देव उपासना
भाग २६
"काहीतरी झालं आहे गावातील लोकं जरा घाबरलेले दिसत आहेत.. हा आदित्य कुठे राहिला, तो आला असता तर काही तरी माहिती पडलं असतं..." संतोष बोलला...
"येईल तो तू कशाला चिंता करतोयस..." संगीता बोलली... तेव्हा त्यांना दरवाजाच्या टाळा खोलण्याचा आवाज येतो...
"घे आला आदित्य..." संगीता बोलली...
आदित्य दरवाजा खोलून आतमध्ये आला लगेच पुन्हा बंद केला...
"अरे आदी कुठे होतास तू... काय झालंय तरी काय गावात जे एवढे लोकं चिंतीत फिरत आहेत..." संतोषने विचारले...
"बस विचारूच नकोस... काल रात्री तशीच घटना घडली जी है ना... जी है ना आपण जंगलात पाहिली होती..." आदी बोलला...
"मला वाटलेलंच... काल रात्री मी त्याच जनावराला पाहिले होते..." संत्या बोलला...
"देव पुन्हा आला आहे संत्या..."
"काय... देव आला... कुठे होता तो एवढे दिवस..."
"ते तर माहिती नाही पण स्वामी बनून आला आहे... पण खूप वाईट झाले त्याच्यासोबत..."
"काय$$ झालं..." संत्याचे डोळे विस्फारले गेले...
"काल रात्री देव सोबत जे त्याचे सहकारी आले होते तेच मारले गेलेत... खूप भयानक मृत्यू मिळाला त्यांना..." आदी बोलला...
आदी त्याला पूर्ण गोष्ट सांगतो... ह्यावेळी तो संत्याच्या घरातील पूर्ण गोष्ट पण सांगतो... तो संगीताच्या भावा विषयी पण सर्व काही सांगतो... तो हे पण सांगतो कि संगीताची वहिनी वाडा सोडून राहुलच्या घरी आली आहे...
संत्या आपल्या घरची गोष्ट ऐकून संतापतो...
"एवढं सर्व काही झालं माझ्या मागे... बरं झालं तो विश्राम कुत्र्यावानी मेला पाहिजे..." संत्या मुठ आवळत बोलला...
संगीताने संत्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलली, "असं नको बोलूस तो माझा भाऊ आहे..."
"त्याने माझ्या बहिणीला पूर्ण गावभर नग्न अवस्थेत फिरवलं आणि तिचा बलात्कार केला... तो कोणाचाच भाऊ नाही होवू शकत... मला जर तो कुठे सापडला ना तर मीच त्याला मारून टाकेल..." संत्या बोलला...
संगीता अजून काहीच बोलू शकली नाही...
"अजून काही होण्याच्या आधी... मला घरी गेलं पाहिजे आदी..."
"रात्रीच काही होवू शकतं... मी संध्याकाळ झाली तर येईन मग आपण निघूया.." आदी बोलून निघून गेला...
--------------------------------------
रात्र झाली होती आणि गावात अशी शांतता पसरली होती जशी स्मशानभूमीत असते तशी... दूर-दूर पर्यंत कोणीच दिसत नव्हतं... बस दोन लोकं अशी आहेत जे गावात फिरत आहेत...
"एवढी भयाण शांतात ह्या पूर्वी मी गावात कधीच पाहिली नव्हती स्वामीजी..." राहुल्या बोलला...
"लोकं खूप घाबरले आहेत... घाबरणं तर शक्य आहे... असं भयानक दृश्य तर मी पण नाही पाहिलं कधी..." देव बोलला...
"तुम्हाला काय वाटतं... गावात पुन्हा येईल ती वस्तू..." राहुल बोलला...
"रक्त तोंडाला लागलं आहे त्याच्या... काही पण होवू शकतं..." देव बोलला...
राहुलच्या हातात तलवार होती आणि देवकडे विश्वास... दोघेही पूर्ण गावात बोलत बोलत फिरत होते...
