांच नाही पूर्ण गावाला माहिती आहे… काही पण झालं तरी तू इथून बाहेर नको निघुस…” आदित्य बोलला…
“खरं खरं सांग माझ्या घरी सर्व ठीक आहे ना…” संतोषने विचारले…
“सर्व काही ठीक असणार… मला तुझ्या घरा विषयी कोणीच अजून पर्यंत अशी तशी गोष्ट नाही सांगितली आहे जी काळजी करण्यालायक असेल.. तू चिंता नको करूस… आराम कर आता… आणि लक्षात ठेव जास्त आवाज नको करूस… बाहेरून टाळा लावतोय… काळजी घे…”
“ठीक आहे मी काळजी घेतो…” संतोष बोलला…
आदित्य गेल्यावर संतोष कोणत्या तरी विचारात हरवून जातो…
“काय झालं चिंतीत का आहेस…” संगीताने संतोषच्या खांद्यावर हात ठेवत विचारले…
“माहिती नाही का मला असं वाटतंय कि घरी सर्व काही ठीक नाही आहे…”
“असं का विचार करतोयस…?”
“माहिती नाही पण आदित्य माझ्या पासून काही तरी लपवत आहे…”
“जास्त विचार नको करूस… सर्व काही ठीक आहे… बघ आम्ही जंगलातून इथे सुकरूप आलो आहोत… परमेश्वर सर्व काही ठीक करतील…”
“हम्म तू बोलतेस तर मानतो…” आणि परत ते दोघे प्रेमात आकंठ बुडून जातात…
“श्श गप्प बस... बाहेर कोणी तरी आहे…” संगीता बोलली…
“अर्ध्या रात्री कोण फिरतंय बाहेर मी खिडकीतून बघतो…”
“राहू दे ना… मला भीती वाटते माझ्या जवळच राह…”
तेव्हा खोलीचा दरवाजा हलकासा हलला, जसा कि कोणी बाहेरून हलकासा धक्का दिला आहे.
“मी पाहतो खिडकीतून..” संतोष बोलला आणि उठून खिडकीजवळ आला…
“अरे परमेश्वरा हा तर तोच प्राणी आहे... जो आपल्यांना जंगलात दिसला होता…” हळूच खिडकी थोडीशी खोलून आणि बाहेर पाहून संतोष मनातल्या मनात बोलला…
संतोष लगेच संगीता जवळ आला आणि बोलला, “एकदम चुपचाप बस काहीच आवाज नको करूस… तो जनावर बाहेर फिरत आहे…”
“अरे भगवंता आता काय होणार…?” संगीता बोलली…
“एकदम शांत बस…” संतोष बोलला… दोघेही एकदम एकमेकांना घट्ट मिठीत पकडून शांत बसून राहिले.. आणि बाहेर आवाज येतंच राहिलेत…
“हे सर्व आपल्या सोबतच का होत आहे संतोष…” संगीताने विचारले…
“मला तर आपलं गाव मोठ्या संकटात आहे असं वाटतंय…” संतोष बोलला…
“आता तर बाहेर काहीच आवाज येत नाही आहे…” संगीता बोलली…
“बाहेर तर काहीच हालचाल होत नाही आहे पण आपल्यांना एकदम शांत राहायला लागणार…”
रात्र निघून जाते आणि सकाळचं पहिलं प्रकाशकिरण खिडकी मधून आत येतं आणि संगीताचे डोळे उघडले जातात…
“उठ आणि खिडकी बंद कर… दिवस उजाडला आहे कोणी आतमध्ये डोकावून पाहू शकतो…” संगीता बोलली…
संतोष उठून खिडकी बंद करत असतो पण बाहेरची हालचाल पाहून थांबतो…
“एवढ्या सकाळी सकाळी हे सर्व लोकं कुठे पळत पळत जात आहेत…” संतोष बोलला…
“तू खिडकी बंद कर पहिले आणि नंतर विचार करत बस…” संगीता बोलली…
संतोष खिडकी बंद करून संगीता जवळ आला…
“जरूर काही ना काही तरी गडबड आहे… रात्री त्या जनावराने इथे गावात पण कुठे कोणाला मारलं तर नाही ना…?” संतोष बोलला…
“मला तर आता झोप येत आहे… खूप तमाशा झाला त्यामुळे रात्र भर झोप नाही आली…”
“असं वाटतंय रात्रीचा उन्माद अजून पर्यंत उतरला नाही वाटतं…” संतोष हसत बोलला…
“उन्माद तर तेव्हाच उतरला होता जेव्हा रात्री त्या जनावराची हालचाल होत होती… खूप मोठ्या मुश्किलने झोप आली होती झोपू दे मला…”
“ठीक आहे तू झोप… हा आदित्य केव्हा येणार…?”
---------------
उपसनाच्या घराच्या बाहेर देव आणि उपासना उभे राहून बोलत होते…
“उपासना मी आपल्या सोबत आणलेल्या माणसांना पाठवले आहे… त्यांना दुसऱ्या गावात काही तरी काम आहे…”
“तू का नाही गेलास देव…?” उपासनाने विचारले…
“वडिलांची तबियत खराब आहे आणि आता गावातलं वातावरण पण खराब आहे म्हणून मी विचार केला थोडे दिवस इथेच थांबतो…”
क्रमशः...

No comments:

Post a Comment