Thursday, May 28, 2015

पापी... एक गूढ सत्य भाग दुसरा

 पापी... एक गूढ सत्य थरारक आणि रहस्यमयी कथा

अध्याय पहिला पराभव

भाग दुसरा 

त्या दिवशी इन्स्पेक्टर शिरीष भोसले घरचा चिकन-करीचा बेत ओरपुन निद्रास्त झाले होते तेंव्हाच त्यांना पोलीस स्टेशनमधुन गुन्हाची बातमी देणारा फोन आला होता आणि चरफडतच रात्रीच्या गारठ्यात ड्युटीचे कपडे अंगावर चढवुन ते घराबाहेर पडले होते.

"शिऱ्या, काय विचार करतोयस तू...?" पूर्ण पडताळणी करून पोलिस स्टेशनमध्ये पोलिस इन्स्पेक्टर शिरीष भोसले उर्फ शिऱ्या आणि स्पेशल ब्रांच ऑफिसर संतोष पाटील उर्फ संत्या बोलण्यात मग्न होते...

"काहीच नाही, उलट तूच मला सांगितले पाहिजेस असं मला वाटतं, कारण इथे एक्स्पर्ट तूच आहेस ना...!!" शिऱ्या त्याची टिंगल करत आणि टोमणा मारत बोलला...

"हे बघ... हे माझं काम नाही आहे, मला पोलिस कमिश्नरांनी डायरेक्ट ऑर्डर दिले आहेत म्हणून ह्या केसमध्ये मी तुझी मदत करतोय..." संत्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला...

"हो हो मला माहिती आहे कि फक्त स्पेशल ब्रांचवालेच कामं करतात आणि आमच्यासारखे पोलिसवाले असेच भरती करून ठेवले आहेत..." शिऱ्याने पुढचा तीर मारला...

"ठीक आहे, कदाचित आपल्यांना एकत्र काम करण्यापलीकडे आत्ता काहीच उरलं नाही आहे... तर मग आता तू काय माहिती गोळा केली आहेस..." शेवटी संत्यानेच त्याच्याशी हुज्जत न घालता कामाची गोष्ट काढली...

"ती एक वेश्या होती... आणि ते वेश्यावृत्तीचे धंदे इरफान चालवतो..." शिऱ्याने माहिती दिली...

"इरफान...??" संत्याने विचारले...

"हो... मी त्याच्याशी बोललो, पण ज्याने तिला पाठवण्यासाठी सांगितले होते, त्याने आपलं नाव, गाव काहीच सांगितलं नव्हतं बस हा पत्ता देवून पाठवण्यासाठी सांगितलं होतं..." शिऱ्या बोलला...

"इरफानला ज्या नंबरवरून कॉल आला होता त्या नंबर विषयी तू काही माहिती काढलीस कि नाही..."

"हो... पण प्रयत्न बेकार गेले... आय.एस.डी. फेक नंबर..."

"आणि मेडिकल रिपोर्टमध्ये काही खास बाबी...?"

"रिपोर्टमध्ये हे नमूद केलं आहे कि हिचा खून करण्याच्या पहिले हिच्याशी कोणीच शारीरिक संबंध केला नाही... ह्याचा अर्थ असा होतो कि हिला फक्त हिचा खून करण्यासाठी बोलावलं गेलं होतं... आणि एकदम लक्षपूर्वक पाहशील तर तिच्या गळ्यावर ह्या प्रकारे घाव केला आहे कि तिचं फक्त रक्तच निघालं पाहिजे... आणि हीच गोष्ट आहे कि जी माझं डोकं फिरवत आहे..." शिऱ्या एका दमात एवढी सर्व माहिती संत्याला सांगतो...

"ह्या खुनाची खूप साऱ्या बाबी खूप गुंतागुंतीच्या आहेत... सारखं सारखं मला असं का वाटतंय कि हे कोणत्या सध्या माणसाचं काम नाही आहे, हि केस जशी दिसते त्याहीपेक्षा गुंतागुंतीची आहे, आणि काही ना काही तरी असं आहे जे आपल्यांना दिसत नाही आहे किंवा आपण त्याला पाहूनही दुर्लक्षित करत आहोत..." संत्या तर्क लावत बोलला...

"त्यासाठीच तर तुला इथे पाठवलं आहे..." शिऱ्या पुन्हा सुरु झाला होता...

ह्यावेळी संत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करत घटना स्थळाचे चित्र लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली... अचानक त्याची नजर एका चित्रावर केंद्रित होते...

"खुन्याने दिवाळावर हे जे काही नंबर्स आणि चिन्ह बनवले आहेत त्या विषयी तू काही विचार केला आहेस काय...?" संत्याने विचारले...

"खरं सांगू मी थकलोय ह्या विषयी विचार करून करून कि कोणी एका वेश्याला बोलावणार आणि मग तिचं रक्त काढून तिचा खून करून तिच्याच रक्ताने दिवाळावर काही लिहून पण जाणार... आणि पूर्ण रूम अशी असेल जिथे जसं काही घडलंच नाही... तिथे एकाचे पण बोटांचे ठसे मिळालेले नाहीत..." शेवटी शिऱ्याने आपला पराभव मानला...

"नाही ह्यात आपण पूर्णपणे पराभूत झालेलो आहोत..." संत्याने त्याचे अर्धवट वाक्य पूर्ण केलं...

"एक मिनट... एक मिनट थांब कदाचित मी कोणाला तरी ओळखतो जो आपली ह्यात मदत करू शकेल... मला पूर्णपणे तरी काही आठवत नाही पण असल्या हुबेहूब मिळणाऱ्या मर्डर केसच्या फ़ाइल्स मी वाचल्या आहेत... त्यामध्ये असलंच रक्ताने लिहिलेल्या नंबर्स आणि चिन्हांची माहिती होती... हे चिन्ह आणि नंबर्स एका कोडींग प्रमाणे आहेत... हे चिन्ह आणि नंबर्स काही तरी सांगत आहेत पण असं समजणार नाही ह्यांना डिकोड करावं लागणार..." संत्या दृढतापूर्वक बोलला पण त्याची नजर त्या नंबर्स आणि चिन्हांवरून हटतच नव्हती...


क्रमशः...

No comments:

Post a Comment