Wednesday, May 27, 2015

बाळासाहेबांचा हिमांशु
"मी माझ्या भावाची गोष्ट सांगत आहे.सुर्यकांत असं त्याचं नाव.आम्ही त्याला सुरी म्हणत असू.तो engineering साठी गावी राहायचा.तो खूप जिज्ञासू होता.त्याला नेहमी भूतांना पहायचं कुतूहल असे.तो engineeringच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याचं project च काम करण्यासाठी तो त्याच्या एका मित्राकडे गेला. नेहमीप्रमाणे. Project राहिला बाजूला, आणि गप्पा सुरु झाल्या.
मित्र म्हणाला, 'मुख्य रस्त्याला रोज रात्री अडीच वाजता एक सुंदर मुलगी उभी असते. Lift मागते,आणि जो कोणी lift देईल, त्याला मारून टाकते.' आता हा आधीच आगाऊ! त्यात हे ऐकून त्याची जिज्ञासा अजून वाढली.
तो बरोबर सव्वादोन ला त्याच्या मित्राच्या घरातून निघाला. त्याने गाडी त्याच रस्त्याला वळवली आणि थोड्या अंतरावर गाडी लावून तो त्या वेळेची वाट पाहू लागला. अडीच वाजले. त्या ओसाड मोकळ्या रस्त्यावर एक
पांढुरकी आकृती दिसू लागली. आणि तो भलताच खुश झाला. आज त्याची इतक्या वर्षांची इच्छा जी पूर्ण होणार होती. त्याने पुन्हा गाडी चालू केली. तो त्या मुलीच्या दिशेने जाऊ लागला. आता जे घडलं तो movie चा climax आहे.
ती मुलगी कमालीची सुंदर होती. पिवळसर रंगाचा छान dress आणि पायात पैंजण होते. तिने माझ्या भावाला हात
दाखवला आणि लिफ्ट मागितली. तिच्याकडे पाहून तो एकदम भावना वश झाला. त्याला इच्छा झाली कि गाडी थांबवावी पण त्याला जाणीव होती कि हि कोण आहे, म्हणून तो काही बोलला नाही. त्याने गाडीचा वेग वाढवला. तो जसा पुढे गेला, त्या मुलीचं रूप पालटलं. ती विद्रूप झाली. तिचे कपडे फाटले. आणि चेहरा बदलला. माझ्या भावाने वेग वाढवला. पण ती अंगे पळत होती. ती गाडीचे मागचे सीत पकडणार, इतक्यात सुरीने गाडी तुफान वेगात
पळवली. नंतर तिची हद्द संपली आणि ती थांबली. दादाने शेवटी ती गाडी खूप पुढे नेउन थांबवली.
इतक्यात मागून तिचा कर्कश आवाज आला. . . "पळालास म्हणून वाचलास. तुम्ही मुलांनीच माझा जीव घेतला.
मी एकालाही जिवंत नाही सोडणार. आज वाचलास, पुन्हा नाही वाचणार." असं बोलून ती अदृश्य झाली.
दादाने घरी येउन सगळं बाबांना सांगितलं. तेव्हा बाबा म्हणाले, 'तिच्यावर चार मुलांनी बलात्कार केलेला. पण
त्या मोठ्या बापाच्या औलादी होत्या. म्हणून त्यांच्यावर case नाही झाली. त्यामुळे आता ती तिथेच भटकत असते. जे कोणी तिच्याकडे पाहतात, त्या मुलांना मारून टाकते, पण मुलींना काहीही करत नाही. तिने एकदा एक मुलाला मारले, पण ताच्यासोबत असलेल्या मुलीकडे पाहून रडू लागली'.

No comments:

Post a Comment