Wednesday, May 27, 2015

भाग १... कथा एका जन्माची

"काय हा वेडेपणा आहे .. या टोपल्या घेऊन आम्ही शहरात
जायच का..." अविनाश रागातच म्हणाला तसे त्याचे सासरे
केविलवाण्या स्वरात बोलू लागले.. " जावईबापु.....ही आपली
परंपरा हाय.. पोर सासरी निघाली की तीला शिदोरी
द्यावी लागतीया... तुम्हास्नी हे सम्द बाजारात इकतही घेता
यतय पर तीच्या आईन आण भनी बाळींनी रातीला जागरण करून
बनीवलया... न्हाई म्हणू नगा...." सास-यांचे शब्द ऐकताच
अविनाश बाहेर जाऊन आपल्या आलिशान मोटारीत बसला..
प्रियंकाने ही आपल्या आई वडिलांच्या पायाला स्पर्श करत
गळ्यात पडून थोड मन हलक केल... आणि मोटारीत जाऊन
बसली.. आज ती सासरी निघाली होती. डोंगराळ भाग
असलेल प्रियंकाच माहेर एक छोटस खेड असल तरी तीच्या
वडीलाना मोठा मान सन्मान होता... शिक्षण पुर्ण झाले
आणि चांगल स्थळ चालून आल. अविनाश तीच्यापेक्षा १० ते १२
वर्षानी मोठा होता.. पन घर, गाडी, बंगला खुप मोठे लोक
म्हणून मोठ्या आनंदान तीच लग्न लाऊन दिल.. जुन
महीण्यातील मृगनक्षत्राचे ढग पावसाच्या सहस्त्र धारांचा
वर्षाव करत होते... डोंगर द-यातून खळखळणारे छोटे छोटे झरे,
हिरवीगार वनराई, दाट ऊंच ऊंच झाडे, त्यातच डोंगरावर
उतरलेला एखादा पांढराशुभ्र 'मेघ' वा-याच्या संथ
झोक्यासोबत हळूहळू पुढे सरकायचा... त्या धुक्यातून वाट
काढत त्यांची मोटार खाली उताराला आली, तसे एखाद्या
तुडूंब भरून वहाणा-या ओढ्याजवळ उभ्या बाभळीच्या काटेरी
झाडावर वा-याच्या झोक्यासोबत हेलकावे घेणारी पक्षांची
गवताच्या काड्या विणुन तयार केलेली छोटी छोटी फिक्कट
पिवळ्या रंगाची घरटी... आणि त्यातूनच आपले भीजलेले पंख
झाडून पुन्हा भरारी घेणारे रंगीबेरंगी पक्षी... आपल्या
माहेरचा नेहमी डोळ्यासमोरचा हा निसर्ग आज
तीच्यासाठी परका झाला होता... माहेरच्या या आठवणी
मनात साठवत तीचा प्रवास सुरू झाला.... शहरात पोहचले
तेव्हा रात्र पडू लागली होती पन पावसाचा जोर कायम
होता...गजबजलेल्या शहरातून त्यांची गाडी पुढे जात होती
तशी प्रियंका ऊंच ऊंच इमरती पहात मनातून उमलून जायची...
थोड्या वेळात त्यांची गाडी शहराच्या गर्दीपासुन थोड दुर
काही अंतरावर असलेल्या एका आलीशान बंगल्याजवळ येऊन
थांबली...तसे एका वयस्कर माणुसाने त्यांच्या बंगल्याचे गेट
उघडले. बंगला खुपच मोठा होता.. भव्य, आलीशान असे
बंगल्याचे रुप न्याहाळती गाडीतून खाली उतरली... तोच
बंगल्याच्या वरील एका खिडकीतून कोणीतरी पडदा
किंचीतसा बाजुला करून किलकील्या नजरेने पहात असल्याच
दिसल... त्यांच्या कडे पाहून थोडी हसली आणी अविनाश
च्या मागे चालू लागली... अविनाश न दरवाजा चे लॉक
उघडायला किल्ली काढली तशी प्रियंका दचकली... तीच्या
मनात एक विचार चमकुन गेला... बाहेर तर कुलूप लावले आहे, मग
आत खिडकीतून कोण पहात होत... पन त्याकडे दुर्लक्ष करत ती
आत गेली...
