Wednesday, May 27, 2015

भराडीची सत्य कथा व् लोकांची भोळी अंधश्रद्धा

मित्रहो....... 
काही गोष्टी पचावयास सहज सोप्या नसतात. मन मानत नाही . आसाराम बापू जेल मध्ये असला तरी तो कोर्टात उभा रहायला जाताना पण लोक पायाखाली फूल घालतात. काय घोर कलियुग आहे ........ असो ! आमची कोकण ची भूमि भगवान परशुरामाने समुद्र बाजूला करुण निर्माण केलेली स्वयंभु शक्ति असलेली भूमि. ईथे गावरहाटी प्रस्थ प्रत्येक गावात असते. कौल लावन्याची परंपरा आजही आहे . ..... गेले काही वर्ष आंगणेवाडी च्या भराड़ीदेवी चे प्रस्थ अतिच वाढत चलले आहे. दर वर्षी जाने. फेब्रु. च्या मध्यात ही जत्रा भरते. मुंबई मधील हजारो गाड्या लाखभर लोक या जत्रेला येतात, तब्बल 5 ते 7 लाख लोक अस्तातच व् करोडोची उलाढाल. माझी मुख्यमन्त्री अशोक चव्हाण याची पत्नी म्हणा किंवा मुंबई मधील मोठे मोठे नगरसेक आमदार सर्व लोक न चुकता या जत्रेला येतात. 
पण यांच्या पैकी कोण आपल्या कुलदेवी ला जाते? कोण आपल्या ग्रामदेवतेला जाते? येणाऱ्या लोकांना अजूनही भराडीची सत्य कथा माहीत नाही. त्या भराड़ी नावाने जी स्त्री अतृप्त बंद आहे तिचे वास्तविक सत्य आंगणे वाडीच्या कोणी व्यक्तिने बाहेरच्या ना सांगितले च नाही आणि सांगतही नाही. आज मी सांगतो तुमाला जी माहिती मला समजली . ऐकून माझाहि विश्वास बसेना , पण सत्य शेवटी कटुच !
भराड़ीदेवी ला आंगणे कुटुंबियांची देवी म्हणतात. या आंगणे लोकांचा मुख्य सेनापती मुखिया वेगेरे आजच्या भाषेत ईनामदार , त्याला संस्थानिक मोठे मोठे गाव संभाळायचि जबाबदारी देत. या सेनापती कड़े बरेच लोक कामास होते , त्यात स्त्रीया पण असत. त्यापैकी एक स्त्री त्याच्या वाड्यात राबायची. आणि या सेनापतीने फायदा उठवून ती पोटुशि राहिली , जेव्हा बातमी समजली तेव्हा अब्रु जाऊ नए म्हणून तिला मारन्याचे आदेश देण्यात आले. घाबरून ती गवताच्या झारित जाऊन लपली. आणि या त्याच्या सेवकानी गवताच्या झार्या पेटवून दिल्या.. ती पोटात बाळ असलेली बाई तिथेच मेली. पण , शेवटी काही दिवसानी सेनापतिस त्रास होउ लागला व् चौकशी अंती त्याला या स्त्रीच्या आत्म्या चा त्रास होत आहे असे समजले. मग त्याने सर्व विधि करुण तिच्या आत्म्याला एका दगडात स्थान दिले. तोच आजचा दगड म्हणजे " भराड़ी देवी " होय.
आता तुमी म्हणाल , भराड़ी देवी नवसाला पावते आणि लाखो लोक तिला नवस बोलतात व् परतफेड ही करतात , नवस पूर्ण होतात. मग हे नवस पूर्ण कसे होतात? याची फोड़ करुण देतो ,..... कलियुगात दैवीतत्व कमजोर आहे आणि अशुभ शक्तींचा प्रभाव् जास्त असतो. जी बाई पोटात बाळ ठेवून मरते तीला हडळ म्हणतात. अशुभ शक्तिं मध्ये बरेच प्रकार आहेत. अशुभ शक्तिंमध्ये असली तत्व अतृप्त आत्म्यां मध्ये मोड़तात. उदा: निर्वंशिक आत्मे, निपुत्रिक आत्मे, जे पुरुष बायको तरुण असताना मरतात त्याच्या आत्म्यना पालो फकीर अस काही नाव आहे, तसेच अपघातात मृत पावणारे अपघाती आत्मे, स्रियाँ मध्ये ही निपुत्रिक विधवा , हडल, जर स्त्री विटाळशीन असताना मेली तर ते विटाळशीन आत्मे .... याची ताकद खुप असते ! यात जर पोटूशि विटाळशीन असेल तर भयानक ......तसेच स्त्रियांचे छळ होवून त्याना मारले जाते अश्याही अतृप्त आत्मे यात येतात. ...... या आत्मयांची शक्ति अफाट असते म्हणजे इथल्या गावकी च्या भाषेत , हजार देव जे करू शकत नाही ते एक असल्या अशुभ आत्म्याची शक्ति करते. लोक जेवा नवस करतात त्यावेळी असे आत्मा नवस पूर्ण करताना , संबंधित व्यक्तीच्या घरातील कुळाचाराची त्या व्यक्तिस भेटनारी साथ बंद करतात कारण देवतत्व व् अश्या घानेर्ड्या शक्ति एकत्र नांदू शकत नाहीत. मग कुळाची कुटुंबास मिळणारी साथ बंद झाली की जो नवस केला असेल तिथे आपली ताकद लावून ती अशुब शक्ति कार्य पूर्ण करते. आणि नवसाची पूर्तता केल्यावर ती वाईट शक्ति निघुन जाते , पण त्यामुळे कुळाचार साथ देत नाही व् नाराज होतो , याचे पुढील पिढिवर वाइट परिणाम होतात.
त्यामुळे तथाकथित कोकनची काशी व् पंढरी असे शब्द भराडीला लावून वितंबणा नको ! असली फालतुगिरी बंद करावी. जिथे भराड़ी आहे त्या गावचे ग्रामदेवतेचे मंदिर आहे तिथे जा कधीतरी आणि ,.... फरक बघा , भराड़ी मन्दिर करोड़ो चा खर्च करुण बांधले आहे आणि तिथलेच ग्रामदैवत ........ ?!?!! तुमि म्हणाल तिने आमचे नवस पूर्ण केले पण हे लक्षात ठेवा असल्या शक्ति कुळ नाही चालवु शकत , तुमच्या पिढ्या वाढवने व् त्यांचा उद्धार करण सर्वस्वी कुलाचारावर अवलंबून आहे. 
माझे बोलन बऱ्याच जणांच्या पचनी पडणार नाही. कुळाचार कुलदेवत याची पूजा करा , उगाच नको तिथे पैसा घालवुन व् चार चार तास रांगेत उभे राहून पिढ्या वाढत नाहीत. ही माहिती तुमी तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यन्त नक्कीच पोचवा. 
।। आभारी ।।
निवृत्ती उबाळे

1 comment: