Saturday, May 30, 2015

देव-उपासना भाग ~ ~ ३ ~~ किंकाळी

देव-उपासना
भाग ~ ~ ३ ~~ किंकाळी
आदित्य संतोषला पूर्ण गोष्ट सांगतो, तेव्हा त्यांना पुन्हा एक जोरदार किंकाळी ऐकायला येते...
"बघितलंस संतोष हे कोणी दुसरं आहे, आम्ही भलं का एवढे भयावह प्रकारे ओरडणार..." आदित्य संतोषला बोलला...
"पण तुम्ही दोघे एवढ्या रात्री इथे काय करत आहात, हे तर बरं झालं कि मी इथे आहे, बाबा असते तर लगेच तुला पकडून सईच्या घरी गेवून गेले असते, आणि सई तू, तुला काय हाच भेटला होता, एक नंबरचा लफंगा आणि हरामी मुलगा आहे..." संतोष रागाने बोलला...
"मी आदित्यशी प्रेम करते संतोष, आम्ही लग्न करणार आहोत, आदित्य लवकर माझ्या बाबांना भेटून लग्नाविषयी चर्चा करणार आहे..." सई बोलली...
"पण तुझ्या बाबांना आदित्य पसंत नाही, ते कदापि ह्या लग्नाला होकार देणार नाहीत..." संतोष बोलला...
"बस्स संतोष... खूप झालं.... तू आपल्या कामाशी काम ठेव.... ठीक आहे, आमच्या सोबत जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, चल सई...." आदित्य संतापून बोलला...
"हो-हो जा निघ इथून, मी तुम्हाला काही निमंत्रण दिले नव्हते, आणि ह्याच्या नंतर इथे दिसू पण नकोस नाही तर..." संतोष रागाने बोलला...
"नाही तर काय रे, काय करणार तू....." आदित्य पण तेवढ्याच त्वेषाने बोलला...
"संतोष..." झाडाच्या मागून संगीता ओरडते...
"हि कोण आहे...!!" आदित्य आश्चर्याने बोलला ...
संतोष लगेच पळत पळत झाडाच्या मागे जातो. सांगितला स्वतःचीच जाणीव उरलेली नव्हती... तिचा झाला होता पुतळा... ज्याचे पाय जमिनीत घट्ट रोवले गेले आहेत... एक हात शेजारच्या झाडाला टेकवलेला आहे... आणि नजर समोर शेताकडे खिळलेली... दुसरा हात स्वतःच्या कंबरे शेजारी लटकतो आहे आणि संपूर्ण शरीर घामाने निथळलेले आहे...
"काय झालं संगीता, घाबरू नकोस मी इथेच तर आहे..." थिजलेली संगीता हादरून संतोषकडे बघत होती... संतोषने तिला धरून गदागदा हालवले...
"ते...न ! ते... आता आता समोरच्या शेतात कोणीतरी घुसलं आहे..." संगीता समोरच्या शेताकडे बोट दाखवून इशारा करते....
"काय बोलतेस, मला तर काहीच दिसलं नाही..." संतोष तिने बोटाने दाखवलेल्या दिशेला पाहायला लागला...
"मी खरं बोलते संतोष... मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे..." संगीता बोलली...
तेव्हा आदित्य पण झाडाच्या मागे येतो, त्याच्या पाठोपाठ सई पण येते...
"ओह हो... साहेब थोड्यावेळापूर्वी आपल्याला प्रवचन देत होते आणि स्वतः इथे भाऊ साहेबांच्या चिमणीला फसवून ठेवलं आहे, असं वाटतंय तुला तुझा जीव जास्त झालेला आहे ..." आदित्य मस्करी करत बोलला...
"तोंड सांभाळून वार्ता कर आदित्य, आम्ही एकमेकांशी प्रेम करतो..." संतोष रागाने बोलला...
"अच्छा तुझं प्रेम म्हणजे प्रेम, आणि आमचं प्रेम म्हणजे लफडा कि काय ..." आदित्य हासत बोलला...
"आदित्य राहू दे, का त्यांच्या प्रेमाचं अपमान करत आहेस..." सई आदित्य ला बोलली...
"तू विसरलीस काय सई आता मघाशी हा आपल्यांना काय बोलत होता...?" आदित्य बोलला...
"आपण त्याच्या शेतात आहोत आदित्य, त्यामानाने आपलं पण चुकतंय ..." सई त्याला समजावत बोलली...
तेव्हा त्यांना समोरच्या शेतातील झाडांमध्ये सळसळ ऐकू आली... ज्याच्या नंतर सगळ्या आसमंतात एका मोठ्या आगतिक, भयावह किंकाळीचा आवाज घुमला. आणि मग सगळीकडे शांतताच शांतता पसरली... अगदी पूर्ववत...
"संतोष हे सर्व काय आहे, मला घरी सोड, मला खूप भीती वाटत आहे..." संगीता भयाने थरथर कापत बोलली...
"घाबरण्याची काहीच गोष्ट नाही आहे संगीता, जो पर्यंत मी आहे तो पर्यंत तुला काहीच होवू देणार नाही..." संतोष तिला बिलगत बोलला...
"आणि जर तू नाही राहिलास तर हे हे हे..." आदित्य हासत बोलला...
"आदित्य.... पागल झाला आहेस काय..." सईने आदित्यला दटावले...
"आदित्य सईला इथून लवकर घेवून जा, मला असं वाटतंय आज इथे काहीतरी गडबड आहे, ह्या सर्व गोष्टी आपण नंतरही करू शकतो..." संतोष आपला राग शांत करत बोलला...
"पण... पण असं वाटतंय... आता इथून निघणं कठीण आहे..." आदित्य भयाने थरथरत बोलला...
"काय फाजीलपणा करत आहेस, हद्द असते कोणत्याही गोष्टीची..." संतोष संतापून बोलला...
"आपल्या मागे बघ संतोष मी फाजीलपणा नाही करत आहे..." आदित्य बोलला...
संतोष मागे वळून पाहतो, त्याला असं काही दिसतं ज्याला पाहून त्याचं संपूर्ण अंग शहारलं...
"संगीता मागे नको पाहूस..." संतोष भयाने थरथरत बोलला...
"काय... काय आहे संतोष..." संगीताने विचारले...
"अरे देवा...! हि काय पिडा आहे..." सई आदित्यला बिलगत बोलली...
"हि विचार करण्याची वेळ नाही आहे सई पळ इथून जेवढ्या वेगाने पळता येईल तेवढ्या... संतोष विचार काय करतोयस चल निघ इथून..." आदित्य बोलला...
एवढं बोलून आदित्य आणि सई पळायला लागतात...
"संगीता माझा हात पकड आणि पळ इथून..." संतोष सांगितला बोलला आणि तिचा हात पकडून तिला खेचत आदित्य आणि सईच्या मागे मागे पळायला लागला...
क्रमशः

No comments:

Post a Comment