बंगला आतून खुप प्रशस्त होता.. जिन्याच्या पाय-या चढत
अविनाश बोलू लागला... " तु थकली असशील... फ्रेश हो, मी
थोड बाहेर जाऊन येतो.... मग जेवायला बाहेरच जाऊ..." तीला
बेडरूम दाखवून अविनाश बाहेर पडला... साहित्य तसच ठेऊन ती
बेडवर तशीच आडवी झाली... प्रवासाचा खुप थकवा आला
होता... डोळ बंद करताच थोडी दचकुन उठली... आणि पुन्हा
तोच विचार पुन्हा मनात आला... 'कोण होत उभ त्या
खिडकीत'. आपली मान वळवून डावीकडे पाहील तर
खिडकीवर लावलेला पडदा हल्क्या हवेने बाजुला व्हायचा
आणि त्यातून बाहेर कोसळणा-या पाऊसासोबत वा-याने
झोके घेणारी त्याच्या बागेतील नारळीची झाडे दिसलीत...
तशी ती उठली आणि खिडकी जवळ जात पडदा बाजुला करत
खिडकीवरील काचेचा दरवाजा किंचीत उघडून बाहेर पाहू
लागली... दुरवर रस्त्याच्या दुतर्फा खांबावरील दिवे, त्यांच्या
प्रकाशात बरसणा-या पावसाच्या धारा दिसत होत्या... वा-
याच्या झोक्याबरोबरच पावसाचे थेंब आत शीरताच तीने
खिडकी बंद केली आणि मागे फिरली आणि दचकुन जागेवरच
उभी राहीली... मनात तोच वीचार आला आणि मागे पाहिल
ही तीच खिडकी होती जिच्या मधून तीला मघाशी कोणतरी
पहात असल्याच दिसल... तशीच ती पुन्हा त्या खिडकी जवळ
गेली आणि खाली पाहू लागली... तोच तीला बंगल्याच्या
डाव्या बाजुला अंधुक उजेडात एक छोट नारळाच झाड दीसल..
त्या खाली कसली तरी हलचाल जाणवत होती.. प्रियंका
थोड निरखुन पाहू लागली तशी त्या झाडाखाली कोणीतरी
आहे आणि ते एका हाताने झाडाला धरून गोल गोल फिरत
असल्याच दिसल... तीला थोड विचित्र वाटल म्हणून ती हे
पहाण्यासाठी आपल्या रुम मधून खाली आली. बाहेर येत तीन
वाचमन ला हाक दिली... "अहो.... काका.... " बंगल्याच्या
आवारात वाचमन ला रहाण्यासाठी बांधुन दिलेल्या छोट्या
घरातून हातात छत्री आणि टॉर्च घेऊन ते धावतच आले... "
बोला मालकीन बाई..." तशी प्रियंका म्हणाली.. " त्या
नारळीच्या झाडाखाली कोणीतरी आहे... जरा बघाल
का....?" तसे ते आपल्या हातातली टॉर्चचा प्रकाश पाडत पाहू
लागले... प्रियंका बंगल्याच्या पायरी वरच उभी राहून पहात
होती... वाचमन ने सगळीकडे पाहील पन काहीच दिसल
नाही... ती तशीच आत आली आणि आपल्या रूम मधे गेली..