अचानक त्यांना लांब कुठेतरी एक सावली दिसली...
"स्वामीजी ते काय आहे...?" राहुलने विचारले आणि हातातील तलवार अजूनच घट्ट पकडली...
"ये... कोण आहेस तू...?" देवने मागून आवाज दिला...
ती सावली त्यांचा आवाज ऐकून पळायला लागली...
"चल धरूया ह्याला.."देव बोलला...
राहुल आणि देव त्याच्या मागे मागे पाळायला लागले... पण ती सावली त्यांना चकवून कुठेतरी गायब झाली...
"तू इथून जा आणि मी इथे पाहतो..." देवने राहुलला आदेश दिला...
"ठीक आहे स्वामीजी..." राहुल बोलला...
तेव्हा एक खूप आगतिक, भयानक, भूतांचाही थरकाप उडवणारी आणि कानठली बसवणारी किंकाळी पूर्ण गावात घुमली...
"हि तर तशीच किंकाळी आहे जी शेतामध्ये घुमत होती... ह्याचा अर्थ ती भयानक वस्तू इथेच कुठेतरी जवळपास आहे..." देवने पळता पळता विचार केला...
राहुल पण किंकाळी ऐकून जागच्या जागी थिजल्यासारखा उभा राहिला आणि थरथरायला लागला...
"स्वामीजी कुठे गेलेत... ओह्ह... आता मी काय करू..."
नशिबाने तो आपल्या घराजवळच होता... त्याने लगेच आपल्या घराकडे आपली पावलं उचललीत... त्याने घराचा दरवाजावर थाप मारली... आतमध्ये पल्लवीने पण ती किंकाळी ऐकली होती आणि थरथर कापत होती...
"क$$ कोण आहे...?" पल्लवीने विचारले...
"मालकीण बाई मी आहे राहुल दरवाजा खोला..." राहुल बोलला...
पल्लवीने लगेच दरवाजा उघडला... दरवाजा उघडल्या उघडल्या राहुल लगेच आतमध्ये शिरला आणि दरवाजा बंद केला...
पल्लवी एवढी घाबरली होती कि ती लगेच राहुलला बिलगली...
"बरं झालं तू आलास ते मला इथे खूप भीती वाटत होती... ती किंकाळी ऐकली तू..." पल्लवी बोलली...
"हो ऐकली तेव्हाच तर इथे आलो आहे... मी बाहेर स्वामीजींना एकट सोडून आलो आहे.. काय करणार माझे हात पाय कापत होते.." राहुल बोलला...
"चिंता नको करूस स्वामीजी स्वतःला सांभाळून घेतील..." एवढं बोलून पल्लवीला आभास झाला आपल्या मूळ परिस्थितीचा आणि ती लगेच त्याच्यापासून विलग झाली...
----------------------------
देव त्या सावलीला आपल्याकडे येतांना पाहून लपला... ती सावली लपत लपत येत होती... जशीच ती सावली देवच्या पुढे गेली देवने तिला मागून पकडलं... त्या सावलीने घोंगडी घेतली होती ती लगेच खेचली...
"देव तू... तू माझ्या मागे पळत होतास..."
"संत्या तू...? हे सर्व काय आहे भाऊ...!!"
संत्या देवला पूर्ण गोष्ट ऐकवतो...
"ओह्ह... तर संगीता आदीच्या घरी आहे तर..." देव बोलला...
"हो... मी बस घरी जात होतो आणि तुम्ही माझ्या मागे लागलात... वरून ती भयानक किंकाळी... माझी तर हालातच खराब झाली... मी तर पुन्हा मागे वळून जाणार होतो पण उपसनाचा चेहरा डोळ्यासमोर फिरायला लागला... मला वाटलं मला कोणत्याही परीस्थित घरी गेलं पाहिजे..." संत्या बोलला...
"ठीक आहे मी तुला घरी सोडतो ये..." देव बोलला...