बाहेर जेवायला जायच होत त्यामुळे शॉवर घेतला आणि तयार
होऊन अविनाशची वाट पहात बसली... वाचनाची आवड
असल्याने सोबत आणलेली काही गोष्टीची पुस्तकें काढून
त्यातल एक वाचत ती बेडवर आडवी झाली... आपले पाय बेडवरून
खाली सोडून तीच वाचन सुरू होत...पन वाचता वाचता कधी
झोप लागली तील समजलच नाही... इतक्यात आपल्या
पायाच्या तळव्यावर कोणाचातरी हल्का स्पर्श होत
असल्यासारख वाटू लागल... तीला हल्की जाग आली पन
डोळ्यावर झापड होतीच... पुन्हा ती तशीच झोपु लागली
तोच कोणीतरी आपल बोट पायाच्या तळव्यावर हळुच ओढल
तशी ती एकदम जागी झाली... झटकन आपले पाय वर घेऊन उठून
बसली... . वर घड्याळात पाहील तर दीड वाजलेला... कसला
तरी भास झाला असेल अशी मनाची समजुत काढली...
अविनाश अजुनही आला नव्हता... दिवसभर पोटात अन्नाचा
कण नव्हता त्यामुळे तीला भुकही लागली होती... अविनाश
ला फोन केला पन तो फोन उचलत नव्हता, शेवटी आईन बांधुन
दिलेली भाजी भाकरी खाऊन घोटभर पाणी प्यायली आणि
पुस्तक घेऊन पुन्हा वाचत बसली तोच अविनाश च्या गाडीचा
आवाज आला.. तीन खिडकीतून पाहिल तर अविनाश सोबत
आणखी एक माणुस होता...प्रियंकान आपले केस नीट केले आणि
एका हातात मोबाइल घेत दुस-या हाताने आपला पदर सावरत
खाली आली... ती खाली येई पर्यन्त दोन वेळ बेल वाजली
होती... गडबडीत तीने दरवाजा उघडला तसा पडत झडत
अविनाश आत आला.. तो खुप प्यायला होता... तो पडणार
तोच प्रियंकाने त्याला सावरले... प्रियंका काही विचारणार
तेवढ्यात सोबत आलेली व्यक्ति म्हणाली... " मालकीनबाई ...
मी तुमचा ड्राइवर 'बबन'.. त्यांना अशा अवस्थेत गाडी
चालवता येणार नव्हती त्यामुळे साहेबानीच मला फोन करून
बोलवुन घेतल होत..." एवढ बोलून ड्राइवर ने तीच्या हातात
गाडीची चावी दिली..आणि निघुन गेला..
हातातील मोबाइल सोफ्यावर ठेऊन अविनाश ला पकडुन ती
आपल्या बेडरूम मधे नेऊन बेडवर बसवले पन तो तीथच आडवा होत
झोपी गेला...त्यान दारू पिलेली पाहून प्रियंकाला भयंकर
संताप आला..... तीला झोप येत नव्हती म्हणून पुन्हा ते पुस्तक
वाचत बेडवरच बसली... वाचता वाचता तीला झोप लागते न
लागते तोच परत तीच्या पायाच्या तळव्यावरून बोट
फिरवल्यासारख्या स्पर्शाने ती झटकन जागी झाली... आणि
आपले पाय जवळ ओढून आजुबाजुला पाहू लागली.. या घरात
आल्यापासुन तीला हा एकच भास होत होता. कदाचित
आपल्या बेडखाली कोणीतरी लपुन बसले असेल या जाणीवेने
ती आणखी घाबरली... थोडा वेळ तशीच बसुन काही चाहुल येते
का पाहील पन सर्व काही शांत होत... मग तीन स्वता:
बेडखाली काही आहे का हे पहाण्याच ठरवल पन खाली
उतरण्याचा धाडस होत नव्हत म्हणून ... आपले केस वर बांधुन
बोडवर पालथी झाली, खाली पाहण्यासाठी हळू हळू पुढे सरकू
लागली तसे तीच्या काळजाचे ठोके वाढत होते... तीची नजर
बेडखाली फिरत होती, खाली काहीच नव्हते पन दुस-या
क्षणात लाईट्स गेल्या तशी ती घाबरली आणि कोणतीही
हलचाल न करता बेडवर शांत पडून राहीली... दुरवरून किंचीतसा
प्रकाश खिडकी मधुन येत होता... टॉर्च लावण्यासाठी
मोबाइल शोधू लागली तस लक्षात आल की मघाशी अविनाश
ला वर आणताना मोबाइल खाली हॉल मधेच राहीला... तशी
हतबल होऊन ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली... काही वेळ
एक निरव शांतता होती पन ती जास्त वेळ राहीली नाही...