"ठीक आहे चल..."
"मग तुम्ही त्या जनावराला पाहिलं आहे... त्याच्याविषयी विस्तारपूर्वक सांग..." देव बोलला...
"मला तर तो कोणी पिशाच्च वाटतो..." संत्याने तर्क लावला...
"पिशाच्च... नाही नाही असं नाही होवू शकत...?" देव चिंतीत होत बोलला...
"का असं का बोलत आहेस...?" संत्याने विचारले...
"अजूनही खूप वर्षांपासून कुठेच कोणी पिशाच्चला नाही पाहिलं आहे... अचानक इथे गावात तो कुठून आला..." देव बोलला...
"पण मला तर तो पिशाच्चच वाटतो.. माणसांना तर पिशाच्चच खातात ना..." संत्या बोलला...
"तो जो कोणी आहे आज पुन्हा गावात आहे... ती किंकाळी त्याच्या इथे होण्याची चेतावणी आहे..."
संत्याचं घर आलं होतं... उपासना संत्याला पाहताच बिलगून स्फुन्दायला लागली...
संत्या ने पूर्ण कहाणी विस्तारपूर्वक तिला सांगितली...
"मी निघतो..." देव बोलला...
"तू एवढ्या रात्री कुठे जातोयस... इथेच थांब ना..." उपासना बोलली...
"माझं जाणं गरजेचं आहे..." देव बोलला आणि तिथून निघून गेला...
"देव खूप बदलला आहे दा..." उपासना बोलली...
"हो कळलं मला स्वामी बनला आहे..." संत्या बोलला...
-----------------------------------------
"हा राहुल कुठे राहिला... त्याच्या घरी जावून पाहतो... कदाचित तो तिथेच असेल..." देवने विचार केला...
देव राहुलच्या घरी पोहोचून बाहेरून कडी वाजवतो...
"स्वामीजी मला क्षमा करा तुम्हाला बाहेर एकट सोडून मी इथे आलो... मी ती भयानक किंकाळी ऐकून खूप घाबरलो होतो स्वामीजी..." राहुल बोलला...
"जर असं आहे तर तू इथेच थांब... मी आता मंदिरात जातोय आपल्या बाबांकडे... त्यांच्याशी पिशाच्च विषयी काही तरी विचारायचे आहे..." देव बोलला...
"प...प... पिशाच्च... ते तर खरोखर भूतांपेक्षाही भयानक असतात..." राहुल बोलला...
"आता फक्त हा अंदाज लावला आहे... तू आता इथेच थांब नंतर भेटूयात... मी पहिले आपल्या बाबांशी चर्चा करून घेतो... त्यांना पिशाच्च विषयी खूप काही माहिती आहे..."
"स्वामीजी मी येतो तुमच्या सोबत..."
देवने पल्लवीकडे पाहिले... पल्लवीच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव साफ साफ दिसत होते...
"नको तू इथेच थांब... ह्यांना भीती वाटेल..."
"पण तुम्ही एकटे..." राहुल बोलला...
"मी एकटा नाही आहे... परमेश्वर माझ्या सोबत आहे... तू इथेच थांब..." देव बोलला...
देवला राहुल्याच्या डोळ्यात पण भीती साफ दिसत होती... त्यामुळे तो राहुल्याला आपल्या सोबत घेवून जात नव्हता...
देव तिथून निघाला आणि विचार करायला लागला, "बाबांची पण तब्येत खराब आहे माहिती नाही काही सांगू शकतील कि नाही ते...!!"
देव रात्रीच्या भयाण शांततेत मंदिराच्या दिशेने पुढे जात होता... सर्वीकडे भयंकर थराराची जाणीव होत होती...
देव आपल्या बाबांच्या चरणाजवळ जावून बसला...
"बाबा आज मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे..." देव बोलला...
"काय झालं.. कोणती मदत हवी आहे तुला..." त्याचे बाबा बोलले...
मग देवने पूर्ण कहाणी त्यांना सांगितली... ती ऐकून त्याच्या बाबांनी त्याला सांगितले कि, "बेटा पिशाच्च देवयोनी मधून असतात आणि मांस खाणं त्यांना आवडतं... त्यांचं शरीर काळं आणि डोळे लाल असतात..."
"म्हणजे त्यांना त्यांच्या शरीराने ओळखता येवू शकतं...?" देव बोलला...
"चूक... पिशाच्च कोणताही रूप घेवू शकतात आणि ते तुमच्या डोळ्यासमोरून लगेच गायब पण होवू शकतात... ते आपल्या वास्तीविक रूपात कमीच भेटतील तुला... बस मला एवढंच माहिती आहे..."
"ह्याचा अर्थ पिशाच्च भूतांपेक्षा जास्त भयानक असतात..." देवने विचारले...
"भूतांची एक वेगळी सत्ता आहे आणि पिशाच्चची एक वेगळी..." बाबा बोलले...
"ठीक आहे मी निघतो बाबा... असं वाटतंय आज तो गावातच फिरत आहे..." देव बोलला...
"थांब बेटा... तू त्याला काहीच करू नाही शकत..."
"मी प्रयत्न तरी करेन बाबा..." देव चालता चालता मागे वळून बोलला...
"तू समजत नाही आहेस... जर हा पिशाच्च असेल तर तुझे कुठलेही प्रयत्न काम नाही करणार..." बाबा जोरात ओरडून बोलले... पण देव तर केंव्हाचाच निघून गेला होता...
देव गावातील काळोख्या गल्लीतून एकटा भटकत होता... पण त्याला काहीच दिसले नाही...
-------------------------------
"मालकीण बाई... तुम्ही झोपा घाबरू नका मी इथेच आहे..." राहुल बोलला...
"बाहेर खूप विचित्र शांतता पसरली आहे... जसं कि वादळापूर्वीची शांतता आहे..." पल्लवी बोलली...
"तुम्हाला पिशाच्च विषयी काही माहिती आहे का...?" राहुलने विचारले...
"प्लीज माझ्याशी अशी वार्ता करू नकोस आधीच मला भीती वाटत आहे..."
"क्षमा करा मालकीणबाई मी असंच विचारलं..." राहुल बोलला...
अचानक बाहेर काहीतरी कोणीतरी असल्याचा भास होतो आणि राहुल उठून खिडकीपाशी येवून पाहायला लागतो...
"कोण आहे...?"
"दिसत तर कोणीच नाही आहे पण असं वाटतंय कि कोणीतरी पळत गेला इथून..."
पल्लवी पण उठून खिडकीपाशी आली..., "कदाचित मांजर किंवा कुत्रा असेल..." पल्लवी बोलली...
पण तेव्हा एक तीच आगतिक भयंकर किंकाळी त्यांना ऐकायला आली... पल्लवी पुन्हा एवढी घाबरली कि ती पुन्हा राहुलला बिलगली...
"अर्ध्याहून जास्त लोकं तर हि किंकाळी ऐकूनच मरतील... कसली चेतावणी आहे हि भूतांची..." राहुल बोलला...
"मला खूप भीती वाटते राहुल... मला एवढ्या लवकर मरायचे नाही आहे..." पल्लवी बोलली... एवढं बोलून आणि स्थितीची जाणीव होताच ती हळूच त्याच्यापासून विलग झाली..
तिला असं बिलगलेलं पाहून राहुलच्या मनात तिच्या प्रती प्रेमाचं अंकुर फुटायला लागलं होतं...
पल्लवी पुन्हा त्याच्याजवळ आली आणि बोलली, "तुला.... तुला मी...चांगली वाटते काय...?"
"नाही मालकीण बाई... म्हणजे होय मालकीण बाई तुम्ही खूप चांगल्या आहात.. पण कोणास ठावूक आज मला काय होत आहे..." राहुल बोलला...
क्रमशः...
No comments:
Post a Comment