आपल्या रूम मधे कसला तरी आवाज येत असल्याच प्रियंकाला
जाणवल... श्वास रोखुन प्रियंका तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न
करू लागली.. कोणीतरी आपल्या रुम मधील फर्शीवर कन्हत
कन्हत आपल डोक आपटत असल्यासारख वाटू लागल...
प्रियंकाला हे थोड विचित्रच वाटु लागल ... तोच कोणीतरी
रांगत,सरपटत फिरत असल्याच जाणवू लागल... ही चाहुल
तीच्या बेड खालुनच येत होती... अगदी तीच्या जवळ.. या
आवाजान तीच्या काळजाच पाणी झाली... भीतीने तीला
घाम फुटला होत... तीच्या रूम मधे भयान काळोखात, निरव
शांततेत कोणीतरी असह्य वेदनेने कन्हत रांगत, सरपटत फिरत होत,
ही विचीत्र चाहूल तीला प्रत्येक क्षणाला जाणवत होती...
आणि ते काय असेल या विचाराने भयभीत होऊन तीचा प्राण
कंठाशी आला. तीने आपले डोळे गच्च मीटून घेतले आणि
अविनाशचा हात घट्ट पकडून थरथर कापू लागली... हवेत गारवा
असला तरीही भीतीने तीला घाम फुटला होता... इतक्यात
तीला जाणवल की कोणीतरी आपल्या बेडवर चढण्याचा
प्रयत्न करतय... आता मात्र हे तिच्या सहणशक्ति पलीकडच
होत... भीतीने काळजाचे वाढणारे ठोके तीला स्पष्ट ऐकु येत
होते... जोरात ओरडाव अस वाटल पन दुस-याच क्षणाला
आपल्या एका हातानी आपल तोंड दाबुन धरल पन भीतीने
तीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागल... प्रियंका आता भीतीने
थरथर कापत होती... थोड धाडस करून तीन आपले डोळे किंचीत
उघडून पाहू लागली तस खिडकीतून आत येणा-या थोड्या
प्रकाशात तीला आपल्या बेडवर एक बुटकी, काळी आकृति
दिसली आपल्या लालसर किलकील्या नजरेने ती आकृति एकटक
प्रियंका कडे पहात होती... ते भीषण द्रुष्य पाहून प्रियंकाच्या
अंगावर सर्रर्रर्रर्रर सर्रर्रर्रर्रर्र काटा येऊ लागला... आणि दुस-
याच क्षणाला त्या आकृतिच्या मागुन आणखी एक पांढरट
आकृति सरकत बाजुला झाली...आता मात्र प्रियंकाची
सहनशक्तिच संपली.... आपल्या दोन्ही मुठी करकचुन आवळुन ती
जोराने किंचाळणार तोच लाइट्स आल्या आणि त्या भयानक
आकृत्या कुठेतरी नाहीशा झाल्या.. मघापासुन सुरू असलेला
थरार, तो विचित्र आवाज सर्व काही शांत झाल होत...
घड्याळात पाहील तर रात्रीचे ३ वाजुन गेलेले... प्रियंका
अजुनही थरथरत होती... भयभीत नजरेने ती आजुबाजूला पहात
होती इतक्यात तीची नजर बेडरूमच्या दरवाजा वर गेली...
दरवाजाच्या खालच्या फटीतून पलकडे कोणीतरी उभ आहे
आणि हळू हळू दूर चालत जात असल्याच जाणवल... मघापासून
सुरु असलेला भयानक खेळ थांबला असला तरी प्रियंका
काळीज अजुनही जोरजोरात धडधडत होत... ही रात्र कधी
संपेल अस तीला वाटत होत... पहाटे कधी झोप लागली समजलच
नाही... तीला सकाळी जाग आली तेव्हा अविनाश आवरून
office ला जाण्याची तयारी करत होता... रात्रि घडलेला
प्रकार अविनाश ला सांगावा अस वाटल पन त्याच्या तापट
स्वभावामुळे ती काही न बोलता उठली आणि फ्रेश व्हयला
गेली... तेच बाहेरून अविनाश चा आवाज आला .. "
मला उशीर होतोय... मी निघतो.... बाहेरच जेवण करेन..." एवढ
बोलुन तो निघून गेला... फ्रेश होऊन तीन आपल्या आई ला फोन
केला...फोन तीच्या बहीनीन उचलला... " हैलो...ताई... कशी
आहेस ग...." " वैशु...आईकडे फोन दे..." प्रियंकाचा आवाज खुप
जड वाटत होता... वैशालीने पन लगेच आईकड फोन दिला तस
प्रियंकान रात्रि घडलेला भयंकर प्रकार आईला सांगितला...
ती खुपच घाबरली होती... बोलता बोलता तीच्या अंगावर
शहारा यायचा.. तीच बोलन ऐकून आई लागेच गावातील
देवळात गेली... देवळातील पुजा-यान सार काही ऐकल आणि
गंभीर मुद्रेन देवीच्या पायाला स्पर्श करून अंगा-याची पुडी
आणि लाल धागा देत म्हणाले.. " पोरी... ज्या घरात तु मलगी
दिलीस त्या घरावर मृत्युची काळी सावली दिसते ग...हे
लवकरात लवकर तुझ्या पोरीला दे आणि सावध रहायला सांग...
आता आईच तीच रक्षण करेल...." प्रियंकाच्या वडीलाचा
तीच्यावर खुप प्रेम... पुजा-यांच बोलण ऐकताच ते आपल्या
मुलीची काळजी वाटु लागली.. त्यांनी तो धागा आणि
अंगारा घेतला . क्षणाचाही विलंब न करता दोघे s.t. ने
लेकीच्या घरी निघाले... इकडे प्रियंकाला एवढ्या मोठ्या
घरात कोंडल्यासारख होऊ लागल... पन आपले वडील येत आहेत हे
समजताच तीला बर वाटल... बाहेर पावसाची उघडझाप चालुच
होती... थोड्या वेळात धुण भांडी करणारी बाई आली तस
प्रियंकाला थोड बर वाटल..काही जास्त न बोलता तीन
आपल काम केल आणि निघुनही गेली... तशी पुन्हा तीला
एकांताची भीती वाटू लागली... रात्रि घडलेल्या जागरणाने
आता दिवसा तीच्या डोळ्यावर झोपड येत होती... हॉल
मधील सोफ्यावर बसल्या बसल्याच तीला डोळा लागला...
आणि पुन्हा तेच घडले पन या वेळ तीला आपल्या पायाजवळ
तीच काळीकुट्ट बुटकी आकृति बसल्यासारख दिसल... त्या
आकृतिने जोरात आपले नख तीच्या पायाच्या तळव्यावर ओढले
तशी झटकन प्रियंकान आपले पाय जवळ ओढून जागी झाली...
पन कोणीच नव्हत... तेच स्वप्न तीला पुन्हा दिसले तशी
अस्वस्थ झाली... इतक्यात दरवाजाची बेल वाजली... आपले
आई बाबा आले असतील म्हणून ती घाई घाईत दरवाजा कडे
धावली... आणि खरच तीचे आई बाबा आलेले... आईला बघताच
तीला भरून आल... त्यांना घेऊन प्रियंका आत आली तोच
तीची आई म्हणाली... " पीयु... फर्शीवर हे लाल डाग कसले
ग..." तसे तीने खाली पाहील तर खरच लाल रंगाचे पण एकाच
पायाचे ठसे उठले होते... ते पाहून तीच्या काळजाचा थरकाप
उडाला... चेह-यावर एकदम भीती दाटली.. आणि थरथरत्या
आवाजात ती म्हणाली... " हे...हे.....हे....श....श....शक्य
नाही.... मी....मी......स्वप्न पाहील होत...." एवढ बोलुन ती
खुर्चीवर बसली आणि पायाच्या तळव्याकडे पाहील तसे तीचे
डोळेच पांढरे झाले... एखादी काच पायात घुसावी तसे पायात
भेग पडली होती आणि एकसारख त्यातून रक्त वहात होत... "
अ....आई......म...म....मला...स्वप्न...." तीच्या थरथरत्या
ओठातून ऐवढेच शब्द निघाले आणी बेशुद्ध झाली.. काही वेळात
ती जागी झाली तेव्हा ती आपल्या बेडवर होती... पायाला
पट्टी बांधलेली तर आई वडील बाजुलाच बसलेले आणि अविनाश
मोबाइल वर कोणाशीतरी बोलत होता... शुद्धवर येताच ती
आईच्या गळ्यात पडून रडू लागली... अविनाश काळजीने
म्हणाला... "कस झाल हे....स्वताला सांभाळून काम करायच
ना..." प्रियंकाच्या वडीलानी सोबत आणलेला देवीचा
अंगारा आणी लाल धागा प्रियंकाला बांधू लागले तसा
अविनाश रागातच म्हणाला... "ते आधी काढुन टाका ..या
घरात असल्या खुळचट गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत
नाहीत.." जावयाचे शब्द कानावर पडताच तीच्या वडिलाना
भयंकर राग आला तरी स्वताला सावरत ते म्हणाले.. " जावई
बापु.... तुमच्याकड सगळ काही आहे ... एक बायको मेली तर
दुसरी मिळल..पन आपल्या मुलगीच काही बर वाईट झाल, तर
रक्ताच पाणी करून फुलासारख मुलीला वाढवणा-या ह्या
बापाच्या काळजाच काय होईल हे तुम्हाला नाही
कळायच..." सास-याच्या या उत्तरान अविनाश गप्पच झाला..
त्यांनी धागा बांधला आणि त्या दिवशी घरीच राहीले...
दुस-या दिवशी प्रियंकाचे आई वडील मुलीचा आणि
जावयाचा निरोप घेऊन परतले... या घटनेला आता तीन चार
महीने उलटून गेले असतील... दोघाचा संसार सुखात चालला
होता... आता तीला कसलाच भास होत नव्हता आणि ती
गरोदर होती... गौरी- गणपतीच्या सणासाठी ती आता
माहेरी आलेली... घरात सगळे आनंदी होते... पन ही एका भयान
वादळा पुर्वीची शांतता होती... गौरी गणपतीच्या सणात
आपल्या मैत्रीणीसोबत चार दिवस घालवून ती आज सासरी
निघाली.. आईने तीला ग्रामदेवतेच्या पायावर डोक ठेऊन
आशीर्वाद घ्यायला सांगितल तशी प्रियंका देवळात गेली...
देवीच्या पाया पडली आणि देवळातील गुरवाच्या पाया पडून
आशीर्वाद घेतला तसे गुरव शांतपने म्हणाले.. " पोरी लग्ना नंतर
ज्या विचित्र घटना तुझ्या आयुष्यात घडल्या त्या मी
दिलेल्या धाग्याने बंद झाल्या नाहीत ... त्या घटना पुढे तुझ्या
आयुष्यात येणा-या एका भयान वादळे सुचक होते..." प्रियंका
थोडी घाबरली आणि हात जोडून त्यांच्या समोर बसली...
क्रमश:

No comments:

Post a Comment